दिल्लीतील औरंगजेब रोडचे नामांतर,औरंगाबाद शहराचे नाव बदलणे ,हा खोडसाळपणा कशासाठी??

सध्या केंद्रात आणि राज्यात असलेल्या भाजपप्रणित सरकारने
इतिहासातील मुस्लिम शासनकर्त्यांची नावे असलेल्या वास्तू,
रस्ते, शहरं यांची नावे बदलण्याचा सपाटाच लावला
आहे.हिंदुत्ववादी भाजप सरकारने हा खटाटोप मुस्लिम
समाजाला डिवचण्यासाठी केला आहे हे अगदी उघड आहे.

यातील पहीला वाद दिल्लीतील औरंगजेब रोडचे नाव बदलणे
यातुन सुरु झाला,इतकी वर्ष दिल्लीत दिमाखाने उभा असलेला
औरगजेब रोडचे नाव बदलुण सरकारने काय साधले याचे कसलेही
स्पष्टीकरण सरकारने दिलेले नाही.फार वाद वाढू नये म्हणून
अब्दुल कलाम यांचे नाव त्या रस्त्याला दिले आहे.

दुसरा वाद हा महाराष्ट्रात औरंगाबाद शहराचे नाव
संभाजीनगर करावे असा आहे,हा वाद तसा जुनाच
आहे.शिवसेनेसारख्या खोडसाळ संघटनेची ही मागणी आहे.
औरंगजेब हा अत्याचारी होता,बलात्कारी होता असा
पद्धतशीर प्रचार संघप्रणीत इतिहासकार अनेक वर्ष करत
आहेत,वास्तविक औरंगजेब हा लोकोत्तर राजा होता,त्याने
अनेक समाज सुधारणा घडवुन आणल्या होत्या. त्याच्या
कारकीर्दीत हिंदुंचे धर्मांतरन त्याने होऊ दिले नाही ,हा
त्याचा मोठा उपकार भारतीयांवर आहे.मुस्लिम शासनकर्ते
कसे क्रूर होते असे खोटेनाटे पसरवण्याने सांप्रत काळच्या
मुस्लिमांना आरोपी ठरवता येते,हाच या पाठिमागचा खरा
उद्देश आहे .

नामांतराने देशाचा, राज्याचा काय फायदा होणार
आहे,अशी खोडसाळ नामांतरे करुन मुस्लिम समाजाला आपण
राष्ट्रीयत्वापासून दुर नेत आहोत,यात हिंदू मुस्लिम दोघांचेही
नुकसान आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (4 votes)

सेक्युलर लिबलर शिक्षकांचा अभ्यासही वाढण्याची गरज कदाचीत अधिक आहे

अर्थातच. अभ्यास करण्याची नी वाढवण्याची गरज आनि जबाबदारी सेक्युलर आधुनिक लिबरलांवरच येऊन पडते.
पुराणमतवाद्यांना किंवा धर्मवाद्यांना खरंतर अभ्यासाची गरज अज्जिबातच नसते! त्यांचे आधीच सगळे ठरलेले तरी असते, नैतर कोणीतरी सांगितलेले तरी! Tongue

जाता जाता: नशीब! बॅट्या असा पुराणमतवादी नाही! सतत अभ्यासाला तयार असतो! तुला शुभेच्छा रे! नंतर औरंगजेबावर येऊदे काहीतरी माहितीपूर्ण

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जाता जाता: नशीब! बॅट्या असा पुराणमतवादी नाही! सतत
अभ्यासाला तयार असतो! तुला शुभेच्छा रे! नंतर औरंगजेबावर
येऊदे काहीतरी माहितीपूर्ण>>>>>>>>>>>>>>>>>> ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

चिखलात कमळ फुलते हे असे.>>>>>>>>>कमळ???? ,,यावरुन हे सिद्ध होते की तुम्ही भाजपाचे एजंट आहात( ह.घ्या)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

ग्रेटथिंकरांसाठी आनंदाची बातमी - http://www.dnaindia.com/india/report-pm-narendra-modi-under-fire-by-civi...

'सिव्हिल सोसायटीचे' नामवंत निधर्मी विचारवंत इरफान हबीब, टिस्टा सेटलवाड इ. नी औरंगजेब रस्त्याचे नाव बदलायला विरोध केला आहे. रस्त्याला दिलेले औरंगजेबाचे नाव बदलणे हे मोदींच्या फॅसिस्ट प्रवृत्तीचे निदर्शक असून ते अनिष्टसूचक आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सिव्हिल सोसायटीचे' नामवंत निधर्मी विचारवंत इरफान हबीब, टिस्टा सेटलवाड इ. नी औरंगजेब रस्त्याचे नाव बदलायला विरोध केला आहे. रस्त्याला दिलेले औरंगजेबाचे नाव बदलणे हे मोदींच्या फॅसिस्ट प्रवृत्तीचे निदर्शक असून ते अनिष्टसूचक आहे अशी टीका त्यांनी केली आहे.

तरी नशीब तीस्ता सेटलवाड ह्या मोदींनीच स्वतःवर हल्ले करून घ्यायला निर्माण केलेल्या आहेत व मोदी स्वतःवर हल्ले करून घेण्यासाठी सेटलवाड यांना सुपारी देतात असा आरोप झालेला नैय्ये हे नशीब - साधारण असे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

औरंगजेब आणि अफजल खान अशी नावं असलेल्या आजकालच्या व्यक्तींचे अनुभव सांगणारा एक हलकाफुलका लेख.
http://www.dnaindia.com/lifestyle/report-the-namesakes-what-about-the-au...

लेखाचा टोन हलकाफुलका असला तरी काही मुद्दे विचारप्रवर्तक आहेत.
१. औरंगजेबानं शिवाजीचा नातू शाहू याला कैदेत असताना शिक्षण, तलवारबाजी वगैरेची व्यवस्था केली
२. सम्राट अशोकचं पूर्वायुष्य बऱ्यापैकी औरंगजेबासारखंच दिसतंय तरी त्याच्या नावावर फारसे आक्षेप घेतले जात नाहीत.
३. नावाबाबतचे पूर्वग्रह मजेशीर आहेत. काही समुदायांत मीरा हे नावही फारसं पसंत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

औरंगजेबानं शिवाजीचा नातू शाहू याला कैदेत असताना शिक्षण, तलवारबाजी वगैरेची व्यवस्था केली

ती याच आशेने की त्यामुळे मुघलांबद्दल मराठ्यांचा सॉफ्ट कॉर्नर होईल, अ‍ॅट बेस्ट शाहू मनसबदार होईल वगैरे. पुढे बाकी कै झाले नै तरी मराठ्यांनी उत्तरेत मुघलांचे प्रोटेक्टर म्हणूनच भूमिका घेतलेली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चौथा मुद्दा
४. एका व्यक्तीला मोठं करण्यासाठी दुसऱ्यांची रेघ लहान करणं, मुद्दाम दैत्यीकरण करणं आणि त्याचा रामायणापासून इतिहास असणं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

औरंगजेब रोडचे नाव बदलून डॉ.कलाम रोड करणे अत्यंत योग्य. ह्यात खोडसाळपणा कसला आलाय. उद्या भाग्यविधाते राहुल गांधी पंतप्रधान झाले तर ते परत बदलतील. जेता आपले श्रेष्ठत्व सिद्ध करणार - ते तसेच होते आणि तसेच होत राहणार.

(तसेच ओरंगाबाद चे नाव बदलून ते संभाजीनगर करण्यात यावे आणि अलिबाग चे श्रीबाग जमलेच तर उस्मानाबाद चे धाराशिव आणि हो , अलाहाबादचे ....)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाने