The Little Fellow

आज चार्ली चॅप्लीनची पुण्यतिथी. त्यानिमित्त मी काही दिवसांपूर्वी लिहिलेला लेख 'ऐसी' साठी सादर करतो आहे.
=======
मी सहसा रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या पुस्तक विक्रेत्यांकडून, पुस्तकं विकत घेत नाही. कारण उघड आहे. बहुतेक वेळेला ती पुस्तके नकली(pirated) ही असतात. पण मी ती पुस्तकं जरूर पाहतो, चाळतो. न जाणो एखादे वेगळेच पुस्तक हाती लागावे. परवा असेच झाले. एका पुस्तकवाल्याकडे रस्त्यावर ठेवलेली पुस्तके पाहत होतो. एका पुस्तकावर माझी नजर रोखली गेली. उचलून घेतले तर ते चार्ली चॅप्लीनचे चरित्र. पुस्तक जुने होते, १९५२ मधील. त्याचे नाव होते The Little Fellow, लेखक आहेत Peter Cotes, Thelma Niklaus. मी मराठीतील चार्ली चॅप्लीनचे चरित्र हसरे दुःख(भा. द. खेर यांचे) हे पूर्वी वाचले होते. अजून कुठली चरित्रे मी पाहिली/वाचली नव्हती. उत्सुकतेने मी ते चाळले आणि तत्काळ विकत घेतले(फक्त शंभर रुपये). त्या पुस्तकाबद्दल येथे थोडेसे.

अचानक एक दिवस मला दूरचित्रवाणीवर चॅप्लीन नावाचा सिनेमा(docu-drama) हे पुस्तक वाचताना पाहायला मिळाला. हा सिनेमा त्याच्या आयुष्यातील वैयक्तिक घटनांवर, प्रसंगांवर आधारित आहे. Richard Attenborough चा हा सिनेमा चार्ली चॅप्लीनच्या My Autobiography ह्या पुस्तकावर, आणि Chaplin: His life and art ह्या David Robinson च्या पुस्तकावर आधारित आहे. त्यामुळे एका बाजूला हे पुस्तक वाचतोय, आणि मध्येच हा सिनेमा पाहायला मिळतोय हा दुर्मिळ योग जमून आला. आपल्या सर्वांप्रमाणे मीही चार्ली चॅप्लीनचे सिनेमे कित्येक वर्षांपासून परत परत पाहतो. आजकाल युट्यूबमुळे चांगली सोय झाली आहे. चित्रपटाच्या इतिहासातील सुरुवातीच्या दिवसात त्याने निर्माण केलेले, काम केलेले हे सिनेमे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. हसवता हसवता डोळ्यातून पाणी आणणारे, जीवनातील विदारक सत्य मांडण्याचे त्याचे कसब हे वेगळेच होते. पण त्याचे स्वतःचे आयुष्य, त्याचा जीवनपट वाचला तर तो माणूस म्हणून कसा होता, कसा घडला हे समजते.

Charlie Chaplin Charlie Chaplin
चार्ली चॅप्लीन ह्या विषयावर साहजिकच कित्येक पुस्तकं आहेत(ह्या पुस्तकात देखील परिशिष्टात यादी आहे). The Little Fellow ह्या पुस्तकाचे एक वैशिष्ट्य असे आहे की प्रसिद्ध लेखक W. Somerset Maugham याने लिहिलेला लेख(A Writer’s Notebook पुस्तकातील) प्रस्तावना म्हणून यात दिले गेले आहे. चार्ली चॅप्लीन गरिबीच्या दिवसांच्या बाबत असलेला एकूण दृष्टीकोनाबद्द्ल Somerset Maugham लिहितो: One night I walked with him in Los Angeles and presently our steps took us into poorest quarter of the city. There were sordid tenement houses, shabby, gaudy shops in which are sold various goods that the poor by from day to day. His face lit up and buoyant tone into his voice as he exclaimed, ‘Say, this is the real life, isn’t it? All the rest is just sham’. इंग्लंड मधील अत्यंत गलीच्छ वस्तीतील गरीबीतील दिवस, आईचा मानसिक आजार, वडिलांचा अकाली मृत्यू ह्या सर्व गोष्टी त्याच्यावर एकामागून एक आघात करत गेल्या. याबद्दल या पुस्तकात देखील आले आहे.

हे पुस्तक दोन भागात विभागलेले आहे. पहिला भाग त्याचे आयुष्य आणि दुसरे त्याच्या चित्रपटाविषयी लेख असलेले आहे. पुस्तकात बरीच छायाचित्रे तर आहेतच. आणखीन एक वैशिष्ट्य असे की त्याने लिहिलेल्या काही लेखांचे संकलन देखील दिले आहे. त्यातील एक लेख आहे तो त्याच्या चित्रपटातील वेशभूषेवर. त्याची ती मिशी, त्याचा ती ढगळ विजार याबद्दल त्याने लिहिले आहे. अजून एक लेख आहे तो त्याचे तोंडी असलेले The Great Dictator या सिनेमातील ते प्रसिद्ध भाषण(तो त्याचा पहिला बोलपट होता). पुस्तकाच्या पहिल्या भागाच्या पहिल्या लेखात Background to Genius मध्ये, पहिलेच वाक्य चार्ली चॅप्लीन आणि चित्रपट यांचे नाते सांगणारे आहे. १८८९ साली त्याचा जन्म झाला, आणि त्याच वर्षी प्रसिद्ध शास्त्रज्ञ एडिसनने kinetoscope नावाचे यंत्र, ज्याला, ज्याला motion picture camera चा पूर्वज म्हणतात, त्याचा शोध लावला(त्या आधी magic lantern होते). साधारण शंभर वर्षांपूर्वी चार्ली चॅप्लीन याची चित्रपट कारकीर्द सुरु झाली. त्याच सुमारास अमेरिकेत हॉलीवूड मध्ये चित्रपट उद्योग सुरु झाला होता. इंग्लंड वरून अमेरिकेत तो चित्रपटातून काम करण्यास धडकला. आणि बाकीचा सर्वांना माहिती असलेला इतिहास आहे.

चार्ली चॅप्लीन आणि वादविवाद हे सुद्धा समीकरण होतेच, त्याबद्दल ही पुस्तकात आले आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक स्त्रिया आल्या, अनेक विवाह झाले, मोडले, हे तर आहेच. पण इतर गोष्टी देखील आहेतच. जसे की जेव्हा १९१७ मध्ये पहिल्या महायुद्धात जेव्हा अमेरिकेने भाग घेतला, तेव्हा, सैन्यात भरती होण्याची लाट आली होती. असा प्रवाद पसरला होता की चार्ली चॅप्लीनने सैन्यात जाण्यापासून टाळले. पण वस्तुस्थिती तशी नव्हती असे ह्या पुस्तकात नमूद केले आहे, तर त्याची निवड सैन्यात झाली नाही. दुसरे म्हणजे १९५२ मध्ये त्याच्यावर कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य आहे असा आरोप झाला आणि त्याला अमेरिकेच्या बाहेर काढले गेले. आणि तो परत अमेरिकेत कधीच गेला नाही. अमेरिका आणि कम्युनिस्ट पक्ष आणि हॉलीवूड चित्रपट व्यवसायातील लोकांचे त्या पक्षाशी असलेले संबंध या विषयावर मी पूर्वी एक सिनेमा पहिला होता आणि त्यावर लिहिले देखील होते.

जरी हे पुस्तक त्याचे जीवन आणि आणि कार्य अश्या दोन विभागात असले तरी, विशेष असा फरक नाहीच कारण थोड्या फरकाने त्याचे त्याचे कार्य हेच त्याचे जीवन आहे हे होय. दुसऱ्या भागातील एक लेख/प्रकरण ज्याचे नाव आहे Chaplin at Work, त्यात त्याने चित्रपट सृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल असे लिहिले आहे, ‘His contribution to film is immeasurable. Of the pioneers in America, he was the first true creator in the new medium; and the only one to apply , from the beginning, film technique to film craft….With him, the silent film reached its peak’. मला वाटते हेच जाणून घेण्यासाठी, त्याचे आयुष्य जाणून घेण्यासाठी, हे पुस्तक वाचले पाहिजे.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आवडायचा चार्लि चाप्लिन. द किड पाहिला तेव्हा पाचवीत असेन. मजा यायची. शेवटी डिक्टेटर पाहिला तोही धमालच होता.
द्व्यर्थी वाक्याच्या व्यसनातून दादा कोंडके सुटला असता तर तोही आणखी आवडला असता. करमणूक दोघांनी केली.
रस्त्यावर फाउंटनला नकली नसलेली पुस्तके मिळतात पण दिसल्यावर सहज कितीला विचारले तर स्वस्तात मिळते. लेखक/पुस्तकाचे नाव सांगून विचारले की स्वस्त देत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल! सुरुवातीच्या काळातील मूक-चित्रपटांचा तो बादशाह होता हे नक्की. त्याकाळातील इतर प्रसिद्ध कलाकार म्हणजे लॉरेल हार्डी आणि बस्टर कीटन...पुस्तकांवरील पुस्तके असा काहीसा प्रकार असतो, त्यात पुस्तकं, वाचक आणि इतर घटक यांच्याबद्दल रोचक माहिती असते...रस्त्यांवरील पुस्तक विक्रेते आणि त्यांचे जग, व्यवहार हा एक रोचक विषय होऊ शकतो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा ब्लॉग: https://ppkya.wordpress.com

कधीकधी अमुल्य पुस्तक मिळते. घरात पुढल्या पिढीत कुणी पुस्तकप्रेमी निघाला पाहिजे मग मजा येते अन्यथा पुस्तकांचे काय करायचं हा प्रश्न होतो. खुशवंतचे हिस्ट्री ओव सिखिझम दोन भाग शंभर रु मिळत होते तरी टाळले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0