मी आणि माझी चित्रकला - हौशी चित्रकारांसाठीचा धागा

लहानपणी माझी चित्रकला चांगली होती ह्याला प्राथमिक शाळेतले निकालपत्र ह्याशिवाय दुसरा पुरावा नाही. माध्यमिक शाळेतला चित्रकलेचा तास हा केवळ ह्याच कारणासाठी आठवतो कि एक तर तो सलग दोन तास असत असे आणि दुसरे म्हणजे इतर तासांच्या तुलने निवांत असे, म्हणजे हे दोन तास चित्रकले व्यतिरिक्त काहीही केलं तरी चालत असे.

माझ्या आईची चित्रकला खूप चांगली ( म्हणजे फक्त माझ्यापेक्षा चांगली असं नाही तर बहुतांश लोकांपेक्षा चांगली Smile ) तिने काढलेली जलरंग आणि पेन्सिलशेडींग ची चित्रं हा वेगळ्या धाग्याचा विषय होवू शकेल. त्यामुळे आणि मला एकंदर कलाकुसर आणि रंगसंगतीची जाण आहे असं तिला वाटल्यामुळे तिने मला एक-दोनदा चित्रकलेच्या ईलिमेण्टरि , वगैरे परीक्षांना बसण्याबद्दल सुचवले होते. पण मला माझी चित्रकलेतली एकंदर गती (?) माहिती असल्याने , मी त्याऐवजी इंग्रजी आणि हिंदीच्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठांच्या परीक्षा देणं प्रेफर केलं !! चित्रकलेच्या पेपर मध्ये मी चित्रांपेक्षा कल्पकतेवर जास्ती भर देत असे . उदाहरणार्थ माझा आवडता प्राणी असा विषय असेल तर कुत्रा काढण्याची हिम्मत नसल्याने ( किंवा काढला तरी तो कुत्रा आहे हे परीक्षकांना कळेल ह्याची खात्री नसल्याने) मी मासा किंवा हत्ती असा काढायला ( आणि ओळखायला ) सोप्पा प्राणी काढत असे . अर्थात पेपर चित्रकलेचा असल्याने कल्पकतेला मार्क नव्हते . शाळेत चित्रकला आणि शारीरिक शिक्षण ह्या विषयांमुळे माझी टक्केवारी खाली जायची . असो.

कोल्हापुरात आईचा चित्रकार मित्र-मैत्रिणींचा एक ग्रुप होता , ते लोकेशनवर जाऊन जलरंग चित्रकला करत. आईची चित्र किंवा एकंदरीतच चित्र आवडत असली तरी आपण पण चित्र काढावीत असं कधी वाटलंच नाही . आणि ह्या बाबतीत मी बाबांवर गेलीये असं समजून आईनेही कधी माझ्यावर चित्रकला फोर्स केली नाही .

मधल्या काळात इथे लिहिण्यासारखं विशेष काही झालं नाही.

लग्नानंतर पहिल्यांदाच आई-बाबा माझ्याकडे एक दीड महिन्यासाठी आले होते. कॅलिफोर्नियातला हिवाळाही त्यांना थंड वाटत होता . शिवाय संध्याकाळी ४ वाजता अंधार होत असल्याने बाहेर फिरण्यावर अजूनच मर्यादा.
मग एक दिवस मी आईला घेवून michaels मध्ये गेले आणि रंग, कुंचले आणि मुख्य म्हणजे कॅनवास विकत आणले.
भारतात आईची नेहमी एक तक्रार असायची कि निवांत चित्र काढायला सलग असा वेळच मिळत नाही . "जरा चित्र सुरु केलं कि बेल तरी वाजते किंवा बाबांना तेव्हाच काहीतरी विचारायचं/ सांगायचं असतं किंवा कोणाचा फोनच तरी येतो! सुट्टी असली तरी माझा असा वेळच नसतो . " ( अवतरणचिन्हातली वाक्यं आईची . स्पेसिफिकली, बरेच दिवस नवीन चित्र नाही का काढलस ह्या प्रश्नाचं उत्तर).

तर मी तिला सांगितलं, इथे तुला कोणी डिस्टर्ब करणारं नाही तू निवांत चित्र काढत आणि रंगवत बस . त्या स्टे मध्ये तिने काढलेली, रंगवलेली चित्र आणि इतरही वस्तू हा परत वेगळ्या धाग्याचा विषय होईल . पण मग परत जाताना तिच्याकडे फारशी जागा नसतानाही मी उरलेले रंग आणि कॅनवास तिला न्यायला लावले . मी कधी जन्मात चित्र काढणार नाही आणि ते रंग उगीचच वाळून जातील त्यापेक्षा आईने नेलेले बरे असा माझा विचार होता.

नंतर एका ऑक्टोबरमध्ये मला एका रीट्रीटला जावं लागलं. तिथे एका activity मध्ये आम्हाला एक ८बाय १२ चा कॅनवास आणि रंग साहित्य देवून सांगितलं कि तुमच्या संशोधना बद्दल सांगणारं चित्र काढा ( represent your research through art) . माझ्या प्रोफेसरनि सोयीस्करपणे ते रंग आणि कॅनवास माझ्याकडे सरकवून दिले आणि मग मी पण सरसावून चित्र काढलं. ते हे :

1

हे चित्रकलेच्या दृष्टीने काही फार भारी चित्र नसलं तरी माझ्या डोक्यात जसं होतं तसं उतरलं म्हणून मला खूप आवडलं . अजून एक गोष्ट ह्या चित्रामुळे झाली ती म्हणजे आपल्याला चित्र काढायला आवडतं असा एक शोध माझा मलाच लागला !!

आमच्या गावात वाईन आणि रंग असे क्लासेस चालू असतात . दोन किंवा तीन तासात वाईन पीत पीत चित्र काढायचं आणि प्रशिक्षक , रंग, कॅनवास आणि वाईन हे सगळं ते क्लासवाले पुरवतात. काही दिवसांपूर्वी जोडप्यांनी अशा क्लासला जाण्याचं फॅड आलेलं मला माहिती होतं.

मग seattle हून परत आल्यावर मी नवर्याच्या मागे लागले की आपण अशा क्लासमध्ये चित्र काढायला जाऊ. त्याला आत्तापर्यंत माहिती झालय कि मला असं अचानक काहीतरी हॉबी निर्माण होते आणि काही वेळाने ती अदृश्य पण होते . त्यामुळे तोही "हो जाऊ. कुठे जायचं , तू बघ ऑन -लाईन." म्हणून मी कितपत खोल पाण्यात आहे ते बघत होता . (कारण जनरली मला हे ऑन -लाईन शोधणं , बुक करणं वगैरे खूप जीवावर येतं आणि मी ते टाळत असते .) तर माझ्यावर पेंटिंगचा अंमल असल्याने मी येल्पवर रिव्यू बघून चांगला क्लास शोधला मग ग्रुपऑन वर त्या क्लासच कुपोनसुद्धा शोधलं. पण एवढं करून झालं असं कि त्या क्लासच्या कॅलेंडर मध्ये त्या महिन्यात असलेलं एकही चित्र आम्हाला पसंद पडेना . शिवाय दोघांनी एकच चित्र करून परत एकाच घरात दोन एकसारखी चित्रं नको असं पण वाटायला लागलं. मला तर चित्र काढायचंच होतं.
त्यावर उपाय म्हणून आम्ही घरीच वाईन आणि रंग करायचं ठरवलं. कशाप्रकारचं चित्र काढायचं ते आधीच ठरवलं. मग रंग-कुंचले , कॅनवास ( आणि मुख्य म्हणजे वाईन Blum 3 ) आणून घरीच चित्रं काढलं. हा आमचा वीकेंड चा उद्योग. दोन कॅनवास मी आणि दोन नवर्यानी केलेत :

2

हे झालं ऑक्टोबर मध्ये. नंतर नेहमीप्रमाणे आणि as expected माझी चित्र काढायची लहर गेली . नाही म्हणायला मधल्या सुट्टीत किंवा दोन तासांच्या मधल्या वेळात काही चित्र / रेखाटन माझ्या फाईल मध्ये आकाराला येत होती.. पण एकंदरीत चित्रकलेची पॉवर गेल्यासारखं झालेलं.

मग मागच्या वर्षी मस्त कलंदर ह्यांनी मधुबनी चित्रकलेची ओळख करून दिली. प्रिंट काढायच्या कागदावर एक-दोन रेखाटनं काढून बघितल्यावर परत माझी चित्रकलेची पॉवर आली आणि मग ६बाय ८ च्या छोट्या कॅनवास च्या टाइल्सवर मी तीन मधुबनी चित्रं काढली :

31

32

33

मग दोन कॅनवास उरले आणि मधुबनी करण्याइतकी चिकाटी नसल्याने सोप्पी चित्र करू म्हणून मग हा गणपती आणि विठोबा. ह्या चित्रात केवळ रंग-काम मी केलं . गणपती आणि विठोबाचा आकार पेन्सिलने नवर्याने काढून दिला.

4

5

आणि मग हे असच टीव्ही बघत बघत एकीकडे केलं.

6

झालं . आत्ता एवढंच . मागच्या वर्षी खूप सारी झेनटँगल प्रकारची चित्रं काढली , त्यांचे फोटो प्रतिसादातून देईन.
पण त्याआधी बाकीच्या हौशी आणि इतरही चित्रकारांनी आपापले चित्रकलेचे अनुभव आणि चित्रं टाकायला सुरूवात करावी ही विनंती.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मधुबनी मोराची रंगसंगती प्रचंड आवडली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

झाडाचा कॅनव्हास एक नंबर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हेच बोल्तो. झाडाचं चित्र खूप छान!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अवांतर: ही वाईनची भानगड काय आहे? वाईनऐवजी दुसरं काही टाकून चित्र काढलं तर चालतं का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आम्ही काहीही न 'टाकता'सुद्धा चित्रे टाकतो तर लोक (आपलेच धागे टिंबरूप करून) पळून जातात. वाइनऐवजी इतर काही 'टाकून' चित्रे टाकू लागलो, तर काय होईल, परमेश्वरच जाणे.

परंतु तरीही, एकदा कधीतरी फुल्टू टुन्न होऊन चित्र टाकण्याचा प्रयोग करण्यालायक आहे. (कम से कम उसी बहाने...)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकदा कधीतरी फुल्टू टुन्न होऊन चित्र टाकण्याचा प्रयोग करण्यालायक आहे.

ROFL ROFL हाहाहा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परंतु तरीही, एकदा कधीतरी फुल्टू टुन्न होऊन चित्र टाकण्याचा प्रयोग करण्यालायक आहे. (कम से कम उसी बहाने...)

याचा अर्थ आजपर्यंतचे तुमचे प्रतिसाद हे
काय म्हणता ?
खरच?
......................
नव्हते ?
?
?
ओ माय गॉड
अहो मी भलतच काहीतरी समजत होतो
अनजाने मे मुझसे कितनी बडी भुल हो गयी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

हाहाहा सॉलिड!!! ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ठ्ठो ROFL ROFL ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(बोले तो, च्यामारी, टुन्न झालो तर झक मारायला इथे कशाला कडमडेन?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गणपती, विठोबा आणि झाड फारच छान. झाडावरची फुले पाहुन 'साकुरा'ची (cherry blossoms) आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मलाही हीच चित्रे सर्वांत जास्त आवडली. पीयच्चडी सीर्यसली करून आणि वर हे सगळं जमवायचं म्हणजे खायचं काम नव्हे. एकदा साष्टांग घालीन म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुळात चित्र काढणे हेच निदान आमच्या तरी खायचे काम नाही. मराठी ४ आकड्याच्या आकाराचे पक्षी, त्रिकोणी डोन्गर आणि काटकोनात मुडपलेले हातपाय असणारी माणसे या पलिकडे आपली चित्रकला कधीच पोचली नाही. Blum 3

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत, मीही तसा पट्टीचा चित्रकार. पट्टीने जे काढता येते तेच तेवढे जमायचे. त्रिकोणी डोंगर, खांद्यातून नव्हे तर पोटातून फुटलेले हात वगैरे अगदी तंतोतंत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पट्टीचा चित्रकार म्हणे!! लोल!! ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ROFL (आम्हीही. नववीपर्यंत चित्रकला या विषयात ४०/१०० गुण मिळत. दहावीला चित्रकला नव्हती याचा फार आणंद झाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पट्टीचा चित्रकार! ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सर्वच चित्रे खूप आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वच चित्रे सुंदर आहेत फक्त तेवढं ते
पहील क्युब वाल चित्र " शाळकरी " सुरयोदयीझम शैलीतल वाटल.
व ते देशीवादाने प्रभावित झालेली मोराखालची / बाप्पावरची बाई
राजस्थानी लोकांच्या खाणावळीत किंवा ट्रक मागे बरेचदा भेटलेली आहे
ते ही सुमारच वाटलं.
आपल एक मत फक्त

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Spring in the air (filled with love)
There's magic ev'rywhere
When you're young and in love

X

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

छान काढता हो चित्र!

(आणि तुम्हाला परवानगी लागते?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नाही, खुसपट काढण्याचा इरादा नाही. आधी म्हटल्याप्रमाणे, चित्र छान आहे, रंगसंगती नयनाल्हाददायक आहे, चित्र एकंदरीत आकर्षक आहे, आणि मुख्य म्हणजे, आतापावेतो या धाग्यावर डकविलेल्या चित्रांपैकी हे एकमेव चित्र मला - मला! - समजले. आणि म्हणूनच अपील झाले. पण म्हणूनच शंकादेखील आली.

बोले तो, चित्रातील होडी. पात्राच्या मध्याच्या बर्‍यापैकी जवळ खुंटाळ्याला बांधलेली दिसते. मात्र, होडीत (किंवा जवळपाससुद्धा) कोणीही नाही. नाही म्हणजे, माझी काहीच हरकत नाही; हा सर्वस्वी त्या होडीच्या चालकाचा नि मालकाचा प्रश्न आहे. चालकाला समजा वाटले, की संध्याकाळी घरी परतण्यापूर्वी होडी नदीच्या मध्यावर पार्क करावी, तर (जोवर मालक हरकत घेत नाही तोवर) ती त्याची मर्जी. (आणि चालकच जर मालक असेल, तर मालकाच्या हरकतीचा प्रश्नच मिटला.) शेवटी लोकशाही आहे. तेव्हा तो प्रश्न नाही.

प्रश्न एवढाच आहे, की होडी पार्क केल्यानंतर तेथून तो घरी कसा जात असेल? दुसर्‍या एखाद्या होडीवाल्याकडून लिफ्ट मागत असेल, की पोहून जात असेल? नि परत दुसर्‍या दिवशी काय? परत कोणी लिफ्ट देतेय काय म्हणून वाट पाहायची, की होडीपर्यंत पुन्हा पोहत जाऊन ओलेचिंब होऊन निथळत्या कपड्यांनिशी होडीत शिरायचे? नाही म्हणजे, होडीपासून/पर्यंत चालत जायला नदीचे पाणी लकडीपुलाखालून वाहणार्‍या ('पूर' न आलेल्या) मुठेइतके उथळ असेलसे वाटत नाही, बर्‍यापैकी खोल वाटते, म्हणून हे कुतूहल, इतकेच. असो.

----------

किमानपक्षी, अशी निदान माझी तरी समजूत आहे. (चूभूद्याघ्या.)

बाकीची सामान्यतः आपल्या नजरेच्या गाळण्यातून ऑपॉप फिल्टर होतात. आणि तशी ती यावेळीसुद्धा झाली!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आबा, चित्र आवडलं.

ओहोटीच्या वेळेस नाव बांधून नावाडी कुठेतरी गेली असेल. नबांचे प्रश्न बघून मला एका प्रदर्शनात आलेला भयभीषण अनुभव आठवला. आमच्याकडे भारतातून पाहुणे आले होते. त्यांच्यातल्या स्त्रियांना कलेची हौस आहे म्हणून ह्यूस्टनच्या चित्रसंग्रहालयात घेऊन गेलो. तेव्हा तिथे जॉन सिंगर सार्जंटच्या चित्रांचं प्रदर्शन आलं होतं. मला त्याची खाणीत काढलेली जलरंगांतली चित्रं बघण्याची विशेष हौस होती. प्रदर्शनाच्या सुरुवातीला थोडी तैलरंगांतली चित्रं होती, इटलीमधल्या कोणत्याशा बागेत काढलेली. एक पाहुणी आणि मी शेजारी शेजारी उभ्या राहून ही तैलरंगांतली चित्रं बघत होतो. मी ती चित्रं पाहताना इटलीतल्या वसंत ऋतूची कल्पना करून बघत होते. अचानक प्रश्न आला -

कला-हौशी पाहुणी - ही चित्रं इथे कशी आणतात?
मी - क्रेटमध्ये घालून आणत असतील.
कहौपा - ती इथे आणायचं कोण ठरवतं?
मी - ह्या संस्थेचे प्रमुख ठरवत असतील.
कहौपा - ह्या चित्रांच्या फ्रेम्स खूप महाग वाटतात. त्याचा खर्च कोण करत असेल?
मी - रात्री हॉटेलात पोहोचल्यावर गूगल करून पाहा.
कहौपा - आम्ही जहांगीरमध्ये एक प्रदर्शन बघायला गेलो होतो. तिथल्या चित्रांच्या फ्रेम्सचा खर्च खूप होतो म्हणून मला माझ्या चित्रांचं काय करायचं ...
मी - आपण रात्री हॉटेलात पोहोचल्यावर ह्या विषयाबद्दल बोलायचं का?

सुदैवाने ह्या कलाहौशी पाहुणीने माझ्या शेजारी उभं राहूनच चित्रं बघायचा हट्ट ह्या वाक्यानंतर सोडून दिला. मी सुखेनैव इटलीतला वसंत ऋतू आणि तेव्हाच्या खाणकामगारांचं आयुष्य ह्यांचा त्या चित्रांसोबत विचार करू शकले. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चंदर-सु

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भारी !!! जलरंग माध्यम सर्वात अवघड वाटतं मला . रंग कमी आणि पाणीच जास्त वापरून शेड्स करतात म्हणे. चित्रात पाणी आणि पाण्यातली हलती सावली मस्त जमलीये .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

माझे आजोबा उत्तम चित्रं काढायचे. वेळ, जागा, माध्यम वगैरेची फिकीर न करता on the fly स्केचेस करायचे. अकौंटंट झालो नसतो तर पोलीस चित्रकार झालो असतो असं ते नेहेमी म्हणायचे. त्यांच्या तालमीत तयार झालेली पोरंही (काका, आत्या, बाबा) छान चित्रं काढतात. त्यांनी 'देऊ' केलेल्या गोष्टींपैकी ही कला मात्र माझ्या अंगावरून वाहून गेली.

शाळेतही फार टिपिकल पद्धतीने चित्रकला शिकवली. त्या म्याडम आणि त्यांचा शिष्यगण अतिशय घिपि चित्र काढायचा. प्रयोग वगैरे केला की म्याडम डोले वटारून बघायच्या. वर्गात एकाने झाडाच्या चित्रात शाळेत मुबलक असलेल्या निलगिरीच्या झाडाची सालं खोडाच्या जागी चिकटवली. म्याडमला पटंना. हळूहळू ते डब्बल तास बंक करून 'ऑक्टोबर ओव्हर' वगैरे रोमहर्षक खेळ खेळायला लागलो, आणि स्वतःपुरता स्वतंत्र झालो. Wink

दोनेक वर्षांपूर्वी चित्र काढायची सणक कुठूनशी आली. रंगात खेळायला लय मजा येते असा शोध लागला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ह्म्म्म्म हेरिडिटरी दिसतय. माझी ज्योतिषाची आवडही तशीच आहे. आईच्या बाबांकडुन आलेली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिद्धी ,चित्र खूप छान आहेत .. मला ते झाडाचं चित्र खूप आवडलं .

हा माझा प्रयत्न

t

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुंदर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद सखी .. मस्तंय हे पण चित्रं . माध्यम काय आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

स्टॅडलर च्या पेंसिल्स आहेत आणि नंतर काही ठिकाणी ओला ब्रश फिरवला आहे .त्यामुळे वॉटर color एफ्फेक्ट आला आहे .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राइट, हे परफेक्त आहे ल्युना पेन्सिलने तंत्र. चित्र पण भारीच

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद अभ्या ,शुचि आणि सिद्धी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त चित्र आहेत सिद्धी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे मी काढलेले व्यंगचित्र. 'व्हेज खाटीक'. Wink
हातानेच काढतो कागदावर, रंग मात्र फोटोशॉपमध्ये भरतो.
bua

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्या बात है सर.

फेसबुकवर तुमची रीसेंट कलाकृती पाहिली. कधीतरी येक छोटेसे फटूशॉपिंग कन्त्राट देईन म्हणतो मीही. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हेहेहेहेहे.
कालचे गिरिजास्वामी पाहिलेत वाट्टं? Wink
कधीही द्या असाइनमेंट सुपारी. वाजवू

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येस्सार पक्का!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मस्त. तुमच्या हाताला वळण आणि वजन छान आहे. हे चित्र कागदावर आधी काढून स्कॅन केल्यासारखं वाटत नाही. सरळ कॉंप्युटरवरच काढल्यासारखं वाटतं. त्यामुळे आणखीच कौतुक वाटलं. काही स्केचपॅड-पेन वगैरे यंत्रं वापरली का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्केच पॅड वगैरे वापरलेत पण कॅलिग्राफी साठी. चित्रे पेन नाहीतर ब्रशनेच काढतो आणि स्कॅन करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणी हे जरा इलस्ट्रेटिव्ह टाइपचे. पोस्टर कलरमध्ये केलेले. साइज १८ बाय १२.
g

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गणपती एक नंबर आहे अभिजित ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लैच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

detailing साठी खूप patience लागतो . भारी अभिजित .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फारच भारी आहे, काय डीटेलिंग आहे. ग्रेट

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जबरदस्त!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

सावकार गणपती दिसतोय Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला मंडईचा वाटला

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मंडईचा ह्म्म्म ... पण पायापाशी सिद्धी (सिद्धीगणपतीतील सिद्धी) दाखविल्याशिवाय शिवाय तो अपूर्ण आहे. मंडईचा म्हटले की दोघे येतात डोळ्यासमोर.

.
.
वेडी झाले
http://www.hindustantimes.com/rf/image_size_800x600/HT/p2/2015/09/26/Pictures/sabudana-sabudana-mohankumar-september-gangurde-thousand-rangoli_e678d6fa-646a-11e5-b95f-5445df9fcc89.JPG

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अप्रतीम! अतिसुंदर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गणपती, मिरवणुकीतले लोकं , पताका , सूर्य सगळंच भारी. हे कसं काढलं ? म्हणजे आधी रेखाटन करून मग रंग दिले की आधी केवळ आउटलाईन करून मग रंग दिले आणि मग बारीक कलाकुसर वरून केली ?
अजून एक प्रश्न - बारीक नक्षीकाम ब्रशने केलं की मार्कर ने ?

परत एकदा मोठं करून बघितलं चित्रं .. रंगसंगतीमुळे गणपतीचं देवत्व आणि बाकीच्यांचं सामान्यत्व जास्ती जाणवतंय ! मस्त .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

एका जाहिरातीसाठी केलेले इल्सट्रेशन असल्याने आधी वेगवेगले कॉम्पोझिशन्स करून पाहिले. एक ए
रफ फायनल झाले तेव्हा पेन्सिलने आऊटलाईन्स काढून प्लेन कलर्स भरले. गणपतीला मास्क केले. नंतर त्याचे कलर भरले. परत मास्क करून ब्लॅक चे काम सर्वात शेवटी. सर्व काम ब्रशने. मार्कर्स नाही. टोटल वेळ: 6 तास.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जबर्दस्त आहे एक्दम. मस्तच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकापेक्षा एक मस्त चित्रं! (अ‍ाणि नबांचे प्रतिसाद.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सिद्धी, मला तुझ्या संशोधनाबद्दल काढलेलं चित्र आवडलं. खरंतर, ते चित्र बघून तू नक्की कोणत्या विषयावत संशोधन करतेस ह्याबद्दल कुतूहलही वाढलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

न्यूरल सिग्नल प्रोसेसिंग मध्ये काम करते. ते चित्र काढलं तेव्हा कॉर्टिकल सिग्नल्स वरून बोटांची / तळहाताची हालचाल प्रेडिक्ट करण्याचं काम करत होते. म्हणून मेंदू आणि हात ... तिथे असणाऱ्या एका पिटुकल्या मुलीचा हात ट्रेस केलाय . ते पांढऱ्या दोऱ्या दिसतायत ते सिग्नल्स आहेत .. माझ्या नवशिकेपणामुळे जरा बोथट झाले Biggrin
आणि मल्टी- डायमेन्शनल सिग्नल्स असल्याने टेन्सर काढलाय बाजूला ..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

तू ज्याला पांढऱ्या दोऱ्या म्हणत्येस ते मला बहुदा पाय वाटले. पण त्यामुळे तू काय सांगणारं चित्र काढलंस ह्याच्या अर्थात फार फरक पडला असं वाटत नाही. टेन्सर हा मला रुबिक्स क्यूब वाटला. मी अर्थ लावला तो साधारण मेंदूत हाता-पायांच्या बोटांच्या हालचालींनी संदेशवहन कसं होत असेल ह्याचं सिम्युलेशन अशा छापाचा. रुबिक्स क्यूब सोडवताना हात कसे हालतील ह्याचा अभ्यास करत असशील म्हणून तो चितारला.

ढोबळमानाने फार निराळा अर्थ लावला नाही तर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सर्वच चित्र भारी आली आहेत लेखातली आणि प्रतिसादांतली.बुद्धी आणि कर्तबगारीवरचं संशोधन दिसतंय.त्याची दोरी हातातच आहे.खरंतर लखोटा/ बटवा उघडण्याच्या दोय्रा आहेत. फणस कापणारा मल्लु आणि पार्किंगमधली होडीसगद्धा आवडली.गणपती, विठोबावगैरे देवता आल्या चित्रात की भाविकपणा डोकं वर काढतो आणि चित्रकारीबद्दल बोलता येत नाही.पारिजातकही मस्त फुलं उधळतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वच चित्रे आवडली. झेनटँगल प्रकारची चित्रं बघायची आहेत, लवकर टाका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मासा फार आवडला.
___
गणेश व विठुराया तर फारच आवडले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वाना एकत्रित धन्यवाद !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

सर्वच चित्रे आवडली. फक्त स्दद्फ्सफ्स्दफ्... या आय.डी. ने एक क्षण भांबावलो. पण नंतर लगेचच लक्षांत आले.

कुकरची मोठी शिट्टी येण्याआगोदर जे आवाज येतात तसं वाटलं.

पूर्वी एक, 'श्याम तेरे कितने नाम' नांवाचा चित्रपट आला होता, त्याची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ॐ नमो छु छां छ

ROFL ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सुरेख! सगळीच चित्र आवडली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असंच म्हणतो. टॅलेंटवाली लोकं आहेत ऐसीवर!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ऐसीची बदनामी थांबवा ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यात बदनामी काय आहे?

(अतिअज्ञानी) बॅटमॅन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे विनोद होता तो. कॉफी जास्त झाल्याने केलेला विनोद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साखर जास्त झाली असती तर अक्षय्य झाला असता. Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाने