छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३६ : इमारती
बरेच दिवस झाले म्हणून आता छायाचित्रण स्पर्धा परत सुरू करत आहे.
या वेळचा विषय आहे "इमारत/इमारती". सर्वांना सहज शक्य आहे असा सोप्पा विषय देत आहे. यात शक्यतो इमारत हा मूळ उद्देश हवा आहे, आयफेल टॉवरसमोर उभे राहून काढलेला फॅमिलीचा फोटो अपेक्षित नाही. अगदी भव्यदिव्य पाहिजे असे काही नाही,एखाद्या चाळीचे छायाचित्र पण चालेल, एखाद्या इमारतीचा रोचक भाग पण चालेल. अनेक इमारती पण चालतील, पण हेतू आहे की लक्ष इमारतीकडे जायला हवे.
तर सुरुवात करा मंडळी.
अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या चित्रसंस्करण प्रणाली वापरून छायाप्रकाशभेद, रंगप्रमाण बदलून तर चित्र खुलविता येतील. तसेच योग्य प्रमाणात कातरल्याने मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते. कृपया या वेळच्या स्पर्धेसाठी शक्यतो तसे करू नये. कातरकाम ठीक आहे, पण संस्करण जर केले तर केलेले संस्करण नमूद करावे.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट २४ मार्च ५ एप्रिल रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. २५ मार्च ६ एप्रिल रोजी निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच विजेता/विजेती घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
----------
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
प्रतिक्रिया
वा छान विषय आहे.. टाकतो फोटोज
वा छान विषय आहे.. टाकतो फोटोज
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
उत्तम काम
उत्तम काम केलंत. लवकरच फोटो काढते आणि/किंवा इथे चढवते.
---
आता ही अडचण दूर केलेली आहे. Width, Height पैकी एकच टॅग वापरा. दोन्ही वापरायचे असतील तर एकतर गणित करून लांबी-रुंदीचं प्रमाण बदलणार नाही याची काळजी घ्यावी लागेल, किंवा फोटो एका दिशेला खेचलेला दिसेल. आता Width आणि Height पैकी जो टॅग वापराल तेवढाच कोड प्रतिसादात उमटेल आणि इंटरनेट एक्सप्लोररची अडचण येणार नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
माहितीबद्दल धन्यवाद
बदल केला आहे.
नवा राजवाडा , कोल्हापूर .
तांत्रिक माहिती :
Nikon D5200
18-140mm f/3.5-5.6
ƒ/9.0 18.3 mm 1/320 250 Flash (off, did not fire)
टिप: फोटो HDR मोड मध्ये काढला आहे. चित्रसंस्करण (बापरे) केलेले नाही .
-सिद्धि
फोटो HDR मोड मध्ये काढला
संस्करण न करताही त्या इमारतीभोवती जी हलकीशी आभा/प्रभा आली आहे ती या मोड मुळे का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मोठ्या वस्तूमुळे नजीकचा
मोठ्या वस्तूमुळे नजीकचा स्पेसटाईम ताणला जाऊन प्रकाशाचं वक्रीभवन झालं आहे.
हाहा!
हाहा!
होय.
होय.
-सिद्धि
कृपया या वेळच्या स्पर्धेसाठी
संस्करणाला आक्षेप का ते कळलं नाही. तसंही कॅमेऱ्याने फोटो काढणं यात मोठ्या प्रमाणावर आंतर्गत संस्करण होतंच. जेव्हा आपण कॅमेऱ्यात एखादा मोड निवडतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारच्या संस्करणातला एक पर्याय निवडतो. ते चालेल पण नंतर स्पर्धकाने केलेलं संस्करण चालणार नाही असं का?
रॉ फॉम्याट
मलाही हाच प्रश्न पडला.
'रॉ' फॉम्याट मध्ये फोटो काढला तर विना संस्करण 'जेपीजी' कसे मिळवणार ?
जर केले तर...
'शक्यतो' करू नये असं म्हणायचं होतं, अजिबात करू नये, असं नाही. जर फोकसिंग नीट असेल, तर संस्करण करून कुठलाही फोटो छान करता येतो, त्यात फोटोग्राफरचे कौशल्य कमी असले तरी चालते, असे माझे 'वैयक्तिक' मत आहे.
आता ठीक आहे?
माउंट वॉशिंग्टन हॉटेल
(No subject)
तांत्रीक माहीती : माहीत नाही, नवर्याने साधा डीजीटल कॅमेरा वापरला आहे, ऑटो मोड मधे.
सुंदर.
सुंदर.
हवामहल
१. हवामहल, जयपूर
२. नदीच्या पात्रातून कथीड्रल, लंडन
३. थिएटर, एडिंबरा(रो?)
४. 'शरलॉक'चा लुटूपुटूचा सेट
५. हॉगॉर्ट्स, सेट
***
काहीही कातरकाम वा संस्करण केलेलं नाही. मोबाईलवर मारलेले फोटू.
-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन
विकासाकडे ?
जयपुर मधील एक ईमारत.
फोटो थोडासा कातरला आहे. माफक संस्करण केले आहे.
कॅनन १000डी,
टॅमरॉन १७-५० @ ५० मी मी
एफ ८, १/१०० से.
ट्रान्सअमेरिका बिल्डिंग
ट्रान्सअमेरिका बिल्डिंग (पिरामिड) सान फ्रान्सिस्को, कॉइट टॉवरच्या खिडक्यांमधून.
f/2.6
1/950
3.7 mm
ISO80
सॅमसंग मोबाईल फोन कॅमेरा
मस्त फोटो आहे,
मस्त फोटो आहे, धनंजय.
(प्रतिसाद दिल्याशिवाय रहावलं नाही, बस्स!!)
रोचक. त्या चिल्लर कसल्या
रोचक. त्या चिल्लर कसल्या पडल्या आहेत?
तिथे ती नाणी वगैरे कशाला
तिथे ती नाणी वगैरे कशाला टाकलीयेत?
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
राणीबाग भायखळा
राणीच्या बागेतला ( भायखळा ) एक मनोरा सकाळी-
इमारत वगैरे म्हणता येइल का शंका आहे.पुर्वी ब्रिटिश अफिसरांच्या वाड्यांना कडेने वॅाच टॅावर होते.
( स्पर्धेसाठी नाही )
फोटो माझाच आहे ,मोबाइल कॅम्रा)
शंका
वरचा फोटो स्पर्धेसाठी आहे का?
अजुन एक
इमारत म्हणावं कि नाही माहिती नाही. कधीकाळी असलेल्या इमारतीचे अवशेष , किल्ले शिवनेरी !
जय भवानी जय शिवाजी !
तांत्रिक माहिती :
Nikon D5200, 18-140mm f/5.6, 56.6mm 1/500 ISO 250
Flash (off, did not fire)
-सिद्धि
अतिच आवडला. अतिशय गोड आहे.
अतिच आवडला. अतिशय गोड आहे.
शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर !
Nikon D5200
18-140mm f/3.5-5.6
ƒ/11.0, 35.6 mm, 1/500 , ISO 250
Flash (off, did not fire)
-सिद्धि
माऊली कृपा
१. माऊली कृपा
२. चेंदणी कोळीवाडा
३. शीर्षक सुचलं नाही
तिन्ही चित्रं कॅनन टी३ मधून घेतली; कॅमेऱ्याने आपण होऊन केलं तेवढं संस्करण, बाकी काही केलेलं नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
निकाल ६ एप्रिलला
लोकाग्रहास्तव (हे आपलं उगीचच म्हणायचं, हॅ-हॅ-हॅ) अंतिम तारीख पुढे ढकलत आहे.
ग्रे अँड ब्ल्यू
Link (पूर्ण फोटो दिसण्यासाठी) http://i.imgur.com/iCc9uj3.jpg
स्मार्टफोन ने काढलेला, १२ mp, unedited.
लोहगड
१० mp digital camera, edited to black and white
(No subject)
आवन कह गये, अजहू न आये
लीनी ना मोरी खबरिया...
पैकौ, निकाल कुठाय!
पैकौ, निकाल कुठाय!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
तुमचे फोटो कुठाहेत? म्हणून
तुमचे फोटो कुठाहेत? म्हणून थांबलोय.
आता काय सांगायचं! लगु दे
आता काय सांगायचं! लगु दे निक्काल.. नका वाट बघु
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
निकाल
कालावधी वाढवूनपण म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही, म्हणून जरा वाईट वाटले.
काही वैयक्तिक मते:
सखी यांच्या फोटोत झाड घेतले नसते तर फोटो चांगला आला असता, असे वाटले. लक्ष झाडामुळे विचलित होते असे वाटले. तसंच काहीसं धनंजय यांच्या फोटोत पण वाटले. लक्ष सर्वप्रथम डाव्या खिडकीकडे जाते असे वाटले. (खिडकीतून येणारा प्रकाश डावीकडे जात आहे, म्हणून कदाचित तसे वाटले असेल).
माऊली कृपा आणि चेंदणी कोळीवाडा ही चित्रे रोचक वाटली, पण अदितीने पूर्वी प्रकाशित केलेल्या बॉस्टनमधील (?) इमारतीसारखी आकर्षक वाटली नाहीत.
शिवाजी विद्यापीठ , कोल्हापूर मध्ये काँपोजिशन जरा वेगळे हवे होते, फोटोत पुढील मैदान्/मोकळा भाग कमी हवा होता असे वाटले.
बोका यांचा फोटो आवडला. नदीच्या पात्रातून कथीड्रल, लंडन यामधील काँपोजिशन आवडले, पण इमारत खूप छोटी वाटली आणि आकाश आणि वळणदार रस्ता मोठे वाटले.
माउंट वॉशिंग्टन हॉटेलमधील पांढरा आणि लाल या रंगांचा काँट्रास्ट छान दिसतोय, पण इमारतीच्या दोन्ही टोकांना दिसणार्या झाडांमुळे विरस झाला.
३ रा क्रमांक:
सिद्धि यांचा किल्ले शिवनेरी
२ रा क्रमांक:
अनु राव यांचा फोटो: क्रॉप करायला हवा होता.
१ ला क्रमांकः
प्रणव यांचा ग्रे अँड ब्ल्यू: उभ्या-आडव्या, काटकोनातल्या रेषांचा संगम चांगला जमला आहे, इमारतीची भव्यता लगेच नजरेत भरते.
मला अचरट यांचा पहिला फोटो आवडला. यात इमारत, त्यावरील कोरीवकाम, सूर्याची किरणे असा सुंदर मिलाप झाला आहे, पण त्यांनी फोटो स्पर्धेसाठी नाही असे म्हटले आहे, म्हणून त्याला १ ला क्रमा़ंक दिला नाही.
अरे वा! प्रणव अभिनंदन! येऊ दे
अरे वा! प्रणव अभिनंदन!
येऊ दे पुढला विषय!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
हुर्रे! धन्यवाद!! हो,
हुर्रे!
धन्यवाद!!
हो, शनिवार पर्यंत विचार करतो पुढ्च्या विषयाचा.
उशीराने
ही इमारत नि दृश्य पाहून या छायाचित्रण आव्हानाची आठवण झाली. सेलफोनरून टिपल्याने चित्राचे तांत्रिक तपशील देऊ शकत नाही.
देऊळ
देऊळ
डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता