निवडुंग तरारे इथला

In Flanders Fields ही एक प्रसिद्ध युद्धकविता.

पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान डॉक्टर, सैनिक व कवी असलेल्या जॉन मॅक-क्रे यांनी बेल्जीयम मधल्या Ypres इथल्या युद्धात मरण पावलेल्या आपल्या मित्राच्या स्मरणार्थ लिहिलेली. लढता लढता संपलेल्या अनाम सैनिकांचं हे मनोगत.

युद्ध अमानुष असतं, निरर्थक असतं हे सर्व जरी खरं असलं तरी आजही ते एक सतत भेडसावणारं अटळ वास्तव आहे. म्हणूनच ही कविता आजही क्षणभर मनाला चटका लावून जाते.

ही मूळ कविता व तिच्या भावानुवादाचा मी केलेला प्रयत्न:

In Flanders fields the poppies blow
Between the crosses, row on row,
That mark our place; and in the sky
The larks, still bravely singing, fly
Scarce heard amid the guns below.

We are the Dead. Short days ago
We lived, felt dawn, saw sunset glow,
Loved and were loved, and now we lie
In Flanders fields.

Take up our quarrel with the foe:
To you from failing hands we throw
The torch; be yours to hold it high.
If ye break faith with us who die
We shall not sleep, though poppies grow
In Flanders fields.

भावानुवादः

निवडुंग तरारे इथला
प्राशून आमुचे रक्त
गुदमरे शीळ पक्ष्यांची
फैरींच्या आवाजात.....या अनाम धारातीर्थी

सळसळते जीवन जगलो
मरणाला भिडण्याआधी
अनुरक्त जीवनी होतो
समरात संपण्याआधी....या अनाम धारातीर्थी

हातांत अपार्थिव अमुच्या
सूडाचे पलिते जळती
व्हा वारस हौतात्म्याचे
देण्यास अम्हाला मुक्ती ...या अनाम धारातीर्थी

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

फक्त निवडुंगातून दिसणारी नकारात्मकता पॉपीज् मधून मूळ कवीला सुचवायची नसावी असं वाटतं.
भावानुवाद उत्कृष्ट. शब्द नेमके; कविताही नेमकी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

खूपच सुंदर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मूळ कवितेतले भाव उत्तमपणे उतरले आहेत. चांगला भावानुवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपल्या प्रतिसादांबद्दल आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0