आयुर्वेद

( नम्र सूचना : होमिओपॅथीची तरफदारी कृपया करू नये. ती अत्यंत बंडल उपचार पद्धती आहे हे माझे स्पष्ट मत आहे.)

या विषयावर बराच जालीय धुरळा उडला असेल. तरीही मला काही प्रश्नांविषयी जाणून घ्यायला आवडेल.
१) आयुर्वेदाला भारतात राजमान्यता का आहे?
२) संपूर्ण आधुनिक वैद्यकाचा अभ्यास करणारे या "शास्त्रा"कडे कसे पाहतात?
३) महाराष्ट्रातील अतिशय चांगले वैद्य कोणते? त्यांचा आपल्यापैकी कोणाला वैयक्तिक अनुभव आहे का? केवळ वैद्यकीय उपचारांचे अनुभव नव्हेत, बाकीचे अनुभव सुद्धा चालतील. जसे की विशिष्ट लकबी, स्पष्ट विचार आणि प्रामाणिक संशोधन, खोलात जाऊन केलेल्या चर्चा आणि मंथन असे अनेक अनुभव, वैद्यकावर केलेला समग्र विचार इत्यादी इत्यादी. (बालाजी भक्तांनी धागा सोडावा.)
४) आयुर्वेदातत्सम अजून देशी उपचार पद्धती आहेत का? भारतीय लोक कितपत या उपचारपद्धतीवर विसंबून असतात?
५) खूपदा हेही करून पाहू या आजारपणातल्या नंतरच्या फेज मध्ये बळावत गेलेला विचार न करता अगदी सुरुवातीपासून आयुर्वेदीक उपचार घेणारे कोणी आहेत का? तुम्ही आयुर्वेदाला फक्त पर्यायी उपचारपद्धत म्हणून पाहता का?

धन्यवाद!

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.75
Your rating: None Average: 3.8 (4 votes)

धाग्याला पहिला स्टार दिलेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

खरेतर मला अगदी गहन चर्चाच घडवून आणायची आहे असे नाही, पण वरील गोष्टींविषयी कुतूहल आहे. हा अगदीच फुसका आजीचा बटवाछाप जालीय अटेम्ट होऊ नये ही इच्छा होती. मला स्वत:ला आयुर्वेदाविषयी अबब! वाटत नाही. पण अनेक डॉक्टर्स होमिओपॅथीला जसे झोडतात तसे आयुर्वेदाला झोडत नाहीत. यात प्रोफेशनल एथिक्स कितपत असतात ते माहित नाही. कदाचित त्यांना आयुर्वेद ही दखल घेण्याइतपतही महत्त्वाची गोष्ट वाटत नसावी. किंवा ते पेशंटच्या मनाच्या समाधानासाठी देखील आयुर्वेदाविषयी कडवट बोलत नसतील.

दुसरं म्हणजे, बी ए एम एस करणार्‍यांना आधुनिक वैद्यक कितपत शिकवलं जातं आणि त्यांचा वैद्य कितपत केला जातो हे प्रत्यक्ष त्यांच्याच तोंडून ऐकायची इच्छा होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

होमिओपाथीची तरफदाती करु नये
बालाजी भक्तांनी धागा सोदावा.

----

अश्या नियम अटी घालुन कशी चर्चा होऊ शकते?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

२) संपूर्ण आधुनिक वैद्यकाचा अभ्यास करणारे या "शास्त्रा"कडे कसे पाहतात?

याबद्दल मलाही कुतूहल आहे. कोणी अभ्यासकांनी लिहिल्यास मला वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अभिराम दिक्षित ह्या आधुनिक एम डी वाल्यानं त्यांच्या ब्लॉगवर आयुर्वेदावर लै शिव्या घातलयत.
ऐसीवरच आडकित्तानं आयुर्वेदाबद्दल त्यांना काय वआटतं ते नेमकं लिहिलय.
सध्या गडबडित आहे.
शोधत बसणं शक्य नाही.
आडकित्त्याचे प्रतिसाद शोधावेत.
"आदिवैद्याला सलाम" असं कायतरी त्यात चरक का सुश्रुत का वाग्भटाबद्दल लिहिलेलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद मनोबा. सर्च मारून बघतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

१.भारतात आयुर्वेदाला राजमान्यता आहे.
आयुर्वेदाबरोबर होमिओपथी , युनानी आणि सिद्धा वैद्यकपद्धतींनाही राजमान्यता आहे.
महाराष्ट्रात तर एकाच आरोग्य विद्यापीठातर्फे आयुर्वेद, मॉडर्न मेडिसीन , होमिओपथी आणि युनानी महाविद्यालयांचा अ‍ॅडमिशनपासून ते परीक्षेपर्यंत सगळा कारभार चालतो.
२. माझ्यासारखे मॉडर्न मेडीसीनचा अभ्यस करणारे बरेच लोक आयुर्वेदाकडे अतीव आदराने पहातात. आधुनिक वैद्यक ही गेल्या १००-१५० वर्षांपासूनची प्रचलित ज्ञानशाखा आहे. खरे तर ही शाखा हा काही वेगळा प्रकार नसून प्रचलित ज्ञानाचा काटेकोर शास्त्रीय दृष्टीकोनातून अभ्यास करत , नवनवीन क्षेत्रातील ज्ञानाची या शाखेत भर घालत, प्रमाणीकरण करत बनलेली शाखा आहे.
आम्ही आयुर्वेदिक्/चायनीज औषधांना नाकारत नाही. उलट त्या पद्धतीत असलेल्या औषधपद्धतीचे मोघम स्वरूप काढून टाकून आत्ताच्या ज्ञानाप्रमाणे जास्तीत जास्त प्रमाणीकरण करतो.
उदा. खोकल्याकरता ज्येष्ठमधाची काडी चघळा हा झाला घरगुती उपाय.
अमुक तोळे ज्येष्ठमधाचे चूर्ण करून ते अमुक पदार्थांत मिसळून त्याच्या अमुक गोळ्या करून इतक्या वेळा या या पथ्यासह खा. हा झाला आयुर्वेदिक उपाय. त्यातही कुठल्या प्रकृतीच्या (वात /कफ्/पित्त) माणसाने किती गोळ्या कुठल्या पथ्यासह खाव्या हे ते सांगणार.
तर ज्येष्ठ मधातलंच कुठलं अल्कलॉईड वेगळं करून ते कफ मेकॅनिजममध्ये टिश्यू रिसेप्टर लेवलवर कसं काम करतं ते अभ्यासून त्या वेगळ्या केलेल्या अल्कलॉईडचा/स्टीरॉईडचा वेगवेगळ्या प्रकारच्या खोकल्यांमध्ये डोस निश्चित करणे. पेशंटच्या वय, प्रकृती यांच्या आधारे मात्रा ठरवणे. हे औषध पोटात गेल्यावर औषध शरीरावर कसा परिणाम करते आणि शरीर औषधाचे काय करते हे अभ्यासणे , साईड इफेक्टस अभ्यासणे, प्लासिबोपेक्षा हे औषध खरेच काम करते का हे पहाणे त्यासाठी रसायन, भौतिक, सांख्यिकी अशा वेगवेगळ्या शाखांतील आधुनिक ज्ञानाचा वापर करणे हे आम्ही म्हणजे आधुनिक वैद्यक वाले करतो.

आम्ही स्वतःवरच अनेक बंधने लादून घेतलेली असल्याने अमुक चार लोकांना अशा अशा मूळीचा /गोळीचा फायदा झाला आता द्या सरसकट सगळ्यांना असे करत नाही.
पण तरिही आमच्या मनात त्या त्या काळात उपलब्ध असलेले ज्ञान वापरून मानवजातीला मदत करणार्‍या आयुर्वेदाविषयी/इंडीजिनस उपचारपद्धतींबद्दल अतीव आदरच आहे.
सेईंग दॅट, आयुर्वेदाच्या नावाखाली जो कुणालाही बांधिल नसलेला भंपकपणा चालतो त्याला आमचा विरोधच आहे.
आयुर्वेदिक परीक्षा पास झालेले बी ए एम एस लोक शेकडा नव्वद किंवा त्याहून जास्त मॉडर्न मेडीसीनचीच प्रॅक्टीस करतात आणि त्याकरता आमच्या दवाखान्यांतून काम करून अनुभव घ्यायला येतात हे सत्य आम्ही रोज पहात असतो.
माझ्याकडेही एकावेळी असे चार पाच स्टूडंट असतात आणि ते नियमबाह्य नाही. कारण या लोकांना अ‍ॅलोपथिक प्रॅक्टीस करायची परवानगी शासनानेच दिलेली आहे. बाहेर अर्धवट ज्ञानावर आधारित प्रॅक्टीस करण्यापेक्षा एखाद्या अ‍ॅलिपॅथकडे शिकून मग यांनी प्रॅक्टीस केली तर जनतेच्याच हिताचे आहे.
३. महाराष्ट्रातील चांगले वैद्य- माहित नाही. याचा विचार करायची कधी वेळच आली नाही. Smile
४. आयुर्वेद सोडून सिद्धा, युनानी अश्या भारतीय उपचारपद्धती आहेत. युनानी भारतीय नाही अर्थात पण ते लोकही आयुर्वेदाप्रमाणेच वनस्पतीज प्राणिज पदार्थ वापरत असतात. मोठ्या विद्यापीठांतून काही आजारांवर शास्त्रशुद्ध डॉक्युमेंटेशनही चालू आहे. अशी एक दोन विद्यापीठे आणि त्यातले काम माहित आहे.
भारत सरकारने 'आयुश' असे डिपार्टमेंट काढून आयुर्वेदिक, योग आणि नॅचरोपथी, युनानी, होमिओपथी, सिद्ध अशा शाखांसाठी ऑफिशीयल काम सुरू केले आहे.
या शाखांतले पदवीधर ऑफिशीयली सरकारी कामंत विशिष्ट कोट्यात नेमतात हल्ली. मोठ्या सरकारी हास्पिटलात एक आयुष ओपिडी असते जिथे यांतले कोणी डॉक्टर पेशंटस बघतात. अध्येमध्ये एखादे औषध काढून त्याचे मार्केटींगपण हे डिपार्टमेंट करते.
(हे मी सगळं ऑफिशीयल लेवलचं सांगत्येय आतली गंमत अर्थातच सांगणार नाही.)
५. सुरुवातीपासून आयुर्वेदिकच घेणारे कित्येक लोक आहेत. फक्त होमिओपथी किंवा फक्त आयुर्वेदिकवालेही आहेत.
सिद्धावाले मी पाहिले नाहीत. जसे आपण आयुर्वेदावर खूप विश्वास ठेवतो तसे मुस्लिम युनानीवर खूप विश्वास ठेवतात आणि फक्त युनानी औषधे घेणारेही कित्येक मला माहित्येयत. हैद्राबादजवळच्या आमच्या गावातल्या उर्दू पेपरांत आपल्या इथल्या तांबेगुरूजींच्या सल्ल्याप्रमाणे कुणा फेमस युनानी डॉक्टरचे सल्लेही छापून येत असतात.

मी आयुर्वेदाला पर्यायी उपचारपद्धती म्हणून पहात नाही. माझ्या मते तेही त्या काळानुसारचे वैद्यक होते.
आता त्यावर पुढिल काळाप्रमाणे संस्कार झाले पाहिजेत.
कुठल्याही ज्ञानशाखेप्रमाणे आरोग्यविज्ञान ही शाखाही एक प्रवाही शाखा आहे असे मी मानते.

जसे भूगोलातले नकाशे पूर्वीच्या नॅव्हीगेटर्सनी त्यांच्या ज्ञानाप्रमाणे बनविले. ते चुकीचे आहेत असे म्हणता येणार नाही. त्यानुसार प्रवास करूनही लोक बर्‍याचदा ईप्सित स्थळी पोचत असत आणि अजूनही काही वेळा पोहोचू शकतात.
पण आता तुम्ही अधिक प्रिसाईज माहिती वापरू शकता.

यात पूर्वीचे नकाशे बनवुणारे फ्रॉड होते असेही नाही, आत्ताचे चालू आहेत असेही नाही आणि पूर्वीचे नकाशे आत्ताच्या नॅविगेशनला पर्याय आहेत असेही नाही.
इत्यलम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साती तै, धन्यवाद.
मला अजून एक विचारायचं आहे. इयत्ता अकरावीला उत्कांती शिकवताना, जीवनाच्या उगमाविषयी आधीच्या काय संकल्पना आहेत हे थोडक्यात का होईना शिकवले जाई. अगदी परवा आलेल्या कॉसमॉस या मालिकेतही बराच भाग विश्वनिर्मितीच्या विज्ञानात इतिहासात लोकांनी कसा मुलभूत विचार केला आहे याबद्दल आहे. तसे आधुनिक वैद्यकाच्या अभ्यासक्रमात आयुर्वेदाविषयी शिकविले जाते का? चरक किंवा सुश्रुत किंवा यांच्याबद्दल शिकविले जाते का? त्यांच्या विचारांतली कमतरता इत्यांदींवर काही सांगितले जाते का?

मला वाटते की, रोग निराकरण, उपाय, प्रतिबंध, एकंदरीत आहार, पथ्ये यांच्याबद्दल या लोकांनी मुलभूत स्वरुपाचा विचार केलेला आहे. त्याला काही तत्त्वांचे आधिष्ठान घालून देऊन एक शिस्तशीर अभ्यासपद्धती तयार केली आहे. तुमचेच उदाहरण सांगायचे तर :

>>खोकल्याकरता ज्येष्ठमधाची काडी चघळा हा झाला घरगुती उपाय << हा प्रामुख्याने अनुभवांवर आधारलेला उपाय. यात संचिताचा मोठा भाग आहे.
>>अमुक तोळे ज्येष्ठमधाचे चूर्ण करून ते अमुक पदार्थांत मिसळून त्याच्या अमुक गोळ्या करून इतक्या वेळा या या पथ्यासह खा. हा झाला आयुर्वेदिक उपाय. त्यातही कुठल्या प्रकृतीच्या (वात /कफ्/पित्त) माणसाने किती गोळ्या कुठल्या पथ्यासह खाव्या हे ते सांगणार << वरच्या अनुभवाधिष्टित निरीक्षणाला एक शिस्त दिली गेली आहे. या उपायाला एका कोअर तत्त्वाशी बांधण्याचा प्रयत्न आहे. त्याचे प्रोज-कॉन्स करण्याचा प्रयत्न आहे. थोड्क्यात वरच्या उपायाचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न आहे. या उपायाचे डॉक्युमेंटेशन करण्याचा प्रयत्न आहे. यावरून जे कुणी याला जबाबदार असतील त्यांची प्रगल्भता जाणवते. अशी एक शिस्त इतर उपचारपद्धतींना आहे का? ही शिस्त प्रवाही ज्ञानशाखेला सहाय्य्भूत आहे हे अभ्यासक्रमात स्पष्ट करतात का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

आयुर्वेदाचे अगदी ओझरते उल्लेख असतात.
म्हणजे चरक/सुश्रूत यांचे असतात.
पण त्यांचे नेमके श्लोक वगैरे नसते.

आयुर्वेद आणि होमिओपथीला पहिल्या वर्षापासून शरीररचना आणि शरीरक्रीया याबाबत मॉडर्न मेडीसीन काय म्हणते हे शिकवलेले असते.
तसेच त्यांना थोडीफार मॉडर्न फार्मॅकॉलॉजॉही शिकवतात.
इमर्जन्सी मेडीसीन्स थोडेफार शिकवतात.
होमिओपथीवाल्यांनी मध्ये मॉडर्न मेडीसीनवाल्यांची औषधे पूर्णपणे वापरता यावीत म्हणून आंदोलन केले, कोर्टात गेले आणि महाराष्ट्राततरी त्यांना अशी परवानगी मिळाली आहे असे ऐकते. आमच्या कर्नाटकात अजूनतरी नाही.

शिस्तशीर अभ्यास हल्ली सगळ्याच शाखांत चालतो.
मी म्हटल्याप्रमाणे आमच्या हैद्राबादजवळच्या एका युनानी केंद्रात अलर्जी/व्हिटीलीगो/अस्थमा या आजारांवर युनानी मेडीसीन्सचे शिस्तशीर संशोधन फार मोठ्या डाटाबेसवर चालू आहे.
मध्ये प्लेटलेटस वाढवायला पपईची पाने खा सांगत. तर या पपईच्या पानांतील प्लेटलेटस वाढविणार्‍या मुख्य अल्कलॉईडला वेगळे करून मग ते हल्ली गोळीच्या स्वरुपात विकतात. त्याआधी त्याचाही पद्धतशीर अभ्यास झाला आहे. मात्र अजूनतरी ते औषध म्हणून नव्हे तर फुड सप्लिमेंट म्हणून विकायचीच परमिशन आहे.
आजच लाल मुळ्या पासून काढलेल्या एका रसायनाचा बॅड कॉलेस्टरॉल (नॉन एच डी एल कॉलेस्टरॉल) कमी करण्याबाबतच्या औषधाचा प्रॉडक्ट मोनोग्राफ येऊन पडला आहे. तो अजून अभ्यासायचा आहे.
तर सिस्टीमॅटीक अभ्यास बर्‍याच पारंपारिक औषधांचा जगभर्वचालू आहेच.

माझे आवडते उदाहरण मलेरियावरच्या अर्टेस्युनेट या चायनीज हर्बल मेडीसीनचे आहे. गेल्या दहाबारा वर्षात या औषधाने मलेरिया इतका कमी केलाय की भारतात तर जवळजवळ दिसेनासा झालाय. (कार्ड टेस्ट्स फॉल्स पॉझिटीव्ह येतात ते सोडा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे आवडते उदाहरण मलेरियावरच्या अर्टेस्युनेट या चायनीज हर्बल मेडीसीनचे आहे.

ह्या साठी च मला वाटते त्या चायनिज डॉक्टर ला नोबेल का कुठले तरी मोठे पारीतोषिक मिळाले ना?

त्यानी सिस्टीमॅटीकली, शास्त्रीय दॄष्ट्या ते मेडीसिन प्रुव्ह केले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हो. त्यांचे नाव तू यू यू (Tu Youyou) आहे.
त्यांना २०१५ चे मेडिसीन्/फिजिऑलॉजीचे नोबेल मिळाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरेच आशादायक चित्र आहे तर एकूण.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आयुर्वेदाविषयीच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आयुर्वेदाविषयीच्या काही आक्षेपांवर उत्तरे मिळू शकतील असा विश्वास वाटल्याने विचारतो..
जसं विरलीकरण हे होमिओपथीमधील वादग्रस्त तत्व, तशाच आयुर्वेदातील या २ गोष्टी.. मिपावर काही धाग्यांवर हे विचारलं होतं पण तिथे वावरणार्‍या आयुर्वेदीक डॉ/तज्ञांनी त्याकडे दुर्लक्ष केलं म्हणा कींवा समाधानकारक उत्तरं देण्यात अयशस्वी ठरले.
१. खाद्यपदार्थांचे उष्ण्/थंड असे केलेले वर्गीकरण. यात तिखट नेहेमीच उष्ण असतं असं नव्हे आणि पपइ/ कलिंगडदेखिल उष्ण ठरवलं जातं. तापमान या गुणधर्मानुसार उष्ण्/थंड जसं समजू शकतो तसं पदार्थाची प्रकृती कशी डीफाइन करता येइल की ज्यामुळे असंअसं होतं ते उष्ण असं सांगता येइल. उदाहरण देउन उलट स्पष्टीकरण अपेक्षित नाही इथे.
२. सर्व विकारांचे कफ/वात/पित्त या तीन प्रकारत केलेले वर्गीकरण. त्यामुळे बर्‍याचशा रोगांवर इलाज म्हणून शुद्धी/कोठा साफ करणे यासारखे उपाय. याला कितपत शास्त्रीय आधार आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा आयुर्वेदाचा अभ्यास नसल्याने उष्ण /थंड वर्गीकरण नीटसे माहित नाही.
इतरत्र जे स्पष्टीकरण वाचले आहे ते पटलेले नाही.

वात/कफ/पित्त अश्या प्रकृतींत त्यावेळी माहित असलेल्या लक्षणांनुसार माणसांचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न त्यावेळच्या आरोग्य अभ्यासूंनी केला असणार.
पण असे काही आधुनिक वैद्यकाच्या निकषात खरे असेलच असे नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

साती तै - उत्तम प्रतिसाद

फक्त

यात पूर्वीचे नकाशे बनवुणारे फ्रॉड होते असेही नाही,

पुर्वीचे नकाशे बनवणारे फ्रॉड नक्कीच नव्हते, पण आता नवे नकाशे तयार होऊन सुद्धा, पूर्वीचेच नकाशे बरोबर होते असे सांगणारे फ्रॉड नक्कीच आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजूनही जुने नकाशे वापरून बर्‍याच जागांवर पोहोचता येतंय.

आता नकाशाच्या संदर्भात होमिओपथीचे उदाहरण द्यायचे म्हटले तर होमिओपथीवाल्यांनी जुन्या नकाशानंतर आधुनिक नॅविगेशनच्या एका टप्प्यात एक भूयार शोधून काढलं.
कुठूनही कुठेही जायचं असल्यास या भूयाराच्या आत जायचं आणि त्या भूयाराचं 'स्पिरीट' तुम्हाला योग्य त्या जागी पोहोचवेल असं मानायचं.
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसं नाही.

नव्या नकाशात दोन तीन ठिकाणं आलेलीच नाहीत. ती आमच्या कच्च्या नकाशात आहेत असं म्हणणं असतं त्यांचं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

साती म्याडमचा प्रतिसाद अतिउत्तम आहे. चान चान पेक्षा तरी नक्कीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

+२

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रतिसाद आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

औषध आणि फूड सप्लिमेंट यात नक्की फरक काय असतो? व्याधी/विकार बरं करणारं किंवा त्यांच्या लक्षणांपासून आराम देणारं ते औषध आणि महत्त्वपूर्ण घटकांची कमतरता भरून काढणारी ती सप्लिमेंट्स. हे बरोबर आहे का?

---

सातीच्या प्रतिसादांतून असं वाटतं की जगातली दुःख वैद्यकीय तंत्रज्ञानाने बरीच कमी केलेली आहेत. व्याधी आणि विकार बरे करतात त्यामुळे दुःख कमी झालेली आहेत हे सहज समजण्यासारखं आहे. पण औषधं कशी बनवतात यामुळेही दुःख कमी झालेली आहेत. पपईची पानं खायची म्हटली तर माझ्या पोटात गोळा येईल. त्यापेक्षा तंत्रज्ञान वापरून त्याची एक गोळी करून दिली तर मी आनंदाने गोळी गिळून टाकेन. एकेकाळी एरंडेल प्यायला लावायचे. आता पोट साफ होण्यासाठी चटपटीत गोळ्या किंवा फायबर्सचे गोडमिट्ट द्राव मिळतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

याचं उत्तर खूप कीचकट आहे.
अमेरिकेत एफ डी ए हे या सगळ्यांबद्दल कडेकोट कायदे बनविते.
ड्रग म्हणजे अशी वस्तू जी एखाद्या आजाराला बरे करण्यास किंवा निदान करण्यात मदत करते. एखादी वस्तू ड्रग म्हणून विकण्यासाठी अ‍ॅनिमल स्ट्डी , अनेक फेजेसमधल्या ट्रायल्स आणि त्या ट्रायल्सनंतरही अ‍ॅडवर्स इफेक्ट्स नाहीत ना हे पहाण्याच्या ट्रायल्स असतात. त्यानंतर एफ डी ए ने मान्यता दिल्यावरच तो पदार्थ औषध म्हणून विकता येतो.

एखाद्या गोष्टीला फूड सप्लिमेंट म्हणून विकायचे असेल तर मूळात अश्या सगळ्या ट्रायल्स असायची गरज नाही. काही गोष्टी म्हणजे स्वच्छता, सुरक्षितता पाळाव्या लागतात. हे सप्लिमेंट त्या सप्लिमेंटने केलेले दावे पूर्ण करणारे आहे असे काही स्ट्डीज दाखवावे लागतात. तसेच वेळोवेळी एफ डी ए ने घातलेले निर्बंध पाळावे लागतात. हे फूड सप्लिमेंट्स तोंडाने / फीडींग ट्यूबने घेण्यासाठीच असतात. इंजेक्शने/आय व्ही नसतात.
हे सप्लिमेंटस 'फूड' असून चालत नाही. म्हणजे उद्या मी त्या खपली गव्हातलं अमूक एक एंझाईम सेपरेट करून 'फूड सप्लिमेंट ' म्हणून विकू शकते. पण खपली गव्हाच्या पिशव्या 'फूड' म्हणून विकाव्या लागतील, सप्लिमेंट म्हणून नाही.

(भारतातले अन्न आणि औषध प्रशासन अमेरिकेचं कॉपीपेस्ट आहे बर्‍याच बाबतीत त्यामुळे वेगळं लिहायची गरज नाही. युरोपियन देशांत काय आहे ते नक्की माहित नाही.)

औषधांच्या स्वरूपात म्हणजे गोळ्या /टॉनिक अश्या स्वरूपात दिसणार्‍या ज्या प्रॉडक्टसवर हिरवा/लाल गोळा (व्हेज सोर्स्/नॉन व्हेज सोर्स)आहे ते औषध नसून फुड सप्लिमेंट आहे हे भारताततरी ओळखायला सोप्पं आणि नक्की !

तसेच भारतात त्यावर 'यूसेज : अ‍ॅज ए डाएटरी सप्लिमेंट
असे स्पष्ट लिहीलेले असते.
आणि एक एफ एस एस ए आय ने दिलेला क्रमांक असतो. ( फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही प्रतिसाद अतिशय आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चर्चाविषय वाचून धाग्याकडे दुर्लक्षच केले होते. पण प्रतिसादसंख्याबघून आज डोकावलो आणि साती यांच्या प्रतिसादांमुळे डोकावण्याचं चीज झालं
दोन्ही प्रतिसाद उत्तम!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!