Skip to main content

kiss (चुंबन)

प्रेम व्यक्त करायला पहिला kiss गरजेचाच असतो मग ती बायको असो वा मैत्रीण, प्रत्येकाच्या "ती" च्या पहिल्या kiss वर काही ....

सहज जाता जाता
kiss देऊन जातेस
रोज एक आठवण
add करून जातेस...

गालावर अोठ टेकवण
तुझ्यासाठी सोपं असतं
स्नानावेळी तोच गाल कोरडा ठेवण
माझ्यासाठी अवघड असतं

जवळ घेतेस अोढून
अन् बर्न होतात कॅलरीज
श्वासांची नुसती चढाओढ
अन् अोठांची बेरीज

मी पोटॅशिअम आयोडाइड(ki)
आणि तू दोन सल्फर(ss)
पृथ्वी उलटी फिरते
अाणि जग होतं धुसर....

अोठातुन गुलाब शिंपडताना तुला
काहीच कसं वाटत नाही
इतक नाजूक या धरतीवर
मोरपिस सुद्धा सापडत नाही ...

सदाफुलीच तुटणं
हेच तिच काम आहे
मी तुझ्या अोठांचा
एक अमर शिकार आहे......

!निनाद!

बिटकॉइनजी बाळा Thu, 17/03/2016 - 07:49

दिवसाची सुरुवात एकदम फ्रेश झाली. वाजवा रे वाजवा!

तिरशिंगराव Fri, 18/03/2016 - 10:21

केमिस्ट्री जुळायची असेल तर
मी दोन हायड्रोजन
तू एक सल्फर
असें म्हणून पहावे. लगेच हायड्रोजन सल्फाईडचा वास सुटेल.

तिरशिंगराव Fri, 01/04/2016 - 10:57

गरवारे ला असतो, तर एम.सी. आलीच नसती,

एक होता गणू Tue, 30/08/2016 - 20:05

सदाफुलीच तुटणं
हेच तिच काम आहे
मी तुझ्या अोठांचा
एक अमर शिकार आहे......
....।।।
...।।

.शुचि. Tue, 30/08/2016 - 20:13

ओठांचे चुंबन छान असणे ही फक्त कविकल्पना आहे किंवा अ‍ॅट बेस्ट ओव्हररेटेड आहे - असे माझे मत आहे. हां अन्य गालाचे वगैरे छान असेल पण ....
शिवाय हे कुणाला विचारता पण येत नाही की बाबा खरच आवडण्यायोग्य प्रकार आहे की ढोंग असते :(

पिवळा डांबिस Wed, 31/08/2016 - 00:03

In reply to by .शुचि.

अन्य गालाचे वगैरे छान असेल पण ....

सामान्यतः ज्याला गाल म्हणतात (जे चेहर्‍यावर असतात) त्याचे चुंबन छान असते.
पण अन्य गालाचे म्हणजे? लेखिकेला आणखी कोणते कोणते गाल अपेक्षित आहेत?
शुचि, प्लीज एलॅबोरेट!
;)

.शुचि. Wed, 31/08/2016 - 00:06

In reply to by पिवळा डांबिस

अन्य म्हणजे दंड वगैरे. =))

साती Wed, 31/08/2016 - 00:06

In reply to by पिवळा डांबिस

भारतात तरी रात्र चढत चालली आहे.
'अन्य' गाल हा प्रकार सज्जन लोकांनी यावेळी डिस्कस करण्यासारखा नाही.

अर्थात, कुठल्याही रंगाच्या 'डांबिस' लोकांना हे लागू नाही म्हणा!
;)

पिवळा डांबिस Wed, 31/08/2016 - 00:21

In reply to by साती

'अन्य' गाल हा प्रकार सज्जन लोकांनी यावेळी डिस्कस करण्यासारखा नाही.

अर्थात, कुठल्याही रंगाच्या 'डांबिस' लोकांना हे लागू नाही म्हणा!

तुम्हां मेडिकलच्या लोकांना सग्गळे गाल सारखे, असं ऐकून आहे.
पण आम्ही इथे वही-पेणसिल घेऊन नोट्स काढतोय शुचिच्या लेक्चरच्या!!
ज्ञानार्जन केल्याविना आमची प्रगती होणार कशी?
:)

.शुचि. Wed, 31/08/2016 - 00:28

In reply to by पिवळा डांबिस

हां नोटस नीट घेणे नाहीतर छडी बसेल .... हातावर. हो आधीच स्पष्ट करते कारण इथे वेगळ्याच गालांचा विषय चाल्लाय म्हणुन ;) =)) =))
.
डिड आय रियली से दॅट? ;) नो वे!!१ मी फार बिघडले ऐसीवर येऊन. ;)

राजेश घासकडवी Wed, 31/08/2016 - 01:18

In reply to by साती

'अन्य' गाल हा प्रकार सज्जन लोकांनी यावेळी डिस्कस करण्यासारखा नाही.

सज्जन लोकांनीच काय घोडं मारलंय? सगळी मजा दुर्जनांनीच का घ्यावी?

कदाचित तुम्हाला 'या चढत्या रात्रीच्या वेळी नुसताच डिस्कस काय करायचा?' असं म्हणायचं असेल तर ठीक आहे.

'न'वी बाजू Wed, 31/08/2016 - 03:00

In reply to by पिवळा डांबिस

...त्यांना 'बटांचा कीस' अभिप्रेत असावा काय?

मारवा Wed, 31/08/2016 - 11:34

In reply to by 'न'वी बाजू

...त्यांना 'बटांचा कीस' अभिप्रेत असावा काय?

नबांच्या या कलाटणीने माझा मराठी कवितांवर पोसलेला सुकुमार पिंड अंमळ गोंधळुन गेलेला आहे.
आम्हास बटांचा एकच मधुबालीय अर्थ माहीत आहे. एकच शेळकीय अविष्कार माहीत आहे.
ही चाल तुरुतुरु उडती केस भुरुभुरु
डाव्या डोळ्यावर बट ढळली
जशी मावळत्या उन्हात केवड्याच्या बनात
नागीण सळसळली !
आमच्या माहीतीप्रमाणे बट ढळते वा भुरुभुरु उडते
आता दोन "बाटा" हाणा पण आपला म्हणा
पण हा कसला अघोरीपणा आहे मी जेव्हा जेव्हा नबांच्या प्रतिसादाला सामोरा जातो
तेव्हा तेव्हा माझ्यातला एखादा तरी कोवळा अंकुर जळुन जातो.
या न्यायाने म्हणाव तर नबांचे प्रतिसाद अगदी काव्यकोमल विषयावरही
"ज्वलंत" उग्र आदिम असतात
धन्यवाद

.शुचि. Wed, 31/08/2016 - 11:43

In reply to by मारवा

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा.
आता असल्या मोठ्या बटा उधळायला किती महाप्रचंड मुजोर वारा लागत असेल.

मारवा Wed, 31/08/2016 - 12:17

In reply to by .शुचि.

माफ करा तुम्ही कवितेचा अर्थ लावण्यात चुकत आहात
हा वारा साधा नेहमीचा नाही लक्षात घ्या हा "मुजोर" वारा आहे
"घोडा" किती वारं प्यायलेला आहे यावर बटांचे उधळणे वा कोसळणे वा तराहणे अवलंबुन आहे

मारवा Wed, 31/08/2016 - 18:25

In reply to by राजेश घासकडवी

धागा उत्सुकतेने वाचला
बटबटीत वाटला.

(घासकडवींना भिऊन इकडे तिकडे पळतोय मला वाटल ते मिपावर आहेत म्हणुन
इकडे आलेलो पण ते लॉगिन दिसताय भाग मिल्खा भाग )

रेड बुल Wed, 31/08/2016 - 11:49

In reply to by .शुचि.

ओठांचे चुंबन छान असणे ही फक्त कविकल्पना आह

चुक. ओठांचे चुंबन दाताने घेणारे अथवा त्याचे तन्त्र अवगत नसणारे असे मानु शकतील.
खरे तर सर्वात जास्त उब जिव्हाळा प्रेम अन कलरि लोस फक्त ओठांच्या चुंबनातुन मिळतो. दुर्दैवाने बरेच भारतीय पुरुष (अन अर्थातच स्त्रिया)यात कौशल्यहिन आहेत वेड्या सारखे आपले ओठ समोरील व्यक्तिच्या ओठाच्या वर ओठ ओलसरपणे स्पर्शत ठेवण म्हणजे ओठानी चुंबन घेण्ने असा त्यांचा गोड(?) गैरसमज असतो... खरे तर ओठानी करायची क्रिया जरा वेगळी आहे अन यात एंट्री एक्स्गीट चे टायमिंग अन जिभेचा वापर विशिष्ट कौशल्याने केल्यासच त्याची लज्जत उमजू लागते अदरवाइज आल गोज मेकेनिकल अन बोरिंग.

जालावर यासाठी नक्कीच बरेच दुव्वे उपलब्ध असावेत ? अधिक मार्गदर्शन मी करू शकत नाही क्षमस्व_/\_

अबापट Wed, 31/08/2016 - 17:25

In reply to by रेड बुल

सहमत . फक्त तुमच्या सारखे तांत्रिक भाषेत विशद करून सांगण्याच्या कौशल्य माझ्याकडे नसल्यामुळे. गप्प बसलो. मूळ गैरसमज वाल्याना एकच म्हणावेसे वाटते कि ' तू ने पी ही नहीं ......'

.शुचि. Wed, 31/08/2016 - 18:33

In reply to by रेड बुल

अति इन्हिबिशन्स, अरेंज्ड लग्ने, तडजोडीस प्राधान्य, एकत्र कुटुंब, व्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच - त्यामुळे मॅजिक हरवलेले असते किंवा अनेकानेकांना ते कधीही सापडत नाही यास मान्यता.

साती Wed, 31/08/2016 - 21:23

In reply to by .शुचि.

'आम्हाला इतका धाक होता घरच्यांचा की दोन मुले झाली तरी एकमेकांशी एक शब्दही बोललो नव्हतो हो!'
हा कुठल्याश्या सिनेमातला की नाटकातला संवाद आठवला.
त्यावरून आमचे एक सर ' पढो बेटा पढो, नहीं तो पास हो जाओगे' असे कळकळीने (अभ्यासाबाबत) सांगायचे ते आठवले.
:)

.शुचि. Wed, 31/08/2016 - 21:31

In reply to by साती

ऑफ कोर्स सगळी जबाबदारी समाजपद्धतीवर, कुटुंबव्यवस्थेवर टाळून चालणार नाही. ज्याचा त्याचा स्वभावही कारणीभूत असतो. मी ज्योतिषात रस घ्यायचे एक कारण हेदेखील आहे की खरच कंपॅटिबिलिटी मॅटर करते का? तर हो पण ती कुंडलीतून कळते का? माहीत नाही.

साती Wed, 31/08/2016 - 10:45

लिप कीस कधीच ट्राय न करण्याचे कारण 'शूचि' तेच्या अवास्तव कल्पना , हे असावं काय?

तिरशिंगराव Wed, 31/08/2016 - 18:16

In reply to by साती

या विषयावर व्हाट्स अप वरची पोस्ट.
एका पुणेरी मुलीने तीन मिनिटे दीर्घ चुंबन घेतल्यावर ती दमली.
तिने त्याच्याकडे पाणी मागितले.
त्यानेही तत्परतेने सॅकमधली बिसलेरी काढून दिली.
पाणी पिण्याआधी ती म्हणाली, ए, उष्टी नाहीये ना बाटली ?
ह्याला म्हणतात संस्कार!

बाळ सप्रे Thu, 01/09/2016 - 17:06

In reply to by तिरशिंगराव

पाणी पिण्याआधी ती म्हणाली, ए, उष्टी नाहीये ना बाटली ?

याच्यापुढे आणखी एक वाक्य आहे..

आज संकष्टी आहे नं.. म्हणून
:-)