Skip to main content

बग्ज/ त्रुटी

या धाग्यावर संस्थळावरील तांत्रिक त्रुटींच्या तक्रारी करा.

सध्या स्मायली/इमोटीकॉन्स बंद केले आहेत. सेवादाता आणि अ-रोमन लिप्यांचे वाकडे आहे असा संशय आहे.

लिंकांचे बटण सुरू झाले आहे. टेस्ट पण त्याचा डिस्प्ले थोडा विचित्र येतो आहे.

आडकित्ता Mon, 31/10/2011 - 14:38

१. Comment viewing options ची फ्रेम वापरकर्त्याच्या खात्यात नेऊन ठेवली तर?
२. Input format चा डिफॉल्ट Full HTML करावा. अन्यथा, प्रतिक्रिया देण्याच्या चौकटीच्या वरच्या या बटनांनी ->

Image and video hosting by TinyPic

केलेले 'फॉर्मॅटिंग' उमटत नाही, अन नवख्या सद्स्याला हे असे का होते आहे हे समजतही नाही. ते करता येण्याजोगे नसेल, तर वरील प्रश्नचिन्हाचे (मदत) बटण दाबल्यावर येते त्यात या 'इनपुट फॉर्मॅट' ची महती सांगणारे एक वाक्य तरी टाकावे असे वाटते.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 31/10/2011 - 20:06

In reply to by आडकित्ता

अगदी उत्तम सूचना. माझं या विषयातली 'ज्ञान' पहाता मला थोडा वेळ लागू शकेल. पण प्रयत्न जरूर करते.

अशोक पाटील यांचीही सूचना आवडली. त्याचं काय करता येईल याचा विचार करते आहे.

limbutimbu Mon, 31/10/2011 - 15:26

"मजकुरास लिन्क चिकटविण्याची" सोय चान्गली सहज समजेल अशी सोपी आहे.
फक्त, कौलाचे पर्याया मधे अशा प्रकारे लिन्क देता येत नाही (फारशी गरज नाही, पण माहित असावे म्हणून सान्गितले)

limbutimbu Tue, 01/11/2011 - 15:10

टेस्ट, प्लिज इग्नोर

ऐसी अक्षरे रसिके मेळवीन

नितिन थत्ते Tue, 01/11/2011 - 13:15

कौल काढणार्‍या प्रस्तावकाला आपले त्या कौलाबाबतचे म्हणणे मांडण्याची सोय (इथेही) उपलब्ध नाही. :(

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 03/11/2011 - 20:53

In reply to by नितिन थत्ते

होय होय. कौलांकडे लक्ष देते. शिवाय एकावेळेस एकापेक्षा जास्त पर्याय निवडता येतील असे कौलही सुरू करता येण्याची सोय करते आहे.

दिलतितली Tue, 01/11/2011 - 14:58

असे लक्षात आले कि बातम्या, ललित, माहिती, चर्चा विषय, समीक्षा, मौजमजा इत्यादी कुठेही न बसणारी एखादी गोष्ट असते .. किंबहुना, तो केवळ एक अनुभव असतो.. इतर काही नाही.. अश्या वेळी हा अनुभव कुठल्या विभागात प्रकाशित करावा? कि अनुभव म्हणून एक विभाग सुरु करता येईल?

आडकित्ता Fri, 04/11/2011 - 21:40

१. कौल तयार करण्याचा प्रयत्न केल्यास फक्त ऑप्शन्स देऊन कौल तयार करता येतो. अन प्रश्नही एका वाक्यात. त्यासोबत थोडी कौलाची पार्श्वभूमी इ. लिहिण्याची सोय करता येईल काय?
२. मुख्य पानावरील प्रतिसाद हे 'इन्डेक्स्ड ऑन लास्ट रिप्लाय टाईम' आहेत. टेबलच्या प्रत्येक हेडरवर क्लिक केल्यास त्यानुसार इंडेक्सिंग करता येईल असे वाटते. मग किती वाचने झाली, किंवा किती रिप्लाईज आले, किंवा लेखकाच्या नावानुसार लिस्ट सॉर्ट होते. जमेल का?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 04/11/2011 - 22:02

In reply to by आडकित्ता

१. कौलांच्या भाषांतरात सध्या गाडं अडलं आहे. नवीन प्रकारची कौलं आहेत तिथे पार्श्वभूमी लिहीण्याची सोय आहे. आणि बहुपर्यायी कौल बनवण्याचीही सोय आहे. कोणी भाषांतरात मदत करणारे असतील तर लवकरच ती कौलं आणते, भाषांतर दोन दिवसांनी टाकता येईलच.

२.

मुख्य पानावरील प्रतिसाद हे 'इन्डेक्स्ड ऑन लास्ट रिप्लाय टाईम' आहेत. टेबलच्या प्रत्येक हेडरवर क्लिक केल्यास त्यानुसार इंडेक्सिंग करता येईल असे वाटते. मग किती वाचने झाली, किंवा किती रिप्लाईज आले, किंवा लेखकाच्या नावानुसार लिस्ट सॉर्ट होते. जमेल का?

किती प्रतिसाद आले हे सध्या दिसतं आहेच. वाचनं किती झाली यासाठी मला थोडी शोधाशोध करावी लागेल. लेखकाच्या नावानुसार लिस्ट तयार करून ती सदस्य खात्यात आणण्यासाठी काम सुरू आहे.

आडकित्ता Fri, 04/11/2011 - 23:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सगळे धागे सॉर्ट होऊन वेगळ्या क्रमवारिने दिसतील असं म्हणायचं आहे मला. हेडर नुसार. म्हणजे उदा. घंटासूरांचे सगळे धागे एकत्र, किंवा सर्वाधिक वाचने (हिट्स) वाले आधी, अशा क्रमवारीने. सध्या मी लॉगिन केल्यानंतर गेल्या लॉगिन नंतरच्या टाईमवर सॉर्टिंग आहे.
मी प्रो. प्रोग्रमर नाही, म्हणून बहुधा नीट सांगत येत नाहिये. :(
अरे हां! उदाहरण आठवलं. ते मेलबॉक्स मधे कसं असत?टायटल वर क्लिक केलं, सेण्डर, सबजेक्ट इ. कि मेल्स चा क्रम बदलतो?? तसं म्हणत होतो मी.

श्रावण मोडक Sat, 05/11/2011 - 01:07

ती सही जाऊ द्या ना प्रतिसादश्रेणीच्या वर.
बाहेरून ऐसीअक्षरेचा दुवा घेऊन प्रवेश केला तर लॉगीन नसतो सदस्य. अशावेळी थेट खरडवहीत जाता येत नाही. हा काही तरी सेटिंगचा मामला आहे. पहावा.

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 05/11/2011 - 02:41

In reply to by श्रावण मोडक

सहीचं शोधावं लागेल, मला मिळेल याची खात्री देत नाही, पण प्रयत्न करते.

आडकित्ता, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते समजलं आहे, आता मला जमेल का नाही याची खात्री देत नाही. पण प्रयत्न करते.

1234 Sun, 06/11/2011 - 02:30

सदस्यता कालावधी
१ आठवडा१ दिवस 5 दिवस

अशी पद्धत काही खवंत दिसते.
ही कुठली कालगणना?

Nile Sun, 06/11/2011 - 02:34

In reply to by 1234

अहो सदस्यांच्या सोयीकरता मराठी अन इंग्रजी अशी दोन्ही कॅलेंडरं दाखवलेली आहेत व्यवस्थापनाने! तुम्ही जर हिंदू, चंद्राधारीत कॅलेंडर वापरत असाल तर मराठी वालं वापरा. अन्यथा इंग्रजीवालं. आठवडा दोन्ही कडे सारखाच असल्याने एकाच फॉर्म्याट मध्ये दिला आहे.

(ह्या झंटल(वू)मन डागदर लोकांना शिंपल गोष्टी कळत नाहीत! काय शिकतात कालेजात कोणास ठावूक!)

1234 Sun, 06/11/2011 - 02:38

१ आठवडा १ दिवस हे कुठल्या कॅलेंडरात 5 दिवस होतात?

बाकी मला जाणीवपूर्वक "वू" :) केल्याबद्दल धन्यवाद.
आम्हाला कॉलेजात हे न्हवते शिकवत,बाकी बर्‍याच गोष्टी आमच्या आम्ही शिकलो म्हणा कालेजात.

Nile Sun, 06/11/2011 - 02:54

In reply to by 1234

तुम्ही नक्कीच पाश्चात्यप्रेमी असणार, म्हणूनच तुम्हाला कळले नाही.

आमच्या गरीब डेवलपिंग देशात आठवडा हा सात दिवसांचा असतो हे तुम्हाला माहित असावे. म्हणजे १ आठवडा १ दिवस= ८ दिवस.

तुमच्या त्या शिंच्या पश्चिमेकडच्या देशात लोकांना काम नको!! म्हणून त्या आठवड्याला पाच दिवसांचा केला आहे. आता हिंदू कॅलेंडराप्रमाणे पाचाचं साताशी गूणोत्तर काढलं आणि त्याला इंग्रजी कॅलेंडरात ट्रान्सफॉर्म* केलं की होता साडेतीन दिवस. तसंही तुम्ही लोक मुलखाचे आळशी! म्हणून साडेतीनाचे राउंडऑफ करून तीन केले अन पाचात मिळवले की झाले कीती? घाला बोटे आणि करा गणित! डागदर लोकांना गणित असतं का हो शाळेत? ;-)

*५/७= ०.७१
०.७*५=३.५