व्हॅलेन्टाईन : स्पर्धेसाठी

काल :
स्मशानात जाऊन मी बसतो. नेहमीच बसतो. आजही बसलो होतो. थडग्यावर बसून तंबाखू खायला फार बरं वाटतं. एकदा किक बसली का तुझ्या आठवणीत शिरता येतं.

तुझ्या केसातला मोगऱ्याचा गजरा आणि त्याचा तो गंध,
बांगड्यांची किणकीण आणि छमछम ते पैंजण,
ढळढळीत दुपार आणि ऊसाचं रान.

तुझ्या वैभवाचा मला स्पर्श झाला...

काय पण व्हॅलेन्टाईन, मी इथं वर बसलोय बार भरत, आणि तू थडग्यात..

आज:
मी व्हिस्की पीत नाही पण हा ग्लास फक्त तुझ्यासाठी. मला आवडतात म्हणून ही गुलाबाची फुलंही सोबत. तुलाही आवडतील याची खात्री आहे.
काल रॉजर म्हणत होता, वील यू बी माय व्हॅलेन्टाईन?
हाऊ क्यन आय डिल विथ धिस्?
मी इथे ऊभी फुलं घेऊन आणि तू थडग्यात...

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet