कैथरीन हेपबर्न-'वूमन ऑफ दि इयर'

12 मे कैथरीन हेपबर्नच्या स्मृति प्रीत्यर्थ

अविस्मरणीय हाॅलीवुड-तीन

सुबह का भूला शाम को घर लौट आए तो भूला नहीं कहलाता....

नायिकेला घरा ऐवजी समाजसेवेत ज्यास्त इंटरेस्ट आहे. घरी नवरा-मुलं यांना सोडून ती सोसायटी, किटी पार्टींमधे बिजी असते। एखाद्या प्रसंगानं तिचे डोळे उघडतात आणि ती जग सोडून पुन्हां आपल्या घरांत रमते...या विषयावर पुष्कळ चित्रपट आले, येत आहेत.

1942 साली हॉलीवुड मधे याच थीमवर एक चित्रपट आला होता-‘वूमन ऑफ दि इयर.’ नायक होता हॉलीवुडचा प्रसिद्ध नट स्पेंसर ट्रेसी तर नायिका होती कैथरीन हेपबर्न. नायक सैम (स्पेंसर ट्रेसी) एका वर्तमानपत्रांचा स्पोटर्स एडीटर आहे. तो आपल्याच आॅफिसांत काम करणारया टेस हार्डिंग (कैथरीन हेपबर्न) च्या प्रेमांत पडतो. ती इंटरनेशनल अफेयर्स कॉलमनिस्ट आहे. दोघांचं कार्यक्षेत्र वेगळं, स्पोटर्सचा तिला गंध देखील नाही. तरी दोघं लग्न करतात. लग्नानंतर देखील नायिकेला कामाशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. घरापासून दूर ती फक्त आणि फक्त आपल्या कामांत बिजी असते...असंच एके दिवशी एका कान्फ्रेंस मधून परत येतांना ती एका 6-7 वर्षाच्या अनाथ मुलाला सोबत घेऊन येते...म्हणजे लग्नाला वर्षभर नाही झालं आणि बाईसाहेब चालल्या आई बनून एका अनाथ मुलाला आसरा द्यायला...! नायक रागावतो खरा पण नमतं घेतो....

याच दरम्यान नायिका टैस हार्डिंग ‘वूमन ऑफ दि इयर’ सलेक्ट होते. बक्षिस समारंभ आणि त्यानंतर टैसच्या आई-वडिलांच्या लग्नाचं सिलवर जुबली फंक्शन आहे. या दोन्हीं कार्यक्रमांत या दंपती ला जायचंय...पण काही कारणांमुळे टैस एकटीच या कार्यक्रमांमधे सामिल होते...सैम नसतो तिच्या सोबत...या दरम्यान झालेल्या घटनांमुळे टैस चे डोळे उघडतांत आणि ‘सुबह का भूला शाम को घर लौट आए, तो भूला नहीं कहलाता...’ या हिंदी म्हणी प्रमाणे सगळी कामे सोडून टैस हार्डिंग घरी परतते नवरयाजवळ, आपल्या घरी...

चित्रपटांत ज्या घटनांमुळे तिचे डोळे उघडतात त्यातील पहली घटना ‘वूमन ऑफ दि इयर’ बक्षिस समारंभा दरम्यान घडते...स्टेजवर आणि नंतर समारंभा मधे उपस्थित सगळे पाहुणे टैसच्या या यशासाठी सैम ची तारीफ करतांत आणि त्याच्या न येण्याचं कारण विचारतांत. या प्रश्नाचा टैस ला राग येतो आणि अचंबा देखील वाटतो की हे माझं यश आहे, पण त्यात सैमची तारीफ कशाला करताहेत सगळे...दुसरी घटना तिच्या आई-वडिलांच्या लग्नाच्या सिल्वर जुबली फंक्शनमधे घडते...समारंभ सुरू होण्या आधी बाप-लेक मधे चर्चा होते. ते टैसला बघून खुश होतात आणि सैम च्या न येण्याचं कारण विचारतात. या प्रसंगी भावुक झालेले वडील टैस ला सांगतात-‘माझ्या उमेदीच्या वयांत जेव्हां मी कफल्लक होतो तेव्हां देखील तुझी आई माझ्या सोबत खंबीरपणे उभी राहिली म्हणून आज हा दिवस बघण्याचं भाग्य मला लाभलं...’ हे एेकतांना शेजारीच उभ्या असलेल्या टैसच्या आईचे डोळे भरुन येतात. समारंभा दरम्यान देखील टैस आपल्या आई-वडिलांचं आपसातलं स्नेह, उत्साह, एक दुसरयाची काळजी घेण्याची पद्धत, त्यांचे संबंध समजण्याचा प्रयत्न करते आणि नकळत स्वत:ची तुलना त्यांच्याशी करते...तेव्हां तिला उमजतं की ती आपल्या नवरयासोबत कसा व्यवहार करत आलीय...तिला पश्चाताप होतो...मग मात्र ती अस्वस्थ होते, समारंभातील रस निघून गेलाय असं तिला वाटतं...समारंभ संपताच ती सरळ घराकडे निघते...

पहाटे ती घरी पाेचते...समाेरच दुधवाला आलेला आहे, घर मालिकणीला पहिल्यांदाच बघितल्याने तो देखील भांबावून गेला आहे...त्याच्या हातातून दूध घेऊन ती आपल्या पर्समधील किल्लीने दार उघडते...नवरा बेडरूम मधे झाेपलाय...ती सरळ किचन मधे जाते...आणि ब्रेकफास्ट तयार करुं लागते. अख्खं आयुष्य समाजसेवेत गेलंय म्हणून तिला धड सैंडविचं सुद्धा करतां येत नाहीत...पुस्तक बघून ती ब्रेकफास्ट तयार करायचा प्रयत्न करते...किचन मधे हाेणारा आवाज ऐकून नवरा म्हणजेच सैम तिथे येतो। टैस
ला काम करतांना बघून अचंभित होतो...सुखावतो देखील, मग तिची मदत करतो...! आणि या प्रकारे नायिका आपल्या घरांत रमते...

https://youtu.be/wFLp-hyPYGU

60 नंतर मिळवले तीन ऑस्कर

कैथरील हेपबर्न म्हणायची-‘My Prize is my work.’ तिला 12 ऑस्कर नॉमिनेशन मिळाले होते. तिने कारकीर्दीत सर्वश्रेष्ट नटीचं ऑस्कर चारदा पटकावलं. यातील तीन ऑस्कर तिने आयुष्याची साठी गाठल्यानंतर जिंकले होते....

हेपबर्न-ट्रेसी या जोडी ने 9 चित्रपटांमधे काम केलं

‘वूमन ऑफ दि इयर’ स्पेंसर ट्रेसी चा कैथरीन हेपबर्न सोबत पहिला चित्रपट होता. यातील टैसच्या भूमिकेसाठी कैथरीन हेपबर्न ने ऑस्कर पटकावला. या चित्रपटा पासून ट्रेसी-हेपबर्नचा रोमांस सुरू झाला, जो 25 वर्षे अबाधित होता...याचा शेवट ट्रेसीच्या मृत्युने झाला. या दरम्यान या दाेघांनी एकूण नऊ चित्रपटांत काम केलं. ‘गैस हूज कमिंग टू डिनर’ ही जोडी एकत्र असलेला शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट पूर्ण झाल्यावर स्पेंसर ट्रेसीचा मृत्यु झाला. या धक्यामुळे म्हणां किंवा ट्रेसी गेल्याने झालेल्या दु:खामुळे म्हणां हेपबर्न ने हा चित्रपट शेवटपर्यंत बघितलाच नाही...कैथरीन हेपबर्न २६ जून २००३ साली गेली...

या दोघांबाबत लियाेनार्ड माल्टिन नी म्हटलं होतं-

‘Match made in Movie Heaven.’

ट्रेसी-हेपबर्न चे चित्रपट

1.‘वूमन ऑफ दि इयर’-(1942) दि.-जार्ज स्टीवेंस।
2.‘कीपर आफ दि फ्लेम’-(1942) दि.-जार्ज कुकर।
3.‘विदाउट लव’-(1945) नि.-हेराल्ड एस. बेक्वेट।
4.‘दि सी ऑफ ग्रास’-(1947) नि.-एलिया कझान।
(हा एलिया कझान चा दुसरा चित्रपट होता)
5.‘स्टेट आफ दि यूनियन’-(1948) दि.-फ्रैंक काप्रा।
6.‘एडम्स रिब’-(1949) दि.-जार्ज कुकर।
7.‘पैट एंड माइक’-(1952) दि.-जार्ज कुकर।
8.‘डेस्क सैट’-(1957) नि.-वाल्टर लेंग।
9.‘गैस हूज कमिंग टू डिनर’-( 1967) नि.-स्टेनले क्रेमर।

--------

ही लिंक बघा-

https://youtu.be/-ZcG7JkeFPQ

https://youtu.be/4oaKyBpdArE

----------------

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet