अपहरण झालं तर ---(तुटक विचार)

***************************लेखाचे फॉर्म्याटिंग सुधारले आहे****************************************
परवी नीरजा भानोत प्रकरनावर आधारित सिनेमा पाहिला.
डोक्यात हायजॅक प्रकरणाबद्दल किंवा एकूणच अपहरण प्रकरणाबद्दल विचारचक्र सुरु झालं.
.
.
एखादं अपहरण होतं तेव्हा त्यात बरेच घटक सामील असतात; ज्याची त्याची उद्दीष्टं आणि ध्येयं वेगळी असतात.ह्या सगाळ्यांमध्ये एक अप्रत्यक्ष मांडवली वाटाघाटी, देवाण-घेवाण क्षणोक्षणी सुरु असते. ज्याची त्याची स्ट्रॅटेजी वेगळी असते.
समजा --
तुम्ही विमानातून जात आहात. आणि एखाद्या मधल्या एअरपोर्टवर तुमचं विमान हायजॅक झालं तर ? तुमची पहिली प्रतिक्रिया काय असावी ? सुरुवातीस शॉक बसला असेल तरी भानावर आल्यावर पहिली गोष्ट काय असते, असावी ? अपहरणकर्त्यांच्या संख्येनं तुम्हाला फरक पडावा का ? म्हणजे समजा तो एकच आहे. त्यानं हवेत एक गोळी उडवून किंवा साधं पिस्तुल नाचवत हायजॅक केल्याचं सांगितलय. तो आता तुमच्यापासून हातभर अंतरावर आलाय आणि त्याचं लक्ष अजून कुठे दुसरीकडेच आहे.
तुम्ही काही झटापट करण्याचा , त्याच्यावर झेप घेण्याचा अदमास घ्यावा काय ? की ते मिसअ‍ॅडव्हेंचर/ दु:साहस ठरु शकतं ? समजा अपहरण करणारी व्यक्ती एक नाही, दोघं तिघं आहेत; आता तुम्ही त्यातल्या एखाद्याचं पिस्तुल हिसकावून घ्यायचा विचार कराल, तो जवळ असल्यावर ? किंवा समजा त्यांच्याकडे पिस्तुलाऐवजी इतर काही भन्नाट शस्त्रात्रं आहेत; एके ४७ वगैरे म्हणतात तसलं काही. शिवाय अंगाला काहीतरी बाँब वगैरे बांधून घेतल्याची शंका तुम्हाला येते आहे. मग? कराल धाडस ? ? बेस्ट सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजी, बचावाचा उत्तम मार्ग काय असू शकतो ? स्वस्थ, शांत बसणं, त्याला फारसा विरोध न करणं , जे होतय ते होउ देणं ? कारण अंतिमतः तुमच्या सुटकेची जिम्मेदारी तुमच्या देशाच्या सरकारची आहे. ते नेमकं काय करताहेत ह्याची खबरबात तुमच्यापर्यंत पोचत नसली, तरी ते काहीतरी करत असण्याची शक्यता बरीच आहे. कारण तुमच्या जिवाची किंमत असणार आहे, म्हणूनच तुम्ही हायजॅकर्सच्या रडारवर असलेल्या ग्रुपमध्ये -- त्या विमानात किंवा त्या विशिष्ट ठिकाणी आहात. ज्याच्या जीवाची किंमत करावी अशापैकी तुम्ही असल्याची शक्यता वाटल्यानच तुमचं अपहरण झालेलं आहे.
शिवाय तुमचा जीव घेणं हे त्याचं आत्ता तरी उद्दीष्ट नाही. तुम्ही त्याला को-ऑपरेट केलत, सहकार्य दिलत (म्हणजेच काहीच न करता स्वस्थ राहिलात ) तर तुमच्या मरण्याची शक्यता बर्रीच कमी आहे. कारण तुम्हाला म्हणजे पॅसेंजर्सना मारुन टाकलं तर त्याची बार्गेनिंग पावर कमी होणारे. तो जितक्या जास्त लोकांना मारेल, तितकी त्याच्या मागण्या मान्य होण्याची शक्यता कमी. उदा -- समजा तुम्ही लहानशा विमानातून जात आहात. अगदि पाच पन्नास लोकंही त्यात नाहित. आणि त्यातले फार मोठ्या संख्येनं लोकं काही कारणानं ह्या झटापटित ('हातापाई'मध्ये) मारले गेले; तर सरकार विचार करु शकते की -- "तसेही ह्यांनी इतके लोक मारलेत; आणि आमचं नाव वाचवू न शकल्याबद्दल खराब झालेलच आहे; एकदाचे ह्या हरामखोरांना मारुनच टाकुया. " हे असं होउ नये; म्हनून एकूणात जीवित हानी कमीत कमी ठेवण्याचा,
म्हंजे प्रत्यक्ष हानीची तलवार टांगत ठेवायचा हायजेकर्सचा प्रयत्न असणार. पण एखादे वेळेस आपल्याला सिरियसली घ्यावं, वेळ पडल्यास आपण हत्याही करु शकतो हे दाखवायला एखाद्याची हत्या करण्याची मात्र शक्यता असते. अर्थात समोरची मंडळी प्रत्यक्षात वाटाघाटी न करता, मागण्यांवर विचार न करता नुसतीच टंगळमंगळ करताहेत, वेळ काढताहेत; असं वाटल्यास हे होण्याची शक्यता जास्त. म्हणजे ते एखाद्याला मारतीलही. पण उरलेले नव्व्याण्णव किंवा एकशे नव्व्याण्णव जीवांना आम्ही अजूनही सोडून देउ शकतो, हे दाखवत वाटाघाटीचा मार्ग सुरु ठेवू शकतात. तर तुमच्या मरण्याचे चान्सेस हे असे दोनशेपैकी एक किंवा शंभरात एक असे असण्याचे चान्स आहेत. तुम्ही फक्त त्याचे "स्पेशल अटेन्शन " ओढावून घ्यायला नको. स्पेशल अटेन्शन ओढवून घेतलत तर तुमचे वाचण्याचे चान्सेस एकदम वाढू किंवा कमीही होउ शकतात.
आत्ता ह्याक्षणी तुमच्याकडे काहीही माहिती नाहिये. समोरचे लोक कोण आहेत; त्यांच्या मागण्या काय आहेत; ते माहित नाही. त्यामुळे स्पेशल अटेन्शन ओढवून न घेणे जास्त व्यावहारिक. स्थिर , स्वस्थ शांत बसू शकलात तर अधिकच उत्तम. स्वतःची जिम्दगी अगदिच "कॅज्युअल" घेता आल्यास अजूनच बरं.
किंवा निदान कॅज्युअल घेणार्‍या व्यक्तीची जी काही मनःस्थिती असते; साधारण तशाच मनःस्थितीत असलात तर परिस्थिती हाताळणं अधिक सोपं ठरेल तुम्हालाच. तुम्हाला अनुकूल असा अंतिम निकाल लागू शकेल. किंवा साध्या भाषेत सांगायचं तर डोकं शांत ठेवता आलं तर बरं.
.
.
पण हे लिहिणं सोपं; करणं अवघड. एकदा शांत स्वस्थ मन्;स्थितीत असलात म्हणजे....
.
.

मग तुम्ही मानसिकदृष्ट्या एक पायरी वरचढ असणार समोरच्या बंदूकवाल्यापेक्षा. गौतम बुद्ध आणि "डाकू अंगुलीमाल"ची कथा आठवतिये ? एक नि:शस्त्र , स्वस्थचित्त मुनी स्वतःहून एका शस्त्रधारी, रागीट पण मनातून चिंतित व भयभीत अशा राकट खुन्याच्या- सिरियल किलरच्या समोर जाउन उभा आहे. एक अगदिच विषम , असमान सामना. एकाकडे शस्त्र नाहिये, दुसर्‍याला शस्त्राची गरज वाटत नाहिये. "गरज" नाहिये , कारण "स्वतःचा जीव वाचलाच पाहिजे" असं त्याचं उद्दीष्ट नाही. त्याला जीवाचा "मोह" नाही. डाकूच्या मनात तो "मोह" आहे. ह्याच्याकडे मोह नाही. त्याच्याकडे शस्त्र आहे. ह्याच्याकडे नाही. किंवा कदाचित डाकूकडे मोह नसेलही; पण भय आहे मनात. गौतमाच्या मनात मात्र भयही नाहीच.
.
.
.
हायजॅक करणारे फार तर पाच सातच असतील; एकूण प्रवाशी किंवा कैदेतल्या/ताब्यातल्या लोकांपेक्षा हे संख्येनं बरेच कमी आहेत. फार कमी आहेत. मग हे दोन-चार लोक मिळून दोनेकशे लोकांना हुकूम कसे सोडताहेत ? दोनेकशे लोकांनी काय करायचं काय नाही; हे असं दोन-चार लोकं कसं काय ठरवू शकताहेत ? ह्यांच्याकडे शस्त्र नसतं तर ते हे करु शकले असते का ? म्हंजे फक्त शस्त्रानं फार मोठा फरक पडलाय. आणी शस्त्रसुद्धा साधं नाही; अत्याधुनिक हवं. त्याच्याकडे पाच-सात गोळ्याच असणारं लहानसं पिस्तुल असेल; आणि प्रवाश्यांमध्ये गोळ्यांच्या संख्येइतकेच धाडसी लोक असले; पाच सात, म्हणजे लश्करी किम्वा तत्सम ट्रेनिंग घेतलेले कधी काळी, तर बाजी पलटू शकते. आणि त्या हायकजॅर्सचं अ‍ॅडव्हांटेज कितीवेळ पुरणार आहे ? थोडं जरी दुर्लक्ष झालं तर कैतरी विपरित घडण्याची आतून किंवा बाहेरुन हल्ला होण्याची त्यांना सतत भिती असणार. शिवाय जितका वेळ अधिकाधिक जात राहिल, तितका शस्त्रधार्‍यांचा धीर सुटत जाणार. अ‍ॅडाव्हांटेज कमी होत जाणार. का कमी होणार; असं विचारताय ? सांगतो --
त्यांना शस्त्र घेउन सतत सावध्/अ‍ॅलर्ट राहणं भाग आहे. आणि हीच समस्या आहे. कुठलाही मनुष्य सतत किती काळ अ‍ॅलर्ट्/सावध राहू शकणार ? काही वेळातच शारिरीक मर्यादा आड येतात. डोळे सतत सताड उघडे राहू शकत नाहित; मन अगदिच एकाग्र चित्त प्रदीर्घ काळ राहणं अवघडच. ह्याशिवाय इतर मर्यादा- टॉयलेटला जाणं वगैरे आहेच. शिवाय दहा-बारा तासाहून अधिक वाट पहावी लागली तर झोप येणं साहजिक. अशावेळी आलटून पालटून एका गटानं झोप घेणं; दुसर्‍या गटानं तोवर पहारा देत राहणं हा मार्ग वापरता येउ शकतो. पण ह्यात एकत्रित मनुष्यबळ कमी उपलब्ध असण्याचा धोका त्यांच्याकडे राहतो. त्यामुळं जितक्या लवकर प्रकरण आटोपतं घेता येइल; तितकं हायजॅकर्सना बरं असणार.
.
.
आता सरकारच्या नजरेतून पाहिलं तर काय दिसतं ?
लोकांच्या जीवीताची जिम्मेदारी सरकारवर आहे.लोकांना स्वसंरक्षणासाठीही सरकार शस्त्र ठेवू देत नाही. सरकारची भूमिका "तुम्हाला कुणी काही करणार नाही; काही केलच तर आम्ही शासन करुत. आम्ही सुरक्षेची हमी देतो" अशी असते. एकप्रकारे नागरिक नि:शस्त्र रहात त्या अपहरणाच्या ठिकाणी अडकण्यात सरकारची जिम्मेदारी असते. आता लोकांचे जीव जाउ न देण्याचा जबरदस्त दबाव सरकारवर असतो. समोरच्यांनी केलेली मागणी पूर्ण होण्याची बरीच शक्यता असते ह्या दबावामुळे; फक्त--
मागणी मान्य होण्यासारखी असावी. म्हणजे पैसे वगैरे असतील; तर केस सोपी असते. पण पैसेच हवे असते; तर इतर अधिक सोयीस्कर पर्याय अपहरणकर्त्यांसमोर होते.
सहसा मागणी पैशाची नसते. ती त्याहून अधिक काहीतरी असते. त्याला सामाजिक, राजकिय पैलू असतात. क्तियेकदा त्यामागे अघोषित युद्ध असतं; संघर्षाचे आयाम असतात. किंवा कुणा कैदेतल्या माणसाच्या सुटकेची मागणी असते. सरकारच्या नजरेतून -- कैदेतला माणूस सोडला; तर तो पलटून पुन्हा शेकडो लोक मारण्याची शक्यता आहे. तो तितका पोटेन्शिअल असलेला आहे; म्हणून तर नाट्य इथवर पोचलय. पण त्याच्या हाती भविष्यात किती लोक मारले जातील, काय होइल हे अनिश्चित आणि अस्पष्ट आहे. ते क्वांटिफायही करता येत नाहिये. आणि त्याला आत्त्ता सोडलं तर कित्येक लोकं जाणार हे मात्र नक्की आहे. काय बरं करता यावं ? हा गुंता जबराट असतो. सरकारनं काहीही केलं तरी आता कुणाच्या ना कुणाच्या लाथा पडणार, कुणाची तरी बोलणी खावी लागणार हे नक्की असतं. म्हणजे सरकार फक्त पेचात असतं, आणि हतबलच असतं, असं काही आहे का ? तर नाही! सरकार फक्त हतबल नाहिये!! सरकारची काही बलस्थानंही असतात. सरकारकडे तत्वतः/व्हर्चुअली अगणित रिसोर्सेस, अगणित ताकत आणि अगणित वेळ असतो. म्हणजे कल्पना करा, एखादं विमान हायजेक झाल्यावर समजा सरकारकडे मागणी आली --
"आमच्या अमुक माणसाला सोडा, नाहीतर ह्या दीड दोनशे लोकांना कापून काढू" आणि सरकारनं थोडा विचार करायला वेळ मागून घेतला, आणि विचार होइस्तोवर प्लीझ थांबा असं म्हणून अधिकाधिक वेळ लावला तर काय होइल ? समजा दोन दिवस, चार दिवस, आठवडाभर...सरकारनं काहिच केलं नाही; नुसता विचार करतोय असं दाखवलं तर ? समोरच्या पार्टीकडे अनंत काळ चालनारा अन्नासाठा आणि पाणी नाही, स्वतःचं शेत नाही, गॅस नाही. सरकारकडे हे सगळं आहे. तातडीची गरज ह्या बंदूकवलयांना आहे, सरकारला नाही. ह्यांच्याकडे थोडाफार मर्यादित काही जिन्नस असणार. ते संपत आल्यावर काय पर्याय राहतील ? भुकेनं तडफडून मरणं ? नोप्स. ती मंडळी म्हणूनच सरकारनं वेळ लावू नये म्हणून आपल्याला सिरियसली घ्यायला लावण्याचा प्रयत्न करतील. कसा करतील ? धमकीतील काही भाग प्रत्यक्षात उतरवणं हा एक मार्ग असू शकतो. म्हणजे धमकी आहे सर्व बंधक मारले जाण्याची ; ती अंशतः खरी करुन दाखवणे. म्हणजे हिंसेची एक झलक सादर करणे. (पण फक्त झलकच. जर फार जास्त तमाशा केलात, तर वाटाघाटी नकोच; काय वाटेल ते होउ दे; ह्या मनःस्थितीत सरकारला येउ देणं त्यांनाही नको असतं. ) मग मर्यादित हिंसा हा एक पर्याय राहतो. मर्यादित म्हणजे एखाद्याच व्यक्तीला इजा पोचवायची आणि योग्य तो संदेश पोचवला जाइल. सिरियसली घेतलं जाइल. पण त्यासाठी एखाद्याचा जीव घेणं आलं, तुम्ही जितके जीव घ्याल, तितकी तुमची बार्गेनिंग पावर कमीही होणार हेही माहिती असते. दोनशे लोकांच्या जिवाची किंमत सरकारच्या लेखी दोन-तीन जिवांहून अधिक असू शकते; संख्यात्मक दृष्टीने. तुम्हाला एकदम एकशे सत्त्याण्णव लोक मारायचे नाहित. एखाद्यालाच मारायचाय.
.
.
सरकारकडे अजून पर्याय असतो तो म्हणजे प्रत्यक्ष सैनिकी/पोलिसी कारवाई करण्याचा. ह्यात अधिक जीव जाणार हे उघड आहे. पण मागण्यांच्या गंभीरतेवर, व्यवहार्यतेवर आणि इतर बर्‍याच बाबींवर ते ठरतं. वाटाघाटी सुरु असतानाच सरकार ह्याही पर्यायाचा विचार करत असतं.
.
हे सगळं बाहेर घडत असताना, आत तुम्ही बंधक असाल तर तुम्हाला काहिच पत्ता नसतो. कितीकाळ आतमध्ये अडकून पडणार आहात; हेही नक्की नसतं. आणि प्रतिकाराची पुरेशी संधीही नसते. फक्त एकच बाजू असलीच तर जमेची असते. तुम्हाला मारुन अपहरणकर्त्याला तसा फायदा होणार नसतो.
***********शिल्लक राहिलेले जीव, हाच त्याचा वाटाघाटींमधला मुद्दा/असेट असतो********
.
.
ह्याशिवाय मिडिया नावाचा एक घटक असतो. आणि आत अडकलेल्या लोकांचे जवळचे नातेवाइक. हे लोक जबरदस्त दबावगट म्हणून काम करतात; व निर्णयप्रकियेवर प्रभाव टाकतात.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

मनोबाच्या कीबोर्डाचं एंटर बटण लवकरच मोडणार आहे. स्पेसबारच्याही आधी मोडेल कदाचित!

अपहरणात धैर्य दाखवणारी व्यक्ती स्त्री आणि दहशतवादी पुरुष! मनोबा, आता अँटीस्त्रीवादी तुमच्यावर हल्ला करणार बघा! सावरून बसा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मनोबा रॉक्स....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कॉलिंग गवि

(विमान म्हटलं की आम्ही गपगुमान त्यांना बोलावतो, उगाच आमचे स्पेसबार का तोडून घ्या Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

कोणत्या देशाचं सरकार आहे त्यावर जीव वाचणं, न वाचणं अवलंबून आहे. काही सरकारं (देश) एक पॉलिसी म्हणून निगोशिएशन्स करतच नाहीत. काही देश मुख्यतः लष्करी कारवाईच्या दृष्टीनेच बघतात. काही पॅसेंजर्सच्या आयुष्याला प्राधान्य देतात. इत्यादि.

इन ऑल केसेस, कोणतीही फाजील हालचाल ही निश्चित मरणाच्या (स्वतःचं आणि इतरांचं) दिशेने नेणारी असल्याने गप बसून राहणं उत्तम. पायलटला (तो /ती जिवंत असल्यास) याबाबत निर्णय आणि अ‍ॅक्शन घेऊ द्यावी. तोंडाने न बोलताही उपकरणांच्या सेटिंग्जमधून कंट्रोल टॉवरकडे तो अपहरण आणि संबंधित माहिती पोचवू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या आठवणीप्रमाणे भारतात अजूनही संसदसंमत पॉलिसी नाही. (का ममोसिंग सरकारच्या वेळी आली? - त्यावेळी सरकारने हा निर्णय घेतल्याचे गुगलबाबा सांगतो. मात्र याचे सर्व सरकारांना बांधील असे पॉलिसीत रुपांतर झाले का माहित नाही). (आपल्याला काही अतिरेकी सोडून द्यावे लागल्यानंतर - का होईना -) वाजपेयींनी अशी पॉलिसी यावी म्हणून बरेच प्रयत्न केले होते. पण ते त्यांना जमले नाही

====

अजून संसदसंमत पॉलिसी नाही हे नक्की झाले.
(गेल्या २-३ सरकाराप्रमाणे आताचे सरकार पुन्हा एकदा तो प्रयत्न करेल असे दिसते)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

तुमची पहिली प्रतिक्रिया काय असावी ? सुरुवातीस शॉक बसल आसेल तरी भानावर आल्यावर पहिली गोष्ट काय असते, असावी ?

फुटलो. अपहरण झाल्यावर अमुक एक प्रतिक्रिया येणे चूक आहे वगैरेची अपेक्षा आहे की काय मनोबाला? ROFL धन्य. _/\_

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काय खतरनाक लिहीलय मनोबा नी!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इजिप्त एअरचं विमान हायजॅक झालं अशी बातमी वाचली आत्ताच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अपहरण करणारा पुरुष होता; त्याला म्हणे त्याच्या माजी पत्नीला भेटायचं होतं. आणि आता अपहरणनाट्य संपलंय, अपहरणकर्त्याला पकडलं अशी बातमी एनबीसीवर दाखवत आहेत.

(यांतल्या जेंडर आयडेंटिटी मी बदललेल्या नाहीत; अँटी स्त्रीवाद्यांनी सगळ्या पुरुषांना पकडून अपहरण करण्यापासून रोखावं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"मनातले खूप मोठे प्रश्न किंवा विचार" असं एक सदर सुरू करावं अशी विनंती व्यवस्थापकांना करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

"मनचे खूप प्रश्न आणि अतिविचार" असं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिविचार हे अतिसार सारखं वाटतय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

त्यावरून हे आठवलं.

ghj

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

WTSHTF म्हणजे हेच म्हणायचं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाही, ते वेगळं. त्यासंबंधीचा एक रोचक आणि उद्बोधक व्हिडिओ उपलब्ध आहे.

हपिसातून पाहू शकता, एका पाणघोड्याचा व्हिडो आहे.

https://www.youtube.com/watch?v=dcslnbWEHt0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

काही फरक आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विमान अपहरणाच्या घटना एवढ्या सर्रास घडताना बघून मला मनाची तयारी करण्यासाठी विशेष कष्ट करावे लागतील असं वाटत नाही. माझ्याच विमानाचं दोन-चारदा अपहरण झालं असेल आत्तापर्यंत!

पण आयत्या वेळेस स्वयंपाकाच्या काकू आल्या नाहीत तर, घाईच्या वेळेस गाडी सुरू झाली नाही तर, गाडी चालवत असताना अचानक ढग जमा होऊन मुसळधार पावसामुळे समोरचं काही दिसेनासं झालं तर, सकाळी अचानक दूध नासल्याचं सापडलं तर, दिवसभरात कधीही अचानक इंटरनेट बंद पडलं तर (बाप रे!), असे वेगवेगळे भीतीदायक विचार मनात येत राहतात. त्यांची उत्तरं आपल्या परीने मी शोधत राहते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

उगाच कशाला कांगावा करतेस. तेव्हा मी आणि राजेश अपहरण-अपहरण खेळत होतो. आणि हे तुला आधीच सांगितलं होतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

अर्रे, हिला सांगायचं नाही असं आपलं ठरलं होतं ना! तिच्या तोंडात तीळ भिजत नाही, ती लगेच तो सात जणांना वाटून टाकते.

अशाने पुढच्या वेळी मी तुझ्याबरोबर खेळणारच नाही जा. माझा बॉंबचा पट्टा दे मला परत. मी आता मेघना आणि चिंतातुर जंतूंबरोबर जातो खेळायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अदिती अपहरण हे थोडं द्रौपदी वस्त्रहरण च्या चालीवरचं वाट्टंय.
ये सब क्या हो रहा है बेटा दुर्योधन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

म्हणजे? तुम्ही खेळत होतात? पैशासाठी आलेला तो फोन? तो कुणी केला होता मग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

कॉमनसेन्स वापरायचा नाही कायॽ आय मीन, कमॉन, अदितीला परत घेण्याबद्दल उलट अपहरणकर्त्यांनीच पैसे देऊ करायला नको होते काय? 'नाही घेत, जा!' म्हणून उलट धमकावायचे नाहीत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिल्या दोन वेळेस ह्या लोकांना समजलंच नाही मी आहे ते! चष्मा लावला नव्हता ना मी; अपहरण होतंय हे समजल्यावर मी लगेच चष्मा लपवला होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खेळातसुद्धा पैसे मागायला काय जातंय? ये तू खेळायला, म्हणजे सगळं समजावून सांगतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0