(सांब भोळा)
खवचट खान
न्हाणीत सांब भोळा
उघड्याच अंगी थर्थरी
'पंचा कुणीकडे गो?'
उमेस त्या विचारी
म्हणतो तिलाही सांब
'मी मारी आर्त हाका,
अन् तू सांसबहू-मग्न
फोडीन तो मूढ-खोका!'
'तो काय खुंटीवर्ती
घ्या चक्षुर्वै बघून,
उगी लागे बोंबलाया
नुसते खुळेच ध्यान!'
***
'चोळुनी खर्खरा हे
पुसतो शरीर सारे...,
माझेच अंग मजसी..
तरी वाटे आर्द्र गारे..!'
'तुमच्या खुळ्या स्वभावी
हे नेहमीचेच आहे...!
कुणी 'जाह्नवी' म्हणा ना..?
डोईत शॉवर आहे...!'
'तिचीच शुद्ध किमया
भासे तुम्हां हिवाळा,
भिज्विते सर्वकाळ
तुमचाच कंठ निळा...!'
हा हा हा!
हा हा हा! "डोईत शॉवर आहे" हे खासच आहे.
फोडीन तो मूढ-खोका!' या ओळीत 'तो' शब्द काढला तर मीटरमधे मावतंय.