जीवनाची प्रभावी दशसूत्री!!
आपले जीवन हे रोज एकेका दिवसाने आपल्यासमोर येते. थेट मृत्यूपर्यंत!!
म्हणूनच आपला प्रत्येक दिवस सारखाच महत्त्वाचा असतो.
खाली दिलेल्या दहा गोष्टी रोज करा म्हणजे प्रत्येक दिवस सत्कारणी लागू शकेल.
अनेक सकारात्मक विचार, सुविचार आणि पुस्तके वाचून त्यात समान असे काही धागे मी शोधले आणि ते संकलन करून आपल्यापुढे मी मांडतो आहे. त्याने आपल्या सर्वांचा झालाच तर फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही. त्यामुळे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?
1) सकाळी देवाला स्मरून दिवसभराची आखणी करून दिवसाची सकारात्मक सुरूवात करावी. आपल्याला जे काही मिळाले आहे त्याबद्दल देवाचे अाभार मानून त्याबद्दल कृतज्ञता बाळगावी. जे मिळवायचे आहे त्याबद्दल दिवसभरात प्रयत्न करावेत. कर्म करत जावे. प्रत्येक दिवस हा चांगलाच दिवस असतो असे मनावर ठसवावे. कुठेतरी लिहून ठेवावे आणि मेंदूच्या एका कप्प्यात नेहेमीकरता जतन करून ठेवावे.
मोबाईल च्या फ्रंट स्क्रीन वर लिहून ठेवावे की - "Every day is a good day!"
2) रोज प्राणायाम आणि योगासने करावीत. जमल्यास सूर्यनमस्कार करा, विविध व्यायाम प्रकार करा किंवा सकारात्मक संगीत लावून तालबद्धतेने एकट्याने किंवा जमल्यास समुहात नाच करावा. तोही एक प्रकारचा व्यायामच होय.
3) रोज किमान अर्धा तास मौन बाळगावे आणि थोडे एकांतात चिंतन करावे. रोज एक वाईट सवय सोडण्याच्या दिशेने आणि एक तरी चांगली सवय अंगीकारण्याच्या दिशेने पाऊल टाकावे व थोडा तरी त्या दिशेने रोज प्रयत्न करावा. आणि स्वतःची कुणाशीच तुलना करू नये. प्रत्येक व्यक्ती वेगळा असतो. आपल्या पूर्वीच्या आणि आजच्या सुधारणेत फक्त तुलना करावी.
4) रोज थोडे अंतर एकट्याने चालावे. शक्यतो निसर्गाच्या सान्निध्यात थोडा तरी वेळ चालत चालत घालवावा.
5) रोज आपल्या वाट्याला आलेले काम (कर्म) मनापासून करावे. आशा, श्रद्धा, विश्वास, आत्मविश्वास आणि धैर्य कधीही गमावू नये. इतर काहीही गमावले तरी हरकत नाही, पण स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नये. आजच्या क्षणात पूर्ण जगावे मात्र भविष्याची जाणीव असू द्यावी.
6) रोज सकारात्मक सुविचार, पुस्तके, थोर पुरुषांची चरित्रे वाचावीत किंवा आॅडिओ टेप ऎकाव्यात.
7) रोज सकारात्मक संगीत ऎकावे.
8) रोज चेहेऱ्यावर स्मितहास्य ठेवावे, हास्यविनोद करावा. त्यामुळे मन हलके होते.
9) रोज कुणाला तरी छोटीशी का होईना मदत करावी. कुणाला तरी रोज सकारात्मक प्रेरणा जरूर द्यावी.
10) प्रत्येक रात्री दिवसभराची उजळणी करावी. त्यामुळे विसरलेल्या गोष्टी किंवा धागे किंवा एखादा मुद्दा ल्क्षात येतो. आपल्या समस्या व अडचणी या निसर्ग आणि दैवी शक्तींच्या हाती रात्रीपुरत्या सोपवून, दिवस कसाही गेला तरी जे दिवसभरात बरे वाईट घडले ते भविष्यातील चांगल्याची चाहूल होती असे समजून पुन्हा कृतज्ञतेने झोपून जावे.
वरच्या गोष्टींसाठी थोडा का होईना वेळ जरूर काढावा. मी सुद्धा या दहा गोष्टींत प्राविण्य मिळवले नाही किंवा सर्व गोष्टी अजून रोज करू शकत नाही पण प्रयत्न मात्र जरूर करत आहे. आपल्या मुलाना सुद्धा त्यांच्या कुमारावस्थेतच या गोष्टी शिकवा आणि शक्यतो सवय लावा.
ललित लेखनाचा प्रकार
पाणी वाहून जाण्यासाठीचं
पाणी वाहून जाण्यासाठीचं पन्हाळ/ळी*
घराच्या छपरावर गिधाडं बसली आहेत, आणि पन्हाळातून रक्त वाहतं आहे. (म्हणजे गुलजारभौ इथे सांगतेत की त्या घरातल्यांचं निर्घृण शिरकाण झालेलं आहे.)
*असा माझा समज आहे. पण त्याला काय अर्थ नाही. मला बरेच दिवस "लाँग गवाच्चा" मधला लाँग म्हणजे लवंग वाटत होती.
सांगतो. ऐका!
"जीना यहा मरना यहा, इसके सिवा जाना कहां?"; दिल के आरमा आसुओ में बह गये; या प्रकारचे गीत किंवा त्या प्रकारचे खिन्न विषाद निर्माण करणारे संगीत हे माझ्या दृष्टीकोनातून नकारात्मक आहे.
आणि "देवा श्रीगणेशा" (अग्निपथ); "हूड हूड द्बंग" (द्बंग); बैंग बैंग (टायटल सॉंग); "जर्राती जर्राती राफ्तारे है" (रा वन) अशा प्रकारची गाणी आणि संगीत हे माझ्या दृष्टीकोनातून सकारात्मक आहेत.
सकारात्मक लेख. एकंदरीत जीवनात
सकारात्मक लेख. एकंदरीत जीवनात शिस्त लावायला, आणि रोज काहीतरी थोडं थोडं चांगलं घडवण्यासाठी या सवयी उपयुक्त ठरतील.
माझी ही अकरावीची भर
११) वरच्या दहापैकी कुठच्याही गोष्टी जमल्या नाहीत, आणि तुमचा दिवस दोस्तांबरोबर दारू पिण्यात, दंगा करण्यात, नुसतंच हॅहॅहूहू करण्यात गेला तर सर्वात छान. कारण असे जास्त दिवस मिळवण्यासाठीच वरच्या दहा सवयी उपयुक्त आहेत, त्या सवयींसाठी तुमचं आयुष्य नाही.
निमिष दादा, भयकथा वाचणं
निमिष दादा, भयकथा वाचणं सकारात्मक की नकारात्मक हो? नाही नाही, भयकथा वाचून घाबरायला होतं, भिती वाटते आणि भिती-घाबरणे हे नकारात्मक असतं म्हणून हा प्रश्न नाहीये पण काही भयकथा ह्या जाम थुकरट असतात आणि त्या वाचून संताप, चिडचिड, खुनाची भावना जागृत होते मग त्याला नकारात्मक म्हणावं का? असल्यास वाचू नये का? वाचण्यापलिकडेही त्यास प्रत्साहन कसं मिळत नाही ह्या साठी वाचकांनी प्रयत्न करायला हवेत का?
हा प्रतिसाद लिहून बाकी फार मंगल वाटतंय बरं - धन्यवाद!
;) :D
प्रत्येक रात्री दिवसभराची
प्रत्येक रात्री दिवसभराची उजळणी करावी. त्यामुळे विसरलेल्या गोष्टी किंवा धागे किंवा एखादा मुद्दा ल्क्षात येतो. आपल्या समस्या व अडचणी या निसर्ग आणि दैवी शक्तींच्या हाती रात्रीपुरत्या सोपवून, दिवस कसाही गेला तरी जे दिवसभरात बरे वाईट घडले ते भविष्यातील चांगल्याची चाहूल होती असे समजून पुन्हा कृतज्ञतेने झोपून जावे.
...हे पटले बॉ !
एवढेच नाही
प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या माऊंट अबू, या शाखेत फार सुंदर, फुलांची बाग आहे. आमचा हॉटेलवाला म्हणाला, बाग जरुर बघून या, पण त्यासाठी आधी बौद्धिक ऐकण्याची सहनशक्ती असेल, तरच जा. आता, या देशांत आमच्या अंगी, सहनशक्तीचा तर अमर्याद साठा आहे. म्हणून गेलो. फुलबाग तर अप्रतिमच होती, पण फोटो काढायला बंदी होती. बौद्धिकांत, एक आकर्षक स्कीम होती. जर त्यांचे मेंबर झालो तर लवकरच येणार्या सत्ययुगांत, आमच्या चारजणांचे जन्म नक्की! आता, लवकरच म्हणजे नक्की कधी, यावर मी हटून बसल्यामुळे, टाळाटाळ करणार्या त्या प्रजापित्याने ३०-३५ वर्षे असे सांगितले. वरील घटनेला आता १५ वर्षे तरी झाली असावीत. म्हणजे आता फक्त १५-२० वर्षेच राहिली आहेत. त्यानंतर कलियुगाचा 'दी एन्ड' आणि ढँट-ढॅण सत्ययुगाची सुरवात! आम्ही तर मेंबर झालो नाही, पण इच्छुकांना लाभ घेता येईल.
 
         
7) रोज सकारात्मक संगीत
- मंग नकारात्मक संगीत ते काय असतं भौ?
___
बाकी मुद्दे पटनीय.