झेन कविता

खरं तर "The Graduate" सिनेमा, पहाटे उठून पहायलाच नको होता. आता दिवसभर डोक्यात रहाणार शिवाय तरुण "Dustin Hoffman" आठवत रहाणार. सिनेमा चांगला होता प्रश्नच नाही. एका सुंदर मध्यमवयीन स्त्रीने, तिचा मुलगा शोभेल अशा तरुण मुलाला seduce करणे - त्याचं भांबावलेपण, क्षीण विरोध आणि त्या पार्श्वभूमीवरचा तिचा आत्मविश्वास, क्वचित जरब आणि हुकूमत - तिनेच त्याला भरीस पाडणं - त्याचं ते पहीलं निळ्या निळ्या पाण्यात पोहण्याचं साहस - निव्वळ intense आणि काव्यमय.
.
झिगझॅग निळं चमकतं खोल पाणी - त्याचं त्या पाण्यात खरं तर मर्जीविरुद्ध ओढलं जाणं .... हे सर्व चालू असताना, घराला जाग आली, मागे वर्दळ सुरु झाली आणि त्या सिनेमाच्या धुंदीत, खरं तर एकांत शोधायला आपण तिरमिरीत बाहेर पडलो. बार्न्स & नोबल्स - एकांत सापडण्याचं हमखास ठिकाण.
.
Erotic poems चं पुस्तक शोधतोय आपण - नाही ना मिळत आहे शेल्फवर - खरं तर गर्दीतल्या एकांतात फक्त त्या कविता वाचण्याकरता आपण आलोय - हां तसं E.E. Cummings चे Erotic poems चे पुस्तक आहे पण आपल्याला हवं ते नाहीये. दूधाची तहान ताकावर भागवायची नाही. नाही निदान कवितांपुरती तरी नाहीच. पण कोणी उचललं ते अनवट पुस्तक? आपल्यासारख्याच एखाद्या रसिकाने घेतले असणर. स्त्री असेल की पुरुष? - तारुण्य हरवत चाललेलच एखादं कोणीतरी असेल. Hanging onto dear youth by reading poems? Living out every poem? चला आपण नाही तर कोणालातरी पुस्तक सापडलय.
.
बाकी हे zen poems चे पुस्तकंही सुंदर वाटतय. दुकानात छान wistful, longing वालं संगीत लागलय. कुठे मिळतात या सीडी आणि मुख्य म्हणजे त्या ऐकण्याकरता आवश्यक असा एकांत. ही कविता छान आहे -
.
I sit beneath the cliff quiet & alone.
Round moon in the middle of the sky's a bird
ablaze:
All things are seen mere shadows in it's brilliance,
that single wheel of perfect light ...
.
ह्म्म पण आधी भांबावलेला आणि गोंधळलेला असतो तो ... पण जसजसे वरचेवर भेटू लागतात, एकमेकांचा आनंद घेऊ लागतात - तसतसा सरावतो तो - पाण्यात तरंगायला शिकतो - He loves floating. - सुंदर! - हे असे सिनेमे एकांतातच पहायला हवेत. कोणी मागून डोकावत बसायला नको - कोणाचाही aura नको - फक्त आपण आणि सिनेमा - आजकाल इतके व्याकुळ का होतो आपण? - काय निसटतय? - आणि समजा झालो १९-२० वर्षाचे तर? तर काय? काय बदलू आपण? बदलायची हिंमत तेव्हा नव्हती तर आता कुठून येणार? आणि आता मारे येणार असेल तर .... नकोच ते विचार.
Who is that the stream sobs for?
वा! छान वाक्य आहे. चमकदार आणि उत्कट. - खरं तर काल रात्री वाचलेल्या कामकथा देखील सुंदर होत्या. आणि व्हिडिओजही सॉलिड होते. विशेषतः शेवटच्या दोन क्लिप्स. - म्हणूनच त्या शेवटच्या होत्या.
.

.
वेडं वेडं करतं हे गाणं आपल्याला - खेचून घेतं - व्याकुळ करतं
.
तिला काय मिळालं एका कोवळ्या तरुणाला भोगून? त्याचा पहीला शरीरसंबंध बनून? - त्याला आत्मविश्वास मिळाला, अमूल्य आत्मविश्वास गवसला त्याला! तिला? स्वप्नं? तारुण्य की फक्त त्याची पहीली प्रेयसी झाल्याचं समाधान? जाऊ देत ना - हे झेन पुस्तक वाच - ५० व्या पानावरची ही कविता भेदक आहे -
.
When the stupidest folks read my poems,
they snort in incomprehension ...
When the middleing sort read my poems,
They think them over & pronounce them in deep...
When a sage reads a poem of mine
his face breaks into a great big smile.
When the great Yang Hsiu saw the
young woman in an instant,
he understood the mystery
.
नंतर तो त्या स्त्रीच्या (Mrs Robinson) च्या मुलीच्या प्रेमात पडतो - काय वाटत असेल तीघांनाही? मुख्य म्हणजे त्याला .... छानच काम केलय डस्टीन हॉफमनने.
.
कविता म्हणे कपडे काढून भोगायची असते. आज हे पुस्तक चवीचवीने वाचले पाहीजे. आधाशासारखं नाही , एकाग्रतेने, प्रत्येक कवितेला तिची due respect देऊन, गर्दीतल्या एकांतात.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

समजण्यापलिकडे.काही असे सिनेमे पाहिलेत.बहुतेक इटालिअन दिग्दर्शकांचे आहेत.नावे आठवत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इंग्रची कवितांचा अनुवाद केला असतात तर बरे झाले असते. आस्वाद घेता आला असता.बाकी छान.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद. प्रत्येक मूड ओसरल्यानंतर, त्या मूडच्या भरात केलेले लिखाण अस्थानी वाटते मला. हा लेख त्याचे ठळक उदाहरण आहे. जाऊ देत.
.
ते झेन काव्याचे अनुवादीत पुस्तक फार छान आहे. रॅकवर मेरी ऑलिव्हर, अँन्जेलु, डव्ह, जिन्सबर्ग, मिनेसोटाचे ब्लाय, बॅक्स्टर अशा नामवंत कविंची पुस्तके हारीने ऊभी होती. खरं तर फार दिवसांनी गेले मी दुकानात. पण यावेळेस काय वाचू न काय नको असे झालेच नाही. एरॉटीक किंवा मग बुद्धीस्ट एवढीच तहान होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झेन = झेपत नसलेले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोण बोलतंय पाहा! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तारुण्य निसटत चालल्याची भीती , बाकी काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

एखाद्या कविते सारखे वाटले लिखाण. आवडले आणि कविताहि.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Hanging onto dear youth by reading poems? Living out every poem?

यावरुन अनेक सुंदर कविता झर्रक्कन नजरेसमोरुन गेल्या
काही गाणी सुद्धा कानांत गुंजुन गेली
त्यातील एक काळजाच्या जवळील

Often I think of the beautiful town
That is seated by the sea;
Often in thought go up and down
The pleasant streets of that dear old town,
And my youth comes back to me.
And a verse of a Lapland song
Is haunting my memory still:
"A boy's will is the wind's will,
And the thoughts of youth are long, long thoughts."

I can see the shadowy lines of its trees,
And catch, in sudden gleams,
The sheen of the far-surrounding seas,
And islands that were the Hesperides
Of all my boyish dreams.
And the burden of that old song,
It murmurs and whispers still:
"A boy's will is the wind's will,
And the thoughts of youth are long, long thoughts."

I remember the black wharves and the slips,
And the sea-tides tossing free;
And Spanish sailors with bearded lips,
And beauty and mystery of the ships,
And the magic of the sea.
And the voice of that wayward song
Is singing and saying still:
"A boy's will is the wind's will,
And the thoughts of youth are long, long thoughts."

I remember the bulwarks by the shore,
And the fort upon the hill;
The sunrise gun, with its hollow roar,
The drum-beat repeated o'er and o'er,
And the bugle wild and shrill.
And the music of that old song
Throbs in my memory still:
"A boy's will is the wind's will,
And the thoughts of youth are long, long thoughts."

I remember the sea-fight far away,
How it thundered o'er the tide!
And the dead captains, as they lay
In their graves, o'erlooking the tranquil bay
Where they in battle died.
And the sound of that mournful song
Goes through me with a thrill:
"A boy's will is the wind's will,
And the thoughts of youth are long, long thoughts."

I can see the breezy dome of groves,
The shadows of Deering's Woods;
And the friendships old and the early loves
Come back with a Sabbath sound, as of doves
In quiet neighborhoods.
And the verse of that sweet old song,
It flutters and murmurs still:
"A boy's will is the wind's will,
And the thoughts of youth are long, long thoughts."

I remember the gleams and glooms that dart
Across the schoolboy's brain;
The song and the silence in the heart,
That in part are prophecies, and in part
Are longings wild and vain.
And the voice of that fitful song
Sings on, and is never still:
"A boy's will is the wind's will,
And the thoughts of youth are long, long thoughts."

There are things of which I may not speak;
There are dreams that cannot die;
There are thoughts that make the strong heart weak,
And bring a pallor into the cheek,
And a mist before the eye.
And the words of that fatal song
Come over me like a chill:
"A boy's will is the wind's will,
And the thoughts of youth are long, long thoughts."

Strange to me now are the forms I meet
When I visit the dear old town;
But the native air is pure and sweet,
And the trees that o'ershadow each well-known street,
As they balance up and down
Are singing the beautiful song,
Are sighing and whispering still:
"A boy's will is the wind's will,
And the thoughts of youth are long, long thoughts."

And Deering's Woods are fresh and fair,
And with joy that is almost pain
My heart goes back to wander there,
And among the dreams of the days that were,
I find my lost youth again.
And the strange and beautiful song,
The groves are repeating it still:
"A boy's will is the wind's will,
And the thoughts of youth are long, long thoughts."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम विस्ट्फुल कविता आहे. आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरं तर "The Graduate" सिनेमा, पहाटे उठून पहायलाच नको होता.

कोणताही सिनेमा पहाटे उठुन पहावासा वाटणे निरामय जिवन शैलीचे लक्षण नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

खरय पहाटे उठून शुचिर्भूत होऊन स्नानादि संध्या, पूजा आटोपून मी सडासंमार्जन करायला हवं होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शुचि शुचि र भुत होऊन स्नानादि संध्या , पुजा आटोपुन मी सडासंमार्जन करायला हव होत.
भुतांमध्ये ही अस सगळ असत का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा तो शुचिर्भूत शब्द इनोदी आहे. अन तसाच सडासंमार्जन ही. नको तिथे अनुस्वार पडला की अर्थच बदलतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

च्यायला फारच विकृत विनोद वाटला हा वाचताक्षणी. पण नंतर सावरलो. धन्य आहे तुमची. प्रतिसाद अगदी जहरी असतात. काळजीपुर्वक वाचल्यावर योग्य अर्थ गवसला. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरय पहाटे उठून शुचिर्भूत होऊन स्नानादि संध्या, पूजा आटोपून मी सडासंमार्जन करायला हवं होतं.

हे तुम्ही रात्री झोपण्यापुर्वी करायला हवं. (हा सल्ला नाही).

पहाटे अगदी बिछान्यात लोळत पडलात तरी हरकत नाही(हा वैयक्तीक सल्ला) पहाटेच्या वेळी आपला मेंदु एक तर जरा शिथीलावस्थेत असतो वा आपल्या दिनचर्येप्रमाणे हायपर तरी असतो थोडक्यात काय तर अशा वेळी जर त्याला मनोरंजनाची भुक निर्माण होत असेल तर नक्किच कुच ठीक नही हय.

मी तुमचा दिनक्रम काय असावा यावर अजिबात भाष्य केलेले नाही. मी फक्त पहाटे पहाटे मेंदुला मनोरंजनाची गरज भासणे त्याचे रिकामेपण (काही सकारात्मक अथवा तट्स्थ गोष्टींनी) पुरेसे व्यापले नसल्याचे लक्षण आहे इतकेच नमुद करेन...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

माझा दिवस कमालीचा लवकर (रात्री ८) संपतो व त्यामुळे खूप लवकर एकदम फ्रेश रीत्या सुरु होतो. आणखीही अनंत कारणे आहेत ज्यामुळे अमूक एक वागावसं वाटतं. तुम्हाला त्या सांगत बसण्यात मला रस नाही तेव्हा तुमचं तत्वज्ञान तुमच्यापाशी ठेवा. नाहीतर ..... काय्ये ना एकदा लेख लिहीला की सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया येतात. काहीजण ललीत फार गंभीर घेऊन त्यावर लेक्चरही झाडायला लागतात. चालायचच. प्रत्येकाची समज वगैरे वगैरे...
माझ्याकडून हा तुम्हाला शेवटचा प्रतिसाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो प्रतिसाद तुम्हाला असला तरी विचार सर्वांसाठी आहे. तुमच्याशी वैयक्तीक होण्यात मला रस नाही.

पण इतकेच म्हणेन तट्स्थतेने समग्र भारुन व भरुन जा... (म्हणजे विवीध उर्म्या दाबा अथवा मनाला प्यारालिसिस झाल्या परमाने बनवा असे न्हवे )

माझ्याकडून हा तुम्हाला शेवटचा प्रतिसाद.

देवकीचा आठावा पुत्तर ठार करेल असे कंसला माहित असुनही त्याने सर्व पुत्तर मारले कारण आठवा ( व शेवटचा) पुत्र कोणता हे ठरवणे म्हणे सोपे नवते...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

Smile ओके. भापो. थँक्स मनापासून सांगतेय.

पण इतकेच म्हणेन तट्स्थतेने समग्र भारुन व भरुन जा... (म्हणजे विवीध उर्म्या दाबा अथवा मनाला प्यारालिसिस झाल्या परमाने बनवा असे न्हवे )

हे आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद शुचि-G. अगदी मनापासुन..

किबहुना मला कोणतेही गोष्ट मनापसुन केलेलीच भावते मग तो माझा प्रतिवाद का असेना... पण होत काय ९९.८४०% वेळा लोक मनाचा न्हवे तत्वाचा वापर करतात.. दॅट ट्रुली डिसप्वायंट मी... अर्थात म्हणून मी त्यांचा त्याग करायचा प्रश्नच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!

खर आहे बर्का!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™