फुसके बार – ०४ मार्च २०१६ . महिषासुर व दुर्गा - दोन संस्कृतीतील फरक व संभाव्य संघर्ष

फुसके बार – ०४ मार्च २०१६
.

महिषासुर व दुर्गा - दोन संस्कृतीतील फरक व संभाव्य संघर्ष
.

जेएनयुमधील आंदोलनाच्या निमित्ताने महिषासुराचा मुद्दा पुढे आला. तेथील विद्यार्थी संघटनांनी महिषासुर पूजनाचा मुद्दा काढताना दुर्गेबद्दल काही अवमानकारक मजकूर लिहिला हे खचितच योग्य नव्हते.

मात्र आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की यावेळी महिषासुर येथे मुक्काम करायला आलेला आहे. यावेळी तो फारसा विस्मृतीत जायचा नाही. विस्मृतीत जाणार नाही एवढेच नव्हे, तर तो चक्क पुजनीय होऊन येईल.

आजवर ठळकपणे नाराजीचे उदाहरण दिसत असे ते बळीराजाचे. अगदी शाळेत असतानाही बळी हा खूप चांगला, दानशूर राजा होता अशी पहिली ओळ असे. मात्र त्यानंतर पुढचे सारे त्याच्याविरूद्ध कट रचणारेच होते याची जाणीव होत होती. नक्की काय ते कळत नसे, पण त्याच्यावर अन्याय झाला अशी भावना असे.

मग मोठे झाल्यावर याबाबत विचारले तेव्हा सांगितले गेले की बळी हा स्वत: वाईट नव्हता, पण वाईट लोकांच्या संगतीत होता, म्हणून त्याला शिक्षा दिली गेली. हे कोण वाईट लोक होते, वगैरे काही सांगायचे नाही. पण त्या भल्या माणसाला ‘शिक्षा’ देणारे हे कोण याबाबत कधी बोलले जात नाही. बरे, या वामनावताराने इतर काही चांगले केल्याचे दाखले दिले जात नाहीत. भल्या बळीचा नाश करण्यासाठी वामनाचा अवतार? आणि त्याला एकदम दशावतारांमध्ये स्थान? काहीच तर्क लागत नाही.

पूर्ण मानव अवतारांपैकी परशुरामाबद्दलही अनेक वाद आहेत. त्याने पृथ्वी अमुक अमुक वेळा नि:क्षत्रिय केली असे आजही काही जण अभिमानाने मिरवतात. त्याच्याबद्दल इतरही काही वादाच्या गोष्टी आहेत. परंतु मुद्दा पुन्हा तोच. आजच्या जगात या क्षत्रिय म्हणवल्या जाणा-या समाजातील लोक आहेत. पृथ्वी इतक्या वेळा नि:क्षत्रिय केली तर ते कसे तगले? मग म्हणायचे, त्याने फक्त दुष्ट क्षत्रियांना मारले. फक्त क्षत्रियांपैकीच काही जण दुष्ट होते का? इतर कोणी दुष्ट नव्हते का? तेव्हा या दशावतारातल्या परशुरामाबद्दल त्यांची काय भावना असेल? बरे, त्यातही सांगितले जाते की त्याने केवळ दुष्ट क्षत्रियांचेच निर्दालन केले. तसे असेल, तर मग त्याने दुष्टांचे निर्दालन केले असे का म्हणू नये?

थोडक्यात या दशावतारांची मांडणी आता नव्याने करण्याची आवश्यकता आहे.

दशावतारातील नरसिंहाबद्दल काही वावगे बोलले जाताना दिसत नाही, परंतु पुढे मागे हिरण्यकश्यपुही पुण्यात्मा होता असे कोणी म्हटले तर आश्चर्य वाटायला नको.

महिषासुराबद्दलची नवीन तथ्ये पुढे येत आहेत. बंगालमधील काही खेड्यांमध्ये नवरात्रीच्या काळात सुतकासारखे वातावरण असते, कारण तेथील लोक आजही महिषासुराला पुजतात. मग त्याला मारल्याचा सण ते कसा साजरा करणार?

हे झाले दूर बंगालमध्ये. अगदी आपल्या महाराष्ट्रातही म्हसोबाची मंदिरे कित्येक दशकांपासून पाहिली जातात. ती सहसा गावाच्या बाहेर असतात हाही ‘योगायोग’ मानायचा का? तेव्हा या देशामध्ये कधीकाळी म्हसोबाला पुजण्याची प्रथा होती हे दिसते. मग अचानक त्याला म्हणजे महिषासुराला दुष्ट कसे ठरवले गेले? कोणी ठरवले? बरे, असेही सांगितले जाते की त्याला मारणारी दुर्गा ही काही रूढार्थाने लढाऊ देवता नाही. मागे टीव्हीवरील चर्चेतही ऐकले होते की जेव्हा बांग्लादेशमुक्तीच्यावेळी वाजपेयींनी संसदेत इंदिरा गांधींचे कौतुक करताना त्यांना दुर्गा असे संबोधले, तेव्हाच डांगेंनी त्यांना म्हटले होते, की तुम्ही अशी चुकीची उपमा का देत आहात?

तेव्हा याबाबतीतील संघर्ष यापुढे वाढतच जाणार आहे.

कम्युनिस्ट लोक भलेही देवदेव करणे मानत नाहीत. पण अशा मुद्द्यांवरून ते रान माजवायला कमी करणार नाहीत. तिकडे तो कम्युनिस्ट कन्हैयाही डॉ. आंबेडकरांच्या नावाने संघटना स्थापणा-या 'दलित' रोहित वेमुलाला साथी रोहित म्हणून आपल्या कवेत घ्यायला पाहतो. तर दुसरीकडे माऔवाद्यांच्या रूपाने हिंसाचाराच्या शिकवणीला पाठिंबा देणारी ही कम्युनिस्ट विचारसरणी देशातील फुटीरतावादी चळवळींचे रूप घेतना दिसते; तर कधी दलितांचा कैवार घेताना दिसते.

त्यांचा कावा यशस्वी होऊ द्यायचा नसेल तर हिंदू समाजाला दुर्गा – महिषासूर प्रकरण स्वत:च निस्तरावे लागणार आहे. जोपर्यंत देवीच्या आरतीमध्ये ‘जय देवी जय देवी महिषासुरमर्दिनी’ असे ऐकू येईल, तोपर्यंत हे होणार नाही. याबाबतीत सामोपचाराची भूमिका घेत सुवर्णमध्य कसा काढला जाईल हे पहावे लागेल. कम्युनिस्टांचे जाउ दे, पण बहुजन समाजातली अशा बाबतीतली संवेदनशीलता यापुढे वाढतच जाणार आहे. त्यामुळे अशा मुद्द्यांना भविष्यात वारंवार सामोरे जावे लागणार आहे. त्यांना कसे सामोरे जायचे याची तयारी आधीच करायला हवी.

परंतु हिंदू समाजाची स्थिती अशी आहे की कोणी कोणाला विचारणारे नाही. धर्माचे प्रतिनिधी म्हणवणा-या शंकराचार्यांना समाजातील या बदलत्या वारे पोहोचले तरी असतील का नाही याबाबतीतही शंका आहे.

पुराणांमधल्या या कथांमध्ये कोणी कोणाला का मारले हे नेहमीच वादाचे असू शकते. एकतर या कथांना कसलेही पुरावे नसतात. अगदी अलीकडच्या सत्य घटनाही दोन पूर्णपणे विरूद्ध बाजूंनी लढवल्या जाताना आपण पाहतो. या सगळ्या तर पुराणातल्या गोष्टी. शिवाय धर्माशी संबंधित. म्हणजे ब-याच संवेदनशील. त्यामुळे याबाबतीत आपण जितके लवकर जागे होऊ तेवढे उत्तम.

अशा परस्परविरोधी मतांच्या धार्मिक प्रकरणांच्या बाबतीत कोणता मार्ग निघू शकतो?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

ही पोस्ट मुद्दाम चर्चाविषयमध्ये टाकलेली आहे. ती हलवू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रा चिं ढेरे यांची विविध देवांसंबंधीची पुस्तकं वाचलीत तर यावर बराच प्रकाश पडू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

+तेहतीस कोटी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आबांना दुजोरा.
मुळात दैवतांच्या बाबतीत अमुक एक सत्य, उरलेले असत्य अशा प्रकारची मांडणी अशक्य असते. त्यात तत्कालीन सामाजिक इतिहास (लढे, जीत-हार, प्रभाव, प्रचार, प्रसार, सहिष्णुता, सामावून घेण्याची ताकद इ.) प्रतिबिंबित झालेला असतो, तोही अतिशय ढोबळ-भग्न अशा स्वरूपात. त्यावर सद्यकालीन अस्मितांचं आरोपणही सातत्यानं होत असतं. त्यामुळेच निरनिराळ्या समूहांसाठी या इतिहासाचं आकलन निरनिराळं असतं. परशुरामाचा गेल्या काही वर्षांत नव्यानं झालेला उदय आणि चित्पावन ब्राह्मण समाजाच्या चेतवलेल्या अस्मिता हे या प्रकाराचं अगदी ताजं आणि ढोबळ उदाहरण.
तुम्हांला हिरण्यकश्यपूला कुणी पुण्यात्मा म्हणेल, अशी भीती पडली आहे. पण ही मांडणी केव्हाच केली गेली आहे. महिषासुराबद्दलची तथ्येही आज 'नव्याने प्रकाशात' आलेली नाहीत. काही जणांना त्याबद्दलचं भान आज येतं आहे, इतकंच.
सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारच्या उलट-सुलट मांडण्या होत असतात, त्या आवश्यकही असतात. त्यात काही दैवतांबद्दलची काही तथ्यं काही समूहांना अवमानकारक वाटण्याची शक्यता असतेच. अशा वेळी "आमच्या भावना दुखावल्या... मांडण्या जाळा, त्यांच्यावर बंदी घाला, मांडणी करणार्‍यांना हाणा, त्यांना तुरुंगात पाठवा, हा त्यांचा कट आहे..." अशा प्रकारची बोंबाबोंब टाळली, तर बर्‍याच गोष्टी सोप्या होतील. ते प्रगल्भतेचंच लक्षण आहे. मुदलात कुणालाच कुठल्याही प्रकारची मांडणी करण्याला आडकाठी नसावी, हे सत्य. कारण दैवतं ही शेवटी निव्वळ प्रतीकं असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुम्हांला हिरण्यकश्यपूला कुणी पुण्यात्मा म्हणेल, अशी भीती पडली आहे.

आपल्याला तर ब्वॉ हिरण्यकश्यपू (काय नाव आहे!), रावण वगैरे राक्षसपार्टी मंडळी जाम आवडतात. (आणि हनुमानसुद्धा. केवळ (१) तो वानर आहे (हाय मंकी!!!!!!), आणि (२) त्याला शेपूट आहे, या कारणांसाठी.) महिषासुराशी फारशी ओळख नसल्याकारणाने त्याच्याबद्दल अद्याप मत नाही, परंतु त्यास म्हशीचे डोके वगैरे असल्यास तो आवडेल, असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

बाकी, हिरण्यकश्यपूला कुणी पुण्यात्मा म्हणेल, अशी भीती वगैरे वाटणाऱ्यांसाठी: बरे ब्वॉ, हिरण्यकश्यपू वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, वैट्ट, दुष्ष्ट!!!!!! वगैरे होता (किंबहुना म्हणूनच आम्हाला आवडतो), आपण त्याची समाधी उन्हात बांधू हं, हात् रे हिरण्यकश्यपू, इ. इ.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही पोस्ट मुद्दाम चर्चाविषयमध्ये टाकलेली आहे. ती हलवू नये.

आदेशाचे पालन होतय असे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वृत्रासुर ते महिषासुर हे सर्व ब्राह्मण होते. (अधिकांश राक्षसानां ब्रह्मदेव (ब्राह्मण) यांनीच वरदान दिले होते. परशुरामाने तर सर्व क्षत्रियांचा संहार करून रावणाचे राज्य पसरविण्यात मदत केली होती. पण विचित्र बाब हि आहे, जे लोकांचा राक्षस (ब्राह्मणांनी) छळ केला तेच आजकाल ब्राह्मणांना पुजू लागले आहे. यालाच म्हणतात गुलामी मानसिकता. (रावणाचा संहार करणारा श्री राम काळे होते, त्यांचे सेनेत सर्व जनजातीय लोक होते). तसेच राक्षसांचा संहार करणारी देवी काळ्या रंगाचीच आहे). असुरांचा गौरव करणार्यांनी किमान रामायण किंवा पुराण तरी थोडक्यात वाचले पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काका, काका, आम्हाला राम आणि शंबूकाची गोष्ट सांगा ना!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

परशुरामाने तर सर्व क्षत्रियांचा संहार करून रावणाचे राज्य पसरविण्यात मदत केली होती.

मग विष्णुने क्षत्रिय रामाचा अवतार घेऊन ब्राह्मण रावणाला मारलं? विष्णु नक्की कोणाच्या बाजूचा होता? तो देव म्हणून जर सत्याच्या बाजूचा असला तर क्षत्रिय दुष्ट की ब्राह्मण? की हे सगळं बदलत असतं दुष्टपणा हा कुठच्याही जातीचा नसतो? हे फारच गोंधळाचं प्रकरण आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे हे पौराणिक प्रकरण आहे तर. ब्राह्मणांना एकसंध विचार करण्यात अडचण आहे तर. ब्राह्मण राक्षस यज्ञ करणाऱ्या ब्राह्मणांना त्रास देणार. तसंच गांधींचे गुरू गोपाळकृष्ण गोखले, पट्टशिष्य(!) विनोबा, इतर अनेक अनुयायी ब्राह्मण. आणि गांधींना मारणारा गोडसेही ब्राह्मण. एकीकडे 'कट्टार' पद्धत कोब्र्यांनी सुरू केली; दुसरीकडे ब्राह्मण म्हणून जन्माला आलेले जाती मोडा म्हणून बोंबलत फिरतात; फुर्रोगामी म्हणून हिणवले जातात.

पुराणांनी फारच लोचा केलाय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वेद आणि पुराणांत कसलाही लोचा नाही आहे. देव आणि असुर हे मानवी स्वभाव आहे. अत्याचार करणार्याला राक्षस म्हणून संबोधित केले आहे, जाती अनुसार नाही. ईश्वाकु वंशातला एक राजा सौदास (१२ वर्षांसाठी राक्षस झाल्यावर कल्माषपाद) मानवांना खात होता (अर्थात अत्याचारी होता).
ब्राह्मण ग्यानी आणि शक्तिमान असल्यामुळे त्यांनी अत्याचार जास्ती केले एवढेच. पण गेल्या शतकातील इतिहासकारांनी (अधिकांश ब्रिटीश) फूट डालो राज करो नीतीच्या अनुसरून उत्तर भारतीय म्हणजे आर्य (देव) आणि दक्षिण भारतीय म्हणजे अनार्य (असुर) असा प्रचार केला. आपल्या विद्वान इतिहासकारांनी फक्त त्यांची नक्कल केली.
नंतर आपल्या राजनीतिक लाभ साठी उच्चवर्ग म्हणजे देव आणि मागासलेल्या जाती म्हणजे असुर असा प्रचार झाला. याच खोट्या प्रचाराचे बळी झालेले लोक महिषासुर बलिदान दिवस साजरे करतात. JNU च्या विद्वानांच्या बाबतीत तर काही म्हणणे व्यर्थ.
बाकी आपले सर्व देवता/ देवी काळ्या रंगाचे होते.
काही वर्षांपूर्वी रावणाला दलितांचा हितैषी मानणारा एक साहित्यिक मला भेटला होता, (मजेदार गोष्ट त्यांनी त्यांनी वाल्मिकी रामायण कधीच वाचली नव्हती). माझ्या घरी वाल्मिकी रामायणणातला काही भाग वाचल्या वर त्यांना धक्काच बसला). असो.

बाकी ब्राह्मण असूनही मी असे लिहितो आहे, हे माझ्या खर्या पुरोगामीत्वाचे लक्षण आहे. बाकी ऐसी वर प्रतिगामी बिरूद मला जास्त प्रिय आहे.
केवळ ऋग्वेद वाचला तरी पुष्कळ भ्रम दूर होतील. सौप्या भाषेत
http://satsangdhara.net/rug/intro.htm

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देव आणि असुर हे मानवी स्वभाव आहेत

हे अ‍ॅब्सोल्युट की प्रतिकात्मक??

देव म्हणजे मानवी स्वभाव म्हणताय तर सर्वशक्तिमान परमात्मा वगैरे तो वेगळा का?? की तो पण प्रतिकात्मक ??
फारच लोच्या आहे बुवा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा परस्परविरोधी मतांच्या धार्मिक प्रकरणांच्या बाबतीत कोणता मार्ग निघू शकतो? >>>>>>

मार्ग एकच आहे कि असल्या विषयांच्या पोस्ट टाकुन उगाचच फुसके बार टाकु नयेत म्हणजे देशाची प्रगती होइल. वेळच जात नसेल तर एखाद्या झोपडपट्तीत जाउन शिकवावे, अनाथाश्रामात जाउन थोडे श्रम करावे किंवा व्रुद्धाश्रमात जाउन मदत करावी. ज्या देशात ६०% बालके कुपोषित आहेत त्या देशातल्या संसदेमध्ये महिषासुरावर तासन तास भाषणे करणार्या नेत्यांना , आणी त्यांना सपोर्ट देणार्या लोकांना आपण काय करतो आहेत हे कधी कळेल ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रिक्षावाला, मजदूर, भाजीवाला, कार्यालयातील कंत्राटी लेबर यांना विमा आणि अटल पेन्शन घेण्यास प्रवृत्त केले तरी चालेल. मी आजकाल हेच कार्य करतो. (मोदी सारखा गरीबांचा, दलितांचा खरा हितैषी, गरिबांचे भाग्य चांगले म्हणूनच मिळाला आहे). काही लोक दलितांचे नाव घेऊन राजनीती करतात पण त्यांच्या साठी काही हि करीत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे देशातल्या संसदेमध्ये महिषासुरावर तासन तास भाषणे करणार्या नेत्यांना कोठे सपोर्ट केलेले आहे? तुम्ही स्वत:चे असे काही लिखाण केलेले आहे काय? दिसले तरी नाही.
एखादी पोस्ट टाका आणि मग मीदेखील तुम्हाला असाच उपदेश करतो.
मुद्दा काय आहे पहायचे नाही आणि निघायचे उपदेश करायला. या पोस्टमध्ये उल्लेख केलेला मुद्दा भविष्यात सामाजिक संघर्षाचे कारण होऊ शकतो. 'अनाथाश्रामात जाउन थोडे श्रम करावे किंवा व्रुद्धाश्रमात जाउन मदत करावी. ज्या देशात ६०% बालके कुपोषित आहेत' याचा व तो संघर्ष टाळण्याचा काही संबंध दिसत तरी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सामाजिक संघर्षाचे कारण मुद्दाम निर्माण करायचे, संघर्ष घडवुन आणायचा, फालतु मुद्दे घेउन संसदेचा वेळ वाया घालवायचा, गोंधळ निर्माण करायचा आणी परत बोंब मारायची कि संसद चालत नाहिये. आणी देशाच्या विकासावर काहिच करायचे नाहि. काहि समजत असेल तर घ्या नाहितर सोडुन द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेहेहे, संसद कोण चालू देत नाहिये ते अगदी उघड आहे. मांसून सेशन ललित मोदीच्या न-मुद्द्यावर गेलं. नंतरच इंटोलरन्सवर गेलं. आता बघू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ok Sabha Years Time of Actual Sitting(in Hours) Time Lost due to Interruptions/ Adjournments (in Hours) %of Time lost due to Interruptions/ Adjournments Ruling Party/ Alliance Party/Alliance in Opposition
10th 1991-96 2527.9 279.4 9.95% INC BJP
11th 1996-98 813.6 45.3 5.28% United Front BJP
12th 1998-99 574.9 68.6 10.66% BJP INC
13th 1999-04 1945.7 454.6 18.94% BJP INC
14th 2004-09 1736.9 423.0 19.58% INC BJP
15th 2009-14 1344.6 891.9 39.88% INC BJP
16th (Till the Monsoon Session of Aug, 2015) 2014-19 610.7 58.7 8.77% BJP INC

भाजपाने मागच्या लोकसभेत जो विक्रम केला आहे तो कधिच मोडला जाउ शकत नाहि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाय विरोधी पक्षाच्या नेत्यांना उद्देशून "यांचं वय वाढलं पण अक्कल आली नाही"*# असं संसदेत म्हणायचं आणि शिवाय त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा करायची हेही आहेच.

*या विधानाच्या सत्यतेविषयी मी येथे शंका घेतलेली नाही हे नमूद करतो. तेव्हा हे विधान कसे सत्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करू नये.
# बाकी जेटलींनी आयकर मर्यादा ५ लाख करायला हवी असं विधान २०१३ मध्ये केलं होतं. अर्थमंत्री झाल्यावर दोन वर्षानंतर त्या पाच लाखाच्या पन्नास टक्केही जेटली पोचलेले नाहीत. त्यांना त्यावेळी "How much does he know – when will he know" असं विचारायला हवं होतं असं आता वाटतं आहे.

एकूणात जेटली काय, मोदी काय किंवा इराणी काय वादविवादातला "सीन जिंकणे" हीच त्यांना अचिव्हमेंट वाटते असं दिसतं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वक्तृत्वाचा फड मारून नेणे हेच यांचे इतिकर्तव्य असावे आणि तीच आकांक्षाही असावी. काही थोडे एकदोघे सोडले तर आपल्या खात्याचा कारभार कसा चालतो, खात्याच्या अखत्यारीत कोणकोणत्या गोष्टी येतात हेही यांना गेल्या पावणेदोन वर्षांत माहीत करून घेता आलेले नसेल. मंत्रिमंडळात सुमारांची सद्दी झालीय. किंबहुना प्रशासनाचा वकूब असलेल्यांची वानवाच दिसतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कॉमेंट कशाआधारे आली आहे माहिती नाही.
हे वाचून बघा. आधीही शेअर केलं होतं.
http://indiatoday.intoday.in/story/transfer-posting-raj-ends/1/531599.html

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

चोर डाकु आणि लुटारुंपेक्षा सुमारसद्दी अनेक पटीने परवडली.

उच्च शिक्षीत चिदु आणि सिब्बु, थरुर, कारथ, येचुरी आणि आमचे काका पेक्षा इराणी बाई लाख पटीने चांगल्या. खरे तर आधी उल्लेखलेल्या चिदु , सिब्बु आणि काकां पेक्षा रागा पण परवडला. रागालाच गृहमंत्री केले पाहिजे.

पर्रीकर, प्रभु, हंसराज अहिर आणि बर्‍याच प्रमाणात गडकरी हे तिघ जर मंत्रीमंडळात असतील तर ते मंत्रीमंडळ युपिए च्या मंत्रीमंडळा पेक्षा अनेक पटीने बरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी, त्यामुळेच आता युपीएमध्ये भ्रष्टाचार झालाच नाही. तो सीएजी/सर्वोच्च न्यायालाचा खोडसाळपणा होता वगैरे हळू हळू ऐकू येतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सत्याला कधी ना कधी वाचा फुटतेच. :D>

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हे सर्व सुमार लोक धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत अशा नंदनवनात तुम्ही वावरत आहात काय? भारतात रहात असाल तर किमान गल्लीतल्या गावातल्या भाजपेयींकडे पहा, व यांच्या 'नेत्यांचे' रोजीरोटीचे व्यवसाय तोडीपाणी व्यतिरिक्त कोणते याची यादी करून पहा. तात्काळ भ्रमाच्या भोपळ्याच्या भाजीची कृती लिहावयास घ्याल Wink

यांचे भ्रष्टाचार (अजून) चव्हाट्यावर आले नाहीत याचा अर्थ हे फार सभ्य व पापभीरू लोक आहेत, असे समजू नका, असे सुचवतो.

एक सोपे उदाहरण : तेलगी स्टँप पेपर घोटाळ्यात जेलमधे राहून आलेला माणूस आज यांचा आमदार आहे.
दुसरे उदाहरण : लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लोकांकडून पैसे घेण्यात पकडले गेलेले भाजपाचे खासदार.
तिसरे : राष्ट्रवादीचे प्रचण्ड भ्रष्ट आरोग्यमंत्री आज भाजपाच्या तिकिटावर आमदार, अन त्यांची कन्या खासदार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

उ.प्र.मध्ये आज भाजप सत्ताधारी नाही. पण तिथल्या कार्यकर्त्यांची (आणि रास्वसंच्या कार्यकर्यांची) जी काही 'करतूतें' कानावर येतात ती मला सुरुवातीला धक्कादायक वाटली होती. तसे बोलून दाखवल्यावर त्या तरुणाने 'तुम्ही कुठल्या जगात वावरता आहात' असे त्याच्या 'शुध' बनारसीत विचारले होते.
आणि हो, एक हेवीवेट पुरेसा आहे याला अनुमोदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांचीच गादी पुढे चालवायची होती का? इतरांना वॉटाबाउटरी म्हणून हिणवताना विचारवंतही त्याच छापाच्या आर्ग्युमेंट्स करायला लागले तर. आनंद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

दोन्हिहि सेमच आहेत कि. एकमेकांची गादि चालवणारच

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

येथे देशातल्या संसदेमध्ये महिषासुरावर तासन तास भाषणे करणार्या नेत्यांना कोठे सपोर्ट केलेले आहे? तुम्ही स्वत:चे असे काही लिखाण केलेले आहे काय? दिसले तरी नाही.
एखादी पोस्ट टाका आणि मग मीदेखील तुम्हाला असाच उपदेश करतो.
मुद्दा काय आहे पहायचे नाही आणि निघायचे उपदेश करायला. या पोस्टमध्ये उल्लेख केलेला मुद्दा भविष्यात सामाजिक संघर्षाचे कारण होऊ शकतो. 'अनाथाश्रामात जाउन थोडे श्रम करावे किंवा व्रुद्धाश्रमात जाउन मदत करावी. ज्या देशात ६०% बालके कुपोषित आहेत' याचा व तो संघर्ष टाळण्याचा काही संबंध दिसत तरी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुळात पुराणातले अगणित दाखले ,प्रसंग,कुट घेऊन त्याच्यावर चर्चा करणे अथवा ते आताच्या प्रश्नांना कसं लागू गैरलागू अहे हे पूर्णपणे बंद व्हायला पाहिजे.

वेळेचा अपव्यय नुसता.

सामान्य नागरिक म्हणेल मला आताच्या प्रवासाची चिंता आहे शेवटच्या पुष्पक विमानाची नाही.

अमक्या प्रसंगात रामाचं/रावणाचं वर्तन उचित/अनुचित होतं का हे भरपेट जेवण करून खांबाला टेकून पडवीत चर्चा करणाय्रांसाठी असतं.सकाळी अर्धा किमी दूरच्या विहिरीवरून पाणी आणायला जाणाय्रांसाठी नसतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0