मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ९२
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० पेक्षा अधिक झाले आहेत म्हणून हा पुढचा धागा.
---
रात्री दहाच्या आत कंडोमच्या जाहिराती दाखवायच्या नाहीत, ही बातमी ताजी असताना रात्री ९ वाजता चॅनल सर्फिंग करत होतो. 'अंजाना अंजानी' नावाचा चित्रपट चालू होता. न्यू यॉर्क शहरात रणवीर कपूर व्हर्जिन आहे आणि त्याचं कौमार्य भंगण्यासाठी प्रियंका चोप्रा त्याला एका नाईटक्लबमध्ये घेऊन येते असा प्रसंग चालू होता. त्या प्रसंगी हे गाणं होतं -
हे स्मृति इराणीला सांगायला हवं म्हणून ट्विटरकडे धाव घ्यावी का, असा प्रश्न पडलेला असतानाच प्रसंग संपला आणि रणवीरच्या संस्कारी मनामुळे त्याचं कौमार्य भंगलं नाही हे लक्षात आलं. शेवटी काय होतं ते पाहायला थांबलो नाही. कधी तरी त्याचं कौमार्य भंगतं का, आणि ते कोणाकडून?
अजो ,
अजो ,
मी हा लेख वाचलेला नाही . ( कारण तो फार मोठा असावा आणि मला इंटरेस्टिंग वाटला नव्हता) तुम्हाला तो आवडलेला दिसत नाही . तुम्ही दुखावले गेला असावात असे वाटते .तुम्हाला विरोध करावा असे वाटत असेल तर तुम्ही जोरदार विरोधी लिहू शकताच या बद्दल . पण राम प्रेमी आणि शामप्रेमी संघटनांना आमंत्रण देऊन काय साध्य करायचे आहे तुम्हाला ? हे सर्व ग्रुप्स सज्जन , सत्प्रवृत्त , सच्चे आणि योग्य असतीलच असे तुम्हाला खात्रीने वाटते का ? का त्यांचे राम शाम प्रेमी असणे हे त्यांचे सज्जन , सत्प्रवृत्त , सच्चे आणि योग्य असण्याचा पुरावा आहे असे तुम्हाला वाटते ?
मी हा लेख वाचलेला नाही . (
मी हा लेख वाचलेला नाही . ( कारण तो फार मोठा असावा आणि मला इंटरेस्टिंग वाटला नव्हता)
वाचायची गरज नाही.
तुम्हाला तो आवडलेला दिसत नाही .
मला त्यात भाषांतरात राम आणि श्याम वापरणं आवडलं नाही. अनुवाद, भाषांतर वा भावानुवाद करताना तारतम्य वापरलं पाहिजे. उद्या ते कुठलेही नावं लिहितील. मूळ लेखात फ्रेंच देवांची नावे असतील तर ती वापरा पण तसं नाही. दोन फ्रेंच माणसांची असतील तर ती वापरा. पण फ्रेंच राड्यामधे भारतीय देव कुठून आले? यात जयदीपचा उद्देश काय आहे?
---------------
बाकी आमच्या श्रद्धास्थानाशी असंबंधित लोकांनी त्यांच्या रुचिनुसार कुठे काय लिहावे करावे हे सांगणारे आम्ही कोण?
--------------------------------
तुम्ही दुखावले गेला असावात असे वाटते.
याने विशेष फरक न पडावा. सदर उदाहरण योग्य कि अयोग्य हे महत्त्वाचे. यात ख्रिस्ती धर्म आणि येशू चे पण अनेक अपमानकारक उल्लेख आहेत. ते कदाचित ॲज इज असावेत. पण भारतात असे उल्लेख करणं मान्य नसावं.
तुम्हाला विरोध करावा असे वाटत असेल तर तुम्ही जोरदार विरोधी लिहू शकताच या बद्दल.
कलाकृतीचा उद्देश, संदेश, भाषांतराचे प्रयोजन इ च्या विरोधात लिहायला आवडले असते. पण या कशाचा उल्लेख नाहीच. ललितातील पात्रांच्या वर्तनाचा विरोध म्हणजे मूर्खपणा आहे.
पण राम प्रेमी आणि शामप्रेमी संघटनांना आमंत्रण देऊन काय साध्य करायचे आहे तुम्हाला ?
आमंत्रण नाही, माहिती. त्यांना माहीत असावं त्यांच्या श्रद्धास्थानाचे नावाचे उपयोग कसे कसे होतात ते. उदा. हे जर रँडम चयन असेल नि त्यात देवांचा संबंध नसेल, तर त्याच लॉजिकवर सगळ्याच पात्रांची नावे रामायणातील घेता येतील नि वर रेटून म्हणता येईल कि यांचा प्रत्यक्ष रामायणाशी संबंध नाही.
हे सर्व ग्रुप्स सज्जन , सत्प्रवृत्त , सच्चे आणि योग्य असतीलच असे तुम्हाला खात्रीने वाटते का ?
लिबटार्ड माजोरड्यांपेक्षा तरी शतपट.
का त्यांचे राम शाम प्रेमी असणे हे त्यांचे सज्जन , सत्प्रवृत्त , सच्चे आणि योग्य असण्याचा पुरावा आहे असे तुम्हाला वाटते ?
येशूचे असे घाण उल्लेख करणं, अल्लाची घाणेरडी काटूनं काढणं, इ इ एक क्कुजकट मनोवृत्ती दाखवते. रामप्रेमी आणि शामप्रेमी लोक बव्हंशी सत्प्रवृत्त असतात याबद्दल वादच नाही. महात्मा गांधी घ्या उदाहरण म्हणून.
वेबसाइटचे सतत बॅकप घेणे,
वेबसाइटचे सतत बॅकप घेणे, प्रतिसाद वाचून अग्राह्य काढणे काम असते ते कोणी वाटून करत असतील. त्याची कॅास्ट कशी काढणार?
हे काम जी व्यक्ती ऐसी मधे जी व्यक्ती करते त्या व्यक्तीने बाहेर त्याच कामासाठी बाहेर अर्ज करावा व तिथे सिलेक्शन झाले तर तिथल्या वार्षिक पगाराला २००० ने भागावे. व जे उत्तर येईल तेवढी रक्कम त्या कामाची प्रतिघंटा कॉस्ट. आता हे काम करण्यासाठी जेवढा एकंदर वेळ प्रतिवार्षिक लागतो त्या एकंदर तासांना ह्या प्रतिघंटा कॉस्ट ने गुणले की ह्या कामाची वार्षिक कॉस्ट आली. ही फक्त टाईम कॉस्ट आहे.
दोन्ही विकल्प विचारणीय आहेत.
दोन्ही विकल्प विचारणीय आहेत.
(१) खऱ्या नावाने अर्ज करा, नोकरी मिळवा आणि मग कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन झालं की त्याला १.३ ने गुणा म्हंजे तुमच्या तथाकथित डिस्क्रिमिनेशन साठी ॲडजेस्टमेंट करता येईल.
(२) पुरुषी नावाने अर्ज करा, पहा नोकरी मिळते का. मिळाल्यास कॅल्क्युलेशन करा.
आणखी एक मार्ग आहे. एखाद्या स्त्रीवादी व्यक्तीकडून फंडींग मिळवा व त्या फंड्स मधून एक स्त्री नेमक्या याच कामासाठी हायर करा. तिला किती पगार देणार ते तुम्हाला नेगोशिएट करावे लागेल. तिथे तुम्हाला स्त्रीपुरुषसमानता सुद्धा राबवता येईल आणि स्त्रियांना आरक्षण पण राबवता येईल. त्या स्त्रीला दिला जाणारा वार्षिक पगार ही तुमची रियल कॉस्ट असेल. एस्टिमेट नसेल. आणि मुख्य म्हंजे तुम्हाला कल्पना येईल की कॉस्ट म्हंजे नेमके काय असते ते. हे सोल्युशन हस्तिदंतीमनोऱ्यातले नसून एकदम ग्रासरूट लेव्हलचे आहे. कारण तिथे हवेतले मनोरे नसतील, एस्टिमेशन नसेल्. खऱ्याखुऱ्या कॉस्टस असतील. याचा आणखी एक फायदा आहे - You will know that you have grown up.
ते तुमचं तुम्ही पाहा....
जयदीप चिकलपट्टी यांनी राम आणि श्याम या हिंदू देवतांचा उदाहरण म्हणून …. याची माहीती रामप्रेमी आणि शामप्रेमी अशा कोणकोणत्या संघटनांना देता येईल?
ते तुमचं तुम्ही पाहा, पण माझं आडनाव त्यांना कळवताना चूक होणार नाही इतकी किमान दक्षता घ्या. थँक यू इन अॅँटिसिपेशन.
-जयदीप
नवीन वर्ष चालू होणार आहे.
नवीन वर्ष चालू होणार आहे.
मेभु आणि ऋ गेल्यामुळे ऐसीचे काय नुकसान झाले ते मालकांना दीड वर्षात कळाले असेल.
ऐसीचे वाचक रेषेवरची अक्षरेकडे वळवता न आल्याने बालसाहित्य विशेषांकला कमी वाचक लाभले असतील.
दोघांनी काही तडजोड करायचा प्रयत्न करावा. दिवाळी आणि उन्हाळी अंकात मेभुला पूर्ण स्वातंत्र्य, इतरवेळी साईटच्या चालवण्यात शून्य लुडबुड. असे काहीतरी....
.
मेभु आणि ऋ गेल्यामुळे ऐसीचे काय नुकसान झाले ते मालकांना दीड वर्षात कळाले असेल.
काहीही नुकसान झाले नाही.
किंबहुना, इथे राहून मी एक कोणती गोष्ट जर शिकलो असेन, तर ती म्हणजे, इथे कोणीही सोडून गेल्यामुळे कोणालाही शष्प (मराठीत: झाट) फरक पडत नाही. (संकेतस्थळाला तर नाहीच नाही. अँड धिस होल्ड्स ट्रू फॉर ऑल संकेतस्थळाज़, नॉट जष्ट 'ऐसी'.)
(वेळोवेळी भलेभले सोडून गेले. इथला एकही जण हळहळला काय त्यांच्यासाठी? इथले जन पळभर तरी हाय हाय म्हणाले काय त्यांच्या नावाने? जाई, सहज, रुची ही नावे (केवळ उदाहरणादाखल) आठवतात तरी काय आजमितीस इथे कोणाला?)
असो चालायचेच.
दोघांनी काही तडजोड करायचा प्रयत्न करावा. दिवाळी आणि उन्हाळी अंकात मेभुला पूर्ण स्वातंत्र्य, इतरवेळी साईटच्या चालवण्यात शून्य लुडबुड. असे काहीतरी....
गेलेल्यांच्या नावाने हळहळण्यात काहीही हशील नसते. आणि त्यांना पुन्हा पाचारण करण्यात तर त्याहूनही नाही. त्यापेक्षा, 'ईश्वर गतात्म्यांस शांती आणि सद्गती देवो' म्हणायचे, आणि मोकळे व्हायचे, झाले.
जाई, सहज, रुची ही नावे (केवळ
जाई, सहज, रुची ही नावे (केवळ उदाहरणादाखल) आठवतात तरी काय आजमितीस इथे कोणाला?) >> आठवण्यासारखी नावं आहेत का ही?? :D
===
काहीही नुकसान झाले नाही. >> ठिकाय ज्याचं त्याचं मत. मी माझं मत मांडलं....
===
(संकेतस्थळाला तर नाहीच नाही. अँड धिस होल्ड्स ट्रू फॉर ऑल संकेतस्थळाज़, नॉट जष्ट 'ऐसी'.) >> उपक्रम च काय झालं?
उपक्रम च काय झालं?
उपक्रम च काय झालं?
ह्म्म्म्म्... 'मारुती कांबळेचं काय झालं?' चांगला प्रश्न आहे.
(थोडक्यात, नो कमेंट्स.)
पण तेथेही, एखादी विशिष्ट व्यक्ती किंवा व्यक्तिसमूह सोडून गेल्यामुळे संकेतस्थळ बंद पडले (किंवा संकेतस्थळाला काही फरक पडला, किंवा संकेतस्थळावर काही परिणाम झाला), असे म्हणता येईलसे निदान मला तरी वाटत नाही.
'काही विशिष्ट गटाच्या ताब्यात जाऊन झालेली पडझड' म्हणू या फार तर.
(थोडक्यात, संस्कृताचे जे झाले (असे म्हणतात), तेच.)
असो.
आठवण्यासारखी नावं आहेत का ही??
वेल, मला विचाराल तर ('अॅमी'बद्दल माहीत नाही, परंतु) ''न'वी बाजू'च्या तुलनेत तरी आठवण काढण्यासारखी अवश्य आहेत.
अर्थात, तुम्हाला तसे वाटत नसल्यास तो तुमचा प्रश्न.
थोडक्यात, आमचा पास.
Indian Journal of History of
Indian Journal of History of Science यातले लेख इथे वाचता येतील:
असं नक्की वाटतय ना तुम्हाला ?
असं नक्की वाटतय ना तुम्हाला ?
यालाच शेवटपर्यंत वाचू न शकणे म्हणतात.
=====================================
बाकी मला पुरोगाम्यांनी प्रसवलेल्या सोडून बाकीच्या सर्व भारतीय बाबतींत नेहमीच एकी राहीली आहे याची खात्री आहे. आता देखील अनेक पुरोगामी वादळं पचवायची ताकद देशात आहे.
आमच्या फेबु वरच्या मैत्रिणी
आमच्या फेबु वरच्या मैत्रिणी आज इतके इंच बर्फ काढला वगैरे पोस्टताना दिसतात. त्याअर्थी हे चित्र खरे नाही.
तसं तर अनेक कंपन्यांमधे स्त्रियांना पुरुषांपेक्षा वरच्या जागा व अधिक वेतन सुद्धा असेलच की.
पण म्हणून स्त्रीपुरुष वेतनसमानतेची मागणी स्त्रिया करत नाहीतच असं नाही.
.
असं नै बै करायचं!
असा नाही बै न-विनोद उघडा पाडायचा!
गेल्या वर्षात, किंवा या हिवाळ्यात डिसेंबरात दोनदा स्नो पडला. पहिल्यांदा अनपेक्षितरीत्या पडला. त्यामुळे हिमवर्षावात सायकल चालवत घरी येणं, मोगऱ्यासारख्या झाडांवरचं हिम झटकून त्या कुंड्या गॅरेजात आणून ठेवणं वगैरे प्रकार करावे लागले. (बरा अर्धा गाडी वापरतो. त्यामुळे त्याला बर्फात सायकल चालवावी लागली नाही. झाडं-बागकाम हा माझाच प्रांत आहे; तो त्यात लक्षच घालत नाही.) हे हिम खूप नव्हतं, गवत, झाडांवरचं हिम दुसऱ्या दिवशीही होतं; पण रस्ते, फुटपाथांवरचं लगेच वितळत होतं.
हॅहॅहॅ
याला युक्तीवाद/प्रतिवाद करता न येणे असे म्हणतात.
दुवा देण्याच्या कृतिबद्दल मी बोलत नैय्ये. दुव्यातल्या मजकूराबद्दल बोलतोय. त्या (सिलिकॉन व्हॅलीतल्या जेंडर डिसक्रिमिनेशनबद्दल च्या) दुव्यात तुम्ही कोणताही युक्तिवाद / प्रतिवाद केलेला नाहीये.
मी वर जे चित्र दिलेले आहे ते पुरुषी असेल तर स्त्रीण चित्र कसे असेल ? - हा प्रश्न आहे. प्रति चित्र काढायची गरज नाही. फक्त थोडक्यात (म्हंजे ३० शब्दात) वर्णन केलेत तरी पुरे.
.
नवनीत गाईड मिळणार नाही.
दोन पर्याय आहेत; हवा तो निवडा -
१. 'आपण दाखवतो तेवढे माचो नाही आणि आपल्यालाही शारीरिक कामांत मदतीची गरज असते', हे मान्य न करता; आपला अशक्तपणा (तुमच्या भाषेत - फडतूसपणा) मान्य न करता त्याबद्दल चिडचिड, त्याचं खापर स्त्रियांवर वा समानतेवर फोडणारी रडारड चित्रं बघणं.
२. न पटणाऱ्या विचारांचे लेख संपूर्ण वाचून, त्याबद्दल उलुसा विचार करून मग लिहायचं का आणखी विचार करायचा याचा निर्णय घेणं.
मी नवनीत गाईड देणार नाही. विशेषतः, संवेदनशीलता दाखवण्याजागी बिनकामाचे, आक्रमक आणि विध्वंसक सल्ले देणाऱ्यांना तर अजिब्बात गाईड मिळणार नाही.
जन्मदत्त गुण
आपल्या जन्मदत्त ओळख/अस्मितांमुळे आपल्याला चिकार फायदा मिळालेला आहे, हे अनेकांना समजत नाही. उच्चवर्णीयांना जातमुक्त होता येतं, अशा अर्थाचं लेखनही अधूनमधून वाचनात येतं.
'Privilege is invisible to those who have it': engaging men in workplace equality
According to American sociologist, Prof Michael Kimmel, men can’t see what the issue is. They don’t see the advantages conferred by their Y chromosome.
अधोरेखन माझं.
“Without confronting men’s sense of entitlement, we will never understand why so many men resist gender equality. [It is] because we grew up thinking this is a level playing field and any policy that tilts it a little bit, we think it is reverse discrimination against us.
“Let me be really clear. White men in Australia, North America and Europe are the beneficiaries of the single greatest affirmative action program in the history of the world. It is called the history of the world.”
एक सिनीयर मित्र म्हणतो, पेशवाईत ब्राह्मणांना १००% आरक्षण होतं.
(हा प्रतिसाद मुद्दाम लिहिण्याचा इरादा नव्हता; पण समाजमाध्यमांच्या माझ्या 'एको चेंबर'मधून मला हे मिळालं म्हणून इथे डकवलं.)
हो, मजा असते ना!
(१) तुंबलेले किंवा ओसंडून वाहणारे गटार साफ करण्यात, किंवा (२) स्वतःचीच मारून घेण्यात१ जेवढी मजा असते, साधारणतः तेवढी मजा असते. (खास करून बाहेर ३२० फॅ.२पेक्षा कमी तापमान असते, तेव्हा.)
(चिराबाजारात ज्या दिवशी बर्फ पडेल३, त्या दिवशी समजेल.)
(बर्फाचे वर्णन साधारणतः 'आकाशातून पडणारी पांढरी विष्ठा' असे करता यावे.४ असो.)
..........
तळटीपा:
१ मला या दोहोंचाही अनुभव नाही. परंतु बर्फ काढण्याचा अतिमाफक आणि अतितुरळक का होईना, परंतु अनुभव आहे.१अ त्यावरून अधिक कल्पनाविलासातून.
१अ कॅलिफोर्नियाबाहेर पाऊल ठेवलेले असल्याखेरीज गब्बरला तोही बहुधा नसावा, असे भाकीत करण्याचे धाडस करतो. असो.
२ तुमच्या भाषेत ०० से.
३ संदर्भ: पु.ल. 'खुरच्याऽऽऽऽऽऽ'.
४ प्रस्तुत वर्णन बर्फ काढावे लागणाऱ्या/रीच्या भूमिकेतून केलेले आहे. त्या (आकाशातून पडून साचलेल्या) बर्फावरून, किंवा त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ते (आकाशातून पडून साचलेले) बर्फ घट्ट झाल्यानंतर त्यावरून, किंवा त्याहीपेक्षा प्रचंड वाईट म्हणजे हवेतील आर्द्रता वा पाऊस वा गारापाऊस रस्त्यावर डायरेक्ट गोठून जो (अदृश्य) बर्फाचा ('काळे बर्फ' उपाख्य ब्लॅक आइस) पातळसर थर जमतो, त्यावरून चालावे वा वाहन चालवावे लागणाऱ्या/रीच्या भूमिकेतून हे वर्णन त्याहूनही तीव्र व्हावे. 'परमेश्वराचा मानवावरील सूड' असे वर्णन त्या भूमिकेतून बहुधा सौम्यातिसौम्य ठरावे. असो.
तक्रार अधिक मागणी
अदितीतैंच्या विदा मधे भर
अदितीतैंच्या विदा मधे भर टाकणारी एक बातमी
पुरुष सहकाऱ्यांना जास्त पगार दिल्याचा आरोप करत बीबीसीच्या महिला एडिटरचा राजीनामा
https://www.loksatta.com/desh-videsh-news/bbc-china-editor-carrie-graci…
यक! मराठी वर्तमानपत्रं!!
'लोकसत्ता'नं दिलेलं बातमीचं शीर्षक अधिक सनसनाटी वाटलं -
पुरुष सहकाऱ्यांना जास्त पगार दिल्याचा आरोप करत बीबीसीच्या महिला एडिटरचा राजीनामा
महिला हा शब्द निरुपयोगी आणि एडिटर काय!
हे लोक फेसबुकवर अपडेट लिहीत आहेत काय; 'आज मॉर्निंगला चार वाजताच टेंपरेचर कमी वाटलं, म्हणून जॅकेट घालून बसली; नंतर वॉक घेतला नाही', छापाचं!
नवा तांदूळ हा प्रकार
नवा तांदूळ हा प्रकार वर्षभराचे धान्य भरणारे लोकच आणतात कि महिना दोन महिनाचे राशन भरणारेपन आणतात?
मी पूर्वी एकदा स्वस्त मिळतो म्हणून नवा तांदूळ आणलेला. लगेच वापरायला घेतला. शिजवल्यावर जुन्या तांदळापेक्षा कमी क्वांटिटी होते म्हणून परत आणला नाही. जुण्याला ५-६ ₹ जास्त दिले तरी हिशेब तेवढाच पडतो अस वाटलं.....
पर्याय
१. ग्राहक पेठेत बघा (ॲट द रिस्क ऑफ बीइंग लेबल्ड बघा टिपिकल म्हंजे अगदीच टिपिकल ममव, विच तसे यू डोंट सीम लाईक). गेल्या ३-४ वर्षांचा माझा अनुभव चांगला आहे. शिवाय सध्या तांदूळ महोत्सव चालू आहे बहुतेक.
२. तुमची रिस्क ॲपेटाइट जास्त असेल तर मार्केटयार्डातले मारवाडी ट्राय करायला हरकत नाही.
३. आणि त्याहूनही जास्त रिस्क ॲपेटाईट असेल तर मावळ वगैरे भागात फिरताना एखाद्या ठिकाणी मिळाला तर बघा.
तांदूळ नवा असो किंवा जुना,
तांदूळ नवा असो किंवा जुना, मटन तांबड्या रश्शासोबत चिकट इंद्रायणी भात अतिशय जबरदस्त लागतो. तो भात जणू फक्त त्याकरिताच बनलाय असे वाटते. त्यासोबत वरण इ. खाणे म्हणजे त्याचा घोर अपमान आहे. सांबार-रसम सोबत मोकळा कुठलातर भात, मटन रश्शासोबत चिकट इंद्रायणी भात अन बिर्यानीसाठी लांबडा बासमती...जेणूं काम तेणूं थाय....
तांदूळ नवा असो किंवा जुना,
तांदूळ नवा असो किंवा जुना, मटन तांबड्या रश्शासोबत चिकट इंद्रायणी भात अतिशय जबरदस्त लागतो.
आत्यंतिक सहमत. खेड शिवापूरला जगदम्बाची फेरी झालेली दिसतेय.
नव्या तांदुळाचा चिक्कटगोळा गुरगुट्या लुसलुशीत मऊ भात हाच खरा भात. लोक त्या भाताला गिजगीजीत गचगचीत किंवा अन्य काही म्हणतात त्यांना व्याडेश्वर माफ करेलच.
कव्हा गेल्ते ओ? शिक्किरवारी
कव्हा गेल्ते ओ? शिक्किरवारी दुपारी यक-दीड? चिकनबी थोडं बिघाळडं व्हतं. तरीबी बाकिच्यांबेक्षा चांगलं, पन दोनेक महिन्याआधी खाल्लं व्हतं तव्हा सारखी मजा नाई.
त्यो ७-८ जनांचा ग्रूप तुमचा व्हता व्हंय खिडकीच्या बाजूला बसल्याला? तुमचं यक अस्सल चित्र बघितलेलं हे दुसऱ्या यका सायटीव. मला वाटतंय तुम्हीच व्हते बाजूच्या ट्याबलाव.

Youthquake!
Broflake आणि White fragility आपल्याकडे पुष्कळ दिसत्ये, पण भारतात Youthquake होताना काही दिसत नाही.
संदर्भ