स्वघोषित देशभक्त आणि युध्दडोहाळे

मी कॉलेजच्या तिसऱ्या वर्षाला होतो जेव्हा २६/११ चा हल्ला झाला. मला आठवतंय त्यावेळी मी होस्टेलवर होतो. हल्ल्याची बातमी कळली तेव्हा डोकंच सणकलेलं. पाकडे लई माजलेत त्यांना धडा शिकवायलाच हवा असं वाटायचं. आता युध्द होऊन जाऊदेच. एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लागुनच जाऊदे अशा गरमागरम चर्चा रूमवर झडायच्या. मी त्यावेळी भारताने आता पाकिस्तानशी डायरेक्ट युध्द छेडायला हवं , घुसून मारायला हवं या मताचा होतो.
हळूहळू गोष्टी आणि मते बदलत गेली.युध्द हे कधीही देशाच्या प्रगतीला मारकच ठरते हे पटायला लागलं. भारतासारख्या प्रगतीशील देशाला युध्द झेपणार नाही आणि गेले ६८ वर्षांत आपण जी काही थोडीफार प्रगती केली आहे तीची युद्धामुळे कशी वाट लागू शकते हे समजलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणतंही युध्द हे दोन्ही बाजूंकडून एकमेकांचं नुकसान आणि विध्वंसापलीकडे कोणताही निकाल देऊ शकत नाही हे पटून गेलं.
आता हे सर्व लिहिण्याचं प्रयोजन म्हणजे नुकताच मंगेश सपकाळ याच्या पोस्टवर पाहिलेल्या शिवप्रतिष्ठानच्या गड मोहिमेसंबंधी एका पत्रकातील हा श्लोक –

संभाजीचे न बलिदान कदापि विसरा |
घ्या सूड म्लेंच्छरिपूचा रणी ठार मारा ||
कणभरही म्लेंच्छबिज ना उरुद्या धरेवर |
हे धर्मकार्य करूया जगपातळीवर ||

आता हे कुणी लिहिलंय माहित नाही. पण म्लेंच्छरिपु म्हणजे पाकिस्तान , बांगलादेश किंवा इतर मुस्लीम राष्ट्रे असावीत असं आपण पकडून चालू.या सर्वांना सूड घेऊन रणी ठार मारा आणि त्यांचा मागमूसही ठेवू नका असा आदेशवजा इशारा इथे देण्यात आलाय. इथे याला श्लोक असं म्हटलं गेलंय. अशा द्वेषपूर्ण ओळींना श्लोक म्हटलंय हेच मुळात हास्यास्पद आहे. आणि युद्धात ठार मारायला यांच्यापैकी कोण सैन्यात आहे आणि कोण कोण देशासाठी किती योगदान देतंय हाही एक चर्चेचा विषयच आहे. पण असो. तूर्तास तरी तो माझा विषय नव्हे.
पण एकंदरीतच सध्या भारतीयांची युद्धाची खुमखुमी वाढत चालली आहे असं दृश्य आहे. स्वत:ला देशभक्त सिध्द करण्याची स्पर्धाही वाढतेय. कुठे काही अतिरेकी हल्ला वगैरे झाला की लगेच युद्धाच्या बाता सुरु होतात. सहज जाता जाता आपल्या कानावर ‘च्यायला सरकार गप का बसलंय ?’ , ‘आपण युध्द का नाही करत यांच्याशी आपण काय बांगड्या भरल्यात का?’ , ‘ यांच्यावर बॉम्ब टाका रे कुणीतरी ’ , ‘रणगाडे , सैन्य घुसवा कायमचा धडा शिकवा अणुबॉम्ब काय शोभेसाठी बनवलेत का ?’ किंवा ‘च्यायला २ बॉम्ब टाकले की राख होऊन जाईल त्यांची’ ‘आपली आर्मी त्यांच्यापेक्षा भारी आहे’ असे तावातावाचे संवाद कानावर पडतात. यात अगदी १३-१४ वर्षाच्या पोरट्यापासून ते ८० वर्षांच्या आजोबापर्यंत सगळे असतात. बऱ्याचदा इतर लोक या बोलण्याशी सहमत आहेत असंच दिसून येतं जे चिंता करण्यासारखं नक्कीच आहे.
गेल्या जवळजवळ २५० वर्षांमध्ये म्हणजे साधारणपणे आधुनिक व अत्याधुनिक शस्त्रास्त्रे जेंव्हापासून युद्धात वापरली जाऊ लागली तेव्हापासून भारताला खऱ्या अर्थाने युद्धाच्या झळा अशा बसलेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे.( अपवाद दुसरे महायुध्द- कलकत्त्यासारख्या शहरांना काही प्रमाणात बसली होती) म्हणजे पाक आणि चीनसोबत युध्द झाली पण ती सीमेपुरतीच मर्यादित होती. काही राज्यांचा सीमाभाग वगळता mainland इंडियामध्ये त्याची झळ सर्वसामान्यांना अजिबात बसली नाही. त्यामुळे युद्धातल्या संहारक शस्त्रांमुळे बेचिराख होणं नेमकं काय असतं याची आम्हा भारतीयांना काडीमात्र कल्पना नाही.
त्यामुळे खुट्ट काही वाजलं की हे असले युद्धाचे भंपक डोहाळे अधूनमधून काही लोकांना लागत असतात. नष्ट करा शत्रूला, हातात शस्त्रे घ्या मारा कापा , धर्माचं, देशाचं रक्षण करा असं म्हटलं की कमालीचं समाधान मिळतं त्यांना. चेव येतो , अवसान येतं. त्यातून शिवाजी / संभाजी महाराजांसारख्या महापुरुषाच्या नावाने असं काही म्हटलं की मग तर विचारायलाच नको. धर्मरक्षणाचा जणू किडा चावतो मग या सर्वांना. मग अशा या युध्दखोरीच्या भाषा अगदी सहजपणे केल्या जाऊ लागतात. ‘पाकिस्तानपर बम गीरादो’ यासारखी गीते निर्माण व्हायला वेळ लागत नाही. लोकांची दिशाभूल केली जाते. असली युध्दखोरी आपल्या देशाला परवडणारी नाही असं कळकळीने सांगणारा मनुष्य हा मूर्ख , फेक्युलर , बुळचट ठरवला जातो(अलीकडे देशद्रोहीपण).
युद्धाच्या फक्त कल्पनाच बऱ्या वाटतात. fantasy मध्ये रमणे आणि युद्धग्रस्त वातावरणात प्रत्यक्ष राहणे फरक आहे. अरे युध्द म्हणजे काय हे जर्मनी, जपान , इंग्लंडच्या लोकांना जाऊन विचारा मग कळेल. झालच तर सिरीया इराकला विचारा.(अरेरे ते तुम्ही कसे विचारणार, ते धर्मशत्रूदेश नाही का) तो विध्वंस , संसार आयुष्याची क्षणात झालेली राखरांगोळी काय शिकवून जाते हे ते सांगतील. देशाची राजधानीच बॉम्बच्या हल्ल्यात जेंव्हा उध्वस्त होते आणि तेथे दुसऱ्या देशाचा ध्वज चढतो तेव्हा काय वेदना होतात माहिती आहे का तुम्हाला ? अरे सहनपण नाही करू शकणार तुम्ही लोक. का दुसर्या महायुद्धातील पराभूत देश युद्धापासून लांब आहेत? का जर्मनीमध्ये हिटलरचे, नाझींचे नावदेखील घेणे वर्ज्य आहे? काय भोगलंय जपानने आपल्या युद्धाच्या खुमखुमीमुळे? काय असतो अणुहल्ला? कधी घेतलंय जाणून? कोणत्या आधारावर हे देश पुन्हा जोमाने उभे राहिले आणि प्रगत झाले? धर्मरक्षणाच्या? का संस्कृतीरक्षणाच्या? ते उभे राहिले ते या सर्व गोष्टी त्यांनी दूर ठेवल्या म्हणून. भूतकाळ विसरून मुकाट्याने कामाला लागले म्हणून. त्यात धर्माचा काडीचाही वाटा नाही.जपानी लोकांना का नाही वाटलं अणुबॉम्ब हल्ल्याचा सूड घ्यावा ? जर सूड घेण्याच्याच मागे लागले असते तर आजचा जपान दिसू शकला असता का ? आज हिरोशिमा नागासाकी मध्ये इतक्या भीषण हल्ल्याचा मागमूसही नाही. राखेतून देश घडवला त्यांनी. देशभक्ती आपल्या कामातून दाखवली. आणि आपण? आमच्यावर मुघलांनी हल्ले केले अन तुर्कांनी आक्रमणे केली. अन्याय केला , छळलं. हेच पुन्हा पुन्हा. पेटून उठण्यासाठी हेच लागतं या लोकांना. देशातली गरिबी , घाण, अस्वच्छता बेशिस्त पाहून का नाही पेटून उठायला होत ?
धर्मरक्षण शिकवतायत.
अणुबॉम्बच्या बाता करता , अणुबॉम्ब कशाशी खातात आणि अणुबॉम्बचे परिणाम माहिती तरी आहेत का? विचारा एखाद्या जपानी माणसाला. वाचा जाणून घ्या माहिती नसले तर. नुसते दुसऱ्या महायुद्धाचे फोटो जरी इंटरनेटवर शोधून पाहिलेत कळेल काय भयंकर प्रकार असतो ते. म्हणे युद्धात ठार मारा. अरे जरी पाकसोबत युध्द झालं तर त्याचं आणि काय होईल ? मुळात होण्यासारखं राहिलंय काय ? अगोदरच युध्दखोरीमुळे , दहशतवादामुळे पोखरला गेलेला , वाट लागलेला देश आहे तो तर त्यात थोडी भर पडेल. पण भारतमातेच्या लाडक्या देशभक्तांनो , आपल्या देशाचं काय होईल याचा विचार तरी केलाय काय ? भिकेला लागू आपण. पुन्हा ५० वर्षे मागे जाऊ. इतक्या वर्षांत जे काही मुश्किलीने उभं केलंय ते मातीत मिळून जाईल. राख होईल सगळ्याची. विचार केलाय का या सगळ्याचा कधी ? म्हणे युध्द पुकारा आणि नष्ट करा. हा काय भातुकलीचा डाव मांडलाय काय युध्द-युध्द खेळायला ? कुठून येते ही युद्धाची खुमखुमी ? कुठून आणता ही स्वस्तात सेलमध्ये मिळणारी देशभक्ती ?
कधी कधी वाटतं तिच्यायला होऊन जाउदे एकदा युध्द. कळूदे या लोकांना काय प्रकार असतो ते. पडूदेत शहरांवर शक्तिशाली बॉम्ब आणि जीरुदे एकदाची यांची खुमखुमी. निदान त्यानंतर तरी या सर्वांतून बाहेर पडून सुधारतील हे लोक. आणि मनुष्यधर्माकडे वळतील. प्रगत , मेहनती , डोळस बनतील. आणि पुन्हा युद्धाच नाव नाही काढणार.
पण नकोच व्हायला. नाही चांगलं ते आपल्या देशासाठी. खड्ड्यात जाईल देश आपला युद्धामुळे. जोपर्यंत स्वत:हून कोणताही देश आपल्याविरुद्ध युध्द घोषित करत नाही तोपर्यंत युध्द करूच नये भारताने. भले इथल्या लोकांना किती का युध्दडोहाळे लागेनात.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

ह्याच रागामध्ये गायलेले दुसरे एक गीत येथेच जुलै महिन्यामध्ये ऐकायला मिळाले आहे. त्याखालचे पुष्कळसे प्रतिसाद येथेहि चपखल बसतीलसे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विचार करायचाच नाही असा निर्धार करून लिहिलेला लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो आम्ही अविचारीच ना Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कालचा ओबामाचा SOTu Speech आठवला - "When you come after Americans, we go after you. It may take time, but we have long memories, and our reach has no limit"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकुणातल्या विचारांची बर्‍यापैकी सह्मत आहे.
फुकट डोके गहाण न ठेवता लिहिलेला सुज्ञ लेख!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जोपर्यंत स्वत:हून कोणताही देश आपल्याविरुद्ध युध्द घोषित करत नाही तोपर्यंत युध्द करूच नये भारताने.

उगाचच काहीतरी!!! भारत कुठे युद्ध वगैरे करायला जातोय कोणाशी आपणहुन. काहीतरी हायपोथेटीकल सिनारीयो घ्यायचा आणि लेख पाडायचे. कुठले तरी शिव प्रतिष्ठान वगैरे काहीतरी लिहीतात आणि ह्यांना जिलब्या पाडायची संधी मिळते.

जाता जाता - जपान ला अणु-बाँब चा शोध आधी लागला असता तर ५० बाँम्ब त्यांनी अमेरीकेवर टाकले असते. त्यामुळे जपानी माणसाची कीव नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी कुठे म्हणतोय भारत युध्द पुकारायला निघालाय? पण भारताने तसं करावं असे म्हणणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे असं मला म्हणायचय. कुणीही उठावं आणि मारा रे पाकिस्तानवाल्यांना म्हणून युद्धाच्या बाता कराव्यात हेच चित्र आता आजूबाजूला दिसतंय. अशा लोकांना युद्धाची भीषणता काय असते हे काहीच माहित नसतं. किंवा माहित करून घ्यायचं नसेल. जिलब्या तळायची मला हौस नाही पण मनातल्या मनात युद्धाचे मांडे खाणाऱ्यांना थोडं वास्तव कळावं म्हणून लिहिलंय.
जपान दुसऱ्या महायुद्धात हरण्याआधी कमालीचा युद्धखोर होता. मी युद्धानंतरच्या जपानबद्दल लिहिलंय. आपण कुणाची कीव वगैरे करत नाही. निदान कुणीतरी त्यांची कीव करण्यासारखी जपानची परिस्थिती आहे का हे जाणून तरी प्रतिक्रिया द्यायची.

बाकी शिवप्रतिष्ठान माझ्या जन्मगावात (सांगली )सर्वात जास्त active आहे. लहानपणापासून मी पाहत आलोय या सर्व गोष्टी. त्यामुळे मला तो एकजेकली काय प्रकार आहे याची कल्पना आहे .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारताने तसं करावं असे म्हणणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे असं मला म्हणायचय.

हे तुम्हाला कोणी सांगितले. १-२ टक्के लोक व्होकल असली म्हणजे ती बहुसंख्य आहेत असे होत नाही.
जगातल्या प्रत्येक् देशातच शत्रु देशांशी युद्ध करा असे म्हणणारी लोकसंख्या असते. मी तर म्हणीन की अशी लोकसंख्या भारतात सर्वात कमी असेल. तुमच्या लाडक्या देशांमधे कदाचित् बहुसंख्येने असेल. सिरीया मधे काय वाईट होते? ( सुंदर इंग्लिश राणी वगैरे पण होती ) पण दुसरे कोणी नाही तर आपापसात युद्ध करायची खाज आलीच ना.

जपान दुसऱ्या महायुद्धात हरण्याआधी कमालीचा युद्धखोर होता. मी युद्धानंतरच्या जपानबद्दल लिहिलंय.

आत्ताही काही बदलले नाहीये. अजुन सुद्धा संधी मिळाली तर जपान युद्ध वगैरे आणि अगदी बाँम्ब टाकायला मागेपुढे बघणार नाही. आपल्या नशिबानी त्यांना तशी संधी नजिकच्या भविष्यात मिळणार नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजुन सुद्धा संधी मिळाली तर जपान युद्ध वगैरे आणि अगदी बाँम्ब टाकायला मागेपुढे बघणार नाही.

विंट्रेश्टिंग. नाही, जपानचा इतिहास बघून असं म्हणता येईल हे नक्की. पण १९४५ नंतर बरंच काही बदललंय.
त्यामुळे जपानने गेल्या दशकात अशी काय मजल मारलीये की तुम्हाला असं म्हणता यावं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण १९४५ नंतर बरंच काही बदललंय.
त्यामुळे जपानने गेल्या दशकात अशी काय मजल मारलीये की तुम्हाला असं म्हणता यावं?

तुमच्या ह्या आशावादाला , "this time is different" syndrome म्हणतात.

जपान आणि जपानी माणुस, २००० वर्षात बदलला नाही. आता ते इंग्लिश बोलतात आणि अमेरीकन झाल्यासारखे दाखवतात. त्यांची विचारसरणी, चमत्कारीक म्हणता येइल इतका एकारलेपणा हा तसाच आहे.

स्त्रीयांबद्दल चे विचार पण इतके वर्ष फारसे बदलले नाहीत. जपानी असण्याचा प्रचंड अहंगंड आहे. हिंसेची आवड पण तशीच आहे. प्रश्न संधी मिळायचा आहे.

जपानी ( आणि चिनी सुद्धा ) समुहाने काम करणार्‍या मुंग्यांसारखे असतात. वेगवेगळे दिसले तरी सबकॉन्शस लेव्हल ला कनेक्टेड असतात. आणि एका मोठ्या मशिन प्रमाणे काम करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जपान आणि जपानी माणुस, २००० वर्षात बदलला नाही.

तसेच भारतातले धर्मांध, कर्मठ अन प्रतिगामी "हिंदुत्व"वादी अजून दहा हजार वर्षे तरी बदलतील असे वाटत नाही. संघिष्ट भाजपेयी विचारसरणीतून ते व्यक्त होतच असतात.

बादवे. याच संघिष्टांना जपान्यांचे अन हिटलरचेही भल्तेच कौतुक बरें.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

अजुन सुद्धा संधी मिळाली तर जपान युद्ध वगैरे आणि अगदी बाँम्ब टाकायला मागेपुढे बघणार नाही

हे आंतरराष्ट्रीय तज्ञ अनुरावांचं अभ्यासपूर्ण मत म्हणून आम्ही लगेच ग्राह्य धरायचं का याच्या पुष्ट्यर्थ काही माहिती देण्याचे कष्ट अनुराव घेणार आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अणुबॉम्बच्या बाता करता , अणुबॉम्ब कशाशी खातात आणि अणुबॉम्बचे परिणाम माहिती तरी आहेत का? विचारा एखाद्या जपानी माणसाला. वाचा जाणून घ्या माहिती नसले तर. नुसते दुसऱ्या महायुद्धाचे फोटो जरी इंटरनेटवर शोधून पाहिलेत कळेल काय भयंकर प्रकार असतो ते. म्हणे युद्धात ठार मारा. अरे जरी पाकसोबत युध्द झालं तर त्याचं आणि काय होईल ? मुळात होण्यासारखं राहिलंय काय ? अगोदरच युध्दखोरीमुळे , दहशतवादामुळे पोखरला गेलेला , वाट लागलेला देश आहे तो तर त्यात थोडी भर पडेल. पण भारतमातेच्या लाडक्या देशभक्तांनो , आपल्या देशाचं काय होईल याचा विचार तरी केलाय काय ? भिकेला लागू आपण. पुन्हा ५० वर्षे मागे जाऊ. इतक्या वर्षांत जे काही मुश्किलीने उभं केलंय ते मातीत मिळून जाईल. राख होईल सगळ्याची. विचार केलाय का या सगळ्याचा कधी ?

जपानवर २ अणुबॉम्ब टाकले गेले. त्यानंतर तो देश भिकेला लागला का ?

जपान हा क्षेत्रफळाने भारताच्या एक दशांश आहे क्षेत्रफळाने व तेव्हाही होता. म्हंजे दोन अणुबाँब मुळे होणारे नुकसान अ‍ॅबसॉर्ब करायला लागणारे क्षेत्रफळ भारतापेक्षा खूप कमी होते. जपान ची लोकसंख्या ही त्यावेळी किती होती व आज किती आहे. भारताची त्यावेळी किती होती व आज किती आहे ? जपान त्यावेळी विकसित होता की विकसनशील ? आता काय स्थिती आहे ?

संभाव्य आक्षेप -

१) भारत व जपान ही अ‍ॅपल्स वि. ऑरेंजेस तुलना आहे
२) जपान ची अर्थव्यवस्था गेली दोन दशके समस्यात्मक आहे.
३) गब्बर, Just because Japan was able to recover does not mean we should play with fire and lose all that we have gained so far ...

----------------------------------------

अरे युध्द म्हणजे काय हे जर्मनी, जपान , इंग्लंडच्या लोकांना जाऊन विचारा मग कळेल. झालच तर सिरीया इराकला विचारा.

जपान मधे आज त्यांचे पॅसिफिस्ट संविधान बदलून ते थोडे संरक्षणात्मक करण्याच्या दिशेने चर्चा चालू आहे. ओकिनावा मधे अमेरिकन सैन्य आहे. अमेरिकेशी सिक्युरिटी करार आहे. चीन शी राडे चालू आहेत. स्प्राटले बेटांबद्दल.
जर्मनीमधे युद्धप्रियता नाही पण अमेरिकन सैन्य (नेटो) आहे.
इंग्लंड ने WWII नंतर किमान चारपाच युद्धे केलेली आहेत. इराकवरील दोनतिन हल्ले विसरलात का ? Falklands War ?
इराक व सिरिया बद्दल न बोललेलेच बरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२) जपान ची अर्थव्यवस्था गेली दोन दशके समस्यात्मक आहे.

अर्थव्यवस्थेचे माहीती नाही पण जपानी माणसाला शुन्य वाढ वगैरे नी फार काही फरक पडला नाहीये गेल्या २ दशकात. त्यांची लोकसंख्याच कमी होतीय. आणि जगभरात प्रचंड गुंतवणुक आहे. मजेत आहेत ते. चुकीचे पॅरॅमिटर बघितले की चुकीचे कंक्लुजन निघते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

..

अगदी अगदी.

GNI per capita (constant LCU) हा कूर्मगतीने का होईना वाढतोय (किमान गेली तिनचार वर्षे).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जपानवर २ अणुबॉम्ब टाकले गेले. त्यानंतर तो देश भिकेला लागला का ?

होय, लागला असता. कदाचित जपान हा जपानच राहिला नसता. सोवियेत युनियन वा चीन झाला असता.
पण अणुबॉम्ब टाकल्यानंतर पश्चातापाने म्हणा किंवा अजून काही कारणाने म्हणा, जपानला पाश्चात्य राष्ट्रांनी अतोनात मदत (विशेषतः लष्करी संरक्षणात) केली त्यामुळे जपान तगला...
आज भारत आणि पाकने एकमेकांवर अणुबॉम्ब टाकले तर कोणीही देश नंतर मदत करायला येणार नाही....
बाकी,

भारत व जपान ही अ‍ॅपल्स वि. ऑरेंजेस तुलना आहे

सहमत. जपानी लोकांची राष्ट्रभक्ती सर्वच देशांनी वाखाणण्याजोगी आहे. भारताची किंवा अन्य देशांची (बहुतेक इस्त्रायल वगळता) तिच्याशी तुलनाही होऊ शकत नाही!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जपान नं मदत घेतली हे मान्य आहे. पण परकीय मदतीच्या जोरावर देश जागतीक अर्थव्यवस्थेत नंबर दोन्/तिन चे स्थान पटकावत नाही. जीडीपी साईझ च्या हिशेबाने बोलायचं तर.

त्यांचे देशप्रेम हे प्रशंसनीय आहेच. पण केवळ देशप्रेमाच्या जोरावर देशातली जनता एवढे यश मिळवत नाही. जपान चा GDP per capita हा विश्वातल्या टॉप च्या देशांच्या आसपास आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवळ देशप्रेम नाही हो. अनेक बाबी आहेत. पण आपला देश अगोदरच गुंतागुंतीचा आहे सगळ्याच बाबतीत. त्यात आणि युध्द वगैरे ते पण मुख्य भूमीत ?
वाट लागणार नाही का ? आता सध्या नॉर्मल परिस्थितीमध्ये इतकी मदत मिळून्पण प्रगती मुंगीच्या गतीने होते आहे. मग युद्धानंतर तर कुत्रे हाल खाणार नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केवळ देशप्रेम नाही हो. अनेक बाबी आहेत. पण आपला देश अगोदरच गुंतागुंतीचा आहे सगळ्याच बाबतीत. त्यात आणि युध्द वगैरे ते पण मुख्य भूमीत ?
वाट लागणार नाही का ? आता सध्या नॉर्मल परिस्थितीमध्ये इतकी मदत मिळून्पण प्रगती मुंगीच्या गतीने होते आहे. मग युद्धानंतर तर कुत्रे हाल खाणार नाहीत.

फारच ब्वॉ पेसिमिस्ट तुम्ही.

जर्मनी, जपान ही दोन दणकट उदाहरणे आहेत. युद्ध झाल्यानंतर च्या कालात त्यांनी लक्षणीय प्रगती केली. दक्षिण कोरिया हे सुद्धा असेच एक शॉल्लेट उदाहरण आहे. अर्थात हे छोटे देश आहेत. पण ...

---

असं पहा की - प्रचंड मोठी मिलिटरी ( आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्टगार्ड, बीएसेफ, आयटीबीपी वगैरे) बाळगण्याची २ अति-बेसिक उद्दिष्टे असतात -

१) शत्रूस हल्ला करण्यापासून परावृत्त करणे
२) हल्ला झाल्यास तो परतवून लावणे

पहिले उद्दिष्ट साध्य झालेले आहे का ? पाकिस्तानला हल्ला करण्यापासून आपण परावृत्त केलेले आहे का आपण ? पाकिस्तान हे इतके यशस्वी राष्ट्र आहे की ते ह्ल्ल्यावर हल्ले करतात व आपण प्रत्याक्रमण करण्याबद्दल बोलत सुद्धा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर्मनी, जपान ही दोन दणकट उदाहरणे आहेत. युद्ध झाल्यानंतर च्या कालात त्यांनी लक्षणीय प्रगती केली. दक्षिण कोरिया हे सुद्धा असेच एक शॉल्लेट उदाहरण आहे.

लक्षणीय प्रगती केली पण त्या आधी त्यांनी युद्धात जे काय काय भोगलंय ते आपल्या लोकांना भोगायला लागू नये हीच इच्छा आहे. पेसिमिस्टिक म्हणा हवं तर.

पाकिस्तान हे इतके यशस्वी राष्ट्र आहे की ते ह्ल्ल्यावर हल्ले करतात व आपण प्रत्याक्रमण करण्याबद्दल बोलत सुद्धा नाही.

हल्ले करतात आणि आपले जवान योग्य उत्तरपण देतात. पण घोषित युध्द आणि चकमक यातला फरक लक्षात घ्या. घोषित युध्द म्हणजे विनाश.

प्रचंड मोठी मिलिटरी ( आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्टगार्ड, बीएसेफ, आयटीबीपी वगैरे) बाळगण्याची २ अति-बेसिक उद्दिष्टे असतात -

१) शत्रूस हल्ला करण्यापासून परावृत्त करणे
२) हल्ला झाल्यास तो परतवून लावणे

सुरक्षितता म्हणून बलाढ्य सैन्य बाळगणे आणि प्रत्यक्ष ते सैन्य मोठ्या युद्धात उतरवणे या भिन्न गोष्टी आहेत. आपले होस्टाइल शत्रू पाहता आपल्याला इतके सैन्य बाळगणे अनिवार्य आहे. पण म्हणून लगेच युद्धाच्या उड्या मारू नयेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हल्ले करतात आणि आपले जवान योग्य उत्तरपण देतात. पण घोषित युध्द आणि चकमक यातला फरक लक्षात घ्या. घोषित युध्द म्हणजे विनाश.

WW-I or WW-2 या नंतर कोणत्या देशांचा विनाश झाला ? जर्मनी, जपान, इटली, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, रशिया ?????

शीतयुद्ध हे घोषित होते की अघोषित की चकमक ?

----------

सुरक्षितता म्हणून बलाढ्य सैन्य बाळगणे आणि प्रत्यक्ष ते सैन्य मोठ्या युद्धात उतरवणे या भिन्न गोष्टी आहेत. आपले होस्टाइल शत्रू पाहता आपल्याला इतके सैन्य बाळगणे अनिवार्य आहे. पण म्हणून लगेच युद्धाच्या उड्या मारू नयेत

शांति च्या उड्या मारतोच आहोत की आपण.

४ वेळा त्यांनी आक्रमण केलं. आपण नाही. कारगिल दरम्यान तर ते आपल्या सीमेत घुसुन आपल्या फौजेच्या बंकर्स मधे येऊन बसले होते. तरीही आपली भूमिका "We will not cross the line of Control" अशीच होती. म्हंजे नुसत्या शांतिच्या उड्या नव्हत्या का ? माणसं (सैनिक) किती मेली व जखमी झाली ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

WW-I or WW-2 या नंतर कोणत्या देशांचा विनाश झाला ? जर्मनी, जपान, इटली, इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, रशिया ?????

विनाश सगळ्यांचाच झालाय. अगदी जेत्या इंग्लंड आणि रशियाचा पण . तुलनेने सर्वांत कमी विध्वंस अमेरिकेत झाला याचे कारण त्या देशाचे सुरक्षित भौगोलिक स्थान (आता पुन्हा ९/११ काढू नका. अमेरिका कॅनडा सारखे देश भौगोलिकदृष्ट्या इतर देशांपेक्षा जास्त सुरक्षित आहेत हे सत्य पुन्हा पटवून देण्यात मला अजिबात रस नाही).
शीतयुध्द हा वेगळा विषय आहे. भारत पाक म्हणजे अमेरिका-सोविएत नव्हेत. लक्षात घ्या. तरीही , अगदी शीतयुद्ध नसलं आपल्यात शस्त्रास्त्रस्पर्धा सुरु आहेच ना ? आम्ही अमुक अमुक बनवलं तर लगेच त्याला उत्तर म्हणून ते लोक तमुक बनवून टाकतात. पुन्हा मग आपण अमुक बनवतो आणि त्याला लगेच उत्तर येतंच

शांति च्या उड्या मारतोच आहोत की आपण

कधी मारल्या शांतीच्या उड्या ? ६५ मध्ये लाहोरपर्यंत नव्हतो गेलो का ? ७१ मध्ये ढाक्यात पराक्रम नव्हता गाजवला? हल्ल्याला उत्तर म्हणून प्रतिहल्ला करणे अलग आणि अतिरेकी हल्ला , बॉम्बस्फोट झाल्याचे प्रत्युत्तर रणगाडे घुसवून देणे अलग. उगाच विरोधासाठी विरोध नका करू राव .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विनाश सगळ्यांचाच झालाय. अगदी जेत्या इंग्लंड आणि रशियाचा पण . तुलनेने सर्वांत कमी विध्वंस अमेरिकेत झाला याचे कारण त्या देशाचे सुरक्षित भौगोलिक स्थान

मुद्दा सहर्ष मान्य.

दुसर्‍या महायुद्धात सक्रीय भाग घेणार्‍या बहुतेक राष्ट्रांना प्रचंड नुकसान भोगावे लागले.

आता हे सांगा की दुसर्‍या महायुद्धाच्या शेवटी जर्मनीमधल्या भस्मासुराचा विनाश झाला का ?

---

कधी मारल्या शांतीच्या उड्या ? ६५ मध्ये लाहोरपर्यंत नव्हतो गेलो का ? ७१ मध्ये ढाक्यात पराक्रम नव्हता गाजवला? हल्ल्याला उत्तर म्हणून प्रतिहल्ला करणे अलग आणि अतिरेकी हल्ला , बॉम्बस्फोट झाल्याचे प्रत्युत्तर रणगाडे घुसवून देणे अलग. उगाच विरोधासाठी विरोध नका करू राव .

शांतिच्या उड्या म्हंजे वारंवार पाकिस्तानपुरस्कृत हल्ले होत असताना (म्हंजे शांति अस्तित्वात नसताना) भारताने "आम्ही शांततापूर्ण धोरण राबवणारोत व शांति महत्वाची आहे" असं वारंवार उच्चारवात सांगणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता हे सांगा की दुसर्‍या महायुद्धाच्या शेवटी जर्मनीमधल्या भस्मासुराचा विनाश झाला का ?

याबाबत माझं उदाहरणार्थ सखोल वगैरे काही वाचन झालं नसलं तरी थोड्याफार वाचीव आणि ऐकीव माहितीच्या आधारे सांगण्याचा प्रयत्न करतो.

दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर जर्मन नागरिकांनी हिटलर आणि त्याच्या नाझी लोक छळछावण्या वगैरे चालवत होते इतक्या प्रमाणात ज्यू मारण्यात येत होते याबाबत आपल्याला काहीच कल्पना नव्हती असे सांगण्यास सुरुवात केली. त्यानंतरच्या जर्मन सरकारने इस्राईलला त्याची भरपाई (reparation) कित्येकदा देऊ केली. अगदी परवा परवा पर्यंत हे देणे सुरु होते.
त्यानंतर हिटलरचे अस्तित्व जवळजवळ संपवण्यात आले. माईन काम्फ वर बंदी घालण्यात आली(आता ती उठवली गेली आहे असे ऐकून आहे). नाझी विचारांशी निगडीत सर्व संघटनांवर,चळवळीवर बंदी घातली गेली(काही चळवळी गुप्तपणे सुरु होत्या अशा देखील conspiracy थेयरीज आहेत. पण त्याबाबत जास्ती मला माहिती नाही). जर्मन जनता तर हिटलरचे नाव पण घेइनाशी झाली. अजिबात म्हणजे अजिबात नाही. या विषयावर अळी मिळी गुप चिळी. हिटलर या नावाचा त्यांना इतका फोबिया होता की त्याच्याबद्दल इतर देशातील लोकांनी त्यांना विचारलेलं त्यांना मुळीच खपायचं नाही. अजूनही जर्मनीमध्ये शिकायला , नोकरीसाठी जाणाऱ्या लोकांना जर्मनीमध्ये हिटलरचा विषय न काढण्याचा सल्ला आवर्जून दिला जातो(मी परवाच जर्मनचा क्लास केला तेव्हाही दिला गेला). म्हणजे थोडक्यात नाझी भस्मासुर नागरिकांच्या मनातून कधीच निघून गेला आहे. उलट त्या भस्मासुराचा साधा उल्लेखही त्यांना सहन होत नाही. आज जर्मनीमध्ये हेट स्पीच देणे हा गंभीर गुन्हा समजला जातो. मध्ये एकदा कॅनडाच्या एका पर्यटकाने जर्मन राईशसमोर(संसद) 'हेल हिटलर' अशी आरोळी देऊन वाद निर्माण केला होता. अर्थात त्याच्यावर काही कारवाई झाली नाही पण प्रचंड टीका झाली.

माझ्या मित्राचा एक जर्मन मित्र होता. त्याने खाजगीत माझ्या मित्राशी बोलता बोलता हळूच हिटलरचा विषय निघाल्यावर सांगितलेलं जर्मन लोक हिटलरला अजिबात आपला मानत नाहीत. म्हणजे त्याचा राग येण्याइतपत पण ते त्याला आठवू इच्छित नाहीत. आधीच्या काळात तर हिटलरच्या नावाचा इतका धसका घेतलेला लोकांनी की एखाद्या गप्पांच्या ग्रुपमध्ये नुसता त्याचा उल्लेख जरी केला तरी स्मशानशांतता पसरायची. आता अशी परिस्थिती नाही. हिटलरवरचा एखादा हलकाफुलका विनोद जर्मन लोकांना खपतो. अगदीच नाही असं नाही. पण तरीही शक्यतो उल्लेख न केलेलाच बरा.
पण जर्मन नागरिकांनी या नाझी भस्मासुराला कधीच आपल्या देशातून आणि मनातून हद्दपार केलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण जर्मन नागरिकांनी या नाझी भस्मासुराला कधीच आपल्या देशातून आणि मनातून हद्दपार केलाय.

नाझी भस्मासुराचा अंत युद्धाशिवाय झाला असता का ?

अंत केला नसता तर काय झालं असतं ? तिसरं महायुद्ध केलं नसतं तर काय झालं असतं ? तिसरं महायुद्ध केलं नसतं तर त्यांचा बेमुर्वतखोर पणा वाढत गेला असता की नसता ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसर्‍या महायुद्धाने त्याचा अंत केला हे मानले तरी त्याला जन्म कोणी दिला? पहिल्या महायुद्धाचा त्यात काही हात होता का?
आयसिसला जन्म कोणी दिला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माईन काम्फ वर बंदी घालण्यात आली(आता ती उठवली गेली आहे असे ऐकून आहे).

बंदी नव्हती. ज्या प्रकाशकाकडे (बव्हेरिआ सरकार) अधिकार होते त्यानेच आवृत्ती काढणार नाही असं म्हटलं होतं. आता प्रताधिकार संपला आहे म्हणून बाजारात आलय पुस्तक. आणि बदाबद विकलं पण जातय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

जपानवर २ अणुबॉम्ब टाकले गेले. त्यानंतर तो देश भिकेला लागला का ?

जपान हा क्षेत्रफळाने भारताच्या एक दशांश आहे क्षेत्रफळाने व तेव्हाही होता. म्हंजे दोन अणुबाँब मुळे होणारे नुकसान अ‍ॅबसॉर्ब करायला लागणारे क्षेत्रफळ भारतापेक्षा खूप कमी होते. जपान ची लोकसंख्या ही त्यावेळी किती होती व आज किती आहे. भारताची त्यावेळी किती होती व आज किती आहे ? जपान त्यावेळी विकसित होता की विकसनशील ? आता काय स्थिती आहे ?

अणुबॉम्ब पडण्याआधी किंबहुना दुसऱ्या महायुद्धाच्या आधी जपान आणि जर्मनी मागासलेले नव्हतेच कधी. त्यात युरोपियन देश असल्यामुळे जर्मनीला इतर युरोपीय राष्ट्रांनीही मदत केली.त्यामुळेच ते भिकेला लागले नाहीत पण उध्वस्त झाले. जर्मनीत युद्धानंतर १० वर्षापर्यंत लोकांना दोन वेळचे धड जेवायलाही मिळत नव्हते.
संयुक्त राष्ट्रे आणि मार्शल प्लानच्या सहाय्याने त्यांना प्रचंड आर्थिक पाठबळ मिळाले. आणि नंतर त्यांनी कमालीची प्रगती केली. पण केवळ मदत मिळून प्रगती होत नसते त्याला सरकार आणि लोकांची इच्छाशक्ती लागते. भूतकाळ विसरून कामाला लागणे इतके सोपे नव्हे. ते त्यांनी केले. उगाच पुन:श्च युद्धाच्या भानगडीत पडले नाहीत.
भारतासारख्या अजूनही प्रगत राष्ट्र या संकल्पनेपासून दूर असलेल्या देशाला युद्धाच्या गर्जना परवडणाऱ्या नाहीत. आपण भिकेला लागू हे नक्कीच

जपान मधे आज त्यांचे पॅसिफिस्ट संविधान बदलून ते थोडे संरक्षणात्मक करण्याच्या दिशेने चर्चा चालू आहे. ओकिनावा मधे अमेरिकन सैन्य आहे. अमेरिकेशी सिक्युरिटी करार आहे. चीन शी राडे चालू आहेत. स्प्राटले बेटांबद्दल.
जर्मनीमधे युद्धप्रियता नाही पण अमेरिकन सैन्य (नेटो) आहे.

मान्य आहे ना मी कुठे नाही म्हणतोय. पण मग सामान्य जपानी किंवा जर्मन नागरिक करा युध्द चीनशी किंवा इतर देशांशी म्हणून ओरड करत नाही. इथे च्यायला शेंबडा पोरगापण पाकड्यांची मारा म्हणून बोंबलतोय.

मग आपल्या सैन्याचे अमेरिका , जपान , इस्राइल बरोबर सैन्यसराव होत नाहीत का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मान्य आहे ना मी कुठे नाही म्हणतोय. पण मग सामान्य जपानी किंवा जर्मन नागरिक करा युध्द चीनशी किंवा इतर देशांशी म्हणून ओरड करत नाही. इथे च्यायला शेंबडा पोरगापण पाकड्यांची मारा म्हणून बोंबलतोय.

गेल्या अनेक वर्षांत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांत जे भारतीय मेले व जखमी झाले ते सामान्य होते किंवा कसे ?

------

भारतासारख्या अजूनही प्रगत राष्ट्र या संकल्पनेपासून दूर असलेल्या देशाला युद्धाच्या गर्जना परवडणाऱ्या नाहीत. आपण भिकेला लागू हे नक्कीच

भारताला जागतिक ब्यांकेची आजही मदत मिळते व तेव्हाही मिळेल. जपान सुद्धा मदत करेल भारताला.

युद्धाच्या गर्जना सुद्धा परवडणार नाहीत ??

भारताचा डिफेन्स वरचा खर्च दरवर्षीचा किती आहे ? इतर देशांशी तुलना कराल ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो ती सामान्य जनताच होती. पण म्हणून उठसुठ करा युध्द करा युध्द म्हणणे हे काही बरोबर नव्हे . (चला लहान पोरांचं ठीक आहे पण हे त्यांच्या डोक्यात भरवून देणारे कोण ?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

युद्धाच्या गर्जना सुद्धा परवडणार नाहीत ??

जागतिक क्रेडेबिलिटीचा प्रश्न येतो, गब्बरशेठ. जर तुम्ही बलवान असाल आणि तुम्ही युद्धाची गर्जना केली तर त्यावर अ‍ॅक्शन घेणं हे देखील अपेक्षित असतं. नाहीतर पाकिस्तान, उ. कोरियासारखी क्रेडेबिलिटी शिल्लक रहाते.
सामान्य नागरिक काय बोंबा मारतात त्याला युद्धाच्या विषयात फारसं महत्व नसतं. राज्यकर्ते काय वल्गना करतात याला असतं.
सुदैवाने भारताला, मग ते कॉन्ग्रेस असो की भाजपा, समंजस राज्यकर्ते मिळाले आहेत. ते उगाच आगखाऊ वक्तव्यं करत नाहीत. म्हणूनच भारताला आज जग काही प्रमाणात सिरियसली घेतंय.
त्या तुलनेत,
"आम्ही घास खाऊ, पण लढू!"
"चंद्र-सूर्य असेपर्यंत लढू!!"
आणि हल्ली,
"आम्ही अणुबॉम्बचा खुशाल वापर करू!!!"
असल्या पाकी राज्यकर्त्यांच्या बोंबांना जग काय किंमत देतंय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"आम्ही घास खाऊ, पण लढू!"
"चंद्र-सूर्य असेपर्यंत लढू!!"
आणि हल्ली,
"आम्ही अणुबॉम्बचा खुशाल वापर करू!!!"
असल्या पाकी राज्यकर्त्यांच्या बोंबांना जग काय किंमत देतंय?

पण धागाकर्ते हे सामान्य जनतेने केलेल्या गर्जनांबद्दल बोलत आहेत.

आणि दुसरं म्हंजे जग काय किंमत देतंय याबद्दल आपण बोलत नाही आहोत. जी माणसं पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांत जखमी होतायत त्या सामान्य भारतीयांबद्दल बोलत आहोत. ( पाक पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांत जे सामान्य भारतीय मरत आहेत ते बोलू शकत नाहीतच.)

---

जागतिक क्रेडेबिलिटीचा प्रश्न येतो

हा भाग मान्य. धमकी परिणामकारक होण्यासाठी ती क्रेडिबिल असणे गरजेचे आहे.

---

बाय द वे - वर तुम्ही - अ‍ॅपल्स वि. ऑरेंजेस चा आक्षेप घेतलेला आहे. पण भारताची तुलना मग कोणत्या देशाशी करायची ? की - तुलना करून हा प्रश्न सुटणार नैय्ये - अशी मखलाशी स्वतःशी स्वत:ला च करत रहायचं ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाय द वे - वर तुम्ही - अ‍ॅपल्स वि. ऑरेंजेस चा आक्षेप घेतलेला आहे.

आक्षेप कुठे घेतलाय? सहमत आहे असंच तर म्हंटलंय!

पण भारताची तुलना मग कोणत्या देशाशी करायची ?

तुलना मुळात करायचीच कशाला? करायची तर अमेरिकेशी तुलना कदाचित होऊ शकेल...
भारतातही इतर वेळी काहीही मतमतांतरे असली, वैचारीक सावळागोंधळ आहे असं वाटलं तरी जेंव्हा कसोटीची वेळ येते तेंव्हा भारतीयही कमालीची देशभक्ती दाखवतात.
माझ्या आयुष्यात अशा दोन घटना मी अनुभवलेल्या आहेत. पहिली म्हणजे बांगला देशचे युद्ध आणि दुसरी म्हणजे भारताने अणुस्फोट केल्यानंतर इतर जगाच्या रिअ‍ॅक्शनला दिलेलं तोंड!
या दोन्ही वेळेस भारतीयानी (निवासी, अनिवासी, सर्वधमीय, स्त्रिया, पुरूष, मुलं, सगळेच!) दाखवलेल्या देशभक्तीचा मला अभिमान वाटतो!!
आणि कसोटीच्या वेळी देशभक्ती दाखवली तरी मला तितकं पुरेसं आहे. उगाच रोज उठता बसता देशभक्तीचे ढोल बडवण्यावर माझा फारसा विश्वास नाही. त्यात भॉदूपणा किवा बहुतेक वेळा दुसरा काही छुपा अजेंडा असतो असा माझा अनुभव आहे...
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उगाच रोज उठता बसता देशभक्तीचे ढोल बडवण्यावर माझा फारसा विश्वास नाही. त्यात भॉदूपणा किवा बहुतेक वेळा दुसरा काही छुपा अजेंडा असतो असा माझा अनुभव आहे...

अगदी अगदी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तुलना मुळात करायचीच कशाला? करायची तर अमेरिकेशी तुलना कदाचित होऊ शकेल...

कोणताही निर्णय घेताना मुख्य प्रश्न हा असतो की "compared to what ?" - म्हणून.

अनेकांना असं म्हणायला आवडतं की "अमका ढमका अतुल्य आहे" किंवा "याची तुलनाच होऊ शकत नाही" वगैरे. पण तुलना न करता घेतले जाणारे निर्णय हे अत्यंत कमी असतात. व त्यांना "विचारपूर्वक" असे विशेषण लावणे कठिण असते.

आता धागाकर्त्यांचा मुख्य मुद्दा हा आहे की अणुयुद्ध झाले तर जे नुकसान होईल व त्यामुळे जी रिझल्टंट स्थिती निर्माण होईल तिची तुलना (ती स्थिती इमॅजिनरी असली तरी) सद्यस्थितीशी व १९४७ मधल्या स्थितीशी केली आहेच धागाकर्त्याने. व तेव्हाच या निर्णयापर्यंत आलाय की युद्धखोरी ही दुर्गतीस कारक होईल. ही तुलना नाहीये ???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अभिजीत अष्टेकर, तुम्ही "त्यांना" "स्वघोषित देशभक्त आणि युध्दडोहाळे" म्हणता मग तुम्ही स्वतःबद्दल स्वघोषित "???" आणि "शांतिडोहाळे" म्हणणार का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही म्हणणार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी स्वतःच म्हणते मला शांततेचे डोहाळे लागले आहेत. अजिबात युद्धंबिद्धं करू नयेत या मताची मी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

युद्ध
१९१४-१८ -> खंदक खोदणे, बर्यापैकी रणगाडे, विमानांची सुरूवात
१९४०-४५ -> पॅराट्रूपर्स, रणगाडे, विमानं. पाणबुड्या आणि मिसाईल्सची सुरूवात. (रासायनिक्/जैविक सोडून द्या). अणुबाँब.
१९६०-७० -> अणुबाँबचं वैविध्य (न्यूट्रॉन बाँब, छोटी अण्वस्त्रं), ICBMs, SAMs वगैरे मधे नवं संशोधन इ.
१९९०-२००० -> Cyber warfares. Viruses, देशांतर्फे केले जाणारे संगणकीय हल्ले. (Stuxnet,नाम तो सुना होगा?)
२०१०-२०२० -> ड्रोन्स, रोबॉट्स इ. ज्यांचा वापर करून नेमक्या जागा "टिपता" येतात.

शिवाय proxy war, घातपात वगैरे प्रकार आहेतच.

तेव्हा युद्ध म्ह्टलं की लगेच शस्त्रं घेऊन हल्ला होईलच असं सांगता येत नाही. छोट्या छोट्या घटनांनीही शत्रूला प्रचंड त्रास देणं - ही नीती खूपच परिणामकारक ठरू शकते. Conventional war एक तर प्रचंड खर्चिक प्रकार आहे, त्यामुळे बाकीची गुंतागुंत (राजकीय, आर्थिक, आणि सगळीकडे बोंबाबोंब ) वाढते. त्यापेक्षा शत्रूच्या इंडस्ट्रियल सिस्टिममधे व्हायरस घालून त्यांच्या महत्त्वाच्या कारखान्यांत लोचा निर्माण केला, तर शत्रूची युद्धसज्जताच धोक्यात येऊ शकते.
कमीत कमी खर्चात शत्रूचं जास्तीत जास्त नुस्कान करता आलं पाहिजे. त्यात जर आपल्या सैन्याचा संबंध नसला तर सोन्याहून पिवळं.

आता हे असले सगळे उद्योग भारत करतो की नाही त्याची कल्पना नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय गुदगुल्या करून हसवून मारणं हा अजून एक अस्वली युद्धप्रकार!!!
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यावरून आठवलं. मॉंटी पायथॉनच्या कार्यक्रमातलं एक स्किट होतं बहुतेक. अशी कल्पना केली होती की दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना एक विनोद सापडतो, जो ऐकला तर माणूस हसून हसून मरून जातो. मग त्या विनोदाचं ते जर्मन भाषांतर करतात, आणि तो विनोद वाचून दाखवणारेच मरू नयेत म्हणून प्रत्येक माणूस त्यातला एक एक शब्द फक्त म्हणून दाखवतो. त्यातून जे काय गोंधळ तो खास पायथॉनी स्टाइलने त्यांनी दाखवला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~ पायथॉन मंडळींचा गरगरता पंखा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देशांतर्गत काय कमी युद्धे चालू आहेत का ? कायम स्वतःलाच पांडव समजणारे ते, कौरव-पांडव पक्ष तर रोजच देशांत युद्ध खेळत आहेत. त्यामुळे लोकसभेचे आणि देशाचे किती तास वाया जातात आणि देशाचे किती नुकसान होते ते कोण मोजणार ? शिवाय अनेक पंथ, जाती, धर्म हे तर कायम लढण्याच्या पवित्र्यातच असतात. त्यांत तिखट-मीठ घालायला मिडिया, कमिटेड वृत्तपत्रे भाग घेतच आहेत. पाकिस्तानशी युद्ध केले नाही तरी हे नुकसान तर रोजचेच आहे. मग, मेल्या कोंबड्याने आगीला भ्यायचे कशाला ?
अशा विचारांतूनच सामान्य जनता आपला राग व्यक्त करत असते. त्यांच्या म्हणण्याने जर युद्ध चालू होणार असते तर त्यांच्या म्हणण्याने आणखी कितीतरी घटना घडू शकल्या असत्या. मॉब सायकॉलॉजी मधे डॉक्टरेट केलेली राजकारणी मंडळी या देशांत असताना, या देशाची वाट लावायला, कुणा बाह्य शत्रुची खरी आवश्यकताच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"आम्ही अणुबॉम्बचा खुशाल वापर करू!!!"
असल्या पाकी राज्यकर्त्यांच्या बोंबांना जग काय किंमत देतंय?

आम्ही भारतात राहणारे लोक देत ब्वा किम्मत. च्याय्ला हितं मुंबैत डोक्यावर अणुबाँब पडला तर पिवळा डांबीस यांचं काय वाकडं होणारे तिथे आम्रविकेत? तेव्हा तुमच्याही "जग काय किम्मत देतंय?" या डरकाळ्या निरर्थकच नव्हेत काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

च्याय्ला हितं मुंबैत डोक्यावर अणुबाँब पडला तर पिवळा डांबीस यांचं काय वाकडं होणारे तिथे आम्रविकेत?

नाही, पिवळा डांबिस यांचं काहीही वाकडं होणार नाही आम्रविकेत.
पण हितं मुंबैत डोक्यावर अणुबॉम्ब पडेल असं वाटणं म्हणजे त्या सशाच्या 'आभाळ पडलं' असं वाटण्याजोगंच आहे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही, पिवळा डांबिस यांचं काहीही वाकडं होणार नाही आम्रविकेत.

तेच. आपल्याला भीती नसली की शेजारून 'बक अप' म्हणणारे कपडे संभाळू लोक बरेच असतात. त्याच लोकांचा वॉर माँगरिंगमधे मोठा हात असतो.

बाकी (तुम्ही नागरिकत्व घेतलेली) अमेरिका 'वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन' म्हणत अख्खा देश जाळते, तेव्हा कोणत्या सशाच्या डोक्यावर नक्की काय पडलेलं असतं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

आपल्याला भीती नसली की शेजारून 'बक अप' म्हणणारे कपडे संभाळू लोक बरेच असतात. त्याच लोकांचा वॉर माँगरिंगमधे मोठा हात असतो.

आडकित्ता, काय ओ असं म्हणता ? पिडांकाका तर माझ्या युद्धखोरीस "दबे लब्जों मे" का होईना पण विरोध करत आहेत. तुम्ही गब्बर सोडून संन्याशाला सुळावर .... ?

अधोरेखित भागाबद्दल. मोरल हजार्ड चे उत्तम उदाहरण. १९८९ मधे पाकिस्तान ने जेव्हा भारतात (काश्मिरात) दहशतवादी कारवाया सुरु केल्या तेव्हा पाकिस्तानी जनतेस कोणतीही भीती नव्हती. रशिया अफगाणिस्तानातून बाहेर पडला त्याआधी जे लोक मुजाहिद्दीन म्हणून काम करत असंत (रशिया विरुद्ध) ते लेबर फ्री-अप झाले व पाकिस्तानला आयतेच प्रशिक्षित अतिरेकी मिळाले. मग ते वापरून त्यांनी काश्मिरात राडे सुरु केले. पाकी जनतेस याची कोणतीही झळ पोहोचत नव्हती. त्यामुळे त्यांची मूक संमती होतीच. अनेक पाकी नेत्यांची सक्रीय संमती होती. त्यांना नुकसान काहीच नव्हते. उलट फायदाच होता. मुजाहिद्दीन मंडळींना "तुमच्या मुळे रशिया अफगाणिस्तानातून बाहेर पडला" असं सांगून मोटीव्हेट करण्यात आले. व पाकिस्तानी युद्धखोरी went unchecked.

नंतर असं झालं की हेच पाकिस्तान पुरकृत अतिरेकी पाकिस्तानवर उलटले व पाकी लोकांना मारायला लागले. व पाकिस्तान आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन बोंबलायला लागला की पाकिस्तान हा दहशतवादाचा व्हिक्टिम आहे.

आणि म्हणून माझी इच्छा ही आहे की पाकिस्तानी जनतेस शिक्षा व्हायला हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर,
इथे फक्त काही देशांची नावे बदलतो. आता तुमची भुमिका मला बरोबर कळली आहे का ते सांगा!

क्ष्क्ष्क्ष्क्ष मधे अमेरिकेनेने जेव्हा अफगाणिस्तानात कारवाया सुरु केल्या तेव्हा अमेरिकन जनतेस कोणतीही भीती नव्हती. रशिया अफगाणिस्तानातून बाहेर पडला त्याआधी अमेरिकेला लोक मुजाहिद्दीन म्हणूल लढायला तयार असणारे आयते प्रशिक्षित अतिरेकी मिळाले. मग ते वापरून त्यांनी अफगाणिस्तानात राडे सुरु केले. अमेरिकी जनतेस याची कोणतीही झळ पोहोचत नव्हती. त्यामुळे त्यांची मूक संमती होतीच. अनेक अमेरिकी नेत्यांची सक्रीय संमती होती. त्यांना नुकसान काहीच नव्हते. उलट फायदाच होता. मुजाहिद्दीन मंडळींना "तुमच्या मुळे रशिया अफगाणिस्तानातून बाहेर पडला" असं सांगून मोटीव्हेट करण्यात आले. व अमेरिकन युद्धखोरी went unchecked.
नंतर असं झालं की हेच (तालिबानी/मुजाहिदीनी) अतिरेकी अमेरिकेवर उलटले व अमेरिकन लोकांना मारायला लागले (९/११). व अमेरिका आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन बोंबलायला लागला की अमेरिका हा दहशतवादाचा व्हिक्टिम आहे.
आणि म्हणून माझी (गब्बरची) इच्छा ही आहे की अमेरिकन जनतेस शिक्षा व्हायला हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ऋ, this line of reasoning माझ्यासाठी प्रचंड गैरसोयीचे आहे म्हणून मी करत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आज 'न्यू याॅर्कर'वर हा लेख वाचला - http://www.newyorker.com/news/news-desk/the-pakistani-dystopia

त्याचा शेवट -
Since 9/11, according to congressional reports, U.S. taxpayers have given Pakistan at least eighteen billion dollars, much of it to the military. Last year alone, the U.S. gave Pakistan $1.5 billion dollars. Isn’t it about time we asked ourselves whether this is a good idea?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि अंतर्गत मास शूटिंगमध्ये जास्त अमेरिकन मरतात अतिरेकी हल्ल्यांपेक्षा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाकिस्तानने , अमेरीकेच्या नक्की नाकदुर्‍या काय धरल्यात कळत नाही ब्वॉ की अमेरीका पाकड्यांचं इतकं लांगूलचालन करते. Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर अप्पा,
माझं ऑब्जेक्शन 'जग काय किम्मत देतंय'ला आहे. पिडाकाका उग्गंच सापडलेत प्रतिसादात.
जगाने किंमत दिलीच नाही अन कुण्या माथेफिरूच्या हातात सापडलाच इस्लामिक बाँब, तर नक्की कुणाच्या डोक्यात आपटला जाईल तो? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

पिडाकाका उग्गंच सापडलेत प्रतिसादात.

मग सोडून द्या त्यांना!
(आणि नंतर मग काय घालायची काशी ती घाला त्या पाकीस्तानची! आमी नाय अडवणार!!)
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डब्बल झाल्यामुळे प्रकाटाआ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अहो पण मी वॉर मॉन्गरिंग कुठे करतोय?
उलट मी तर तुमच्या 'मुंबैत अणुबॉम्ब पडण्याच्या' विधानाशी असहमती दाखवून असं काही होण्याची शक्यता नाही हेच तर सांगतोय!
ते तर अ‍ॅन्टी- वॉरमॉन्गरिंग झालं!
बाकी तुम्ही आम्रविकेला शिव्या घातल्याबद्दल काही वाटलं नाही. ते तर ह्या मराठी संस्थळांवर गेली सात आठ वर्षे जवळजवळ रोजच वाचतोय.
कारण एकतर फ्रीडम ऑफ स्पीच आणि दुसरं म्हणजे आता कान मेले आहेत आमचे!!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्या घाल्णं जस्टीफाईड आहे, हे उत्तर चुकीचं आहे का? Beee

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

तुम्हाला जर जस्टीफाईड वाटत असेल तर घाला शिव्या, मला काय!
त्यालाच तर फ्रीडम ऑफ स्पीच म्हणतात.
आय मे डिसअ‍ॅग्री विथ युवर व्ह्यूज, बट आय विल फाईट फॉर युवर राईट टू एक्सप्रेस देम!!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I am not interested in you fighting for my rights. I can fight for myself. तेवढा दम अजून आहे.

I am only interested in your opinion about the ONE point i raised regarding the "world opinion" about bullying a country for imagined weapons of mass destruction, and waging a war, AND possibility of Pakistan with PROVEN atomic bomb capability, and the sanity of its leaders when they say that they might deploy it. And american viewpoint re this.

हे "तुम्हाला जर जस्टीफाईड" वाटते का?

After all, America IS your adopted country. Is it not?

काय म्हणता? ओपिनियन देणार की बगल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

काय म्हणता? ओपिनियन देणार की बगल?

ओपिनियन.

I am not interested in you fighting for my rights. I can fight for myself. तेवढा दम अजून आहे.

गुड. हार्दिक शुभेच्छा!

I am only interested in your opinion about the ONE point i raised regarding the "world opinion" about bullying a country for imagined weapons of mass destruction, and waging a war, AND possibility of Pakistan with PROVEN atomic bomb capability, and the sanity of its leaders when they say that they might deploy it. And american viewpoint re this.

हे "तुम्हाला जर जस्टीफाईड" वाटते का?

होय! कारण पाकिस्तान असं करेल असं मला वाटत नाही.

After all, America IS your adopted country. Is it not?

येस, अ‍ॅन्ड इट इज नन ऑफ युवर बिझिनेस!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय! कारण पाकिस्तान असं करेल असं मला वाटत नाही.
<<
अहो,

तुम्ही 'जगाला फिकीर' बद्दलचे स्टेटमेंट केले. तुम्ही तुमच्या 'राष्ट्रीय पॉलीसी'ला योग्य म्हणता की अयोग्य हे विचारतोय. पाकिस्तान काय करेल त्याबद्दलचे तुमचे मत नाही.

तुमचे एकट्याचे मत = जगाचे असे म्हणणे असेल, तर मज्जाच्चै.

अन हो, I have to make things MY business, when a person tells me that I am dumb for worrying about fate of MY country Smile

"तुम्हाला" अंडरस्कोर करून (अमेरिकेला) शिव्या देणे योग्य वाटत असेल तर द्या, असे तुम्ही म्हणालात. मी देण्याबद्दलचे माझे जस्टीफिकेशन सांगितले. व तुमचे विचारले. त्यावर किती बगला? एलोएल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मी माझ्या बाजूने पाकिस्तानच्या मुंबईवर अणुबॉम्ब टाकण्याच्या विषयावरचं माझं मत सांगितलं. मी माझंच मत सांगणार ना, की आणखी कुणाचं?
जर तुमच्या डोक्यात ते शिरत नसेल किंवा तुम्हाला काहीही करून मी बगला मारतोय असंच जाहीर करून स्वनामधन्य लोल करायचं असेल तर जरूर करा. माझं त्यात काही जात नाही. ज्याची त्याची समज! इतर सूज्ञ लोकं काय समजायचं ते समजतात.

तुम्ही तुमच्या 'राष्ट्रीय पॉलीसी'ला योग्य म्हणता की अयोग्य हे विचारतोय.

माझ्या, म्हणजे भारताबद्दलच्या गेल्या १०-१५ वर्षांतील अमेरिकन राष्ट्रीय पॉलिसीबद्द्ल (मग ती रिपब्लिकन असो वा डेमोक्रॅट), विचारत असाल तर माझा तिला पूर्णपणे पाठिंबा आहे. आता ती योग्य आहे की अयोग्य हे फक्त काळच ठरवू शकतो!

मला वाटतं की आता माझ्या परीने जे काय सांगायचं ते मी सांगितलं आहे. याउप्पर तुम्हाला आणखी काही फाटे फोडायचे असतील तर तो तुमचा प्रश्न.
पण आता माझ्याकडून तुमच्यासाठी लेखनसीमा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0