विश्वसंवाद-२: विजय पाडळकर (भाग-२) [मराठी पॉडकास्ट]

"विश्वसंवाद" या मराठी पॉडकास्टचा हा दुसरा एपिसोड. माझे आवडते लेखक विजय पाडळकर यांच्या मुलाखतींचा दुसरा भाग इथे ऐकायला मिळेल.

या मुलाखतीत मुख्यतः साहित्य आणि चित्रपट या माझ्या आवडीच्या विषयांवरच आम्ही बोललो असलो तरी पाडळकरांच्या बहुमुखी प्रतिभेचा परीघ त्याहून बराच विस्तृत आहे. कादंबरी, कथा-संग्रह, कविता/हायकू,अनुवाद, बालसाहित्य असं विविधांगी लेखन त्यांच्या नावावर जमा आहे. पहिला एपिसोड ऐकल्यानंतर अनेक मित्रांनी पाडळकरांचं इतर लेखन वाचण्याची इच्छा व्यक्त केली आहे. नेहमीच्या पुस्तकालयांबरोबरच "बुकगंगा" या ऑनलाईन पुस्तकालयातही त्यांची पुस्तकं मिळू शकतील. त्यासाठी ही लिंक : bit.ly/padalkar-on-bookganga.

अगदी कालच त्यांचं नवं पुस्तक प्रसिद्ध झालंय: "गगन समुद्री बिंबले" - गाजलेल्या साहित्यकृतींवर आधारित सत्यजित राय यांच्या चित्रपटांचा रसास्वाद. याशिवाय येऊ घातलेलं काही नवीन लेखन: कवी रॉबर्ट फ्रॉस्ट आणि गीतकार शैलेंद्र यांच्यावरची पुस्तकं आणि एक व्यक्तीचित्रांचा संग्रह.

माझ्या पॉडकास्टची पहिली मुलाखत पाडळकरांची मिळाली हा एक सुंदर योगायोग आहे. या मुलाखतीवर तुम्हां सर्वांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet