पारुबायची खाज

पारुबायची खाज
पारुबायला एक झ्यांगडी सवय होती!

खाजकुयलीची पावडर स्वतः अंगाला लावायची, आणि 'क्काय खाजवतंय, क्काय खाजवतंय' अशा बोंबा ठोकत, अंगावरचे कपडे काढत, गावभर सुसाट धावायचे!

पारुबाय बोल्ड! तिला मानणारे चिक्कार घोळके होते.

मग काही घोळके, 'बाई इथ्थं खाजवतंय का, तिथ्थं खाजवतंय का?'असं विचारून विचारून तिला विविधांगी खाजवायचे!पारुबायला इतकं बरं वाटायचं! काय विचारू नका.

पण नंतरनंतर घोळक्यांच्या लक्षात यायला लागलं,मायला, हिला खाजवता खाजवता आपल्या हाताबोटांची आग व्हाय लागलीय.मग हळूहळू घोळक्यांनी खाजवायचे थांबवले.तशी पारुबाय जास्त आक्रस्ताळेपणा करू लागली!

गावच्या वेशीवर एक फकीर पडीक असायचा! तो ही नाटकं चिलीम ओढता ओढता रोज पहायचा.

एके दिवशी पारुबाय अशाच बोंबा ठोकत वेशीपर्यंत पोहचली.कपडे काढायची सवयच असल्याने, वेशीपर्यंत पोहचता पोहचता बिचारी पूर्ण विवस्त्र झाली.

त्यात कुणी लक्षच न दिल्याने, आणखी संतापली. तिला वाटले, आता या फकिराने तरी खाजवावे!

फकिराने एक मस्त झुरका मारला, खाजकुयलीची पुडी तिच्यासमोर टाकीत म्हणाला,

'पारुबाय, ही पावडर अशा ठिकाणी लावून घे, जिथं खाजवायला कुणालाच जमणार नाही!'

तेव्हापासून पारुबायचे काय झाले असेल बरे?

-शिव्कन्या शशी

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

रुपक( ललित नसावे) समजले नाही.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

होय, हे रूपक आहे. प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खाजकुयलीची पावडर स्वतः अंगाला लावायची, आणि 'क्काय खाजवतंय, क्काय खाजवतंय' अशा बोंबा ठोकत, अंगावरचे कपडे काढत, गावभर सुसाट धावायचे!

कळले नाही.

म्हणजे, आधी अंगभर खा.कु. ची पा. फासण्यासाठी अंगभरचे कपडे काढायचे (नाहीतर कशी फासणार?), मग फासून झाल्यानंतर ते (किंवा दुसरे) कपडे पुन्हा शांतपणे अंगावर चढवायचे नि मगच गावभर बोंबलत हिंडायचे?

मग फासल्यानंतर कपडे पुन्हा चढवेपर्यंत मध्यंतरीच्या काळातल्या खाजेचे काय?

नि फासल्यानंतर चढवून जर पुन्हा काढायचेच आहेत, तर मुळात फासल्यानंतर पुन्हा चढवायचेच कशासाठी? तसेच नाही गावभर बोंबलत सुटायचे?

आणि मुळात जनतेकडून खाजवून घेण्यासाठी हा जर बहाणाच असेल, तर मग खरीखुरी खा.कु.ची पा. तरी कशासाठी वापरायची? प्लासिबो चालणार नाही काय?

किंबहुना, ज्याअर्थी खा.कु.ची पा. फासून झाल्यानंतर पारूबाय पुन्हा शांतपणे कपडे चढवू शकतात, त्याअर्थी त्या प्लासिबोच वापरत असल्या पाहिजेत, अशी आम्हांस दाट शंका आहे.

इन विच केस, ही जनतेची फसवणूक आहे, लोकांच्या डोळ्यांत धूळफेक आहे. पब्लिक ट्रस्टची प्रतारणा आहे. याची कसून चौकशी झालीच पाहिजे. द पब्लिक वाँट्स टू नो! लोकप्रतिनिधी तथा संबंधित अधिकारी पब्लिकचे पैसे खाऊन डाराडूर झोपा काढण्याऐवजी यात लक्ष घालतील काय?

'पारुबाय, ही पावडर अशा ठिकाणी लावून घे, जिथं खाजवायला कुणालाच जमणार नाही!'

म्हणजे नक्की कोठे? सूर्य जेथे प्रकाशत नाही अशा ठिकाणी?

मुळात कशासाठी? बोले तो, लोक खाजवतात, हाच जर पेबॅक असेल, तर मग अशा ठिकाणी लावण्यात नक्की काय हशील?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे नक्की कोठे? सूर्य जेथे प्रकाशत नाही अशा ठिकाणी?

न बा, तुम्ही सायगन बॉडिगार्ड बघितला नं???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भांबड आलं

तुम्ही सायगन बॉडिगार्ड बघितला नं???

१. नाय ब्वॉ. (हे नक्की काय असते?)

२. का बरे?

(अतिअवांतर: 'जेथे सूर्य प्रकाशत नाही तेथे' हा माझ्या कल्पनेप्रमाणे एक सामान्य अमेरिकी वाक्प्रचार आहे. त्याच्या उगमाबद्दल मला कल्पना नाही. मात्र, चपखल आहे, एवढे निश्चित. Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रुपक असेल तर ठीक आहे. नाहीतर खाजकुयलीची पूड वा शेंग कधी अंगाला लावून पाहिली आहे ? इतकी भयानक खाज सुटते की सहन होत नाही. असे असताना, निव्वळ लोकांनी खाजवावे म्हणून कोणीही असा प्रकार एकदा सुद्धा करायला धजावणार नाही, वारंवार तर सोडूनच द्या!

बाकी रुपक कसलं ते कळलं नाहीच, ते कळेपर्यंत मनाला खाज येतच रहाणार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोणी अजून विचारलं नाही की फकिराने खाजकुईलीची पुडी कशाला बाळगली होती.

कारण ते पोटदुखीवर ( खय्रा) औषध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही पारूबाई बरीच प्रामाणिक म्हणायची की

निदान ती तिच्या खऱ्या त्रासासाठी सहनुभूतीचा जोगवा मागतेय .. मग भले तो त्रास तिने आपणहून ओढवून घेतला असेना ...
आणि त्यातही आगीत तेल ओतणारा तो फकीर .. म्हणजे आनंदी आनंदच की.
काही लोकांना कश्शात काहीच्चं नसताना बोंबा मारायची
कांगावा करण्याची वाईट खोड असते. त्या पेक्षा हे बरच बरं की.
काय म्हणता?

*** खाजवतय च्या जागी खाजतय असं हवं ना?
खाजवणे ही क्रिया आहे . खाजणे अथवा खाज सुटणे असा शब्दप्रयोग आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

'ऐसी' ला साजेसे प्रतिसाद दिलेत, धन्यवाद.
ही रूपक कथा, झुंड प्रवृत्ती बद्दल बोलते.
रूपक कथा असल्याने, वाचक आपल्या बुद्धी बळानुसार वेगवेगळे अर्थ काढू शकतात. तेच कोणत्याही रूपक कथेचे यश असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0