दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
१७ जानेवारी
जन्मदिवस : अमेरिकन वैज्ञानिक, संशोधक, पत्रकार, लेखक, राजकारणी बेंजामिन फ्रँकलिन (१७०६), रश्यन साहित्यिक आंतोन चेक्कॉव्ह (१८६०), लेखक, शिक्षणतज्ञ, वि. द. घाटे (१८९५), गणितज्ञ दत्तात्रय रामचंद्र कापरेकर (१९०५), कुटुंब नियोजनाच्या कार्यकर्त्या, रधोंच्या सहकारी शकुंतला परांजपे (१९०६), क्रिकेटपटू यादवेंद्रसिंग (१९१३), नट, दिग्दर्शक, राजकारणी एम.जी.रामचंद्रन (१९१७), हिंदी लेखक रांगेय राघव (१९२३), हॉकीपटू जगतसिंग (१९४४), कवी आणि लेखक जावेद अख्तर (१९४५)
मृत्युदिवस : पेशव्यांचे सरदार गोपाळराव पटवर्धन (१७७१), कवी, नाटककार, दिग्दर्शक ज्योति प्रसाद अगरवाला (१९५१), 'त्रिकाळ' साप्ताहिकाचे संस्थापक आणि पत्रकार शिवराम लक्ष्मण करंदीकर (१९६९), गायक आणि अभिनेते, सुरेश हळदणकर (२०००), अभिनेत्री सुचित्रा सेन (२०१४)
---
शिल्पी दिन
१६०५ : मिग्युएल दि सर्व्हांतेस याची डॉन किहोते ही पहिली कादंबरी प्रकाशित
१८६१ : प्रसाधनगृहाच्या फ्लशचे पेटंट थॉमस क्रॅपरने दाखल केले.
१९२९ : एल्झी सीगर याचे पोपाय - द सेलर हे कार्टून पात्र सर्वप्रथम थिंबल थिएटर या कॉमिकमधे अवतरलं.
१९४१ : नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थानबद्धतेतून स्वतःची सुटका करून घेतली.
१९४९ : पहिली सिटकॉम 'द गोल्डबर्ग्ज'ची सुरूवात
१९५६ : बेळगाव - कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा
२०११ : मॉरिटेनिया, सुदान आणि ओमान या देशांमधे एकाच वेळेस जनतेने राजकीय हक्कांसाठी आंदोलन सुरू केले. त्यामुळे सरकारी धोरणात काही बदल घडले.
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 3 सदस्य आलेले आहेत.
- Nikhil
- गवि
- यडमाठराव
प्रतिक्रिया
समीक्षा आवडली.
इनकार बऱ्याच वर्षांपूर्वी पाहिला होता. त्यातलं मुंगळा गाणं अर्थातच खूप वेळा पाहिलं आहे. सिनेमातले खूप बारीक बारीक प्रसंग आठवतात. श्रीराम लागू आपला जुना चांभारकाम करतानाचा फोटो दाखवून स्वतः ती बॅग शिवतो तो प्रसंग. जळण्याच्या ठिकाणाहून पिवळा धूर निघतो तो प्रसंग. आणखीन एक आठवतो तो म्हणजे अमजद खान पळून जाण्यासाठी उजव्या हातावरची खूण लपवण्यासाठी हात प्लॅस्टरमध्ये घालतो खरा, पण तिकीट काढताना पाकीट त्याला डाव्या हाताने काढावं लागतं. त्या अडचणीमुळे पाळत ठेवणारे सीआयडी त्याला ओळखतात.
पण या चार नकारांची गोष्ट लक्षात नव्हती. तीन नकार हरिदासच्या तत्वनिष्ठा अथवा गुर्मीतून येतात. एक काहीशा कातडीबचावू प्रवृत्तीतून येतो. दोन चुकीच्या नकारांचे होकार झाले, आणि दोन योग्य ते (तत्वनिष्ठेचे) नकार राहिले. हा अर्क चांगला समजावून सांगितला आहे.
मुंगळा नंतरचा मारामारीचा प्रसंग कथानकासाठी आवश्यक आहे. कारण सिनेमातला व्हीलन किती जबरदस्त आहे हे सिद्ध केल्याशिवाय संघर्षाला जोर येत नाही. त्या मारामारीसाठी अर्थातच मुंगळा हे गाणं आवश्यक आहे. तात्पर्य, हेलनचा नाच कलात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आहे.
अर्क कोळून प्यालोय...
>
धन्यवाद. तो अर्क माझ्या मेंदूत फार चांगल्या प्रकारे उतरलाय कारण चित्रपट पहिल्यांदा पाहण्यात आला तेव्हा नव्यानेच नोकरीत रुजू झालो होतो आणि त्याकाळी हे असले नमकहराम, काला पत्थर, बेमिसाल वगैरे...तात्विक चित्रपट मोठ्या भक्तिभावाने पाहून त्यावर तितक्याच तावातावाने चर्चा करीत असायचो.
असो. अब न वो दिन रहे न रही वो बाते...
http://www.loksatta.com/vruthanta-news/now-teach-lessions-from-movies-33...
>
सव्वा दोन तासांच्या चित्रपटात ५ मिनिटांचे नृत्यगाणे (च) लक्शात ठेवण्याकरिता हे कारण पुरेसे आहे?
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
या चित्रपटात हे गाणं आहे
या चित्रपटात हे गाणं आहे माहीत नव्हतं
तुम्ही चित्रपट फार बारकाईने पाहलात अस वाटतं
एकदम डिट्टेलमधे लिहीलय
चित्रपट ओळख आवडली
.
धन्यवाद.
चित्रपट पहिल्यांदा पाहिल्यावर एकदम आवडून गेला. त्यातल्या हरिदासच्या भूमिकेनं अक्षरशः झपाटून टाकलं. लेख लिहीण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाहिला. शेमरूनं आंतरजालावर ठेवलाय. पुन्हा पाहिल्यावर लगेचच लेख लिहील्यानं बारकावे टिपता आले.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
मुंगळा हे गाणे ह्या
मुंगळा हे गाणे ह्या चित्रपटातील आहे हे माहीत नवते. परिक्षण आवडले हे वेगळे सांगायला नको.
जियो.
भवतु सब्ब मंगलम्
समीक्षा आवडली
'इन्कार' हा चित्रपट पाहिला नाहीये पण त्याची केवळ पटकथा येथे न देता त्यावर केलेली समीक्षा आवडली.
==================================
इथे वेडं असण्याचे अनेक फायदे आहेत,
शहाण्यांसाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...
मंडळींनाही चित्रपटातला शीर्षक
चित्रपटाचं अपयशच.
तत्कालिन परिस्थितीवर भाष्य करणारा चित्रपट बनवणं वेगळं आणि तो चित्रपट लक्षात राहिल असा बनवणं वेगळं. 'सारांश' बघणार्यांना चित्रपट आठवत नाही असं होईल का?
हा चित्रपट मी पण पाहिला होता, अनेक वर्षांपूर्वी, एकीकडे दुसरं काही काम करत. खिळून रहात बघावं असं यात काहीही आढळलं नाही. 'मुंगडा' गाणं मला आवडतं आणि हेलन जितकी सुंदर नाचली आहे तेवढीच सुंदर ती दिसते आहे. तिच्या नेहेमीच्या 'वाईट बाई'च्या मेकपपेक्षा तिचा हा अवतार खूपच सुरेख वाटतो. गाण्यातही मराठी लोकसंगीताचा, कोळीगीतांच्या ठेक्याचा सुंदर उपयोग केलेला आहे. सुंदर गोष्टी सहज लक्षात रहातात, कुरूपता का लक्षात ठेवावी?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
हे खरं की ते?
इथे तुम्ही म्हणताय
>
तुमचं हे मत माझ्या मतापेक्षा भिन्न असलं तरी त्याविषयी काही आक्षेप नाही.
पण त्यानंतर
http://www.aisiakshare.com/node/540#comment-7272 इथे तुम्ही म्हणताय -
त्यातून श्री. घासकडवी यांचा सर्व प्रकारचा तुच्छतावाद माफ केला तरीही स्वतःला प्रगत समजणार्या देशात रहाणार्यांकडून अल्पसंख्यांकांची पुरुषांनी हे नृत्य बघताना एखादं कापड लाळेरं म्हणून वापरावं अशा प्रकारे उपेक्षा करणे हे अजिबातच अपेक्षित नव्हतं. >>
तुमच्या ह्या मताविषयी आक्षेप असण्याचा तर प्रश्नच नाही उलट मी तर या मताचं समर्थनच करील कारण मी स्वतःही याच मताचा आहे.
आता माझा आक्षेप एवढाच आहे की एकाच विषयावर दोन वेगवेगळी मतं एकाच व्यक्तीने का मांडावीत? तुम्ही कुठल्याही एकाच मतावर ठाम राहिलात तर माझा काहीच आक्षेप नाहीये, पण कृपया मला असं गोंधळात पाडू नये.
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
घासकडवी यांच्याशी सहमत. परिचय
घासकडवी यांच्याशी सहमत.
परिचय आवडला.
चित्रपट पाहिला नव्हता, पण " मुंगळा" हे गाणे आहे असे जर कळले असते तर नक्कीच टाळला असता ( हेलन उत्कृष्ट नर्तिका आहे यात शंका नाही परंतु स्त्री देहाचे प्रदर्शन आणि exploitation ( शोषण ) कुठल्याही कारणासाठी मला मान्य नाही).
आता मुद्दाम पाहीन असे जरी नाही तरी मुद्दाम टाळीन असेही नाही.
असो. अब न वो दिन रहे न रही वो बाते... >>
अरेरे ! वाचून खरेच वाईट वाटले.
इतर मतप्रवाह
>
तुमचं हे मत मला पूर्णतः मान्य आहे. मी स्वतःही त्याच मताचा आहे. पण तुम्ही http://www.aisiakshare.com/node/540 हे वाचलंत का?
आता तुमचं
> हे मत बदलणार तर नाही ना?
चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com
कुरोसावाचा रिमेक
ईन्कार हा चित्रपट कुरोसावाच्या high and low चा रिमेक आहे. मुळ चित्रपट खुप सन्थ आहे. पण तरीही एकदा पहायला हरकत नाही.