कंटाळा!
कंटाळा
अस्वस्थ कंटाळा
इथून तिथून, तुला मला,
आतून बाहेरून, मुळापासून
खच्ची करत जाणारा
कं टा ळा
स्वस्त, भडक, टिपटिप
गळत राहतो कंटाळा
पिरपिर, मचमच, कुरकुर
गडद गडद गडद कंटाळा
एक जिवंतपणाची खूण दिसावी
वाट बघत राहतो कंटाळा.
- नी
कंटाळा
अस्वस्थ कंटाळा
इथून तिथून, तुला मला,
आतून बाहेरून, मुळापासून
खच्ची करत जाणारा
कं टा ळा
स्वस्त, भडक, टिपटिप
गळत राहतो कंटाळा
पिरपिर, मचमच, कुरकुर
गडद गडद गडद कंटाळा
एक जिवंतपणाची खूण दिसावी
वाट बघत राहतो कंटाळा.
- नी
प्रतिक्रिया
एक जिवंतपणाची खूण दिसावी वाट
खरय. मला तर जेलसी सारखा दुर्गुणही आवडतो. कारण तिच्या फणकार्यात जिवंतपणाची चाहूल असते. अगदी हसण्यापेक्षाही रडणं ही आवडतं. पण कंटाळा नको. इन्टेन्स भावना आवडतात.
Love me OR hate me. Please don't ignore me
कारण तिच्या फणकार्यात
कारण तिच्या फणकार्यात जिवंतपणाची चाहूल असते. <<<
खरंय..
म्हणूनच सगळे मनाला शांती देतो म्हणणारे अध्यात्मिक नको होतात.
अस्वस्थ असू तर काहीतरी घडेल ना...
- नी
कविता विशेष नाही आवडली. पण
कविता विशेष नाही आवडली. पण माझं एक जुनं पोस्ट आठवलं. त्याची जाहिरात.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
छान
मेघनाताई,
तुमचं कंटाळ्यावरचं स्फुट फारच आवडलं.
कविताही आवडली, त्यांत तो एक 'कर्कश्श कंटाळा' घालायचा राहिलाय!
जालावरच्या कर्कश चर्चा वाचून
जालावरच्या कर्कश चर्चा वाचून अगदी असाच कंटाळा येतो.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मला ही धागे हायजॅक
मला ही धागे हायजॅक करणार्यांचा कंटाळा येतो,
.
एखाद्या कवितेच्या शब्दांशी खेळून तश्शीच आपली कविता जुळवून ती कशी श्रेष्ठ आहे हे सुचविणार्यांचा ही अफाट्/अमाप्/अतुलनिय/अचाट कंटाळा येतो. मीटरमध्येच कविता का असावी? कवितेचे अस्तित्व फक्त "बस्स ती आहे.... अशी आहे" असे का असू नये?
अशी असावी कविता म्हणूनतशी
अशी असावी कविता म्हणून
तशी नसावी कविता म्हणून
सांगावया कोण तुम्ही कवीला
आहात मोठे, पुसतो तुम्हांला?
ही केशवसुतांची कविता आहे. आयरनी इज़ दॅट इट इटसेल्फ इज़ इन उपजाती मीटर.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
वाह!
वाह!
छान संदर्भ. पण मीटरचा प्रश्न
छान संदर्भ.
पण मीटरचा प्रश्न कुठे आला?
- नी
इदंनमम यांच्या प्रतिसादात
इदंनमम यांच्या प्रतिसादात आला..तो तिथे कसा आला ते माहिती नाही.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ओके.
ओके.
- नी
मार्मिक!
खरे आहे. कविता मीटरमध्ये असू नये. किमान वीसएक हजार तरी किलोमीटर१च्या बाहेर असावी. काय आहे, पॉइंट ब्ल्यांक रेंजमध्ये अत्यंत कर्कश भासते.
.....................
१ पृथ्वीचा सुमारे अर्धा परीघ.
'अभ्यासाचा कंटाळा, भाग्याला
'अभ्यासाचा कंटाळा, भाग्याला टाळा' असे आमची आई आम्हाला लहानपणी सांगायची.
वा! उत्तम.
वा! उत्तम.
कवितेत माझं नाव घेतल्याबद्दल
कवितेत माझं नाव घेतल्याबद्दल धन्यवाद!
अरे. कवितेत
अरे, कवितेत घेतलेलं नाव आहे ते, उखाण्यात नैये काही.
...
(वाइल्ड गेस...) म्हणून(च) तर धन्यवाद दिलेत ना त्यांनी!
कंटाळा
'कंटाळा' चांगला जमलाय.
अशाच कंटाळ्यातून आलेले आमचे दोन शब्द.
http://www.aisiakshare.com/node/2564
.
.
http://www.aisiakshare.com/node/1677