बिनाका गीतमाला व हिन्दि चित्रपट सन्गीताचा प्रवास
मित्रान्नो, बिनाका सन्गीतमालेचे बोट धरुन हिन्दि चित्रपट सन्गीताच्या इतिहासाचा अभ्यास मि सुरु केला आहे. या धाग्यावर तुम्हाला त्या अभ्यासावर आधरित श्राव्य साहित्याच्या लिन्कस मिळतिल. आपला आभिप्राय प्रश्न हे विचारात घेउन पुढिल भाग सादर करन्याचा माझा विचार आहे.
पहिला भाग
तुम्हाला माहीत आहे का … अनेक दिग्गज संगीतकार, अभिनेते यांनी १९५२ साली Debut केला आहे. या सालातील काही विशेष चित्रपट आणि संगीता ची सफर करू या
प्रतिक्रिया
ही लिंक मिहीर यांनी दिली
ही लिंक मिहीर यांनी दिली होती. व तिचा ऑलरेडी आस्वाद घेण्यात आलेला आहे/येत आहे.
ऐसीवर स्वागत. पुढील भाग मोठा
ऐसीवर स्वागत.
पुढील भाग मोठा असेल अशी आशा करतो. जर लहान स्फूट लिहायचे असेल तर याच धाग्यावर प्रतिसादात लिहावे किंवा "मनातील लहान मोठे प्रश्न, विचार" येथील ताज्या धाग्यांवर लिहावे ही विनंती
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ह्रुशिकेश, माझे काम हे
ह्रुशिकेश, माझे काम हे प्रमुख्याने ओडिओ स्वरुपात आहे. मी या विषयावर केलेले ओडिओ साधारण ३० मिनिटाचे आहेत. त्याच्या लिन्क्स इथे शेअर करन्याचा माझा विचार आहे. काहि लिन्क्स शेअर केल्या आहेत
पुलेप्र
बिनाका गीतमाला (मुदलातच रेडियो सिलोन) याची कथा बा वि केसकर ह्या व्यक्तीच्या उल्लेखाविना पूर्ण होउच शकत नाही. तेव्हा सुरुवात तिथूनच होउदे!
सुनिल, केसकर यान्चा उल्लेख व
सुनिल, केसकर यान्चा उल्लेख व ति कथा इथे आइका
http://www.voisact.work/index.php/2016/01/04/binaka-geetmala-1/
बीते हुए दिन कुछ ऐसे ही है ... याद आते ही दिल मचल जाए
ऐसीअक्षरेवर स्वागत. बिनाका काय किंवा सिबाका काय किंवा अमीन सायानीची पेशकश काय - सगळ्याच मर्मबंधातल्या ठेवी. मधुर आठवणींची मालिका. आजकाल नॉस्टाल्जिया ही एक व्हॅल्यु म्हणून तिचे अस्तित्व धोक्यात आलेय की काय असा प्रश्न पडतो. स्मृतिरंजनासोबत येणार्या अनोख्यापणास आपण मुकणार का या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची मुराद सुद्धा कभी न बुझनेवाले चिराग की तरहा. एक शम्मा जल रही है ... और वोह भी उदास है. त्यापलिकडे हिंदी चित्रपट संगीत म्हंजे ... न पूछो... एकसे-एक नग्मे. तेव्हा तुम्ही लिहाच व आम्ही मस्त प्रतिसाद देऊच अशी खात्री बाळगा. सरदार मलिक, सज्जाद हुसेन, अनिल विश्वास अशी सुरुवात करणार काय ?
तू लिही की. हिंदी
तुम्ही लिहा की. हिंदी गाण्यांबाबतीत किती पॅशनेट आहात पण नाही आळस. प्लीज लिहा.
रेहमान आणि रेशमिया येताच
रेहमान आणि रेशमिया येताच बिनाका बंद झाली.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
तुम्हाला माहीत आहे का … अनेक
तुम्हाला माहीत आहे का … अनेक दिग्गज संगीतकार, अभिनेते यांनी १९५२ साली Debut केला आहे. या सालातील काही विशेष चित्रपट आणि संगीता ची सफर करू या. ऐकु यात हि रन्जक सफर ...
http://www.voisact.work/index.php/2016/01/13/binaka-1952-2/
बिनाका गीतमाला … हिंदी
बिनाका गीतमाला … हिंदी चित्रपट संगीताचा हा सोनेरी इतिहास आपल्या पिढीला जगता आला नाही ना ? ते दर आठवड्याला बुधवारी रात्री radio ला कान लाऊन बसणे , मित्रांशी आठवड्याच्या क्रमवारी विषयी पैजा लावणे. अहाहा, काय काळ होता नाही ? जर का मी असे म्हटलं कि …..हा काळ पुन्हा जगायची एक संधी आम्ही तुम्हाला देत आहोत तर काय ? मज्जा धमाल Isnt it ? चला तर मग पुन्हा एकदा जगू यात ते मंतरलेले क्षण
http://www.voisact.work/index.php/2016/01/04/binaka-geetmala-1/
बिनाका गीतमाला १९५२ – क्रमवारी बिनाकाची ,आमची, आणि मराठीची
ऐकू यात १९५२ सालची बिनाकाची गाण्यांची क्रमवारी आणि आज १९५२ सालच्या गाण्यांच्या लोकप्रियतेचा विचार करून केलेली आमची गाण्यांची क्रमवारी
http://www.voisact.work/index.php/2016/01/20/binaka-1952-3/
http://www.voisact.work/index
http://www.voisact.work/index.php/2015/11/24/balraj-mannadey/
हाय!!!मस्त मस्त!!
"तू प्यार का सागर" मधले गंभीर बलराज सहानी कुठे आणि या गाण्यातले रंगीले बलराज कुठे.
सुभानल्ला!
___
कवि - साहीर लुधियानवी. __/\__
__
या वीकेंडला वक्त सिनेमा पहाणे आले.
बिनाका गीतमाला १९५३ – अनारकली
शंकर जय किशन हे १९५३ चे सर्वात यशस्वी संगीतकार होते पण सर्वोत्कृष्ठ सांगीतिक चित्रपटाचा मान मिळाला तो मात्र सी रामचंद्र यांच्या अनारकली ला … आणि तुम्हाला हे माहित आहे का कि अनारकली व मुगले आझम हे दोन्ही चित्रपट एकाच वेळी प्रोडक्शन मध्ये होते … ह्या आणि अश्या रंजक माहिती साठी ऐका
http://www.voisact.work/index.php/2016/01/27/binaka-1953-anarkali/
छान! आत्ता ऐकते आहे. ही
छान! आत्ता ऐकते आहे. ही माहीती नवीन आहे. हा धागा आवडला.
बिनाका गीतमाला १९५३ - आह, अलिफलैला, दो बिघा जमीन
तुम्हाला माहित आहे …. महेंद्र कपूर यांचे गायक म्हणून पदार्पण १९५३ च्या मदमस्त ह्या चित्रपटात झाले. १९५३ च्या राज कपूर यांच्या आह ह्या चित्रपटात मुकेश यांच्यावर एक गाणे चित्रित झाले आहे. तर दो बिघा जमीन ची कथा सलिल चौधरी यांची आहे. या आणि अश्याच रंजक माहिती आणि गाण्यांसाठी ऐका
http://www.voisact.work/index.php/2016/02/03/binaka-1953-2-aaah/
बिनाका गीतमाला १९५३ – पतिता , फुटपाथ आणि इतर चित्रपट
तुम्हाला माहित आहे …. लता दिदींनी त्यांच्या कारकिर्दीत दोन नायिकांना आवाज दिला … नसीम बानो आणि सायरा बानो. नसीम बानो हि सायरा बानो यांची आई आहे. १९५३ च्या दो बत्ती तीन रस्ता ह्या चित्रपटासाठी शांताराम बापूंनी एक गाणे रेकॉर्ड व चित्रित केले ज्या गाण्यात ७ कडवी ७ भाषेत आहेत. ७ संगीतकार , ७ गायक आणि ६ कलाकार … एक मोठा प्रयोग. या आणि अश्या रंजक माहिती साठी गाण्यांसाठी ऐका
http://www.voisact.work/index.php/2016/02/10/binaka-1953-3/
करेक्शन
तीन बत्ती, चार रास्ता
https://www.youtube.com/watch?v=8wrTQCoJHDc
हा सिनेमा पाहीला आहे.
धन्यवाद शुचि ... गड्बडित मि
धन्यवाद शुचि ... गड्बडित मि चक्क चुकिचे नाव छापले
बिनाका गीतमाला - १९५३ गाण्यांची क्रमवारी बिनाकाची आणि आमची
ऐकू यात १९५३ सालची बिनाकाची गाण्यांची क्रमवारी आणि आज १९५३ सालच्या गाण्यांच्या लोकप्रियतेचा विचार करून केलेली आमची गाण्यांची क्रमवारी
http://www.voisact.work/index.php/2016/02/17/binaka-1953-rankinglist/
बिनाका गीतमाला १९५४ – नागिन आणि आरपार
तुम्हाला माहित आहे का? १९५३ च्या नागिन चित्रपटातली पुंगी धून ही चक्क ClaVoiline वर वाजवली आहे आणि ClaVoiline हे एक keyboard instrument आहे. हि वाजवली आहे कल्याणजी यांनी आणि यात संगीतकार रवि यांचेही खास योगदान आहे. १९५३ च्या आरपार ह्या चित्रपटातील दोन गीते हि ओ पी नय्यर यांनी गुरुदत्त यांच्या सांगण्या वरून चक्क western गाण्यावरून बांधली आहेत. या आणि अश्याच रंजक माहिती साठी गाण्यांसाठी ऐका
http://www.voisact.work/index.php/2016/02/24/binaka1954-part1-naginaarpar/
ही काय जमाडीजम्मत चाललीय
ही काय जमाडीजम्मत चाललीय इकडे?
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
बिनाका गीतमाला – १९५४ Taxi Driver, जागृती आणि इतर चित्रपट
तुम्हाला माहित आहे … संपूर्ण देव कुटुंबाचा १९५४ च्या Taxi Driver ह्या चित्रपटाच्या निर्मितीत सहभाग होता… देव आनंद , कल्पना कार्तिक, चेतन आनंद , चेतन आनंद यांच्या पत्नी उमा आणि विजय आनंद. सी रामचंद्र अर्थात आण्णा चितळकर यांनी केवळ हिंदी चित्रपटात एकूण १२ संगीत दिग्दर्शकांकडे गाणे गायले आहे. तसेच १९५४ च्या सम्राट चित्रपटासाठीचे एक गाणे लतादीदी आणि आशाताई या दोघींच्या स्वरात आहे. या आणि अश्याच रंजक माहिती साठी गाण्यांसाठी ऐका
http://www.voisact.work/index.php/2016/03/03/binaka-1954-2/
फार आवडतं गाणं आहे.
बिनाका गीतमाला १९५४ – किशोरकुमार
तुम्हाला माहित आहे काय की, छोटासा घर होगा हे सलिल चौधरी यांचे नौकरी चित्रपटातील प्रसिद्ध गाणे एका बांगला गाण्या वर आधारित आहे. या गाण्याचे एक Slow version हेमंत कुमार यांच्या आवाजात सुद्धा रेकॉर्ड झाले आहे. तसेच किशोरकुमार अभिनीत धोबी डॉक्टर या चित्रपटात किशोरकुमार यांच्या तोंडी एकही गाणे नाही. या आणि अश्याच रंजक माहिती साठी गाण्यांसाठी ऐका…
http://www.voisact.work/index.php/2016/03/09/binaka-1954-part3-kk/
बिनाका गीत माला ही
बिनाका गीत माला ही एक्स्क्लूझिव्ह भारतीय/हिंदी चित्रपट गीतांचा भारतीय कंपनीने प्रायोजित केलेला भारतीय अँकरने चालवलेला भारतीय श्रोत्यांसाठीचा कार्यक्रम सिलोन रेडिओवरून लघुलहरींवर का प्रसारित होत असे याविषयी काही माहिती उपलब्ध आहे का?
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
केसकर
वर दिलेला माझा प्रतिसाद आणि त्याला दिले गेलेले उत्तर वाचा.
तत्कालीन नभोवाणी मंत्री केसकर यांच्या दृष्टीने हिंदी चित्रसंगीत हे छचोर होते. सबब, आकाशवाणीवर त्याला स्थान नव्हते!
विविध भारती होतीच ना !!!
विविध भारती होतीच ना !!!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ते नंतर
रेडियो सिलोनला तोड देण्यासाठी नंतर विविध भारती बनवले गेले. ते लोकप्रियदेखिल होते. तरीही बिनाकाची लोकप्रियता घटली नाही.
कारण बहुधा अमिन सायानीच असावेत!
नितिन, सुनिलजी ने उत्तर दिलेच
नितिन, सुनिलजी ने उत्तर दिलेच आहे तरि देखिल तुम्हाला आणखी विस्त्रुत महिति हवी असल्यास हा भाग आइका
http://www.voisact.work/index.php/2016/01/04/binaka-geetmala-1/
बिनाका गीतमाला १९५४ – गाण्याची क्रमवारी बिनाकाची
टेक्सी ड्रायवर, नागीन आणि आरपार ह्या चित्रपटांनी अपेक्षेप्रमाणे १९५४ च्या बिनाका क्रमवारीत विशेष स्थान मिळवले. पण हेमंतकुमार यांच्या बरोबरच सर्वाधिक गाणी होती नौशाद यांची. तलत व लता यांनी या ही वर्षी रसिकांच्या मनावर राज्य केले. या आणि अश्याच रंजक माहितीसाठी अवश्य ऐका ...
http://www.voisact.work/index.php/2016/03/16/binaka-1954-list/
बिनाका गीतमाला १९५४ – क्रमवारी आमची – हिंदी व मराठी गाण्यांची सु
काही गाणी आपल्या मनात दशकानुदशके रेंगाळत रहातात, कवी प्रदीप यांनी लिहिलेल्या व गायलेल्या अश्याच दोन खास गाण्यांना आम्ही आमच्या यादीत स्थान दिले आहे. तसेच आमच्या दृष्टीने टेक्सी ड्रायव्हर, नागिन व आरपार या तिन्ही चित्रपटांची गाणी १९५४ च्या बिनाका यादीत असली तरी काही गाण्यांचा समावेश त्या यादीत झालेला नाही … आमच्या यादीत अश्या सर्व गाण्यांना आम्ही स्थान दिले आहे… पाहू या तुमची यादी आणि आमची यादी जुळते का ?
http://www.voisact.work/index.php/2016/03/23/binaka-1954-ourlist/
बिनाका गीतमाला १९५५ – श्री ४२०
राज कपूर यांचा एक सर्वार्थाने संपूर्ण असा सांगीतिक चित्रपट. गाण्यांचा उपयोग चित्रपटाची कथा पुढे नेण्यासाठी किती सुंदर पद्धतीने करता येतो याचा वस्तुपाठच राज कपूर यांनी घालून दिला आहे. शंकर जयकिशन यांचे संगीत म्हणजे एक सांगीतिक कथाकथन आहे. या चित्रपटातील गाण्यांचे चित्रीकरण हा एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. पाहू या हा चित्रपट आमच्या नजरेतून.
http://www.voisact.work/index.php/2016/03/31/binaka-1955-shree420/
खुश कर दिया ओय!
काल बिनाका गीतमाला १९५५ – श्री ४२० ऐकलं... उत्तम! तुमचा इव्हन टोन पण आवडला. धन्यवाद!
धन्यवाद
अनेकानेक धन्यवाद सिफर ... तुमच्या सारख्या रसिकांचा प्रतिसाद हेच एक मोठे प्रोत्साहन आहे. त्या पुंजी वरच हा प्रयत्न चालू आहे
बिनाका गीतमाला १९५५ – आझाद आणि सीमा
आझाद – दिलीपकुमार आणि मीनाकुमारी यांच्या अभिनयाने नटलेला हा चित्रपट एका तामिळ चित्रपटाचा remake होता. सी रामचंद्र आणि राजेंद्र कृष्ण यांना त्यामुळे एका वेगळ्याच सांगीतिक आव्हानाला सामोरे जावे लागले. शैलेन्द्र यांना याच चित्रपटातील संगीतामुळे एक पैज गमवावी लागली.
सीमा – नूतन व बलराज सहानी यांच्या सहजसुंदर अभिनयाचा आविष्कार म्हणजे सीमा, शंकर जयकिशन यांचा आणखीन एक सांगीतिक hit. लतादीदीनें पंडित रामनारायण यांच्या कडून शिकलेले काही अनवट आलाप सादर करायचे आव्हान नूतन यांनी समर्थपणे पेलले.
अश्या अनेक रंजक कथांसाठी ऐका …
http://www.voisact.work/index.php/2016/04/06/binaka-1955-azaadseema/
बिनाका गीतमाला १९५५ – बाप रे बाप, उडन खटोला, झनक झनक पायल बाजे
१९५५ चा बाप रे बाप हा सिनेमा म्हणजे किशोर कुमार या अवलिया च्या अदाकारीची आणखीन एक मिसाल आहे. किशोर चे onscreen improvisation एका गाण्यात आहे तर दुसऱ्या गाण्यात किशोर कुमार यांना playback दिलाय चक्क आशाताई यांनी … विश्वास नाही ना बसत ?
शांताराम बापूंनी एका खऱ्या commercial सिनेमा ची निर्मिती केली ती याचवर्षी, तो grand चित्रपट होता झनक झनक पायल बाजे. हा त्या वर्षातला ३रा commercial hit. त्या बरोबरच दिलीप नौशाद जोडीच्या उडनखटोलाने सुद्धा उत्तम यश मिळवले. या चित्रपटांविषयी त्यातील संगीता विषयी जाणून घेऊया या खास episode मध्ये
http://www.voisact.work/index.php/2016/04/13/binaka-1955-3-bbjjpb/
झनक झनक आनि नवरंग हे सदाबहार
झनक झनक आणि नवरंग हे सदाबहार सिनेमे आहेत. पैकी नवरंग यु ट्युबवरती लागतो. झनक झनक कधी दिसला नाही.
छान माहिती
छान माहिती. लिन्कही पाहतो.
बिनाका गीतमाला १९५५ – देवदास , मिस्टर and मिसेस ५५, मुनीमजी
देवदास या विख्यात चित्रपटासाठी बिमल राय यांची अभिनेत्यांसाठी प्रथम पसंती होती दिलीप , मीनाकुमारी आणि नर्गिस यांना. तर मिस्टर and मिसेस ५५ या चित्रपटासाठी ओ पी नय्यर यांनी त्यांचेच एक जुने लोकप्रिय गीत पुन्हा रेकॉर्ड केले. हिंदी चित्रपट संगीताच्या प्रवासातल्या या आणि अशा अनेक गोष्टी जाणून घेऊ यात
http://www.voisact.work/index.php/2016/04/20/binaka-1955-4-ddmunimaji/
वा! सुंदर. .
वा! सुंदर.
.
बिनाका गीतमाला १९५५ – गाण्याची क्रमवारी बिनाकाची
१९५४ च्या चित्रपट संगीताची लोकप्रियता इतकी अफाट होती हि १९५४ च्या ८ गाण्यांनी १९५५ च्या वार्षिक सर्वोत्तम गाण्यांच्या यादीत स्थान मिळवले. हेमंतकुमार यांची ४ गाणी तर नौशाद यांची ३ गाणी या यादीत होती. लतादीदींची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत होती. त्यांची ५ गाणी या यादीत आहेत तर दुसरीकडे त्या आधीच्या वर्षातले लोकप्रिय गायक तलत मेहेमूद यांचे एकही गाणे या यादीत नाही हा विचित्र योगायोग. ऐकूयात या यादीतल्या गाण्यांविषयी…
http://www.voisact.work/index.php/2016/04/28/binaka-1955-list/
मिस्टर & मिसेस ५५ मी ११ वीत
मिस्टर & मिसेस ५५ मी ११ वीत टी व्ही वर पाहीला होता. मंतरलेले दिवस होते. अतिशय आवडला होता. तेव्हा गुरु दत्त फार आवडायचा.
बिनाका गीतमाला १९५५ – क्रमवारी आमची – हिंदी व मराठी गाण्यांची
श्री ४२० हा एक सर्वार्थाने सुंदर असा सांगीतिक चित्रपट. यातील सर्व गाणी आपण आजही गुणगुणतो. आम्ही आमच्या यादीत या चित्रपटाला योग्य स्थान द्यायचा प्रयत्न केला आहे. ऐका आणि सांगा आमच्या क्रमाशी तुम्ही सहमात आहात का ?
http://www.voisact.work/index.php/2016/05/05/binaka-1955-ourlist/
बिनाका गीतमाला १९५६ – जागते रहो
राज कपूर प्रोडक्शन चा एक आर्थिक विचार बाजूला ठेऊन केलेला अर्थपूर्ण चित्रपट. ह्या चित्रपटासाठी आरके च्या नेहमीच्या टीम ऐवजी काही नवीन कलाकारांनी काम केले. संगीतकार सलिल चौधरी, गीतकार प्रेम धवन या निम्मित्ताने आरके स्टुडीओ मध्ये आले. ‘एक दिन रात्रे’ यामूळ बांगला नाटका वर आधारित या चित्रपटातील गाण्यांच्या जागा अतिशय कल्पकतेने निर्माता दिग्दर्शक जोडीने निवडल्या. हा चित्रपट बांगला भाषेतही करण्यात आला. मुळ चित्रपटातील कोइ ना हे भांगडा गीत व दीदींच्या आवाजातील आओ मोहन प्यारे हे गाणे बांगला चित्रपटात जसेच्या तसे घेण्यात आले. … अश्या आणखी रंजक माहिती साठी ऐका
http://www.voisact.work/index.php/2016/06/08/binaka-1956-1-jagateraho/
संगीतका सफर १९५६ – बसंत बहार आणि सी आई डी
साक्षात भारतरत्न पंडित भीमसेनजी बरोबर गाणे गायचं या गोष्टीचे मन्नाडे यांनाही मोठी भीती होती आणि त्यामुळेच ते चक्क हि संधी टाळत होते. हे शंकर जयकिशन यांचे अजरामर गीत आहे बसंत बहार या चित्रपटातील. याच वर्षी सी आई डी या चित्रपटातून एक नवी नायिका गुरुदत्त यांनी लोकांपुढे आणली, हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात ह्या नायिकेचे एक विशेष स्थान आहे … वहिदा रहेमान. गम्मत म्हणजे ह्या नायिकेच्या पहिल्याच चित्रपटात तिने भूमिका केली ते एका खलनयिकेची. … अश्या आणखी रंजक माहिती साठी ऐका
http://www.voisact.work/index.php/2016/06/15/binaka-1956-2-cidbb/
आँखो ही आँखोमे इशारा हो गया
आँखो ही आँखोमे इशारा हो गया ....
.
वक्त मधलं अजून एक आवडतं
वक्त मधलं अजून एक आवडतं गाणं
आगे भी जाने ना तू, पीछेभी जाने ना तू
https://www.youtube.com/watch?v=9ookSneuHOA
साहिर बाप माणूस होता/आहे.
चित्रगीतमाला १९५६ कॅप्सूल – न्यू दिल्ली, परिवार , फंटूश व इतर
काही चित्रपट, गाणी ही अनवट असतात , गोडीच्या ह्या गाण्यांचा उल्लेख नेहमी होत नसला तरी रसिकांच्या मनात विशेष जागा असते
अश्याच काही खासम खास गाण्यांचा आस्वाद घेऊ या १९५६ चित्रगीतमाला कॅप्सूल मध्ये
http://www.voisact.work/index.php/2016/06/23/cgm-1956-3/
(No subject)
चित्रगीतमाला १९५६ – चोरी चोरी
चोरी चोरी हा १९५६ चा सर्वाधिक यशस्वी चित्रपट. ह्या चित्रपटाच्या यशामध्ये संगीताचा सिहांचा वाटा आहे. हा चित्रपट १९३४ च्या एका इंग्लिश चित्रपटाहून प्रेरित होता. राजकपूर यांचा गाणारा आवाज मुकेश यांच्या ऐवजी या चित्रपटात मन्नाडे यांना संधी देण्यात आली. ह्या संधीचे मन्नादा यांनी सोने केले. या आणि अश्याच रंजक कथा व गाण्यासाठी ऐका हा भाग
http://www.voisact.work/index.php/2016/06/29/cgm-1956-4-chorichori/
कालपासून (तुमचा धागा
कालपासून (तुमचा धागा आल्यापासून. इथे रात्र होती) राज कपूर-नर्गीसची गाणीच ऐकते आहे. चोरी-चोरी तर कितीदा पाहीला आहे. श्रीमंत वडीलांची नकचढी, हट्टी गोड मुलगी आणि एक साधासुधा पत्रकार. काय गोड कथा आहे. उफ्फ!
.
या गाण्यात नर्गीस-राज कपूर खास दिसत नाहीत पण गाणे काय गोड आहे. ओह माय गॉड!!
.
.
.

.
सिनेसृष्टीतील माझी सर्वाधिक आवडती जोडी.
.
खालील गाणे तर कळस आहे -
अफाट काम करून ठेवले आहे या
अफाट काम करून ठेवले आहे या दिग्गज्जानी. केव्हडा आनंद दिला आहे देत आहेत
इट हैपन्ड वन नाइट-1934
कालपासून (तुमचा धागा आल्यापासून. इथे रात्र होती) राज कपूर-नर्गीसची गाणीच ऐकते आहे. चोरी-चोरी तर कितीदा पाहीला आहे. श्रीमंत वडीलांची नकचढी, हट्टी गोड मुलगी आणि एक साधासुधा पत्रकार. काय गोड कथा आहे. उफ्फ!
खरं आहे...
इंग्रजीचा ओरिजिनल बघा-क्लार्क गेबल आणि Claudette Colbert ची जोडी होती.
1934 सालचा एक तास पंचेचाळीस मिनिटांचा हा चित्रपट आहे
बघाच, मजा येईल...
रवींद्र दत्तात्रय तेलंग
अरे क्लार्क गेबल मग नक्की
अरे क्लार्क गेबल मग नक्की पाहीन.
चित्रगीतमाला १९५६ : बिनाका क्रमवारी
१९५६ च्या बिनाका क्रमवारीत सर्वाधिक गाणी होती मदन मोहन व ओ पी नय्यर यांची. या क्रमवारीत लता दीदींची ६, रफिसाहेबांची ४ तर किशोर, मन्नाडे व गीता दत्त यांची प्रत्येकी ३ गाणी होती. तलत मेहेमूद यांचे एकही गाणे या यादीत झळकले नाही. ऐकू या बिनाका १९५६ ची हि झलक
http://www.voisact.work/index.php/2016/07/06/cgm-1956-5-binaka/
हे हे बिनाका ग्रीन, बिनाका ग्रीन...
मी बिनाका (सिबाका) कित्येक वर्षे ऐकले आहे... १९७० च्या दशकात... नंतर गाणी भिकार होत गेली आणि मी ते ऐकायच पण थांबवल... आणि मग सगळेच टायटॅनिक सारख संपल एक दिवस..
भ्रष्टाचाराचे आरोप पण झाले होते गाणी निवडण्यावरुन... पैं. इसाक मुजावर ह्या प्रचंड अभ्यासू आणि माहितगार (आणि दुर्लक्षित) माणसाने ह्याबद्दल लिहल आहे...त्यांच्या लेखाचे शीर्षक अजून आठवते : "हॅमर संगीताचे बळी" (हॅमर - पक्षी: बिनाका गीतमाला)...
सांगायची गोष्ट म्हणजे मला त्यातील जाहिराती खूप आवडायच्या... सगळ्यात जास्त आवडायची ती जाहिरात काहीशी अशी होती: "हे हे बिनाका ग्रीन, बिनाका ग्रीन... हे हे बिनाका ग्रीन, बिनाका ग्रीन"...एक गोडवा आणि आर्तता त्यात होती... कार्यक्रमाची signature tune खूप आवडायची...तशीच ट्यून १९८४ ऑलिंपिक्सच्या ओपनिंगला (अथेलेट्स मार्चिंग इनला) वापरली होती..खूप शोधून हे मला कुठेही इंटरनेट वर मिळालेले नाही...
"It was the middle of summer, I finally realized that, within me, monsoon was inextinguishable."
>>भ्रष्टाचाराचे आरोप पण झाले
>>भ्रष्टाचाराचे आरोप पण झाले होते गाणी निवडण्यावरुन..
पण तो स्पॉन्सर्ड आणि खाजगी कंपनीचा कार्यक्रम होता !!! त्यात प्रामाणिकपणा आणि तत्त्वनिष्ठा वगैरे अपेक्षिणेच चूक आहे.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
हो,
गाण्यांची निवड व पादान नंबर "रिकार्डोंकी बिक्री और श्रोतासंघोंकी राय" के अनुसार असायची ना?
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
चित्रगीतमाला १९५६ – यादी आमची
१९५६ च्या आमच्या चित्रगीतमाला क्रमवारीत आम्ही १६ गाण्यांना स्थान दिले आहे. यात तब्बल १० गाणी शंकर जयकिशन यांची आहेत. चोरी चोरी आणि बिजू बावरा ह्या चित्रपटांचे सांगीतिक महत्व वादातीत आहे. शंकर जयकिशन यांना सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनासाठी पहिले फिल्मफेअर चोरीचोरी या चित्रपटासाठी मिळाले. ऐकू यात २०१६ मधील १९५६ च्या चित्रपट संगीताच्या लोकप्रियतेवरून बांधलेली आमची क्रमवारी
http://www.voisact.work/index.php/2016/07/13/cgm-1956-ourlist/
चित्रगीतमाला १९५७ – नया दौर
१९५७ चा नया दौर हा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी चित्रपट. दिलीप कुमार यांची उत्तम अदाकारी, वैजयान्तिमाला यांचा सहजसुंदर वावर, व्यवसायाची गणिते सांभाळून सामाजिक प्रश्नाला हात घालणारे बी आर चोप्रा यांचे दिग्दर्शन आणि ओ पी नय्यर याचे सदाबहार संगीत यांच्या जोरावर ह्या चित्रपटाने रसिकांच्या मनावर गारुड केले. योग असा की इतक्या यशस्वी चित्रपट असूनही ओ पी यांचा दिलीप कुमार व बी आर चोप्रा यांच्या बरोबरचा हा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला. ह्या चित्रपटासाठी दिलीपकुमार यांना चक्क कोर्टात साक्षीदार म्हणून उभे राहावे लागले आणि आपल्या प्रेमाचा इजहार करावा लागला. ऐकू यात हा श्राव्य अनुभव …
http://www.voisact.work/index.php/2016/07/21/cgm-1957-nayadaur/
१९५७ चा नया दौर हा दुसऱ्या
यातली गाणी एकसेएक आहेत. एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना...
ओहोहो मांग के साथ तुम्हारा
ओहोहो मांग के साथ तुम्हारा ....
लाजवाब! मला तशीही वैजयंती माला आवडतेच.
.
.
अतोनात सुंदर वगैरे काही नाही पण बोलके डोळे आणि प्रेझेन्स आहे तिच्याकडे.. शेवटी प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या निरनिराळीच असते. कोणाला काय सुंदर वाटेल कोणाला काय.
चित्रगीतमाला १९५७ – मदर इंडिया
मदर इंडिया हा चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी ५ चित्रपटा पैकी एक आहे. या चित्रपटातील बिरजू च्या भूमिकेसाठी आधी चक्क एका हॉलीवूड स्टारचा विचार झाला होता व त्याच्या बरोबर कामालाही सुरुवात झाली होती. दिलीपकुमार यांना हि भूमिका करायची होती. भारता तर्फे हा चित्रपट ऑस्करला गेला व याचे ऑस्कर केवळ एका मताने हुकले. जाणून घेऊ यात या ऐतीहासिक चित्रपटाविषयी आजच्या भागात.
http://www.voisact.work/index.php/2016/07/28/cgm-1957-2-mi/