नामाची महिमा न्यारी


नाम संकीर्तन साधन पैं सोपे
जळतील पापें जन्मांतरीची.
(संत. तुकोबाराय)

शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? अरे पण नाव नसते तर शेक्सपिअरला कोणी ओळखले असते. नावाच मुळे शेक्सपिअरला लोक आज ही ओळखतात. नावाची महीमाच न्यारी आहे. व्यक्तीपेक्षा त्याचे नाव मोठे असते. समुद्रावर सेतू बांधताना, राम नाव लिहिलेले पाषाण समुद्रावर तरंगत होते. पण भगवंतानी आपल्या हाताने समुद्रात टाकलेला दगड समुद्रात बुडाला कारण त्या दगडावर राम नाम लिहिलेले नव्हते. भगवंतापेक्षा, त्यांचे नाव जास्त परिणामकारक होते.

दिल्लीत प्रतिनियुक्तीवर आलेला एक सरकारी अधिकारी आपले विजेचे बिल ठीक करण्यासाठी DESUच्या कार्यालयात गेला. तिथल्या बाबूला आपले नाव आणि पद सांगून बिल ठीक करण्यास विनंती केली. च्यायला आपल्या पदाचा रौब दाखवितो, बाबू भडकला, इथे सर्वच मोठे अधिकारी येतात, आधी बिल भरा, अप्लिकेशन द्या, मग काय करायचे ते बघू. अधिकारी हात हलवीत कार्यालयात परतला. त्याने आपल्या पीएला, घडलेला प्रकार सांगितला. त्याच्या पीए म्हणाला ‘साब इतनी सी बात के लिये आपने क्यों तकलीफ ली’. त्याने साहेबांकडून बिल घेतले, लगेच DESUतल्या मोठ्या अधिकाऱ्याला फोन लावला, मी अमुक अधिकार्याच्या पीए बोलतो आहे, साहेबांच्या बिलात समस्या आहे, सिपाहीला पाठवीत आहे. अर्थातच दोन तासांत बिल ठीक झाले. आता हे ही समजले असेल, अधिकांश अधिकारी आपल्या घरची सर्व कामे अर्थात वीज, पाण्याची बिले, प्रापर्टी टेक्स, इन्कमटॅक्स, बेंकेच कामे इत्यादी आपल्या व्यक्तिगत स्टाफ कडून का करवून घेतात.

देवळात हि सतत प्रभूचे नाव घेणाऱ्या सेवकांचीच चलती असते. दिल्लीत दर मंगळवारी श्री रामाच्या मंदिरा एवजी हनुमान मंदिरातच भक्तांची भीड जास्त असते. भक्त रामनाम जपणार्या हनुमन्ताला त्यांच्यावर आलेले संकट दूर करण्याची विनंती करतात. हनुमंताला प्रसन्न करण्यासाठी त्याला नेवेद्य हि अर्पित करतात. श्रीरामाला कुणी विचारात सुद्धा नाही. तसेच शिवाच्या मंदिरात नंदीला आणि गणपतीच्या मंदिरात उन्दिराला हि अनन्य महत्व आहे. प्रभूचे हे सेवक हि भक्तांच्या हाकेला धावून येतात आणि त्यांचे संकट दूर करतात. म्हणूनच तुलसीदासांनी म्हंटले आहे,

संकट कटै मिटै सब पीरा,जो सुमिरै हनुमत बलबीरा.

अर्थात जे भगवंताला शक्य नाही ते कार्य हि भगवंताचे नामस्मरण करणारे भक्त सहज करू शकतात. आपण आज पाहतोच भगवंताचे नाव घेणारे लोक किती हि पाप करत असतील तरी ते भगवंताच्या कृपेने सुखी आणि समृद्ध होतात. साक्षात लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरते. महापापी सुद्धा पवित्र होतात. म्हणूनच समर्थांनी म्हंटले आहे.


नामें पाषाण तरले.
असंख्यात भक्त उद्धरिले.
महापापी तेची जाले.
परम पवित्र.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

मस्त. या लेखात कुणाचंच नाव न घेतल्यामुळे तो परिणामकारक झाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठीत महिमा तो असतो ना? उगाचच महिमा चौधरीचे नाव आठवून गेले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय "महीमा" हे पुल्लिंगी नाम आहे. आणि नामाचा महीमा नेहमीच अमर्याद, असीम वगैरे नसून अगाध असतो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाषा प्रवाही असते!!

फार्फार वर्षांपूर्वी मराठीत 'व्यक्ती' हा शब्द स्त्रीलिंगी असे. म्हणजे, संबंधीत व्यक्ती जरी पुल्लिंगी असली तरी शब्द स्त्रीलिंगी शब्दासारखाच चालवला जाई .

परंतु, आजकालचे जालीय मराठी वाचताना असे जाणवलेय की, सध्या हा शब्द लिंगानुसारे बदलतो!!

महिमा तर बोलून-चालून 'आ'कारांती! तेव्हा हा शब्द स्त्रीलिंगी होण्यास फार वेळ लागू नये! (महिमेचे नाव घेताच 'सविता' आठवली!!)

१ पर्शियनमध्ये 'यार' हा शब्द नेहेमीच पुल्लींगी असतो तसा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0