दिवाळी अंक २०१६ : फोटोंचे आवाहन
दिवाळी अंकासाठी लेखन मागवण्यासाठी स्वतंत्र धागा आहे; त्याचा हा दुवा.
दिवाळी अंकात फोटो, चित्रं, अशा दृश्य घटकांचाही समावेश असावा अशी इच्छा आहे. त्यासाठी छायाचित्रण स्पर्धेत नेहेमी किंवा क्वचित भाग घेणाऱ्या आणि कधीही भाग न घेतलेल्या सदस्यांसाठी हा धागा. दिवाळी अंकाची संकल्पना आहे - नातीगोती. ह्या संकल्पनेला अनुसरून फोटो मागवत आहोत. आई-मूल, रक्षाबंधन किंवा सुरकुतलेले आजी-आजोबा ह्यापलिकडे, काहीकिंचित अमूर्त कल्पना वापरून फोटो/चित्रं असावीत अशी अपेक्षा आहे. उदाहरणार्थ - मांजराचं लोकरीच्या गुंड्याशी नातं, नात्यांच्या फाईनमन डायग्राम किंवा मुळांचं जमिनीशी नातं (!) असा कल्पनाविस्तार करता येईल.
हे फोटो सदर धाग्यावर लावणं अपेक्षित नाही; फोटो ऐसीच्या इमेल पत्त्यावर पाठवा. ऐसीचा इमेल पत्ता आहे - ऐसीअक्षरे@gmail.com (ऐसीअक्षरेचं स्पेलिंग युआरेलमध्ये आहे तेच - aisiakshare)
फोटो किंवा चित्राच्या कल्पना डोक्यात आहेत, पण प्रत्यक्षात आणता येणं शक्य नाही असं असल्यास व्यनितून संपर्क करा.
हजारोंच्या संख्येने, बघताय काय सामील व्हा. फोटो पाठवण्याची अंतिम तारीख २० ऑक्टोबर २०१६.