मराठा मूक मोर्चा
महाराष्ट्रामध्ये - आणि देशामध्ये - काय चालू आहे हे आम्हासारख्या परदेशस्थ लोकांना मुख्यत्वेकरून वृत्तपत्रांमधून कळते. गेले काही दिवस वृत्तपत्रे 'मराठा मूक मोर्चा' ह्याचे गावोगावचे फोटो दाखवून मोर्चा कसा शिस्तबद्ध होता इत्यादि सांगत आहेत. ह्यांच्या मुळाशी मराठा समाजास राखीव जागांची मागणी हा प्रमुख विषय असावा असे दिसते. पण बरोबरच SC/ST ह्यंना मिळणार्या राखीव जागांबद्दल, त्यांच्या रक्षणासाठी केलेल्या अॅट्रॉसिटी कायद्याबद्दल जळजळहि दिसत आहे.
मराठा समाज म्हणजे काय ह्याबद्दलहि संभ्रम दिसत आहे. कुणबी म्हणजे मराठा का कोणी अलग असाहि उपप्रश्न येथे आहे असे दिसते. (नागपूरला असा भव्य मेळावा २५ ऑक्टोबरला भरणार आहे पण त्यातून कुणबी समाजाला वगळले जाणार आहे असे दिसते. संदर्भ म्हणून इंडियन एक्स्प्रेसची हेडलाईन "Maratha ‘silent march’ in Nagpur on Oct 25, Kunbis excluded. The Sakal Maratha Samaj, which is organising the silent march in the city, has excluded the Kunbis from the protest." पहा.
(माझे थोडे अवान्तर - कुणबी येथे २००० वर्षांपासून राहात आहेत ह्याची कोणास जाणीव दिसत नाही. अशाच एका 'कुणब्या'ने आणि त्याच्या आईने तळेगावजवळ शेलारवाडीला लेणी कोरण्यासाठी देणगी दिली होती असे तेथील कोरीव लेखावरून दिसते.)
सैराट चित्रपटातून कोपर्डीसारखे अत्याचार होतात तेव्हा तो चित्रपटच बहिष्कृत करावा, कोपर्डी घटनेतील गुन्हेगारांना त्यांचे हातपाय तोडून भर चौकामध्ये लटकावून द्यावे अशा मागण्या येत आहेत. माता जिजाऊ, रणरागिणी ताराऊ ह्यांचे वेष करून स्त्रिया मोर्चामध्ये सहभागी होत आहेत.
असले लाखोंचे मोर्चे सुरुवातीला शांततेने चालले आहेत असे दृश्य दिसले तरी ते हिंसाचारी होण्याची कितपत शक्यता आहे? ह्यातून ब्राह्मण समाज सध्यातरी बाजूस ठेवला गेला आहे असे दिसते पण ब्राह्मण समाज अशा चळवळींचे नैसर्गिक शत्रु असतात. ही चळवळ ब्राह्मणविरोधात केव्हा उलटेल?
सध्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या 'ऐसी'च्या विचारवंतांकडून माहितीची अपेक्षा बाळगून आहे. पण तूर्तास तरी ते फेमिनाझी, कुंडली असल्या गहन विषयांच्या काथ्याकूटात गढलेले दिसतात.
ब्राह्मण बहुधा या बाबतीत
ब्राह्मण बहुधा या बाबतीत पाहुण्यांच्या (मराठ्यांच्या) काठीने साप (आरक्षण*) मारला गेला तर बरेच असे म्हणून गप्प बसला असावा !
* आणि सर्व (असोसिएटेड?) प्रागतिक बदल
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
मज्जाच आहे
सांगलीतल्या मोर्चात जे दिसले त्यावरून सांगतो. ब्राह्मणांचे नेतेही यात होते. एवढेच काय तर एस सी एस टी वगळता जवळपास सर्व जाती- ज्यात आरक्षित अनारक्षित सर्वच आले- समाविष्ट होत्या. मुसलमानही होते.
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
अमरावतीतल्या मोर्चात पण ९०
अमरावतीतल्या मोर्चात पण ९० टक्के कुणबीचं होते म्हणतात. एका मित्राची गाडीची वाट पाहता पाहता उगाच खेचत बसलो मि. तो ओबीसी असून मोर्चात गेलेला.
आरक्षण असतांना कायले झेंडे फडकाले गेला होत बे ?
---कायचं भोकाचं आरक्षण आहे? ओबीसी ले लय कमी आहे .. सगळं बाबासाहेबवाले घेऊन जाते साले..फुकटाचं पाहीजे सायच्यांईले... मेन्टयालीटी खराब आहे त्याईची...
ओबीसीले कीती पर्सेन्ट आहे?
---ते काय माईत नाही पन कमी आहे...
मग तुयी मागणी काय होती तीन पैकी?
---लम्बा सन्नाटा ... रीझर्वेशन अॅक्ट्रोसिटी ...
तुया ओळखीचा आहे का कोणी ज्याले अॅक्ट्रोसिटीचा त्रास झालेला... तुम्ही कम शिव्या देता त्याईले कामनाधाम?
---लम्बा सन्नाटा
बरं मन्ग मराठ्याईले ओबीसीत टाकलं तं चालन काय?
---आम्ही मराठा-कुणबीच तर हाओत एकच आहेत सगळं... पण तरी त्याईले अल्लग रीझर्वेशन देल्लं पाहीजे
हीहीही घंटा अबे तुम्ही ओबीसी ना मंग मराठे कशे? सोयरीक करते काय तुमच्या सोबत मराठे? तुमाले त खालताटे म्हणतेत ते..
--- भोकात जाये बे तू... तुयी गाडी नाही आली का अजून?
अजुन बरेच काही
:
:
:
झेंडे - याठीकाणी जरा वेगळा शब्द वापरलेला, तसलं इथे बोलणं काही बरं दिसणार नाही
कम - खुप (किती)
खालताटे/वरताटे - वरचे आणि खालचे कुणबी
कोल्हापुरात तर इतर समाजाचे
कोल्हापुरात तर इतर समाजाचे लोक केवळ सहभागीच होते असे नाही, तर मोर्चातील सहभाग घेणाऱ्यांना पाणी, नष्ट, जेवण, स्वच्छता-सुविधा इ. देण्यातसुद्धा इतरेजनांचाच पुढाकार होता.
डाव
गुजरातच्या पटेलांचे आणि इथल्या पाटीलांचे मोर्चे ही आरक्षणाविरुद्ध केलेली एक चाल आहे. त्याला अनारक्षित सर्व वर्गाचाही पाठिंबा आहे. पण आरक्षण काढा अशी मागणी केली तर दलित तसे होऊ देणार नाहीत, म्हणून उलट मागणी करायची. आणि तसे आरक्षण देणे हे कोर्टाच्या आदेशानुसार शक्य नसल्याने शेवटी सर्वांचेच आरक्षण रद्द होईल वा केवळ आर्थिक निकषावरच आरक्षणाचा नवीन कायदा करावा लागेल, अशी यामागची व्यूहरचना आहे. यामागे मोठे राजकीय नेते व संस्था असाव्यात, पण ते आत्ता पडद्यामागे लपलेले आहेत.
असे काहीसे कानावर आले आहे. पण ठामपणे ते खरे आहे, याचा कोणताही पुरावा नाही.
नैसर्गिक शत्रू?
निदान ह्या चळवळीत तरी ब्राह्मण हे या चळवळीचे नैसर्गिक शत्रू दिसत नाहीत. ही चळवळ उघड उघड भगवी आणि परधर्मीय दलितांविरोधात दिसते आहे. हिंदू तेतुका मेळवावा असे लक्ष्य दिसते आहे.
गंमत आणि गूढ म्हणजे या प्रचंड खर्चिक आणि डोळे दिपवून टाकणार्या मोर्चांच्या आयोजनाबद्दल अथवा प्रणेत्यांबद्दल फक्त कुजबुजीशिवाय अवाक्षरही ऐकू येत नाही. छापील अथवा इलेक्ट्रॉनिक दोन्ही माध्यमांतून. ही गूढ नि:शब्द स्तब्धता मला भयावह वाटते. आतल्या आत गुप्त कटासारखी वाटते.
ही गूढ नि:शब्द स्तब्धता मला
ही गूढ नि:शब्द स्तब्धता मला भयावह वाटते. आतल्या आत
गुप्त कटासारखी वाटते.
करेक्ट. लोकशाही इतकी फ़्लूएंट कधीच नसते.
actions not reactions..!...!
गंमत आणि गूढ म्हणजे या प्रचंड
एवढंच नव्हे तर या मागण्यांविरुद्ध चानेलांवरले चर्चाळ लोकं एकाच रिंगणात फिरत आहेत. "हे चूकीचं आहे असं थेट कोणीच बोलायला तयार नाही" एका विचारवंतांनी एका चर्चेत "मराठ्यांना वेदाध्ययनाचा अधिकार नव्हता" वैगेरे विधानं केली. राजकारण्यांच जाऊद्या, या विचारवंतांना असे दूषित विचार पसरवून काय करायचं आहे कळत नाही. मोर्चे व्यवस्थित प्लॅन्ड आहेत. बाकी काय व्हायचं ते होवो पण तरूण शाळकरी/कॉलेजगोईग मुलांमध्ये "जात" हा विषय मुख्य बोलण्याचा नव्हता तो चर्चेत आलाय, ह्याने समाजाचं प्रचंड नुकसान होणार आहे. आपल्यावर अन्याय होतोय ही भावना सगळ्याच जातींमध्ये बळावतेय. आपल्यावर नागरीक म्हणून काय अन्याय होतोय त्याकडे दुर्लक्ष करून प्रत्येक अन्याय हा विशिष्ठ समाजाचा भाग म्हणून होतोय असं विचित्र "समाजभान" आलेले लोकं आपल्या आजूबाजूला दिसायला लागलेले आहेत. मूक भाषा ही पोस्टरवर, भाषणातून अतिशय भडक आहे. दिशा आहे असं वाटतय पण हे पूर्णतः दिशाहीन आहे. वर म्हटल्याप्रमाणे या उर्जेचं रुपांतर कश्यात होईल हे कळत नाहीये. काल या मोर्चांना सनदी अधिकार्^यांची मदत आहे असं वाचनात आले. त्यातही "समाजाच्या दशेने अस्वस्थ झालेले सनदी अधिकारी" असे विशेषण. मोर्च्यासाठी खास ठाणे गाड्या रेल्वेने सोडल्या. हे सगळच अनाकलनीय आणि अस्वस्थ करणारं आहे हे खरं.
प्रतिसाद वाचला. त्या चर्चेतून
प्रतिसाद वाचला. त्या चर्चेतून काहिर अंग काढून घेतल्याने तिथे लिहिणं आता नको वाटत होतं. पण आता लिहितोच
मुंबईतच रहात असतो तर मी ही हेच विधान केलं असतं. मुंबईबाहेरपडेपर्यंत माझी जात ही ओळख आहे याची मला कल्पनाही नव्हती. मात्र इतर महाराष्ट्रात ही खूप ठळकपणे ठाण मांडून आहे-होतीच. कॉलेज काय अगदी शालेय शिक्षकांकडूनही जातीचा उद्धार होत असे. कोणी कोणाबरोबर खेळायचं हे ही जातीवरून ठरे. आता अनेकांकडून ऐकले आहे. त्यामुळे आता अचानक तो मुख्य बोलण्यात आलाय वगैरे मला वाटत नाही. उलट तो विषय समोरासमोर व थेट चर्चेत आल्याने विद्यार्थ्यांना काही काळाने त्यातील फोलपणा स्वतःच जाणवेल असे मला एकिकडे (माझ्या आशावादी कोपर्यात) वाटते.
याला एक मार्मिक! मात्र याआधीची पायरी अन्याय होतोय हेच मान्य होत नव्हतं. आता एक पायरी पुढे आलोय. दुसरं, पुर्वी अश्य्च्च जन्मदत्त ओळखीवरून म्हणजे स्त्री म्हणून, दलित म्हणून अन्याय होतोय ही ओरड जुनी आहे मग आता अचानक मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी तसा ओरडा केल्यावर लगेच हे समाजभान विचित्र कसं होतं? तुम्ही काय म्हणताय ते कळतंय मात्र जोवर या मोर्चेकर्यांकडून बोट दाखवावं असं काही घडणार नाही तोवर हे प्रश्न उभे रहाणारच!
हे अनाकलनीय याच्याशी सहमत. मात्र अजूनतरी मला यात अस्वस्थ करणारं आहेच असे छातीठोकपणे म्हणता येत नाहिये. एक नवी आणि अतिशय चतुर राजकीय खेळी समोर येतेय. ती अतिशय तरल आहे - तिला असं खटाखट निषेध करून बाजुला सारणं शक्यही नाहि आणि घाईचंही आहे. त्यामुळे अनेक भल्यांभल्यांना यावर नक्की टिका कशी करावी हे सुधरेना झालंय. त्यामुळे मग ते तुम्ही सुरूवातीला उदाहरणादाखल दिलीयेत तशी बेताल विधाने करत टिका करत आहेत. किंवा काहितरी विनोदी वैयक्तिक बोलत आहेत.
जोवर ते टिका करण्यासारखं काहि करत नाहीत किंवा टिका करावी अश्या दिशेनं काही कृती/बोल्णं करत नाहित तोवर मी टिका करायला तयार नाही. मोर्चेकर्यांच्या माणण्यांपैकी बलात्कार्यांना शिक्षा झाली पाहिजे या मागणीव्यतिरिक्त पाठिंबा देण्यासारखंही त्यांच्या मागणीत मला काही दिसत नाही. मात्र मागणी समोर ठेवायची पद्धत निश्चित चतुर, रोचक वैग्रे (राजकीयदृष्ट्यातर कौतुकास्पदही) आहे. या प्रकारच्या राजकारणाकडून इतरही समाजाने शिकणं मला पुढे आरोग्यपूर्ण घुसळण होण्यासाठी आवश्यक वाटतं.
===
अवांतरः
अश्या प्रकारे समोरच्याला टिका करायला संधी न देता आपले म्हणणे निश्चित व ठामपणे मागत रहायचे मात्र समोरच्यावर मागण्याव्यतिरिक्त टिका करायची नाही हे धोरण गांधींनी कित्येक वर्षे आधी रुजवले होते. तेव्हा ते नक्की कसे डिल करायचे याचे ब्रिटीशांनाही ज्ञान नव्हते. आजही ही पद्धत एवढी प्रभावी ठरत असताना तेव्हा या पद्धतीने अख्खा देश जागवला यात मला तरी आता आश्चर्य वाटत नाही. ही पद्धत आहेच अति प्रभावी आणि सोपी असल्याने अनेकांना जोडणारी! जगताना मला गांधींचं कौतुक कितीवेळा वाटणार आहे त्याला काही सुमार नाही!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जात ही ओळख असतेच. आपल्या
जात ही ओळख असतेच. आपल्या कानावर लहानपणापासून पडत असणार्^या चर्चेमधून अमूक एक आपला जातवाला दिसतोय,अमूक आडनाव म्हणजे अमूक जात अश्या प्रकारचे विचार पटकन मनात येतातच. मी ही मुंबईत जन्मले, रहातेय. पण त्या बाबत अभिमान वाटावा वा अन्याय होतोय असं वाटावं असं वातावरण नव्हतं. मैत्रिणीत ओबीसी, बीसी मुले, मुली होत्या. पण त्यांना कमी मार्कात प्रवेश मिळतोय याचं वैष्यम्य वाटलेलं नव्हतं. कोणी ब्राम्हण, अब्राम्हण वा बीसी एवढंच ध्यानात येणार्^या आमच्या मुलांना आता मराठा, कुंणबी वैगेरे ही माहित झालय.आणि यातला फोलपणा तेव्हाच जाणवेल जेव्हा खरोखर सामाजिक दृष्ट्या अस्पृश्य, मागास जातींना आणि त्यातही एका पिढीपुरतं आरक्षण मिळून हळूहळू आरक्षण रद्द होईल, फोलपणा तेव्हाच जाणवेल जेव्हा कोणालाही कोणत्याही कागदपत्रात जात लावावी लागणार नाही. ह्या दृष्टीने काही करायचे सोडून गंगा उलटी कशी वाहेल याकडे लक्ष दिलं जातय.
या वाक्याची अपेक्षा तुमच्याकडून नव्हती. आपली (भारतीय) समाजरचना स्त्रीया आणि दलित यांच्या बाबतीत अन्याय्य होती हे मान्य नाहीय का तुम्हाला? असे मराठे वा ब्राम्हण यांच्या बाबतीत केव्हा तरी होते का? इंग्रजांच्या राज्यात शेतकरी वा एकूणच समाजाला आलेली विपन्नावस्था आणि दलितांची जनावरांसारखी अवस्था यात फरक आहे हो. त्यामुळे स्त्रिया वा दलितांनी असे ओरडणे समजू शकते ( ते प्रत्येक वेळेस न्याय्यच असते असे मला म्हणायचे नाही, समजू शकते एवढेच.) आर्थिक स्थिती चांगली नसताना केवळ सूनेनं नोकरी करणं कमीपणाचं वाटून तिला घरी बसवलेली मराठा कुटुंबे मला माहिती आहेत. "घरात नाही दाणा आणि मला बाजीराव म्हणा" ही वागणूकही आपल्या स्थितीला कारणीभूत आहे हे मराठ्यांना सांगणारा नेता/विचारवंत कोणी दिसत नाही. हे मला धोकादायक वाटतं. आपल्या स्थितीला आपणही जबाबदार आहोत हे समजत नाही किंवा समजू दिलं जात नाही.
अगदी सर्व वर्णांच्या पायाशी बसणं हा आपला धर्मच आहे आणि ते केलं नाही तर भयंकर पाप आहे अशी समजूत असणार्^या द्लितांना ही आंबेडकरांनी सतत "तुमच्या स्थितीला तुम्हा जबाबदार आहात. तुम्ही आपापसात भांडू नका. शिका. स्वच्छ रहा" आदी प्राथमिक शिकवणी सतत दिलेल्या आहेत.
द्लितांची एखाद दुसरी पिढी शिकून आता कुठे पिढ्यान् पिढ्याचं ओझं उतरवायला सज्ज होतेय अश्या वेळेस जाती समाजातून काढून टाकण्याऐवजी त्यातले बारकावे दृढ करत जाणारे हे मोर्चे कितीही मूक असोत समर्थनीय निश्चित नाहीत. आणि त्या मोर्च्याच सामील होणार्^याना 'सामाजिक जाणिव' आहे वैगेरे म्हणणं म्हणजे शुद्ध थोतांड आहे, कारण ते भान अर्धवट आहे. अर्धवट ज्ञान असण्यापेक्षा नसलेलं परवडलं. म्हणून त्याला विचित्र म्हटलय.
काय झालं म्हणजे टीका करण्यास हरकत नाही असं वाटतं तुम्हाला. "आपल्याला आरक्षण नाही म्हणून आपण मागे आणि त्यांना आरक्षण म्हणून ते पुढे" एवढंच पोरासोरांच्या टाळक्यात कोंबणं हे टीकायोग्य नाही का? त्यात समाजातील विचारवंतांनी "नरो वा कुंजरो वा" अशी भुमिका घेणं टीकापात्र नाही का?
आपल्या आजूबाजूला असणारा मध्यमवर्ग एवढांच देश नसतो. अस्जूनही खेड्यात जाती आहेत, लग्नाच्या जाहिरातीत 'एस्सी एस्टी' क्षमस्व आहेत. "आरक्षणामुळे कामं होत नाहीत हो भराभर" असं बँकेबाहेर उभं राहून म्हणणारे पेन्शनर आहेत. कोणत्याही अव्यवस्थेला आरक्षण कारणीभूत आहे हे आपण शोधलेलं सोपं उत्तर आहे. हे सुलभीकरण निव्वळ धोकादायकच नव्हे तर अन्य्याय्य आहे.
आपली (भारतीय) समाजरचना
मान्य आहे.
पण आता दुसर्या एखाद्या समाजाला (सध्या मराठा/ब्राह्मण) तसे वाटत असेल (जे योग्य की अयोग्य हा मुद्दा बाजुला ठेऊ) तर त्यांनी नक्की काय व कसं वागावं असं तुम्हाला वाटतं? का त्यांनी तसे वाटून घेणेच चुक आहे? आणि असेल तर ते त्यांना पटवायचे कोणी आणि कसे?
हे कळलं तर काही उत्तर देता यावे. नुसतंच ते चुक आहे चुक आहे म्हणण्याऐवजी बरोबर कृती कशी असावी? तेही कळु दे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पण आता दुसर्या एखाद्या
वाट्णे आणि असणे यात फरक आहे.
इतिहासाचं, सामाजिक जाणिवेचं भान ठेवून त्यांनी असं वाटून घेणं चूक आहे. आणि हे समाजधुरिणांनी त्यांना पटवायला हवं (हे कोणत्या ग्रहावर रहातात मलाही ठाऊक नाही.)
ऋ, मला कितीही पगार दिला तरी त्या 'जयभीम' वाल्यांकडे जाऊन स्वयंपाक करणार नाही असं म्हणणारी मराठा स्वयंपाकीण मला फार नाही ८ दहा वर्षांमागेच भेटलेली. आणि ते कुटुंब चांगल्या वागणुकीचं, अधिकारी क्वार्टर्समध्ये रहाणारं असूनही. असं वास्तव किती मराठा वा ब्राम्हण कुटुंबाना फेस करावं लागतं?
तू जो युक्तीवाद मांडतोयस तो तूच केलेला आहेस यावर माझा विश्वास बसत नाही. मग याच न्यायाने उद्या मुलांना सीट्स मिळत नाहीत म्हणून मुलींनी प्रोफेशनल कोर्सेसना प्रवेश घेऊ नये वा स्त्री अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा स्त्रिया गैरफायदा घेतात म्हणून ते रद्द्/सौम्य करावेत यासाथी मोर्चे निघाले तर त्यांनाही समजून घ्याव असं वाटेल का तुला?
मग याच न्यायाने उद्या मुलांना
जोवर तो शांततामय आहे आणि विधायक मार्गांनी केली जातोय तोवर माझा कोणतीही मागणी करण्याला विरोध नाही. ते माझ्या विरोधी मतांचे मोर्चे असतील. मी त्या मागण्यांशी सहमत नसेन. मात्र त्यांनी त्यांच्या मागण्यासाठी प्रयत्नच करू नयेत असे मी महणार नाही
जर उद्या माझ्या मागण्यांसाठी कोणी मोर्चा काढला तर मी सहभागीही होईन. त्यावेळी जर माझ्या विरोधकांनी मोर्चा काढु नका असे म्हटले तर मला पटणार नाही त्द्वतच..
===
अजूनही त्यांना तसे (आपल्यावर अन्याय होतोय असे) खरेच वाटत असेल तर त्यांनी काय करावं याचं उत्तर कोणीतरी द्यावं
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
फार संयत भाषेत तुम्ही वास्तव
फार संयत भाषेत तुम्ही वास्तव मांडलेले आहे. (परदेशातील मराठी लोकांचं तर सोडाच ते तर खूप अंतरावर असतात ), पण इथल्या शहरी सुशिक्षित मध्यमवर्गीयांना निमशहरी आणि ग्रामीण भागातील जातवास्तवाबद्दल जे पूर्ण अज्ञान असते, ते भयाण असते . जातवास्तवाच्या पार्श्वभूमीवर वर अश्या प्रकारच्या ,अशी उद्दिष्ट असणाऱ्या आणि एवढ्या संख्येने होणाऱ्या मोर्चानी आधीच पोलराइज्ड समाजाचे पुढे काय होणार याची जाणीव फार लोकांना नाही . मूक आहे , अहिंसक आहे का नाही हे माझ्या मते किरकोळ तपशील आहेत .
समाज आधीच पोलराईज्ड आहे व
समाज आधीच पोलराईज्ड आहे व होता हो! या मोर्च्यांनी त्यातल्या एका गटाला तरी आउटलेट दिलेय!
स्फोट होण्यापेक्षा शांततामय मोर्चे परवडले!
कारपेट खालचा जातीय कचरा (खुलासा: कोणत्याही एका विशिष्ट जातीला कचरा म्हणत नसून एकुणच जातीयतेला म्हहणतोय) बाहेर आल्याने इतके अस्वस्थ का होताय? तो आधीही होताच उलट तो बाहेर आल्यावर त्याला हाताळायचे कसे? करायचे यावर विचार करण्याऐवजी बुद्धीवादी लोकांचा "हा कचरा बाहेरच का काढताय? तो कारपेट खालीच असुदे म्हणून ओरडा का?"
तो कारपेट खालीच बायोडिग्रेड होऊन हळुहळु जिरला असता असा विचार फार भाबडा आहे!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
समाज आधीच पोलराईज्ड आहे व
समाज आधीच पोलराईज्ड आहे व होता हो! या मोर्च्यांनी त्यातल्या एका गटाला तरी आउटलेट दिलेय!
स्फोट होण्यापेक्षा शांततामय मोर्चे परवडले!
ऋषिकेश , आपण एकाच गोष्टीचे दोन वेगळे अर्थ लावतोय . तेही ठीक .
हळू घ्या .
आणि हे 'बुद्धिवादी ' ...कुठे राहतात हे ? : )
बुद्धीवादी धर्मवाद्यांच्याच
बुद्धीवादी धर्मवाद्यांच्याच कॉलनीत फक्त बरोब्बर उलट्या विंगमध्ये रहातात!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
"कोणत्याही अव्यवस्थेला आरक्षण
"कोणत्याही अव्यवस्थेला आरक्षण कारणीभूत आहे हे आपण शोधलेलं सोपं उत्तर आहे. हे सुलभीकरण निव्वळ धोकादायकच नव्हे तर अन्याय्य आहे">
असा बागुलबोवा दाखवणे हे अव्यवस्थेच्या खर्या कारणांपासून लक्ष्य विचलित करण्यासाठी असते. ही अशी 'कार्ड्स' अनेकवेळा वापरली गेली आहेत. मुंबईत मद्रासी कार्ड, नंतर मुस्लिम कार्ड, क्वचित जैन-मारवाडी कार्ड वगैरे. आपली निष्क्रियता आणि नेतृत्वाचे अपयश झाकण्यासाठी ही कार्ड्स उपयोगी पडतात. प्रश्नांची खरी सोडवणूक याद्वारे कधीही होणार नाही हे सर्वांना ठाउकच असते. वरती ऋषिकेश यांनी म्हटले आहे तसे जनमत आणि लोक आपल्या बाजूला वळवण्याचा हा एक (लोकशाहीत) राजमान्य मार्ग आहे.
ता.क. ऋ यांनी संबंधित प्रतिसादात पुरोगाम्यांना (लोक गोळा करण्यात अपयशी ठरल्याबद्दल) नाहक दोष दिला आहे असे वाटते. प्रवाहाच्या विरुद्ध पोहोणे हे सोपे नसते. तसे करणारे लोक नेहमीच अल्पमतात असतात, एकटे पडलेले दिसतात. पण अशा क्षणिक लाटा निर्माण करण्यात आणि त्यांवर स्वार होण्यात त्यांना खरोखर रस नसतो आणि ते त्यांचे ध्येयही नसते. घिसेपिटे तत्त्व मांडायचे झाले तर उत्क्रांती/सुधारणा ही इतकी हळू होत असते की ती घडताना दिसत नाही. कालांतराने तिचे परिणाम दिसतात. क्रांती मात्र झगझगीतपणे डोळ्यांसमोर घडून दिपवून टाकते. तिचे भलेबुरे परिणाम इतके झगझगीत नसतात; किंबहुना पुष्कळ वेळा क्षणिकच असतात.
असे जनमत गोळा करणे हा सत्तेचा मार्ग असतो. तो नेहेमी पुढेच नेतो (पुरः गमनम्) असे नाही. तो लोकांना वापरून घेऊन नेत्यांचे ईप्सित साधून देतो. अर्थात हे साध्य होणे म्हणजेच पुरोगामी होणे, एक पाऊल पुढे पडणे असा दावा नेतागण करू शकतोच.
ऋ यांनी संबंधित प्रतिसादात
इतका कळफलक बडवला त्याचे सार्थक झाले!
आभार आणि सलाम!! आपल्या मुद्द्याचे असे दमदार खंडन झाले की किती समाधान वाटते म्हणून सांगू!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१
+१
लग्नाच्या जाहिरातीत 'एस्सी
आरक्षणामुळे भरभर कामे होत नाहीत हे म्हणणे चूकीचे, निखालस चूकीचे आहे.
पण माझ्या भाच्याला, पुतण्या-पुतणी कोणी का असेना त्याला गुणवत्ता असूनही डावलले जाणे - हेसुद्धा तितकेच चूकीचे आहे.
पूर्वीच्या समाजाने/पूर्वजांनी केलेल्या चूका निस्तरायच्या हेच एक बरोबर नाही पण चला तो मुद्दा सोडला. तरी ती चूक निस्तरण्याला ओपन एन्डेड ठेवणे हेच चूक आहे. काहीतरी शेवटची तारीख हवी जेव्हा आरक्षण संपेल.
.
"स्वच्छ रहा" - हा सल्ला दिला की नाही (वाचन नाही) माहीत नाही पण खरं तर फक्त दलितांना द्यायचे कारणही नव्हते. एकंदर आपण एशिअन्स अस्वच्छ आहोत असे जग समजते. आणि जर इथले लिटील इंडीया पाहीले तर ते खरे आहे हेच आढळते.
.
आरक्षण गेले तर जातीयता जाईल कारण तरच सगळे समान पातळीवरती येतील. आणि हे असे समान पातळीवरती येणे अधिक चांगले.
______________________________________________________________________________
अंतराचा हा मिपावरचा प्रतिसाद -
मस्त उपाय आहे. हा प्रतिसाद आवडला.
"हे चूकीचं आहे असं थेट कोणीच
याचं कारण मूळात "आरक्षण" हेच चूकीचे आहे. आता बास की. सर्वांना समान संधी मिळू देत.
नाशिक दंगल
हिंसाचार होण्याची शक्यता नव्हे, तर हिंसाचार झालेलाच आहे :
दंगल डायरी
सध्या त्याला मराठा विरुद्ध दलित असं स्वरूप आहे. दलित आमच्यावर अत्याचार करत आहेत म्हणून अॅट्रॉसिटी कायद्याचा पुनर्विचार केला पाहिजे अशी मागणी मराठ्यांकडून होते आहे आणि संघाचे ब्राह्मण मुख्यमंत्री त्यासमोर हतबल होत आहेत असं सध्या तरी चित्र आहे.
ठीक. हेदेखील वाचा असं सुचवेन. ऐसीकरांच्या त्यावरच्या प्रतिक्रिया रोचक आणि उद्बोधक आहेत -
सांस्कृतिक दहशतवादाचं आव्हान... : प्रज्ञा पवार ह्यांनी केलेलं भाषण
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
असले लाखोंचे मोर्चे
असा पुर्ण प्रश्न आहे. त्यातील अर्धाच भाग उचलून बघा बघा दंगल झाली, हिंसाचार झाला असा ओरडा करण्याला काय अर्थ आहे?
नासिक दंगल लाखोंचे मोर्चे चालु असताना किंवा मोर्च्यांमुळे झालेली नाही. तेव्हा उगाच त्याचे उदाहरण नको.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
क्षमस्व, पण...
घटनाक्रमः
२५ सप्टेंबर : नाशिकमधला मराठा मोर्चा
६ ऑक्टोबर : आदिवासी विकास परिषदेचा मोर्चा
१० ऑक्टोबर : नाशिकमध्ये जनक्षोभ
पीडित मुलगी मराठा होती आणि अत्याचार करणारा अल्पवयीन दलित समाजाचा होता असं ऐकिवात आहे, पण घटनाक्रमाविषयी इतक्या उलटसुलट बातम्या येत आहेत की नक्की काय झालं होतं ते सांगणं कठीण आहे. तरीही ह्या घटनेविषयी अफवा पसरल्या, घटनेला जातीय स्वरूप आलं आणि त्यानंतर दंगलीत दलितांना लक्ष्य केलं गेलं हे वादातीत असावं.
१५ ऑक्टोबर : जिल्ह्य़ात ५६ गुन्हे दाखल, १२० जणांना अटक
वृत्तपत्रांतून उपलब्ध झालेली माहिती पाहता ह्या प्रकारच्या भावना भडकावण्यामागे आणि त्या भडकवून घेण्यामागे सध्या चालू असलेल्या मराठा मोर्चांचा काहीही संबंध नाही असं विधान मला खूपच धाडसी वाटतं. त्यामुळे मी तरी ते करू शकत नाही. बाकी तुमच्या मताचा आदर वगैरे अध्याहृत आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बटरफ्लाय इफेक्ट काय कशातही
बटरफ्लाय इफेक्ट काय कशातही लावता यावा. पण ही दंगल मोर्चेकर्यांमुळे नाहीये इतकं नक्की
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
छान किती दिसते फुलपाखरू, पण...
आणि तरीही बटरफ्लाय इफेक्ट? बरं.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मोर्चेकरी त्यात सामील होउन
मोर्चेकरी त्यात सामील होउन किंवा मोर्चा चालु असताना ही दंगल झालीये का? नाही. कोल्हटकरांचा प्रश्न त्याच्याशी संबंधित होता. त्या प्रश्नावर बंदूक ठेऊन इतरच गोळीबार चालुये
त्यांचा प्रश्नः
इतका जमाव असल्यावर हिंसाचार होण्याची शक्यता किती इतका साधा प्रश्न आहे हा!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
स्थूलातून सूक्ष्माकडे
आणि मी म्हणतोय, की
थोडक्यात, समाजघटकांच्या मनात खदखदत असलेला (त्याच त्याच गोष्टींबाबतचा रोष किंवा आपल्यावर अन्याय होतो आहे ही भावना) पद्धतशीरपणे राबवून दोन्ही कृती (मोर्चे आणि मग दंगली) घडवल्या जात आहेत. हा कार्यकारणसंबंध 'मोर्चात खूप लोक एकत्र येतात आणि लगेच ते हिंसक होतात' इतका उघडउघड नसून सूक्ष्म आहे.
जाता जाता : धागालेखकाच्या अपेक्षेनुसार मराठा मूक मोर्चांविषयी काही मुद्दे गांभीर्यानं मांडले, तर त्यांना अवांतर / विनोदी श्रेण्या देऊन काही लोकांचा भावनिक निचरा होतो आहे ही बाब (दंगलीत भावनिक निचरा होण्यापेक्षा) चांगलीच आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही आनंदाचीच गोष्ट आहे
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
असहमत आहे.केवळ एकाच काळाच्या
असहमत आहे.
स्कोर सेटलींग अधिक आहे.
केवळ एकाच काळाच्या तुकड्यात दोन गोष्टी घडल्यानं त्याचा परस्परसंबंध स्वयंस्पष्ट आहे म्हणणं हे अतिसुलभीकरण झालं
१. मोर्चे शांततामय आहेत त्याहून मुख्य ते अतिशय व्यवस्थित नियोजित आणि शिस्तबद्ध आहेत. त्या उलट हि दंगल अगदीच धसमुसळी तात्कालिक क्षोभातून आलेली आहेच.
२. मुख्य म्हणजे दंगल हि स्थानिक पातळीवरचे हेवेदावे, नुकतीच जाहीर झालेली मतदारसंघनिहाय आरक्षण यादी आदी स्थानिक घटकांच्या क्षोभातून झालेली आहे. त्यामागे वाईड (दलित मराठा वगैरे) विचारांपेक्षा ऐसीवरही चालू असते तसे
३. दोन्ही घटक (मोर्चाचे आणि दंगल करणारे) हे एकच असण्यापेक्षा ते वेगळे असण्याचीच शक्यता अधिक आहेच. किंबहुना दंगल हि मोर्चातील शांततामय विरोध या युएसपीला मारक असण्याची शक्यता लक्षात घेता दंगलेच्छुक मोर्चेकरांच्या विरोधी पक्षात असण्याची शक्यता मोठी आहे.
तेव्हा मोर्चाचामुले लोक जमली माथी भडकली नि दंगल झाली हा अतिसुलाभिकृत आभास गोष्टी वरवर बघून निष्कर्षाला यायची घाई करणाऱ्या जनतेत तरी उभा करण्यात दंगलखोर यशस्वी झाल्याचं चित्र तुमच्या प्रतिसादामुळे दिसत असलं तरी हा निष्कर्ष तथ्याच्या जवळपासही जाणारा नाही असे माझे मत आहे. मी इतक्या घाईने या निष्कर्षाला येऊ शकत नाही. तितका विदा मला दिसत नाही आणि तर्कहि त्या बाजूला नाही
---
मी मोर्चेकरांच्या मागण्यांच्या बाजूने असेन नसेन पण लोकशाहीत अशा पद्धतीने विरोध करण्यांच्या (आणि तशाप्रकारच्या विरोधकांना थांग लागू न देणाऱ्या अहिंसक राजकारणाच्या फ्लेवरच्या) बाजूने नक्कीच आहे. त्यांच्या विरोधकांनीही असेच शांततामय नि प्रभावी राजकारण केल्यास त्यातून निघणारे उत्तर प्रभावी असेल यात शंका नाही.
पण अशा राजकारणाची सवय नसल्याने अनेक तथाकथित पुरोगाम्यांना नक्की कसला विरोध करावा हे कळत नाहीये (पण आपलं पुरोगामी असणं मिरावण्यासाठी कसलातरी विरोध आवश्यक आहे) त्यामुळे यात राजकारण आहे या उघड सत्यालाच ते काहीतरी उलगडल्याच्या थाटात सांगत आहेत. अरे यात राजकारण आहे म्हणजे काहीतरी घातकच आहे असा बालिश युक्तिवाद सर्वत्र होताना दिसतो आहे.लोकशाहीत राजकारण होणे हे अतिशय गरजेचे आणि प्रमुख अंग आहे. त्यात वाईट काय?
राहता राहिले ब्राह्मण ते महाराष्ट्रात उरलेतच किती कि त्यांचा विचारही करावा कोणी. ते नव्या महाराष्ट्रात गैरलागू आहेत हे वास्तव जितक्या लवकर स्वीकारतील तितके उत्तम
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
सूक्ष्म भेद
सोशल मीडियातून पद्धतशीरपणे वातावरण तापवून दिलं गेलं होतं. काही व्हॉट्सअॅप ग्रूपचे अॅडमिन अटकेखाली आहेत. त्यामुळे केवळ तात्कालिक क्षोभातून सहज झालेली ती दंगल नव्हती, तर घटनेचा फायदा उठवत तिचं नियोजन केलं गेलं. मोर्चांच्या अगोदरही सोशल मीडियावर पद्धतशीरपणे मराठा समाजाला अशाच प्रकारे टार्गेट करून संघटित केलं गेलं.
मुळात मराठा-दलित हेवेदावे अनेक वर्षांपासून स्थानिक पातळीवर कित्येक ठिकाणी होते. गेली कित्येक वर्षं वेळोवेळी त्यांचे हिंसक पडसादही उमटत होते आणि त्याचे राजकीय फायदेही घेतले जात होते. उदा. आरक्षणामुळे मराठा समाज चिडलेला होताच. अॅट्रॉसिटीमुळे आपण पिडले जातोय ही भावनाही होतीच, आणि निम्नजातीय पोरी आपली मालमत्ता, पण आपल्या पोरी मात्र जिजाऊच्या लेकी ही भावनाही होतीच. ह्या सर्व घटकांचा मोर्चासाठी वापर हेतुपुरस्सर आणि पद्धतशीरपणे केला गेला हे अगदी उघड आहे. आणि हेच घटक दंगलींमागे कार्यरत होते हेसुद्धा हळूहळू स्पष्ट होतंय. त्यामुळे "एकाच काळाच्या तुकड्यात दोन गोष्टी घडल्यानं त्याचा परस्परसंबंध आहे" एवढंच मी म्हणत नाही आहे, तर दोन्ही गोष्टींमागचे हितसंबंध, लोकभावना आणि त्यांचा वापर करण्याची पद्धत एकसारखी आहे असा अधिक व्यापक दावा मी करतो आहे. शिवाय, "परस्परसंबंध स्वयंस्पष्ट आहे" असं मी म्हणत नाही, तर हे सर्व समान घटक पाहता ह्या गोष्टींचा परस्परसंबंध लावता येणं शक्य आहे असं म्हणतोय.
मोर्चे वाईट आहेत की चांगले ह्याबद्दल मी काहीच म्हटलेलं नाही, आणि मोर्चांना विरोधही केलेला नाही. त्यामुळे हे मी अंगाला लावून घेत नाही. ज्यांना तसं वाटत असेल त्यांनी तुमच्या मुद्द्यांचा प्रतिवाद जरूर करावा. बाकी पुरोगामीपणा मिरवणं किंवा उघड सत्याला थाटात सांगणं वगैरे मुद्दे अवांतर शेरेबाजी म्हणून (श्रेणी न देता) दुर्लक्षित केले आहेत.
अरे वा! आली की श्रेणी. भावनांचा निचरा झिंदाबाद.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
छान प्रतिसाद
विशेषतः मुद्दा क्र. ३ पटला.
क्या ब्बात है! मस्तं !
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
आभार नेमक्या त्याच मुद्याकडे
आभार
नेमक्या त्याच मुद्याकडे सोयीस्कर नव्हे तर सराईत दुर्लक्ष केलं जातंय
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
पुरोगामी नसणारे आणि अशाच शिस्तबद्ध राजकारणाची सवय असणारे
>>>पण अशा राजकारणाची सवय नसल्याने अनेक तथाकथित पुरोगाम्यांना नक्की कसला विरोध करावा हे कळत नाहीये (पण आपलं पुरोगामी असणं मिरावण्यासाठी कसलातरी विरोध आवश्यक आहे) त्यामुळे यात राजकारण आहे या उघड सत्यालाच ते काहीतरी उलगडल्याच्या थाटात सांगत आहेत. अरे यात राजकारण आहे म्हणजे काहीतरी घातकच आहे असा बालिश युक्तिवाद सर्वत्र होताना दिसतो आहे.लोकशाहीत राजकारण होणे हे अतिशय गरजेचे आणि प्रमुख अंग आहे. त्यात वाईट काय?
क्या ब्बात है! मस्तं !<<<
अनुपशेठ ,
पुरोगामी नसणारे आणि अशाच शिस्तबद्ध राजकारणाची सवय असणारे आता राज्य करत आहेत . त्यांना झेपतं आहे का हे बघू. कसें ?
मागणी अवास्तव आहे असं माझं मत
मागणी अवास्तव आहे असं माझं मत आहे. पण शेवटी ऋ म्हटल्याप्रमाणे आपण बरोबर काय आहे ते पॉप्युलॅरिटीने ठरवतो. यामागे राजकारण नक्की आहे. अशीच आंदोलनं गुजरात, हरियाणा आणि राजस्थानमध्ये झाली आहेत. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा या सर्व ठिकाणी भाजपा सत्तेत आहे. यात योगायोग नाही. या गुजरात, महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यात आत्ता एक गोष्ट कॉमन आहे. ती म्हणजे त्या त्या राज्यातल्या डॉमिनंट जातीकडे मुख्यमंत्रीपद नाही. खट्टर जाट नाहीत आणि फडणवीस मराठा नाहीत. भाजपा हायकमांडने हे जाणीवपूर्वक घेतलेले निर्णय आहेत असं म्हणता येईल. ही झाली पार्श्वभुमी.
सध्याच्या राज्यकर्त्यांना हे हाताळणं जमणार नाही हे नक्की. तेवढी बुद्धी/स्किल्स भाजपाकडे नक्की नाहीत. गुजरात आणि हरियाणा मध्ये अशीच आंदोलनं हाताबाहेर गेली आहेत. राजस्थानमधलं गुज्जर आंदोलन पेटलं नाही फक्तं. हरियाणामध्ये सुरुवातीला शांतित चाललेलं जाट आंदोलन शिस्तीत काँग्रेसच्या माजी मुख्यंत्र्यांनी भडकवलं होतं. पण त्याला भाजपाच्या एका मंत्र्याचं बेजबाबदार वक्तव्य कारणीभूत ठरलं होतं. (जो जाटांशी वाकडं असलेल्या ओबीसी जातीचा होता.) कोऑर्डिनेटेड हिंसाचार हाताळायला खट्टर सरकार सपशेल फेल गेलं. गुजरातेत हे कसं हँडल करावं हे आनंदीबेन पटेलना समजलं नाही. त्यामुळे उद्या हिंसाचार झालाच तर फडणविसांना जमेल हे आटोक्यात ठेवायला हे म्हणायला काही आधार नाही.
पण हिसाचार झाला तर आंदोलन वीक होइल असं वाटतय. या आंदोलनात पांढरपेशे/उच्चशिक्षित मराठा लोक खूप संख्येने हजर आहेत. स्त्रीयादेखील भरपूर आहेत. हा वर्ग हिंसाचारापासून दूर राहील असं वाटतय. किंबहुना हिंसक नाही म्हणूनच बुद्धीजीवी वर्ग/पेपर यांचा पाठिंबा आहे आंदोलनाला. हिंसाचार होणार नाही/ झाल्यास आंदोलन अशक्त होईल हे म्हणण्याला अजून एक आधार म्हणजे हे आंदोलन मराठा असून ब्रिगेडी पब्लिक यात फार कुठे दिसत नाही. किंवा ब्रिगेडी अजेंडा पुढे दिसत नाही. मधूनच बाबासाहेब पुरंदर्यांचा पुरस्कार काढून घ्या वगैरे मागण्या आल्या होत्या पण त्या अल्पजीवी होत्या. ब्रिगेडी लोक मराठा = कुणबी आणि म्हणून आरक्षण अशी मांडणी करतात. या मोर्चात कुणबी फार नाहीत असं कुठशी वाचलं होतं.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
ठीक आहे ...lets revisit this
ठीक आहे ...lets revisit this debate after 3- 4 months . तुम्ही म्हणता तसे हे सगळे benign असेल आणि फुरोगामी चूक असतील तर चांगलंच होईल . पण बघूयात !!!
benign आहे असा दावा नाही. हा
benign आहे असा दावा नाही. हा पद्धतशीर राजकारणाचा भाग आहे आणि म्हणूनच त्यात दंगल हा भाग त्याचाच भाग नसून किंवा नियोजित नसून इतरांकडून (बहुधा मोर्चेकऱ्यांच्या विरोधकांकडून) प्रक्षिप्त आहे असा माझा अंदाज आहे.
पुढे अधिक तथ्ये समोर आली तर माझे मत बदलायला मी आजवर अनेकदा तयार झालो आहे. पण सध्या अमोर जे आहे त्यावरून तरी दंगलकरी व मोर्चेकरी एका नाहीत असे माझे मत झाले आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
benign आहे असा दावा नाही. हा
पुनरुक्त प्रकाटाआ
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
प्रकटाह म्हणजे काय ?
प्रकटाह म्हणजे काय ?
ऋ - तू मोर्चे किंवा जमलेली
ऋ - तू मोर्चे किंवा जमलेली गर्दी कीती शांततेने वागतीय, कीती शीस्तबद्ध आहे ह्यावरच भर देतो आहेस. मागणी बरोबर आहे का चुक आहे हे महत्वाचे नाही, गर्दी ( आत्तातरी ) शांत आहे हे महत्वाचे. काय काळ आला आहे ह्या देशात...
मागणी जर चुकीची असेल आणि ती मान्य झाली तर त्याची फळे ही चुकीचीच मिळतील, मग ती मागणी कीती का शांत पद्धतीने केलेली असेल.
नव्या महाराष्ट्रात ब्राह्मण गैरलागू आहेत हे मात्र तुझे विधान सत्य आहे. ब्राह्मणांना ते कळेल की नाही कोणास ठाऊक?
--------
अवांतर : काही प्रश्न आहेत, इथे टाकतेच, पण प्रश्नांच्या धाग्यावर पण टाकते.
१. नविन धर्म काढुन त्याला सरकार मान्यता मिळावी म्हणुन काय प्रोसीजर आहे.? म्हणजे मी "अबक" धर्म स्थापन केला आणि नवरा आणि मुलगी त्यात सामिल झाले तर आम्हा तिघांना अल्पसंख्य म्हणुन सर्व सोयी सवलती मिळतील का?
२. पारशी होता येत नाही हे माहीती आहे, पण जैन होयचे असेल तर काय काय करावे लागते?
मागणी बरोबर आहे का चुक आहे हे
लोकहाशीत चुक बरोबर असे काही नसते - सामाजिक प्रश्नांवर तर नाहिच नाही. हे चुक आहे की बरोबर हे ठरवणार कोण? मुख्य म्हणजे कसे?
लोकशाहित बहुसंख्यांचे मत पुढे रेटले जाते - चुक बरोबर पेक्शा तो निर्णय बहुसंख्यांना (तेथी थेट नाही तर निवडून दिलेल्या प्रतिनिधिंपैकी उपस्थित असणार्यांचे बहुमत) मान्य आहे का? इतकेच महत्त्वाचे असते.
ज्यांना ते चुक वाटते त्यांनीही संघटित व्हावे आणि त्यांचे म्हणणे का चुकीचे आहे ते बहुसंख्य अतदारांना पटवावे - ते ही शांततामय मार्गाने. जर तसे केले नाही आणि तुम्हाला चुक वाटणारे मंजूर झाले तर त्याचा दोष केवळ त्यांचा नव्हे तर त्याला योग्य त्या प्रकारे विरोध करू न शकणार्यांचाही तितकाच आहे.
तेव्हा लोकशाहीत बदल घडवायचा तर माणसे जोडावी लागतात. ते सध्याच्या बोरुबहाद्दर फुरोगाम्यांना कुठले जमायला. ते आपलेच शहाणपण पाजळण्यात
मग ज्यांना येनकेनप्रकारे माणसे जोडता येताहेत त्यांच्या मतानुसार झाले तरी यांचा थयथयाट.
व्यस्तव्यग्र असतातम्हणतात तसे लोकशाही काही सर्वोत्तम पद्धत नव्हे पण अजून तरी त्याहुन चांगली पद्धत दृष्टीपथात नाही.
====
महाराश्ट्राला सगळ्यात मोठी वानवा आहे ती समाजसेवकांची. गेल्या २०-२५ वर्षांत महाराश्ट्रात समाजसेवा करून जनमत जमवू/वळवू शकणारे फारसे कोणि झाले नाहिये. एकेकाळी फुले, आगरकर वगैरेंची फळी होती पुढे आंबेडकर होते. त्यानंतर मोठी पोकळीच आहे. अण्णा हजारे या व्यक्तीची समाजकारणाशी राजकारणाशी सांगड घालणारी व्यक्ती म्हणून नाव घ्यावे लागावे यातच बरेच काही आले.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
अवांतर असेलही पण....
>>लोकहाशीत चुक बरोबर असे काही नसते - सामाजिक प्रश्नांवर तर नाहिच नाही. हे चुक आहे की बरोबर हे ठरवणार कोण? मुख्य म्हणजे कसे?
लोकशाहित बहुसंख्यांचे मत पुढे रेटले जाते - चुक बरोबर पेक्शा तो निर्णय बहुसंख्यांना (तेथी थेट नाही तर निवडून दिलेल्या प्रतिनिधिंपैकी उपस्थित असणार्यांचे बहुमत) मान्य आहे का? इतकेच महत्त्वाचे असते.
लोकशाहीत असे नसते.
लोकशाहीत लोक चूक किंवा बरोबर हे ठरवण्याची सिस्टिम उभी करतात. प्रत्येक गोष्ट लोक ठरवत नाहीत कारण लोक प्रत्येक बाबतीत एक्सपर्ट नसतात. त्या सिस्टिमवर लोकांचा प्रतिनिधींमार्फत कंट्रोल असतो.
लोकपाल कायदा असावा की नाही ते लोक ठरवतात. त्यातली कलमं काय असावीत, चेक्स & बॅलन्सेस काय असावेत ही प्रत्येक गोष्ट लोक ठरवत नाहीत. ते करण्यासाठी लोकांनी अधिकारी/वकील इत्यादींची सिस्टिम उभारलेली असते.
जनरल प्रॅक्टिशनर म्हणून कोणास परवानगी द्यावी त्याचे निकष काय असावेत. परीक्षा कोणी घ्यावी, काय अभ्यासक्रम असावा हे लोक ठरवत नाहीत.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
ऋ म्हणतो तसं होऊ नये हे
ऋ म्हणतो तसं होऊ नये हे बरोबरच. पण तस होत तर आहे. आप्/भुषण यांचा मोहल्ला सभा/ ग्राम स्वराज्य वगैरे प्रकार बोगस आहेत असं स्पष्ट मत आहे. जास्तं विकेंद्रिकरणं वाईट असतं. सरासरी भारतीय माणूस ढ आणि अज्ञानी असतो.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
लोकशाहीत लोक चूक किंवा बरोबर
सिस्टिम बदलायची असली तर अधिकार कोणाला असतो? लोकप्रतिनिधिंना. ते कोण निवडून देतात लोकं! म्हणजे बहुमत/जनमत निर्माण केल्याखेरीज सामाजिक प्रश्नात सिस्टिम बदलणं लोकशाहीत खुप दुश्कर असतं!
जनमत निर्माण करण्याला लोकशाहीत अनन्यसाधारण महत्व आहे. सध्या ते तयार न करताच फक्त लेख लिहून अथवा मोठमोठ्याने टिव्हीवर ओरडून लोकांना पटेल अशा अविर्भावात कित्येक फुरोगामी असतात. लोकांना खरोखर पटण्यासाठी काही ठोस कार्यक्रम करायची त्यांची इच्छा नसते.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
जरी निवडुन दिलेल्यांनी
जरी निवडुन दिलेल्यांनी वाट्टेल तसे कायदे केले तर ( आमच्या नशिबानी ) सुप्रिम कोर्ट चालवुन घेत नाहीये.
गेल्या कित्येक वर्षात भारतातल्या लोकशाहीची लाज सुप्रिम कोर्टानीच सावरली आहे.
आँ??
हे शब्द साक्षात ऋ कडून? ई का हुई गवा? भानामती वगैरे काही?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
कोणी म्हटलंय याला मी महत्व
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मागणी जर चुकीची असेल आणि ती
+१
ऋषिकेश , मोर्च्याच्या वेळी
ऋषिकेश , मोर्च्याच्या वेळी हिंसा झाली नाही हे जरी खरे असेल तरीही ...
जेव्हा काही विशिष्ट मुद्द्यावर , ( या केस मध्ये आरक्षण आणि कोपर्डी) एवढ्या मोठ्या संख्येने लोकं एकत्रित येतात , आणि कनेक्टेड असतात आणि त्यानंतर लगेचच तोच मुद्दा असलेली घटना घडते किंवा घटनेची अफवा पसरते तेव्हा मोठ्या प्रमाणावर जनक्षोभ होणे हे नैसर्गिक असते . आणि हल्ली जनक्षोभ ( बहुतेक वेळेला ) दंगल/हिंसा करून एक्सप्रेस केला जातो . तेव्हा संबंध आहेच ....तेव्हा आपले मतभेद या विषयावर
अवांतर मुद्दा : हे अश्या धर्तीवरचे संघटन , हा महाराष्ट्रात एक नवीन प्रयोग आहे ... एखादी कायदेशीर दृष्ट्या होऊ न शकणारी , किंवा एकांगी मागणी होऊन एवढ्या मोठ्या प्रमाणात समाजाचा काही भाग एकत्र येत असेल , आणि त्यांना हवी असलेली ( योग्य किंवा अयोग्य मागणी हे आत्ताच्या घडीला बाजूला ठेवूया ) मागणी जेव्हा पुरी होत नाही तेव्हा एवढा एकत्रित समाज कंट्रोल करणे कोणाला शक्य असते का ? रामजन्मभूमी आंदोलन आंदोलन विसरलात का ?
त्या वेळेला अडवाणींनी रथयात्रा व ६ डिसेंबर ला घडलेल्या घटना यांचा एकमेकांशी संबंध नाही असे आपण म्हणू शकतो का ? ( कारण रथयात्रेच्या वेळी तर बाबरी मशीद पडली नाही असे लॉजिक वापरून ?)
वर तपशिलात लिहिलं आहे जंतूंना
वर तपशिलात लिहिलं आहे जंतूंना दिलेल्या ताज्या प्रतिसादात
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
आरक्षण हा मुद्दा भाजपच्या
आरक्षण हा मुद्दा भाजपच्या* "सर्व मतदारांच्या" जिव्हाळ्याचा आहेच !!!
*भाजप ऑफिशिअली हा मुद्दा आपल्या अॅजेंड्यावर घेणार नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
?
"सर्व मतदारांच्या" असं का म्हणता ते समजलं नाही? आरक्षण देणार म्हणायचं, द्यायचं नाही आणि काही राजकीय खेळी करायची का कसं?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
मराठा मोर्चांवर मराठा
मराठा मोर्चांवर मराठा समाजातल्या पुरोगाम्यांचे मौन अनाकलनीय आहे . विरोध करण तर दूर ते मोर्चाना सक्रिय पाठिंबा देत आहेत . समाजतल्या /जातीतल्या बहुसंख्याना विरोध करण जिकिरीचं असतं . ब्राह्मण व्हाटस अप ग्रुप / गेट टुगेदर मध्ये मोदी /भाजप//हिंदुत्वविरोधी असणाऱ्याचे काय हाल होतात हे मी स्वानुभवावरून सांगू शकतो . शेवटी बहुसंख्यांसोबत सिंक मध्ये राहणे हाच सोपा पर्याय .
दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम नज़र में ख़्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो जिंदा हो तुम
निवडणुका
महाराष्ट्रातल्या कित्येक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होतं आहे. हे होणं अपेक्षित होतंच. म्हणजे, निवडणुका जवळ आल्या आहेत हे सर्व राजकीय पक्षांना ठाऊक होतंच. नेमक्या अशा वेळीच मराठा समाजाला असं संघटित करण्यामागे राजकीय डावपेच असतील, की हादेखील कशाच्याही मागे बटरफ्लाय इफेक्ट असल्याचा विनोदी / अवांतर दावा?
श्रेणींच्या प्रतीक्षेत आहेकुणाचा तरी भावनिक निचरा करता आल्याबद्दल आनंदात आहे- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
भावी भयानक घटनांची चाहूल ?
तांत्रिक मुद्दे ( कोण पार्टीसिपेट होतंय आणि कोण नाही वगैरे ) सध्या जरा बाजूला ठेवून मी विचारतो , की :
एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांना , न पुऱ्या होऊ शकणाऱ्या मागण्या करण्यासाठी संघटित केले जाते तेव्हा , नंतर या मोठ्या जमावाला ( जो मागण्या पूर्णपणे किंवा अंशतः अमान्य झाल्यावर) या जमावाला आवर कोण घालू शकेल ? आठवा रामजन्मभूमी आंदोलन ... व त्यानंतरच्या दंगली ...(मंदिर अजून बनतेय .. २४ वर्षे झाली तरी ...)
१)आताच बातमी ऐकली - टाइम्स
१)आताच बातमी ऐकली - टाइम्स स्केअरमध्येही मोर्चा निघाला.
२)समजा हे आरक्षण दिलं तर राहिले कोण? सिधि ,पारशी,जैन?
३)विनायक मेटेंनी हा झेंडा खांद्यावर घेतला तेव्हा कोणाचं राज्य होतं?
३-अ)त्यावेळी त्यांच्यामागे जाऊन आरक्षण मिळवलं असतं तर ते मोठे नेते ठरले असते.
३-ब)त्यावेळेस सरकार पडण्याची भिती वाटली का?
३-क)आता दुसय्रा नेत्यांनी झेंडा घेतलाय. एक विरोध म्हणून एक कार्यक्रम हाताशी आला,मिळालं तर श्रेय यांनाच.
सी के पी समाज
सी के पी समाज रहातोय.
प्रतिक्रिया
सकाळ वा मटा वर या मोर्चाविषयी ज्या बातम्या येतात त्यांत, एल्गार, वादळ वगैरे शब्द वापरुन, संपादक त्याचे ग्लोरिफिकेशन करतात. आणि त्यावरच्या प्रतिक्रियांत दलितांना आणि ब्राह्मणांना शेलक्या शिव्या हासडलेल्या असतात. खर्या ब्राह्मण नांवाने विरोधी प्रतिक्रिया दिल्यास, " भटुरड्यांनो, घरांत बसून वरण-तूप-भात खा, वा संध्या करुन गुमान पडून रहा, पण आमच्या बाबतीत नाक खुपसू नका" वगैरे प्रतिक्रिया वाचल्या आहेत. दिवसेंदिवस त्या प्र्तिक्रियांचे स्वरुप जास्त उग्र होत चालले आहे.
आग लावणे सोपे असते, पण ती आटोक्याबाहेर गेल्यास कोण विझवणार ?
बाप रे
बाप रे
सहमत
अगदी सहमत. ब्राह्मण आणि दलित समाजाच्या विरोधातली ह्या प्रकारची भडकाऊ शब्दरचना मराठा समाजाकडून खाजगीमध्ये येताना कित्येक वर्षांपासून सातत्यानं पाहतो आहे. आता मोर्चे जरी शांततेत निघत असले तरी ती एक हुशारीने खेळलेली राजकीय खेळी आहे, आणि मोर्चात लोकांना आणण्यासाठी खाजगीमध्ये पुन्हा तीच भडक भाषा वापरली जात आहे. केवळ मोर्चा शांततेत निघत आहे म्हणून मागची ती भडक भाषा लपत नाही. आणि मोर्चामधल्या मागण्यांआडची सरंजामी विचारसरणी तर अगदीच स्पष्ट आहे. मग दंगली झाल्या की केवळ मोर्चा शांततेत निघतो आहे म्हणून हे दंगलखोर लोक वेगळेच आहेत असं म्हणायला जीभ उचलत नाही.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मी एका कारणासाठी मोर्च्यांचे
मी एका कारणासाठी मोर्च्यांचे येणारे वेगवेगळ्या जिल्ह्यात अतिशय खाजगी व मराठा गटांमध्ये पाठवलेले किमान
10(आताच मोजले) 18 मेसेजेस (व्हॉट्सऍप, ईमेल) वाचले आहेत. ते ज्यांच्याकडून मिळवले त्यांच्याशी प्रत्यक्ष बोललो आहे. त्यात अजिबातच भडकावू भाषा नव्हती. उलट शांतता पाळण्यासंबंधी काही रोचक नियम होते.तेव्हा
मोर्चात लोकांना आणण्यासाठी खाजगीमध्ये पुन्हा तीच भडक भाषा वापरली जात आहेहा दावा/अध्याहृत/निष्कर्ष/समज/आव/अफवा (आपापल्या सत्याप्रमाणे निवडा) मला तथ्यापासून दूर आहे असे खात्रीने सांगता यावे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
व्हाट्स आप मेसेज मध्ये भडकाऊ
व्हाट्स आप मेसेज मध्ये भडकाऊ पणा टाळणे हे हुशारीचे लक्षण आहे. पुण्यातल्या मोरच्या च्या वेळी मी लोकांमध्ये हिंडलोजास्त इथे सांगत नाही. असं होतंय ऋषिकेश कि एकतर मी आणि जंतू भाबडे आहोत ( आणि नसलेल्या गोष्टी इमॅजिन करतोय) किंवा तुझी बाजू भाबडी आहे . मला खात्री नाही , मला वाटते वाट बघुया . I sincerely hope that you are right.
वाट बघूया पण कसली?या पुढे
वाट बघूया पण कसली?
या पुढे काय होईल यावरून आजवर जे झालं त्यासंबंधी नक्की कसं कळेल असं वाटतं?
मुळात यात राजकारण नाहीये असं मी म्हणतच नाहीये. उलट यात फारच मुरलेलं राजकारण आहे. आणि म्हणूनच ते ऐन भरात असताना उगाचच दंगल घड(व)णार नाहीत असे माझे म्हणणे आहे.
किंबहुना जरी या मेसेजमध्ये मुद्दाम भडकपणा टाळला आहे हे तुमचे म्हणणे मान्य केले तरी तशी काळजी नाशिकात घेतलेली दिसत नाही. अर्थात हे हि ते दोन गट वेगळे असल्याचेच दाखवते नाही का?
मी फक्त हे दोन गट वेगळे आहेत इतकेच म्हणतोय. ते तुम्ही पुढे नक्की काय झालं तर मान्य कराल?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
चिन्हव्यवस्था, प्रतीकं, भाषा...
शांतता पाळण्यासाठीचे नियम असलेले निरोप मीदेखील वाचलेले आहेत, पण इतरही वाचलेले आहेत. मोर्चाच्या पोस्टर्सवरची चिन्हव्यवस्था आणि हिंसासूचक संदर्भ : हातात तलवार घेतलेल्या मुली, आगीचा भडका (भगव्या रंगात अर्थात), ब्लॅक पँथर ह्या कृष्णवर्णियांच्या हिंसक गटानं प्रतीक म्हणून वापरलेल्या मुठीप्रमाणे वज्रमूठ, 'गेरिला गर्ल्स'सारख्या मूठ वळवून समोर पाहणार्या मुली, बुब्बुळांभोवतीचा पांढरा भाग स्पष्ट दिसेल इतके डोळे मोठे करून पाहणार्या मुली, वगैरे. 'खबरदार जर छेडाल आमच्या लेकींना', 'रडायचं नाही लढायचं', 'आता खूप झालं', 'वाघ जखमी झाला तरी तो आयुष्याला कंटाळत नाही... तो थांबतो, वेळ जाऊ देतो आणि बाहेर पडतो... घेऊन तोच दरारा आणि तीच दहशत'...
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
!
वाव! हा असा विचार मी आपण होऊन केलाच नसता.
मराठा मोर्चा आणि दंगलींचा संबंध नाही, हे विधान (इथली चर्चा वाचून) 'संघाचा आणि अमुकतमुकचा* संबंध नाही', ह्या विधानासारखंच तत्त्वचिंतनात्मक वाटायला लागलं आहे.
*नथुराम गोडसे, बाबरी मशीद पाडणं, अशा बऱ्याच गोष्टी आपापल्या रुचीनुसार वाचता येतील.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
प्र.का.टा.आ
प्र.का.टा.आ
+१
मेसेजेस हे जरी शांततेचे आवाहन करणारे असले तरी ह्या मोर्चांचे अंतःप्रवाह अत्यंत हिंसात्मक आहेत. जंतू म्हणतात त्याप्रमाणे ही वरवरची प्रतीकं जरी पाहिली तरी हे पोस्टर्स छापून घेणार्यांची मानसिक स्थिती समजायला फ्रॉइड्ची अक्कल लागत नाही.
मोर्चा जरी "मुक" वगैरे असला तरी स्कॉर्पिओंच्या, रॉयल एन्फिल्डांच्या झेंडे लावलेल्या इंजिनांचे आवाज मात्र मूक नाहीत.
माझे मराठा मित्र मोर्च्यातील मागण्यांबाबत प्रचंड गोंधळलेले जरी असले तरी त्यांच्या भावना स्पष्ट आहे. "आमी सरदार आहोत आणि एस. सी. एस. टी मापात र्हाईत नाइत" अशा साध्या उग्र भावना.
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
त्यांची मतं काहीही असतील पण
त्यांची मतं काहीही असतील पण दंगेकरी आणि मोर्चेकरी एकाच गटाचे नाहीत हे आता पुरेसे स्पष्ट नाही का?
मोर्चा उभारून निर्माण केलेली आभा/वलय दंगल करून स्वतःच्याच हाताने मिटवायला हे राजकारण करणारे इतके कच्चे आहेत हे तुम्हाला पटते का?
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
दंगे
>>मोर्चा उभारून निर्माण केलेली आभा/वलय दंगल करून स्वतःच्याच हाताने मिटवणारे कच्चे राजकारण<<
मिरजेतल्या अनेक दंगलींवरून मला असं बिल्कुल वाटत नाही. ह्या दंग्यांचाही हे राजकारणी खुबीने वापर करून घेतील. ह्या गटाचे वा त्या गटाचे.
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
मोर्चाला बदनाम करण्यासाठी
मोर्चाला बदनाम करण्यासाठी मोर्चाच्या विरोधकांनी असे म्हणताय तर तेही अशक्य नाही . राजकारण्यांना विन विन आहे यात.( राजकारणी अधिकृतरित्या पुढे नाहीयेत . त्यामुळे यात हरला तर मोर्चा , जिंकलो तर आपण असेही असू शकते)
आभार! इतकंच म्हणणं होतं. या
आभार! इतकंच म्हणणं होतं.
या धाग्यावर आता रजा घेतो. काही तिरकं बोललो आसन तर स्वारी!
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
+१११११११११११११११११११११
त्यात परत फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे तर इतकी जळतेय की सांगता पुरवत नाही. "फडन१विसांनी पाय उतार व्हावं, पाठांतर करून पौरोहित्य२ व्हावं" वगैरे लेव्हलच्या कमेंट वाचल्या आहेत.
१ आणि २ हे जसे वरिजिनल कमेंटमध्ये आहे तसेच दिलेय.
आजकाल उघड माज केला तर लोक उघड मारतात म्हणून भाषा उघड माजुरडी नाही इतकेच. परी अंतरीचा सरंजामदार काय गप र्हात अस्तोय व्हय!
माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं
ते शिवाजी आणि परशुराम चे
ते शिवाजी आणि परशुराम चे समर्थक पाहूनच कित्येक मैत्रिणींना फेबुवरुन उडविले. आणि नंतर एकंदरच कंटाळच आला तो अलाहिदा. पण कविता आवडणार्या, किती छान छान मैत्रिणी एकदम ज्या पोस्टस टाकू लागल्या होत्या त्या वाचून वैतागवाडी होत असे.
_______________
खरं तर कोणालाच आरक्षण नको.
काही दिवसापूर्वी व्हॉट्सअॅप
काही दिवसापूर्वी व्हॉट्सअॅप वर आलेले मेसेज छापतोय -
लोकसत्ताचे संपादक
गिरीश कुबेर यांचा वादळी अग्रलेख..
(दि.१९/९/१६)
बनी तो बनी..
लोकसत्ता टीम | September 19, 2016 2:48 AM
सत्ता गेली की समाज आठवतो. मराठा समाजाच्या राज्यभर निघणाऱ्या मोच्र्यामुळे हेच सत्य अधोरेखित होते. सत्ताहीन झालेल्या समाजास उद्रेकासाठी कारण लागते. कोपर्डी येथे घडलेल्या अमानुष बलात्कार आणि हत्येने ते पुरवले. कोपर्डी अहमदनगर जिल्ह्य़ात येते. राज्यातील एकापेक्षा एक सर्वार्थाने दांडग्या नेत्यांचा हा जिल्हा. हे नेतृत्वाचे दांडगेपण त्या जिल्ह्य़ास समंजस वा प्रागतिक करण्यासाठी उपयोगास आले असे म्हणायची सोय नाही. परिणामी पुरोगामी नेतृत्वाचे गोडवे गाणारे नगर अत्यंत मागासच राहिले. या नगर जिल्ह्य़ात गेल्या काही वर्षांत अनेक लाजिरवाण्या घटना घडल्या. त्यातील बहुतांशी घटनांत पीडित व्यक्ती या दलित समाजाच्या होत्या. काही प्रकरणांत तर दलित तरुण आणि मराठा वा तत्सम समाजाच्या तरुणी यांच्यातील प्रेमकथेने सवर्ण संतापले आणि त्यांनी पिके कापण्याच्या यंत्रातून दलित तरुणास कापून मारले. हे भीषण होते. परंतु कोपर्डी येथील अत्याचाराचे चित्र उलटे होते. सदर घटनेत अत्याचारास सामोरे जावे लागलेली अभागी तरुणी ही मराठा समाजाची होती आणि अत्याचार करणारे दलित समाजातील होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्यातील क्रौर्याने राज्य हादरले. अशा वेळी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारी यंत्रणेने शिताफीने जी काही कारवाई करायला हवी होती, ती केली नाही. वास्तविक अशीच आणि इतकीच सरकारी दिरंगाई नगर जिल्ह्य़ातील या आधीच्या अत्याचारांबाबतही दिसली होती. परंतु कोपर्डी प्रकरणात आरोपी दलित असल्याने सरकार कारवाईत कुचराई करीत असल्याचा समज जाणूनबुजून पसरवण्यात आला आणि मराठा समाजातील नाराजीच्या उद्रेकाची व्यवस्था केली गेली. अशा प्रसंगांच्या निमित्ताने राजकारणाचे मतलबी वारे कसे वाहू लागतात *हे वेळीच समजून घेण्यात देवेंद्र फडणवीस सरकार कमी पडले आणि सत्ताहीन मराठा समाजातील अस्वस्थतेचा गुणाकार होत राहिला.
पीडित तरुणी मराठा समाजाची. अत्याचार करणारे दलित आणि सत्ताकेंद्री ब्राह्मण मुख्यमंत्री ही अवस्था अस्वस्थ मराठा समाजास चेतवण्यासाठी आदर्श.
तशीच ती ठरली आणि गावोगाव मराठा समाजाच्या मूक मोच्र्याचे मोहोळ उठले. हे जे काही सुरू आहे त्यामागे मोठाच सामाजिक उद्रेक असल्याचे सांगितले जात असले तरी वास्तव तसे नाही. या मराठा उद्रेकामागे दोन कारणे आहेत. एक आर्थिक आणि दुसरे राजकीय. या मोर्चेकऱ्यांकडून प्रामुख्याने दोन मागण्या पुढे येत आहेत.
दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यात, म्हणजे अॅट्रॉसिटी अॅक्ट, सुधारणा केल्या जाव्यात किंवा तो मागे घेतला जावा आणि दुसरी मागणी म्हणजे मराठा समाजाचा अंतर्भाव राखीव जागांत केला जावा. या दोन्हीही मागण्यांचा कोपर्डीत जे काही घडले त्याच्याशी संबंध नाही.
त्या कोपर्डीच्या आधीपासूनच चर्चेत आहेत. तेव्हा मराठा समाजाच्या बराच काळ दुर्लक्षित मागण्यांना कोपर्डीने गती दिली, असे म्हणणे खरे नाही.
यातील अॅट्रॉसिटी कायद्याचा मुद्दा राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही. कारण तो केंद्रीय कायदा आहे. म्हणजे त्यात बदल करावयाचा तर केंद्रीय पातळीवर व्हायला हवा. त्यासाठी देवेंद्र फडणवीस सरकारसमोर त्रागा करून काहीही उपयोग नाही.
खेरीज, दलितांवरील अत्याचारांचा मुद्दा केवळ महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे, असेही नाही. तसेच या कायद्याचा दुरुपयोग होतो या भावनेस आकडेवारीचा आधारही नाही. भारतीय नागरिकांच्या रक्तात मुदलातच अप्रामाणिकपणाचा अंश असल्याने आपल्याकडे कोणत्याही कायद्याचा काही प्रमाणात दुरुपयोग होतच असतो. तो करण्यात समाज आणि सरकार दोघांचाही तितकाच वाटा आहे. मग तो कायदा गर्भलिंग चिकित्सेचा असो वा देशद्रोह निश्चित करण्याचा.
आपल्या देशात अजिबात दुरुपयोग झालेला नाही असा एकही कायदा सापडणार नाही. परंतु म्हणून प्रत्येक कायदा रद्द केला जावा अशी मागणी केली जावी काय?
तेव्हा अॅट्रॉसिटी कायद्याने अन्याय होतो असे सरसकट विधान करण्यापेक्षा या कायद्याच्या गैरवापराची उदाहरणे संबंधित समाजाने सादर करावीत. परंतु तसे केल्यास या कायद्याविरोधात प्रचार करता येणार नाही, याची जाणीव असल्याने हे करण्यापेक्षा या कायद्याबाबत भावना भडकावण्याचा मार्ग संबंधित नेते पत्करतात. आपल्याकडे असे करणे सोपे असते. मुसलमानांची संख्या प्रचंड गतीने वाढत असल्याचा समज पसरवून देणे हिंदुत्ववाद्यांना जितके सहजसाध्य असते तितकेच अॅट्रॉसिटी कायद्याविरोधात वातावरणनिर्मिती करणे मराठा नेतृत्वास सुलभ असते. कारण हे आणि असे गैरसमज एकदा का पसरवून दिले की संबंधित नेतृत्वास दुसरे काहीही करावे लागत नाही. गैरसमजांनी भारित समाज आपोआप तापत जातो आणि त्यावर नेतृत्वास आपली पोळी भाजणे सोपे जाते.
तसाच दुसरा मुद्दा राखीव जागांचा. स्वातंत्र्यपूर्व काळात बाळासाहेब खेर आणि स्वातंत्र्योत्तर काळात मनोहर जोशी आणि सध्या देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद वगळता या महाराष्ट्राची सूत्रे प्राधान्याने मराठा नेतृत्वाच्या हाती राहिलेली आहेत. राखीव जागांचा प्रश्न ऐंशीच्या दशकात मंडल आयोगानंतर पेटला असे मानले तरी त्यानंतरही महाराष्ट्रावर मराठा समाजाचेच राज्य बराच काळ राहिले. सध्या या समाजाचा बराच कळवळा आलेले आणि तो व्यक्त करण्यात धन्यता मानताना आपले पुरोगामीपण तात्पुरते बाजूला ठेवणारे शरद पवार हे तर मंडल आयोगोत्तर काळात किमान दोन वेळा मुख्यमंत्री झाले आणि नंतर सलग १५ वर्षे त्यांचा पक्ष सत्तेत राहिला. या इतक्या प्रदीर्घ काळात या जाणत्या नेत्यास आणि त्यांच्या भोवतालच्या अन्य अजाणत्या मराठा नेतृत्वास आपल्या समाजाचे मागासलेपण कधीही जाणवू नये? हे या नेत्यांचे समाजापासून तुटलेपण की या समाजातील नेतृत्वाचा आचंद्रदिवाकरौ सत्ता आपल्याच हाती राहील हा भ्रम? या सगळ्यांच्या समजास पहिल्यांदा काँग्रेस नेतृत्वानेच तडा दिला. आधी बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले आणि पुढे विलासराव देशमुखांच्या जागी सुशीलकुमार शिंदे यांना मुख्यमंत्री करून. अंतुले आणि शिंदे यांच्या हाताखाली हे मर्द मराठा सरदार किती ‘मनापासून’ काम करीत होते यास मंत्रालय साक्षी आहे. पुढे पृथ्वीराज चव्हाण यांनीही या मराठा नेतृत्वास दणका दिला. परंतु चव्हाण यांच्या विरोधात या मंडळींना उघड बोंब ठोकता आली नाही. कारण पृथ्वीराज यांचे ‘चव्हाण’पण. वास्तविक चव्हाण यांचेही सरकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर तगून होते. पण तरीही मराठा आरक्षणाची मागणी या मंडळींना रेटता आली नाही किंवा त्याची गरजही त्यांना वाटली नाही. वाटली ती एकदम सत्ता जाणार याची जाणीव झाल्यावर. तेव्हा ती वाचवण्याचा शेवटचा केविलवाणा प्रयत्न म्हणून मराठा आरक्षणाचे गाजर पुढे केले गेले. ते अर्थातच न्यायालयाने फेकून दिले. कारण तो निर्णयच मुळात अयोग्य होता. त्यानंतर राज्याची सूत्रे थेट फडणवीस यांच्याच हाती गेली.
तेव्हा मराठा नेतृत्वाच्या दुखण्याचे खरे मूळ हे आहे, हे वास्तव नाकारून चालणारे नाही. आता जे मोर्चे निघत आहेत त्यामागे मराठा समाजास शिक्षणाच्या वा रोजगाराच्या संधी नाहीत याबद्दलचा आक्रोश असल्याचे सांगितले जाते. हे दुखणे राज्यातील खऱ्या गरीब मराठय़ांचे आहेही. परंतु राज्यातील अर्थकेंद्रे इतकी वर्षे ही मराठा समाजाच्याच हाती होती याकडे कशी डोळेझाक करणार? राज्यातील शिक्षणसंस्था, साखर कारखाने, सहकारी बँका, दुग्धव्यवसाय आदी अनेक अर्थकेंद्रांवर मराठा समाजाचीच पकड होती. तेव्हा या मोर्चेकऱ्यांनी खरे तर राज्यातील गडगंज शिक्षणसम्राट, सहकारमहर्षी यांनाच जाब विचारायला हवा आणि या सगळ्या संस्थानांच्या सरकारीकरणाची मागणी करायला हवी. त्यासाठी वेळ पडल्यास भय्यूजी वा तत्सम कुडमुडय़ा महाराजाने संबंधितांना सल्ला द्यावा. पण मराठा नेतृत्वाच्याच वळचणीखाली पोसले गेलेले हे बेगडी महाराज असे करण्याचे धैर्य दाखवणार नाहीत. सध्या जो काही उद्रेक दिसत आहे त्यात खरा होरपळलेला मराठा समाज आहेही. पण त्यामागे सत्ताशून्य निर्वात पोकळीत राहावयाची वेळ आलेले मराठा नेतृत्व नाही, असे म्हणता येणार नाही.
तेव्हा संघर्ष आहे तो सत्तेसाठीचा.
सामाजिक अवस्था हे कारण. या कारणास पुढे करून राजकारण करणे अधिक सोपे असते.
या संघर्षांचे केंद्र सध्या मराठवाडय़ात आहे. सत्ताधारी भाजपचे मराठवाडी नेतेदेखील यामागे नाहीत, असे कोणीही ठामपणे म्हणणार नाही.
याच मराठवाडय़ातील परभणी परिसरात ‘बनी तो बनी, नही तो परभणी’, अशी म्हण आहे. सध्याच्या उद्रेकास ती लागू पडेल.
--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life
सत्ता गेली की समाज आठवतो.
("सत्ता" हा शब्द घेऊन संपादकीय लेखामधली ही वाक्ये एकत्र केलेली आहेत.)
14 March 1995 – 31 January 1999 या कालात मनोहर जोशी सत्तेवर होते. त्यावेळी मराठ्यांच्या हातात सत्ता होती का खरंच ? (ठाकरे हे मराठा नाहीत). त्यावेळी मराठा आरक्षणाची चर्चा का झाली नाही ? हा मुद्दा माझ्या माहीतीनुसार १९९९ नंतर समोर आला.
( डिस्क्लेमर - गब्बर मराठा नाही. )
बरोबर शिवाय अंतुले , वसंतराव
बरोबर
शिवाय अंतुले , वसंतराव नाइक , सुधाकर राव नाइक, सुशिलकुमार शिंदे होतेच
आम्ही कोपर्डीच्या गाडीत
आम्ही कोपर्डीच्या गाडीत बसलो.
मधेच ड्रायव्हर बदलला अन गाडी "अट्रॉसिटी" गावाकडं निघाली.
त्या रस्त्यावर दलित गाडीला पुढं जाऊ देईना.
मग पुन्हा ड्रायव्हर बदलला.
गाडी "आरक्षण" गावाकडं निघाली.
त्या रस्त्यावर न्यायालयानं आधीच No Entry चा बोर्ड लावून ठेवला होता.
मग पुन्हा एकदा ड्रायव्हर बदलला.
आता गाडी मुख्यमंत्र्याच्या जाती कडे चालली आहे.
आता त्यांचे 3% लोक आम्हाला काय अडवणार?
सगळे खुश आहेत !!!
खरेतर गाडी सुरूवातीलाच ' जाती ' गावाकडेच न्यायची होती, पण गाडीला पाटी ' पुरोगामी ' लावल्याने अशी फिरवून फिरवून आणावी लागली!
--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life
मिश्किली =पार्किंगसोसायटीत
मिश्किली =पार्किंग
सोसायटीत गाड्यांच्या पार्किंगचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे
पूर्वी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश
अशा तत्वावर पार्किंग व्हायचे
पण काम्बळे सरांकडे लूना होती वेग कमी असल्याने ते कायम उशीरा यायचे म्हणून चेरमन पवारांकडे
"माझे पार्किंग रिज़र्व करा "असा अर्ज केला व तो मंजूरही झाला
सोनारकाम करणारे पारखी यांनाही हीच समस्या आली त्यांच्याकडे स्कूटी होती.त्यांनाही रिज़र्व पार्किंग देण्यात आले
अशा पद्धतीत उपलब्ध पार्किंग स्पेस पैकी सत्तर टक्के रिजर्व झाली
आता झालय असं कार्यकारणी बदलून कर्मधर्मसंयोगाने जोशी चेयरमैन झालेत त्यांना गाडी पार्किंग चा प्रश्न कधीच नव्हता.त्यांच्याकडे सायकल आहे
पवारांना आता पार्किंगचा प्रश्न भेडसावत आहे त्यांच्या भाऊबंदासहित त्यांना रिजर्व पार्किंग हवे आहे
चेयरमैन जोशींनी आता काय बरे
करावे ? स्वतः च्या सायकल सहित सोसायटी सोडून दूर निघून जावे ?
पवारांना पार्किंग द्यावे ?
की रिजर्व पार्किंग उठ्वुन
पूर्वीप्रमाणे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश ही पद्धती चालू करावी ?
तुमचे मत सांगा plz व जोशींना निर्णय घेण्यास मदत करा
--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life
सायकल!
हे वाक्य विनोदी आहे. फक्त सायकल असणारे जोशी पुण्यात तरी सापडत नाहीत
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
जोशी काय फक्त पुण्यातच
जोशी काय फक्त पुण्यातच राहातात काय? मूळ प्रतिसादात पुण्याचा उल्लेखही नाही.
आहे मर्यादित तरी
'जोशी पुण्यातच राहतात' असा दावा मी केलेला नाही. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून मिळणार नाही. मात्र, मराठीची एक शिकवणी मी आनंदाने घेईन : पुण्यात तरी सापडत नाहीत असं मी म्हटलं होतं. त्याचं कारण म्हणजे माझा परिघ पुण्यापुरताच मर्यादित आहे ह्याची ती नम्र कबुली होती. माझी जी मर्यादा माझ्या प्रतिसादात अभिप्रेतच होती ती मर्यादा पुन्हा दाखवून दिल्याबद्दल तुमचे आभार मानतो, पण त्यामुळेच तुम्हाला थोडी मराठीची शिकवण देण्याची गरज भासली हेदेखील नम्रपणे कबूल करतो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
म्हणजे माझा परिघ पुण्यापुरताच मर्यादित आहे
तुमचा परिघ पुण्यापुरताच मर्यादित आहे हे सांगून तुम्ही पुण्याच्या भाषेत "''व्यासोच्छीष्टं जगत सर्वम्'' हे सांगीतले आहे मग दुसर्याने तसे समजले तर मराठीची शिकवणी का बरे लावावी ?
किंवा गणपतीने केवळ मातापित्याला प्रदक्षिणा मारुन पृथ्वीची प्रदक्षिणा पुर्ण केली तसे तुम्ही "पुण्यात सारे जग जगते" असे मनी धरुन लिहिल्याची एक शक्यता आहेच की !
नोंदी टिपणं संदर्भ वगैरे
शक्यता नाकारता येत नाही, पण माझ्या कबुलीच्या निमित्तानं फक्त सायकल असणारे जोशी कुठे कुठे सापडतात याची जंत्री जर तयार झाली तर भविष्यात संदर्भासाठी ती एक चांगली नोंद होईल. मग मला खरा आनंद होईल.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
:ड
ह्या निमित्ताने जंतूच्या विनोदबुद्धीला लागलेली जळमटं थोडी तरी साफ झाली असं दिसतंय. दिवाळीची तयारी का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
शिकवणीबद्दल धन्यवाद
तुम्ही निव्वळ तुमचा शब्द खाली पडू नये , म्हणून वाद घालताय असं दिसतंय.
पुण्यातील सर्व जोशींकडे कुठली वाहने आहेत (म्हणजे फक्त सायकल नाही) आणि एकही वाहन नसेल तरी त्यांच्याकडे फक्त सायकल नक्कीच नाही, याची नोंद तुमच्याकडे आहे, याची खात्री तुमच्या विधानामुळे पटली आहे.
यू कॅन बी द चेंज
योग्य तो विदा दिल्यास मी माझं मत बदलतो
त्यामुळे फक्त सायकलवाले पुणेरी जोशी दाखवा आणि जंतूमतपरिवर्तन मिळवा!
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
.
.
"हे मूक मोर्चे कोणत्याही अन्य
"हे मूक मोर्चे कोणत्याही अन्य जाती विरोधात नाहीत"
हे वाक्य हळू हळू, हळू हळू धूसर होत जाणारेय...
--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life
आरक्षणाचा शेवट यातून होऊ
आरक्षणाचा शेवट यातून होऊ शकतो. (असे आज टॉयलेटला बसल्यावर विचार करताना जाणवले).
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
इतकं मोठं काही करायचा विचार
इतकं मोठं काही करायचा विचार यातून दिसत नाही. इथे टार्गेट नि उद्देश राज्यस्तरीय असावे
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
महाराष्ट्र ही ल्याबोरेटरी असू
महाराष्ट्र ही ल्याबोरेटरी असू शकते गुजरातप्रमाणे !!
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
कधी भेटताय? बोलु. काही जाहिर
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
कुठल्या? राजकीय, शैक्षणिक की
कुठल्या? राजकीय, शैक्षणिक की नोकरीमधल्या?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
सगळच आरक्षण संपावं.
सगळच आरक्षण संपावं.
ऋंची फटकेबाजी आवडली.
ऋंची फटकेबाजी आवडली.
ऋषिकेशचे सर्व मुद्दे अचूक
ऋषिकेशचे सर्व मुद्दे अचूक आहेत. पडद्यामागचे राजकारण कसेही असले तरी हे मोर्चे आणि व्यक्त होण्याची पद्धत अतिशय संयमित आणि प्रभावी आहे हे निश्चित.
सर्वच आरक्षण रद्द होणे हा जर अंतस्थ हेतू असेल तर तो काही चुकीचा नाही.
अॅट्रॉसिटी अॅक्ट बद्दल बोलायचे तर असा कायदा फक्त दलितांबद्दलच का असावा, समजत नाही. समाजाच्या कोणत्याही दुर्बल घटकासाठी तो लागू असायला हरकत नाही.
एकूणच, जातीवादावर आधारित सर्वच कायद्यांचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. असे वाटते.
जातीवादावर आधारित सर्वच
जातीवाद गेला तरच तसे होईल.
जातीवाद गेला की आरक्षणही
जातीवाद गेला की आरक्षणही जाइल. दोन्ही खरच जावेत.
अॅट्रॉसिटी अॅक्ट बद्दल
परवाच थोडंफार अॅट्रॉसिटी अॅक्ट बद्दल वाचलं. थोडक्यात असं - पूर्वीच्या काळी (म्हणजे ६०s/ ७०s असावं) दलितांविरुद्ध लोकं आणि पोलीस सुद्धा मुद्दाम गुन्हे दाखल करायचे. त्यांना प्रोटेक्ट करायला अॅक्ट बनवलाय.
बाकीच्या दुर्बल लोकांची वोटबँक तेवढी जड नाही, त्यामुळे त्यांचे आवाज पोचत नाहीत. म्हणून कुणी लक्ष देत नसावं.
--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life
एकूणच, जातीवादावर आधारित सर्वच कायद्यांचा पुनर्विचार
एकूणच, जातीवादावर आधारित सर्वच आचरणाचा पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे. असे वाटते.
(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me
आज मला तरी आजूबाजूला
आज मला तरी आजूबाजूला जातीवादावर आधारित आचरण कुठे दिसत नाहीय. हां, जातीवादावर आधारित राजकारण सर्रास दिसतंय.
जातीवादावर आधारित आचरण
"ऋषिकेशचे सर्व मुद्दे अचूक आहेत" हे तुमचं विधान आणि तुम्हाला "आजूबाजूला जातीवादावर आधारित आचरण कुठे दिसत नाहीय" ह्या दोहोंची सांगड तुम्ही कशी घालता? कारण, ऋषिकेशला तर जातीवादी आचरण दिसतंय. संदर्भ : हा प्रतिसाद.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
आरक्षण हे जातीवादावर आधारीत
आरक्षण हे जातीवादावर आधारीत आचरण नाही? कमाले.
दिवाणखान्यातला (धोरणी, धूर्त, चतुर, तरल वगैरे) हत्ती
अशा विधानांसमोर इथे राही यांनी जो कळीचा मुद्दा मांडला आहे त्याकडे लक्ष वेधतो :
मी जी कुजबुज ऐकली आहे ती स्पष्टपणे मराठ्यांच्या एका धोरणी आणि जाणत्या नेत्याकडे बोट दाखवते. २०१४मध्ये त्यांचा मराठा व्होट बेस पूर्णपणे हलला. त्यानंतर त्यांचा पक्ष निर्नायकी अवस्थेत चाचपडताना दिसत होता. पुष्कळशा मराठ्यांच्या मनात 'ह्या नेत्यानं आपला विश्वासघात केला' म्हणून राग जाणवत होता. त्यामुळे आता ही नवी राजकीय खेळी खेळताना पुन्हा एकदा मराठे संघटित तर करायचे, पण आपलं नाव कुठेही येऊ द्यायचं नाही असा डाव असल्याचं बोललं जातंय. विरोधकांना आपले डावपेच कळूच शकणार नाहीत अशा गुंतागुंतीच्या किंवा भंजाळून टाकणाऱ्या खेळी करण्याचा पूर्वेतिहास तर ह्या नेत्याकडे आहेच; आणि मतांसाठी आरक्षणाचं गाजर दाखवून मराठ्यांना चुचकारण्याच्या प्रयत्नांचा इतिहासही त्यांच्याकडे आहेच; पण शिवाय आणखीही एक गोष्ट आहे : वर एकाहून अधिक लोकांनी मिरजेतल्या दंगलींचा उल्लेख केला होता. ती दंगलही निवडणुका तोंडावर आल्या असताना घडवली गेली होती आणि त्या दंगलीतही ह्याच नेत्याचा हात असल्याचा संशय होता, हेसुद्धा कदाचित इथे दखलपात्र ठरावं.
असो. सांगोवांगी ही विदा नाही हे मी जाणतो
ताज्या घटनांमागे कोण आहे ह्यांचे पुरावेदेखील माझ्याकडे नाहीत. इतक्या धूर्तपणे चाल खेळायची अक्कल कुणाकुणाकडे आहे ह्याचे अंदाज मात्र आहेत. त्यामुळे तूर्तास एवढेच बोलून गप्प बसतो.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
बाकी, अचानक लक्षात आले. धागा
बाकी, अचानक लक्षात आले. धागा उघडून कोल्हटकर का बरे मजा बघत बसले असावेत? मैदानात उतरा!
(ह. घेणे)
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
ऋषिकेश , बाकी जाऊ दे , पण या
ऋषिकेश , बाकी जाऊ दे , पण या गोष्टीबद्दल एकमत

त्यांना कोल्हटकर"आजोबा"
त्यांना कोल्हटकर"आजोबा" म्हणले की ते वैतागुन मैदानात उतरतात.
लेख निराशाजनक आणि हे विधान त्याहुन जास्त निराशाजनक
श्री अरविंद कोल्हटकरजींचा लेख असल्याने ज्या उत्सुकतेने उघडुन बघितला व अभ्यासपुर्ण विवेचना ऐवजी चार ओळी खरडुन केलेली त्रोटक विचारणा पाहता. मराठी आंतरजालाच्या वावराने अखेरच्या शिलेदाराचाही घास घेतलाच शेवटी असे वाटुन गेले. कितीही दमदार फलंदाज असला तरी मराठी आंतरजाल त्याला शेवटी आपल्या प्रभावाखाली घेतल्यावाचुन राहत नाही. शिवाय हे असले विधान.
याने तर अजुन निराश झालो. काहीही संबंध नसतांना उगाच खाजवुन "ब्राह्मण" मध्ये आणला.
मराठी आंतरजालाचा विजय असो !
असोच.
+०.५
एखाद्या विषयाबद्दल आपल्याला कुतूहल, उत्सुकता वाटते, पण अभ्यासपूर्ण लिहावं इतपत माहिती नसते. अशा वेळेस गप्प बसावं, विषयाला चालनाही देऊ नये, असं म्हणण्यात हशील नाही. विषय महत्त्वाचा आहे; त्याबद्दल त्रोटक का होईना धागा काढण्यात मला काही गैर वाटत नाही. कोल्हटकर अभ्यासू सदस्य आहेत, ते एरवी चारोळी धागे काढत नाहीत, हे पाहता ह्या धाग्याच्या लांबीबद्दल किंवा प्रतिसादांमधून चर्चेत भाग न घेेण्यात काही आक्षेपार्ह वाटत नाही.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
या
या मोर्चांच्या मागे असलेल्या महाकावेबाज, महाधूर्त डोक्याला , महामहाकावेबाज, महामहाचतुर महामहीम दिल्लीश्वर कसे तोंड देतात, हे बघण्याची उत्सुकता आहे.
बुडती हे जन
एका ब्लॉगवर एक स्फुट वाचले.
त्यातला एक मुद्दा मला महत्वाचा वाटतो.
मराठा मोर्चांचे, किंबहुना इतक्या मास स्केलवर होणार्या ह्या साठमारीने मुलांवर काय परिणाम होत आहेत?
मी पाहिलेल्या पुण्याच्या मोर्चात लहान, कुमारवयीन मुलांचा उत्साह फसफसून जात होता.
साठीनंतरच्या साधारण चार-पाच पिढ्या धरल्या तर जातीपातींचे तीव्र प्रभाव मंडल आयोगापर्यंत साधारणतः थोडे थोडे कमी होत असावेत. नंतर थोडे चढउतार असावेत.
सध्याच्या पिढीला निदान चिकित्सेचे प्रश्न पडतात, जात पात तपासून घ्यायला सुरुवात तरी केली होती. या मोर्चांना निकालात काढणारे आणि मनस्वी प्रतिसाद देणारे असे दोन गट माझ्या मित्रांत आहेत. ब्रिगेडी विचारांतून सुरुवात करून समंजस भूमिका घेण्याइतपत काही मित्र पुढे जात आहेत.
हे पुढच्या पिढीत क्रमाने संक्रमित व्हायला हवं, तरीही
आताची मुलं कसली जात अन कसला धर्म असं विचारणारी आहेत का? या मुलांवर मराठा ही खोलवर ओळख रुजत जाईल का? हीही मुलं जातीबाहेर लग्नं करायला धजावतील का?
२०१६ ला आपण फिरून पुन्हा मागेच आहोत हे जाणवत असेल का?
टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.
हा धागा मी का उघडला?
हा धागा मी का उघडला? ह्या प्रश्नाला दुहेरी उत्तर आहे.
आतापर्यंत मी जे जे धागे उघडले ते सर्व सरासरीने १५-२० प्रतिसादांपलीकडे जाऊ शकले नाहीत. भरपूर प्रतिसादनिर्मितीची सुप्त क्षमता असलेला एखादा तरी धागा आपल्या नावाने असावा अशी मला एक महत्त्वाकांक्षा होती पण असे काही सुचत नव्हते.
महाराष्ट्रात आणि भारतवर्षात प्रतिदिन काय चालू आहे हे माहीत करून घेण्यासाठी मी काही मराठी आणि काही इंग्रजी वृत्तपत्रे चाळतो. गेले काही दिवस सातत्याने गावोगावच्या प्रचंड आणि शिस्तबद्ध सभांचे वृत्तान्त येत होते. हे थोडे वेगळे होते. १९४८ सालात आमचे घर जाळले गेले तेव्हाचा उद्रेक आणि १९६८ मध्ये शिवसेनेने घातलेला धुमाकूळ मी स्वतः पाहिलेले होते. त्या दोन्हीपेक्षा ही चळवळ वेगळी वाटत होती. ह्या सकृद्दर्शनी शान्तिपूर्ण वाटणार्या चळवळीमागे हिंसक होऊ शकणारी शक्तीहि आहे हे काही प्रत्यक्ष दिसलेल्या मुलाखतींवरून स्पष्ट दिसत होते.
हा एक नवा भस्मासुर तर जन्माला घातला जात नाही ना असे वाटावे अशी परिस्थिति आहे. हा भस्मासुर हाताबाहेर जायला कोठलीहि क्षुल्लक घटना पुरते आणि एकदा तो जर हाताबाहेर गेला तर त्याला काबूत आणण्याचे नैतिक सामर्थ्य असलेला कोणी नेता आहे का अशी शंकाहि येत होती. (येथे १९२२च्या चौरीचुरा घटनेची आठवणा येते. तेथेहि अहिंसक असहकार चळवळ हिंसेच्या मार्गाकडे वळत आहे असे दिसताचा गांधीजींच्या एका इशार्याने चळवळ थांबली.)
मात्र 'ऐसीवर' ह्याविषयी पूर्ण शान्तता होती. येथे मला माझी संधि दिसली आणि मी धागा उघडला. अपेक्षेप्रमाणे त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि माझे एक स्वप्न वास्तवात उतरले.
ह्यापलीकडे दिसणार्या घटनांवर काही भाष्य करावे, जे इतरांना वाचनीय/मननीय वाटेल असे माझ्याकडे काही नाही. केवळ दिसणार्या गोष्टींबाबत आणि त्या काय वळण घेतील ह्याबाबत चिंता आहे, तिला उघड करण्याचे कार्य मी केले. इत्यलम्.
राहवत नाही ...
कोल्हटकर, तुम्हीसुद्धा ... टारगटपणा करता ते बघून मनापासून हसायला येतं.
---
जुन्या 'चळवळीं'शी केलेली तुलना रोचक. १९६८ सालच्या 'चळवळी'मागचं कारण काय होतं?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
तुम्ही काय फार कुणी काही
तुम्ही काय फार कुणी काही त्यावर लिहावं किंवा वाहवा करावी असं टाकलं नाहीय, पण तरीपण जे काय लिहिलंय ते आवडलं.
--------------
Comedy is a distortion of what is happening, and there will always be something happening. ― Steve Martin, Born Standing Up: A Comic's Life
हे पहा
ह्या आरक्षणाच्या (शैक्षणिक + नोकर्यांमध्ये) प्रश्नाचा पूर्ण आढावा सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश पी.बी. सावंत ह्यांच्या ह्या मुलाखतीमध्ये घेतला गेला आहे. मुलाखत घेणारे (नाव कळले नाही) परोपरीने न्यायाधीशांच्या तोंडातून 'मराठा' जात किंवा समाज ह्यांना घटनेच्या कलम १५ खाली शिक्षण आणि कलम १६ खाली नोकर्या कशा मिळवता येतील हे काढण्याचा प्रयत्न करत होते पण न्यायाधीश ह्यावर ठाम राहिले की असे आरक्षण मिळण्यासाठी any socially and educationally backward classes of citizens ही चाचणी आहे. ती ओलांडून मराठा समाज जे काय आरक्षण मिळवेल ते सध्याच्या २७ टक्क्यात मिळवले जाईल आणि नवा आकडा - समजा ४३ टक्के - हा त्यांना अन्य ओबीसीबरोबरच मिळेल, मराठा समाजाचे असे १६ टक्के आरक्षण नसेल. हे झाले शिक्षणाचे आणि कलम १५ चे.
नोकर्यांच्या बाबत कसोटी निराळी आहे. तेथे आरक्षण in the opinion of the State, is not adequately represented in the services under the State ही कसोटी पार करूनच मिळेल. (कलम १६)
न्यायाधीश असेहि पुनःपुनः सांगत होते की मराठा आरक्षणाविषयी जी जी आश्वासने राजकीय नेते देतात ती ती - न्यायाधीशांच्याच शब्दात - समाजापुढे धरलेली गाजरे आहेत. अशी गाजरे धरण्यापेक्षा राजकीय नेत्यांनी सर्वांनाच सर्व शिक्षण मोफत मिळेल असे मार्ग शोधावेत जेणेकरून आरक्षणाची आवश्यकताच राहणार नाही आणि हे सरकारला करणे अशक्य नाही.
सत्ताकांक्षी अभिजनांचे चौरंगी हिंदुत्व
हा एक सुंदर लेख . वरील शीर्षकाचा एक सुंदर लेख आजच्या लोकसत्तामध्ये आला आहे. लेखक श्री प्रकाश पवार यांचे मुद्दे अभिनव असतात. मांडणी क्लिष्ट आणि भाषा जडजंबाल वाटली तरी आशय चमकदार आणि समस्येची नवी बाजू दाखवणारा असतो.
१०१
कोल्हटकरांच्या धाग्याने शंभरी गाठ्ल्याबद्दल आणि स्थानिक विद्यमान स्थितीविषयी ऐसीवर दुर्मीळपणे चर्चेला चालना दिल्याबद्दल आनंद व्यक्त करून हा पुढचा १०१वा प्रतिसाद.
उपरोल्लेखित लेखात हिंदुत्वाची जी मीमांसा केली आहे ती तंतोतंत पटते. हिंदुत्वाला कवटाळल्यामुळे (सत्तेत वाटा मिळून) प्रश्न सुटत असतील तर तसे होऊ दे. साधन शुचिता गेली खड्ड्यात. एकंदरीत हिंदुत्व ही कामधेनु ठरू लागल्याने तिच्या दोहनासाठी सर्वांनीच रांग लावली आहे. तिचे दुग्धप्राशन करून लोकांच्या हृदयात प्रवेश मिळतोय म्हणजे कमी श्रमांत कार्यसिद्धी होण्यासारखी आहे म्हटल्यावर तसे तर तसे.
मला मोर्च्यांत उघडछुपे हिंदुत्व प्रथमपासूनच जाणवत होते. त्याचा अन्वयार्थ आता लागला. गोदुग्धाची महती अगाध आहे.
लेखाबद्दल अतिशय आभार. छान
लेखाबद्दल अतिशय आभार. छान मांडणी आहे.
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
दिवाणखान्यातला आणखी एक हत्ती
मांडणी रोचक आहे हे कबूल, मात्र दिवाणखान्यातला एक हत्ती तिथून अनुल्लेखाने मारला असल्यामुळे अपूर्ण झाला आहे. तो हत्ती म्हणजे सरंजामी मानसिकता. ते ज्या समाजघटकांबद्दल बोलत आहेत ते सर्व घटक आपापल्या जातीच्या अंतर्गत सरंजामशाही मानसिकतेनं पोखरलेले आहेत. ते मुळातून हिंदुत्ववादीच आहेत असं नाही, तर -
पोथीनिष्ठता मानणारे ते अभिजात असं धरलं तर, आणि हे सर्व ब्राह्मणेतर समाजघटक आज सोय म्हणून हिंदुत्ववादी भासू लागले आहेत हे मान्य केलं तरीही त्यामुळे समस्येचं मूळ असलेल्या सरंजामी विचारसरणीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ब्राह्मण त्यातून बाहेर पडले म्हणून पुढे गेले. आज ह्या गोष्टींकडे ब्राह्मण बाहेरून आणि मजेत पाहू शकतात ते त्यामुळेच.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
सहमत
"हे सर्व सोडून आधुनिक व्यक्तिस्वातंत्र्यवादी होण्याची जी किंमत चुकवावी लागते त्याला त्यांची अद्याप तयारी नाही."
अगदी सहमत. हे सर्व समाजघटक गावकी, भावकी, खोत, पाटील, सरपंच या गोतावळ्यात पार गुरफटून गेले आहेत. व्यक्तिस्वातंत्र्य हा शब्दही त्यांच्या कानांवरून कधी गेला नसेल, इतपत.
माझ्या मते याची दोन कारणे संभवतात. १)पारंपरिक शेती आणि बलुतेदारी व्यवस्था २)(याच्याच परिणामी) बाह्य जगाला सामोरे जाण्याची वेळ न आल्याने आलेला न्यूनगंड. आपली पारंपरिक अर्थ आणि ग्रामव्यवस्था ही मनुष्यबळप्रधान आहे. शेती/बलुतेदारी एकेकट्याने होत नाही. त्यासाठी आजूबाजूची माणसे सांभाळावी लागतात. स्वतःची मते लादता येत नाहीत. संयुक्त कुटुंबपद्धती टिकून राहाण्यालाही ही अर्थव्यवस्थाच कारणीभूत होती. युरोपातल्या औद्योगिक क्रांतीनंतर मानवी श्रमांची गरज हळूहळू कमी होत गेली आणि तिकडची सरंजामशाही मोडून पडली. आपल्याकडे मात्र खेडोपाडी अजूनही ही नवी व्यवस्था तितकीशी खोलवर रुजलेली नाही. टीवी, फ्रिज, फटफट्या आल्या पण व्यक्तीवर लादलेले समूहाशी नाते तुटले नाही. त्यामुळे अजूनही गावकी/जातपंचायत/पंचनिर्णयाच्याजागी नव्या न्यायव्यवस्थेने मूळ धरलेले नाही. ताठ मानेने जगण्याची सवयच नसल्याने एक प्रकारचा न्यूनगंड व्यक्तीच्या वागण्यात दिसतो. स्वयंनिर्णयाचे भलेबुरे परिणाम पेलण्याइतकी विचारशक्ती तयार आणि सशक्त नसते. ही सगळी झुंड शहरात आली तरी बाह्य जगाशी संपर्क साधताना पहिल्या दुसर्या पिढीपर्यंत भांबावलेली, धास्तावलेली असते. आपापसात अर्थात गावातली उच्चनीचता, गावकी सोबतीला राहातेच.
ही सर्व व्यवस्था ठामपणे झिडकारली तरच नवे काही रुजू शकेल. पण तेव्हढे धैर्य आणि सकारात्मक मर्दुमकी आज या गटात दिसत नाही.
आग.सोमेश्वरी...बंब...आरक्षण घरी...
मराठा..समाज हा प्रामुख्याने शेतकरी समाज आहे.. कुणबी हाही मराठाच आहे..असं पंजाबराव देशमुख म्हणत..आज महाराष्ट्रात शेतकरयांची अवस्था बिकट आहे.. शेतकरी समाजातील युवकांमध्ये नोकरी बद्दल प्रचंड अनिश्चितता आहे.
शेजारच्या माळी, धनगर,वंजारी समाजाच्या युवकांना कमी मार्क मिळून सुद्धा त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये एडमिशन मिळत ,नोकरी बद्दल सुद्धा असंच असतं.
तो ह्या प्रश्नावर उत्तर शोधत असतो.. अन् ज्याच्यावर तो प्रश्न सोडवायची जबाबदारी असते.. तो त्याच उत्तर आरक्षण देतो..जी निव्वळ दिशाभुल असते...
पण त्या युवकाला आपल्या भवितव्याची सुरक्षा आणि तरणोपाय आरक्षण वाटु लागत..अन् तो तेच आपल्याला या स्पर्धेच्या युगात वाचवेल ही खोटी आशा मनात धरून मोर्चात येतो...
लक्षात ठेवा मोर्चाची मागणी चुकीची असेल..पण मोर्चात येणारे...खुप अडचणीत आहेत.. म्हणून इतक्या तळमिळीने येतायेत...
याला जबाबदार आपली सरकारे आहेत जी पुरेशा रोजगार संधी देण्यात अपयशी ठरली आहेत....
आरक्षण राजकारण्यांची सर्वात आवडती टोपी आहे.. घाईत लिहीलय..दमानं वाचा.
पोथी पढी पढी जग मुआ...पंडित भया ना कोय...
ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय..
शेजारच्या माळी, धनगर,वंजारी
शेजारच्या माळी, धनगर,वंजारी समाजाच्या युवकांना कमी मार्क मिळून सुद्धा त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये एडमिशन मिळत ,नोकरी बद्दल सुद्धा असंच असतं.
तुम्हाला,
"शेजारच्या कुणबी माळी, धनगर,वंजारी समाजाच्या युवकांना कमी मार्क मिळून सुद्धा त्यांना चांगल्या कॉलेजमध्ये एडमिशन मिळत,नोकरी बद्दल सुद्धा असंच असतं."
असं म्हणायचं असावं कदाचित.
रावसाहेब कसबे म्हणातात कि कुणबी माळी, धनगर यांनी मराठा आरक्षणाला बराच विरोघ केलेला आणि मराठ्यांना मागासांसाठी असलेलं आरक्षण पण नको होतं.
चुलत भाऊ
मी उत्तर महाराष्ट्रात राहतो... इथे मराठा-कुणबी दोघांमध्ये सोयरीकी होतात(जी फक्त एका जातीतच शक्यता बनवली जातात).मराठ्यांना आरक्षण मिळावं अस बहुसंख्य कुणबी समाजाला वाटतं.. जळगाव, धुळे येथील मोर्चात तर बहुतेक सर्व कुणबीच होते.
कुणबी समाज स्वतःला मराठाच समजतो.व तो एकच आहे असं सदानंद मोरे म्हणतात.
.
थोडक्यात आपल्याला मिळालय आतां पश्चिम महाराष्ट्रातल्या आपल्या चुलतभावाला मिळायला आपली काही हरकत नाही असंच मत आहे....
पोथी पढी पढी जग मुआ...पंडित भया ना कोय...
ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय..
चांगली चर्चा
चर्चा आवडली. चिंतातूर जंतू, अंतराआनंद, राही, थत्ते यांची मते पटली. मी एकदोन मराठाकेंद्रित व्हॉट्सअॅप ग्रूपचा सदस्य आहे. सुरुवातीला माफक राजकीय चर्चा, क्वचित पुरंदरे व तत्सम ब्राम्हणांना विरोध वगैरे स्वरुप असलेल्या या ग्रूपमध्ये गेले एकदोन महिने अत्यंत तापलेले वातावरण दिसले आहे. 'आम्ही शांत राहतोय हा आमचा दुबळेपणा समजू नका', 'मागून दिले नाही तर हिसकावून घेऊ' वगैरे स्वरुपाच्या प्रतिक्रियांची वाढलेली संख्या किंवा अॅट्रॉसिटीच्या खऱ्याखोट्या केसेसचे सतत दिले जाणारे दाखले आणि त्यावरुन तापलेली डोकी हे आता वारंवार दिसते. गेल्या एकदोन आठवड्यात वर्तमानपत्रात वाचयला न मिळालेल्या बलात्काराच्या घटनाही या ग्रूपवर वाचायला मिळाल्या आहेत. त्यातील आरोपी हे महार असल्याचे आवर्जून अधोरेखित केले गेले आहे. मराठ्यांच्या योगदानामुळे आणि त्यागामुळे (!)इतर जातींची प्रगती कशी होत आहे आणि त्याविषयी कोणतीही कृतज्ञता कशी व्यक्त होत नाही याविषयी रोषही आता वाचायला मिळतो आहे. वाघ, सिंह, तलवार, वटारलेले डोळे, उगारलेली मूठ वगैरे फॉरवर्ड्स कायम येत असतात. पुण्याच्या मोर्च्यातील सहभागींची संख्या ७५ लाख होती हा दावा करताना कुठल्या रस्त्यावर किती माणसे असे कोष्टक आले होते. त्याचे विश्लेषण करुन ती संख्या फारतर ३० लाखापर्यंतच येते असे गणिती कल असलेल्या एकदोन (नॉनमराठा) सदस्यांनी खेळकरपणे सांगायचा प्रयत्न केला तर 'गप्प बसा नाहीतर तुमचा "सामना" होईल' असा दम मिळाला. (त्या आठवड्यात सामनामध्ये आलेल्या वादग्रस्त व्यंगचित्राचा संदर्भ होता). त्यामुळे हे मोर्चे वरवर शांत दिसत असले तरी सोशल मीडियावर वेगळाच प्रचार चालू आहे याची मला खात्री वाटते.
अतिशहाणा ह्यांच्या वरच्या
अतिशहाणा ह्यांच्या वरच्या प्रतिसादावरुन, चिंज पहिल्यापासुन जे म्हणत होते ते बरोबर आहे असे वाटतय.
रोचक.
सिफर, एक होता गणू, अतिशहाणा ह्यांचे, हस्ते-परहस्ते आलेल्या अनुभवांचे प्रतिसाद रोचक आहेत. नील लोमस यांनी आणि इतरांनीही असे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आलेले अनुभव मांडावेत अशी विनंती.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
फिल्लम इन्स्टीट्युटमदे गजा
मआंजा हा एक गमतीदार प्रकार आहे. 'मी कोब्रा तू देब्रा म्हणत एकत्र येणारे उजवे' असो किंवा 'खरंतर मी जन्माने ब्राह्मण पण जातपात मानत नाही म्हणत एकत्र येणारे (सोकॉल्ड)डावे'. दोन्हीकडे एकाच जातीचे लोक दिसतात. पहिल्यांचं ठिकय; पण दुसर्यांना 'हं? मग बाकीचे कुठयत??' असा प्रश्न विचारावा वाटतो.
===
एनीवे ऋचे प्रतिसाद आवडले.
===
गणूने जो मुद्दा मांडलाय तो इथल्या डाव्या, सामाजिक भान मिरवणार्यांना स्वतःहून जाणवू नये; रादर उजव्याब्राह्मणी लोकांचे अँटीमराठा विचारच त्यांनी वेगळ्या शब्दात मांडावेत हे रोआउ आहे. मूळ प्रश्न अल्पभूधारक शेतकर्यांचा आहे. आणि आरक्षण हे त्यावर उत्तर नाही.
===
पण तरी तो एक ठळक मुद्दा असल्याने त्याबद्दलचे माझे विचार:
* आरक्षण रद्द करा किंवा केवळ आर्थिकनिम्नस्तराला आरक्षण द्या हा पुर्णपणे बामनी कावा आहे. मराठ्यांनी त्याला बळी पडू नये.
* कायदा, घटना या मार्गाने आरक्षण मिळणे अवघड मार्ग आहे. त्यापेक्षा मराठा शिक्षणसंस्थांनी 'पुर्ण खाजगीकरणा'चा पर्याय विचारात घ्यावा. DTE ब्रोशर वरवर चाळताना जैन आणि मराठा संस्थांचे प्राबल्य सहज जाणवले. पक्का विदा नाही तरीही १६% आरक्षणापेक्षा ४०% खाजगीकरण जास्त फायद्याचे वाटते.
याबद्दल माझे http://misalpav.com/node/37481?page=1 इथले प्रतिसाद खाली चोप्यपस्ते करते.
===
भटुर्डे, वरणभात वगैरे शब्द वापरणारे ब्राह्मणच दिसलेत. इथेच आंजावर! मग तेच शब्द ब्राह्मणेतरांनी (की फक्त मराठ्यांनी?) वापरले तर भडकाऊ होतात?
===
अन् फडणवीसांना 'पाठांतर करा, पुरोहीत बना' सांगणे ही जळजळ असेल तर मग शिक्षणसम्राट, साखरसम्राट, जाणता राजा वगैरे काय आहे?
===
कोणी ब्राम्हण, अब्राम्हण वा बीसी एवढंच ध्यानात येणार्या आमच्या मुलांना आता मराठा, कुंणबी वैगेरे ही माहित झालय. >> म्हणजे 'ब्राह्मण सेंट्रीक जातियवाद आमच्या आजूबाजूला होता तोपर्यंत ठीक होतं पण आता मराठा, कुणबी वगैरेपण आपापल्या जातीविषयी बोलायला लागले ते फार चूक आहे' असं का?
===
ह्या दृष्टीने काही करायचे सोडून गंगा उलटी कशी वाहेल याकडे लक्ष दिलं जातय. >> काय करायचं सांगा? उपाय सुचवा. जालावर येऊन 'जातपात मानत नाही' या वाक्याच्या जस्ट आधी 'मी जन्माने ब्राह्मण' असं सांगायचं? की 'SC/ST क्षमस्व, उच्चआंतर्जातीय चालेल' लिहणार्यांवर घणघणाती टिका करायची पण स्वतःमात्र सोयीस्करित्या स्वजातीतच लग्न करायचं? जरा आपापली फेसबुकफ्रेंडलिस्ट बघा बरं एकदा. कोणत्या जातीचे जास्त आहेत?
===
आर्थिक स्थिती चांगली नसताना केवळ सूनेनं नोकरी करणं.... नेता/ विचारवंत कोणी दिसत नाही. हे मला धोकादायक वाटतं. >> अन् आर्थिक सुस्थितीत असलेल्या स्वखुशीने गृहिणींना सर्जनइतकी प्रतिष्ठा द्या, त्यांचा सावित्रीबाईंइतका आदर करा सांगणार्या इस्त्रिवादीफुरोगाम्यांना कोण सुधारणार?
===
मला कितीही पगार दिला तरी त्या 'जयभीम' वाल्यांकडे जाऊन स्वयंपाक करणार नाही असं म्हणणारी मराठा स्वयंपाकीण मला फार नाही ८ दहा वर्षांमागेच भेटलेली. >> यापेक्षा कितीतरी जास्त ब्राह्मण-जातपातची उदा पाहिलीत. इनफ्याक्ट इथे गब्बरचे 'एम्प्लॉयी आणि एम्प्लॉयर कोणत्याही बेसिसवर नोकरी देऊ अथवा नाकारू शकतात' हे तत्व लावले तर चालेल असे वाटते.
===
मग याच न्यायाने उद्या मुलांना सीट्स मिळत नाहीत म्हणून मुलींनी प्रोफेशनल कोर्सेसना प्रवेश घेऊ नये वा स्त्री अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा स्त्रिया गैरफायदा घेतात म्हणून ते रद्द्/सौम्य करावेत यासाथी मोर्चे निघाले तर त्यांनाही समजून घ्याव असं वाटेल का तुला? >> त्यासाठी मोर्चे काढायचीही गरज नाही. कोणत्याही लॉजिकल माणसाला ते सहज समजेल. आरक्षणातून शिकलेल्या मुली चूलमूलमधे अडकणे म्हणजे शिकलेल्या दलितांनी परत साफसफाइ कामं करण्यासारखे आहे. आणि ४९८अ च्या गैरवापराबद्दल शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. जे योग्यच आहे.
===
बादवे प्रतिसाद देताना मराठा आणि कुणबी एकतर एकत्र ठेवा किंवा वेगवेगळे. खैरलांजीबद्दल बोलताना मराठा असे म्हणायचे पण इतरवेळी कुणबींचा वेगळा उल्लेख करायचा?
===
अशी गाजरे धरण्यापेक्षा राजकीय नेत्यांनी सर्वांनाच सर्व शिक्षण मोफत मिळेल असे मार्ग शोधावेत जेणेकरून आरक्षणाची आवश्यकताच राहणार नाही आणि हे सरकारला करणे अशक्य नाही. >> आता ओपनमधे अॅडमिशन घेणार्या सर्वांनाच ओबीसीप्रमाणे ५०% फीसवलत सरकारकडून मिळणार आहे. हे मराठा मोर्चाचे यशच म्हणायला हवे. याबद्दल मराठेतर ओपनवाल्यांनी 'कृतज्ञ' असायला हरकत नाही
बादवे ओबीसी १९% आहे. ओबीसी+एन्टी २७%.
===
ब्राह्मण त्यातून बाहेर पडले म्हणून पुढे गेले. आज ह्या गोष्टींकडे ब्राह्मण बाहेरून आणि मजेत पाहू शकतात ते त्यामुळेच. >> रिअली? असो.
===
पुण्यातील रस्त्यावरील गर्दीचे विश्लेषण करुन संख्या फारतर ३० लाखापर्यंतच येते असे गणिती कल असलेल्या एकदोन (नॉनमराठा) सदस्यांनी खेळकरपणे सांगायचा प्रयत्न केला >> खेळकरपणे? विश्लेषण?? फारतर(!) ३० लाख??? असो.
या विषयावर माबोवर
प्रकाटाआ
का काढलास? मी जस्ट वाचून ,
का काढलास? मी जस्ट वाचून , समजावुन घ्यायचा प्रयत्न करत होते. अनंत कॉपी-पेस्टसमुळे खिचडी प्रतिसाद होता पण ठेवायला हरकत नव्हती.
विनंती
माझी वाक्यं उद्धृत केलीत त्यामुळे एक नम्र विनंती : जर तुमच्या मते परिस्थिती अशी नसेल, तर परिस्थिती कशी आहे ते मला समजावून सांगितलंत तर आभारी असेन.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
दुसर्यांना 'हं? मग बाकीचे
खरय . हे कोडं आहे. इथे ठराविकच लोकं का दिसतात हा प्रश्न मलाही पडला आहे.
प्रतिसादातील जी वाक्य माझी आहेत त्यांचं स्प्ष्टीकरण द्यायचा प्रयत्न.
कोणी ब्राम्हण, अब्राम्हण वा बीसी एवढंच ध्यानात येणार्या आमच्या मुलांना आता मराठा, कुंणबी वैगेरे ही माहित झालय. >> काय करायचं सांगा? उपाय सुचवा.-----------------कोणत्या जातीचे जास्त आहेत?
जात मानणारे वा न मानणारे दोघांच्याही कानावर हे प्रकरण असतचं. आडनाव कानावर पडलं की "हा कोणत्या जातीचा" हा विचार माझ्या मनात येत नाही असं म्हणणारा भारतीय खोटारडा आहे असं मी स्प्ष्ट म्हणते. कारण हे लहानपणापासून कानावर पडलेलं असतं. त्याचा परिणाम आअपल्यावर होऊ द्यायचा किंवा नाही ही बाब त्या पुढली. त्यामुळे हे वाक्य लिहीताना "जातींची ढोबळ माहिती असण्यनेही दरी पडते तर त्या तपशीलात माहिती होणे आणि त्याचा संबध फायद्या-तोट्याशी जोडला जाताना दिसणे हे जास्त घातक आहे " असा होता. त्या वाक्याचा असाही होऊ शकतो हे मला मान्य आहे, आणि त्याबद्द्ल माफी असावी पण मी त्या अर्थाने बोलले नव्हते. आंबेडकरांनी 'जातीचे निर्मुलन करायचे असेत तर पोटजाती प्रथम नष्ट केल्या पाहिजेत' असे मत मांडले होते त्या अर्थाने मी हे लिहीले होते.
माझ्या फेबु आणि प्रत्यक्ष फ्रेंडलिस्टात सर्व आहेत. याचं मूळ म्हणजे आपली आडनावं. ती व्यवहारात वापरली जाऊ नयेत असं मला वाटतं. जात आडनावांना चिकटलेली असत. ती न वापरणं हा एक उपाय. जातीचा उल्लेख कुठेही असू नये ना शाळेच्या दाखल्यात, ना लग्नांच्या जाहिरातीत. आंतरजातीय विवाहितांच्या संततीला जात लागू नये. सर्व ******जात समाजोन्न्ती मंडळे बेकायदेशीर ठरवावी, जात पंचायती ठरवतात तशी.
अर्थात हे सर्व उपाय वैय्यक्तिक पातळीवर करता येणारे नाहीत हे माहिती आहे. पण जात ही भारतीय समाजाला लागलेली घातक कीड आहे हे सर्व पातळीवर मान्य होत नाही तोपर्यंत काही उपाय नाही. यासाठी राजकारणी काहिही करणार नाहीत ती अपेक्षाही नाही. त्यामुळे शक्यतो हे आपण व्यकिगत जीवनात पाळावं,जातीच्या वळचणीला जाणे ठामपणे टाळावे. आता ते कोण करतं आणि कोण नाही यावर मी काही बोलु शकत नाही. मी करते.
का देऊ नये प्रतिष्ठा. सर्जनएवढी नक्की नको पण थोडीफार तरी. तिला खरंतर नवर्^याच्या उत्पन्नातला वाटाही मिळायला हवा. याची मुळं आपल्या समाजात मुलग्यांना जे लाडावून ठेवतात त्यात आहेत त्याचा या विषयाशी काहिही संबंध नाही. आता अर्थात समानता म्हणत मुलींनाही स्वावंलंबी करायचं नाही असा ट्रेंड आहे. तो विषय वेगळा.
हो आहेत. हे मान्यच. २०१४ निवडणूकींच्या वेळेस राजकारण म्हणजे काहीतरी वाईट असं मानणार्^या कितीतरी साध्यासुध्या ब्राम्हण बायाबापड्यांनी "मतदान करा बरं का. आपलं राज्य येणार आहे" असं परस्परांत सांगितलेलं आहे. ( "यात काय चूक आहे?" असा प्रश्न येईल. त्याचं उत्तर "ही मंडळी आम्ही जात वैगेरे मानत नाही असं उघड आणि खाजगीत बोलतं. त्याची आर्थिक स्थितीही मध्यम ते उत्तम, मग एवढा "आपलं राज्य" चा आनंद का? तर आपलं म्हण्जे "हिंदू राज्य" त्याचा आनंद. )
आधीची ओझी झेपत नसताना हे नवीन लोढंण गळ्यात अडकवून घेतलय . सर्वांना मोफत आणि उत्तम प्राथमिक शिक्षण हे जास्त गरजेचं आहे.
हे वाक्य माझं नाही तरिही रहावत नाही म्हणून. त्या गोष्टीकडे ब्राम्हण मजेने बघतात म्हणजे थत्तेंच्या म्हणण्याप्रमाणे "पाहुण्यंच्या काठीने परस्पर साप मेला तर बरच" असं बघतात.
अजूनही सामाजिक पुढारीपण ब्राम्हणांकडेच आहे आणि "आम्हीही वाईट आर्थिक परिस्थितीतून गेलोय" असा कांगावा करण्यापेक्षा त्यांच्या पुढ्यार्^यांनी ते स्वतःहून सोडायला हवं. त्याऐवजी "हमों" सारखे सुजाण लोकंही जातीचा कसा तोटा होतो हे सांगत त्यांना एकत्र करवून ब्राम्हण संमेलनं भरवतात आणि त्यांना लोकं जातात (इथे कोणी स्वतःला लावून घेऊ नये)
यातही परत आंबेडकरांचंच उदाहरण त्यांच्या म्हणण्यानुसार 'केवळ बुद्धीवादी वर्ग जेव्हा जातीच्या सुधारणां विरोधात असते तेव्हा जाती नष्ट होण्याची शक्यता सुतराम दिसत नाही.' आणि भारतातली बुद्धीवादी वर्ग ब्राम्हण आहे त्याशिवाय त्यला सामाजिक प्रतिष्ठा आहे. तो या जात नष्ट करायचा मागे का लागेल? त्यापेक्षा व्यक्तिगत पातळीवर आपलं भलं करून घेऊन "जातपात मानत नाही" असं सांगत फिरणं सोईचं असतं. तसंही काळानुसार बदलणारा हा वर्ग आहे.
आंबेडकरांनी "देवस्थानात परंपरागत पुजारी न नेमता तो सरकारी नोकर असावा असं आणि प्रत्येक हिंदू व्यक्तीला पुजारीपण करण्यासाठी पात्र समजले जावे तसंच त्यासाठी सरकारी परिक्षा आणि सनद असावी" असं म्हटलेलें आहे. त्या दृष्टीने कोणी काही करेल ही अपेक्षाच व्यर्थ आहे. त्यांच्याच म्हणण्यानुसार "ज्या चळवळीचा अंतिम परिणाम आपली सत्ता गमावणे यात होईल त्या चळचळीचे नेतृत्व ब्राम्हण का करेल?
मी प्रयत्न केलाय स्पष्टीकरण द्यायचा. यातून अजून वाद उद्भवू शकतीलही पण नाईलाज आहे.
अंतरा, यासगळ्या मुद्द्यांवर
अंतरा, यासगळ्या मुद्द्यांवर आपली परवाच चर्चा झालेली. बर्याच बाबतीत सहमती, काही बाबतीत अजून चर्चेची गरज वगैरे. ते सगळे वैयक्तीक पातळीवर होत राहिलच.
तुझ्या+इतरांच्या प्रतिसादातील काही वाक्यं उचलून मी त्यावर मतं मांडली कारण स्वतःहून सेपरेट लिहण्यापेक्षा हा मार्ग मला सोपा वाटला. म्हणूनचतर उपप्रतिसाद देण्याऐवजी वेगळा एकच प्रतिसाद दिलेला.
===
जात मानणारे वा...त्या अर्थाने मी हे लिहीले होते. >> माफी कशाला उगीच. जात हा अँगलच मला चारेक वर्षांपुर्वी मआंजावर आल्यावर मिळाला आहे. पण हळूहळू त्याचे कांगोरे लक्षात येत आहेत.
===
'जातीमुळे कोणताही फायदातोटा न होणार्यांनी किंवा होत असेल तरी तो नको असणार्यांनी आडनावं वापरणं बंद करणे' हा उपाय प्रेक्टीकल, वैयक्तीत पातळीवर करता येईल असा वाटतोय.
===
तो विषय वेगळा. >> +१ फक्त 'गरज असतानाही आपल्या बायकोला बाहेर इतरांची कामं करायला न पाठवणार पुरुष' आणि 'काय गरजय? मी कमवतोय की! तू बस घरातच अंडी उबवत. म्हणणारा पुरुष' यांना कसे रँक करावे हा विचार करत होते
===
आधीची ओझी झेपत नसताना हे नवीन लोढंण गळ्यात अडकवून घेतलय. >> हा हा:-D मलादेखील तो निर्णय आवडला नाही
सर्वांना मोफत आणि उत्तम प्राथमिक शिक्षण हे जास्त गरजेचं आहे.>> भारतात ८०% मुलं अजुनही मोफत सरकारी शाळेतच जातात. पण त्या शाळांची अवस्था उत्तम म्हणण्यासारखी नाही.
===
ब्राह्मण त्यातून बाहेर पडले म्हणून पुढे गेले. आज ह्या गोष्टींकडे ब्राह्मण बाहेरून आणि मजेत पाहू शकतात ते त्यामुळेच. >> यातून दोन अर्थ निघतायत:
1. त्यातून=जातपात, ह्या गोष्टींकडे=मोर्चा:
ब्राह्मण जातपातीतून बाहेर पडलेत?
बाहेरुन आणि मजेत? नोप्स
* एकतर ते मोर्चा हिंसक होइल म्हणून घाबरले आहेत किंवा
* मराठ्यांनापण आरक्षण मिळालं तर आपल्याला उत्तरध्रुवावर जाऊन रहावे लागेल म्हणून चिंताग्रस्त आहेत किंवा
* आपलेच नुकसान होइल हे लक्षात न घेता ब्रिगेडला प्रोवोक करतायत किंवा
* मोर्चाला अँटीदलित मुव्हमेंट म्हणून हायज्याक करायचा प्रयत्न करतायत
तो सिमोल्लंघनमधला १४ कोटी सुवर्णमुद्रा फी मागणारा, त्याकाळचा शिक्षणसम्राट कसा कोणाच्याच लक्षात येत नाही; पण लढणारा, लूट करणारा क्षत्रियच कसा व्हिलन ठरवला जातो तसं काहीसं
2. त्यातून=सरंजामशाही मानसिकता=परंपराश्रेष्ठत्व मानणारी, पुरुषप्रधान, वर्चस्ववादी, समताविरोधी, सश्रद्ध विचारसरणी
ब्राह्मण यासगळ्यातून बाहेर पडलेत?? की फक्त गावकी, भावकी, खोत या गोतावळ्यांना वेगळ्या नावात, रुपात कन्वर्ट केलंय? मआंजा, कट्टे, परदेशातदेखील घेट्टो करुन राहणे, BMM, तिकडेदेखील आपले सण साजरे करायला एकत्र येणे, हमोंचे ब्राम्हण संमेलन हे सगळं कायेमग?
भारतातली बुद्धीवादी वर्ग ब्राम्हण आहे त्याशिवाय त्यला सामाजिक प्रतिष्ठा आहे. तो या जात नष्ट करायचा मागे का लागेल?
ज्या चळवळीचा अंतिम परिणाम आपली सत्ता गमावणे यात होईल त्या चळचळीचे नेतृत्व ब्राम्हण का करेल? >> तेच की! मग ब्राह्मण व्यक्तीस्वातंत्र्यवादी झालाय वगैरे म्हणण्याला काय अर्थ?
बाकी काही समजलं नाही पण BMM,
बाकी काही समजलं नाही पण
यात काय प्रॉब्लेम आहे?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मला कसलाच प्रॉब्लेम
मला कसलाच प्रॉब्लेम नाही.
'ब्राह्मण सरंजामशाही मानसिकतेतून बाहेर पडून व्यक्तीस्वातंत्र्यवादी झालेत. त्यामुळे ते इतर सरंजामशाहीत अडकलेल्यांकडे बाहेरुन आणि मजेत बघतायत' असा दावा केला गेलाय. तर तो खरंच खरा आहे का ते चेक करतेय.
परदेशात सणवार साजरे करणे आणि
परदेशात सणवार साजरे करणे आणि BMM वगैरे बनवणे ही सरंजामशाही आहे?
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
'सरंजामशाही
'सरंजामशाही मानसिकता=परंपराश्रेष्ठत्व मानणारी, पुरुषप्रधान, वर्चस्ववादी, समताविरोधी, सश्रद्ध विचारसरणी' असे जंतू म्हणतायत. परदेशात सणवार साजरे करणे आणि BMM वगैरे बनवणे हे त्यातल्या कुठल्या एक/अधिक शब्दाखाली बसवता येतय का ते बघ बरं.
परंपराश्रेष्ठत्व मानणारी,
परदेशात सण साजरे करणं यातल्या कशातही बसत नाही.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
मला असं वाटतंय की
मला असं वाटतंय की परंपराश्रेष्ठत्व मानणारी, सश्रद्ध विचारसरणी यात ते बसतं. पण मी चूक असू शकते.
बरोबर
चूक आहात.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
बाहेर आणि मजेत :-)
ब्राह्मण यातून बाहेर पडले आहेत ह्याचा मला अभिप्रेत अर्थ मी वर मांडलेल्या आधुनिक व्यक्तिस्वातंत्र्याविषयीच्या संकल्पनेशी आणि सरंजामी विचारसरणीशी संबंधित आहे. रोजीरोटीसाठी इतर (सरंजामी) जाती जितक्या सरकारवर, आपल्या जातिबांधवांवर, कुटुंबावर किंवा वडिलोपार्जित गोष्टींवर अवलंबून असतात तितका ब्राह्मण नसतो. तो स्वतःचं कमावतो आणि खातो. नवरा-बायको दोघे कमावतात आणि आपल्याला हवं तसं जगतात. मुलांनी कसं जगावं ह्यावर आईवडील फार स्वतःची मनमानी चालवत नाहीत आणि चालवली तर मुलं त्यांना हिंग लावून विचारत नाहीत. असं स्वातंत्र्य
'सरशी तिथे पारशी' अशा अर्थानं. म्हणून तो ह्या सगळ्याच्या बाहेर आहे आणि मजेत आहे. जगण्याचं मूल्य म्हणून ते योग्य आहे किंवा नाही ह्यात मी पडत नाही, पण सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजी म्हणून ते उत्तम काम करतंय हे नाकारण्यात हशील नाही. इतर लोक त्याला नावं ठेवण्याऐवजी तसं वागायला शिकतील तर त्यांची आर्थिक प्रगती होईल. उदा. काही दलितांनी, ओबीसींनी आणि मराठ्यांनीसुद्धा हे अंगिकारलेलं दिसतं आहे, तेदेखील खुद्द स्वतःच्या जातिबांधवांकडून चेष्टा केली जात असताना.
मिळालंघेतलं आणि परावलंबित्व संपलं की हळूहळू माणूस स्वतःच्या हिताचा विचार स्वतःच करायला लागतो आणि 'लोक काय म्हणतील?' असा विचार स्वतःच्या हिताआड येऊ देत नाही. ह्याचा अर्थ ते जातपात मानत नाहीत किंवा एकत्र येऊन सणसमारंभ वगैरे साजरे करत नाहीत असा नाही. ते परंपराश्रेष्टत्वाला तोंडदेखलं मान्यही करत असतील, पण... ते त्या गोष्टींचं स्वतःच्या व्यापक हितावर आणि प्रगतीवर जोखड बनू देत नाहीत. घरातल्या लग्नानिमित्त किंवा मयतानिमित्त गावजेवण घालायला ते कर्ज काढणार नाहीत, पण मुलाच्या उच्चशिक्षणासाठी काढतील. उच्चशिक्षणासाठी किंवा नोकरीनिमित्त मुलीला परगावी पाठवायचं तर ते घराण्याच्या इभ्रतीची काळजी करून तिला घरी बसवणार नाहीत. अशा वातावरणात वाढलेला माणूस मग इतर लोकांना सरकारकडून किती मदत मिळतेय, आपणच कसे कमनशिबी वगैरेंची चिंता करण्यापेक्षा व्यक्तिगत हिताचा मार्ग चोखाळतो. अर्थात, इतर जातीतले लोक ह्याला स्वार्थी, मतलबी, व्यवहारी, धूर्त, आपल्या पोळीवर तूप ओढण्यात पटाईत वगैरे हिणवतात, पण त्याची अजिबात पर्वा तो करत नाही. मराठ्यांच्या आरक्षणाबद्दल मत विचारलं तर तो त्याच्या विरोधात असेलही, पण तो काही त्याच्या जीवनमरणाचा प्रश्न नाही. आपल्याशिवाय भारताचं जीडीपी वाढत नाही ह्याची त्याला खात्री आहे. किंबहुना त्यानं तीच त्याची सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजी केलेली आहे- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
इंटरेस्टींग! आधी एका
इंटरेस्टींग! आधी एका प्रतिसादात लिहल्याप्रमाणे उजव्याब्राह्मणी लोकांशी फारच म्याच होतायत तुमचे विचार! श्रीगुरुजी वगैरे... काय कारण असू शकेल यामागे याची थोडी गंमत वाटतेय
एनीवे सध्या इतकेच. अजून काही लिहण्यासारखं वाटलं तर लिहीन किंवा लिहणार नाही.
वरवर नाही खोलवर वाचा
ह्याला माझे विचार समजाल तर तिथे फसाल
ह्यात मी काहीही नॉर्मेटिव्ह म्हणत नाहीए. मी मला दिसणारी आणि यशस्वी होणारी सर्व्हायव्हल स्ट्रॅटेजी वर्णन करतो आहे. तुम्हाला ती तशी दिसते आहे की काही वेगळी दिसते आहे? मराठा मोर्चांमुळे घाबरून गेलेले आणि आता आपलं कसं होणार ह्या चिंतेत असलेले ब्राह्मण मला दिसत नाहीत ही माझ्या परिघाची मर्यादा असू शकते हे मला मान्य आहे.
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
मराठा मोर्चांमुळे घाबरून
मराठा मोर्चांमुळे घाबरून गेलेले आणि आता आपलं कसं होणार ह्या चिंतेत असलेले ब्राह्मण मला दिसत नाहीत ही माझ्या परिघाची मर्यादा असू शकते हे मला
मान्य आहे.
>> त्या मिपा धाग्यावरचा गंम्बाचा प्रतिसाद वाचा. कट्ट्याला झालेली भेट परिघात येत असेल तर गंम्बा तुमच्याच परिघातले आहेत.
कट्ट्याला झालेली भेट = परीघ
कट्ट्याला झालेली भेट = परीघ कै च्या कै गं. चिंता ठरवणार ना त्यांचा त्यांचा परीघ. म्हणजे तुझं चुकत आहे. हो स्पष्ट करते नाहीतर कोणीतरी "खवचट" श्रेणी देऊन रंगच बदलून टाकायचं.
___
गम्बांच्या प्रतिसादाचे काय? मी वाचला त्यांचा मिपावरचा प्रतिसाद-
अंतराच्या या अत्यंत सेन्सिबल सूचनेला (सजेशन) त्यांनी दुजोरा दिलेला आहे. मी जसा दिला तसाच.
गम्बा "आपलं कसं होणार ह्या चिंतेत असलेले ब्राह्मण" कुठे आहेत?
चिंता वर म्हणतायत की "आपलं कसं होणार ह्या चिंतेत असलेले ब्राह्मण मला दिसत नाहीत".
गम्बा हे चिंतांच्या परीघात असल्यानसल्याने काय फरक पडतो?
>>आपल्याशिवाय भारताचं जीडीपी
>>आपल्याशिवाय भारताचं जीडीपी वाढत नाही ह्याची त्याला खात्री आहे.
हे काय आहे ते कळलं नाही.
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.
आपल्याशिवाय भारताचं जीडीपी वाढत नाही
(एक गट म्हणून)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
(एक गट म्हणून) तो जास्त
ब्राह्मण हे सर्व करतात? इतर जाती का नाही करत? मला कळलं नाही हा निष्कर्ष कोणत्या आधारावर काढला आहे.
म्हणजे असं स्टेटमेन्ट मला छातीठोकपणे करता आले नसते. ज्यांना करता येतं त्यांच्या बद्दल कौतुक (खवचटपणे नाही) वाटतं कारण त्यांच्याकडे पुरावा अथवा अभ्यास अथवा निदान लोकसंग्रहातून आलेले नीरीक्षण असावे असा कयास.
तथाकथित वैश्य / व्यापारी
तथाकथित वैश्य / व्यापारी समाजा च्या योगदानासमोर ब्राह्मण समाजाचे GDP मधले योगदान किरकोल असावे
तुलना
महाराष्ट्राच्या लोकसंख्येत ब्राह्मण किंवा पारशी वगैरे तसे छोटे समूह आहेत. एकंदर सकल उत्पादनातला त्यांचा हिस्सा आणि लोकसंख्येतलं त्यांचं प्रमाण अशी तुलना केली, तर लक्षात यावं की मराठे किंवा तत्सम समूहापेक्षा ते ह्या बाबतीत पुढे आहेत.
(आणि मारवाड्याचं दुकान वगैरे छोटे व्यवसाय सोडून जर बलाढ्य कंपन्या पाहिल्या तर असं लक्षात येईल की त्यातही ब्राह्मण लोक मराठ्यांपेक्षा तुलनेत अधिक उच्चपदांवर - व्यवस्थापकीय वगैरे - आढळतात. म्हणजे वैश्य व्यापारी समाजालाही मोठा व्यवसाय करायचा तर त्यांना हाताशी घेऊन करावा लागतो. तशा अर्थानंही त्यांचा जीडीपीत वाटा दखलपात्र आहे.)
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
तुम्ही जीडीपी बद्दल बोललात,
तुम्ही जीडीपी बद्दल बोललात, "आपल्याशिवाय भारताचं जीडीपी वाढत नाही".
१. मारवाड्यन्चे छोटे व्यवसाय देखिल अनेकाना रोज़गार पुरविते, असे असंख्य व्यवसाय असतील, त्याना कशाला सोडायचं ? this is just a convenient exclusion to suit your calculation.
२. मारवाड्यान्चे मोठे व्यवसाय ब्राह्मण चालवीत नाहित , ते सगलयात जास्त क्रिटिकल कशा वरून ? you have this backwards, business owner is most important, Also मराठा आणी ब्राह्मण शिवाय दुसरे समाज देखील मारवाड्यंकड़े नौकरी करतात , esp अब्राह्मणीय बुद्धीजीवी समाज सारस्वत,ckp वग़ैरे, आणी ते देखील मोठ्या सांख्येत
३. ३०% मराठ्या पैकी १०% तरी रेग्युलर सर्विस इंडस्ट्री मध्ये असतील, त्यांचे योगदान (टोटल ३% पॉप्युलेशन) Maharasthrian BrahmanAnchya नजीक असेल
उरलेल्या २७% शेतकर्यांचे उत्पादन तुमच्या जीडीपी मध्ये येत नसावे , कदाचीत तुम्हाला टैक्स रेवेन्यू मधील contribution अभिप्रेत होते ?
माफ़ करा पण तुमचे वर quote केलेले वाक्य कमालीचे बिनबुडाचे आणी अहंकारी वाटते।
पाने