गणवेष आणि Uniform!

फक्त गणित, विज्ञान किंवा तत्वज्ञान अशा विषयांवरच खोल विचार करता येतो, असा बऱ्याच लोकांचा समज असतो. पण या म्हणण्यात काही फारसं तथ्य नाही. आज सकाळचीच गोष्ट. कोणीतरी माझ्यासमोर 'शाळेचा गणवेष' असा शब्दप्रयोग केला, आणि माझं विचारचक्र सुरू झालं. गणवेष हा तसा मराठीमधला रुटीन शब्द. तो ऐकल्यावर मनात, लाल चट्टे असणाऱ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या शर्टाचं एक जनरल चित्र उमटण्याव्यतिरिक्त काही फार प्रक्रिया घडत नाहीत. पण या शब्दाच्या ईंग्रजी प्रतिशब्दाच्या पार्श्वभूमीवर मात्र हा शब्द अचानक इंटरेस्टींग होतो! कसा? सांगतो!

गण म्हणजे शिष्य, भक्त किंवा तत्सम. कोणालातरी मानणारा किंवा follow करणारा. त्याचा पेहराव म्हणजे गणवेष. याला ईंग्रजीमध्ये uniform म्हणतात. याचीही फोड करूयात. uni म्हणजे एक आणि form म्हणजे स्वरूप. थोडक्यात एकसारखं स्वरूप म्हणजे uniform. आता यात एक गंमत आहे. गणवेष हा गणाचा वेष असल्याने, त्या गणाचा, कोणीतरी गणपती असणंही compulsory आहे! गणपती म्हणजे गुरू या अर्थाने. थोडक्यात गणवेष या शब्दात एक higher authority किंवा ideology अध्याहृत आहे. uniform मध्ये तसं नाही. तिथे एकसारखे कपडे घालण्याला महत्व आहे. गणवेषात एकसारखे कपडे घालण हे खरं तर compulsory नाही! गणाचा वेष हवा, तो काहीही असू शकतो, एकसारखा असेलच असं नाही. uniformity मध्ये जनरली individuality ला स्थान नसतं. स्वत्वाच निर्मूलन म्हणजे एकवाक्यता. म्हणजेच uniform या शब्दात संघभावना किंवा coordination गृहीत आहे! त्यामुळे जर 'खोल' विचार केला तर लक्षात येतं की uniform आणि गणवेष या शब्दांचा मूडच वेगवेगळा आहे. आणखी एक मुद्दा म्हणजे गणवेष या शब्दात 'वेष' आल्यामुळे तो फार specific बनून गेला आहे. म्हणजे शब्दश:, तो फक्त पेहरावाबद्दल बोलतो. uniform हा form किंवा स्वरूप याच्याबद्दल बोलत असल्याने तो थोडा अधिक व्यापक आहे. किंबहुना म्हणूनच ईंग्रजीमध्ये uniform हा शब्द अधिक flexible पणे वापरला जातो.

आपल्याकडे लोक 'शाळेचा गणवेष' असं बऱ्याचदा म्हणतात. ते तसं चूकच. शाळेचा मधली षष्ठी अनावश्यक आहे. गणवेष हा गणाचा असतो, मग शाळेचा गणाचा वेष असं कसं होईल? 'शाळा गणवेष' हा शब्दप्रयोग अधिक चपखल आहे. ईंग्रजीमध्येही, school's uniform असं न म्हणता school uniform असं म्हणलं जातं!

आता आणखी थोड्या गमती. वरती explain केल्यानुसार जर वेगवेगळ्या शाळांची मुले आपापल्या शाळा गणवेषात आली तर ते सर्वजण गणवेषात असतील पण uniform मध्ये नसतील! आता हे अतीच झालं, पण खरंय! आणि आधी न ठरवता किंवा योगायोगाने किंवा कोणताही विशिष्ठ हेतू मनात न ठेवता किंवा नाईलाज म्हणून काही लोकांनी एकसारखे कपडे घातले तर ते uniform मध्ये असतील पण गणवेषात नसतील. असो. रात्रीबेरात्री असलं काहीतरी convoluted लिहिण बरोबर नाही.

या लेखाला काही फारसा मुद्दा नाही. ठरवलं तर कशाचाही कीस पाडता येतो, इतकाच काय तो take-away!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
2.5
Your rating: None Average: 2.5 (2 votes)

प्रतिक्रिया

Smile Smile Smile Smile Smile Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुसतेच स्माईली? Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि गंमत म्हणजे 'शाळेचा गणवेष' हा शब्दप्रयोग काही पहिल्यांदाच ऐकला असशील असं नाही. आपल्या मेंदूतली अगम्य कार्यपद्धती कशी चालते देव जाणे. असो. चिंतन आवडलं.

ता.क.: आत्ता तरी 'अचरट' आणि मी, तुझं लिखाण आवडलेल्या 'गणसमुदायातले' आहोत !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

थॅंक यू अचरटराव आणि मिसळपावकाका!:)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठरवलं तर कशाचाही कीस पाडता येतो

हे मात्रं अगदी बरोबर !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

टिळकांच्या काळात दिडकी लागायची, म्हणतात. चालू भाव काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भावाचं माहीत नाही, पण बळवंतरावांच्या काळानंतर डिस्ट्रिब्युशन सुधारलं आहे. कोणत्याही पानटपरीवर जरा प्रयत्नांती मिळेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

वरील लिखाण हे लेखकाने पूर्ण शुद्धीत केलेले असून तो याचे श्रेय हे, पानटपरीवर 'थोड्याश्याच प्रयत्नांती' मिळणार्या लाबुडक्या, बारीक पोत्यासमान दिसणार्या अथवा वेडेवाकडे कापलेले गवत व हिरवी तंबाखू यांच्या मिश्रणावजा दिसणार्या कोणत्याही पदार्थास देउ इच्छीत नाही! Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0