खरं म्हणजे मला लहानपणापासूनच चौसष्ट कलांत निपुण व्हायचं होतं. व्यापक समाजहिताच्या दृष्टीनं चौसष्ट कलांनी माझ्याशी छत्तीसच्या आकड्यातून सख्य दाखवल्यानं, मला त्यातल्या काहींचा फक्त आस्वाद घ्यायची संधी साधावी लागली. बाकीच्या कला 'अकलेच्या' गुलदस्त्यात ठेवून फक्त सिनेमा उर्फ पासष्टाव्या कलेबद्दल लिहायचं आहे हे बरं झालं, नायतर एवढे कष्ट कोण करेल प्रभो!
कठोर लॉकडाऊनच्या काळात प्रवासासाठी ई-पास लागायचे. त्या काळात हे ई-पास प्रकरण एखाद्या काळ्या ढब्ब्या ढगासारखं सतत वर तरंगत असायचं. आमच्यासारख्यांना तर कायकाय त्या ई-पासासाठी यातायात करावी लागायची! हां पण हुशार लोकांसाठी मात्र...