मुले आणि आपण आणि संगीत/वाद्य साक्षरता वगैरे वगैरे

एक मार्च रोजी संध्याकाळी आमच्या साऊंड कार्ट ( मूळ पोलिश नाव देवनागरी मध्ये लिहिणं फारच मुश्किल आहे ) चा परफॉर्मन्स झाला. यामध्ये खरं तर एक ते सव्वा तासामध्ये आम्ही दोन कथा ( परीकथा म्हणता येतील अशा, आणि या दोन्ही इटालियन आहेत) सादर करतो. सादर करतो म्हणजे त्या कथा संगीतातून सांगण्याचा प्रयत्न करतो , त्याला कथेचं musical interpretation असंही म्हणता येईल. माझ्या मनात ही कल्पना फार आधीपासून होती. आणि यामध्ये पूर्ण अंधारात हा प्रयोग करावा असा माझा मूळ इरादा होता. पूर्ण अंधारात यासाठी की ऐकण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित व्हावं. भारतीय आणि पाश्चात्य समाजात एक फार महत्वाचा फरक मला जाणवतो तो म्हणजे भारतीय मनुष्याचा कान खूप तयार आहे तर पाश्चिमात्य समाजाचा डोळा किंवा नजर! मात्र ही नजर पुष्कळ वेळा संगीत पूर्णपणे ऐकण्यात अडथळा ठरते , ठरू शकते , असा माझा अनुभव झाल्यावरून अंधारातली अशी मैफल करून पाहण्याचं माझं ठरलं आणि त्याप्रमाणे ऑक्टोबर च्या महिन्यात आम्ही याचा एक प्रयोग केला, आणि त्या प्रयोगातून काही गोष्टी नवीन शिकून त्यावर नवीन काम करून मग एक मार्चचा प्रयोग सादर केला. प्रयोगात एका झिरझिरीत अर्धपारदर्शक पडद्यामागे आम्ही बसलो होतो आणि अधून मधून आमच्या आणि वाद्यांच्या सावल्या त्यावर पडत होत्या, प्रेक्षकांना आम्ही अधून मधून , अर्धे मुर्धे दिसत होतो आणि तरीही दिसत नव्हतो. मुळात आमचा हा परफॉर्मन्स जास्त करून मुलांसाठी असल्याने ( ९/१० वर्षाच्या पुढे) त्यात काहीतरी दृश्य तत्व असणं हे गरजेचं होतं. प्रयोग मुलांच्या शाळेत होता आणि यात आम्ही एकच कथा ( अवधी ३५-४० मिनिटे) वाजवली. कथेचं नाव -साप ! यात अर्थातच मुलांना ही कथा आधी सांगितली नाही. त्यांना संगीत ऐकून जी चित्रं दिसतील, जी कथा जाणवेल ती त्यांनी मनात ठेवावी/त्याची स्केचेस करावीत/जमलं तर छोट्या नोट्स काढून ठेवाव्यात अशा सूचना आधीच देऊन ठेवल्या होत्या. हा प्रयोग आम्ही तिघे वाजवतो , मी , एरीक आणि प्योत्र ! प्रयोगानंतर आधी थोडा वेळ मुलांबरोबर चर्चा , त्यांना दिसलेली गोष्ट समजून घेणे आणि त्यानंतर प्रत्येकाबरोबर स्वतंत्रपणे वेगवेगळी वाद्ये पाहणे , ती हाताळणे असं एक वर्कशॉप आयोजित केलं होतं. तर त्याप्रमाणे प्रयोग सुरु झाला. हॉल च्या पुढच्या भागात मुलांसाठी जाजम टाकलं होतं आणि मागे त्यांच्या पालकांसाठी खुर्च्या!! प्रयोगात सुरुवातीला थोडा वेळ शांतता होती , नंतर मात्र काही मुलं गडबड करू लागली. अर्थात आमच्या प्रयोगात काही आवाज फारच विनोदी आहेत, त्यात आम्ही लहान मुलांची खेळणी देखील वापरतो. तेव्हा काही ठिकाणी मुलांना मजा वाटणं, त्यांना हसू येणं हे गृहीत धरलं होतंच, पण मुलं काल जास्तच गडबड करीत होती. त्यांचे पालक तिथे होते तरी पालकांनी त्यांना शांत बसवलं नाही. Sad आमच्या कहाणीचा उत्तरार्ध आम्ही किंचित लवकर संपवला कारण श्रोते जरा जास्तच आवाज करू लागले होते. ३५ मिनिटं झाली, कार्यक्रम संपला. झिरझिरीत पडदा दूर झाला , आता आम्ही मुलांशी बोलू लागलो. त्यांना यात कोणती कथा दिसली , कथेत कुठली आणि किती पात्रं होती , कुठल्या प्रकारच्या घटना होत्या, कुठल्या इमोशन्स होत्या अशा आमच्या प्रश्नांवर त्यांनी आश्चर्यकारक पणे खूपच भारी उत्तरं दिली. एकूण गप्पा मारल्यावर लक्षात आलं की ही गडबड करणारी मुलं संगीत मात्र ऐकत होती आणि त्यातून त्यांना काहीतरी दिसत होतं, जाणवत होतं हे नक्की! मूळ कथेत तीन बहिणी आहेत आणि एका ( अर्थातच चांगल्या ) बहिणीचे डोळे काढणे , हात कापणे असे -हॉरर -प्रसंग होते. डोळे काढण्याच्या सीन साठी प्योत्र माईक जवळ अडकित्त्याने अक्रोड फोडतो आणि मी ओरडतो , विव्हळतो वगैरे ! पण चर्चेत हळू हळू जेव्हा मुलांना समजलं की मूळ कथेत स्त्री ओरडते, तर मुलं म्हणाली की आमच्या परफॉर्मन्स मध्ये मात्र पुरुष ओरडल्यासारखा वाटतो, ते ओरडणं स्त्री चं यायला पाहिजे. हा मुद्दा खूपच दिलचस्प आणि महत्वाचा होता आणि पुढल्या प्रयोगात यावर काम करणार आहे Smile

पुढचा सेक्शन वर्कशॉप: प्योत्र मुलांना अनेक छोट्या गोष्टी दाखवून त्यापासून संगीत निर्मिती कशी करता येऊ शकते , वेगवेगळे सांगीतिक इफेक्ट कसे निर्माण करता येऊ शकतात यावर वर्कशॉप घेणार होता. एरीक जास्तकरून सतार , त्याबद्दलची माहिती आणि संगीतात मेलडी कशी काम करू शकते, वेगवेगळे मूड कसे निर्माण करू शकते याबद्दल बोलणार होता. माझ्याकडे मुद्दा आला ताल आणि लय. प्रयोगात आम्ही तबला , जेमबे , मुलांचा प्राथमिक ड्रम , थाळ्या , मेटल डिस्क असं बरंच काही वापरतो. त्यात एक दोन वेळा त्रिताल सुद्धा येतो आणि इतर अनेक वेळा विविध इफेक्ट!

ताल आणि लयीची जी समज सर्वसाधारण भारतीय मुलाला आहे त्याच्या एक शतांश समज देखील पाश्चिमात्य मुलांमध्ये सापडत नाही. आणि आता तर कॉम्पुटर , मोबाईलच्या अति वापरामुळे अनेक मूळ क्षमता आपण मारून टाकतो आहोतच ! ताल आपल्याला कुठे सापडतो यावर बहुतेक मुलांनी गाण्यात , संगीतात असं उत्तर दिलंच पण एका साहेबांनी मोबाईल मध्ये असं देखील बिंदास पणे सांगितलं! Wink ताल-लय समजण्यासाठी सर्वात आधी आवर्तन ( एक सायकल ) समजली पाहिजे आणि त्याचा आनंद घेता यायला पाहिजे आणि आणखी महत्वाची गोष्ट त्यात (स्थिर) राहता आलं पाहिजे. यासाठी मी अगदी साधा तीन मात्रांवर टाळी वाजवण्याचा एक्सरसाइज घेतला ( नंतर दुगून, चौगुन करण्याची गंमत करण्याचा विचार होता , पण तो सोडून दिला). आणि यात पालक देखील होते. त्यामुळे आधी पालक आणि मग त्यांचं पाहून, त्यांच्या निमित्ताने मुले अशी या वर्कशॉपची रचना होती. पण पालक या साध्या आवर्तनाची टाळी पकडू शकत नव्हते. दुसरी गोष्ट टाळी वाजवण्याची कला ! सुरेख , स्पष्ट टाळी कशी वाजवावी हे अनेक लोकांना जमत नाही ! आता हे मुलांना न जमणं समजू शकतो, पण अनेक पालक आयुष्यात पहिल्यांदा टाळी वाजवावी तशी वाजवत होते. दुसरी गोष्ट म्हणजे मोठ्याने म्हणण्याची ! एक-दोन-तीन किंवा राझ-द्वा-त्शे असं म्हणून टाळी पकडा म्हणजे सर्व एका लयीत येतील असं अनेक वेळा सांगून ही पालक हे समजू शकले नाहीत. ताल लयीची गुंतागुंत आणि मुळात ती एक फार मोठी साधना आहे हे समजायला इथल्या समाजाला अजून काही हजार वर्षं घालवावी लागतील. (उत्क्रांतीच्या कुठल्या टप्प्यावर मनुष्याच्या लय-तालाच्या जाणिवा प्रगल्भ होत असाव्यात ?) इथल्या माझ्या वास्तव्यात सर्वात मजेशीर जाणवणारी गोष्ट म्हणजे इथल्या मनुष्याला तालाची जाणीव नसावी, किंवा हे काही महत्वाचं आहे हे अजिबात समजत नसावं आणि पाश्चिमात्य समाजाला भारतीय समाज , भारतीय कला न समजण्यामागे ताल- लयीचं जग न समजण्याचा फार मोठा हात आहे. भारतीय साहित्य , इतर अनेक कला यात सापडणारा ताल, त्यातल्या लयीची बहुपेडी समज ही भारतीय समाजात आहे आणि म्हणून अनेक भारतीय गोष्टींना बाहेरचा मनुष्य समजू शकत नाही ( अपवाद निश्चित पणे आहेत. आता जॉन मॅकलौगलीन सारखे कलाकार घ्या ना !). भारतीय जीवनाची लय, इथल्या निसर्गाची, अनेकविध रिच्युअल्स ची लय , त्यातला मूळचा संथपणा हा निव्वळ द्रुत लय समजणाऱ्या पाश्चिमात्य समाजाला समजणं अवघड आहे, आणि दोन्ही समाजातली ही फार मोठी दरी आहे. अर्थात लौकिक अर्थाने उत्तम आणि अवघड बोल पढंत करणाऱ्या माणसाला प्रोग्रामर पेक्षा कमीच पैसे मिळतात, आणि त्याच्या या क्षमतेचं काही विशिष्ट/मोजक्या लोकांनाच कौतुक असू शकतं ! अर्थात प्रोग्रामर ला मी कमी लेखत नाही, परंतु परंपरेनं मिळालेल्या इतक्या मोठ्या खजिन्याला समजून घेण्याचा आपण किमान प्रयत्न तरी करतो का हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे. कारण परदेशात इतके इंजिनियर आणि प्रोग्रॅमर वगैरे पाठवून ही वोझनियाक काका म्हणत आहेतच की भारतीय मनुष्य क्रिएटिव्हिटी मध्ये कमी पडतो. या क्रिएटिव्हिटी चं संगोपन करायला आपल्याकडे परंपरेनं अनेक गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्यात लय-तालाची खोल समज ही येतेच. याकडे लक्ष देण्याचा आपण कधी प्रयत्न करणार? कॉम्पुटर साक्षर असणं ही काळाची गरज आहेच पण आपण संगीत/वाद्य साक्षर कधी होणार ?

वर्कशॉप मध्ये मुलांना काही वाद्य देखील दाखवली. जेमबे हे आफ्रिकन वाद्य ( अर्थात यात याच्या आफ्रिकन असण्याबद्दल अनेक मजेदार गोष्टी आहेत, पण त्याबद्दल स्वतंत्रपणे लिहावं लागेल) इथे अर्थातच लोकप्रिय आहे. तर एक मुलगी कुठल्याश्या म्युसिक क्लास मध्ये जाते आणि तिथे व्हायोलिन आणि जेमबे शिकते असं ती म्हणाली. मी खुश झालो. इतर मुलांपेक्षा ती बऱ्यापैकी वाजवत होतीच आणि आमच्या गप्पा सुरु झाल्या. ती कुठे शिकते, तिला कोण शिकवतं, कसे शिकवतात याबद्दल विचारलं. तर ती म्हणाली की आमच्या बाई/ताई म्हणतात की जेमबे बिलकुल चांगला वागत नाही म्हणून त्याला फटके मारा !! इथे मात्र मी सर्द झालो ! एकूण पोलिश कलेक्टिव्ह साठी - चांगला वाग हां !!- चांगला नाही वागलास तर .... - हा बहुतेक सर्व क्षेत्रांत , सर्व पातळ्यांवर बोलण्याचा धमकीवजा कोड आहे. पण इथे संगीतात ?? मी तिला सांगितलं की वाद्यावर रागावण्याची काय गरज आहे ? उलट वाद्य म्हणजे तुझा मित्र आहे , किंवा लहान मुलगा आहे असं समज, त्याच्यावर प्रेम कर, तर ते -बोलेल ! वाद्य हे आपल्याइतकंच जिवंत आहे आणि ते 'बोलतं' असा सन्मान त्याला देण्याची भारतीय समज अशा मुलाला कशी आणि कधी समजू शकेल? वाद्य वाजवणे म्हणजे हातात येईल ते घेऊन हवं तसं कुटणे/बडवणे नाही हे मुलाला पालक आणि संगीत शिक्षक यांच्या खुद्द वागण्यातून न बोलता समजलं पाहिजे. आणि असा फार गहन वारसा भारतीय मुलाला आयताच मिळालेला आहे, तो इथल्या मुलाला मिळायला आणखी हजार वर्षे सहज लागतील. अर्थात प्रत्येक बाबतीत आणि प्रत्येक ठिकाणी अपवाद असू शकतीलच ! इथला मनुष्य शांतपणे आणि तल्लीनतेने एखादं वाद्य वाजवतो आहे आणि त्यात रमून जातो आहे असं फारसं दिसत नाही. इथल्या संगीत शाळा देखील या बाबतीत कमी पडतात ! संगीत ( ऐकणे/वाजवणे/गाणे असं सर्वच ) हा एकूणच सामाजिक व्यवहार आहे आणि अनेक कुटुंबाचा ( मुख्यत्वे ) बनणारा समाज सांगीतिक-तल्लीनतेला समजून घेऊ शकत नसेल, त्याला प्रोत्साहन देत नसेल तर विकासाच्या अनेक दिशा आपण मारून टाकतो. असो !! आपण वाद्य/संगीत साक्षर आहोत का, पालक म्हणून, संगीत शिक्षक म्हणून आपण बैठक मारून स्वस्थ पणे आणि तल्लीनतेने संगीत करतो का , जर प्रत्यक्ष करत नसू तरी मुलाला त्याची गरज वाटत असेल, त्याची आवड असेल तर त्याला प्रोत्साहन देतो का हे प्रश्न कायम विचारत राहण्याची गरज आहे
वादकाचं, त्याच्या शारीर बोलीचं, हाताचं, हात ठेवण्याच्या शैलीचं निरीक्षण, त्याचं अनुकरण करण्याची भारतीय सवय , त्याचं अनौपचारिक ट्रेनिंगअशा अनेक पैलूंबद्दल बोलता, लिहिता येईल. पण ते नंतर कधीतरी ! सध्या आपण सर्वच संगीत/वाद्य साक्षर होऊयात असं आवाहन करून थांबतो !

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

काहीतरी छान वेगळं वाटतंय. नंतर वाचतो.

सध्या ही पोच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

असेच म्हणतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

इथला मनुष्य शांतपणे आणि तल्लीनतेने एखादं वाद्य वाजवतो आहे आणि त्यात रमून जातो आहे असं फारसं दिसत नाही

"निरो" आठवला!

असो.

पोलिश समाजाबद्दल फारशी माहिती नाही. परंतु, एकंदरीतच युरोपिय समाज हा संगीत-निरक्षर आहे, असा सूर लेखातून निघतो आहे काय? किंवा मलाच लेख समजला नायीय?

खरोखरच असा सूर लेखातून निघत असेल तर, तो खरा नसावा असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निरक्षरवाद आहेच.

मला संगीत समजत नाही. कुणी गात असेल,वाजवत असेल तर प्रेक्षक ठराविक ठिकाणी आनंदाने बेहोश होतात टाळ्या वाजवताना दिसतात. पण तिथे नक्की काय गम्मत आहे ते कळत नाही. पण कधी एखादा गाऊ लागला की अरे हे काहितरी वेगळं वाटतय असं वाटतं. तसाच प्रकारचा हा वर्णन केलेला अनुभव असावा.
एकदा म्हणजे इंदिरा गांधीच्या पहिल्या पुण्यतिथिस टिव्हिवर गायन ठेवले होते. तेव्हा एकच नॅशनल चानेल होता. दिवसभर हाच कार्यक्रम. एका मुंडासेवाल्या गायकाचा आवाज वेगळा आवडला. मग ओफिसात संगीतवाल्यास विचारलं - तो गात होता ते फार आवडलं कानाला बरं वाटलं. तो कोणी मल्लिकार्जुनमन्सुरखाँ होता हे कळलं. थोडक्यात बरेच कलाकार श्रोत्यांना सतावत असावेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आणि एका ( अर्थातच चांगल्या ) बहिणीचे डोळे काढणे , हात कापणे असे -हॉरर -प्रसंग होते. डोळे काढण्याच्या सीन साठी प्योत्र माईक जवळ अडकित्त्याने अक्रोड फोडतो आणि मी ओरडतो , विव्हळतो वगैरे !

असा लहान मुलांचा कार्यक्रम ???

अर्थात इकडेही राक्षसाचा डोळा वगैरे फोडण्याचा उल्लेख बालकथेत येऊ शकतो पण फट्ट खटाक असे दृक श्राव्य माध्यमातून ते प्रसंग रंगवाले गेल्याचं पाहिलं नव्हतं. पोरंही किंकाळी स्त्रीची हवी वगैरे बारकावे सुचवताहेत.

त्यांना शिरसाष्टांग आशीर्वाद.

ता.क. हात कापताना कसा आवाज दिला ? चेनसॉ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अर्थात इकडेही राक्षसाचा डोळा वगैरे फोडण्याचा उल्लेख बालकथेत येऊ शकतो

अंहं. राक्षसाचा डोळा नाही काही फोडत! राक्षसाचा जीव पोपटाच्या डोळ्यात असतो म्हणून पोपटाचा डोळा फोडतात.

बिचारा पोपट!

तुम्हाला मराठी बालकथा येतच नाही मुळी!

बाकी, पोपटाचा डोळा फोडण्याच्या सीनला एकता कपूरच्या सीर्यलीला साउण्ड इफेक्ट देणाऱ्याला बोलावले ('टॅढॅण! टॅढॅण! टॅढॅण!'), तर बहार येईल!

ता.क. हात कापताना कसा आवाज दिला ? चेनसॉ?

छे छे! 'ये हाथ मुझे दे दे, ठाकुर!' विसरलात? (थोडक्यात, हलाल नव्हे. झटका.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तपशील??

ठीक. मग मुळात डोळा फोडताना आक्रोड फोडल्याप्रमाणे आवाज येईल का?*

छे छे! 'ये हाथ मुझे दे दे, ठाकुर!' विसरलात? (थोडक्यात, हलाल नव्हे. झटका.)

अरे.. हो की..

....

* डॉ. आडकित्ता (नट क्रैक करुन देणारे) यांना विचारावे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळात डोळा फोडताना आक्रोड फोडल्याप्रमाणे आवाज येईल का?

कल्पना नाही. कधी फोडून पाहिला नाही ब्वॉ!

पण काय आहे ना, कवींना आणि साउण्ड इफेक्टवाल्यांना नको तिथे डोकावून पाहायचे लायसन असते, म्हणतात. त्यातलाच हा प्रकार म्हणायचा.

* डॉ. आडकित्ता (नट क्रैक करुन देणारे) यांना विचारावे काय?

हम्म्म्म्... कदाचित प्रात्यक्षिक करून दाखवतील. एखादा गिनीपिग घेऊन जा बरोबर, नाहीतर...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खोडसाळ ही श्रेणी कधी उपलब्ध होणार? उपरोक्त प्रतिसादाला द्यायची आहे. धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'भडकाऊ'च्या खाली मी काहीही स्वीकारत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

भड़काऊ तरी कुठेय? तुरतास खवचट देऊन थांबतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपला आजन्म ऋणी राहीन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर1
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हात कापण्याच्या आवाजाची रेसिपी Wink एक स्वरमंडळ घ्या , त्याच्या तारा सुरेल लावल्या असतील तर जाणीवपूर्वक बेसुऱ्या करा,अर्थातच सर्वच तारा नव्हेत आणि काही तारा एकाच सुरात ( किंवा बेसुरात ) असलेल्या चांगल्या ! नंतर व्हायोलिन चा बो घ्या , तो मात्र व्यवस्थित ताणलेला असला पाहिजे. आता स्वरमंडलावर व्हायोलिन च्या बो ने छेडायला सुरुवात करा !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

रोचक आहे. सादरीकरणाचा व्हिडि‌ओ असेल तर इथे एम्बेड करून टाकता येईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आम्ही मुळात याचं ट्रेलर बनवत आहोत , काही दिवसात ते तयार होईल. सध्या काही छोटे छोटे विडिओ आहेत, पण ते इथे कसे टाकणार ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

सध्या काही छोटे छोटे विडिओ आहेत, पण ते इथे कसे टाकणार ?

जर व्हिडिओ यूट्यूब किंवा तत्सम ठिकाणाहून शेअर केलेले असतील, तर इथे एम्बेड करता येतील, किंवा दुवे देता येतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

छोटे छोटे विडिओ आहेत, पण ते इथे कसे टाकणार ?>>>

युट्युब आवडत नसेल तर दुसरा पर्याय >> https jumpshare dot com. >>account बनवा, pdf/image/video/audio चढवा, " copy link share करा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इथे काही फोटू आणि विडिओ क्लिप्स चे धागे देतो आहे ! धन्यवाद ! पोलिश समाजाचा - म्यूजिकल कोशंट - आणि भारतीय समाजाचा - म्यूजिकल कोशंट - याबद्दल विस्ताराने लिहीन , पुढच्या आठवड्यात !

https://jumpshare.com/v/HXXwKxEqiUsJCWV0r1hR

1st peformance: https://jumpshare.com/v/6T7hLF9K5CzSKX7L6gBi

Cogito performance: behind the curtain
https://jumpshare.com/v/M6NJsQF9DpeXudebbbIs

https://jumpshare.com/v/qPla1lI2oat6ferMX3t6

https://jumpshare.com/v/PZsjaJJYenUT9qBszdLo

just after the show:
https://jumpshare.com/v/8HsLbQ1HML9y1UF4GLS4

Videos:
dola fod scene Wink
https://jumpshare.com/v/yesRuC4oBGTC7hODzK48

https://jumpshare.com/v/VstYrya8gA6ZFouuy5kZ

https://jumpshare.com/v/Pg5Rjz6eXyiM7DWbRcU2

https://jumpshare.com/v/3FObvKnQgFd9iZIuDnTb

Dhanyavaad!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

मायला अमचे नाव अगोदरच आगलावे म्हणून या डोळे फोडणे प्रकर्णावर बोललो नाही. अहो त्या हिस्ट्री चानेलच्या ( युट्यबावर आहे) जिझस मालिकेल सुचना असते - इथे अति हिंसा दिसू शकते. विचार केला या मालिकेत काय बघू नये असं काय असणार पण एकदोन डोळे काढण्याचे प्रसंग भारी शहारे आणणारे आहेत. शिवाय "तू आता तुझ्या मुलांना शेवटचेच पाहशील" हे वाक्यही भयानक घाबरवते. आपणही पाहू/ऐकू शकत नाही ते दहा वर्षांची मुले काय पाहणार?

२६ जानेवारीला एका रस्त्याला मी जाण्याचेही टाळतो. एकेका कोंबडीचा आक्रोश ऐकत जावे लागते.

बाकी पोलंडात प्रौढांसाठी कोणते कार्यक्रम असतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रौढांसाठी देखील अनेक भारी भारी कार्यक्रम असतात या देशात. त्यातल्या अनेक नाटकांवर लिहितो आहे, कधीतरी इथे टंकेन ! जुन्या मूकपटांना नवीन आणि लाईव्ह संगीत देण्याचा उद्योग आम्ही काही लोक करतो, सध्या त्याचा एक विडिओ पहा! हा चित्रपट फारच अप्रतिम आहे ! संगीत आवडलं नाही तरी चित्रपट आवडेल याची सोळा आणे ग्यारंटी !!!
https://www.youtube.com/watch?v=nQuZB8vZgGQ ( पोझनान मधल्या एका जुन्या किनो (सिनेमाहॉल) चा पुनर्वापर करण्याची, तिथे सांस्कृतिक भवन स्थापण्याची एक सामाजिक चळवळ सुरु होती. त्याचे सुरुवातीचे जे कार्यक्रम होते त्यात आमचा हा परफॉर्मन्स होता. आज या किनो मध्ये ( Kino Amarant ) सांस्कृतिक भवन आहे ! तर हा विडिओ त्या लाईव्ह परफॉर्मन्स चा आहे, तर लोकांचे आवाज यात येतील. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

अनेक प्रतिक्रिया पाहून माझ्या प्रतिक्रियेला नक्की कुठून सुरुवात करावी हे कळत नाहीए ! आणि डोळा फोडण्यावर बऱ्याच लोकांचा 'डोळा' Wink आहे हे लक्षात आलेलं आहे. अर्थात एकूणातच युरोपीयन परिकथेतील क्रौर्य हा स्वतंत्र विषय आहे. आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही ही कथा सांगत नाही , तर प्रत्येक श्रोता स्वतःच्या कल्पनाशक्ती प्रमाणे गोष्टीची कल्पना करू शकतो , किंवा नुसतीच मनात चित्रमालिका बनवू शकतो , याचा सर्वप्रमुख उद्देश हा संपूर्ण श्रुतीशरण होऊन ऐकण्यातून कल्पनासृष्टी उभी करणे हा आहे. तर यांच्या संगीताच्या अनेक पैलूंबद्दल लिहिता येईल, ते येत्या काही दिवसात लिहीन. इथे फोटो किंवा विडिओ टाकायचे असतील तर ते नक्की कसे टाकता येतात ? धन्यवाद !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

आणि हा अनुभव मांडण्यामागे माझा खरा हेतू असा आहे की मी जरी वर्षातून एकदा भारतात येत असलो ( आणि आल्यावर जमेल तितकी नाटके पाहत असलो , मैफिलींना जात असलो) तरी मला स्थानिक सांगीतिक संस्कृती चा त्यातल्या लाईव्ह बदलांचा , मुलांच्या सांगीतिक भावविश्वाचा किंवा "ऐकण्याच्या संस्कृती" चा ( ऐकण्याच्या सवयी , कसे आणि काय ऐकतो वगैरे) नक्की अंदाज नाही. या निमित्ताने जर याबद्दल कोणी स्पष्ट आणि थेट सांगू शकेल, अनुभव सांगू शकेल तर त्यातून काही देवाणघेवाण नक्कीच होऊ शकेल. कोण जाणे त्यातून एखाद्या चांगल्या अनोख्या सांगीतिक प्रोजेक्ट ची कल्पना सुचू शकेल !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Observer is the observed

ह्म्म -- माझी वैयक्तिक बाब म्हणावी, तर माझ्या कानांची तयारी भारतात लहानाचा मोठा होताना फारच कमी होती. आताही ताल, लय, आवर्तने, वगैरे सैद्धांतिक दृष्ट्या चांगली ओळखीची असली तरी प्रात्यक्षिक खूपच कच्ची आहेत. पाश्चिमात्य संगीत (अभिजात, लोकप्रिय, सर्व प्रकार) साधारणपणे सहसंगीत असते. (स्वत:ला गिटार किंवा पियानोची साथ देणे, हे सन्माननीय अपवाद सोडल्यास गायक/सुरवादक/तालवादक असे तिघे जण लोकसंगीतात असतात. अभिजात संगीतात दोन-वा-अधिक सुरवादक असतात.)
माझ्याबरोबर साथीने वाजवायचे धाडस करणाऱ्या मित्रांना पाच मिनिटांत दुसरे काहीतरी काम आठवते आणि संगीताचा प्रयोग थांबवावा लागतो! याचे मुख्य कारण याचे प्रमुख कारण ताल आणि लयीमधली अनियमितता आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

संगीत हा विषय मला फार समजतो, असं मी म्हणणार नाही. पण प्रयोग रोचक वाटला. आता सवडीनं ध्वनिफीतीही ऐकेन.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.