काही रोचक अनुभव - १

विज्ञानशाखेतली सर्व्वोच्च पदवी घेतल्यावर माझे, नोकरीसंशोधन सुरु झाले. यच्चयावत नातेवाईकांना, मी अध्यापन क्षेत्रांत जाईन, असे वाटत होते. मला मात्र उद्योगक्षेत्रांत आणि त्यांतही, 'शोध आणि विस्तार' या क्षेत्रांतच रस होता. त्यादृष्टीने, पहिला चॉईस म्हणजे, त्या क्षेत्रातल्या मातब्बर बहुराष्ट्रीय कंपन्यांवरच माझा डोळा होता. पण काही प्रयत्नांनंतर, अशा कंपन्यांत शिरकाव होणे किती कठीण आहे, याचा मला प्रत्यय आला. लहान कंपन्यांत सहज प्रवेश मिळत असतानाही त्या नाकारुन, या मोठ्या कंपन्यांतच जाण्याचा अट्टाहास मला फार महागात पडला. त्यापैकीच काही रोचक अनुभव, माझे पाय जमिनीवर घेऊन आले.

एका रविवारी, अचानक एक नातेवाईक असलेले, पत्रकार आले. जुजबी गप्पा झाल्यावर त्यांनी माझी चौकशी केली. मी अजूनही नोकरी शोधतो आहे, हे कळल्यावर ते म्हणाले," तुला कुठल्या कंपनीत जायचे आहे तेवढे फक्त सांग. बाकीचे माझ्याकडे लागले". मी लगेच, त्यांच्या हातात माझा 'क्युरिक्युलम व्हायटे' ठेवला.(खरा उच्चार माहित नाही.) तो पाहिल्यावर त्यांनी तोंड वाईट केले आणि तो वाईट्टै, असे त्यांचे मत पडले. तो त्यांच्या मताप्रमाणे सुधारुन घेतला.
"अरे, त्या जर्मन कंपनीतला पर्सनल मॅनेजर आणि मी, एका ग्लासातले आहोत, आपण त्याला घरी भेटू, तुझे काम नक्की होणार." या आश्वासनाने माझा चेहेरा उजळला. त्यांनी लगेच त्याची एका सकाळची अपॉईंटमेंट घेऊन मला तयार रहायला सांगितले. "सकाळी सात म्हणजे सातला पोचलं पाहिजे हं आपल्याला! तो वेळेच्या बाबतीत एकदम कडक आहे." आम्ही टॅक्सी करुन पावणेसातलाच त्याच्या बंगल्यावर पोचलो. नोकराने दार उघडून दिवाणखान्यांत बसवले. साहेब वरुन खाली येईपर्यंत, आम्ही त्यांच्या इंटिरिअरचे निरीक्षण करायला लागलो. बरोब्बर सात वाजता, पांढरा टी शर्ट, पांढरी हाफ पँट घातलेले साहेब, गोल जिन्याच्या पायर्‍या , हरणाच्या पावलाने उतरुन खाली आले. आम्ही सावरुन बसलो. खाली आल्याक्षणी त्यांनी कपाटावरची रॅकेट उचलली आणि, "मी जरा खेळून येतो हां, तुम्ही बसा" असे जाहीर करुन ते दाराबाहेर नाहीसे झाले.

आमचे पत्रकार माझ्याकडे ओशाळं हंसून बघत म्हणाले," फिटनेसच्या बाबतीत अगदी पर्टीक्युलर आहे तो". मी मांडीवरची फाईल धरुन अस्वस्थपणे बसून राहिलो. साधारण सव्वा तासाने साहेब आंत प्रवेशले आणि एकाआड एक पायर्‍या चढत वर अंतर्धान पावले. माझी चुळबुळ वाढली होती. पण माझी मध्यमवर्गीय सभ्यता मजबूर होती. अर्ध्या तासाने साहेब खाली आले. "हं, काय काम आहे, लवकर बोला, मला आज खूप मिटिंग्ज आहेत."

पत्रकारांनी माझी ओळख करुन दिली, येण्याचे कारण सांगितले. " तुमचा सीव्ही देऊन ठेवा, सध्या व्हेकन्सीज नाहीयेत, जेंव्हा होतील तेंव्हा बघू." त्यांनी गुंडाळलेच होते. आम्ही काही बोलायच्या आधीच, साहेबांनी टाईम्स तोंडासमोर धरला होता. आम्हीही मुकाटपणे उठून बाहेर आलो. पत्रकार टॅक्सीत बसताना म्हणाले," तो नक्की तुझं काम करेल. मी बोलेन त्याच्याशी." टॅक्सी भुर्रकन निघून गेली. मी समोरच्या फूटपाथवर बस स्टॉप शोधू लागलो!

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

Sad डिप्रेसिंग अनुभव आहे. माणुसकी म्हणुन किंवा शिष्टाचार म्हणुन नीट वागवण्याचे साधे सौजन्य नाही?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यांच्याकडे असे कित्येक गेटक्रॅशर्स येत असतील. कोणाकोणाशी सौजन्याने वागणार, नि काय म्हणून? Why should he not treat gatecrashers with the contempt they deserve?
..........
बोले तो, तिमा नव्हे. तर त्यांना तिथे घेऊन जाणारा तो **वा. तिमांचा दोष यात नसावा; असलीच तर अगतिकता अधिक अननुभव असावा. असो.
(अशा प्रसंगी असले **वे वुडवर्कातून वळवळत येतातच. (अनेकदा ते नात्यातले किंवा गणगोतातलेच असतात.) आणि गरजवंताला अक्कल नसते. किंवा असली, आणि लख्ख दिसत असले, तरी परिस्थितीच्या आणि अनेकदा आजूबाजूच्यांच्या/घरच्यांच्या प्रेशरखाली नाही म्हणता येत नाही. म्हणजे, याचा काही उपयोग नाही हे दिसत असले, तरी ते धुडकावून लावल्यानंतर लवकरच अन्य मार्गाने यश न मिळाल्यास 'तरी तो अमूकअमूक शब्द टाकायला तयार होता, पण यालाच दळभद्र्याला काही करायला नको; सरळसरळ धुडकावून लावलेनीत' हे उर्वरित आयुष्यभर ऐकावे लागते. (आणि पुढे कधीतरी यथावकाश यश मिळाले, तरीही त्यापुढचे उर्वरित आयुष्यभर ऐकत राहावे लागते.) या घरच्या संततहल्ल्यांपेक्षा बाहेरचा अपमान अनेकदा स्वस्तात पडतो. शिवाय, बाहेरचा असा एखाद वेळेस अपमान करेल; उर्वरित आयुष्यभर आपला नि त्याचा काय संबंध असतो? तसेही तो काही आपल्याला नोकरी देऊन अथवा अन्य प्रकारे उपकृत करत नसतोच, नि पोसत तर नसतोच नसतो, ना त्याला रोज तर सोडाच, पण उर्वरित आयुष्यात पुन्हा तोंड द्यावे लागणार असते. मग त्याच्या वागण्यास एवढा (किंवा काहीही) भाव काय म्हणून द्यावा? 'उडत गेला' म्हणून सोडून द्यावे, झाले.

असो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त लिहिताय तिमा.

'शोध आणि विस्तार' म्हणजे र आणि ड का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तीच 'रड' !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिरशिंगराव, एकदम कोसला स्टाईल! तुमचं हे अलिप्त असं नॅरेशन फार भावतं.

हे वशिलेवाले लोक किती नकली असतात, आणि खरोखर ज्यांचा वशिला लावायचाय त्यांच्यालेखी हे लोक कितपत क्षुद्र जीवाणू असतात ह्याबद्दलच्या अनुभवांवर एक लेखमालाच काढता येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

एकंदर वशील्याच्या तट्टूंबद्दल कंटेम्प्टच दिसतोय. हे कोल्ह्यास द्राक्षं आंबट म्हणावे का अन्य काही? कारण जर वशीला लागत असेल तर तो घेण्यात हरकत काय नक्की? पुढे आयुष्यभर तर काही पुरत नाही. आपला फायदा करुन घेणे ही मानवी प्रवृत्तीच नाही काय?

(दोन्ही बाजूंचा अनुभव असलेली)
शुचि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहमत.
मुलाखतीस बोलावण्याइतपत ओळख लावायला हरकत नाही. घेणारा विचार करूनच घेतो.
मात्र वशिल्याने निवड झालीच तर दोनेक वर्षे तिथे काम करावे, शिडी वापरून मोक्याच्या वेळी पळून जाऊ नये इतकीच अपेक्षा असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वशिला फक्त मुलाखतीला बोलावण्यापुरताच हवा होता. त्यानंतर मुलाखतीत अर्थातच मेरिटला महत्त्व असायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रस्तुत लेखकास कोणत्याही प्रकारे दोष दिलेला नाही. (तसेही दोष देणारे आम्ही कोण, हा एक भाग झाला, आणि समजा दिला, तरीही प्रस्तुत लेखकास त्याचे काय असावे नि काय म्हणून, हा दुसरा.) आणि उमेदवार आपल्या परीने शक्य ते प्रयत्न फॉर-व्हॉटेवर-इट-ईज़-वर्थ तत्त्वावर करणार, हेही (त्यामागील एथिक्समध्ये शिरण्याचा किंवा त्यावर जजमेंट पास करण्याचा प्रयत्न कोणत्याही प्रकारे न करता) समजण्यासारखे आहे. मुद्दा तो नाही.

प्रश्न हा आहे, की ज्याचा वशिला लावायचा, ती व्यक्ती उमेदवाराच्या थेट परिचयाची (मध्यस्थामार्फत नव्हे) होती काय? उमेदवाराशी त्या व्यक्तीचे काही थेट लागेबांधे/जिव्हाळा वगैरे होता काय? तर नाही. ऑन द काँट्ररी, कोणीतरी तिऱ्हाईत व्यक्ती (पक्षी: प्रस्तुत मध्यस्थ), फक्त आपली त्या मनुष्याकडे किती 'वट' आहे (तो कसा आपल्या 'ग्लासातला' आहे) हे कोण्या चौथ्याच, असंबद्ध, पार्टीला (पक्षी: प्रस्तुत लेखकाला) दाखवण्यासाठी (थोडक्यात, शोऑफ करण्यासाठी) त्याचा केवळ (पदस्थल म्हणून) वापर करत होती. (असले कितीतरी जण त्याच्याकडे रोज कटकट करायला येत असतील.) मग त्याने अशा बेमतलबी मध्यस्थांना भीक का घालावी? उगाच संबंध नसताना आपल्या एक्स्पेन्सवर मधल्यामध्ये मोठेपण मिळवण्याच्या त्यांच्या खेळात सामील का व्हावे? त्यात त्याला काय हशील? उलट अशा मध्यस्थांना त्याने झुरळासारखे झिडकारू का नये? त्या माणसाचे वागणे मला अजिबात आश्चर्यकारक वाटले नाही. (आणि, अधिक विचार करता, अधिक तपशील मला ठाऊक नाहीत, पण, प्रस्तुत लेखकाप्रति थेट अपमानकारकसुद्धा वाटले नाहीत. यात अपमान झाला, किंमत झाली ती त्या मध्यस्थाची. कारण त्या गृहस्थाशी डील करत होता तो मध्यस्थ, प्रस्तुत लेखक नव्हे. प्रस्तुत लेखक त्या गृहस्थाच्या दृष्टीने नॉन-एंटिटी होता, व्हू जष्ट ह्यापन्ड टू एक्झिष्ट ऑन द सीन. प्रस्तुत लेखकास तो फार फार तर (असलाच तर) सिग्नल होता, की बाबा रे, तू ज्यास मध्यस्थ म्हणून वापरत आहेस, त्याची पत काय आहे, ते तूच पाहा! बोले तो, त्या मध्यस्थाचा तो दोन्हीकडे अपमान होता, त्या गृहस्थाकडेही, आणि प्रस्तुत लेखकाकडेही! त्या मध्यस्थाने लेखकास त्या गृहस्थाच्या घरी टॅक्सीने आणले, पण परतताना मात्र स्वत: टॅक्सी पकडूनसुद्धा लेखकास घरापर्यंत लिफ्ट न देता आपल्या डिव्हाइसेसनिशी सोडले, यातच सर्व आले!)

बाकी, तो गृहस्थ प्रस्तुत लेखकास कोणत्याही प्रकारे ओब्लाइज करण्यास तसाही बांधील नव्हताच. त्यामुळे मामला खतम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे वशिलेवाले लोक किती नकली असतात, आणि खरोखर ज्यांचा वशिला लावायचाय त्यांच्यालेखी हे लोक कितपत क्षुद्र जीवाणू असतात ह्याबद्दलच्या अनुभवांवर एक लेखमालाच काढता येईल.

होय नबा आपला मुद्दा कळला होता मला. माझा प्रतिसाद बॅटमन यांस उद्देशून होता. अर्थात बॅटमन यांचे मत त्यांच्यापाशी. मला फक्त माझा मुद्दा मांडायचा होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(आता येणार मजा! :D)

----------

बाकी, उपरोद्धृत प्रतिसाद ज्या कोणा वनफॉरटॅन यांनी लिहिला आहे, ते श्री. बॅटमॅन यांचा डुआयडी आहेत किंवा नाहीत याबद्दल मला कल्पना नाही, परंतु त्यांनी त्यांच्या प्रतिसादात जे काही म्हटले आहे, ते मी माझ्या प्रतिसादांतून जे काही म्हटले आहे त्यापेक्षा फार काही वेगळे नसावे, अशी माझी धारणा झाली. बोले तो, त्यांच्या उपरोद्धृत विधानाचा रोख प्रस्तुत सद्गृहस्थ आणि प्रस्तुत मध्यस्थ यांजकडे असावा (आणि प्रस्तुत लेखकाकडे अजिबात नसावा), असाच काहीसा अर्थबोध तो प्रतिसाद वाचून मला तरी झाला ब्वॉ. बाकी त्यांचा नक्की उद्देश काय होता ते त्यांचे त्यांनाच माहीत; माझे आपले हे स्पेक्युलेशन. (टीपः श्री. वनफॉरटॅन हे माझा डुआयडी नाहीत.)

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह शूट !!! अरेच्च्या तो १४टॅन यांचा प्रतिसाद होता ROFL पण भाषा अगदी बॅट्याची होती त्यामुळे माझा गैरसमजच झाला.
बाकी मी "हॅकसॉ रिज" सिनेमा पहात हे लिहीतीये त्यामुळे अर्धं लक्ष त्या सिनेमात आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिसाद होता (लोळून हसत) पण भाषा अगदी बॅट्याची होती

मनोबा - हे पटतय का तुला? तुझा बॅटोबाच्या भाषेचा चांगलाच अभ्यास आहे म्हणुन तुला विचारले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वनफॉरटॅन आणि बॅटमॅन हे एकमेकांचे डुआयडी नाहीत. इशय संपला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

१. तुम्ही वकील आहात का?
२. तुम्ही लिहिता ते थोडे मधाळ करून का लिहित नाही?
३. तुम्ही इतके डिस्क्लेमर का टाकता?
४. एवढे कंस का वापरता?
५. तुम्ही अगदी तुमच्या वाक्याचा कसा काढावा नि कसा काढू नये याची इतकी स्पष्टीकरणे का देता?
६. तुम्ही अयोग्य नसले वाटत तरी फार शुष्क का वाटता? (हा प्रश्न जनरल आहे.)
७. आपल्या दोघांचं रसग्रहण इतकं जुळलं कसं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मस्तं लिहिलय!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !