प्रेम म्हणजे नक्की काय असतं ???

दररोज पेपरात प्रेमभंगातून नैराश्य आल्याने अथवा विरुद्धलिंगी व्यक्तीने योग्य प्रतिसाद न दिल्याने अथवा आपल्या प्रेमास समाजाने /कुटुंबाने मान्यता न दिल्याने आत्मघात केल्याच्या बातम्या येत असतात ....

आम्ही स्वत: प्रेमात तसे अपयशीच , आमची व्यथा इथे पहा ... http://www.misalpav.com/node/27748
तर प्रेम म्हणजे नक्की काय असते ? या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केयास अनेक उत्तरे समोर आली ...
विकीबाबा म्हणतात... Love is a variety of different feelings, states, and attitudes that ranges from interpersonal affection to pleasure It can refer to an emotion of a strong attraction and personal attachment.[1] It can also be a virtue representing human kindness, compassion, and affection—"the unselfish loyal and benevolent concern for the good of another".[2] It may also describe compassionate and affectionate actions towards other humans, one's self or animals.[3]

पण थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून विचार केल्यास प्रेम भावना ही विशिष्ट वयात ( पौगंडावस्था ते युवा -तरुण अवस्था ) पुनरुत्पादन /प्रजोत्पादना साठी निसर्गात:मानवी मेंदुमध्ये जे हार्मोनिक बदल होतात त्यास भिन्नलिंगी आकर्षक व्यक्ति दिसल्यानंतर मेंदूने दिलेले प्रतिसाद व त्याचे अभिव्यक्तीकरण असे असावे असे वाटते ... प्रेमात माणसे खरोखर वेडी होतात ,आंधळी देखील होतात याचा अनुभव मला स्वत:ला तर आलाच ,पण इतर अनेकांमध्येही तशी लक्षणे कॉमन आढळली ....

आपणास काय वाटते ? प्रेम म्हणजे नक्की काय असतं ???

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

हल्लीची परिस्थितीबद्दल म्हणत असाल तर प्रेम म्हणजे फक्त आणि फक्त अट्रॅक्शन असतं,बाकि काही नाही.
लवबर्ड्स पळून जातात आणि ज्या हेतूसाठी पळून जातात तो हेतू पार पडला कि झालं,मग संसारात ठिणग्या उडायला लागतात.
प्रेम वरवरचं असतं,एकदा कि त्या व्यक्तीच्या संपर्कात सतत 24 तास राहिलं कि गुणदोष समजायला लागतात आणि मग नको वाटतं.म्हणजे "दुरून डोंगर साजरे".
लवमॅरेज झालेले,पळून गेलेले,इत्यादींच्या घरामध्ये राजरोस हाणामारी पाहिलेली आहे.
ह्या गोष्टी आसपास घडत आहेच,म्हणून सांगतोय.
{काहीजण अपवाद असू शकतात}
.
.
अरेंज मॅरेज वाला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात माणसाच्या जाती दोनच,नर आणि मादी