कधितरी...
anant_yaatree
1 minute
अमेरिकन कवी थॉमस एस. जोन्स यांची "Sometimes" ही एक अल्पाक्षरी कविता.
लहानपणी ध्यानी, मनी, स्वप्नी उराशी बाळगलेल्या व पुढे जगण्याच्या धडपडीत नामशेष होऊन स्मरणमात्र उरलेल्या आपल्या महत्वाकांक्षांबद्दलचं हृदयस्पर्शी भाष्य म्हणजे ही कविता.
ही मूळ कविता व तिच्या भावानुवादाचा माझा प्रयत्नः
ACROSS the fields of yesterday
He sometimes comes to me,
A little lad just back from play—
The lad I used to be.
And yet he smiles so wistfully
Once he has crept within,
I wonder if he hopes to see
The man I might have been.
========================
कधितरी...
----------
भेदून पटल काळाचे
तो कधितरी भेटिस येतो
येताना अवघे माझे
तो शैशव लेऊनी येतो
का त्याच्या चेहेर्यावरचे
हसणे अवचित काजळते?
माझ्या हत आकांक्षांचे
का पिशाच्च त्याला दिसते?
Node read time
1 minute
अनुवाद खूप सुंदर!
मूळ कविता फार नसली आवडली, तरीही अनुवाद फार्फारच सुंदर आहे.