शत – प्रतिशत हिंदुत्व... फक्त हिंदुत्व

Shadow Armiesधीरेंद्र झा यांच्या शॅडो आर्मीज या पुस्तकाचे उपशीर्षक Fringe Organizations and Foot Soldiers of Hindutva हे असून त्यावरून पुस्तकाचा रोख कुणाकडे आहे हे कळू शकेल. लेखकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या छत्राखाली भारतभर सांस्कृतिक उन्नयनाचे कार्य करत असलेल्या सनातन संस्था, हिंदू युवा वाहिनी, बजरंग दल, श्री राम सेने, हिंदू ऐक्य वेदी, राष्ट्रीय शीख संगत इत्यादी निरनिराळ्या राज्यातील (कु)प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या प्रमुख संघटनांची विस्तृतपणे माहिती दिली आहे.

जरी आरएसएस स्वतःला सांस्कृतिक संस्था म्हणून बिरूद मिरवत असली तरी तिची राजकीय महत्वाकांक्षा कधीच झाकलेली नव्हती व नाही. व याच महत्वाकांक्षेला खत – पाणी पुरवणाऱ्या या चेला संघटना आपल्या हिंसक व दहशतीसदृश कारवायामुळे बघता बघता मातृसंस्थेच्यापेक्षा मोठ्या दिसत आहेत. यांच्या एखाद्या आततायी कृत्यामुळे संघ बदनाम होण्याची शक्यता असल्यास आरएसएस त्या संघटनेशी आमचा संबंध नाही हे सांगून नामानिराळे राहते. म्हणूनच या संघटना बिनबोभाटपणे काहीही करण्यास तयार असतात, हे उघड गुपित आहे.

परंतु हे हिंदुत्व प्राप्त करण्यासाठी वाटेल ती किंमत देण्याच्या तयारीत सर्व घटक आहेत. एकदा का ही हिंदुत्वाची प्रक्रिया पूर्ण झाली की हा समाज दुखभरे दिन बीतेरे भैया असे सुस्कारा सोडत अच्छे दिनात न्हाऊन निघेल, याबद्दल सत्ताधारी पक्ष व त्यांचे खंदे पुरस्कर्ते यांच्या मनात तिळमात्रही संशय नाही. परंतु संपूर्ण देशाला हिंदुत्वाच्या दावणीला बांधण्याची ही कल्पना अत्यंत भयानक आहे, हे धीरेंद्र के झा यांनी लिहिलेल्या शॅडो आर्मीज (Shadow Armies) हे इंग्रजी पुस्तक वाचताना प्रकर्षाने जाणवू लागते.

लेखक, धीरेंद्र झा मात्र या परिवारातील काही चुने हुये संघटनांचा वेध घेत या भारतीय समाजापुढे काय वाढून ठेवले आहे याची थोडी फार कल्पना देण्याचे प्रयत्न करत आहेत. 1984च्या लोकसभेत फक्त दोन सदस्य असलेली भाजप 2014मध्ये 284 सदस्याना निवडून आणून सत्ता हाशिल करू शकली यातच हा समाज कुठल्या दिशेने जात आहे याची कल्पना येईल. भाजपच्या या यशस्वी दीर्घ प्रवासात झा यानी वर्णन केलेल्या या आठ प्रमुख संघटनांचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळे या संघटनांचा इतिहास, त्यांची कार्यपद्धती व त्यांचे अंतर्गत ताणे बाणे समजून घेतल्यास हिदुत्व हे स्वप्न म्हणून न राहता वास्तव म्हणून स्वीकार केल्याशिवाय गत्यंतर नाही, हे लक्षात येईल.

सनातन संस्था
या संस्थेतर्फे सनातन प्रभात नावाचे मराठी दैनिक काढले जाते व त्या पत्रिकेतून प. पू. आठवले आपल्या हिंदुत्वाबद्दलच्या विचारांचा प्रसार करत असतात. सनातन प्रभातच्या मते 2023पर्यंत हिंदू राष्ट्र प्रस्थापित होणार आहे. आठवले या माध्यमातून स्वतःची आरती ओवाळून घेत असतात. ही संस्था सर्व सत्ताधारी राजकीय पक्षांना चांगल्या प्रकारे हाताळू शकते याचा अनुभव दाभोलकरांच्या हत्येंनंतर आला. काँग्रेसचे सरकार असूनही या संघटनेवर बंदी घातली नाही त्याचप्रमाणे आता सत्तेवर असलेले भाजपही त्यांना धक्का लावणार नाही याची तिला पूर्ण खात्री आहे म्हणूनच ती बिनधास्त आहे.

हिंदू युवा वाहिनी
गोरक्षा पीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संघटनेचे योगी आदित्यनाथ यांनी हिंदू युवा वाहिनी म्हणून पुनर्नामकरण करून त्याची व्याप्ती वाढवली. लेखकाने योगी आदित्यनाथ यांच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल सविस्तरपणे लिहिले आहे. अजय मोहन बिस्त या ठाकुर जातीतल्या मुलाला गोरखपीठाच्या या पूर्वीच्या पीठाधीशानी वारसदार म्हणून नेमले व हाच वारसदार योगी आदित्यनाथ म्हणून ओळखला जाऊ लागला. राजकारणात धर्मभावनेच्या वापर करत आपल्या क्षेत्रात निवडून येण्यासाठी योगीनी एक सुसज्ज यंत्रणा या संघटनेद्वारे उभी केलेली आहे. या संघटनेला सबकुछ योगीच आहेत हे जाणवते. याचे कार्यकर्ते योगी आदित्यनाथ असे उल्लेख न करता गोरक्षा पीठाधीश्वर परमपूज्य योगीनाथजी महाराज असे एखाद्या वाक्यातसुद्धा अनेक वेळा करतील. तुम्ही असे का करता हा प्रश्न विचारल्यास ते अस्वस्थ होऊन तुम्हाला मारहाण करण्यासही मागे पुढे पाहणार नाहीत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच सर्व उद्दिष्ट राबवत असून सुद्धा ही संघटना स्वतःचेच स्वतंत्र धर्मकारण व राजकारण यांचा अजेंडा राबवण्याइतकी सशक्त झाली आहे. योगी आदित्यनाथ यांना 2-3 वेळा निवडून आणण्यात या संघटनेचा नक्कीच वाटा मोठा आहे, हे खुद्द आदित्यनाथही विसरू शकत नाहीत. म्हणूनच योगी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील तरुणांची फौज – ‘डोक्यास भगवे मुंडासे, हाती भाला त्रिशूल किंवा असे मध्ययुगीन काहीही आणि मुखी सिया रामचंद्राचा घोष’ – अशा प्रकारे सज्ज होऊन हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सतत उभी राहणार आहे.

बजरंग दल
1984 साली स्थापन झालेल्या या युवा संघटनेचा प्रमुख उद्देश अयोध्येतील रामजन्मभूमीसाठी हिंदूंची मानसिकता तयार करणे हा होता. रामायण काळातील रामाला सर्वतोपरी मदत केलेल्या वानर सेनेप्रमाणे विश्व हिंदू परिषद व आरएसएस यांना मदत करण्यासाठी, रामभक्त मारुतीइतकी प्रचंड शक्ती आहे याचे उघड उघड प्रदर्शन करणारी म्हणून बजरंग दल नावाने ही संघटना उत्तर प्रदेशच्या कानाकोपऱ्यात उभी राहिली. बाबरी मशीदीच्या विध्वंसात सहभागी झालेले एकूण एक नेत्यांचा आशिर्वाद या संघटनेला लाभला आहे. बिहार व उत्तरप्रदेश या राज्यातील खेड्यापाड्यातील हिंदूंना संघटित करून वाटेत शक्ती प्रदर्शन करत आयोध्येला पोचण्याचे काम या दलाने केले. तरुणांच्या या संघटनेचा जो राम के काम न आये वो बेकार जवानी है हा नारा होता. त्यामुळे लाखो तरुण या दलात सामील झाले कदाचित बजरंग दलाचा हिंस्र आक्रमकपणा नसता तर संघ वा विश्व हिंदू परिषद मशीद पाडण्यासाठी समर्थन दिले नसते असे पश्चात बुद्धीने म्हणता येईल. बजरंग दलाची वाढ मुख्यत्वे करून ओबीसी तरुणांच्या भरतीमुळे झाली असे म्हणण्यास वाव आहे. बेकार तरुणांच्या झुंडीच्या झुंडी या संघटनेत सामील झाले. त्यामुळे तत्वशून्य वा कुठल्याही प्रकारची नैतिकतेची चाड नसलेली ही संघटना संघाची रिझर्व फोर्स म्हणून कार्य करू लागली.

संघ परिवाराचा अजेंडा राबवण्यात ही संघटना नेहमीच पुढाकार घेते. हिंदू मुलींना मुस्लिमांच्या ताब्यातून सुटका करणे म्हणजे 100 गायी वाचवण्यासारखे आहे, अशी मानसिकता त्या मागे होती. संघाच्या हिंदू मुस्लिम समाजातील दरी वाढवण्याच्या कामाला ही संघटना खत पाणी घालते. त्यामुळे मुस्लिमांना आपल्या संख्याबळावर विसंबून राहण्याची पाळी आली. दंगलीत होरपळलेले मुस्लिम निराश्रित शहरी भागातील मुस्लिम वसतीत राहू लागले. एका प्रकारे मुस्लिमांचे छावणीकरण (ghettoization) होऊ लागले. एका ठिकाणाहून मुस्लिमांना पळवून लावल्यानंतर बजरंग दल मुस्लिम मुक्त ठिकाण म्हणून पोस्टर्स लावत होते.

श्रीराम सेने
श्रीराम सेनेचे सर्वे सर्वा असे म्हणवून घेणारा प्रमोद मुतालिक स्वतःबद्दल प्रौढी मिरवत असला तरी या संघटनेचा जन्म बजरंग दलातील अंतर्गत कुरबुरीमुळे झाला आहे, हे नाकारता येत नाही. कर्नाटकातील मंगळूरु येथील बजरंग दलातील भाजप व संघातील ब्राम्हण कार्यकर्त्यांच्या वर्चस्वामुळे तेथील इतर मागासवर्गीय कार्यकर्ते नाराज होते. निवडणुकीच्या काळात तर सर्व महत्वाच्या पदावर उच्च जातीयांचीच निवड झाल्यामुळे बजरंग दलातील अंतर्गत जातीवाद उफाळला. ओबिसीच्या कार्यकर्त्यांना सभेतील खुर्च्या उचलण्याचे वा गाद्या अंथरण्याचेच कामं दिल्या गेल्यामुळे ते नवीन नेत्याच्या शोधात होते. नेमके त्याच वेळी प्रमोद मुतालिकाने दल/पक्षाची सूत्रे हातात घेतले व शिवसेनेत गेलेले इतर मागासवर्गीय कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन राष्ट्रीय हिंदू सेना या नावाने एका वेगळ्या संघटनेची स्थापना केली व नंतर त्याचेच श्रीराम सेना म्हणून पुनर्नामकरण करण्यात आले.

हिंदू ऐक्य वेदी
उत्तर भारततातील राज्ये, महाराष्ट्र – गोवा आणि काही प्रमाणात कर्नाटक या राज्यात ज्या प्रकारे हिंदुत्वानी बस्तान बसवले आहे त्याप्रमाणे दक्षिणेतील केरळ, तमिळनाडू व आंध्र प्रदेश येथे हिंदू या शब्दाची जादुई जाणवत नाही. म्हणूनच संघ व पक्ष हे दोन्ही काही तरी निमित्त शोधून या राज्यात चंचुप्रवेश करण्याच्या बेतात असतात. याच रणनीतीचा भाग म्हणून केरळमध्ये हिंदू ऐक्य वेदी या नावाची संघटना हिंदुत्वाचा झेंडा फडकवण्यासाठी कार्यरत आहे. भाजपचे राजकारण केरळमध्ये आणण्यासाठी डावपेच म्हणून या संघटनेला भाजप रसद पुरवत आहे.

शासन नियंत्रित देवस्वम बोर्डच्या मगरमिठीतून केरळातील 3000 मंदिरांना मुक्त करण्याच्या आक्रमक पावित्र्यामुळे हिंदू ऐक्य वेदी अजूनही तग धरून आहे. ज्या प्रकारे मुस्लीम व ख्रिश्चन धार्मिकांची चर्च व मशीद पूर्णपणे त्या त्या धर्माच्या स्वाधीन असतात, त्याचप्रमाणे केरळ येथील देवळांची मालकी शासकीय बोर्डाच्या अखत्यारीत न राहता हिंदू भक्तांच्याकडेच असली पाहिजे या मागणीसाठी भाजप व हिंदू ऐक्य वेदी लढत आहेत. मुळात या मंदिरांचे उत्पन्न शासकीय तिजोरीत जाते व तेथून गोरगरीबांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत यावरच हिंदू ऐक्य वेदीचा आक्षेप आहे. हिंदू भक्त या देवळांना देणगी देतात परंतु भक्तांचा या देणगीवर अधिकार नाही याचे संघटनेला दुःख आहे.

अभिनव भारत
अभिनव भारत या संघटनेची सुरुवात कशी झाली हे एक गूढ आहे. 1905च्या सुमारास फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना वीर सावरकर यानी इटलीतील माझिनीच्या प्रेरणेतून एका गुप्त संघटनेची स्थापना केली. या संघटनेचा सशस्त्र क्रांती व हिंसाचारावर विश्वास होता. परंतु 1906 साली सावरकरांना इंग्लंडला जाण्याची संधी मिळाल्यानंतर ही संघटना 1952 साली हिंदू महासभेने पुनर्जिवीत करेपर्यंत 46 वर्षे निद्रिस्तच राहिली. पुनर्जिवीत करण्यात कुणाचा हात होता याबद्दलही शंका आहेत. महात्मा गांधीचा खून करणाऱ्या नथुराम गोडसेचा भाऊ गोपाळ गोडसे याची कन्या व सावरकरांचे बंधू नारायण सावरकर यांची सून असलेल्या हिमानी सावरकरच्या मते मालेगाव बॉम्ब स्फोटातील समीर कुलकर्णी या आरोपीने अभिनव भारतला जीवदान दिले.

भोंसला मिलिटरी स्कूल
नाशिक येथील भोंसला मिलिटरी स्कूलची स्थापना डॉ. बाळकृष्ण मुंजे या कट्टर हिंदूनिष्ठाच्या प्रेरणेतून झाली. डॉ. मुंजे हे आरएसएसचे संस्थापक हेडगेवार यांचे राजकीय गुरु होते. हिंदूंची एके काळची क्षात्रवृत्ती पुनर्जीवित करण्यासाठी व मातृभूमीच्या रक्षणास कटिबद्ध असलेल्या हिंदू तरुणांना सनातन धर्माबरोबरच राष्ट्रीय संरक्षणाला उपयोगी पडणारे विज्ञान व युद्ध कला शिकवण्यासाठी एखादी शिक्षण संस्था उभारण्याचा उद्देश त्यामागे होता. या सोसायटीने पुढील काळात भोंसला मिलिटरी स्कूलची स्थापना केली. ही शाळा फक्त सैनिकी प्रशिक्षण देणारी शाळा नसून हिंदू सनातन धर्माचे जतन व संरक्षण करणारी शाळा आहे हेही त्यांनी या शाळेत प्रवेश करू इच्छिणाऱ्यांच्या पालकांना पटवून दिले. शाळेच्या मैदानाला रामभूमी व शिक्षण घेणाऱ्या छात्रांना राम दांडी असे नावही देण्यात आले.

राष्ट्रीय शीख संगत
आरएसएसच्या मते संपूर्ण भारत हे एक हिंदू राष्ट्र असून येथील बौद्ध, जैन वा शीख धर्म हे हिंदू धर्मातील पंथ असून फार फार तर त्यांना हिंदू धर्मातील इतर जातीप्रमाणे जातीचा दर्जा देता येईल. याच गृहितकानुसार देशभर त्यांची प्रचार यंत्रणा काम करत आहे व त्यांना अडवणारेही कुणी नाहीत. अपवाद फक्त पंजाबचा. म्हणून 1986मध्ये हिंदू शीख संगतची स्थापना झाली. व या संगतचे काम पंजाबमधील शीख धर्माचे वर्चस्व हळू हळू कमी करत हिंदूंचा प्रभाव वाढवणे हा आहे. सुरुवातीपासूनच हिंदू शीख संबंधातील आरएसएसचे सिद्धांत पक्के होते. ब्रिटिशानी जेव्हा शीख आयडेंटिटी वेगळे ठेवण्याचे प्रयत्न करत होते तेव्हा हिंदू संघटनेचा त्याला विरोध असे.

मुळात राष्ट्रीय शीख संगतची स्थापना शीख विरोधाची धार कमी करण्यासाठी झाली होती. कारण इंदिरा गांधीची हत्या शीख अंगरक्षकांनी केल्यामुळे दिल्लीतील धार्मिक दंगलीमध्ये शिखांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली. दिल्लीच्या दंगलीतच 2733 शिंखांची हत्या झाली होती. दंगलीची आग कानपूर, बोकारो, जबलपूर व रूरकेलापर्यंत मोठ्या प्रमाणात पोचली. दंगलीतील शीख समुदायाची होरपळणे बघून त्याचा फायदा उठवण्यासाठीच संगतची स्थापना झाली असावी असे लेखकाला वाटते.

या संघटना आरएसएसचे केवळ होयबा संघटना नाहीत. त्यांनाही स्वतंत्र अस्तित्व आहे, त्यांची एक विचारधारा आहे, एक अजेंडा आहे व तो अजेंडा राबवण्याची ताकदही त्यांच्याकडे आहे. या ताकदीच्या जोरावर या संघटना काहीही करू शकतात, याचा प्रत्यय गेल्या काही वर्षातील घडामोडीतून आलेला आहे. डॉ. दाभोलकर, कॉम्रे़ड पानसरे व डॉ कलबुर्गी यांचा भरदिवसा केलेल्या हत्या, मालेगावमधील बॉम्बस्फोट, इतर काही ठिकाणचे असफल झालेले काही दहशती प्रयत्न इत्यादीमध्ये सनातन संस्था व अभिनव भारतचा हात आहे, हा दोषारोप केला जात आहे. गौरक्षा, घर वापसी, लव्ह जिहाद सारख्या नॉन-इश्यूंचे निमित्त करून अल्पसंख्यांकांना नाहक त्रास देण्यास वा प्रसंगी हिंसाचाराचा उद्रेक करण्यात उत्तर प्रदेश येथील हिंदू युवा वाहिनीचे कार्यकर्ते माध्यमावर झळकत आहेत. बाबरी मशीदीच्या विध्वंसात व त्यानंतरच्या दंगलीत बजरंग दलाचा सक्रीय सहभाग होता. कर्नाटकातील श्रीराम सेने ही संघटना व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणते. राष्ट्रीय शीख संगतला शीख हा वेगळा धर्म आहे हेच मान्य नाही. भोसला मिलिटरी स्कूल हिंदू फूट सोल्जर्स तयार करणारी संस्था आहे. अशा प्रकारे हिंदू चेला संघटनांच्या काळ्या कुट्ट इतिहासाबद्दल लेखकाने छानपणे टिप्पणी केली आहे.

पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या प्रत्येक प्रकरणासंबंधीच्या संदर्भसूचीवरून लेखकांची बहुतेक विधानं व निष्कर्ष केवळ लेखकाला वाटतात वा सांगोपांगी गोष्टीवरून केलेले नसून त्यामागे अविश्रांत संशोधन आहे हे पुस्तक वाचत असताना प्रकर्षाने जाणवू लागते. पुस्तकातील विषयासंबंधी एखाद्या फूट सोल्जरशी संवाद साधत असतानासुद्धा स्वतःची मतं न लादता किंवा आपले शब्द त्याच्या तोंडी न घालता समोरच्या व्यक्तीला बोलते केल्यामुळे पुस्तकाच्या आशयात नक्कीच भर पडली आहे.

आपल्या भारतीय समाजाची आजची स्थिती व भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल व त्यासाठी लेखकाचे आभार मानायला हवेत.

Shadow Armies:
Fringe Organizations and Foot Soldiers of Hindutva

Dhirendra K Jha
Juggernaut (2017)
Price Rs 499, pp 229

समीक्षेचा विषय निवडा: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

एक नंबर! धन्यवाद!

पतित पावन संघटना आणि विश्व हिंदू परिषद याचा उल्लेख का नाही बरं? आणि 'खोलीतल्या हत्ती'चं काय?

एकाच विचारसरणीच्या अनेक संघटना निर्माण होणं हे ती विचारसरणीच्या फ्रॅग्मेन्टायझेशनचं द्योतक आहे. याने त्या विचारसरणीची कलेक्टिव्ह बार्गेनिंग पॉवर वाढण्याऐवजी कमीच होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

व‌न‌वासी क‌ल्याण आश्र‌म? आणि काम‌गार संघ‌ट‌ना आहे ना कोण‌तीत‌री + अभाविप्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो! अभाविप‌, भार‌तीय‌ म‌ज‌दूर‌ स‌ंघ‌ आणि व‌न‌वासी क‌ल्याण‌ आश्र‌म‌ राहिलेच‌ की.

एलिफ‌ण्ट‌ इन‌ द‌ रूम‌ म्ह‌ण‌जे खुद्द‌ रास्व‌स‌ंघ‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

हिंदुहृदयसम्राट आणि त्यांचे वारस ह्यांना विसरलात? त्यांच्या कपाळावरील लाल शेंदूर दिसत नाही का? त्याचप्रमाणे ह्यांच्या रणरागिण्या?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>शाळेच्या मैदानाला रामभूमी व शिक्षण घेणाऱ्या छात्रांना राम दांडी असे नावही देण्यात आले.<<

रामाची भूमी आणि त्याची(च) दांडी ह्यातली प्रतीकात्मता अंमळ अश्लील वाटली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ते दांडी नाही, दंडी आहे. दंड म्हणजे काठी, रामाचा दंड म्हणून रामदंडी (तत्पुरुष) अथवा राम आहे दंड ज्याचा (बहुव्रीहि) असा कोठलाहि अर्थ घावा. भाव तोच.

इंग्रजी लेखनात दोन्ही सारखेच danda असे दिसतात म्हणून हा गोंधळ.

(ह्यावरून एक मजेदार किस्सा आठवला. अनेक दशकांपूर्वी माझी मुलगी दिल्लीमधील एका उच्चभ्रू मॉंटेसरी शाळेत जात होती. मी तिला एकदा विचारले, "शाळेत तुझ्या मित्रमैत्रिणी कोण आहेत?" तिने तीनचार नावे सांगितली त्यात एक 'डंडापानी' होता. तिच्या 'मिस'चाच हा उच्चार होता. त्या 'मिस'ला 'दंडपाणि' हे नाव शब्द माहीतच नव्हते. त्याच 'मिस'ने तिला देवनागरी अक्षरे म्हणायला शिकविले होते 'का से कबूतर, खा से खरगोश, गा से गमला, घा से घडी और अडा.' 'क' वर्गाचे शेवटचे अनुनासिक 'ङ' हा त्या 'मिस' 'डा' चाच एक प्रकार वाटत होता. उत्तरेत कखगघ असे न म्हणता काखागाघा असे म्हणायची प्द्धत आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...हे तरीही ठीक आहे. कय् खय् गय् घय् असाही एक (महाइरिटेटिंग) पाठभेद ऐकलेला आहे. त्या मानाने काखागाघा बरेच सुसह्य म्हणता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्याहून मज्जा... आमच्या कंपनीत दंडपाणि नावाचाच एका सप्लायरचा दाक्षिणात्य माणूस यायचा. तो त्याच्या नावाचं स्पेलिंग Dhandapani करत असे. त्याला झाडून सगळे जण धंदापानी म्हणून हाक मारायचे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तामिळनाडूत 'हिंदू मक्कल कच्छी' , कर्नाटकातली 'श्रीराम सेना', काश्मीरातली 'पनून कश्मीर' , पुण्यातली 'हिंदु राष्ट्र सेना' , बंगाल टायगर अशी ओळख असलेले ' हिंदू संहती' नावाचे संघटन, 'हिंदु एक्सिस्टन्स' , 'भोजशाळा मुक्ती आंदोलन' , 'हिंदु जनजागृती समिती' ही नावं सोडली लेखकाने, तो तरी काय करणार म्हणा हा कट्टरतेचा अनेक तोंडांचा राक्षस आहे. आणखीही छोट्या छोट्या अनेक संघटना आहेत किती नावं लिहिणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...पनून कश्मीर???

ते कसे काय बुवा? सविस्तर समजून घ्यायला आवडेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही संस्था गेल्या काही वर्षात बर्यापैकी आक्रमक झाली आहे.

वानगीदाखल हा विडीयो बघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'पनुन काश्मीर' म्हणजे 'आमचे काश्मीर'. हा विकिपीडिया लेख पहा. काश्मिरातील पंडित समाजाची ही संघटना आहे आणि त्यांच्यासाठी एक सुरक्षित 'Homeland' निर्माण केली जावी अशी त्यांची एक मागणी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(मुळात हा पुस्तक परिचय सुमारे 5500 शब्दांचा होता.ऐसी अक्षरेसाठी लेख 2000 शब्दात बसविल्यामुळे मूळ लेखातील काही पॅरा गाळले गेले. त्यातील हे दोन गाळलेले परिच्छेद.)

आरएसएस ही संस्था गेल्या 80-85 वर्षात अनेक चढ उतारांचा सामना करत आजच्या उर्जितावस्थेला पोचलेला आहे. महात्मा गांधीच्या खुनानंतर या संघावर काही काळ बंदी घालण्यात आली होती.(परंतु त्या काळच्या सरसंघसंचालकांनी आरएसएस ही राजकीय संधटना नसून सामाजिक कार्य करणारी व करत राहणारी म्हणून त्या काळचे गृह मंत्रा,सरदार वल्लभभाई पटेल यांना आश्वासन दिल्यामुळे बंदी उठली) 70च्या दशकात इंदिरा गांधीच्या आणीबाणीच्या काळात संघाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. (भाजपच्या पूर्वीचा जनसंघ असलेला जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर बंदी उठली.) 1992च्या बाबरी मशीदीच्या विध्वंसात संघाचा हात होता व संघ दांभिकपणे वागत आहे हे सगळ्या जगाला समजले. तरीसुद्धा संघाच्या सदस्यसंख्येत कधीच घट झाली नाही. आरएसएस ही मूळ संस्था व भारतीय जनता पक्ष वेळोवेळी भारतीय मझदूर संघ, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय युवा मोर्चा, विश्व हिंदू परिषद व त्याची युवा शाखा अशा कित्येक संघटनांना संलग्न करून घेत वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत व मतांची बेजमी करत आहेत. आणि या सर्व संघटना संघ परिवार म्हणून ओळखल्या जातात. या संघ परिवाराची पाळे मुळे ईशान्य भारतातील आदिवासी भागापर्यंतसुद्धा पोचलेले आहेत.

खरे पाहता संघ परिवार फार मोठा आहे. कदाचित आरएसएसलासुद्धा आपल्या परिवारातील सदस्य संघटनांची पूर्णपणे माहिती नसेल. एखादी सदस्य संघटना माध्यमांच्या टीकेचे धनी झाल्यास आरएसएस विश्वामित्री पवित्रा घेत त्याच्याशी संबंध नसल्याचा भास निर्माण करत असते. या परिवारातील विश्व हिंदू परिषदेसारख्या महत्वाकांक्षी संघटना आरएसएसची मध्यस्थी धुडकावून भाजपशी डायरेक्ट संधान बांधत असल्यास आरएसएसला मूग गिळून बसण्याशिवाय पर्याय नसतो. भाजप, आरएसएस व संघ परिवार यांचा एकमेकाशी असलेला व्यवहार इतका गुंतागुंतीचा आहे की तेथे नेमके काय घडत आहे हे कल्पनेच्या पलिकडचे असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पतीssssत पावन अजून आहे ? त्यांचं विधायक कार्य करायला जास्त धडाडीच्या संघटना आल्यामुळे आणि मा सं अ ( माजी संस्थापक अध्यक्ष ) हे मा . खा. झाल्यामुळे का काय , का एकेकाळचे तरुण तडफदार ब्यांक नेत्याची देशद्रोह्यांनी भर टिळक रोडवर निर्घृण हत्या केल्यापासून का काय माहित नाही पण जोर लै कमी झाल्यावानी वाटतोय ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मा सं अ ( माजी संस्थापक अध्यक्ष ) हे मा . खा. झाल्यामुळे

अनिल‌ शिरोळे ना?

-----
जोर‌ क‌मी झालाच‌ आहे, प‌ण अस्तित्त्व‌ आहे अजून‌. (अर्थात‌ प‌० पा० स‌ंघ‌ट‌नेच‌ं काम‌ काय‌ आहे हे म‌ला क‌धीच‌ नीट‌स‌ं क‌ळ‌ल‌ं नाही. भावेस्कूल‌स‌मोर‌च्या ग‌ल्लीत‌ प‌०पा० स‌ंघ‌ट‌ना आणि ब‌ज‌र‌ंग‌ द‌ल‌ यांनी एक‌च‌ बोर्ड‌ अर्धा अर्धा वाटून‌ घेत‌ला आहे, तेव्हापासून‌ या दोन‌ स‌ंघ‌ट‌नांची प्र‌त्येकी काम‌ं काय‌ आहेत‌ हा प्र‌श्न‌ म‌नात‌ आहेच‌.)

-----
पॉईंट‌ इज: एक‌चाल‌कानुव‌र्तित्त्व‌ मान‌णाऱ्या, "आदेश‌ सिस्टिम‌" व‌र‌ चाल‌णाऱ्या स‌ंघ‌ट‌नेचे असे तुक‌डे प‌डाय‌ला लाग‌ले याचा अर्थ‌ त्यांच‌ं स‌माज‌वादीक‌र‌ण होत‌ आहे. स‌माज‌वादी क‌से एक‌हाती स‌त्तेच्या उच्चांकाला जाऊन‌, म‌ग‌ तुक‌डे तुक‌डे होऊन‌ फाफ‌ल‌ले, त‌स‌ं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नाय हो , प्रदीप रावत ( होय होते ते पण खासदार पुण्याचे ... नंतर विझलेच ते )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प‌तित‌पाव‌न‌चे एकाच् दिव‌शी जास्तित जास्त र‌क्त‌दानाचे कैत‌री रेकॉर्ड होते असे ऐक‌लेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रावतांबद्दल हे खुप चांगलं वाचण्यात आलं..

http://www.thebetterindia.com/66826/pradeep-rawat-rawats-nature-library-...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

विज्ञानप्रसाराच्या एका कार्यक्रमात ते आले होते तेव्हा त्यांनी या उपक्रमाविषयी सांगितले होते. राजकारणापासून दूर आहेत ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

चांगले आहे हे !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक‌हाती स‌त्तेच्या उच्चांकाला जाऊन‌

हे क‌धीच‌ं? ७७ ला हिंदुत्व‌वाद्यांब‌रोब‌र होते ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हो, प‌ण तेव्हा ज‌न‌स‌ंघाच‌ं राज‌कीय‌ बूड‌ कुठे स्थिर‌ होत‌ं? १९७७च्या क‌ड‌बोळ्यात‌ ज‌न‌स‌ंघाचे किती लोक‌ जिंक‌ले माहीत‌ नाही, प‌ण त्याआधीच्या १९७१च्या निव‌ड‌णुकीत‌ वीसेक‌ खास‌दार‌ होते फ‌क्त‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

आपल्या भारतीय समाजाची आजची स्थिती व भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे समजून घेण्यासाठी हे पुस्तक नक्कीच उपयोगी पडेल व त्यासाठी लेखकाचे आभार मानायला हवेत.

लेख‌काचे डिमॉनेटाय‌झेश‌न म‌ध्ये ब‌रेच‌ पैसे बुडालेत आणि आता बेनामी संप‌त्ती जाणार आहे हे स्प‌ष्ट दिस‌त‌ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ही बातमी पहावी. जातीय आणि धार्मिक दंगलीत गेल्या तीन वर्षांत ४१% वाढ झाली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही बातमी नीट वाचली तर यूपी च्या समाजवादी पक्षाच्या कार्किर्दीत आणि उत्तराखंडाच्या कॉंग्रेसच्या कार्किर्दित इतर संपोर्ण देशात केलेली सलोख्याची प्रगती मिटली असं कळतं.
=================
शिवाय ३ आणि ४ नंबर वर केरळ आणि बंगाल आहेतच.
लोकसत्तावाले पैसे खाऊन बातम्या द्यायला लागले. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

ही बातमी नीट वाचली तर यूपी च्या समाजवादी पक्षाच्या कार्किर्दीत आणि उत्तराखंडाच्या कॉंग्रेसच्या कार्किर्दित इतर संपोर्ण देशात केलेली सलोख्याची प्रगती मिटली असं कळतं.

अजोंना जोरदार पाठिंबा.

सेक्युलरिझम च्या नावाने कंठशोष करणाऱ्यांनी याचे उत्तर देणे गरजेचे आहे. इतकी वर्षं तुम्ही सेक्युलरिझम च्या नावाने जयघोष केलात. त्याचा परिणाम इतक्या लगेच हा असा झाला - की तुम्ही सत्तेवरून पाय-उतार झाल्यावर ३ वर्षांत ४१% वाढ ? हे सेक्युलरिझम चे अपयश आहे की सेक्युलरिस्टांचे ??

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अजो, मी काँग्रेसचा किंवा इतरही कोणा पक्षाचा कैवार घेण्यासाठी ही बातमी टाकली नाहीये. (जे तुम्ही गृहीत धरलंय) राज्य कुठलंही असो ,सरकार कुठलंही असो एक नागरीक म्हणून मला हा वाढता हिंसाचार काळजी करण्यासारखा वाटतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हारुनजी, ते मला माहित आहे. वास्तविक माझं तर असं मत आहे कि तुमच्यासारख्या लोकांनी सरकारचा व्यवस्थित विरोध केला पाहिजे म्हणजे अभ्यस्त विरोध असं काही वाचायला तरी मिळेल. पुरोगाम्यांच्या आक्रस्ताळेपणातून सरकारचा सुयोग्य राजकीय विरोध (वाचकांनी) कसा वेगळा करायचा ही समस्या थोडी हल होईल.
==========================
बाकी मला जे म्हणायचं आहे ते अत्यंत गणिती आहे.
२०१४:
भारत: ३३६
युपी: २६
उत्तराखंड: ४

नवे आकडे :
भारत: ४७४
युपी: ३४६
उत्तराखंड: २२
===================
बाकी राज्यांत स्थिति तिच असती तर ((३४६-२६)+(२२-४))/३३६ = ९१% इतके प्रमाण असते. यात बंगाल आणि केरळ मिसळलात तर ते १२५% च्या आसपास असते. पण ते ४०% आहे कारण अन्य बहुतांश भाजपशासित राज्यांत पूर्विपेक्षा जास्त चांगली स्थीती आहे. क्राईम कमी झाला आहे.
================
केंद्रशाशित प्रदेशांत १८:१ हा जुन्यास नवा रेशो आहे. आणि कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा प्रश्न आहे.
================
म्हणून म्हटलं की बातमी मिसलिडिंग आहे. असं इंप्रेशन देते कि सर्व देशात परिस्थीती (कंसात भाजपमुळे) बिघडली आहे. कोणीही म्हणेल अरे बिजेपी आल्यापासून दंगे वाढले. पण ते तसं नाही. बीजेपी न आल्यामुळे कदाचित वाढले असतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>कारण अन्य बहुतांश भाजपशासित राज्यांत पूर्विपेक्षा जास्त चांगली स्थीती आहे. क्राईम कमी झाला आहे.<<

कार्यकारणभावात अंमळ घोळ होतो आहे का? जिथे निवडणुका होऊ घातल्या आहेत तिथे दंगल करण्याची आपल्या कित्येक राजकीय पक्षांची संस्कृती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जिथे निवडणुका होऊ घातल्या आहेत तिथे दंगल करण्याची आपल्या कित्येक राजकीय पक्षांची संस्कृती आहे.

अंमळ नव्हे, प्रचंडच घोळ! २०१४ ला निवडणूक येऊन घातली होती आणि लोकांनी २००२ पासून दंगे करायला चालू केले हे तर जगत्विख्यातच आहे! कार्यकारणभाव लावावा तर असा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>अंमळ नव्हे, प्रचंडच घोळ! २०१४ ला निवडणूक येऊन घातली होती आणि लोकांनी २००२ पासून दंगे करायला चालू केले हे तर जगत्विख्यातच आहे! कार्यकारणभाव लावावा तर असा.<<

प्रचंड घोळ झाला आहे ह्याच्याशी शत-प्रतिशत सहमती. जुलै २००२ मध्ये मोदींनी गुजरात विधानसभा मुदतपूर्व ८ महिने अगोदर बरखास्त करून निवडणुका घेतल्या आणि प्रचंड बहुमत मिळवलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

२००७ आणि २०१२ चे गुजरातचे निवडणूकपूर्व दंगे कसे विसरता येतील? आणि २०१४ चे राष्ट्रव्यापी दंगे?
=====================
बाय द वे, माझ्या लग्नान्ण्तर मणिप्पोरमधे प्रथमच दंगे थांबलेत आणि नक्कीच हे असंच चालू राहिलं तर नवनिर्वाचित भाजप सत्ता गमवणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हे वाचा, अभ्यासकांना काय सापडतं.
BJP gains in polls after every riot, says Yale study
... a recent study conducted by three political scientists of the Yale University claim that had Congress lost all close elections between 1962 and 2000, there could have been 10% more communal riots in the country.

यात त्यांनी २००२चा समावेश केलेला नाहीच! सोय-गैरसोय, हेतू, पैसे खाणं किंवा काय-कसं ते ठरवा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे तीन महाशयही धन्य आणि त्यांचे वाचकही धन्य इतकंच म्हणेन. येल विश्वविद्यालयाच्या प्राध्यापकांना अक्कल नसते असं अतिरेकी विधान करावं वाटावं इतकी मूर्खतापूर्ण यांची मेथडॉलॉजी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

येल विश्वविद्यालयाच्या प्राध्यापकांना अक्कल नसते असं अतिरेकी विधान करावं वाटावं

हे विधान अगदीच काही वाईट नाही. दुसरे उदाहरण इथे पहा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हे तिकडचं जे एन यू दिसतंय.

"the BJS/BJP saw a 0.8 percentage point increase in their vote share following a riot in the year prior to an election".

विनोदाचा दर्जा लक्षात येतोय का गब्बर?
आणि भारतात इथ्नो-रिलिजियस पार्टिज आहेत तरी का? मंजे महत्त्व असलेल्या पार्ट्या, नावाला नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गब्बर, तुला आठवतं का १९८४ च्या जातीय दंग्यांनंतर भाजपला ०.८% च्या जागी चांगलं ८०% चं घसघशित यश मिळाल्याचं. अशी प्रत्येक गोष्ट "अभ्यासकांनी" सांगावी हा अपमान आहे आपला.काश्मिरात १९८४ पासून भापजला २/३ मेजॉरिटी मिळतेय हे ही विसरत आहेस. २००१ ला मोदी सत्तेत येण्यापूर्वी गुजरातेत झालेल्या अमानवी दंग्यांची तर एक बातमी मिडियात नाही. प्रत्येक जण ती २००२ ची पाटपुट जाळपोळ घेऊन बसलाय. नुसता लिंका फेकत असतोस, अभ्यासक कसं बनावं ते शिक.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मुद्दा एकदम मान्य, अजो !!!

---

खरंतर आमचा फुर्रोगामी मंडळींच्या प्लुरलिझम, सेक्युलरिझम, डायव्हर्सिटी, मल्टिकल्चरलिझम च्या बकवासाला प्रचंड विरोध आहे. आणि हे लोक प्लुरलिझम + सेक्युलरिझम हे चांगलं आहे हे बोंबलून सांगत असतात ..... कोणतेही पुरावे न देता. आणि वर - "तुम्हाला हे समोर दिसतं तरी अमान्य करताय ?" वगैरे डबल बकवास असतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

हे तीन महाशयही धन्य आणि त्यांचे वाचकही धन्य इतकंच म्हणेन. येल विश्वविद्यालयाच्या प्राध्यापकांना अक्कल नसते असं अतिरेकी विधान करावं वाटावं इतकी मूर्खतापूर्ण यांची मेथडॉलॉजी आहे.

पैले म्हंण्तो तोच असतो!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"लेख‌काचे डिमॉनेटाय‌झेश‌न म‌ध्ये ब‌रेच‌ पैसे बुडालेत आणि आता बेनामी संप‌त्ती जाणार आहे हे स्प‌ष्ट दिस‌त‌ आहे." - अजो123

मुख्य विषयासंबंधी प्रतिसाद द्यायच्या ऐवजी, असा हेत्वारोप बघून सखेद आश्चर्य वाटले।

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

१. जे आडात आहे, तेच पोहऱ्यात येतंय. ऐसीबाहेर, खऱ्या जगात, याच प्रकारचा गदारोळ (दोन्ही बाजूंनी) सुरू असतो. त्याचं ट्रेलर बसल्याजागी ऐसीवर दिसतंय.
किंवा
२. तो प्रतिसाद विनोद आहे असं समजून हसा आणि लठ्ठ व्हा.

अशा या प्रतिसादाच्या सकारात्मक बाजू वगळता, तुम्ही फक्त नकारात्मक बाजूंकडेच लक्ष केंद्रित केलं आहेत. हे सखेद नमूद करत आहे. अरेरे, कुठे गेली माझी सकारात्मकता! तर ते हे असं, मूळ मुद्दा सोडून हेत्वारोप करण्याचा निषेध करणं गरजेचं आहे; त्याला +१.

एक शक्यता आहेच की अजोंनी खरोखर विनोद म्हणून तो प्रतिसाद लिहिला असेलही. पण त्यांचं इतर लेखन पाहता अशी शंका येण्याची शक्यता कमी आहे. तर अजो, हा विनोद असेल तर तो आणखी थोडा बटबटीत करा किंवा एकादा इमोटिकॉन डकवून विनोद असल्याचं सूचित करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

विनोद इ काही नाही. सत्य आहे. आणि दुसरीकडची नकारात्मक बाजू इ पण नाही.
=============
मोदींचे सरकार बदनाम करणे हा धंदा आहे. खूप पैसे मिळतात त्यात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रश्न - हे पैसे कोण देतं? हिंदी, इंग्लिशपेक्षा मराठीसाठी कमी दर असतो का? ऐसीच्या दिवाळी अंकासाठी पैसे देणार का, हे त्या लोकांना विचारायचं आहे. तुम्हाला दलाली देण्यासाठीही रदबदली करेन. १०% पुरतील ना?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मला या गाढव लेखकावर वेळ घालवायची अजिबात इच्चा नाही. हा एक हिंदूफोब सांड आहे. त्याची अक्कल (ते भारतीय समाजाचं भविष्य इ इ जाऊच द्या) किती आहे यासाठि एवढं वाचलं तरी पुरे.
http://www.opindia.com/2016/12/this-scroll-reporter-can-write-reports-on...
इथे त्यांच्या लेखनाच्या, पत्रकरितेच्या आणि आकलनाच्या दर्जावरनं कळाबं कि मोदींना बदनाम करायला कित्ती पैसे मोजले जात असतील. लोकं अगदी आपली इज्जत विकायला तयार आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मोदींना बदनाम करायला कित्ती पैसे मोजले जात असतील. लोकं अगदी आपली इज्जत विकायला तयार आहेत.

अजोंना जोरदार विरोध.

व्यक्तीने खुशाल बिकाऊ असावे.

मी (गब्बर) मोदींचे समर्थन करतो कारण मी बिकाऊ आहे. व मला बिकाऊ असण्याचा प्रचंड अभिमान आहे. परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ जर काय असेल तर ते बिकाऊपण. सिरियसली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक3
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण समजा तुम्हाला अपेक्षित असलेली किंमत आली नाही तर?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

तुमचा प्रश्न समजला. मला जे म्हणायचं आहे ते थोडं वेगळं आहे.

पण तरीही तुमच्या प्रश्नाचे थेट उत्तर देतो. ---- मला अपेक्षित असलेली किंमत आली नाही तर दुसऱ्या कोणाला तरी विकेन की जो मला हवी ती किंमत देईल. नैतर माझ्याकडचे विकण्याजोगे मटेरियल विकण्यायोग्य बनवण्याचा यत्न करेन.

मला जे म्हणायचं आहे ते हे - की आजकाल मिडियाला बिकाऊ म्हणून दोष लावण्याची फॅशन आहे. आवडती बातमी दिसली नाही किंवा नावडती बातमी जास्त वेळा दिसली की मिडिया ला बिकाऊ म्हणण्याची फॅशन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

परमेश्वरापेक्षा श्रेष्ठ जर काय असेल तर ते बिकाऊपण.

ईश्वरापेक्षा ईश्वराप्रति असलेलं समर्पण श्रेष्ठ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.