क्षणकथा: 1
Removed
ललित लेखनाचा प्रकार
ऐसी सदस्य
ऐसी सदस्य हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यावर उत्तम लेखही येऊन गेले आहेत. इथे तुम्हाला कोण भेटणार नाही ?
अत्यंत ज्ञानी, आपापल्या विषयांत पारंगत आणि तरीही स्वतःचा बडेजाव नसलेले सदस्य इथे मोलाची भर घालत असतात. प्रख्यात लेखक आपल्या नाना प्रकारच्या ज्ञानाची वटी इथे उपलब्ध करुन देतात. संस्कृतातले पंडित इतक्या सहजतेने लिहितात की असे वाटावे की हे घरी संस्कृतच बोलत असावेत. इथल्या भाषातज्ञांची बॅटिंग बघून आपण चकित होऊन जातो. अवकाशशास्त्रावर, माझ्यासारख्या निर्बुद्धालाही समजेल अशा भाषेत लेख लिहिणार्या विदुषी आहेत. आणि आमचे आद्य गुर्जी ! विदासम्राट म्हणून प्रसिद्ध झाल्यावर त्यांनी विदांशिवायही इतकी सुंदर लेखमाला चालू केली आहे की 'विश्वाचे आर्त' थोडेतरी प्रकाशले असे वाटते.
आता, वादविवाद, चेष्टामस्करी होते, आंबटशौकिनपणा उघडपणे चर्चिला जातो, कारण इथे कुणाला कसलीही 'इन्हिबिशन्स' नाहीत. प्रतिवादात समोरच्याचे भुस्काट फोडून टाकणारी क्षमता इथे आहे तर प्रत्येक मुद्दा एका नव्याच बाजूने मांडणारे बंडखोरही इथे आहेत. इतकी टोकाची विषमता असूनही(मी सर्वात खालच्या लाईनला) सगळे गुण्यागोविंद्याने रहातात.
आता प्रत्येकाला हे वातावरण रुचेलच असे नाही. त्यामुळे काहीजण ज्या वेगाने येतात, त्त्याच वेगाने जातात.
असो. एवढे लिहिल्यावरही धाप लागली.
जरा
जरा कळ काढा डॉ. साहेब, उद्यापर्यंत याच्यावर ज्या प्रतिक्रिया येतील ना परदेशातून, ते सर्व आणि आत्ता ज्यांनी वर लिहिल्या आहेत, ते सव थोर थोर लेखक लेखिका आहेत. त्या सर्वांचं वाचून झालं की आणखीन सुचवतो. नावं मुद्दाम लिहित नाही नाहीतर येखादा राह्यला तर तो काय फेकणार असेल ते पण मिळणार नाही.
बाकी आपला कुणावर राग नसतो राव, आयुष्य आरामशीर जगून झाले आहे. आता फक्त हे निवृत्तीनंतरचे उद्योग!
 
         
भयंकर
भयंकर