भा. रा. भागवत प्रश्नमंजूषा
तुम्ही स्वतःला पुस्तकातला किडा समजता? जेवता खाता पुस्तकं वाचून, चश्मिष्ट म्हणून चिडवून घेऊन, पुस्तकात नाक खुपसून तुमचं लहानपण गेलंय? फास्टर फेणे, बिपिन बुकलवार, नंदू नवाथे आणि रॉबिन हुड ही नावं तुम्हांला मित्रासारखी जवळची वाटतात? ज्यूल व्हर्न आणि एच. जी. वेल्स आणि आर्थर कॉनन डॉयल या लोकांशी तुमची ओळख मराठीतून झालीय? द्या टाळी!
मग भारांना तुम्ही किती ओळखता ते आजमावून बघाच! ही आमची प्रश्नमंजूषा भा. रा. भागवतांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त सहर्ष सादर...
हां, ही प्रश्नमंजूषा स्पर्धेचा एक भाग आहे, हे ही लक्षात असू द्या! तुम्हांला लेखनस्पर्धेतही सहभागी होण्याचा पर्याय आहेच. तुम्ही दोन्ही स्पर्धांतही सहभागी होऊ शकता. लेखनस्पर्धेचा तपशील इथे.
प्रश्नमंजूषा व लेखनस्पर्धेच्या संयुक्त विजेत्याला रुपये १००० किंमतीची पुस्तके / पुस्तकांच्या दुकानाचे गिफ्ट व्हाउचर देण्यात येईल.
प्रश्नमंजुषेच्या विजेत्याला देण्यात येणारी बक्षिसं खालीलप्रमाणे:
प्रथम क्रमांक: भारांची रुपये १००० किंमतीची पुस्तके
द्वितीय क्रमांक: भारांची रुपये ७५० किंमतीची पुस्तके
तृतीय क्रमांक: भारांची रुपये ५०० किंमतीची पुस्तके
शिवाय दोन्ही विभागातील विजेत्यांचे नावे तसेच लेखनस्पर्धेतील विजेता मजकूर २५ मेपासून टप्प्याटप्प्याने प्रकाशित होणार्या ’ऐसी अक्षरे’च्या भा. रा. भागवत विशेषांकात प्रसिद्ध केला जाईल. मग? बघताय काय? सामील व्हा! ’ऐसी अक्षरे’वर या, सभासदत्व घ्या नि उत्तरं पाठवा. बक्षिसं जिंका. भागवत विशेषांकात लेखनाचे मानकरी व्हा.... कमॉन, फास्ट!
स्पर्धकांना शुभेच्छा.
स्पर्धकांना शुभेच्छा.