डोक्यात जाणारी व्यक्तिमत्त्वं आणि प्रवृत्ती

ललित

डोक्यात जाणारी व्यक्तिमत्त्वं आणि प्रवृत्ती

- परिकथेतील राजकुमार

सोशल मीडिया हा ताप आहेच पण तिथे वावरणारे काही महाभाग हा तर महाताप आहे. ही माणसे कधी झुक्याच्या नजरेत आली ना, तर तो थेट फेसबुक आणि व्हॉट्सएप बंद करून जगाची जाहीर माफी मागेल हे नक्की. वेळोवेळी अशा प्रवृत्तींना ’ठेचण्याचे’ कार्य आम्ही उदारहस्ते करत असतोच. त्या प्रसंगांचाच गुंफलेला हा (प्र) हार...

गणपती आणि दिवाळीला हमखास मनात येणारा विचार म्हणजे...

आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त.
आजच्या दिवसापुरती ’Facebook Live' ची सेवा कोलमडून पडायला हवी.

आणि पावसाळ्यातल्या सोशल बेडकांचा आनंद तर काही निराळाच. पूर्वी पाऊस पडला, की दर दोन घरे किंवा झाडे सोडून कुत्र्याच्या छत्र्या उगवायच्या, आता कवी आणि चारोळीकार उगवतात, ’माझ्या मनातला पाऊस... ’

मनातच ठेव की तो भोसडीच्या! सगळ्या फेसबुकभर कशाला चिखल करतो? मुळात ह्यांना माणूस म्हणून देखील कोणी ओळखत नसते. पण हे हार न मानता स्वत:च्या नावामागे स्वत:च कवी वैग्रे लावून हिंडत असतात. असेच काही इसम आणि इसम्या स्वत:च्या नावामागे DR वैग्रे लावून हिंडत असतात. खरं सांगू का, हा प्रकार म्हणजे, ते गावाकडे मूळव्याध किंवा कमजोरी का इलाज करणारे स्वत:च्या नावामागे राजवैद्य लावतात ना तसे वाटते.

शेणसडा
आला आला पाऊस
मी जवळ केला कीबोर्ड माऊस
झाल्या सुरू पोटात कळा
काय प्रसवू कांदाभजीचे फोटो का चारोळ्या?
किती हौसेने मी टॅगले लोकांना
वदलो.. या कौतुके कराया
कवी मित्र आले धावून
म्हणती, काय छान फुलवला केवडा..
काही तुच्छ ही आले,
वदले.. अरे हा तर निव्वळ शेणसडा!

फेसबुकवरती विदेशी कल्पनांना भिकारडे देशी रूप देण्याचा प्रयत्न तर बघायलाच नको. उत्तम उदाहरण म्हणजे पुस्तकदिंडी!

ह्या प्रकाराखाली जाहिरात करायची असते, की आपण किती सुशिक्षित, साक्षर आहोत.. आपले वाचन, आवडी किती संवेदनशील आहेत इ. इ. ह्यासाठी वापर केला जातो ते आपल्या आवडीच्या दहा पुस्तकांची यादी सार्वजनिक करण्याचा. बरं, ह्यात आपली यादी द्यायची आणि त्यात एखाद्या मित्र मैत्रिणीचे नाव टॅग करून त्याला पण हे चाळे करायला लावायचे. आणि दहा पुस्तकांची यादी दिली की झाले? दहा पुस्तकांनी तुमचे जीवन प्रगल्भ बनवल्यावर मग इतर पुस्तके काय झक मारायला वाचलीत?

मला आजही चंपक, चांदोबा वाचायला आवडतात. पु. लं. चे कुठलेही पुस्तक दिसलं तरी चाळल्याशिवाय राहवत नाही, आणि अगदी हेच 'प्लेबॉय'च्या बाबतीत देखील घडतंच. मग उद्या जर मी आवडती पुस्तके मध्ये एक नंबर 'दुनियादारी', दोन नंबर 'व्यक्ती आणि वल्ली', तीन नंबर 'हैदोसचा २००३ चा दिवाळी अंक', चार नंबरला 'हस्तमैथुन शाप की वरदान? ', पाच नंबरला 'एका तेलीयाने', सहा नंबरला.. अशी यादी प्रामाणिकपणे बनवून टाकली, तर मला खो देणारा स्वत:च धोबीपछाड खाणार नाही का? फिट वैग्रे येऊन पडला कुठे तर मला पाप लागणार नाही का?

मग नंबर असतो गुरुपौर्णिमा, चतुर्थी, एकादशी शुभेच्छांचा.

गुरुपौर्णिमेला लोकांनी प्रामाणिकपणे वंदन करायचे ठरवले, तर सोशल मीडियावरती विजय माल्ल्या, रतन खत्री, वात्स्यायन, नारदमुनी, आनंदीबाई पेशवे, मंथरा, सिंड्रेलाच्या सावत्र बहिणी इ. इ. सुंदर सुंदर व्यक्तिमत्त्वांचे फोटो बघायला मिळतील.

काही नार्सिसस स्वत:चाच फोटो टाकून देखील वंदन करतील.

मग नंबर लागतो, ’कित्ती कित्ती छळतात लोक मला.. ’ असे भोकाड पसरणाऱ्यांचा.

फेसबुकवरची एखादी फ्रेंड रिक्वेस्ट लोकं नक्की काय मापदंड लावून स्वीकारतात? सगळ्याच नाही पण काही लोकांच्या बुद्धिचातुर्याविषयी मला खरंच आजकाल शंका यायला लागली आहे. एखाद्या कट्टर विचारसरणीचे, पक्षाचे किंवा विशेषत: प्रौढ स्त्रिया यांची रोजची रडगाणी, ती पण पन्नास पन्नास लोकांना टॅग करून गायलेली पाहिली की वैतागच येतो.

"किती लोचट लोकं असतात? उत्तर दिले नाही तरी पन्नास वेळा मेसेज करतात. किळसच वाटते बै! " अमकी तमकी विथ प्रसाद ताम्हनकर आणि पाच इतर.

आता कोणा पन्नाशीच्या बाईने अशी पोस्ट टाकली तर वाचणाऱ्यांपैकी काही मतिमंदाचा असा समज होणार नाही का, की हा ताम्हनकर आणि इतर पाच पांडव या बाईला छळून राहिलेत. तुमचा उद्वेग समजू शकतो, पण त्यात आम्हाला कशाला हिस्सेदार करता? वाल्या कोळी साल्या...

"काही फालतू आणि बेअक्कल डुकरांना पुन्हा समज देतोय. तुमची फलाणा फलाणा पक्ष / नेता ह्या विषयीची मते तुमच्यापाशीच ठेवा. माझ्या वॉलवरती येऊन ओकाऱ्या काढू नयेत. " अमका तमका विथ प्रसाद ताम्हनकर आणि इतर सोळाजण.

"फ्रेंडलिस्ट मधली घाण साफ करायला सुरुवात केली आहे. सावध... " फलाणा ढिमका विथ प्रसाद ताम्हनकर आणि पाचपन्नास इतर.

ह्या सगळ्याच पोस्टमध्ये मी टॅग असतो असे नाही, पण जे होतात त्यांचं दु:ख वेगळं नसावं. अरे का टॅग करता बाबा? ह्यातल्या कित्येकांची तर कधी प्रोफाइल देखील उघडून बघायचा महिनोंमहिने योग आलेला नसतो. ही लोकं अशी दवंडी पिटून पिटून आपलीच अब्रू चव्हाट्यावरती का मांडतात? तुमच्या मित्रयादीत किती मजनू आहेत, किती धर्मरक्षक आहेत, किती ओकाऱ्या काढणारे आहेत ह्याची माहिती आम्ही विचारली आहे का? तुमच्याच घरात, तुम्हीच आणलेला कचरा आहे ना? मग साफ करा आणि गप्प बसा की.

वैयक्तिक टीका वाईटच, पण तरी खरंच सांगतो, पन्नाशी उलटलेल्या आणि बिना मेकअप चेटकिणीचा रोल ऑफर होऊ शकेल अशा बाया, रोज उठून कोण तरी नवीन त्यांना इश्कबाजीचे मेसेज पाठवतोय, किंवा फोन नंबर मागतोय अशा 'लडिवाळ' तक्रारी जाहीरपणे करायला लागल्या, की एकतर ह्यांना म्हातारचळ लागलाय किंवा ह्याच्या मित्रयादीत बरेचशे मोतीबिंदू रुग्ण आहेत ह्याची खात्री पटते. बरं, ह्यांना नावे जाहीर करा, स्क्रीनशॉट टाका, सहन करू नका.. कायदेशीर तक्रार करा असे सुचवले रे सुचवले की लगेच "बघू.. आता सकाळपासून काही मेसेज नाही. " किंवा "हो, विचार चालू आहे, मिस्टरांशी बोलते. " असली कारणे देऊन पसार. ज्या ताया-माया-आज्यांना खरंच त्रास होतो ना, त्या तर अशा त्रास देणाऱ्यांची सरळ अब्रू काढून मोकळ्या होताना दिसतात. मी असं म्हणत नाही, की ह्या बायांना त्रास होतच नसेल, पण मग उगाच मित्र यादीतल्या सगळ्यांविषयीच संशयाचे वातावरण कशाला निर्माण करायचं? तुम्हाला काही प्रतिकार करायचाच नसेल, तर निदान डिलिट / ब्लॉक करून टाका की अशा इसमाला.

'पऱ्या तुला ना कोणाचेच कौतुक नाही' असा आरोप नको, म्हणून जाता जाता मला कोणाकोणाचे कौतुक आहे त्याची एक यादी :

१) वल्हीसारखे दोन्ही पाय गाडीच्या बाजूला लोंबकळत दुचाकी चालवणाऱ्या बायकांचे, रस्त्यातच एकदम गाडी लावत आजूबाजूला अशी कावळ्यासारखी मान वळवत पत्ता शोधणाऱ्या पुरुषांचं, विन डिझेल आपला शिष्य असल्याच्या थाटात वेगाने गाड्या हाकणाऱ्या तरुणाईचं.
२) पानी-पानी-पानी, आयपीएलची तुतारी, टिकटिक वाजते डोक्यात असले रिंगटोन ठेवणाऱ्यांचं.
३) स्वत:च्या पोस्टला लाइक करणाऱ्यांचं, 'आई-वडिल गेल्याची' पोस्ट टाकणाऱ्या साठपासष्ट वयाच्या नववृद्धांना 'अरे ते कुठे नाही गेले, इथेच आहेत.. आपल्यात. तुझ्याकडे बघतायत' असले खुळचट आणि बालिश रिप्लाय देणाऱ्यांचं. अत्यंत टुकार भिकार फोटो काढून गौतम राजाध्यक्षांच्या थाटात ते फेसबुकवर टाकणाऱ्यांचं आणि त्या फोटोवर त्याला साजेशीच स्वत:ची भिकार चारोळी प्रतिसाद म्हणून देणाऱ्यांचं.
४) खिडकीतल्या फुटक्या कुंडीतल्या छाडमाड फुलाचं ते सुवर्णकमळ असल्यागत कौतुक करणाऱ्यांचं, गाढवापासून कावळ्यांपर्यंतचे फोटो भीषण भीषण कॅप्शन्ससह टाकणाऱ्यांचं, रोमिओ ज्युलिएटनंतर किंवा कदाचित त्याआधीचे आपणच अशा थाटात हनीमूनचे फोटो टाकणाऱ्यांचं.
५) राखी सावंत, पूनम पांडेंच्या पेजला लाइक करणाऱ्यांचं, साईबाबा-हनुमानाचे 'ओरिजिनल' फोटो शेअर करणाऱ्यांचं.
६) 'श्री-जान्हवीच्या लग्नाला यायचे हां! ' किंवा 'रोडीज न्यू सीझन ऑसम' सारखे स्टेटस टाकणाऱ्यांचे.
७) मराठी चित्रपट आज कोटीच्या घरात यश खेचून आणतोय ह्याचे कौतुक करून, शेवटी 'चित्रपटाचे टोरेंट कुठे मिळेल? ' विचारणाऱ्यांचं.
८) सल्लागाराच्या वेषात संपादक म्हणून वावरणाऱ्यांचं, आणि आंतरजालावरील जुन्या दिवसांच्या आठवणीने उगाचच उसासे टाकत बसणाऱ्यांचं.
९) सावरकर जयंतीला गांधींचे गोडवे गाणाऱ्यांचं आणि ड्रायडेला त्याच गांधींना शिव्या घालणाऱ्यांचं.
१०) 'तुम्ही मला फ़्रेंड रीक्वेस्ट पाठवली आहेत, पण तुम्ही मला ओळखता का नक्की? ' ह्या प्रश्नाला 'तुमच्याकडच्या मित्र यादीत माझे पण तीन मित्र आहेत' असे उत्तर देणाऱ्यांचं.

विशेषांक प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

A day before yesterday,by mistake a comedy post was forwarded on Accupressure app site, the Admin was so angry that three times, she contacted on phone AND asked to delete the matter immediately. I said I am in the market now and will delete after sometime, but she was so irritated that she immediately deleted my name from the group. I said " Geli Udat"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

How cute!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डु.का.टा.आ.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फेसबुक नावाची रवी सर्वांना मिळाली आहे. घुसळूनघुसळून नवनीत/लोणी काढण्यासाठी. पण आजुबाजूंच्या अंगावर थोडे ताकाचे शिंतोंडे उडणारच.
या राजकुमारास कुणाचे किती निघते हे पाहायचे आहेच पण ताक उडायला नको. पुन्हा माझे बघा,किती छान लोणी आणि पातळ ताक. बघाबघा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अग्ग बाई परा तु म्हंंण्ण्जे अस्सा आहेस की नै!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

हे मी कसं नाही वाचलं? झकास लिहीलंय हे आलंच.
माझीही भर:
१) तरूणवर्ग:
अ) फुटबॉल म्याचेसची कमेंटरी लिहीणार. त्यांचे ड्यूड आणि ब्रो त्यावर हिरीरीने वाद घालणार. खेळता घंटा येत नाही.
ब) कुठल्याही 'इन्' गोष्टीची फुक्कट जाहिरात करणार. उदा. डेडपूल-२ चा ट्रेलर, एआयबीचा नवा व्हिडीओ
क) मेलेल्या व्यक्तींचे आत्मे RIP RIP करत टराटर फाडणार.
ड) स्वत:ची थोबाडं किंवा काहीही इथेतिथे उभं राहून जमिनीकडे पाहतानाचा फोटो टाकणार आणि खाली मोटीव्हेशनल क्वोट टाकणार.
ई) स्वत:ची थोबाडं (सेल्फी हो, सेल्फी!) टाकून त्याखाली हॅप्पी होली/मकरसंक्रांती/नवरात्री/गुडमॉर्निंग वगैरे धेडगुजरीत लिहीणार.
फ) नुसता धुर्र, इउउउउ, राडा, #kdk अशा पंचवीस कमेंट मित्रांच्या फोटोवर मारणार.
असो.
२) म्हातारावर्ग:
अ) ते सायन्स-अध्यात्म पुरणकालवण शिजवणार.
ब) जुनी ब्ल्याकँडव्हाईट गाणी शेअरून वात आणणार.
क) फोटोच्या कमेंटमध्ये गप्पा मारायला बसणार.
ड) वॉलवर गप्पा मारणार.
इ) देवतांचे फोटो इतके शेअर करणार की बाप्पाने ह्यांना घ्यायला (ॲटलिस्ट परसाकडे जाताना पाडायला आणि त्या निमित्ताने... असो.) उंदीर पाठवावा अशी भीषण कल्पना आपण करणार आणि हो:हो:हो: करुन हसणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

भलतेच लोक भलतंच एंडॉर्समेंट करतात तेव्हा सुद्धा मजा येते. (डोक्यात जातंच असं नाही. पण मजा येते).

उदा. जन्मभर बँकेत कॅशियर असलेल्या माणसाने आपल्या मुलाची Perl प्रोग्रामिंग ची स्किल्स (LinkedIn वर) एंडॉर्स करणे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...कळत नसावा त्यांना.

आपल्या बाब्याला येनकेनप्रकारेण प्रमोट करायचे आहे, आपल्याला त्यातले शष्प कळत नसले तरी, त्याचा एक मार्ग, एवढ्याच मर्यादित दृष्टिकोनातून बघत असावेत त्याकडे.

त्या बाब्याला खरोखर जर काही अक्कल असेल, तर त्याला असली 'एंडॉर्समेंट' ही अंगावरून झुरळ गेल्यासारखी वाटत असावी. पण सांगतो कोणाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

LinkedIn वरती मी देखिल अपरिचित कौशल्यांकरता मैत्रांना एन्डॉर्स करते पण त्याचा अर्थ निव्वळ असा असतो की त्या व्यक्तिमध्ये ते कौशल्य आहे हे मला माहीत आहे व मला या व्यक्तिबद्दल प्रेम, आदर किंवा plain empathy आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

LinkedIn वरती मी देखिल अपरिचित कौशल्यांकरता मैत्रांना एन्डॉर्स करते पण त्याचा अर्थ निव्वळ असा असतो की त्या व्यक्तिमध्ये ते कौशल्य आहे हे मला माहीत आहे व मला या व्यक्तिबद्दल प्रेम, आदर किंवा plain empathy आहे.

हे छान, सराहणीय, स्पृहणीय, प्रशंसनीय, उच्च, श्रेष्ठ, महान आहे.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बॉरं.
.
अजुन एक ते कौशल्य आहे हे चक्षुर्वै सत्य असल्याखेरीज एन्डॉर्सही करत नाहीत. उदाहरणार्थ एखादि व्यक्ती "रिक्रुटर" असते व माझ्या जीवनात ती रिक्रूटर म्हणुनच आलेली असते. मला जरी "रिक्रुटींगबद्दल" अवाक्षरही कळत नसले तरी हॅन्डस ऑन अनुभवावरुन मी तिला एन्डॉर्स करु शकतेच की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0