लंगडा भिंगाऱ्या

अंधारायला आलं होतं.
लंगडा भिंगाऱ्या वैरण घेउन आला.
आण्णा नांगरटीला गेला होता .
मंजु भाकऱ्या थापत होती .
लंगडा भिंगाऱ्यानं वैरण कापून गुरांना टाकली .
पोरं पडवीत शाळेतला गृहपाठ करत होती .
वैरण टाकून भिंगाऱ्या दिवसभराचा थकवा काढायला अड्यावर गेला .
दोन गलास रिकामे करुन पुन्हा झोकांड्या खातच घरी आला.
मंजुनं त्याला भाकर कालवण दिलं.
त्यानं ते पडवीत बसून खाल्लं.
भिंगाऱ्या एका पायान लंगडा असला तरी रेड्यासारखं काम करायचा.
चार गुरांचा चारा एका खेपेत आणायचा.
माजघरातील सतरंजी उचलून तो व्हरांड्यात येऊन पसरला.
त्याची नेहमीची गौळत म्हणत तसाच पडून राहिला.
तो गौळणी कुठे शिकला देवजाणे.
एकदा किक बसल्यावर त्याच्या गौळणी तारस्वरात रात्र रात्र चालायच्या.
" लय माज आलाय का भिंगार " गोठ्यात बैलं बांधताना मालकाचा आवाज आला.
मालक कधी आलं त्याला कळलंच नाही .
" न्हाय आण्णा, जरा पडलू हुतु" म्हणत तो आणखी सावरून झोपला.
मालकापुढं त्याची चांगलीच टरकायची.
मालक त्याला गुरासारख कामाला लावायचा. तो निमुटपणे करायचा. शेवटी भाकर तुकड्याचा सवाल होता.
गारगारं वाऱ्यात त्याचा डोळा लागला.
राती कधीतरी त्याला जाग आली.
आतल्या खोलीतनं खाटेची खडखड कानावर आली.
मंजु रत होतं होती. मालक पण लयबद्ध होता.
भिंगाऱ्याला हे नेहमीचं होतं.
एकदा तर मंजुच पाय त्यानं मालकाच्या गळ्यात बघितले होते.
तेव्हा डोक्यात कितीतरी वेळ भुंगा भुणभुणत होता. आज जरा कमीच.
मागल्या पावसाळ्याची रात्र त्याला कधीचं विसरायची नव्हती .
बैलाचं शिंग बरगडीत घुसलं, म्हणून मालक हप्ताभर दवाखान्यात होता.
पाऊसाच्या पिरपिरीमुळं तो घरातचं झोपला होता.
त्या रात्री मंजु तरटावली होती.
तिचं सुचनचं बंद झालं होतं.
भिंगाऱ्यासंग ती रत झाली होती.
भिंगाऱ्याचं आभाळचं फाटलं होतं.
तो धो धो कोसळत होता.
त्याच्या डोक्यातले अनंत भुंगे आसमंतभर उडत होते.
काळोख्या रातीत त्याला शरीराचा नवा अर्थ गवसला होता.
मंजुन त्याला परत कधीच जवळ केलं नाही.
तशी वेळचं आली नाही.
तो हि कधी संधीच्या शोधात नव्हताच.
किती निरक्त राती त्यानं अशाच भळभळत घालवल्या होत्या.
पण अश्या रातींचे तिचे हुकार त्याच्या डोक्यातल्या भुंग्याना जागवायचे.
आणि त्यांना पुन्हा आसमंतभर उडवायची स्वप्ने
रंगवत तो तसाच झोपी जायचा.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

चांगली आहे. व्यक्तीचित्र किंबहुना भिगर्‍याचे जीवन, माफक गरजा, अपेक्षा अन तदनुषंगिक जीवनाचा दर्जा या बाबी छान चितारल्या आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद. अजून वाढवायची होती.
पण बघू म्हटल, एवढीच कशी घेताय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0