पॉर्न आणि आपण - सर्वेक्षण

काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने पॉर्नवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. बंदी लागू होण्याआधीच हा निर्णय मागे घेतला. त्या निमित्ताने पॉर्नबद्दल सर्वसामान्यांची आणि अभ्यासकांची, पॉर्नच्या बाजूने आणि विरोधात अशी सगळ्या प्रकारची मतं प्रदर्शित झाली. पॉर्न बघणं चांगलं का वाईट, योग्य का अयोग्य याबद्दल काहीही मत न बनवता लोकांना काय वाटतं याचा थोडा अभ्यास केला जावा; लोक पॉर्न बघतात का, बघतात तर किती प्रमाणात, किती नियमितपणे बघतात; बघत नसतील तर का बघत नाहीत; पॉर्न ही घृणास्पद गोष्ट आहे का अनावश्यक याबद्दल समाजाचं काय मत आहे याचा अभ्यास करणं महत्त्वाचं वाटतं. कारण समाजासाठी बनवलेले कायदे हे समाजाच्या मताकडे दुर्लक्षून बनवले जाऊ नयेत.

आत्तापर्यंत अशा प्रकारची अनेक सर्वेक्षणं झालेली आहेत, पण ती पाश्चात्य समाजात झालेली आहेत. टीव्ही, सिनेमा, इंटरनेट या माध्यमांतून पाश्चात्य संस्कृती आपल्यापर्यंत पोहोचत असली तरीही भारतीय समाजाची, भारतात अनेक वर्षं घालवलेल्या लोकांची मतं काही निराळी असू शकतात. त्याची चाचपणी करावी असा या प्रश्नमालिकेमागचा हेतू आहे.

या सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या कोणाचीही व्यक्तिगत माहिती, ओळख आमच्यापर्यंत पोहोचणार नाही. किंचित व्यक्तिगत माहिती हवी आहे ती वयोगट कोणता आणि स्त्री-पुरुषांच्या मतांमध्ये काही फरक आहे का असा अभ्यास करण्यासाठी. हे प्रश्न पूर्ण करण्यात तुमचा फार वेळ जाणार नाही. या प्रश्नांच्या उत्तरांमधून कोणाबद्दलही मतं बनवायची नाहीत, वा कोणालाही जोखायचं असा हेतू नाही. ही प्रश्नावली भरताना एक मिनीटापेक्षा जास्त वेळ जाऊ नये याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे.

आपण समाज म्हणून कसा विचार करतो हे समजून घेण्यासाठी मदत करण्याबद्दल आभार. सर्वेक्षणाचे निकाल (बहुदा) मे महिन्यात इथेच जाहीर केले जातील. ३१ मार्चपर्यंत सर्वेक्षणात भाग घेता येईल.

सर्वेक्षणात भाग घेताना गूगलमध्ये लॉगिन करण्याची गरज नाही. खाजगीपणा जपण्यासाठी प्रायव्हेट ब्राऊजिंगची सोय वापरून उत्तरं देऊ शकता; जेणेकरून मला आणि गूगललाही तुमची ओळख काय हे समजणार नाही. हा सर्वेक्षणाचा दुवा.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

भाग घेतल्या जाण्यात आल्या गेलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या चार तासांमध्येच २५+ प्रतिसाद आलेले दिसत आहेत. ए‌वढा उत्साहवर्धक प्रतिसाद, तो ही लगेचच मिळेल अशी अपेक्षा नव्हती.

मराठी संस्थळांवर नसणाऱ्या, पण ओळखीच्या भारतीयांनाही याचा दुवा पाठवायला हरकत नाही. जितक्या वेगवेगळ्या विचारांच्या, पार्श्वभूमीच्या, वयाच्या लोकांकडून उत्तरं मिळतील तेवढं उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आणि अ‍ॅनॅलिसिस वाचण्यास आतुर.

डेटातुराणाम न भयं न लज्जा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाग घेण्यात आला आहे. धाग्याचा दुवाही यथाशक्ती पुढे ढकलण्यात येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

हे उत्तम आहे की या सर्वेक्षणात प्रश्न इंग्रजीतही आहेत. आता भारतीय परंतू अमराठी वर्तुळांमध्ये, नातेवाईकांमध्ये, भारतभर पसरलेल्या मैतरांमध्ये हा सर्व्हे पोचवता येईल आणि त्याचे निष्कर्ष अधिकाधिकाक व्यापक विदा वापरून तुम्हाला काढता येतील.

प्रश्न आवडले. शुभेच्छा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भाग घेतलेला आहे. लवकर निकाल घोषित करून टाका. आणखी एक प्रश्न टाकता आला असता. कोणत्या प्रकारचे पहायला आवडते ? म्हणजे त्यात पण प्रकार आहेत. मिल्फ , इंटर रेशिअल , टीन , मचुअर , कुगार इत्यादी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याने काय साध्य झाले असते? कॉन्टेक्स्ट (परिप्रेक्ष्य वाटतं) हा आहे की सरकारने हस्तक्षेप करावा का?
अर्थात तुम्ही थट्टेत म्हणत असाल तर सोडून द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कॉन्टेक्स्ट (परिप्रेक्ष्य वाटतं) हा आहे की सरकारने हस्तक्षेप करावा का?

ते केवळ तात्कालिक कारण वाटलं. या सर्वेमागील भुमिका वेगळी दिसतेय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ओह. असेल ब्वॉ. शक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याने काय साध्य झाले असते?
थट्टेत म्हणत असाल तर सोडून द्या.

छे छे !! थट्टा नाही . मला वाटत जर हे कळालं भारतीय लोकांचात्याबाबतचा मानसिक ओघ , असलेली उत्सुकता अजूनच उघड झाली असती. जर लोकांना त्याचे टाईप पण माहिती आहेत तर ते किती मन लावून आणि मोठ्या प्रमाणावर पाहतात हे सरळसरळ कळालं असतं. बाकी काही नाही.
आता सर्व्हे करतच आहेत तर विस्तारात होऊन जाऊदे. सरकारला कळेल तरी किती शौकीन बसलेत ते.

अर्थात माझं मत चुकीचंही असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लोकांना नक्की काय आवडतं याचे तपशील समजून त्यातून काही आणखी अर्थ समजून घेण्याएवढा माझा अभ्यास नाही.

उदा - सध्या मी एक पुस्तक वाचत आहे - The Feminist Porn Book. ही अँथॉलॉजी आहे. यात काही पॉर्नोग्राफर्सनी लिहिलेलं आहे. एकीने लिहिलंय, ती पुरुष म्हणून जन्माला आली, पॉर्नमध्ये काम करून पैसे मिळवून सेक्स रीअसाईनमेंट सर्जरी करून घेतली. तेव्हा तिला वाटत होतं की आपल्याला जे बघावंसं वाटतं ते पॉर्न अस्तित्वातच नाही. म्हणून पॉर्न-अॅक्टर ते पॉर्न-निर्माती/दिग्दर्शक असा तिचा प्रवास झाला.
आणखी एक आहे तो ट्रान्सजेंडर, कृष्णवर्णीय, (आता) स्त्री मानसोपचारतज्ञाचा. तिने नोंद केल्ये की तिच्या दोन 'पेशंट्स' लेस्बियन जोडीदार होत्या. त्या दोघींच्याही वेगवेगळ्या फँटसीज होत्या आणि दोघींनाही दुसरीच्या फँटसीबद्दल आक्षेप होता; हे जमणार नाही, यामुळे आनंद मिळणार नाही, असं. तज्ज्ञाने या दोघींना एकमेकींच्या फँटस्या दर्शवणारं पॉर्न बघायला सांगितलं. ते बघून "यातूनही आपल्याला आनंद मिळेल" हे दोघींनीही मान्य केलं. त्यांचं आपसांत प्रेम होतंच, पण शारीर संबंधांची प्रत सुधारल्यामुळे प्रेम आणि नातेसंबंधांची प्रतही वाढली.
एक लेख आहे तो स्वतःला जेंडरक्विअर म्हणणाऱ्या व्यक्तीचा. या व्यक्तीचा उल्लेख ती/तो असा होऊ नये असं म्हणणं आहे. या व्यक्तीला कधी पुरुष, कधी स्त्री असल्याप्रमाणे लैंगिक संबंध ठेवायचे असतात. याला तरल-लैंगिकता म्हणतात.

(हे पुस्तक वाचताना मराठी भाषेत एवढे शब्दच नाहीत याबद्दल फार गंड येतो. ट्रान्सजेंडर याला शब्द काय, मला माहीत नाही. या संदर्भात बोलताना सिसजेंडर असाही शब्द येतो; मराठीत असं काही नाहीच.)

खोऱ्याने उपलब्ध असलेलं पॉर्न हे स्ट्रेट पुरुषांच्या उपभोगासाठी बनवलेलं असतं हे मला पॉर्न बघितल्यापासून लक्षात आलं. गे पुरुषांसाठीही नसतं असं नाही. फेमिनिस्ट पॉर्न हा प्रकार गेल्या काही वर्षांतच साईट्सवर दिसायला लागला. स्त्रिया मोठ्या प्रमाणावर गे पॉर्न पाहतात अशी नोंद सर्व्हेंमधून होते.

हेटरोनॉरमेटीव्ह वगळता इतर लोक, जे हेटरोसेक्शुअलही असतात, त्यांना संस्कारांमुळे, भीडेमुळे, आपल्या फँटस्या म्हणजे विकार वाटू शकतात. उदाहरणार्थ - S/M.

माणसांच्या फँटसीज फार विचित्र असू शकतात. मास्टर्स आणि जॉन्सन नोंदवतात की काही स्त्रियांना स्वतःवर बलात्काराची फँटसी असते; प्रत्यक्षात तो व्हावा असं नव्हे, तर अशा कल्पनांनी त्यांना ऑरगॅझमचा आनंद मिळतो. या फँटस्या पॉर्नमधून पुरवल्या जाऊ शकतात.

म्हणून या सर्व्हेत काही प्रश्न असे आहेत - तुम्ही प्रत्यक्षात ज्या लैंगिक क्रिया करता त्याच बघता का? तुम्हाला ज्या प्रकारचं पॉर्न बघायचं असतं ते सहज उपलब्ध होतं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ओके

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाग घेतलेला आहे.निकाल वाचण्यास आतुर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाग घेण्यात आला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The Journey Is the Reward...

भरून दिला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

भाग घेण्यात आला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर कोणी या सर्वेक्षणात भाग घेतला नसेल तर आठवण म्हणून सर्वेक्षण वर काढत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!