आयायटी, दक्षिणा आणि MCPपणा

एके काळी अनेक मित्र-मैत्रिणींच्या घरी मी आणि भाऊ एकत्र जायचो. कधी जेवायच्या वेळेस असलो, तर त्या घरचे लोक जेवायला घालायचेच. काही घरांमध्ये भावाला बारकी दक्षिणाही मिळायची.

मला पैशांबद्दल असूया नव्हती, पण मला मान का नाही मिळत! एका जवळच्या मित्राच्या घरी भावाला पैसे मिळायचे; त्याच मित्राला विचारलं. तो म्हणाला, "तुला आता लग्न झाल्यावरच दक्षिणा मिळेल." मित्रही ओवाळून टाकलेला. आम्ही दोघं हसलो.

हा मित्र आयायटीमध्ये शिकलाय.

साधारण वर्षभरापूर्वी मला ही गोष्ट आठवली आणि मी मनातल्या मनात हसले. ही गोष्ट आठवण्याचं कारण, सोना मोहपात्राला IIT-B नं सांगितलं, तुला जेवढे पैसे हवेत तेवढे द्यायचे तर सोबत एक पुरुष सहकलाकार आण.

त्या बातमीचा हा दुवा तेव्हा माझ्या फेसबुक भिंतीवर डकवला होता. तिथे बारकी चर्चा झाली. स्त्रीवाद म्हणजे काय, याबद्दल बहुदा काहीही वाचन न केलेल्या, नुकत्या मिसरूड फुटलेल्या तरुण, तडफदार आयायटीयनानं मला 'हा स्त्रीवाद नाहीच' असं बाणेदारपणे बजावलं होतं. पुरुषांनी बायकांना 'स्त्रीवाद म्हणजे काय' हे शिकवायला जाऊ नये, असं मत मला फुटायला सुरुवात झाली ते याच नवतरुणाच्या तडफदार बाण्यामुळे.

आयायटी-बीचं तेव्हाचं म्हणणं - “IIT-Bombay is the last place where you would encounter sexism."

ट्रंपुलीसुद्धा म्हणतेच की, मी स्त्रियांचा जेवढा मान राखतो तेवढा इतर कोणीच राखत नाही. तेव्हा तर ट्रंपुली नुकतीच निवडून आलेली होती. आयायटीला शब्द शोधणंसुद्धा सोपं झालं असेल.

फक्त (मुंज झालेल्या ब्राह्मण) पुरुषांना दक्षिणा ठेवणारी माझ्या मित्राची आई गोड आहे; त्या ही असली बडबड करत नाहीत. त्यांचं वागणं स्त्रीद्वेष्टं आहे, याची त्यांना जाणीवही नसेल. एक सामान्य व्यक्ती म्हणून त्यांना ही जाणीव नसणं खपवून घेता येतं. मनुष्य म्हणून त्यांनी कोणाचाही अपमान, अवमान केल्याचं मला दिसलेलं नाही; ना कोणी त्यांच्याबद्दल असं कधी काही म्हटलेलं.

आयायटी-बी ही मात्र सामान्य व्यक्ती नाही; तिला सामान्य संस्था म्हटलं तर किती लोकांच्या भावना दुखावतील आणि किती विदा माझ्यासमोर ओतली जाईल! आपल्या संस्थेत जे वर्तन चालतं ते अतिशय हिडीस ते थोडक्यात स्त्रीद्वेष्टं असलं काही असतं, याची जाणीव आयायटी-बीला आहे असं वाटत नाही. आपण थोर संस्था आहोत, असं मिरवणाऱ्या संस्थेबद्दल मात्र कालच हा लेख वाचनात आला.
At IIT-Bombay, your day starts with casual sexism and ends with chauvinism

तर या बातमीवरून मला सोना मोहपात्रा आठवली. आयायटीत शिकलेले माझे परिचित, स्नेही, एक्स, मित्र आठवले. तिथल्या मुलींना 'नॉन मेल' म्हणतात हे याच लोकांनी मला सांगितलेलं. "तू असतीस तर तुला नसतं नॉन-मेल म्हटलं", अशीही 'प्रशंसा' कानावर आलेली. माझ्या नोकरी शोधण्यावरून 'तुला स्कर्ट फॅक्टरचा फायदा होईल' असं म्हणणारा आयायटीय मित्र आठवला. काय न् काय!

भरतवाक्य पुन्हा एकदा - आपलं वर्तन हिडीस आहे, किंवा स्त्रीद्वेष्टं आहे, किंवा स्त्रियांना कसलाकसला त्रास होतो हे पुरुषांना समजतही नाही. आपल्याला समजत नाही, हेसुद्धा बहुतेकांना समजत नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

कल्पनेच्या भराऱ्या घेतलात की तुम्ही , आता अजून कुठल्या पंख मोकळे करायचे स्त्रीवादाचे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

स्त्रियांनाही जरुर दक्षिणा घालावी, याला माझे पूर्ण अनुमोदन आहे. त्यांनीही जानवे घालून जेवावयास बसावे, चित्रावती घालाव्या आणि जेवायच्या शेवटी मोठ्ठा ढेकर देऊन 'अन्नदाता सुखी भव', असे म्हणावे, हे पहाण्याची माझी लहानपणापासूनची इच्छा आहे!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे असं काही माझ्या भावानं केलं तर मी त्याला टाकेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

दक्षिणा देऊन बोळवण केली असं म्हणण्याचा प्रघात आहे. याचे कारण माझ्या समजुतीनुसार -
१) बोळवण = कटवणे. स्त्रियांना कुणी कटवत नाही
२) मुंज झाल्यावर तो पुजाविधि करणारा ब्राम्हण होतो आणि देवासाठीचे दिले जाणारे अन्न,वस्त्र,धन त्यामार्फत पोहोचते ही कल्पना.
३) दक्षिणा ही त्या पुरुषाला नसते ते एक माध्यम आहे.
४) बोडण नावाच्या एका विधित कुमारिकेस दक्षिणा मिळते.
५) नॅान-मेल हा शब्दप्रयोग बोंगाली लोकांनी काढला असावा असा दाट संशय आहे. त्यांच्या मते खोरोगपूर आयआयटी सर्वात अव्वल आहे. तिथे काही नानमेलांनी प्रवेश घेतल्याने त्यांना इकडे यावे लागले आहे.
६) मी काही कार्य करणारा असतो तर प्रत्येक मुलामुलींना दक्षिणा दिली असती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"बोळवण = कटवणे. स्त्रियांना कुणी कटवत नाही" असे तुम्ही वर म्हटले आहे. हा अर्थ ठीक दिसत नाही. 'बोळवण'चा मोल्सवर्थने दिलेला अर्थ "The ceremonious conducting or bringing on his way a departing guest or friend, by accompanying him for a short distance, seeing off" असा आहे. हाच अर्थ शाळेत शिकलेल्या पुढील श्लोकामध्येहि आहे:


हरीच्या घरी शेवया तूपपोळ्या
हरी वाढितो ब्राह्मणा वेळोवेळा |
असे ब्राह्मण जेउनी तृप्त झाले
विडा दक्षिणा देउनी बोळवीले ||

"भरतवाक्य पुन्हा एकदा - आपलं वर्तन हिडीस आहे, किंवा स्त्रीद्वेष्टं आहे, किंवा स्त्रियांना कसलाकसला त्रास होतो हे पुरुषांना समजतही नाही. आपल्याला समजत नाही, हेसुद्धा बहुतेकांना समजत नाही." हे पटले पण विक्षिप्यतबाईंना आता दक्षिणा मिळवायची हौस उरली नसावी असे वाटते. आम्हालाहि कोणी दक्षिणा देत नाही. किंबहुना मला स्वत:ला ६०-६५ वर्षांपूर्वी मित्रांकडे शनिवारचा ब्राह्मण म्हणून अथवा मित्रांच्या मुंजीत अष्टवर्ग बटूंपैकी एक म्हणून जी काय दक्षिणा मिळाली असेल ती अखेरचीच. तदनंतर कोणीच मला दक्षिणा दिल्याचे आठवत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The ceremonious conducting or bringing on his way a departing guest or friend, by accompanying him for a short distance, seeing off

पूर्वीची बहुतेक घरं , मेन रोडवर नसायची. पुण्यामधे बोळ खूप. ब्राह्मणही खूप. त्यामुळे ब्राह्मणांना सन्मानाने जेऊ घालून नंतर बोळाच्या टोकापर्यंत सोडून येणे, यालाच 'बोळवण' म्हणत असतील का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"यथोचित आदरसत्कार पाहुणचार करून पाठवणी" याचा विनोदी टोकाचा अर्थ रूढ झाला भाषेमध्ये.
दुसरे उदा० "तुमचे चिरंजिव ~~~"
= उपदव्यापी लेक असा अर्थ असतो बोलण्यात. मोव्सवर्थास काय ठावे की पुढे असे कुलदिपक अवतरतील?

अदितीचे लेख अधुनमधून विनोदाचे झरे फोडण्यासाठीच असतात असे अमचे ठाम मत आहे.
बाकी आता कोशांतील शब्द खय्रा अर्थाने वावरतील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

2018 मध्ये दक्षिणा मिळाली नाही म्हणून स्त्रीवाद. हजार वर्षभराची दक्षिणा पुरली नाही का ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

हजार वर्षभराची दक्षिणा पुरली नाही का ?

???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

जय परशुराम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

स्त्रियांना वाण देतात अथवा त्यांची खणानारळाने ओटी भरतात. आणि माझ्या आठवणीनूसार सवाष्णी सोबत कुमारीका असेल तर तीलाही काही वस्तु (काचेच्या बांगड्या, गजरा इ.) अथवा पैसे देतात. अर्थात त्याला दक्षिणा म्हणत नाहीत.

पण स्त्रिया/ मुलींची पंगत शेवटची ही प्रथा अन्यायकारक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

सवाष्ण आणि कुमारिकांना मिळणारे वाण हे पुरुषांना मिळणाऱ्या दक्षिणेशी इक्विव्हॅलंट समजणे* हे उदाहरणार्थ थोर आहे.

* इथे आधी समाजाने असं दिसत होतं त्याची दुरुस्ती केली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला नाही वाटत तसं .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

शिवल्रीलामृताला प्रतिशब्द म्हणून स्त्रीदाक्षिण्य हा शब्द योजला जाण्यामागे हेच तर कारण नसावे? Smile

बाकी भरतवाक्यावरून अशीच काही उच्चशिक्षित उदाहरणं आठवून गेली.

अवांतर: नॉन-फिमेल्सना 'अनार' म्हणून माफक सूड उगवता यावा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्रीदाक्षिण्य दाखवतात,देत नाहीत.

दक्षिणा दिल्याने पुण्य लाभते असं पुराणांत/ पोथ्यांत नसतं तर चाराणेही मिळाले नसते.

जैनांचा असा समज आहे की मागील जन्यातल्या कुकर्माला नष्ट करण्यासाठी दहा टक्के दानधर्म करा आणि या आयुष्यात चांगले कर्म गाठीस बांधा. कर्मसिद्धांत दोन्हींत आहे. पण इकडे दक्षिणा देऊन निरनिराळी पुण्य घेण्याची सोय आहे. पितरांनाही हातखर्चाला पैसे पोहोचतात.
या सर्वांशी पुरुष / स्त्री भेदभाव नाही. स्त्रिया कर्मकांड/ विधि करत करत नसल्याने त्यांना दक्षिणा मिळत नाही. करत असत्या तर त्यांनाही हक्क पोहोचला असता.
थोडक्यात दक्षिणा पुरुषांनाच का हा मुद्दा असेल तर.

कुमारिकांना आईसह दान,वाण मिळण्याचे कारण लाक्षणिक समृद्धी ही कल्पना. ती दात्यास मिळेल ही भावना. इथे पुरुष तोकडे पडतात.
इहलोकातील प्राप्ती - स्त्रीला तुष्ट करणे,
पूर्व/उत्तर लोकातील काल्पनिक आरक्षण - दक्षिणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दक्षिणा किती मिळाली आणि कुणाची ओटी कशानं भरली, हा मुद्दा नव्हता आणि नाही. एखाद्या व्यक्तीला पैसे किंवा वस्तू देण्याएवढी त्या भावाची किंमत आहे आणि आपली नाही; किंवा एक बाब्या सोबत आणल्याशिवाय आपल्याला पारंपरिक समाजात किंमत नाही हा त्यातला मुद्दा आहे.

लहान वयात, पाळी न आलेल्या कुमारिकेला किंमत आणि तिच्या भावाला नाही; मात्र पाळी आली तोवर (ब्राह्मण) भावाची मुंज होते आणि मग तो मरेस्तोवर "मौल्यवान" आणि मुलीचं मात्र लग्न करून, सधवा असेस्तोवरच भाव देण्याजोगी, हा सगळा प्रकार अत्यंत जुनाट, पुरुषप्रधान मानसिकतेचा आहे. याच दक्षिणा देणाऱ्या घरांमध्ये, साधारण वडलांच्या वयाच्या मित्रालाही दक्षिणा मिळाल्याचं कानावर आलं होतं. गेलाबाजार, दक्षिणा नाही दिली तरी 'ब्राह्मण घरी जेवला' म्हणून ७५-८० वयाच्या म्हातारीनं 'ब्राह्मणा'ला वाकून नमस्कार करणं (आणि त्या मित्राला लाज वाटणं); हा प्रकारही या अठरापगड मैत्रमंडळात बघितला होता.

हे सगळे गेलाबाजार, जुनाट प्रकार आयायटीमुळे आठवले; आणि हसायला आलं. त्या काळात लोकांना हे प्रकार अन्यायकारक वाटत नव्हते. आणि 'पुरुष कलाकार सोबत आणलास तरच तुला एवढे पैसे देऊ', हे सोना मोहपात्राला सांगणं आयायटीला अगोचरपणाचं वाटलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्या काळातच कशाला?
अजूनही असल्या प्रथा कसोशीने सांभाळल्या जातात. त्यात कुणालाच काही गैर/अक्षेप घेण्याजोगे काही वाटत नाही. आणि त्यात स्त्रियांचा पुढाकार असतो हे विशेष. याला मानसिक गुलामगिरी म्हणावे काय?

स्त्रियाना नेहमीच दुय्यम स्थान दिले जाते आणि त्यांची पदोपदी उपेक्षा केली जाते हे नेहमीच पाहिलेले, अनुभवलेले आहे.
पुरूषांची "दादागिर्री", भारताचे यान मंगळावर पोहोचले तरी संपत नाहीये.
हे दुर्दैवी वास्तव आहे यात कसलीच शंका नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

आता हळदीकुंकवात सधवेलाच निमंत्रण आणि विधवेला तो मान का नाही हा ही विषय अदितीबाईंकडून लेखरूपात येण्याचा दिवस नियती आम्हांस दाखवणार की काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नुसता स्त्री-पुरुष हाच भेदभाव चालतो असे नाही, तर सवाष्ण स्त्री आणि वांझ स्त्री असाही भेदभाव केला जातो.
विंध्या नैव विजानाति गुर्वीं प्रसववेदनाम्
या श्लोकातही वंध्य स्त्रीला हिणवले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अदिती,मनीषा तुमचा मुद्दा समजला आहे. हा समाजाचा नीचपणा म्हणण्यापेक्षा "पुण्य गोळा करण्याचे शंभर उपाय जे पुराणपोथ्यात सांगितले आहेत त्याचा लोभही कारणीभूत आहे.
मी लहानपणीच पाचवीसहावीतच आमंत्रणं नाकारली आहेत. "तुमचं पुण्य तुम्हीच गोळा करा" सांगून.

सधवा/विधवा प्रकार अशावेळी आला जेव्हा रुद्धा लढायांत बरेच लोक मरत होते हे विशेष.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0