काही रोचक अनुभव - २

एका ठिकाणी असा अनुभव आला तरी, मी माझा हट्ट सोडला नाही. टाईम्समधल्या प्रत्येक जाहिरातीला अर्ज करत गेलो आणि बर्‍याच ठिकाणी मला मुलाखतीसाठी बोलावलेही. पण, एकंदर सगळीकडचा अनुभव नकारात्मक होता. मुलाखत घेताना, तुम्हाला काय येतं, यापेक्षा काय येत नाही ते शोधून त्यावरच प्रहार करण्याचे टेक्निक असते. आणि माझ्या बाबतीत तरी, येणार्‍या गोष्टींपेक्षा न येणार्‍याच जास्त! त्यामुळे सगळीकडे, व्यवस्थित चिरफाड करुन घ्यायची आणि घरी यायचे, या प्रकाराची संवयच झाली.
एका ठिकाणी तर मुलाखत घेणार्‍यांपैकी एक, अ‍ॅप्रनच घालून बसला होता.त्याने मला सांगितले," मी एक ले मॅन आहे. तुम्हाला आठवत असलेली कुठलीही एक रिअ‍ॅक्शन मला समजावून सांगा या कागदावर." मी अचंब्याने पहात राहिल्यावर, बाकीचे "गो अहेड" असं म्हणाले. मी कागदावर रिअ‍ॅक्शन लिहायला लागल्यावर, तो म्हणाला," हे सी, एच, एन काय लिहिलंय, मला काही समजत नाही." मी पुन्हा गोंधळलो. तो म्हणाला," डु यू थिंक, इट इज युसलेस टु टॉक टु ए पर्सन लाईक मी ?" सगळे हंसले. मी सांगितले की, मला नाही समजावता येणार अशा कंडिशनमधे. त्यावर तो म्हणाला, " मीच इथला चीफ केमिस्ट आहे."
माझ्या ते लक्षांत आलंच होतं. म्हणून तर, सगळे त्याच्या प्रत्येक वाक्याला आणि आविर्भावाला हंसत होते. मुलाखत संपली होती. मी वेंधळ्यासारखे ते पेन माझ्याच खिशाला लावले. क्षणार्धात लक्षांत आल्यावर परतही केले. एक महिन्यानंतर रीतसर रिग्रेट लेटर आले.

घरी कोणी काही बोलत नव्हते. पण मलाच मेंटल प्रेशर आले होते. आपल्याला एवढी, 'विद्यावाचस्पती' ही पदवी मिळूनही काहीच येत नाही, अशी धारणा झाली होती. जास्त वाट न पहाता, एका देशी कंपनीत नोकरी घेतली. तिथे, एकदम घरगुती मॅनेजमेन्ट होती. म्हणजे, दादा, भाऊ, ताईसाहेब इत्यादि. त्या कंपनीत पॉलिमर प्रिंटर रोलर बनवत. सगळा कच्चा माल आयात केला जायचा. माझे पहिले काम म्हणजे. त्यातले एक रसायन त्यांच्या लॅबमधे करुन द्यायचे, इंपोर्ट सबस्टिट्यूशन! ते रसायन एका जगप्रसिद्ध फ्रेंच-अमेरिकन कंपनीतून यायचे. त्याचे सगळे लिटरेचर मी नीट वाचले. मी येण्यापूर्वी, कंपनीने एका मोठ्या रिसर्च इन्स्टिट्यूटला ते करायला दिले होते. त्यांनी ते दोन वर्षांत केलेही होते. पण ते वापरुन केलेले रोलर, अ‍ॅप्लिकेशन टेस्ट मधे पास होत नव्हते. रेसिपी हाताशीच होती. मी लगेच काम सुरु केले. त्या रेसिपीबरहुकुम मलाही तस्सेच रिझल्ट आले. अ‍ॅप्लिकेशनला फेल! मी फक्त दोन प्रयोग केले आणि मग, आयात केलेले आणि माझे सँपल घेऊन युनिव्हर्सिटीत गेलो. तिथे माझा मित्र काम करत होता. त्याच्या मदतीने दोन्ही सँपल्सचे पृथःकरण केले. काही फरक सापडला नाही. लायब्ररीत जाऊन सर्व रेफरन्सेस वाचले. साधारण अंदाज आला. परत प्रयोग सुरु केले. एके दिवशी ट्युब पेटली आणि रेसिपीमधे थोडासा बदल केल्यावर, हवा तसा प्रॉडक्ट हातात आला. काही न बोलता, अ‍ॅप्लिकेशन टेस्टला दिला. दुपारी जेवण झाल्यावर डोळे जड झाले होते. झोप अनावर झाली होती. तेवढ्यांत तिथला इंजिनिअर आला आणि म्हणाला," यू हॅव डन इट!, ग्रेट, काँग्रॅटस!" त्याने मला हाताला धरुन डायरेक्टरांकडेच नेले. सर्व खूष झाले होते.

पण तो आनंद फार काळ टिकला नाही. त्यांच्या अपेक्षा फार वाढल्या. 'घंटोंका काम मिंटोंमे' करणारा, मी कोणी जादुगार आहे, अशी त्या सर्वांची समजूत झाली. डायरेक्टरांनी एक दिवस, त्यांची नुकती ग्रॅज्युएट झालेली मुलगी माझ्यासमोर उभी केली. "डॉक्टर, आजपासून ही तुमची असिस्टंट. तिला केमिस्ट्री शिकवा." त्याच सुमारास, मी तेंडुलकरांचे ,'पाहिजे जातीचे' हे नाटक पाहिले होते. माझ्या अंगावर सरसरुन कांटा आला.
मुख्य म्हणजे, माझ्यापेक्षा जास्त ज्ञान असलेले तिथे कोणीच नव्हते, मग, माझे ज्ञान वाढणार कसे ? 'लायब्ररीत जायची जरुर नाही, सगळा रिसर्च ट्रायल अँड एररनेच होतो', अशी त्या डायरेक्टरांची मते होती. त्यामुळे त्यांच्याशी फार काळ पटणे शक्यच नव्हते. एखादी केमिस्ट्रीच्या दृष्टीने न पटणारी गोष्ट करायला सांगायचे, आणि विरोध केला तर, 'फॅक्टरी माझी का तुमची', असे बिनदिक्कत विचारायचे.
फक्त पांच महिन्यांत मी कंटाळलो. सणकीत राजीनामा दिला आणि परत एकदा नोकरीच्या शोधास लागलो.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

वाचतोय! असेच सलग लिहावे ही विनंती..
वाचस्पती म्हणजे 'पीहेच डी.' असावे असे दिसते. पण हा काळ नकी कोणता हे कळत नाहीये.साल किंवा तत्कालीन सामाजिक संदर्भ आल्यास अजून चांगले वाटेल. तसेच तुमच्या वाचस्पती पदापर्यंत पोहोचताना बाकीचे मित्र कसलीतरी नोकरी करून पुढे गेले असतील तर त्यांना कश्या प्रकारच्या नोकर्‍या मिळत होत्या? वगैरे वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणतो, लिहीत रहावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुमचे रोचक अनुभव नोकरी सोडुन दुसर्‍या खर्‍याखुर्‍या रोचक गोष्टींबद्दल पण असणार आहेत का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाहीतर तेही नोकरी पॉर्न ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नोकरी पॉर्न असेल तर..
मग तर लिहाच.

पण लिहा. प्रतिक्रिया पॉर्नपेक्षा लिहणं महत्त्वाचं, काय अणूराव?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जबरदस्त लिहिताय! पुभाप्र!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मुलाखत घेताना, तुम्हाला काय येतं, यापेक्षा काय येत नाही ते शोधून त्यावरच प्रहार करण्याचे टेक्निक असते.

अगदी अगदी. जरी प्रत्येक प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले तरी, शेवटी उत्तर न उएईपर्यंत इन्टर्व्ह्यु ताणला जातो.
___
अनुभव रोचक वाटला.
सणकीमध्ये राजीनामा देण्याची ऐष (लक्झरी) एन्व्ही-एबल वाटली.
______
विद्यावाचस्पती - मस्त टायटल (मला वाटतं, पी एच डी डिग्री धारकाकरता, समानार्थी शब्द)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे टायटल माझ्या डोक्यातले नाही. पुणे युनिव्हर्सिटीनेच त्यांच्या पदवी वर लिहिले आहे. त्यातला फोलपणा, माझ्यासारख्या पदवीधारकांकडे बघितलं की लगेच कळतो. अजूनही, डॉक्टर म्हणून कोणी समोरुन हांक मारली तर मी मागे वळून पाहतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजूनही, डॉक्टर म्हणून कोणी समोरुन हांक मारली तर मी मागे वळून पाहतो.

हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त अनुभव.

जनरली असे म्हणतात कि दुसरी नोकरी मिळाल्याशिवाय पहिली सोडू नये. असे तुम्हाला नाही वाटले का? कशामुळे ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

@निरागसः काळ १९७७-७८ मधला. त्यावेळी माझ्याबरोबरचे एम.एस्सी., बी.एससी झालेल्या मित्रांना चांगल्या नोकर्‍या मिळाल्या त्यामुळे ते जास्त पुढे गेले असे तात्कालिक वाटले खरे, पण काळाच्या कसोटीवर शेवटी माझे उच्च शिक्षणच जास्त कामी आले.

@शुचि व प्रणवः दुसरी नोकरी हातात नसताना पहिली सोडणे, ही लग्झरी नव्हती तर शुद्ध अविचार होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्याला नाय जमत असले मनस्वी जगणे!
पैशासाठी मतलबी नोकरी करणारे आम्ही.

..

छान लेखन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!