तुमची सध्याची वादग्रस्त मते कोणती? - १
कोणताही विषय चालेल. त्या विषयावरचे तुमचे वादग्रस्त / प्रवाहाविरुद्ध मत कोणते ते थोडक्यात सांगा.
कृपया एका कमेंट मधे एकच मत लिहा. दुसऱ्या मतासाठी दुसरी कमेंट वापरा.
उप प्रतिसादांमधून त्या मतावर चर्चा अपेक्षित आहे.
धन्यवाद.
+ एक लक्श
(मानव सोडल्यास) घरात फिसणारे, आपल्या कुशीत शिरू पाहणाणार, चाटायचा प्रयत्न करणारा, प्रसंगी चाऊ शकेल अशा कोणत्याही प्राण्याबद्दल हेच मत आहे!
माशाबिशांसारखे दूरवर टँकमध्ये अंगचटीस न येणारे प्राण्यांचं किंवा घराबाहेर गोठ्यात/पडवीत/तबेल्यात बांधलेल्या गाई/म्हशी/बकर्या/घोडे वगैरे प्राण्यांचं नि आपलं काय बी वाकडं नाय. तद्वत माझं नी भटक्या कुत्र्यांचं/मांजरींचंही काय बी वाकडं नाय
===
अर्थात हे कुत्रे मांजरी (आणि लहानमुलं) जास्त तापदायक की त्यांचे पालक हा प्रश्न विचारला तर मी देईन ते उत्तर अनेकांना आनंददायी वाटणार नाही!
वादग्रस्त मते
१)90 टक्के भारतीय मूर्ख आहेत या काट्जूंच्या विधानाशी माझी सहमती(मी उरलेल्या 10 टक्यांमध्ये मोडतो असे म्हणणे नाही)
२) खवचट,हेकेखोर आणि अडेलतट्टू म्हाताऱ्या माणसांना वृद्धाश्रमात ठेवण्यात काही गैर नाही
३) सगळे धर्म बुडवले पाहिजेत
४) भारतात porn इंडस्ट्री सुरु झाली पाहिजे
५) लिव्ह इन पद्धत सामान्यजनांत रूढ झाली पाहिजे
३/४ अगदीच सहमत २ - मी जे
३/४ अगदीच सहमत
२ - मी जे वृद्धाश्रम म्हणून जागा पाहिल्यात त्या बघता तिथे नी हॉस्पिटलांच्या जनरल वॉर्डात मला फरक आढळलेला नाही. तिथे रहाण्यापेक्षा एकटं रहावं हे ब्येष्ट!
१ - टक्केवारी माहित नाही पण हे मत माझं जगभरातील व्यक्तींबद्दल आहे. पर से भारतीयच मूर्ख आहेत असे वाटत नाही
५- सद्य प्रकारची लग्नसंस्था मोडीत निघाली पाहिजे याच्याशी सहमत. पर्याय कोणता हवा यावर अजून ठम मत बनवू शकलेलो नाही.
विवाहसंस्था आणि आनुषंगिक नियम
विवाहसंस्था आणि आनुषंगिक नियम हे स्त्री-पुरुषांच्या सहजीवनासाठी निर्माण झालेले नसून पुरुषाची मालमत्ता त्याच्या वारसांना संक्रमित व्हावी म्हणून निर्माण झाली आहे. बायोलॉजिकल वारसाखेरीज इतर कुणाला प्रॉपर्टी मिळू नये याची खात्री असण्यासाठी तत्कालीन तंत्रज्ञानानुसार नियम निर्माण झाले आहेत.
माझ्या मते अशी दुरुस्ती हवी.
माझ्या मते अशी दुरुस्ती हवी.
शरीरसंबंधात
लग्न साजरे करण्यासाठी म्हणूनठरावीक डेसीबल्सच्या वर आवाज केल्यास शरीरसंबंधात बाधा आणण्याची तरतूद आजूबाजूच्या रहिवाशांसाठी असावी.
लग्नसंस्थाच मोडून पडेल तेव्हा हा क्लॉज हवाच. उगाच आवाज करून लोकांची झोपमोड करायची म्हणजे काय?
न्यू ईयर, सर्व जयंत्या
न्यू ईयर, सर्व जयंत्या मयंत्या, सर्वधर्मीय सण आणि दीडदमडीच्या नगरसेवकांचे वाढदिवस वगैरे साजरे करताना डीजे वापरल्या गेले तर ते फोडून टाकावेत.
हिंदू म्हणून जन्माला आलेल्या सर्व अतिडावे, सिकुलर लोकांना चार फटके हाणून कायमचे पाकिस्तान आणि सौदीत पाठवले जावे.
सर्व सदस्यांना श्रेणी
सर्व सदस्यांना श्रेणी देण्याची सोय द्यावी, नाही तर श्रेणी देण्याची सोयच बंद करावी.
प्रचंड असहमत.
समानता हा शब्द संविधानातून व इतरत्र राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चर्चेतून काढून टाकावा. विषमता ही नैतिकदृष्ट्या अत्युच्च गोष्ट आहे असे मानायला सुरुवात करावे. अमिताभ बच्चन हा चंकी पांडेपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणताना नेमकी कुठे समस्या आहे ? चंकी पांडेकडे अमिताभ किंवा त्यापेक्षा श्रेष्ठ अभिनेता बनण्याचं पोटॅन्शियल होतं अस म्हणणार का ? तद्वत काही श्रेणीधारक हे संपादक मंडलाच्या, व्यवस्थापनाच्या नजरेत (इतर सदस्यांच्या तुलनेत) श्रेष्ठ योगदान करत असतील तर त्यात अयोग्य काय आहे ?
कोणत्याही घरातल्या फायनान्शियल निर्णयप्रक्रियेत घरातल्या मुलांना पालकांच्या इतकेच समान स्थान द्यावे का ? की फक्त पालकांना असावे ?
बहुसंख्य पुरुष सुपरफिशिअल
बहुसंख्य पुरुष सुपरफिशिअल असतात तर बहुसंख्य स्त्रिया या क्लिंगी, लो-सेल्फेस्टीम वाल्या व असुरक्षित.
- अमेरीकेत "हाऊ टू गेट अ मॅन इन १० डेझ" व तत्सम पुस्तकांचे जे पिक दिसते त्यावरुन. कधीही "हाऊ टू विन अ गर्ल इन १० डेझ" पाहीले नाही :(
____
ज्योतिष हे उपयुक्त स्युडोशास्त्र आहे.
६ दिन लडकी इन.
सगळ्या गोष्टीसाठी अमेरीकेचा रेफरन्स नको. आमचे बॉलीवुड काही कमी नाही... कल हो ना हो बघा ;) अथवा हॉलीवडच हवयं तर विलस्मिथचा फोकस नामक सिनेमा बघा त्यात एखाद्याला कसे मनवायचे फार प्रॅक्टीकली एक्स्प्लेन केलयं.
बाकी एकुणच धाग्यावरील पहिला प्रतिसाद सोडला तर वादग्रस्त मत असे काहीच वाचायला मिळाले नाही :( सॅड. वेरी वेरी सॅड. कोन कशाला वादग्रस्त मानेल खरेच सांगता येत नाही.
वादग्रस्त काय?
प्साईनफेल्ड यांच्या विचारांच्या गाभ्याशी सहमती आहे; पण हे मत वादग्रस्त वाटत नाही. स्त्रीवाद आणि स्त्रैणपणा* ह्या दोन्ही गोष्टी एकसमान आहेत असा अनेकांचा समज आहे, तसं या दोन्ही गोष्टी विरुद्ध ध्रुवांच्या आहेत असं मत असणारेही अनेक लोक आहे.
*Femininity याला चपखल मराठी शब्द सुचला नाही म्हणून स्त्रैणपणा असा शब्द वापरला. चांगला मराठी शब्द सुचवा.
त्यामुळे मला असे वाटते आहे की
त्यामुळे मला असे वाटते आहे की ऐसी वर एकुणात समज फारच कमी असावी.
ऐसी वर समज कमी असावी या निष्कर्षाप्रत तुम्ही आलेले आहात ते (वरील) किमान ३० प्रतिसादांच्या विश्लेषणानंतर असेल तर तुमचा मुद्दा सुयोग्य मानावा. ३० पेक्षा कमी असतील तर वादग्रस्त.
तुमचा प्रतिसाद येण्यापूर्वी वरती किमान ४२ प्रतिसाद होते
दक्षिण आशियाई लोक हीणकस असून
दक्षिण आशियाई लोक हीणकस असून बहुतेकांना डनिंग-क्रुगर इफेक्टची बाधा झालेली असते. खरं तर यात वादग्रस्त काहीच नाही पण असे बाधित लोक लगेच वाद घालून विरोध करतात आणि बळंच हे वादग्रस्त करण्याचा प्रयत्न करतात.
ब्राऊन लोक जेनेटिक, आर्थिक, बौद्धिक वा इतर कोणत्याही बाबतीत इतर लोकांपेक्षा कमी आहेत हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ दिसत असतं; पण ह्या लोकांचा इगो मात्र सतत गगनावरी गेलेला असतो. विशेषतः उपखंडातले एलिट्स. हजारो वर्षे जोपासलेल्या डनिंग-क्रुगर इफेक्टमुळे दुसर्यांना तुच्छ लेखायची सवय असते आणि त्यामुळेच प्रचंड प्रमाणात वर्णभेद आणि विषमता दिसते. शिवाय हे सगळं असं व्हायला क्षुद्रबुद्धीचे पूर्वज एलिट्सच कारणीभूत आहेत, त्यामुळे तर इतिहासाचा "गर्व" असणारे आणखीच हास्यास्पद होतात.
ऐ स्त्री!
'ऐसी अक्षरे'चे लघुरूप 'ऐस्त्री' असे असावे.
खाली कुणीतरी 'कारणे द्या' नोटिस पाठवली आहे, म्हणून,
१) 'स्त्री अक्षरे' हे स्त्री उवाच, स्त्री हुंकार, स्त्री नाद, स्त्री माज, स्त्री बोंब, स्त्री बोंबाबोंब या अन्य प्रचलित शब्दांशी साधर्म्य दाखवते.
२) 'ऐसी'वरचे किमान/कमाल दोन स्त्री आय्डी तमाम कथित, घोषित अथवा स्वयंघोषित एम्सीपीज़ना पुरून दशांगुळे वर उरतात. अशा पुरलेल्या ठिकाणी वटसत्यवान् व्रतासाठी वडाची झाडे लावण्यात येतात असे ऐकीवात आहे.
३) 'ऐ स्त्री!' हे काहीतरी 'अय मेरे वतन'वगैरे प्रमाणे भलतेच देशभक्तिपर वाटते.
४)उद्गारचिह्न समाविष्ट केले तर तो स्त्री-उद्गार ठरेल. कदाचित स्त्री-एल्गारही ठरण्याची त्यात ठासून कॅपॅसिटी आहे. म्हणजे जबरदस्त दारू त्यात ठासलेली आहे.
वरील चारही कारणे वादग्रस्त असू शकतात म्हणून (या कारणांवरून ठरवलेले) माझे मत वादग्रस्त ठरू शकते. इथे पुरुष आय्डीज़नी सपशेल लोटांगण घातल्यास आपली पण माघार हे आधीच नमूद करून ठेवीत आहे.
माणसासारखा विचार करायचा आपला प्रयत्न स्वागतायोग्य आहे
घर चांगलं, व्यवस्थित चालवण्याचा, घरातले सगळे गुण्यागोविंदाने नांदण्याचा आणि झेंडा फडकवत फिरण्याचा काहीही संबंध नसतो.
येस, माणसासारखा विचार करायचा आपला प्रयत्न स्वागतायोग्य आहे. आणी आपल्या कडुन अजिबात अपेक्षीत नसलेले (माझी नकारत्मकता दुसरे काय ) फार महत्वाचे विवेचन या ओळीत आपण केले आहे ते म्हणजे पुटींग आरसेल्फ अॅट बॅक व्हाइल गिवींग प्रायोरीटी टु द हेपिनेस ऑफ फॅमीली. आय मस्ट से मला तुमचे या विचारांबद्दल फार कौतुक वाटते जे अभिमानातही बदलु शकते.
पुरुषांचा फॉर्म टिकवायला किमान व्हायगरा जोपर्यंत उपलब्ध आहे पुरुषांना, या करारापासून विशेष असूरक्षा नाही
हो, वाक्य भडक आहे (माझ्या द्रुश्टीने तरी). त्यामुळे सुरुवातिलाच जगातल्या मानवी पुरूषांची माफि मागतो. सॉरी फोर रिप्रेसेंटीग यु नॉट करेक्ट्ली(फॉर नावु). परंतु या उदाहरणात एक महत्वाचे योगदान दडलेले आहे जे चर्चेच्या ओघात स्पश्ट होइल, परीणामी मी वरील मतावर ठाम आहे.
गेम ऑफ थ्रोन्स
माझं मत : 'गेम ऑफ थ्रोन्स' आणि तद्दन कौटुंबिक हिंदी मराठी सीरियलींमध्ये फारसा फरक नाही - असलेच तर ते एवढेच की -
१. स्टेक्स जास्त आहेत - म्हणजे माणसांचे जीव वगैरे जातात, आणि अख्खं राज्य पणाला लागतं वगैरे.
२. सेक्स + व्हायलन्स जास्त आहे. अन्यथा कुटुंबं आणि त्यांच्यातले झगडे, हेवेदावे, छान छान कपडे आणि चेहरे वगैरे एवढंच तर आहे हा का ना का ;-)
हेतुपुरस्सर लक्ष / दुर्लक्ष?
>> हिरॉईनची कंपिटीटर हिरोच्या समोर कपडे काढून आव्हानात्मक पोज मध्ये उभी आहे असं चित्रच डोळ्यासमोर आले!.
म्हणजे तुम्ही नग्नतेकरता असल्या सीरियली पाहता ह्याची ही कबुली समजतो. ;-)
>> पण म्हटलं ना वय झाली ही हे फरक दिसून येत नाहीत
आमचं वय मान्य हो, पण वर 'सेक्स आणि व्हायोलन्स जास्त' हा फरक लिहिलाय त्याचं काय? ;-)
म्हणजे तुम्ही नग्नतेकरता
म्हणजे तुम्ही नग्नतेकरता असल्या सीरियली पाहता ह्याची ही कबुली समजतो.
असल्या!!!!!!!!!! 'अशा' म्हणावं! तुम्हाला मुळी टेस्टच नै! आंबा न आवडणारे कुठले!
आणि अर्थात! नग्नता हा ही एक महत्त्वाचा घटक आहे. सेक्स वायला नी नग्नता वायली. तसंही यात सेक्स बराच कमी दाखवला आहे. केवळ नग्नताच आहे.
आता काहि वयानंतर दोन्ही एकच वाटत असेलही :प (सार्ख सार्ख काय वय काढायचं, पण इलाज नै)
अनाहूत सल्ला, आधीच माफी मागतेय
तुम्हांला असं वाटत नाही का, की तुम्ही स्वतःची कीव जाहीरपणे करण्यात काही चुकीचं करताहात? आपल्या मनात अनेक बरेवाईट विचार येत असतात. पण दर वेळी ते जाहीरपणे लिहिले म्हणजेच आपण प्रामाणिक असं काही नसतं. सगळ्या गोष्टी मुळातच सगळ्यांना कळण्याची काही आवश्यकता नसते. अशानं तुम्ही लोकांच्या हातात कोलीत देता आहात, असं वाटतं.
देवपूजा
एक निरीक्षणः
देवाची पूजा म्हणजे आदल्या दिवशीच्या पूजेमुळे अस्वच्छ झालेल्या मूर्तिंना आंघोळ घालून चकाचक करायचे आणि पुन्हा गंध लावून, फुले वाहून परत अस्वच्छ करुन ठेवायचे. एकंदर चोवीस तासात, ते फारच अल्प काळ स्वच्छ राहू शकतात. स्वतः मात्र दिवसातून दोनदा शूचिर्भूत व्हायचे. हा अन्याय आहे.
माझे अजुन एक वादग्रस्त मत.
एवरी वन वांट्स टु बी एक्स्प्रेस्स्ड, बट नोबडी वांट्स टु बी जज्जड... म्हणून ऐसी वरती नवसदस्यांच्या प्रतिसादांना श्रेणी मिळताच त्यांच्यावर याचा प्रमाणाबाहेर सकारात्मक/नकारात्मक परीणाम दिसुन यायची शक्यता वाढते जे ऐसीला एक सर्वसामावेश्क संस्थळ म्हणून लक्षात राहण्यास बाधक ठरत आहे. खरे तर नव सदस्यांना सर्वप्रथम वातावरणात रुळु देणे आणी नंतर गेट द बेस्ट आउट ऑफ देम करण्यात इतर संस्थळे म्हणुनच बाजी मारतात. ज्यासाठी ऐसीकडे कोणतेही प्लानिंग नाही.
किंचित सुधारणा
मत क्र. ३ बद्दल असे ऐकलेय की जोवर पहिली/दुसरी/(एन -१) वी बायको पोलिसात कंप्लेंट दर्ज करत नाही तोवर पॉलिग्यामी कायद्याने हिंदूंत अलौड आहे.
अलौड वगैरे नाही. मात्र:
१. आंध्र प्रदेश वगळता उर्वरित भारतात हा दखलपात्र गुन्हा नाही. (आंध्र प्रदेशाच्या विभाजनानंतर आता तेथे नक्की काय परिस्थिती आहे याबद्दल कल्पना नाही; मात्र, विभाजनपूर्व आंध्रप्रदेशात हा दखलपात्र गुन्हा होता, असे वाचले आहे. तसेच जम्मू आणि कश्मीरमध्ये उर्वरित भारताचे कायदे थेट लागू होत नसल्याकारणाने तेथेही नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दल कल्पना नाही.) म्हणजेच, या बाबतीत लोकस ष्ट्याण्डाय असलेल्या अफेक्टेड पार्टींपैकी कोणी जातीने उपस्थित राहून रीतसर अर्ज करून न्यायालयीन वॉरंट मिळविल्याखेरीज पोलिसांस यात हस्तक्षेप वा याबद्दल कार्यवाही करण्याचे तर सोडाच, परंतु साधे तक्रार नोंदवून घेण्याचेसुद्धा अधिकार नाहीत.
२. या बाबतीत लोकस ष्ट्याण्ड्याय असलेल्या व्यक्तींची यादी ही पहिली ते 'न'वी पत्नी (होय, 'न'वी पत्नी हीदेखील अफेक्टेड पार्टींमध्ये मोडू शकते.) आणि/किंवा तिच्या वतीने तिचे काही अनुसूचित अतिनिकटतम नातेवाईक इथवरच मर्यादित आहे; इतरेजनांस वा पोलिसांस यात दखलअंदाजीचा कोणताही वैध अधिकार नाही.
३. उपरनिर्दिष्ट अतिनिकटतम नातेवाइकांच्या अनुसूचीत नेमके कोणकोण समाविष्ट आहे, हे तूर्तास विसरलो (जालावर शोधल्यास ही माहिती सहज मिळू शकेल), परंतु तीही यादी अतिशय मर्यादित आहे.
(थोडक्यात, कायद्याने अलौड नाही; मात्र, एन्फोर्सेबिलिटीस मर्यादा आहेत.)
म्हणजेच, या बाबतीत लोकस
म्हणजेच, या बाबतीत लोकस ष्ट्याण्डाय असलेल्या अफेक्टेड पार्टींपैकी कोणी जातीने उपस्थित राहून रीतसर अर्ज करून न्यायालयीन वॉरंट मिळविल्याखेरीज पोलिसांस यात हस्तक्षेप वा याबद्दल कार्यवाही करण्याचे तर सोडाच, परंतु साधे तक्रार नोंदवून घेण्याचेसुद्धा अधिकार नाहीत.
आय स्टँड करेक्टेड. आता मला सांगा, की समजा तक्रारबिक्रार नसेल तर कागदोपत्री कशी नोंदणी होते?
सेन्सस मधून.... दोन तीन
सेन्सस मधून....
दोन तीन दिवसांपूर्वी बातमी वाचली. आपण विवाहित असल्याचे जितके पुरुष सांगतात त्यापेक्षा जास्त महिला सांगतात. हा पॉलिगामीचा इंडिकेटर आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
Just released census data shows that there are about 6.6 million more women who are "currently married" than men. While part of this might be accounted for by married men who have migrated abroad for work leaving their wives behind, the data also indicates that there are a very large number of women in polygamous marriages.
विकिपीडियावर हे सापडलं.
विकिपीडियावर हे सापडलं.
According to the 1961 census (the last census to record such data), polygamy was actually less prevalent among Indian Muslims (5.78%) than among several other religious groups.[2] Incidence was highest among Adivasis (15.25%) and Buddhists (7.9%); Hindus (5.8%), by comparison, had an incidence 0.5% higher than Muslims in 1960; though it has declined much more faster among Hindus in the last five decades with its criminalisation[3][4]
स्वार्थी असतात हा मुद्दा
स्वार्थी असतात हा मुद्दा मलाही मान्य आहे परंतु दृष्टी आत वळवा हा आत्मकेंद्रीपणा आहे या विधानावरती आक्षेप आहे.
.
दृष्टी आत वळवा म्हणजे आपल्यावरुन जग ओळखा. अपमानास्पद बोलण्याचा आपल्याला जसा त्रास होतो तसाच दुसर्यालाही होतो, कौतुकाने आदराने आपण जसे जिंकले जातो तसे इतर सर्वजण. स्वतःवरुन जग ओळखा. काही पायाभूत म्हणजे बेसिक भावना या सर्वव्यापी आहेत त्या स्वतःचे नीरीक्षण करुन ओळखा.
तुमच्या अवतीभोवती जी काही
तुमच्या अवतीभोवती जी काही संपत्ती दिसते आहे ती आत्मकेंद्रीपणाच्या अनुपस्थितीत निर्माण झाली ? माणसं काम करतात ते स्वतःमधल्या आत्मकेंद्रीपणास मारून करतात ? उद्या तुम्ही ऑफीसला जाणार आहात ते स्वतःबद्दल कोणतीही concern न बाळगता, दातृत्वभावनेतून काम करण्यासाठी जाणार आहात ? सामाजिक कार्यकर्ते कोणताही मोबदला न मागता आयुष्यभर काम करू शकतील ? त्यांच्या जेवणाचं, कपड्यालत्त्याचं, दुखल्याखुपल्याचं काय ? (to borrow from Adam Smith) तुम्ही बाजारातून ब्रेड विकत आणता तो बेकरीवाला स्वतःचे कोणतेही हित न पाहता तुम्हाला ब्रेड मोफत देतो ?? त्यागभावनेतून/ परार्थभावनेतून देतो ? की त्याला स्वतःचे हित साधायचे असते ?
ऐसीअक्षरे
माझे सगळ्यात वादग्रस्त मत म्हणजे ऐसीअक्षरे ही सर्वात रद्दड मराठी साईट आहे.