पुरोगामी होण्यासाठी मला काय ‘करावे’ लागेल ?

आजकाल पुरोगामी या शब्दावरून फार धुरळा उडतो आहे.

मलाही आजकाल आपण ‘पुरोगामी’ व्हावे असे फार वाटते. पण त्यासाठी नक्की काय करावे याबाबत निश्चित अशी काही माहिती मिळत नाही. मध्यंतरीच्या काळात ‘अंतर्नाद’ मध्ये ‘जिथे पुरोगामी ही एक शिवी आहे’ असा लेख वाचलेला आठवतो. लेखक कोण हे फारसे महत्वाचे नाही. पण याही लेखात ‘पुरोगामी’ म्हणजे कोण याची सुस्पष्ट व्याख्या नव्हती, असे आठवते.

पण पुरोगामीपणाच्या व्याखेशी मला काही देणघेणे नाही. मला पुरोगामी ‘असण्यात’ रस आहे.

काही लोक स्वत:च स्वत:ला पुरोगामी म्हणवून घेताना दिसतात. उदा पवारांच्या ‘पु’लोद पासून ते सं’पु’आ पर्यंत अनेक सरकारे, राजकीय पक्ष इ. तर काही लोक इतरांना पुरोगामी म्हणत असतात. उदा. दिव्य मराठी, लोकमतच्या लेखांखाली अनेकदा ‘लेखक हे ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत/पत्रकार’ आहेत वगैरे छापलेले असते. हे कोण ठरवते ? यावर कोणी म्हणेल की अशी माहिती हिंदुत्ववादी विचारकांच्या लेखाखालीही छापलेली असते, मग तुम्ही पुरोगामी विचारकांबद्दलच का खवचटपणे हा प्रश्न विचारता तर त्याचे उत्तर असे आहे की हिंदुत्ववादी ओळखणे तुलनेने सोपे आहे. जसे ०१) कॉंग्रेस हा छुपा मुसलमानांचाच पक्ष आहे ०२) आपण शांत बसलो तर एक दिवस हिंदू जमात नामशेष होईल ०३) सगळे आधुनिक शोध आमच्याकडे आधीच लागलेले होते ०४) देशाच्या दुर्दशेला कॉंग्रेस, गांधी आणि नेहरूच जबाबदार आहेत ०५) भारत हा विश्वगुरू आहे इ.इ. समजुती बाळगणे आणि निव्वळ मनात न बाळगता वेळोवेळी बोलून दाखवणे अशी अनेक सर्वसाधारण हिंदुत्ववाद्याची लक्षणे सांगता येतील. त्याचप्रकारे पुरोगामीपणाचीही काही लक्षणे असतीलही, कोणास ठाऊक ? पण मला तीही जाणून घेण्यात रस नाही.

तर पुरोगामी होण्यासाठी मला काय ‘करावे’ लागेल हे जाणून घेण्यात रस आहे. सदस्यांनी कृपया या विषयावर आपले प्रतिसाद द्यावेत ही विनंती. पण त्याआधी काही नम्र विनंतीवजा खुलासे:

१)इथे ‘काय करावे लागेल’ याचे उत्तर निव्वळ पुरोगामी-प्रतिगामीपणाच्या चर्चा न करता पुरोगामी होण्यासाठी दैनंदिन आयुष्यात काय करावे लागेल याचे उत्तर अपेक्षित आहे.
२)इथे फक्त ऑब्जेक्टीव्ह प्रकारची ०१,०२,०३....अशी उत्तरे अपेक्षित आहेत. पुरोगामीपणाच्या व्याख्या, महनीय विचारवंतांची उद्धृते वगैरे सबगोलंकारी (?) उत्तरे अपेक्षित नाहीत.
३)आपले उत्तर देण्याआधी प्रतिसादकांनी त्यांच्याबद्दल या विषयाबाबत खालीलप्रमाणे थोडी जुजबी आवश्यक माहिती द्यावी:
a.आपण पुरोगामी आहात काय? हो/नाही
b.असल्यास आपण कुठल्याप्रकारचे पुरोगामी आहात ?

 1. स्वत:च स्वत:ला पुरोगामी समजणारे/असणारे
 2. सार्वजनिक स्तरावर इतरांकडून पुरोगामी संबोधण्यात येणारे
 3. दोन्ही

c.नसल्यास आपण वरील प्रश्नास सविस्तर उत्तर द्यायची तसदी घेतली नाही तरी चालेल. आपले उत्तर विचारात घेण्यात येणार नाही.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

इथे ‘काय करावे लागेल’ याचे उत्तर निव्वळ पुरोगामी-प्रतिगामीपणाच्या चर्चा न करता पुरोगामी होण्यासाठी दैनंदिन आयुष्यात काय करावे लागेल याचे उत्तर अपेक्षित आहे.

१. सर्वात महत्वाचे म्हणजे जे बोलतो त्याच्या विरुद्ध कृती करायची.
२. जो पर्यंत आपला किंवा आपल्याला आवडणारा विचारच दुसरा मांडतो आहे तो पर्यंत त्याला बोलू द्यावे. चुकुन कोणी विरुद्ध विचार मांडला की त्याला झोडपुन आणि प्रतिगामी वगैरे अश्या शिव्या घालुन बेजार करावे.
३. कोणीही काही ही बोलले तर त्याच्या ९० डीग्री का होईना पण वेगळे मत द्यावे. त्या साठी आपण आपल्याच कालच्या मताच्या विरुद्ध आज मत दिले तरी चालेल. पण कोणाशीही १००% सहमत होणे म्हणजे प्रतिगामी असणे हे पक्के ध्यानात ठेवावे.

अजुन बर्‍याच गोष्टी सांगु शकते, पण आधी ह्या पासुन तुम्ही सुरुवात करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मा. अनु राव जी ,
आपले उत्तर अम्मळ चुकले आहे.
सुधारणा करून परत लिहून आणणे Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

**********

राम का गुनगान करिये |
रामप्रभू की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिये ||

महनीय विचारवंतांची उद्धृते वगैरे सबगोलंकारी (?) उत्तरे अपेक्षित नाहीत.

हा मुद्दा राहीलाच. हे असे सबगोलांकरी बोलुन तुम्ही नक्कीच पुरोगामी वर्गात प्रवेश करु शकता.
कुठल्याही बोलणात आपलाच शब्द शेवटचा राहील हे बघणे महत्वाचे. आणि ते जमत नसले तर "लवकर बरे व्हा" किंवा "अभ्यास वाढवा" अश्या काँमेंट मारुन पळ काढणे.

दुसर्‍या पुरोगाम्यानी गांधींना कोट केले की आपण डायरेक्ट हिटलर ला कोट करायचे. कोणी हिटलर ला कोट केले की आपण आंबेडकरांच्या नावाखाली काहीतरी फेकायचे.

त्याच बरोबरीने, झोप येणारे सिनेमा बघणे, सेट नसलेली प्रतिकात्मक नाटकांना ह्जेरी लावणे. आदिवासेंच्या संस्कृतींबद्दल जिव्हाळा दाखवणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

झोप येणारे सिनेमा बघणे

किंवा बघतो म्हणून सांगणे. ही जरा वरची पायरी झाली अर्थात. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> झोप येणारे सिनेमा बघणे

ेहे पुरेसं नसावं. असे सिनेमे पाहून त्यांना 'भिक्कार' वगैरे म्हणणाऱ्या अनु राव तुमच्या मते पुरोगामी आहेत का प्रतिगामी? असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

असे सिनेमे पाहून त्यांना 'भिक्कार' वगैरे म्हणणाऱ्या अनु राव तुमच्या मते पुरोगामी

असे कधी म्हणले मी?

कोर्ट बघुन सुद्धा मी "ह्याच पटकथेवर बराच चांगला सिनेमा काढता आला असता" अशी प्रतिक्रिया दिली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> ह्याच अगदी एक ओळ सुद्धा न बदलता, ह्या पटकथेवर १ तासाचा ह्यापेक्षा बराच चांगला "सिनेमा" काढता आला असता.

बरं. आहात तुम्ही जंतू-सर्टिफाइड पुरोगामी.
जाता जाता : ते श्याम बेनेगलवरनं काय झालं होतं हो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे बरं आहे चिजं भिक्कार वाटले तर भिक्कार पण म्हणायचे नाही का?

तसे ही ऐसीवर सर्व पुरोगामी आहेत.

काही साधे पुरोगामी आणि काही अति(शहाणे ) पुरोगामी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भिक्कार वाटले तर भिक्कार पण म्हणायचे नाही का?

याचा ऐसी-सर्टिफाईड अल्गोरिदम.

१. 'अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे' असे म्हणायचे.
२. आपल्या श्रद्धेय स्थानाला कुणी भिकार म्हटले की 'अमुकतमुक लिहिल्याने मजा वाटली, रोचक वाटलं', 'काळजी वाटते' वगैरे पेरणी करायची.
३. सवयीने इतरांसाठी शालजोडीतली शाल अदृश्य झाली तरी डायरेक्ट काही बोलायचे नाही, म्हणजे 'मी असे बोललोच नव्हतो/ते', 'परिप्रेक्ष्य', 'अर्थनिर्णयन' वगैरे सुजलेले शब्द पेरून ठेवायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>> हे बरं आहे चिजं भिक्कार वाटले तर भिक्कार पण म्हणायचे नाही का?

खुशाल म्हणा की. मुद्दा असा आहे की तुम्ही स्वतःला पुरोगामी मानता की नाही? म्हणजे, ह्या धाग्यावरचे तुमचे प्रतिसाद पाहता असं वाटतं की तुम्हाला पुरोगाम्यांच्या विषयात विशेष प्रावीण्य आहे. मग ते पुरोगामी म्हणून की अदरवाईज ते माहीत असावं म्हणून विचारलं. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

तुम्ही स्वतःला पुरोगामी मानता की नाही?

तुमचे पॅरॅमिटर जर नास्तिकता, स्त्री-पुरुष समानता , भारतीय सो कॉल्ड संस्कृतीला शिव्या घालणे, नविन विचारांचे स्वागत असे काही असतील तर तर मी आहे पुरोगामी.

बाकी तुमची पुरोगामी असण्याची व्याख्या फक्त जाती-धर्मा पुरतीच मर्यादित असेल तर नाही बॉ मी पुरोगामी.

दुर्दैवानी ऐसीवरचे बरेसचे पुरोगामीत्व फक्त एका धर्माला ठोकणे आणि दुसर्‍याची वकीली करणे इतकेच असते. आणि मी नास्तिक आहे म्हणुन दुसर्‍याच्या आस्तिकतेला हसणे आणि स्वताला वरचढ समजणे इतकेच असते.

मला बेनेगलांचे सिनेमे भिक्क्कार वाटू शकतात ह्याला सुद्धा कीती आक्षेप आहे हे मी बघितलेच आहे Smile पण समाजवादी पुरोगामित्व कसे असते की "मला आवडते ते तुला आवडलेच पाहिजे आणि नसले आवडत तर तूला कलेची काही समज च नाही".

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> तुमचे पॅरॅमिटर जर नास्तिकता, स्त्री-पुरुष समानता , भारतीय सो कॉल्ड संस्कृतीला शिव्या घालणे, नविन विचारांचे स्वागत असे काही असतील तर तर मी आहे पुरोगामी.

अशा रीतीने अनु राव यांनी अखेर आपली खरी पुरोगामित्वाची व्याख्या या ठिकाणी देऊ केली आहे. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्याच बरोबरीने, झोप येणारे सिनेमा बघणे, सेट नसलेली प्रतिकात्मक नाटकांना ह्जेरी लावणे. आदिवासेंच्या संस्कृतींबद्दल + समलैंगिकांबद्दल जिव्हाळा दाखवणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी सिनेमात झोपते. बरेचदा. बऱ्याच लोकांना हे प्रत्यक्ष बघून माहित्ये. (ही स्वतःची जाहिरात नव्हे.) म्हणजे मी पण पुरोगामी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दुसर्‍या पुरोगाम्यानी गांधींना कोट केले की आपण डायरेक्ट हिटलर ला कोट करायचे. कोणी हिटलर ला कोट केले की आपण आंबेडकरांच्या नावाखाली काहीतरी फेकायचे.
त्याच बरोबरीने, झोप येणारे सिनेमा बघणे, सेट नसलेली प्रतिकात्मक नाटकांना ह्जेरी लावणे. आदिवासेंच्या संस्कृतींबद्दल जिव्हाळा दाखवणे.

अशाने तमाम पेठीय (म्हंजे पेठेत रहाणारे नव्हे पेठीय म्हणून एक खास प्रवृत्ती असते रहा कुठेही! अगदी परदेशातही!) पुणेकर पुरोगामी होतील की! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कोणत्या प्रकारचा विचाराल तर सारासार विचार करून मी
'पुरो'गामी आणि तथाकथित प्रतिगामी या दोन्ही बाजूंनी बोलतो,त्यामुळे मी 'प्रतिपुरो'गामी आहे.

पुरोगामी होण्यासाठी काय करावे?

1) सतत भाजप,सेना व संघावर टीका करावी.
2)''हिंदूंनी सहिष्णूता दाखवावी" असे कायम बोलून दाखवावे.
3)समानता,बंधुत्व या गोष्टी बोलून दाखवाव्यात,पण समान नागरी कायद्याला विरोध करावा.
4)मोदींच्यावर उगाचच सतत गरळ ओकावी.(अजून एकही भ्रष्टाचार बाहेर आला नाही तरी)
5)देवावर अजिबात विश्वास ठेऊ नये.

या फक्त पाच गोष्टी करता आल्या ना कि तुम्ही 'पुरो'गामी म्हणवून घ्याल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी

१. समाजवाद आणि फक्त समाजवादच जगाचा उद्धार करू शकतो ह्यावर अढळ निष्ठा ठेवणे.
२. समाजवादाची रूपे आणि देव्हारे अनंत आहेत त्यापैकी आपण ज्या रुपास मानतो त्या देव्हाऱ्यात जो देव असेल त्याची भक्ती मनोभावे करणे. प्रजा समाजवादी , समाजवादी , समता , राष्ट्रीय समता , जनता दल , भालोद , पुलोद , राजद ........आपापला देव पकडून असावे.
३. इतिहास आणि भूगोल ह्यांचा अभ्यास करावा - इम्रे नाझ पासून हमीद दलवाई पर्यंत सगळ्या सामाज्वध्यांचा इतिहास तोंडपाठ करणे.
४. मराठी असल्यास 'साधना ' चे वर्गणीदार त्वरित होणे.
५. सेवादलाचे अस्तित्व आता संपले आहे हे पूर्ण विसरणे - आपल्यावर सेवादलाचे संस्कार आहेत हे दुसर्याला सतत ऐकवत राहायचे. सेवादल हे संघापेक्षा श्रेष्ठ आहेच हे मनावर बिंबवावे. आपण मामा ( माजी मार्गदर्शक ) होतो हे विसरू नये .
६. निळू फुले , स्मिता पाटील , वसंत बापट , ह्यांचा आपला कसा गाढ परिचय होता हे जाहीर उगाळत राहणे. तसेच श्रीनिवास / विनायक कुलकर्णी , साने गुरुजी , कुरुंदकर , ग.प्र. , ह्यांची पुस्तके दर्शनीय भागी असू ध्यावी.
७. नवा मागे साथी लावावे पण त्याचा अर्थ काय असे विचारल्यास विचारणारा किती येड#$ आहे असे कुत्सित हसावे.
८. पुरुषांनी दाढी वाढवावी. महिलांनी पांढरी सुती साडी आणि पर्स मध्ये खादी ग्रामोद्योग मधील काही पदार्थ ठेवावे - बाकी भरपूर मेकप , अत्याधुनिक आंतर्वस्त्रे ( संदर्भ - मुरारजी देसाई ), उंची परफ्युम चालेल.
९. अधून मधून लेख लिहावे त्यात हिंदुत्व , संघ ह्यांना तुच्छ लेखावे .. सतत गुजराथ च्या दंगलीचा उल्लेख करत राहावा.
१०. २०१४ नंतर पुढे १०-१५ वर्'मोदी ' हाच सर्व समस्यांचा कारणभाव आहे हे मनाशी ठरवून दिवसाला प्रारंभ करावा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुरोगामी बनणे अत्यंत सौपे आहे.
१. आपण सोडून इतर सर्वांचे लेखन निरर्थक आहे, या वर ठाम राहा.
२. घरात कर्मकांड, पूजा पाठ करत रहा, फक्त अंतर्जालावर किंवा इतर ठिकाणी हिंदू धर्मावर टीका आणि टिप्पणी करत रहा.
३. एखादा Ngo उघडणेहि गरजेचे. विदेशी अनुदानहिहि मिळावा. त्या शिवाय कुणी तुम्हाला खरा पुरोगामी मानणार नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पुरोगामित्वाचे आकलन पाहून मजा वाटली. अनेकांना पुरोगामी विचार का पटत नाहीत हे आता लक्षात आले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद वाचून शिरोगामी असा एक नवा शब्द सुचला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुरोगामी व्हायला धाडस लागते.नुसते फाट्यावर मारतो वगैरे बोलून नाही तर प्रत्यक्ष कृती करावी लागते.आता हे केवळ ललित लेखनच असेल तर राहिलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही हा विषय प्रामाणिकपणे मांडलेला वाटला, त्यामु़ळे प्रामाणिक उत्तरं देत आहे. थोडीफार विस्कळीत.
---------------------------
१. मी पुरोगामी नाही.

२. आपण शब्द आणि त्यामागचा अर्थ काहिच्या काही स्वस्त करून टाकलेला आहे. पत्रकार म्हटलं की "झुंजार", आणि जरा काही non-fiction लिहिलं की डायरेक्ट "विचारवंत". साठीच्यावर गेला असेल तर कुठल्याही क्षेत्रातला माणूस "ज्येष्ठ" वगैरे होऊनच जातो.
awesome हा असाच एक घाऊक स्वस्ताईत आलेला शब्द. तसंच "पुरोगामी" ह्या विशेषणाचं झालं असावं.

३. फेबु, व्हॉट्सअ‍ॅप आणि एकूणच आंजामुळे जाज्वल्य हिंदुत्त्व काय किंवा पुरोगामित्त्व काय - फटाफट मिरवता येतं. पूर्वी हे करायला फार व्याप- दाढी वाढवा, गेटअप घ्या, खादी घाला, चर्चासत्रात सहभागी व्हा - असलं काहीतरी केल्याशिवाय नुसता शिक्का बसणंदेखील मुश्कील होतं बहुतेक. आता तसं नाही. पंधरा मिनिटांच्या संडासागमनातही आपण चटकन मोबाईलच्या "लाईक्/शेअर" मार्गांनी पुरोगामी/हिंदुत्त्ववादी असल्याचं भासवू शकतो. फ्लश ओढला की नॉर्मल आयुष्यात परत. तेव्हा हे प्रकार स्वस्त झाले आहेत.

४. तर खरा पुरोगामी {किंवा प्रतिगामी} कसा असतो/काय करतो हे नक्की माहिती नाही. पण त्यातही stages असाव्यात. डायरेक्ट पुरोगामी कसा होणार?
माझा एक ढोबळ अंदाज -
अ) फार फार तर बहुसंख्य लोक "पुरोगामी विचारांना पाठिंबा देणारे"/ "हिंदुत्त्ववादी विचारांना पाठिंबा देणारे" असतात. (passive. एखाद्या विचारसरणीचा मनाने स्वीकार करणं हे तुल्नेने सोप्पं आहे )
ब) त्याहून कमी लोक "पुरोगामी विचारांचे" असावेत (active जे स्वतः विचारांप्रमाणे खाजगीत का होईना, कृती करतात.)
क) लाखात एक बाकीच्यांसाठी विचार करून, कृती करतो. ( volunteer. चळवळ चालवणं, एखाद्या न पटलेल्या गोष्टीविरूद्ध बाकी लोकांमधे जागर करणं)
ड) मुळातच काही नवीन विचार/ थिअरीज् मांडणं की जे समाजाला पुढे घेऊन जाईल. (leader/ )

मला वाटतं पुरोगामी म्हणवलं जाण्यासाठी ब) ही किमान पातळी असली पाहिजे.

कदाचित ह्यात मधे अजूनही काही पायर्‍या असतील.
माझ्या मते मी तरी सध्या फारतर अ) मधे येईन. ब- कदाचित, क्वचित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सॉलिड!!! टाळ्या!!ष्टँडींग ओव्हेशन Smile
.
तुमच्या फॅन क्लबच्या वेशीवर घोटाळत होतेच पण हा प्रतिसाद वाचून , वेस ओलांडली Wink
.

पंधरा मिनिटांच्या संडासागमनातही आपण चटकन मोबाईलच्या "लाईक्/शेअर" मार्गांनी पुरोगामी/हिंदुत्त्ववादी असल्याचं भासवू शकतो. फ्लश ओढला की नॉर्मल आयुष्यात परत. तेव्हा हे प्रकार स्वस्त झाले आहेत.

ROFLROFL मेले हसून हसून

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रतिसाद आवडला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कडाडून टाळ्या!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्तर खुप आवडलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा लेख गंभीरपणे लिहिला आहे असं समजून गंभीर उत्तर देतो.

पुरोगामी होण्यासाठी काय 'करणं' आवश्यक आहे असा प्रश्न विचारला आहे. त्यातला अस्वल यांनी म्हटलेला, पातळ झालेला अर्थ म्हणजे 'धर्माविरुद्ध बोलणारा'. ही छटा गेल्या काही वर्षांत जास्त तीव्र झालेली आहे. तो शब्द 'हॅं, स्वतःला पुरोगामी म्हणवून घ्यायचं असलं की धर्मावरती, विशेषतः हिंदू धर्मावरती टीका करावीच लागते!' या प्रकारच्या वाक्यांतून थुंकल्याप्रमाणे बाहेर पडतो. 'पुरोगामी म्हणवून घेणं' हे काहीतरी महत्त्वाचं आहे अशी हे (किंवा तत्सम) वाक्य उच्चारणारांची समजूत असते. हा अर्थ उघडपणे इतक्या टोकाचा आहे की त्याबद्दल न बोलणंच बरं.

खरा पुरोगामी म्हणजे जो आपण आत्ता आहोत त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. जुने विचार नव्या ज्ञानाच्या आधारावर तपासून पाहातो. केवळ कुठच्यातरी जुन्या पुस्तकात लिहिलेलं आहे, किंवा आत्तापर्यंत लोक करत आलेले आहेत, किंवा कुणाचा तरी आदेश आहे म्हणून एखादी गोष्ट करायला नकार देतो.

एक उदाहरण देतो. मुंज हा धार्मिक संस्कार, रूढी आणि परंपरा आहे. जेव्हा लहान मुलगा अध्ययनासाठी गुरुगृही जात असे तेव्हा ते त्याला फॉर्मली सांगणं हे त्या विधीतून होत असे. निदान तशी मूळ कल्पना असावी. पण आता मुलं, मुली, सगळेच तिसऱ्या चौथ्या वर्षापासून काही ना काही शिकायला लागतात. शिक्षणाचा धार्मिकतेशी असलेला संबंध ढासळला आहे. मग ज्या भाषेत मुलाला हे कळत नाही त्या भाषेत असा संस्कार सातव्या आठव्या वर्षी करावा का? अर्थातच नाही. कारण एक निरर्थक विधी आणि समारंभ करण्याची हौस यापलिकडे त्यात काहीच नाही. मग केवळ काहीतरी न करणं म्हणजे पुरोगामी होणं का? नाही. मुंज विधी करण्याऐवजी जर मी माझ्या मुलांना शिक्षणाचं महत्त्व समजावून दिलं तर त्याचा खरा फायदा होईल. मुंजीच्या ऐवजी मुलाच्या अभ्यासात लक्ष घालणं, शाळेतल्यांना मान द्यायला शिकवणं यासारख्या काही सकारात्मक गोष्टी केल्या तर त्याला पुरोगामी विचारसरणीने वागणं म्हणता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अ. होय.
ब. १. पुरोगामी व्हायला विचार करावाच लागतो. (हिंदुत्ववादी, किंवा कोणताही धर्ममुलतत्ववादी, व्हायला केवळ अंधानुकरण पुरेसं आहे), त्यामुळे १. चं उत्तर स्पष्ट आहे, तिथे पर्याय नाही.
२. पुरोगामी होताना लोक काय म्हणतात याची फार भिती बाळगू नये असे माझे स्वतःचे मत आहे. उदा. इथेच वरती आलेले प्रतिसाद पहा, ज्यांना पुरोगामी म्हणजे काय हे ही कळत नसेल ते लोक काय म्हणतात याची काळजी तरी का करावी बरे?

तुर्तात इतकेच. अतिशहाणायांच्या (आकलनविषय) प्रतिसादाला पुन्हा एकदा (आधी गर्भित, आता स्पष्ट) अनुमोदन देऊन आणि अस्वल आणि राजेश यांच्या प्रतिसादाशी सहमती दर्शवून थांबतो. पुढे वाटेल तसा चर्चेत भाग घेईन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'पुरोगामित्वाची व्याख्या बघा, पुरोगामी म्हणवणारे लोक कसे वागतात तिकडे बघू नका'

आणि

'धर्माच्या शुद्ध स्वरूपाकडे बघा, धार्मिक म्हणवणारे लोक कसे वागतात तिकडे बघू नका'

या दोन्हींत लक्षणीय सामंतर्य आहे. पैकी एका बाजूचे प्रत्यंतर प्रतिक्रियांमधून येणं रोचक वाटलं. धरम अपना अपना....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट्या - तुला माझ्या कडुन मार्मिक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद!!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इथे पुरोगामी म्हणजेच समाजवादी अशी नवी व्याख्या कळली.
आणि पुरोगामी ऊर्फ समाजवादी हे सदाच, सर्वत्रच झोडपणीय, तुडवणीय, (आणि कदाचित गोळीमार्णीय) असतात, आवर्जून असावेत हेही पटले.
लत्ताग्रे वसते पुरोगः, पदमूलेsपि तु सः
सुनिश्चितः पदमध्ये च
एषः सर्वत्र ताडयेत्
(पुरोग या शब्दामुळे मात्रादोष घडला असल्यास समजून घेणे)
(ताडयेत् चा प्रयोगही समजून घेणे)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्व प्रतिसादकांचे आभार !
मला हे प्रश्न का पडले याची काही कारणे म्हणजे खालील बाबतीत माझ्या मनात निर्माण झालेलं कन्फ्युजन आहे.
०१. पुरोगामित्व हे कालसापेक्ष असते का?
०२. पुरोगामित्वाचं प्रॅक्टीकल अ‍ॅप्लिकेशन कसे करावे?

०१. पुरोगामित्व हे कालसापेक्ष असते का?

पुरोगामी या शब्दाचा एक ढोबळ शब्दकोशार्थ पाहिला तर तो म्हणजे- पुढे जाणारा, पुढचा विचार करणारा. तर याविरूद्ध प्रतिगामी म्हणजे मागे जाणारा.

आता एक टिपिकल उदाहरण पाहू या (मी इथे मुद्दामच धार्मिक उदाहरण घेत नाहीये). सध्या लिव्ह इन संबंधांची चर्चा सुरू आहे.याविषयावर माध्यमात झालेल्या चर्चा पाहिल्या तर सर्वसाधारणपणे नेहमी पुरोगामी म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्यक्ती या विवाहेतर(विवाहबाह्य नव्हे)लिव्ह इन संबंधांचा व तात्पर्याने मुक्त शरीरसंबंधांचा पुरस्कार करताना दिसतात.(हा विरोध प्रामाणिक असून तो केवळ हिंदुत्ववाद्यांकडून करण्यात येणार्‍या लिव्हइनच्या विरोधाच्या विरोधात नाही या समजुतीतून हे लिहित आहे.) अशा विवाह वगैरे व्यक्तिस्वातंत्र्यविरोधी संकल्पना आहेत असेही मत बरेचवेळा मांडण्यात येते.असो.

आता जरा मागे जाऊ.एकदम मागे.प्रागैतिहासिक(म्हणजे कुठल्या कोण जाणे,पण असे म्हणायची पद्धत आहे)काळात जाऊ.जेव्हा माणूस गुहेत राहात होता. टोळीने राहात होता परंतु कुटुंब,विवाह,एकमेव जोडीदार, वंशशुद्धी,धार्मिक विधी वगैरे संकल्पना उत्क्रांत झालेल्या नव्हत्या त्या काळी स्त्री-पुरुष संबंध हे बंधमुक्त होते असे मानावयास हरकत नाही.

नंतरच्या काळात वरील बंधमुक्त संबंधांच्या परिणामांची प्रतिक्रिया म्हणून वा इतर कुठल्याही कारणासाठी विवाहाची संकल्पना विकसित झाली,असे सांगण्यात येते. मग ह्या विवाहाच्या संकल्पनेला प्रोत्सहन देणार्‍या तत्कालीन सामाजिक पुढार्‍यांना पुरोगामी म्हणावे की प्रतिगामी?

बरं.ते जाऊ द्या.आता आजच्या काळात येऊ.आज लिव्ह इनचा पुरस्कार हा तसे पाहिले तर वरील प्रागैतिहासिक काळातील मुक्तसंबंधांचा पुरस्कार ठरतो.हा प्रागैतिहासिक काळ टाईमलाईनवर आजच्या काळाच्या मागे आहे याबाबत तरी दुमत नसावे. मग आज या विचारांचा पुरस्कार करणार्‍या तथाकथित पुरोगामी व्यक्ती यांना पुरोगामी म्हणावे की जुन्या विचारांचा पुरस्कार करणारे प्रतिगामी?

उदाहरण दुसरे. आता हिंदू धर्माकडे वळू. महाराष्ट्रापुरता विचार केला तर शाहू-फुले-आंबेडकर हे पुरोगामी विचारसारणीचे अग्रदूत म्हणून सांगण्यात येते. आंबेडकरांनी हिंदू कोड बिल अंतर्गत फार मोठे परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. संघाचे एक सोडा ते बोलूनचालून प्रतिगामीच पण या विधेयकाला खुद्द कॉंग्रेसमधूनच विरोध झाला व शेवटी आंबेडकरांना राजीनामा द्यावा लागला. त्याआधी पुणे करारावेळी जवळपास अशीच कथा घडली होती. तेव्हा आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांना विरोध करणारा, त्यांना अनुल्लेखाने मारणारा कॉंग्रेस पक्ष आज पुरोगामी समजण्यात येतो(यात संघविरोध हे त्यांचे एकमेव क्वालिफिकेशन नसून कॉंग्रेस खरोखरच पुरोगामी आहे अशी पुरोगाम्यांची प्रामाणिक समजूत आहे या प्रामाणिक समजूतीतून हे लिहिले आहे.)

म्हणजे आजचा पुरोगामी 'परिवर्तनाच्या वाटेवरचा वाटसरू'उद्या प्रतिगामी ठरू शकतो काय किंवा आजचा प्रतिगामी उद्या पुरोगामी ठरू शकतो काय? म्हणजेच या संकल्पना कालसापेक्ष आहेत काय? भौतिकशास्त्रात आहे तितकेच महत्व संदर्भचौकटीला इथेही आहे काय?

०२. पुरोगामित्वाचं प्रॅक्टीकल अ‍ॅप्लिकेशन कसे करावे? याबाबत सवडीने लिहेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

इथे ‘काय करावे लागेल’ याचे उत्तर निव्वळ पुरोगामी-प्रतिगामीपणाच्या चर्चा न करता पुरोगामी होण्यासाठी दैनंदिन आयुष्यात काय करावे लागेल याचे उत्तर अपेक्षित आहे.

हा स्वतःचा नियम मोडून तुम्हीच पुरोगामित्व हे कालसापेक्ष असतं का? असा प्रश्न विचारला आहे. तेव्हा उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.

पुरोगामित्वाची संकल्पना ही अर्थातच उत्क्रांत झालेली असावी. तुम्ही लग्नाचं उदाहरण दिलेलं आहे, पण जुन्या काळच्या टोळ्यांमध्ये राहाणाऱ्या समाजांतही अनेक रूढी, परंपरा असणारच. त्यांना प्रश्न विचारून; केवळ जुन्या काळपासून चालत आलेलं आहे, म्हणून ते आंधळेपणाने स्वीकारण्याऐवजी त्यांना प्रश्न विचारून बुद्धीला काय पटेल, योग्य काय ते करण्याचा प्रयत्न करणारे त्याकाळीही असावेत.

मी दिलेल्या व्याख्येतच 'जुने विचार नव्या ज्ञानाच्या आधारावर तपासून पाहातो' हे वाक्य आहे. नवीन नवीन ज्ञान उपलब्ध होत जातं तसतसं 'सध्याच्या काळात पुरोगामी विचार म्हणजे काय' याचं उत्तर बदलत जातं. एके काळी 'सकच्छ की विकच्छ' यावर वाद घालणं परंपरावादी की पुरोगामी ठरवणारं होतं. आता आपण ते केव्हाच मागे सोडून पुढे आलेलो आहोत. आजचे परंपरावादीही ते सोडून पुढे आलेले आहेत. ज्ञानाची, वर्तणुकीची कुंपणं विस्तारतात तसे कुंपणाच्या थोडे आत असणारे आणि कुंपणाच्या जवळ पोचणारे यांच्यात वाद होतात. पण शेवटी आधीच्या कुंपणांच्या सीमा मागे पडतातच.

टोळीने राहात होता परंतु कुटुंब,विवाह,एकमेव जोडीदार, वंशशुद्धी,धार्मिक विधी वगैरे संकल्पना उत्क्रांत झालेल्या नव्हत्या त्या काळी स्त्री-पुरुष संबंध हे बंधमुक्त होते असे मानावयास हरकत नाही.

हेही इतकं साधंसोपं नाही. माणूस हा कायमच 'सीरियल मोनोगामी विथ अकेजनल पॉलिगामी' अशी वर्तणूक करणारा आहे. लग्नाची रूढी कोणीतरी तयार केली असं नाही. तीही उत्क्रांत झाली. शेती करणं, एका गावात स्थिरावणं, स्वतःची खाजगी मालमत्ता बाळगणं व ती मुलांना वारसहक्कांने देणं या सगळ्या प्रथांबरोबर ती तयार झाली. त्या काळात कदाचित अशा मोनोगामीच्या बंधनात अडकण्याचा फायदा असेल. आता तो फायदा तितका राहिला नाही. म्हणून बंधनाची गरज नाही असा विचार काही जण मांडतात.

पण मुळात पुरोगामित्व हे कालसापेक्ष असणं आश्चर्यकारक का आहे हे कळलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

... कॉंग्रेस पक्ष आज पुरोगामी समजण्यात येतो(यात संघविरोध हे त्यांचे एकमेव क्वालिफिकेशन नसून कॉंग्रेस खरोखरच पुरोगामी आहे अशी पुरोगाम्यांची प्रामाणिक समजूत आहे या प्रामाणिक समजूतीतून हे लिहिले आहे.)

पुरोगामी म्हणता येतील असे लोक एवढ्या प्रचंड संख्येने समाजात असतात असं मला वाटत नाही. मतपेट्यांचं राजकारण ज्यांना जमतं त्यांना पुरोगामी म्हणता येईल का याबद्दल मला बरीच शंका आहे. प्रतिगामी नाहीत ते पुरोगामी असं मला वाटत नाही.

आजचा पुरोगामी 'परिवर्तनाच्या वाटेवरचा वाटसरू'उद्या प्रतिगामी ठरू शकतो काय किंवा आजचा प्रतिगामी उद्या पुरोगामी ठरू शकतो काय? म्हणजेच या संकल्पना कालसापेक्ष आहेत काय? भौतिकशास्त्रात आहे तितकेच महत्व संदर्भचौकटीला इथेही आहे काय?

पुरोगामी-प्रतिगामी हा बदल नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखं आकलन आहे असं एकंदर वाटलं. ते तसं नसतं. प्रागैतिहासिक काळात जी मूल्यं, नैतिकता होती त्यातली बरीचशी आजही शिल्लक आहे - अडल्यानडल्या माणसाला मदत करावी, स्वतःकडे काही उतू, फुकट जात असेल तर ते दुसऱ्याला द्यावं किंवा फुकट जाऊ देऊ नये, इ. अलिकडच्या आणि व्यवस्थित ज्ञात इतिहासात पाहिलं तर मुलींना शिकवणं, विधवापुनर्विवाहाला मान्यता देणं या गोष्टी शंभर वर्षांपूर्वी पुरोगामी समजल्या जात होत्या. आज या गोष्टी आपण सहज गृहित धरतो. तेव्हाचे जे पुरोगामी विचार होते तो सामाजिक नीतीनियम किंवा कायद्याचा भाग आहेत. त्यामुळे अर्थातच ही संकल्पना कालसापेक्ष आहे.

भौतिकशास्त्रात वेग प्रकाशाच्या वेगाशी तुलना करण्याएवढा झाला की संदर्भचौकटीला महत्त्व असतं. ३०० किमी/तास वेगाने प्रवास करणाऱ्या ट्रेन, विमानांसाठीही संदर्भचौकट काय हे सांगावं लागत नाही.

रोजच्या आयुष्यात कोणीही मनुष्य सदान्‌कदा पुरोगामी असू शकत नाही. पुरोगामीपण दाखवण्याची संधी फार कमी वेळा मिळते. त्यापेक्षा उदारमतवाद दाखवण्याची संधी बऱ्याच जास्त वेळा मिळते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>> पुरोगामित्व हे कालसापेक्ष असते का?
हो. एकदमच. पुरोगामित्व = पुढे जाणे = मागच्या काळात नेहमी होत असणार्‍या गोष्टींहून वेगळी गोष्ट पुढच्या काळात नेहमी होईल हे लक्षात घेऊन त्या वेगळ्या वागण्याचा अंगीकार करणे.

लिव्ह इन : प्रागैतिहासिक काळातही स्त्रीपुरूष संबंध तत्कालीन समाजाच्या नियमांनुसार होते/ होत असणार. कारण त्यातून नवीन माणसे तयार होणे अपेक्षित आहे, तसेच नातेसंबंध (मैत्री, सलोखा, टीम बाँडिंग) तयार होणे अपेक्षित आहे. आताचे लिव्ह इन हे प्रागैतिहासिक संबंधांसारखे असण्याची काहीच शक्यता नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१) समाजाशी फटकून वागणे; सगळ्या जगाला तुच्छ लेखणे, इतरांबाबत बेचारे गंदी नाले के किडे असा भाव ठेवणे
२) आपली ती स्ट्रॅटिजी व इतरांची ती लबाडी म्हणणे
३) चिकित्सा या नावाखाली तर्ककर्कश वागणे
४) परधार्जिणे असणे
५) भारतीय संस्कृती ही कशी मागास आहे असे सतत दाखवणे
६) फुले शाहू आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात.... असे सतत म्हणणे
७) देवाधर्माविषयी आस्था न दाखवणे.
८) सेक्युलर असण्याबद्द्ल टिमकी वाजवणे व सेक्युलर शब्दाचा शब्दोच्च्छल करणे. एकूणच अशा कल्पनांचा शब्दोच्छल करणे
.
.
थोडक्यात एकूण छिद्रान्वेषी असणे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हा प्रतिसाद गंभीरपणे दिला आहे असं समजून विचारतो. नरेंद्र दाभोलकर यापैकी नक्की काय काय करायचे? ते जर पुरोगामी नाहीत असं म्हणायचं असेल तर गोष्टच वेगळी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रघांचा आय डी हॅक झालाय बहुतेक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गुर्जी - तुम्हाला आवडणार नाही, पण दाभोळकर चांगलेच अंधश्रद्ध होते. भारतासारख्या देशात सामाजिक आणि बौद्धीक सुधारणा होऊ शकतात अशी अपेक्षा आणि शक्यता बाळगणे म्हणजेच पराकोटीची अंधश्रद्धा आहे. हे जर शक्य असेल तर गणपती दुध पितो हे ही शक्य असायला हरकत नाही.

ता.क. तुमच्या माहीती साठी, दाभोलकरांची चेष्टा नाही करायची मला. मी स्वता जेंव्हा मूर्ख होते तेंव्हा अनिस चे काम करायचा प्रयत्न केला होता काही महीने. रस्त्यावर बोर्ड वगैरे घेऊन फेर्‍या काढणे, पँप्लेट वाटणे असले प्रकार पण. नंतर लक्षात आले की लोकांना नकोय असले काही, ज्यांना पटते त्यांना आपले स्वताहुनच पटते, ज्यांना नाही पटत त्यांना काही केल्या पटत नाही. मग अजुन वय वाढल्यावर लक्षात आले की, ज्यांना आपण अंधष्रद्ध वगैरे म्हणतो आहोत, त्यांना काहीच तक्रार नाहीये, मग आपण का त्रास करुन घेतोय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>> भारतासारख्या देशात सामाजिक आणि बौद्धीक सुधारणा होऊ शकतात अशी अपेक्षा आणि शक्यता बाळगणे म्हणजेच पराकोटीची अंधश्रद्धा आहे. हे जर शक्य असेल तर गणपती दुध पितो हे ही शक्य असायला हरकत नाही.

म्हणजे भारतासारख्या देशात ('भारतासारख्या'मध्ये जे काय तुम्हाला अभिप्रेत असेल ते) सामाजिक आणि बौद्धिक सुधारणा होऊच शकत नाहीत असं तुमचं मत दिसतंय. ह्याविरोधात पुष्कळ काही म्हणता येईल, पण मला वाटतं त्यापेक्षा तुमच्याच (म्हणजे समर्थनार्थ काहीही न मांडता ठामपणे अंतिम सत्य सांगण्याच्या) शैलीत 'ही एक अंधश्रद्धा आहे' एवढंच बोलून मी खाली बसतो. धन्यवाद आणि शुभेच्छा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

की लोकांना नकोय असले काही,

जे लोकांना हवे आहे ते काळाच्या अन पर्यायाने लोकांच्या पुढे, म्हणजे पुरोगामी कसे असेल?

हेच आधी स्वतःला पुरोगामी म्हणवणारे अन नंतर पुरोगाम्यांना शिव्या देणारे लोक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या सुधारणा वगैरे किमान काही लोकांना तरी पाहिजे असतात ना? की हवेत असतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

किमानांविषयी बोलत नाहीएत अनुराव. आणि किमानांमुळे कार्य सोडणे तर अजून हास्यास्पद. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हांला मुद्दा समजलेला नाही, असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अनु राव तुम्ही निर्मूलनवाल्यांच निर्मूलन वाचा. बघा आमचे अवधूत परळकर काय म्हणतात ते.

मग अजुन वय वाढल्यावर लक्षात आले की, ज्यांना आपण अंधष्रद्ध वगैरे म्हणतो आहोत, त्यांना काहीच तक्रार नाहीये, मग आपण का त्रास करुन घेतोय

Smile
जे अंधश्रद्धेचे बळी असतात तेच अंधश्रद्धेचे वाहक असतात म्हणूनतर अंनिस च काम लै अव्घड

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

वाघमारे साहेब,
तुमचं आडनाव पुरोगाम्याला शोभणारं नाही सो बदलून गोमारे, गोवंशनाशक, गोहत्रे असं काहीतरी करून "सेव्ह टायगर" अशी स्वाक्षरी घ्यावी असं सुचवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपली पंचेंद्रिये उघडी ठेवून, जे आपल्या बुद्धीला पटेल तसे वागणारा, परिस्थिती व अनुभव याप्रमाणे, प्रसंगी स्वतःची विचारसरणी बदलायला तयार असलेला, इतरांच्या मताला मान देणारा माणूस, पुढे जाण्याची शक्यता जास्त असते.

ही पुरोगामी व्यक्तीची व्याख्या होऊ शकते का ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

http://www.misalpav.com/node/17722
इथून :-

गदिमा-सुधीर फडके-पुलं-राजा परांजपे अशी सगळी मंडळी आजही मराठी समाजमनाच्या ‘गेले ते सोनेरी दिवस’छाप स्मरणरंजनात वंदनीय असणारी नावं आहेत. पण पुरोगामी, उदारमतवादी वगैरे आज शिव्या असाव्यात असं मराठी संकेतस्थळं, ब्लॉग वगैरे पाहता वाटत राहतं. हिंदू संस्कृती, अंधश्रद्धा, परप्रांतीय, स्त्रिया, वगैरे अनेक गोष्टींबाबत अजूनही अत्यंत बाळबोध स्वरूपाचे आरोप-प्रत्यारोप आणि वाद-प्रतिवाद घडत शतकी प्रतिसादांचे धाग्यांमागून धागे इथे (म्हणजे या आणि इतर संकेतस्थळांवर) निघत रहातात. म्हणजे शिवाजीच्या काळात गिरवलेला धडा आपण उत्तर पेशवाईत विसरलो (आणि मग त्याचा फायदा इंग्रजांना झाला,) तसंच आता पुन्हा होत आहे का? की प्रतिगामी ते पुरोगामी आणि मग पुन्हा प्रतिगामी अशा आवर्तनांत आपण फिरत राहतो? पण मग समंजस, सर्वसमावेशक जनहितात आपलं दीर्घगामी हित होतं (शिवाजीचं स्वराज्य, स्वातंत्र्यचळवळ वगैरे) हे आपण पुन्हापुन्हा विसरतोय का? आणि तसंच असेल तर मग इतिहासापासून धडे घेण्यात मराठी माणूस कमी पडतो असा सरसकट निष्कर्ष काढावा का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars