यंदा (तरी) ऑस्कर्तव्य आहे ?

नुकताच लिओनार्डो डी’केप्रियोचा ‘द रेवेनंट’ पाहिला. आलेजन्द्रो इनारीतू ( ‘birdman’ चा दिग्दर्शक) याने दिग्दर्शित केलेला आणि याच नावाच्या एका कादंबरीवर बेतलेला हा चित्रपट एक भन्नाट सूडकथा आहे.

साधारणपणे अठराव्या शतकाच्या दरम्यान अमेरिकेच्या बर्फाळ प्रदेशांत घडणाऱ्या या कथेचा नायक आहे ह्यु ग्लास(लिओ). जंगलात प्राण्यांची शिकार करून त्यांची कातडी विकण्याच्या धंद्यात असलेला ग्लास जेंव्हा आपले साथीदार आणि मुलासोबत अशाच एका मोहिमेवर जातो त्यावेळी अरीकारा नावाची एक स्थानिक जमात त्यांच्यावर हल्ला करते.अचानक झालेल्या अशा अनपेक्षित हल्ल्यामुळे ग्लास आणि त्याची टीम प्रतिकार करण्यास असमर्थ ठरते. ग्लासचे बहुतेक सर्व साथीदार मृत्युमुखी पडतात. उरलेल्या लोकांकडे माघार घेऊन पलायन करण्यावाचून कोणताही पर्याय उरत नाही.जमेल तसं मिळेल त्या वाटेने त्यांचा परतीचा प्रवास सुरु होतो. त्यात अचानक अस्वलाच्या प्राणघातक हल्ल्यात ग्लास जबरदस्त जखमी होतो. इतका की तो लवकरच मरेल असं लोकांना वाटू लागतं. मरणासन्न अवस्थेत असलेल्या ग्लासला आपणच मारून मुक्त करावं असेही काहीजण म्हणू लागतात पण त्यांचा कप्तान एक वेगळाच निर्णय घेतो. फिटझगेराल्ड (टोम हार्डी) नावाचा एक मनुष्य, ग्लासचा मुलगा , आणि एक ब्रिजर नावाचा तरुण यांना ग्लासच्या देखरेख आणि सुश्रुषेसाठी मागे ठेवून कप्तान आणि इतर साथीदार पुढे निघून जातात. पण फित्झगेराल्ड दगा देतो आणि ग्लासच्या मुलाचा खून करून आणि ग्लासला जमिनीत अर्धवट पुरलेल्या अवस्थेत सोडून ब्रिजरसोबत पळून जातो. जखमी आणि हतबल असलेला ग्लास केवळ पाहण्याशिवाय काहीच करू शकत नाही. पण त्यानंतर जगण्याची त्याची इच्छाशक्ती शतपटीने वाढते. पोटच्या मुलाच्या खुनाचा सूड घेण्यासाठी. धड उठुदेखील न शकणारा ग्लास केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर मृत्यूवर मात करतो. पुन्हा उठून बसतो. हाडं गोठवणाऱ्या थंडीत अन्नपाण्यावाचून दिवस काढतो. मनाने केव्हाच मेलेला ग्लास कुजलेलं मांस, गवत, कच्चे मांस जे मिळेल ते पचवून केवळ फित्झगेराल्डला मारण्यासाठी जिवंत राहतो.थंडीपासून बचाव करण्यासाठी प्रसंगी घोड्याचे शरीर कापून,पोकळ करून त्यात आसरा घेतो. बर्फातून चालत राहतो. पाण्यातून पोहत राहतो. त्याने स्वत:च्या survival साठी टाकलेलं प्रत्येक पाउल त्याला सुडाकडे घेऊन जात असतं अजून बळ देत असतं. कडाक्याची थंडी, बर्फाची वादळे, त्याला शत्रू समजून स्थानिक टोळ्यांचे वारंवार होणारे हल्ले अशा येणाऱ्या प्रत्येक संकटावर तितक्याच थंड डोक्याने मात करत तो पुढे जात राहतो. त्याला मुळात जगायचं नसतंच. त्याला फक्त जिवंत राहायचं असतं. मृत्यूचे सर्व हल्ले परतवून तो जिवंत राहतो आणि शेवटी आपल्या मुलाच्या खुन्याला गाठून आपल्या सूडाचा प्रवास पूर्ण करतो.

step1

चित्रपट सुरेखच आहे. पण थांबा.केवळ परीक्षण करण्यासाठी मी हे लिहीतच नाहीये मुळी. शनिवारी हा चित्रपट पाहिला आणि त्याबद्दल थोडंसं लिहायचं होतंच. म्हणून लिहिलं. पण मुख्य लिहायचं होतं ते लिओनार्डोवर. या पिक्चरमधला लिओचा खतरनाक अभिनय पाहून तो खलनायकावर राहूद्या पण कदाचित ऑस्करवर तर सूड उगवत नसेल ना असं आपलं उगाच वाटून गेलं(हे मत वैयक्तिक आहे. सर्व सहमत असतीलच असे नाही)
गेली अनेक वर्षे हॉलीवूडमध्ये एकापेक्षा एक सरस चित्रपट देणाऱ्या लिओनार्डोला एकही ऑस्कर मिळू नये हे खरोखर अगदीच दुर्दैवी, निराशाजनक वगैरे नसलं तरी खटकण्याजोगं नक्कीच आहे. म्हणजे पाहा ना. Titanic पासून प्रकाशझोतात आलेला हा हिरो त्यानंतर अनेक चित्रपट करूनसुद्धा ‘तो Titanic वाला हिरो रे’ याच नावाने प्रसिध्द होता. म्हणजे एखादी प्रसिध्द भूमिकाच ती साकार केलेल्या नटाला कशी घातक ठरू शकते याचं हे उदाहरण. त्याचा fan असूनसुद्धा एक अभिनेता म्हणून Titanic मध्ये त्याने फार काही विशेष केलेले नाही असेच मला नेहमी वाटते. उलट पिक्चर येऊन अनेक वर्ष होऊनही त्या भूमिकेत विनाकारण तो अडकून पडला.

तुम्ही त्याचा ब्लड डायमंड पाहिलाय ? पाहाच. त्यात तो शून्यात नजर लावून भकासपणे ‘The god left this place a long time ago’ जेव्हा म्हणतो ना तेव्हा अंगावर शहारा येतोच येतो. किंवा त्याच चित्रपटात शेवटी जेव्हा तो फोनवर बोलता बोलता आपल्या रक्ताळलेल्या हातांनी लाल माती उचलून आपलं रक्त त्यात मिसळतो ते दृश्य पाहा.लाजवाब अभिनय आहे. अर्थात ब्लड डायमंडमध्ये सहकलाकार जीमोन होनसू यानेपण तोडीस तोड किंबहुना किंचित सरसच काम केलंय हेही खरच म्हणा.

त्याचा आणखी एक भन्नाट चित्रपट म्हणजे शटर आयलंड. मनोरुग्ण आणि पत्नीच्या खुनाच्या आरोपाखाली वेड्यांच्या इस्पितळात असलेला लिओ जेव्हा पिक्चरच्या शेवटी ज्या शांतपणे आपल्या साथीदाराला ‘Which would be the worse , to live as a monster or to die as a good man?’ असे विचारतो तेव्हा डोक्यात झिणझिण्या आल्याशिवाय राहातच नाहीत. अक्ख्या चित्रपटाचा अर्थच बदलण्याची ताकद या एका शक्तिशाली वाक्यात सामावलेली असते. यात त्याचा अभिनय म्हणजे खरोखर masterpiece आहे. या चित्रपटाचा शेवट काय असेल यावर अजूनही एकमत नाही. अनेक फोरमवर वाद-विवाद झडून गेलेत. आंतरजालावर माहिती मिळेलच याविषयी.
हे सर्व पिक्चर आले आणि गेले. departed , Catch me if you can , gangs of New York , The Beach असे इतर चित्रपटही तो करत गेला पण त्याच्यावरचा Titanic शिक्का काही पुसला गेला नाही.निदान भारतात तरी.

तो पुसला गेला तो २०१० मध्ये जेव्हा त्याचा ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित Inception रिलीज झाला. एखाद्याच्या स्वप्नांत घुसून त्याच्या विचारांची चोरी करणाऱ्या, पत्नीच्या मृत्यूसाठी स्वत:ला जबाबदार मानणाऱ्या आणि म्हणून तिला स्वप्नातल्या जगात जिवंत ठेऊन स्वप्न की वास्तव या संभ्रमात अडकून राहणाऱ्या नायकाची अफलातून भूमिका त्याने साकारली आणि त्याची पुन्हा एकदा नव्याने ओळख निर्माण झाली. हा चित्रपट जगभरात प्रचंड गाजला.

Inception विषयीच एक Troll प्रसिद्ध आहे. त्याच्या पहिल्याच प्रसंगात लिओ समुद्रकिनारी बेशुद्धावस्थेत पडलाय आणि नंतर तो शुद्धीवर येतो असे दृश्य आहे. म्हणजे Titanic मध्ये समुद्रात बुडून मेलेला लिओ Inception मध्ये पुन्हा किनाऱ्यावर येतो आणि तिथे त्याला पुनर्जन्म मिळतो असे म्हणावयास हरकत नसावी( अर्थात या दोन चित्रपटांना एकमेकांशी जोडून एक वेगळाच पट काढणारे हुश्शार लोकपण आहेत).

त्यानंतर त्याचा नुकताच गाजलेला चित्रपट म्हणजे The wolf of Wall Street. जोर्डन बेलफोर्ट नामक एका व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित हा पिक्चरपण तुफान चालला. नेहमीच्या गंभीर भूमिकांतून बाहेर येऊन यातला धूर्त , ऐयाश , चलाख जोर्डन साकारताना लिओ किंचितही कमी पडलेला नाही. निदान यासाठी तरी त्याला ऑस्कर मिळेल अशी सर्वांना आशा होती पण नाही. पुन्हा हुकला.

तसे हे काही नवीन नाही. दर्जेदार अभिनय करूनसुद्धा , नामांकने मिळूनसुद्धा यापूर्वी अनेकवेळा त्याचे ऑस्कर हुकलेले आहेत. पण यावेळी मात्र ह्यु ग्लास साकारताना त्याने जी प्रचंड मेहनत घेतलेली दिसून येते ती व्यर्थ न जावी. द रेवेनंट पाहताना क्षणोक्षणी ती मेहनत आपल्याला जाणवते. म्हणून तर म्हणालो मगाशी. हे पाउल ऑस्करवर सूड घेण्यासाठीच टाकलंय की काय हे वाटण्याइतपत जाणवते. होऊ दे बाबा त्याचा सूड पूर्ण एकदाचा.
असो. सूड, बदला वगैरे जरा जास्तच होतंय कल्पना आहे मला. पण एकंदरीत तसा कोणताही ठराविक पुरस्कार एखाद्या अभिनेत्याचे १०० टक्के मूल्यमापन करत नाही हे जरी खरं असलं तरी तो मिळाल्यावर त्याच्या मान शतपटीने वाढतो हेदेखील नाकारण्यासारखं नाही. म्हणून मला त्याला एकदा तरी ऑस्कर मिळावाच असं वाटतं. एक fan म्हणून आपली ही भोली सी आशा दुसरं काय.

(मी लिओचा fan असल्यामुळे हा लेख काहींना Biased वाटू शकतो.पण नाईलाज आहे. )

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

लिओ ना? हो तो तसाच आहे. द ग्रेट गॅट्सबीच्यावेळीच अमितबरोबर पडद्यावर दिसला तेव्हाच मी त्याला स्पष्ट सांगितलं होतं, "बाबारे! हे लोक काही तुला पुरस्कार देणार नाहीत"; पण ऐकेल तर लिओ कसला?
आता यावेळी पडद्यावर आल्या आल्या खरडपट्टीच काढतो त्याची चांगली. तो एडीसुद्धा तसाच रे बाबा! दोन-चार वर्षांमागे ऑस्कर सोहळ्यात किती नाराज झाला होता! तरीही हट्ट सोडत नाहीत ही मुलं. पण मला लिओचा राग येत नाही. मोठा गोड मुलगा आहे. शिवाय गोरापान आहे. मुलींचा फार जीव आहे त्याच्यावर. त्याला ऑस्कर मिळाले नाही तर मात्र फाऽर मोठा अन्याय होईल. जगात देव आहे की नाही असा प्रश्न पडतो कधी कधी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिलं वाक्य "लिओ माझा नानावाडा शाळेतला विद्यार्थी" असं असावं की काय असं वाटून गेलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

तो अधिकार फक्त पोतदार-पावसकर madam चा आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या निमित्ताने त्याच्या चित्रपटांचा आढावा घेणे आवडले.
सुदैवाने यात लिहिलेले सगळॅ चित्रपट पाहिले असल्याने "अर्र हा राहिला असे" वाटून जळलो नाही Wink

अर्थात रेवेनन्ट नाही पाहिलाय अजून.. आता बघेन म्हणतोय

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

द एविएटर, जे. एडगर, रेवोल्यूशनरी रोड, ... 'व्हॉट्स ईटिंग गिल्बर्ट ग्रेप' मधला लहान वयातला लिओनार्डो.
ऑस्कर पुरस्कारवाल्यांचं लिओशी पडद्यामागे (त्याच्या अ‍ॅक्टिविझम वगैरे मुळे) काहीतरी वाकडं असावं अशी शंका येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी रेलेवंट प्रश्न. आता तरी मिळालेच पाहिजे. गोल्डन ग्लोबने बोहोनी केली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या सिनेमाची सिनेमॅटोग्राफी देखील अप्रतिम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0