पंजाब आणि समस्या

रणजीतसिंघ आणि ब्रिटीशपुर्व काळात बिचार्‍यांनी वर्षानुवर्षे अफगाणी आक्रमणांना तोंड दिले हे खरे- पण रणजितसिंगापासूनच्या काळानंतर किमान अफगाणी आक्रमणे कमी झाली आहेत. फाळणी पंजाबने स्वतःवर ओढवून घेतलेले बाकी देशावरही लादले गेलेले दु:ख होते पण काळ थांबत नाही तो पुढे सरकतो. पंजाब बाकी तसा पाच नद्यांनी समृद्ध प्रदेश, स्वातंत्र्योत्तर हरीत क्रांतीच्या काळात भरभराटीस आला.

याच प्रदेशात गुरुनानक देवांनी शीख धर्म/पंथाची स्थापना केली. गुरु नानकांचा एक प्रयास लोकांना अंधश्रद्धांपासून दूर नेणे असाही असावा. सर्व साधारणपणे एका लोकशाही देशात अंधश्रद्धांचा अभाव असणे अभिप्रेत असलेल्या लोकांना खरेतर आपल्या भाषेसाठी स्वतंत्र लिपी बाळगून ठेवणे, धर्माधारीत राजकीय पक्ष असणे धर्माधारीत राजकारण करणे यांची जरुरी का भासावी हे व्यक्तिशः मला अनाकलनीय भासत आलेले आहे. १९८० च्या दशकात आनंदपूर साहीब ठरावावरुन अशांतता माजवली गेली त्या ठरावातील बहुतांश मागण्या धर्म संबंधीत नव्हे तर राजकीय आणि आर्थीक वगैरे असाव्यात ज्याचा धर्म विषयक बाबींशी सरळ संबंध असण्याचे कारण नव्हते, तरीही त्या मागण्यांच्या मागे धर्माधारीत राजकारण नेऊन उपस्थित केले गेले. जशी तशी शांतता वापस आली पण कोणत्या न कोणत्या टाळण्याजोग्या समस्यांच्या मागे इथले का पडलेले असतात हे समजणे अवघड जाते. स्मगलींग ड्रग इत्यादी गोष्टी फोफावल्याचे ऐकण्यात येते खरे खोटे देव जाणे. हरयाणा या शेजारच्या राज्याशी कशा न कशावरुन खास करुन पाण्यावरुन सदैव बिनसलेले असते. हरियाणा आणि दिल्लीतही शीख समाज आहे त्यांनाही पाणि लागत असेल की. राजस्थानला पाणि नाही दिले आणि तिथले वाळवंट अजून पुढे पसरले तर पंजाबाचाही वाळवंट होऊ शकेल असे होऊ नये म्हणून पंजाबला पाणी देताना आनंदाने द्यावयास हवे. लंगर मध्ये भाजी भाकरी वाटून खाता येते पाणि देता येते मग तिच संस्कृती मोठ्या मनाने इतरत्र जपण्यात काचकूच का होत असावी ?

गुरुद्वार्‍यांच्या प्रबंधनाच्या निवडणूकातून सहजदारींना वगळण्याचा आग्रह लावून धरला. सहजधारींच्या व्याख्यांविषयी गोंधळ आहे बेसिकली धार्मीक बाबतीत अधिक इम्फॉर्मल म्हणजे सहजधारी असावेत आणि त्यांच्या व्याख्येत बसतील अशांची संख्या पाच पंचविसापुढे नसावी तरीही सहजधारींना गुरुद्वारा प्रबंधनातून दूर करण्याचा हट्ट पुरवून घेतला जात आहे. हे ठिक. पंजाबात मागच्या काही काळात कुणितरी ग्रंथ साहीबचा अपमान केला म्हणून त्यावरुन वातावरण तापले. गुरुग्रंथसाहीबचा अपमान करण्यासारखे त्या ग्रंथात काहीही नसावे पण तरीही वातावरण तापवले जाते. ब्रिटीशांच्या काळापासून आतापर्यंत विशीष्ट ब्लास्फेमी लॉ शिवाय सुद्धा धार्मीक भावना दुखवणार्‍यांवर पिनलकोडच्या माध्यमातून कारवाई होतच होती. पंजाब विधान सभेने नुकताच विशेष ब्लास्फेमी प्रिव्हेंशन कायदा मंजून केल्याचे ऐकण्यात आहे.

पंजाबमधला शीख समुदाय का काय ते ठिक पण कॅनडात स्थलांतरीत झालेल्यांना पंजाबातल्या नकारात्मक राजकारणाचे
एवढे का पडलेले असावे. बाहेरच्या देशात राहून तरी अंधश्रद्धा कमी रहावयास हव्यात. बाकी परंपरा अंधश्रद्धा ठिक, पण शाळेसारख्या जागी मुलांच्या सोबत कृपाण असलेच पाहीजे का ? कॅनडात त्यांच्यावर पुर्वी रेशिअल अन्याय झाले हे खरे त्याची भरपाई म्हणून कॅनडाच्या मंत्रिमडळात शिखांना भरपूर प्रतिनिधीत्व देणे स्तुत्य आहे पण कॅनडातील शाळात मुलांसोबत खरे खुरे शस्त्र असू देण्याचा आग्रह लावून धरणार्‍यांनी धरणे आणि अनुनय करणार्‍यांनी मानणे कसे समर्थनीय ठरते याचे आकलन होत नाही.

अफगाणिस्तान असो की आमेरीका तिथल्या पेक्षा भारतात शिख समुदायाकडे बरेच आदरपुर्वक पाहीले जाते. इतरही समुदाय अंधश्रद्धादी गोष्टी बाळगतात मनाच्या संकुचितता बाळगतात म्हणून शिख समाजानेही इतर धर्मीयांच्या तेवढ्या स्तुत्य नसलेल्या बाबींचे अनुकरण करण्या पेक्षा पुरोगामीत्वाचा अवलंब का करु नये. त्यांच्यातही काही पुरोगामी चळवळी असल्यास कल्पना नाही. एकुण पंजाबी समस्यांचे घोंगडे भिजत का रहाते ? समस्या कुठे पेंड खातात ते याचे कोडे उलगडणे अवघड जाते. ऐसि वरच्या बहुश्रूत मंडळींकडून या विषयावरच्या चर्चेतूनही काही माहिती मिळेल असे वाटते.

माझ्या लेखनात काही तथ्यांमध्ये दुरुस्ती करण्या लायक त्रुटी असतील तर दाखवून देणे. चुभूदेघे.

*चर्चा सहभागासाठी अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळण्यासाठी धन्यवाद
* माझ्या या धागा लेखाचा आणि चर्चेचा माझ्या विकिपीडियातील रोलशी काहीही संबंध नाही हे लक्षात घ्यावे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)