तू...ना jealous झालीस ना की...

तू...ना jealous झालीस ना की मला असुरी आनंद होतो... माझी दखल तुझ्याशिवाय कोणीच घेऊ नये ही भावनाच किती जबरदस्त आहे ना. माझा मोबाईल माझ्या नकळत चेक करताना मलाही ते समजतच ना, तुझे चेहर्‍यावरचे चढऊतार होणारे भाव मीही तुझ्या नकळत टिपतोच. Specially खटकलेल्या व्यक्तिंचे मग call records, messages, whatsapp च्या posts...सग्गळं अगदी सगळं मन लाऊन scan करणं आणि खरंच एखादी गोष्ट खटकली की मग तुझी चिडचिड...कळत की पटलं पाहीजे असं ऊत्तर (तयार कराव) द्यावंच लागणारय. पण तुझ्या या सगळ्या करण्यामुळं, खर सांगू, एक प्रकारचा confidence निदान माझ्यामध्ये तरी निर्माण होतोच. स्वतःला आम आदमी समजणारा मी तुझ्या कुठल्यातरी शंकेमुळं कुणीतरी खास असल्याची भावना निर्माण होते, दुसर्‍या (आणि तिसर्‍यालाही) कुणाला आपली आपल्यापेक्षा कित्ती काळजी आहे, तू पण या भावनेचा डोळे झाकुन अनुभव घे म्हणजे तुला समजेल. तू...jealous झालीस की मग जास्तच मटकावस वाटतं, तू...jealous झालीस की तुला आणखी वेडवावस वाटत, तू...jealous झालीस ना की मला असुरी आनंद होतो, तू...jealous झालीस की खास असल्याचा भास होतो, तू...jealous झाल्यावर आपलं नातं आणखी घट्ट घट्टच होत जातं... कधी कधी तुझ jealous होण्यानं suffocate व्हायला होतं, पण तुझा possessiveness तरीही मनाला भावतोच...

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet