कॅरीकेचर

मागे एकदा मित्रांसोबत देव असलाच तर तो आर्टिस्ट असेल का इंजिनीअर या विषयावर एक रिकामी चर्चा झाली होती. रिकामी अशासाठी की अशा चर्चांमधून काही एक ठोस निष्कर्ष निघणं अशक्यच असतं. पण त्या निमित्ताने याबाबतीत थोडंफार वाचन झालं. त्यात व्ही.एस. रामचंद्रन आणि विलियम हर्स्टीन नावाच्या दोघांनी लिहिलेला एक इंटरेस्टिंग रीसर्च पेपर वाचनात आला. त्याच्यात त्या दोघांनी कलेच्या ८ वेगवेगळ्या पैलूंवर चर्चा केलेली आहे. खरं तर कलेपेक्षा, कलेचा माणसाच्या मनावर जो परिणाम होतो त्याचे ८ पैलू त्यात सांगितले आहेत असं म्हणणं अधिक योग्य ठरेल. हे ८ पैलू देव आर्टिस्ट आहे का इंजिनीअर हे ओळखायला मदत करतात का असा विचार मी चालू केला.(मी माझ्या कामाच्या ठिकाणाहून बराच लांब राहतो, त्यामुळे येता जाता बस मध्ये मला दुसरं काही करायला नसतं)

इंग्रज जेव्हा पहिल्यांदा भारतात आले तेव्हा देवळांच्या भींतींवर चितारलेल्या शिल्पकला पाहून त्यांना धक्का बसला. वाईट अर्थानं. त्या मूर्तींची ॲबनॉर्मली लुकडी कंबर, फुगलेली स्तनं आणि बाहेर आलेले पार्श्वभाग पाहून त्यांनी नाकं मुरडली. स्त्रियांना या अशा अवस्थेत चितारण्यामागे काय लॉजिक असेल याचं उत्तर आपल्या संस्कृतीय दडलेलं आहे. 'रस' असा शब्द भारतीय कलाविषयक अनेक पुरातन पुस्तकांमध्ये वारंवार वापरला जातो. रस म्हणजे इसेंस. एखाद्या संकल्पनेचा मूळ गाभा. आपली बरीच शिल्पकला या रसाभोवती रचलेली आहे. इंग्रजांना न आवडलेलं शिल्प हे 'स्त्री-देहाचा रस काय?' या प्रश्नाचं उत्तर आहे. या कंसेप्टकडे अगदीच सायंटिफिकली पहायचं असेल तर इमॅजीन करा की तुमच्याकडे एका ॲव्हरेज पुरुषाचा देह आणि एका ॲव्हरेज स्त्रीचा देह आहे. आता तुम्ही पुरुषाचा देह स्त्रीदेहातून मायनस केलात तर काय उरेल? अर्थातच लुकडी कंबर, आणि जरासे फुगीर स्तन आणि पार्श्वभाग. हा झाला स्त्रीदेहाचा इसेंस. शिल्पकार या रसाचं शिल्प बनवताना मुद्दामहून या रसातले फीचर्स एक्झॅजरेट करतो.(कंबर आणखी लहान केली जाते वगैरे) थोडक्यात काय तर भारतीय शिल्पकार एखाद्या संकप्लनेचा रस ओळखतात आणि तोच रस ॲंप्लीफाय करून आपल्यासमोर ठेवतात.

इथपर्यंत तर सगळं ठीके पण आणखी खोलात जायचं तर मुळात हे रस काढून ॲंप्लीफाय केलेले कलाप्रकार आपल्या मेंदूला चांगले का वाटतात या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. याचं उत्तर मिळवायचं असेल तर संशोधकांनी केलेला एक प्रयोग आपल्याला अभ्यासावा लागेल. त्यांनी काही उंदरांना चौरस आणि आयत यांच्यामधला फरक ओळखण्यासाठी ट्रेन केलं. उंदरांनी आयत बरोबर ओळखला की त्यांना काहीतरी बक्षीस दिलं जात असे. मग आपोआपच त्यांना आयत दाखवला गेला की ते एक्साईट होऊन काहीतरी रीस्पॉंस देतात. गमतीचा भाग असा की त्यांना खूप निमुळता, म्हणजे ज्याची लांबी ही रूंदीपेक्षा खूप जास्त आहे असा, आयत दाखवला तर ते अधिक स्ट्रॉंगली रेस्पॉंड करतात! या प्रयोगाची आणि आधीच्या पॅरामध्ये सांगितलेल्या शिल्पांची सांगड कशी घालायची?

सोपंय. आपला मेंदूमध्ये एक व्हिज्युअल सिस्टीम असते. आपल्या डोळ्यांमधून जी चित्र मेंदूकडे जातात त्यांचा अर्थ लावण्याचा काम ही सिस्टीम करते. मनुष्यदेह, मग तो स्त्रीचा असो वा पुरुषाचा, ओळ्खणारं एक सर्कीट ह्याच सीस्टीममध्ये कुठेतरी असतं. हे सर्कीट मेंदूच्या आणखी एका अतरंगी सिस्टीमला जोडलेलं असतं. या सिस्टीमचं नाव म्हणजे लिंबीक सिस्टीम. आपल्या मनात ज्या भावना उमटतात, त्या भावनांसाठी ही सिस्टीम जबाबदार असते. आता देह ओळखणारं सर्कीट हे भावना उद्दीपीत करणाऱ्या सिस्टीमला का जोडलेलं असावं? कारण देह दिसला की मनात भावना उमटणं हे आपल्या सर्व्हायव्हलसाठी आवश्यक होतं आणि असतं. अशा भावना नेहमी इरॉटीक किंवा सेक्ष्युअल असतीलच असं नाही. एखादा धष्टपुष्ट देह पाहून भीती किंवा लुत भरलेला देह पाहून दया असंही मनात उमटू शकतं. थोडक्यात त्या सर्कीटचं लिंबीक सिस्टीमशी कनेक्षन आहे ही बाब महत्वाची. आता समजा या सर्कीटने असं रस काढून ॲंप्लीफाय केलेला देह ओळखला तर काय होईल? लिंबीक सिस्टीम ही निमुळता आयत पाहिलेल्या उंदारासारखी अधिक स्ट्रॉंगली उड्या मारू लागेल आणि त्यामुळे आपल्याला अचानक मनात खूप भावना उमटत असल्याचा अनुभव येईल.

हे फक्त देहाबाबतीतच खरं आहे का? तर नाही. आपल्या मेंदूत पोश्चर ओळखणारं एक सर्कीट असतं. हे सर्कीटही लिंबिक सिस्टीमला जोडलेलं असतं. का? पुन्हा तेच. मी जर तुमच्याकडे शस्त्र परजून धावत येऊ लागलो तर माझं हे पोश्चर पाहून तुमच्या लिंबिक सिस्टीमने तुम्हाला भीती वाटवणं आवश्यक आहे. भारतीय शिल्पांचा अभ्यास केला तर आपल्याला अशी पोश्चर एक्झॅजरेट केलेली शिल्पं खूप सापडतील. प्रथमदर्शनी 'काय वाकडंतिकडं केलंय' असं वाटलं तरी आता त्यामागचं कारण समजणं अवघड जाऊ नये. पोश्चरप्रमाणेच, रंगामध्ये एक्झॅजरेशन केलेली पेंटींग्जही खूप सापडतील.

बर. या सगळ्याचा देवाशी आणि त्याच्या आर्टिस्ट किंवा इंजीनीअर असण्याशी काय संबंध आहे? सांगतो. कल्पना करा की देव हा खरंच आर्टिस्ट आहे आणि आपलं जग हा त्याने रचलेला कलाप्रकार आहे. आता अर्थातच, आपण त्या जगाचाच भाग असल्यामुळे आपण या कलाप्रकाराचा ऑडीयंस नाही, आणि तो कोण आहे याबद्दल आपल्याला काही माहिती मिळणंही तसं अशक्यच आहे. मग वर जे काही इतकं विवेचन झालं त्यामध्ये आपलं जग कुठे बसतय का याचा विचार करणं हा एकच मार्ग आपल्याकडे उरतो. म्हणजे प्रश्न असा आहे की आपलं जग हे कुठल्यातरी संकल्पनेचं रस काढून ॲंप्लीफाय केलेलं स्वरूप आहे का? यातही, ती संकल्पना काय हे आपल्याला समजण्याची शक्यता शून्य. पण आपल्या जगात अशा ॲबनॉर्मली एक्झॅजरेट केलेल्या काही गोष्टी आहेत का हे मात्र आपण नक्की तपासू शकतो.

टर्न्स आऊट, आपल्या जगात अशा ॲटलीस्ट दोन गोष्टी आहेत. पहिली म्हणजे ॲंटी मॅटर आणि दुसरी म्हणजे डार्क मॅटर. या गोष्टींबद्दल अधिक लिहिणं जागेच्या मर्यादेमुळे शक्य नाही पण एवढंच सांगतो की ॲंटी मॅटर हे आपल्या नेहमीच्या मॅटरच्या तुलनेत खूप खूप म्हणजे खूपच अल्प प्रमाणात आहे, आणि डार्क मॅटर दिसत नसलं तरी ते फार मोठ्या प्रमाणात आस्तित्वात असल्याचे पुरावे संशोधकांना मिळाले आहेत. गूढ बाब अशी की ॲंटी मॅटर इतकं कमी का आहे आणि डार्क मॅटर इतकं जास्त का आहे याचं कुठलही ठोस किंवा कंव्हिंसिंग उत्तर आज आपल्याकडे नाही.

हे खरंच असं असेल का? आपलं जग हे एखाद्या दुसऱ्याजगातला कलाप्रकार असेल? कल्पना भीतीदायक आणि अनसेटलिंग आहे. मानवी मनाची स्वत:लाच इनसिग्निफिकंट वाटवून घेण्याची क्षमता मात्र अगदीच वादातीत आहे यात शंका नाही!

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

मॅटरचा कॅरिकेचरशी लावलेला संबंध जमला आहे थोडाफार. बाकी ब्रिटिशांच्या कल्पनेतली स्त्री समजायला काही मार्ग नाही दघडधोंड्यातला- स्टोनहेंजचं माहित नाही. फार विचार करून बय्राच ब्रिटिशांचे गाल पोकचे होतात असं मला लहानपणापासून वाटायचं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पूर्वी साधे IR लॅब मधे असायचे. त्यानंतर FTIR आले. त्यांत दोन IR , एकमेकांतून मायनस करुन उरलेले पिक्स बघण्याची सोय आली. त्यामुळे एखाद्या केमिकल रिॲक्शनमधे काय बदल झाले, ते बघणे सोपे झाले. तुमचीही मानवी आकृत्या एकमेकांतून वजा करण्याची आयडिया मला तशीच वाटली.
तुमची थिअरी पटो वा न पटो, तुमच्या मेंदूला मात्र कुठल्याच् बॉक्सची आडकाठी नसावी, त्यामुळेच तुम्ही एवढा 'आऊट ऑफ द बॉक्स' विचार करु शकता, म्हणजेच तुम्ही उच्च श्रेणीचे आर्टिस्ट आहात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

आता तुम्ही पुरुषाचा देह स्त्रीदेहातून मायनस केलात तर काय उरेल? अर्थातच लुकडी कंबर, आणि जरासे फुगीर स्तन आणि पार्श्वभाग. हा झाला स्त्रीदेहाचा इसेंस. शिल्पकार या रसाचं शिल्प बनवताना मुद्दामहून या रसातले फीचर्स एक्झॅजरेट करतो.(कंबर आणखी लहान केली जाते वगैरे) थोडक्यात काय तर भारतीय शिल्पकार एखाद्या संकप्लनेचा रस ओळखतात आणि तोच रस ॲंप्लीफाय करून आपल्यासमोर ठेवतात.>>>
असं असेल तर पुरुषांची शिल्पं बनवताना पुरुष देहातून स्त्रीदेह मायनस करून भल्यामोठ्या दाढ्या, मोठी लिंगे आणि वृषण्स आणि भलामोठा मेंदू असलेली पुरुष-शिल्पं सुद्धा दिसायला हवीत ना???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Liberalism is a mental disorder

कलाकार/चित्रकार/फोटोग्राफर यांनाच नेहमी हा प्रश्न पडतो की अमुक एकाची कला का वाखाणली जाते? आम्हीही अशाच कलाकृती करण्यात आयुष्य घालवले. मग ते या नावाजलेल्या कृतींची रिकी/पोस्टमार्टेम/FTIR/ स्टटिस्टिकल डिसेक्शन करून काप्या मारतात. म्हणजे तसा शोध सतत चालू असतो. सर्वांनाच आपल्यात दडलेला एमेफहुसेन/पिकासो/माति{स}/ माइकल अंजेलो बाहेर काढायचा असतो.
पण खरा कलाकार कल्पनांच्या ढगात असतो. मी तर रोजच समुद्रावर फिरायला जातो मग मला कसा असा चांगला शंख सापडला नाही हा सल कायम राहतो. जव्हारचा एक वारली चित्रकार. त्याची कला ओळखून परदेशी पर्यटकांनी त्यास पन्नास देश फिरवून आणल्यावर आम्हास माहित झाला. तोपर्यंत आम्ही बेरीज वजाबाक्या अन नकलाच करत राहिलो. त्या चित्रकाराने आयुष्यात प्रथमच रेल्वे, विमान , हेलिकॉप्टर पाहून त्याला वारली रूप दिले तेव्हा डार्क आणि व्हाइट मॅटरचा फरक समजला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबल पोस्टिंग काढले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0