Skip to main content

आजची ज्वलंत चर्चा - सुरेल कोण?

दूरदर्शन वाहिन्यांवर, ज्वलंत आणि गंभीर मुद्यांवर चर्चा कश्या रंगतात....

हात हलवीत हातवारे आले, हा! हा! हा!. आज रंगणार सुरांची चर्चा, माऊ, कुत्रा, कोकीळ, कावळा, कोण सुरेल तुम्हीच ठरवा. (मनातल्या मनात इथे माझाच निर्णय अंतिम असतो) हा ! हा! हा!.उडी मारुनी मनी आली बारीक आवाजात हलकेच म्हणाली, हातवारे भाऊ, आवाज आहे माझा गोड, सदा गाते म्याऊ म्याऊ म्याऊ.तेवढ्यात ओरडला दादा कुत्रा, हळवा-बुजरा गळा तुझा, खर्जातला बघा सूर माझा, भों भों भों भों भों.

ना सुरांचे ज्ञान तुम्हास्नी, ना तालाचे भान, रडत असतील पूर्वज सारे, ऐकून तुमचे गान. परंपरेचे मला ज्ञान, संगीताची मीच आहे राणी, पंचम सूर हा ऐका माझा, कुह कुह कुह कुह.

ह: ह: ह: ह:, जुनाट बूर्ज्वा सूर तुझा, आज जमाना रेपचा, पुरोगामी या कावळ्याचा, रेप रेप रेप रेप, कांव कांव कांव कांव.
कोण बूर्ज्वा, तू हलकट, नालायक, चुडेल-डाकिन तू, कुह कुह, कांव कांव. म्याऊ म्याऊ, भों भों भों, हातवारेचा हा! हा! हा!.

ज्वलंत चर्चा रंगली अशी, कान लाउनी ऐकती सारी, ज्ञानी अज्ञानी प्रतीगामी, ऐकू आले केवळ, ढेन्चू, ढेन्चू, ढेन्चू गर्दभ गान.

आजची चर्चा इथेच संपली, आपण उद्या पुन्हा भेटू, नवीन विषय पण ओरड तीच, ढेन्चू, ढेन्चू ढेन्चू.
कुणाला काही कळले का? नसेल तर उद्या पहा ‘आजची ज्वलंत चर्चा’

Node read time
1 minute

ललित लेखनाचा प्रकार

1 minute

.शुचि. Wed, 12/08/2015 - 22:53

.

अस्वल Thu, 13/08/2015 - 01:44

आज जमाना रेपचा, पुरोगामी या कावळ्याचा, रेप रेप रेप रेप, कांव कांव कांव कांव.

ह्यातला रेप हा जाणीवपूर्वक उल्लेख आहे की रॅप म्हणायचं आहे?