राम बहादुर थापा च्या केस च्या निमीत्ताने

ओरीसातील बालासोर जिल्ह्यातील रासगोविंदपुर या गावात एक वापरात नसलेले विमानतळ होते. तिथे मोठ्या प्रमाणावर असलेल्या किंमती भंगारमालाची राखण करण्यासाठी दिबाकर व गोविंद या दोन चौकीदारांना नेमलेले होते. या विमानतळाच्या सभोवतालच्या परीसरात संथाळ इ.आदिवासींची मोठ्या प्रमाणात वस्ती होती. या लोकांचा भुताखेतांवर विश्वास होता व या उजाड विमानतळावर भुताखेतांचा वास आहे अशी त्या परीसरात समजुत पसरलेली होती. एक दिवस कलकत्त्याच्या चटर्जी फ़र्म कडुन एक जगतबंधु चटर्जी नावाचा माणुस त्याचा नेपाळी नोकर राम बहादुर थापा बरोबर येथील भंगारमाला च्या खरेदीसाठी गावात दाखल झाला. ते दोन्ही गावातील किशनचंद्र पात्रो या माणसाकडे मुक्कामाला उतरले. त्याचा गावातच एक चहाचा स्टॉल होता. एका खेड्याहुन दुसर्‍या खेड्याला जाणारे अनेक छोटे रस्ते या विमानतळाच्या परीसरामधुन जात होते. भुतांच्या भीतीने रात्रीनंतर कोणी विमानतळाचा रस्ता वापरुन दुसरीकडे असलेल्या गावात जाणे टाळत असे. असाच एक शेजारील टेलकुंडी गावचा रहीवासी चंद्रा माझी रात्री उशीर झाल्याने विमानतळाचा रस्ता टाळण्यासाठी पात्रोच्या चहास्टॉलवर रात्रीच्या मुक्कामास आला. येथे अगोदरच असलेल्या चटर्जी व थापा ला भुतांना बघण्याची अनिवार इच्छा झाली. त्यांनी पात्रो ला पटवले की चंद्राला सोबत करुन आपण त्याच्या गावी पोहोचवुन येऊ व भुते असतील तर पाहुन घेऊ. त्याप्रमाणे या तिघांनी रात्री निघुन चंद्रा ला टेलकुंडी गावी पोहोचवले. तेथुन पुन्हा विमानतळाच्या फ़ुटपाथ च्या रस्त्याने परतत असतांना मध्यरात्रीच्या सुमारास त्यांना तेथुन काही अंतरावर तेव्हा वारा वेगाने वाहत होता, काही आकृत्या अंधारात हलत नाचत असलेल्या दिसल्या व एक प्रकाशाकृती इंग्रजीत ज्याला 'will-o' the wisp.' म्हणतात तसा दिसला. त्यावरुन त्यांना काही भुते एका प्रकाशाभोवती नाचत आहेत असे द्र्श्य प्रतीत झाले. ते तिन्ही त्या दिशेने धावले.तिथे सर्वात अगोदर नेपाळी नोकर थापा पोहोचला त्याने त्याच्याजवळील "कुकरी" या घातक शस्त्राने भुतांवर बेभान सपासप वार करणे सुरु केले. त्याच्या हल्याने जखमी झालेले ओरडु लागल्यावर काही क्षणांनी थापा भानावर येऊन थांबला.

प्रत्यक्षात झाले असे होते की ज्यांच्यावर त्याने हल्ला केला होता त्या शेजारच्या परीसरातील "माझी" आदिवासी स्त्रीया होत्या. त्या तेथे कंदिल घेऊन आलेल्या होत्या व तेथील मोहुआ च्या झाडाखाली "मोहुआ" ची फ़ुले रात्रीच्या वेळेस वेचत होत्या. दुरुन बघितल्याने ,या आदिवासी स्त्रीयांच्या हातातील हलत्या कंदिलाच्या प्रकाशाने वा मनातल्या भीतीने म्हणा 'will-o' the wisp चा भास या तिघांना झाला. व त्या समजतुतीतुन थापाने यांना खरोखर भुत समजुन कुकरीने वार केले. थापाच्या या हल्ल्यात एका आदिवासी स्त्रीचा गेल्ही मांझियानी चा जागीच मृत्यु झाला आणि इतर दोन स्त्रीया गंभीर जखमी झाल्या.मागुन आलेल्या पात्रो वर सुद्धा अंधारात न ओळखल्याने गोंधळुन भुत समजुन थापाने काही वार करुन जखमी केले. थापावर कलम ३०२ अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला व ३२४ व ३२६ अंतर्गतही इतरांना जखमी करण्यासाठी गुन्हा दाखल झाला.

या खटल्यात सेशन कोर्टाच्या जज ने थापा ला निर्दोष मानुन त्याची मुक्तता केली. यासाठी सेशन जज ने जी कारणीमीमांसा दिली ती अशी की थापा ने केलेले कृत्य हे " अंडर अ बोना फ़ाइड मिस्टेक ऑफ़ अ फ़ॅक्ट " होते. तो पुर्ण विश्वासाने भुतांवर हल्ला करत होता मानवांवर नाही म्हणुन तो आयपीसी च्या कलम ७९ अंतर्गत (चा फ़ायदा घेऊन) दोषी मानला जाऊ शकत नाही. या निकालाला हाय कोर्टात आव्हान देण्यात आले.

हायकोर्टाने किशन चंद्र पात्रो ज्याला थापाने जखमी केले होते त्याची साक्ष ग्राह्य धरली नाही कारण पोलिसांना दिलेल्या जबानीत त्याने म्हटले होते की जगतबंधु चटर्जी ने त्याला रात्री भुते बघण्यासाठी घराबाहेर पडण्यास भाग पाडले होते. मात्र कोर्टात त्याने मी त्यांच्या बरोबर गेलोच नव्हतो अशी जबानी दिली. व चंद्रा ने सुद्धा अगोदर पोलिसांसमोर तो घाबरला होता म्हणुन रात्री त्याच्या टेलकुंडी गावास जाणे टाळत होता असे सांगितले मात्र कोर्टात त्यानेही मी भुतांना घाबरत नाही इ. उलटी बाजु मांडली. त्यास्तव हायकोर्टाला दोन्ही साक्षीदार फ़ारसे " रीलायबल" वाटले नाहीत. पुढे ज्या फ़ॅक्ट्स हायकोर्टाने महत्वपुर्ण मानल्या त्यांच्या दृष्टीने त्या अशा

१- जगतबंधु व नेपाळी थापा या परीसरात नविन होते घटनेच्या केवळ काही महीनेआधी पुरता त्यांचा या परीसराशी संबंध आला होता.
२-या परीसरात अशी अफ़वा वंदता होती की मंगळवारी व शनीवारी रात्री विशेषत: या विमानतळाच्या परीसरात भुते मोकाट फ़िरतात गाणी गातात, नाचतात, इ.
३-त्या रात्री मंगळवार होता. व त्यामुळेच सुरुवातीला चंद्रा ने टेलकुंडी गावी जाण्याऐवजी पात्रो च्या चहा स्टॉल वर मुक्कामाचा निर्णय घेतला होता.
४- अशा रीतीने " विमानतळ परीसरात भुते आहेतच " या पुर्ण विश्वासाने सर्व झपाटलेले चौघे त्या मंगळवार च्या रात्री निघालेले होते.
५- त्यानंतर तिघे परततांना वाटेवर त्यांना जेव्हा 'will-o' the wisp. दिसला तेव्हा टी स्टॉल वाला पात्रो जोरात ओरडला " ते बघा तिथे भुते आहेत"
६- ते ऐकताक्षणीच नेपाळी थापा वेगाने त्या दिशेने एका शॉर्ट कट ने त्या दिशेने व इतर दोघेही दुस‍र्‍या थोड्या लांब मार्गाने त्या दिशेला धावले.
७- गोंधळात जेव्हा मागाहुन आलेल्या पात्रो ला ही थापाच्या कुकरीचा वार बसला तेव्हा तो ओरडला त्याच्या आवाजानेच नेपाळी थापा भानावर आला.

ज्या आयपीसी च्या सेक्शन ७९ चा फ़ायदा थापा ला मिळाला त्यातील तरतुद अशी आहे. The benefit of Section 79 I.P.C. is available to a person who by reason of mistake of fact in good faith, believes himself to be justified by law in doing an act. मात्र सेक्शन ५२ प्रमाणे Good faith requires due care and attention .

म्हणजे गुड फ़ेथ तेव्हाच मान्य होतो जेव्हा व्यक्तीने सत्यता तपासण्याची पुरेशी काळजी घेतलेली आहे व त्याकडे अवधान दिलेले आहे. या केसमध्ये थापाच्या विरोधी वकीलाने आक्षेप घेतला तो असा की .घटनेच्या संदर्भात दिलेल्या साक्षीवरुन असे सिद्ध होत होते की थापा कडे त्या वेळेस टॉर्च होता. तर त्यांच म्हणण अस की थापा ने टॉर्च चा प्रकाशझोत टाकुन जर एकदा जरी खात्री करुन घेतली असती तर त्याच्या तात्काळ लक्षात आले असते की तिथे त्या स्त्रीया आहेत व भुते नाहीत , व त्यांचा जीव वाचला असता. मात्र त्याने तसे काहीही केले नाही व पात्रो चे " ते बघा तिथे भुते आहेत " हे विधान ऐकता बरोबर तो तिकडे पळत सुटला व बेभान होऊन कुकरीने वार करु लागला. त्याने ड्यु केअर घेतली नाही म्हणुन तो दोषी आहे. अशी बाजु मांडली.

हायकोर्टाने त्या विरोधात जो मुद्दा सर्वात महत्वाचा मुद्दा ग्राह्य धरला तो असा होता. ( हा एका जुन्या केस लॉ वर आधारीत होता एम्परर व्हर्सेस अब्दुल वदुद अहेमद.) त्यातील निकालावरुन केअर व कॉशन घेतली जाण्यासंदर्भात ते त्या संबंधित व्यक्तीच्या क्षमता आणि इंटेलीजन्स वर अवलंबुन आहे व त्याहुन सर्वात महत्वाच विधान म्हणजे एखाद्या माणसाने शांत व चिंतनीय मनाने विचारपुर्वक काढलेला निष्कर्श हा दुसर्‍या एखाद्या सांप्रदायिक उन्मादाच्या प्रभावाखाली अतीउत्साहात झील मध्ये काढलेल्या व जो सारासारविवेकी विचाराला सरावलेला नसलेला असा माणुस आहे त्याने काढलेला निष्कर्श यात फ़रक असतो. हाच विचार रेफ़रन्स मध्ये खालील शब्दात मुळ असा मांडलेला आहे. जो हायकोर्टाने महत्व देऊन ग्राह्य मानला. तो मुळ उतारा असा.

"The standard of care and caution must be judged according to the capacity and intelligence of the person whose conduct is in question. It is only to be expected that the honest conclusion of a calm and philosophical mind may differ very largely from the honest conclusions of a person excited by sectarian zeal and untrained to the habits of reasoning.'' "The question of good faith must be considered with reference to the position of the accused and the circumstances under which he acts .... .. ....... The law does not expect the same standard of care and attention from all persons regardless, of the position they occupy

तर या केसमध्ये हायकोर्टाने कलम ७९ चा लाभ नेपाळी थापा ला देतांना खालील बाबींचा निर्देश केला.

१-नेपाळी थापा या परीसरात नविन होता व भुताखेतांवर दृढ विश्वास ठेवणारा माणुस होता.
२-नेपाळी थापा पेक्षा तुलनेने अधिक सुशिक्षीत अशा त्याच्या मालकाने चटर्जी ने त्याला या विश्वासापासुन तो नेपाळी परावृत्त होइल असे काहीही सांगितले सुचविले नाहे.
३-जेव्हा पात्रा ओरडला की "ते बघा तिथे भुते आहेत " तेव्हा तो सर्वाधिक विचलीत व एक्सायटेड झाला होता.
जज चे त्यावर असे म्हणणे होते की

Considering the status and intellectual attainments of the respondent and the place and time and the circumstances, I do not think it can be said that he acted without due care and attention. When even persons with a higher standard of attainments like P.Ws. 26 and 29 thought that there were ghosts around the flickering light find when neither of them dissuaded the Nepali from going there and when on the other hand P.W. 26 cried out pointing out that it was a ghost it would not be proper to expect that the Nepali should have paused and examined carefully whether the persons moving round the figures were human beings or not.

जज ने महत्व दिलेला भाग की त्याच्याहुन नेपाळी थापा पेक्षा तुलनेने अधिक क्षमता असलेल्या इतर दोघांना सुद्धा या गोष्टीवर विश्वास बसला की तिथे भुते च आहेत. आणि त्या दोघांनीही त्याला थांबवण्याचा जराही प्रयत्न केला नाही तेव्हा नेपाळी थापा सारख्या सामान्य तुलनेने कमी क्षमता असलेल्या व्यक्ती कडुन त्याने थोडे थांबुन अधिक विचारपुर्वक विवेकाने निर्णय घ्यायला हवा होता टॉर्च मारुन खातरजमा करावयास हवी होती अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. कोर्टाच म्हणण अस की थापा च्या मनात अगदी कणभर जरी संशय निर्माण झाला असता तर त्याने टॉर्च मारुन पाहीलाच असता मात्र तसे नव्हते त्याला पुर्ण खात्री झालेली होती व इतर दोघांनी त्याला तो चुकतोय असे न सांगता उलट त्याचा समज अधिक दृढ होईल असेच वर्तन केले.

या आधारावरुन हायकोर्ट जज ने नेपाळी राम बहादुर थापा ला कलम ७९ चा फ़ायदा देऊन या आदिवासी महीलेच्या खुनाच्या व इतरांना जखमी करण्याच्या सर्व आरोपांतुन आरोपी राम बहादुर थापा ची पुर्णपणे निर्दोष मुक्तता केली.

आता एक दुसरा भाग मला तुर्तास हाच मुद्दा चटकन आठवतोय म्हणुन हा घेतोय बाकी अनेक समकालीन इतर मुद्दे या दिशेने जाणारे असु शकतात. कृपया या कडे सध्या घेतलेले एक प्रातिनीधीक उदाहरण म्हणुनच बघावे ही विनंती. भारतात विच हंटींग च्या केसेस चे म्हणजे एखाद्या पुरुष वा महीलेला ( अशा केसेसमध्ये तुलनेने महीलांची संख्या नेहमीच अधिक असते ) ती चेटकीण आहे असे ठरवुन समुहाने मारण्याच्या अनेक घटना झालेल्या आहेत. यात टीपीकली गावात एखाद बाळ वा माणुस आजाराने दगावला किंवा एखादा पाळीव पशु जरी अगदी बैल बकरी दगावु लागले. तरी इतक्या पुरेशा कारणास्तव एखाद्या महीलेला एखाद्या लोकल ओझा मांत्रिकाच्या निर्णयावरुन चेटकीण ठरवले जाते, व तिच्या चेटुक करण्यामुळे असे मृत्यु होत आहेत असा आरोप करण्यात येतो. आणि त्यानंतर अनेकदा भयानक पाशवी रीतीने त्या महीलेचा बळी घेतला जात असतो. हा प्रकार भारतात आसाम व झारखंड या राज्यात मोठ्या प्रमाणावर झाल्यावर या दोन राज्य सरकारांनी विशेष कायदे या संदर्भात पास केलेले आहेत. एक डायन प्रथा नावाने व दुसरा अजुन एका नावाने. राजस्थान सरकारने पास केलेल्या एका कायद्यात ही या डायन संदर्भात ली विशेष तरतुद करण्यात आलेली. आहे. झारखंड इ. च्या विशेष कायद्यात हा गुन्हा कॉग्नीझेबल ऑफ़ेन्स व अजामीनपात्र गंभीर गुन्हा मानण्यात आलेला आहे. खुनापेक्षा अधिक कठोर शिक्षेची त्यात तरतुद करण्यात आलेली आहे. या विषया वरील अभ्यासकांच्या मते जमीनीतील वाटा हिसकावण्यासाठी प्रामुख्याने विधवा महीलां विरोधात या चेटकीण ठरविण्याच्या तंत्राचा सर्वात जास्त उपयोग संबंधितांकडुन केला जातो. अनेक विधवा महीला आपण चेटकीण ठरवले जाऊ या भीतीच्या सावटाखाली जगतात. हे प्रकार प्रमाणाबाहेर वाढल्यानेच वरील दोन्ही राज्यांना स्वतंत्र कठोर कायदा पास करण्या इतकी गरज भासली.

वरील दोन केसेस समोरासमोर ठेवल्यावर मला एक विसंगती जाणवली. उदा. समजा एक केस झाली समजा चा अर्थच हायपोथेटीकल आहे या संदर्भातील स्वतंत्र तरतुदींचा माझा अभ्यास नाही व त्याचा मला पुरावा पाहीजे ही अपेक्षा नाहीच मी फ़क्त एक विरोधी जाणारी प्रातिनिधीक बाजु म्हणुन मांडतोय. तर अशा चेटकीण म्हणवुन ठरवल्या गेलेल्या महीलेची एका समुहाने हत्या केली. तर समजा वरील थापा च्या केसचा दाखला ( कायद्यात हा प्रीसीडन्स म्हणतात बहुधा अगोदर च्या केसमध्ये दिलेल्या समान स्वरुपाच्या खटल्याच्या निकालाचा संदर्भ केस बळकट करण्यासाठी देणे चुकभुल देणे घेणे ) जर दिला तर. काय होईल ? म्हणजे गावकरींचा वकीलाने खालील मुद्दे मांडले.

१- गावकर्‍यांचा दृढ विश्वास होता की महीला चेटकीण आहे.
२- गावकरी सेक्टरीयन झील मध्ये ओझा व लोकल मांत्रिकाने दिलेल्या निर्णयावरील श्रद्धेने हे कृत्य करण्यास प्रवृत्त झाले वा समजा त्याने रोखले नाही.
३- भीतीने त्यांचा सारासार विवेक हरवला होता. व ड्यु केअर व कॉशन घेण्याच्या मनस्थितीत ते नव्हते व त्या सिच्युएशन मध्ये ते योग्य होते. कारण त्यांच्या मुलाबाळांच्या आयुष्याचा प्रश्न होता.
४- त्यांना पुर्ण विश्वास होता की मुल मारण्याचे हे कृत्य ( आजारावरील उपचाराअभावी न होता ) चेटकीणीच च आहे. व तीच या मुलांची मारेकरी आहे. तीने केलेल चेटुक याला कारणीभुत आहे.
५- त्यांना समजावणारा व परावृत्त करणारा गावात कोणी नव्हता त्यांच्यापेक्षा थोडा बरा स्थितीत असलेला अधिक क्षमता असलेला मांत्रिक ओझा त्यांना उलट प्रोत्साहनच देत होता.
६-त्यांना विचाराचा विवेकाचा टॉर्च पेटवणं त्या परीस्थीतीत शक्य नव्हत त्यांचा मिसगायडेड थापा झालेला होता.
या कारणास्तव या समुहाला वरील महीलेच्या हत्येच्या आरोपातुन मुक्त करण्यात याव.

हा निकाल योग्य होइल का ? वरील निकाल योग्य होता का ?
परीस्थीती कायदा वर्तन व शिक्षा आणि न्याय हे कसे काम करतात यांची प्रक्रिया गुंतागुंतीची व्यामिश्र वाटते. एखादा कायदा तयार करतांना एक संदर्भ आठवतो मोडका तोडका आठवणीच्या भरवशावर तो असा " कुठलाही कायदा हा नुसता गुन्हा व त्याची शिक्षा इतकच निश्चीत करत नाही तर त्याचा उद्देश अप्रत्यक्षरीत्या जनतेला ( तो कायदा मानत व बनवत असलेल्या ) काही हेतुंपासुन काही भावनांपासुन काही विश्वासांपासुन काही वृत्ती काही मुल्यांपासुन परावृत्त वा काही कडे प्रवृत्त करणे असा असतो. तर असे निकाल कुठल्या दिशेला समाजाला प्रवृत्त वा परावृत्त करतात ? करत असावेत ?
मी फ़क्त समजुन घेण्याचा प्रयत्न करतोय माझा कुठलाही दंड थोपटुन दावा नाही,
तुम्हाला वरील सर्व बाबींविषयी काय वाटत ? तुम्ही या कडे कसे बघतात ? जाणुन घ्यायला आवडेल.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (4 votes)

योगायोगाने ओल्मोस्ट अशीच काहिशी केस मी काल्पनिक उदाहरण, थॉट एक्स्परिमेण्ट म्हणून उल्लेख केली होती.

http://www.aisiakshare.com/node/1705
.
.
शेवटचे तीन चिमुकले परिच्छेद पहावेत. (तीन्ही मिळून आठ दहा ओळींच्या वर नाहित)
.
.
" कायद्याचे अज्ञान हा बचाव होउ शकत नाही" असे कायद्याचे तत्व आहे म्हणे. (म्हणजे "अमुक अमुक बाब बेज्काय्देशीर आहे हे माहितच नव्हते " असे म्हणत कोणी बचाव केला तर तो ग्राह्य मानला जात नाही.)
त्याप्रमाणेच "अंधश्रद्धा हा बचाव होउ शकत नाही" असेही तत्व असेल; अशी आशा होती.
.
अर्थात केसबद्दलचे पुरेसे तपशील पाहिल्याशिवाय काहीही बोलणे उचित वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख आवडला. मुळातला केस स्टडी अतिशय नेटकेपणे मांडलेला आहे.

मूळ केस आणि कल्पित केस यामध्ये एक मोठा फरक वाटतो - तो म्हणजे मध्ये जाणारा काळ. थापाला 'भूत दिसलं' आणि क्षणार्धात कुकरी काढली. याउलट एखादी स्त्री चेटकीण आहे या अफवा पसरायला भरपूर वेळ जातो. त्याने फरक पडत असावा. दादरीच्या घटनेबाबतही अशीच कल्पित केस निर्माण करता येते. पण त्यात जो जमाव तिथे पोचला, आणि ज्या पद्धतशीरपणे त्याला मारलं, त्यात 'आम्हाला आम्ही एक माणूसच मारतो आहोत याची कल्पनाच नव्हती' असा युक्तिवाद करता येणार नाही.

पण तरीही 'आमच्या विश्वासानुसार ही व्यक्ती धोकादायक आहे, म्हणून आम्ही तिला मारलं.' यासाठी काही पाठबळ थापाबाबतच्या निर्णयामुळे मिळू शकेल कदाचित. तज्ञ यावर अधिक प्रकाश टाकू शकतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यातील इतर मुद्द्या बरोबरच सर्वात जास्त खटकलेला मुद्दा हा की इन गुड फेथ मध्ये केलेल्या कृत्याला योग्य ठरवण हे भयावह आहे. याचे रीपरकशन्स ?
इतर मुद्दे पण आहेत पण सर्वात हाइट हा मुद्दा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुड फेथ - कोणाच्या दृष्टीने चेटकिणींच्या की मांत्रिक/अंधश्रद्ध सामान्य जन यांच्या?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

समजा काही उदाहरण बघु
१- तो मांत्रिक गावातला त्याच्या पुर्ण गुड फेथ मध्ये जो त्याच्या संस्कारबद्धत्ते / अनुभव / अंधश्रद्धा इ. तुन आलेला आहे. त्याला प्रामाणिकपणे वाटतय त्याच्यापुरता तो अगदी खरा खुरा दावा आहे. की अमुक एक स्त्री चेटकीण च आहे आणि तीच्यामुळेच गावातील लहान मुले दगावत आहेत. व या स्त्री चेटकीण ला तात्काळ ठार मारण अत्यावश्यक आहे अन्यथा अजुन बालकांचा बळी जाऊ शकतो. पुढे तो इतर त्याच्याहुन निन्म स्तरावर असलेल्यांना मार्गदर्शन करतो. व ते सर्व त्या चेटकीणीचा सामुहीकरीत्या वध करतात.
वरील कायदा पुन्हा तेच त्याची भीती सार्थ होती त्याने गुड फेथ मध्ये ते केले त्याची क्षमता नव्हती विवेकपुर्ण विचार करण्याची अजुन एक शब्द सेक्टरीयन झील सांप्रदायिक उन्मादातुन त्याने ते कृत्य केले त्याच्या खालच्या स्तरात जे होते ते तर जाउच देत.
विच हंटींग माझ्या अल्प माहीतीप्रमाणे युरोपात ही मोठ्या प्रमाणात होत असे. आपल्याकडे आजही मोठ्या प्रमाणावर होतेच. मी मांत्रिक आहे माझ्या वकीलाने वरील केसचा संदर्भ दिला व या लाइनवर आर्ग्युमेंट केले तर ?

२- विदेशात सरदारजींना मुस्लिम अतिरेकी समजुन त्यांच्यावर प्राणघातक हल्ले झाल्याच्या घटना आपणास माहीत असतील. त्या विदेशी व्यक्तीला शिखांच्या विशीष्ट पोशाखावरुन दिसण्यावरुन व त्याचे एशियन समुदायाप्रती असलेले अज्ञान यातुन समजा फरक करता आला नाही व इन गुड फेथ त्याने अतिरेकी समजुन ( आता मुस्लिमच आहे हे जरी बरोबर ओळखले तरी तो अतिरेकीच आहे हे गुड फेथ मध्ये मानणे हा त्यातलाच एक प्रकार ) पण समजा त्याने इन गुड फेथ हल्ला केला घाबरुन. तो कुटुंबासोबत रात्री सबवे मध्ये आहे एकटा आहे घाबरलाय इ. इ. त्याला वाटल इन गुड फेथ की हा घातक आहे ड्यु केअर व कॉशन घेण त्याला परवडणार नाही.

३- घासकडवीनी दिलेल उदाहरण आहेच.

गांधीजींचा ही एक अंतरात्मत्याचा आवाज खरा आवाज वगैरे होता. म्हणजे इतक सिद्ध केल इतका इनफ इनोसन्स प्रुव्ह केला की झाल. मग न्याय कसा होणार ?
म्हणजे मी विचार करतोय कुठल्या निष्कर्शांवर पोहोचलेलो नाही
मात्र वरील थापाची केस काल्पनिक नसुन प्रत्यक्ष झालीय या केसला सुप्रीम कोर्टात आव्हान मिळायला हव होत. आदिवासीच होते गरीब बहुधा म्हणुन फार रेटु शकले नसतील पुढे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या सविस्तर प्रतिसादाबद्दल आभारी आहे. आपल्या मुद्द्यावरती, अन्य ऐसीकरांचे विचार ऐकण्यास उत्सुक.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखातली मांडणी आवडली आणि लेख-प्रतिसादांमधला मुद्दा मान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वरच्या केसमध्ये एक कच्चा दुवा आहे.

त्या गुरख्याचा जर तिथे भुते नाचतायत असा समज झाला असेल तर "भुतांवर कुकरीने वार केल्याने काही फायदा होणार नाही" असाही त्याचा समज असायला हवा होता. केसच्या मांडणीतली त्रुटी आहे की कसे हे कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कुकरी काढून वार करणे ही "उन्माद+भय" या दोन्ही भावनांमधून निर्माण झालेली "प्रतिक्षिप्त" क्रिया आहे. एकदा प्रतिक्षिप्त म्हटले की तिथे बोलणे खुंटते. ती तत्काळ्+विचाररहीत च असते असे समजायला प्रत्यावय (बरोबर आहे का हा शब्द?) नाही.
याउलट चेटकिणीबद्दल संशय येणे + तो दृढ होणे+ कदाचित दोन्ही बाजूंनी विचार करुन निर्णयाप्रत येणे यात वेळ लागतो व ती जाणून बुजून केलेली हत्या ठरते.
.
दोन्ही केसेस मध्ये एकच साम्य आहे - अंधश्रद्धा.
बाकी समांतरत्व संपते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा निकाल विचित्र आहे हे खरंच आहे अगदी. आणि मांडणीबाबत दुमत असण्याचं कारणच नाही.

या निमित्ताने बर्‍याच बाबतीत असं काही (एक्झॅक्टली हेच नव्हे, पण) समांतर युक्तिवाद करता येतात. उदा. समलिंगी कायदेशीर मान्यता आणि स्त्रीभ्रूणहत्याविरोधी, रादर प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदानप्रतिबंधक कायदा.

गर्भलिंगनिदानप्रतिबंधक कायदा: याचा मूळ उद्देश काय? तर भारतासारख्या देशातली पार्श्वभूमी मुलगाच हवा अशा विचाराचा प्रभाव असलेली आहे आणि अनेक मुलींची गर्भावस्थेतच हत्या केली जाते हे सामान्य कटुसत्य ध्यानात घेऊन. यात अल्टिमेट उद्देश कायकाय आहेत?

१. नैसर्गिक लिंगसमतोल टिकवणे आणि त्यात ढवळाढवळ न करणे. (व्यावहारिक उद्देशः सर्वांना भिन्नलिंगी पार्टनर मिळणं कठीण होऊ नये.)
२. स्त्रीभ्रूणांना जन्माला येण्याची समान संधी देणे. (केवळ स्त्री म्हणून डिस्क्रिमिनेशन न होऊ देणे)

समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता देण्यामागे कोणते उद्देश आहेत?

१. प्रत्येकाला आपापली लैंगिकता असण्याचा आणि जपण्याचा हक्क असला पाहिजे.
२. ही अत्यंत खाजगी बाब असल्याने त्यात सरकारने किंवा समाजाने किंवा कायद्याने ढवळाढवळ करणं योग्य नाही.
३. मेजॉरिटी संख्येने लोक एका लैंगिकतेचे आहेत म्हणून केवळ वेगळ्या लैंगिकतेचे लोक आपोआप अनैसर्गिक ठरवले जाऊ नयेत.

इत्यादि

दोन्ही कायदे आवश्यक आणि समर्थनीय असतीलच. पण समजा समलिंगी संबंधांना कायदेशीर मान्यता देणारा कायदा भारतात संमत झाला (जो होणं भारताच्या ओपन माईंडेड होण्यासाठी गरजेचाच आहे).

तर मग आता प्रसूतिपूर्व लिंगनिदान कायद्याच्या तत्वांच्या संदर्भात पहा..

-आपला पार्टनर स्त्री असावा की पुरुष हे ठरवण्याचा हक्क कायदेशीर , पण आपली संतती कोणत्या लिंगाची असावी हे ठरवण्याचा हक्क बेकायदेशीर. (वास्तविक तर या दोन्हीही तितक्याच खाजगी गोष्टी आहेत).... कायदेशीर मानल्या जाणार्‍या विवाहसंबंध या नात्यात नको असलेल्या लिंगाच्या व्यक्तीला टाळण्याचं स्वातंत्र्य, पण संतती म्हणून नको असलेल्या लिंगाच्या व्यक्तीला स्वीकारण्याची सक्ती, इतकंच नव्हे तर न स्वीकारल्यास शिक्षा. बरं, पार्टनरबाबत टाळणं म्हणजे नुसतंच नाकारणं पण संततीबाबत टाळणं म्हणजे थेट हत्याच म्हणून ती अमानवी असं म्हणावं तर बिनशर्त गर्भपाताचा हक्क (लिंगनिदान न करता) हा मात्र कायदेशीर.

-स्त्रीभ्रूण जन्माला येणं सिलेक्टिवली रोखून बॅलन्स बिघडवणारी कृती बेकायदेशीर पण कोणत्याच प्रकारचे (स्त्री अथवा पुरुष) भ्रूण जन्माला येण्याची शक्यताच रोखणारी कृती कायदेशीर.

यामधे दोन्ही कायदे तसे एकमेकांशी संबंधितही नाहीत आणि कंपेरेबलही नाहीत, पण व्यक्तिस्वातंत्र्याचं तत्व त्यात आणायला गेलं तर एका ठिकाणी मूलभूत हक्क मान्य आणि एकीकडे त्याविरुद्धची सक्ती असं होतं.

अशा तात्विक विसंगती होतातच. शेवटी कायदा हा त्या त्या देशाची मानसिक जडणघडण बघून बनत आणि बदलत जातो, आणि तसाच जावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केसचे निकालपत्र तपशीलासकटः

http://indiankanoon.org/doc/1489567/

१९५९ सालची केस दिसतेय. म्हणजे खूपच जुनी. निकालही १९६० मधला वाटतोय. मधल्या अनेक दशकांत या केसचा आधार कोणत्याही मुरब्बी वकिलाने घेतला नसेल का?

बाकी, जजमेंटचे प्रत्यक्ष शब्दः

9. The two leading decisions on the question of criminal liability where a person kills what he considers to be ghosts are Waryam Singh v. Emperor, AIR 1926 Lah 554 and Bouda Kui v. Emperor, AIR 1943 Pat 64. In these two cases also, if the assailant had taken special care to ascertain who the person assailed was, he would have easily known that he was attacking a human being and not a ghost. Neverthless the High Court held that the assailant was protected by Section 79 I.P.C. because, from the circumstances under which the apparition appeared before him and his pre-disposition, it would be reasonably inferred that he believed, in good faith, that he was attacking a ghost and not a human being. There may be slight difference on facts between these cases and the instant case. But on the evidence of the prosecution witnesses it is clear that the respondent is protected by Section 79 I.P.C. The mere fact that had he exercised extra care and attention the incident might have been averted is no ground for denying him the protection of that section.
10. The learned Sessions Judge was therefore right in acquitting the appellant. The order of acquittal is confirmed and this appeal is dismissed.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0