Skip to main content

संवादात्मक कार्यशाळा (फक्त पुणे)

खास नवीन आणि उदयोन्मुख लेखकांसाठी , नुक्कड सादर करीत आहे 'संवादात्मक कार्यशाळा !' मराठी साहित्य परिषद , पुणे , यांच्या संयुक्त विद्यमानाने, आपल्यातल्या लेखकासाठी!

नाव नोंदणी - http://goo.gl/forms/sKCHbNZchh

दिनांक - १९ डिसेंबर २०१५, वेळ सायं ६.३० ते ८
महाराष्ट्र साहित्य परिषद हॉल , टिळक रोड , पुणे

(टीप : नाव नोंदणी आवश्यक आहे , हा उपक्रम केवळ पुण्यातील होतकरू लेखकांसाठी मर्यादित आहे. तुमच्या शहरात लवकरच येत आहोत!)

कोणाला काही अधिक माहिती हवी असल्यास -
संपर्क करा :-
श्री. अक्षय वाटवे
९४२०२६०८०८

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

पिवळा डांबिस Wed, 16/12/2015 - 11:42

पुण्याला करायचीय काय, 'संवादात्मक कार्यशाळा'?
म्हणे, "हा उपक्रम केवळ पुण्यातील होतकरू लेखकांसाठी मर्यादित आहे"
होतकरू लेखक? आणि पुण्यात?
परा चे काहीच्या काही उद्योग!!!!
अरे उद्या बाबासाहेब पुरंदर्‍यांना तुझ्या त्या जळळ्या मेल्या संवादात्मक कार्यशाळेत बोलावशील!!!!

गवि Wed, 16/12/2015 - 12:09

उत्तम उपक्रम पराशेट.

पण.. वेळ सायं ६.३० ते ८ ?

संवादात्मक (इंटरअ‍ॅक्टिव्ह) कार्यशाळा, क्रिएटिव्ह विषयावर आणि दीडच तास ?

राजेश घासकडवी Wed, 16/12/2015 - 22:14

पुण्यापासून फारच लांब राहात असल्यामुळे कार्यशाळेला उपस्थित राहाणं जमणार नाही. नुसत्या शुभेच्छा देतो. या कार्यशाळेचा वृत्तांत आलेला आवडेल.