404 page not found..
Oops!
Something went wrong
Sorry!
शक्करकंद रताळ्याला नाव पडले
शक्करकंद रताळ्याला नाव पडले पण बीटाची साखर करतात.
बाकी पंजाब बांगलादेशसह जो पूर्वीचा भारत होता तिथे गोड्ड मिठाई आहे. इतर जगात नसावी. द भारतात तर पायसम, गुळ खोबऱ्याचे गोड आप्पे. संपलं गोड प्रकरण. तिरुपतिचे लाडुवगैरे आहेत. पण त्याच्या ऐतिहासिकपणाबद्दल माहीत नाही.
( मिपावर मालिका वाचली आहे. )
@ नील लोमस
@ नील लोमस
उबर, एअरबीनबी इत्यादी गोष्टी ऐनवेळेस इन्स्टॉल करताय?
उबर साठी उत्तर होय असे आहे. मी भारतात किंवा परदेशात उबर चा वापर करत नाही. तसेच माझ्या फोन मध्ये वापरात नसलेली ॲप्स आपोआप डी-अॅक्टिवेट होतात (फक्त आयकॉन राहतो.) त्यामुळे जर ती वापरायची असतील तर री-इन्स्टॉल करावी लागतात.
एअरबीनबी चा संदर्भ नाही लक्षात आला, कारण त्याचा ह्या भागात कुठे उल्लेख नाहीये.
इजिप्तच्या दक्षिणेकडच्या
इजिप्तच्या दक्षिणेकडच्या प्रदेशातून उसाची साखर आली. मॅारिशस बेटावरून गुजराती लोक साखरेला "जरा मोरस आपो तो" (=जरा साखर द्या). तिथल्या लोकांची नावंही इकडचीच.
गांधार ( अफगाणिस्तान) इथून गुंफा आणि मूर्तीकला भारतात आली अशोकाच्या काळात. तेच इजिप्तशी संबंध आले असते तर बरीच कला इथे पोहोचली असती. तसे तिथल्या दोनतीन बंदरांशी व्यापारी संबंध होते. पिरॅमिडातली चित्रकला फार चांगली आहे.
अॅनाक्रॉनिझम?
तसेही, सुमारे २ हजार वर्षांपूर्वीचा (आपल्या रोमन साम्राज्याशी होत असलेल्या ईजिप्तमार्गे व्यापाराचा) काळ हा पिरॅमिडांच्या काळाच्या गेला बाजार दोन ते अडीच हजार वर्षांनंतरचा असावा, नाही काय?
(हे म्हणजे, आपल्या अमेरिकेशी आज होत असलेल्या व्यापारामुळे प्री-कोलंबियन नेटिव अमेरिकन चित्रकलेचा प्रभाव आजच्या भारतीय चित्रकलेवर पडण्याची अपेक्षा करण्यासारखे आहे. अर्थात, महाभारतातला (मयसभा बांधणारा) मयासुर हा मायन (यानी कि दक्षिण मेक्सिकोचा नेटिव) होता, असे ऐकून आहे, तेव्हा पुरातन मेक्सिकन/मायन आर्किटेक्चरचा प्रभाव आधुनिक भारतीय आर्किटेक्चरवर पडला असेलही कदाचित, परंतु त्याचा भारताच्या अमेरिकेशी असलेल्या सद्य व्यापाराशी संबंध कितपत असावा, याबद्दल कल्पना नाही. (शिवाय, भारताचा मेक्सिकोशी अमेरिकेमार्फत व्यापार होतो किंवा कसे, हेही ठाऊक नाही.) तेव्हा असोच.)
..........
(मात्र, स्फिंक्सचे नाक तुटले, ते ओबेलिक्स त्यावर चढल्यामुळेच, यावर आम्ही ठाम आहोत. (संदर्भ सवडीने.))
(मात्र, स्फिंक्सचे नाक तुटले,
(मात्र, स्फिंक्सचे नाक तुटले, ते ओबेलिक्स त्यावर चढल्यामुळेच, यावर आम्ही ठाम आहोत.
संदर्भ हा घ्या
https://in.images.search.yahoo.com/yhs/search;_ylt=Awrx5ZZr2c1b7pYAGITn…--?p=asterix+in+egypt&fr=yhs-pty-pty_extension&hspart=pty&hsimp=yhs-pty_extension#id=14&iurl=https%3A%2F%2Fi2.wp.com%2Fwww.rollingalpha.com%2Fwp-content%2Fuploads%2F2014%2F08%2Fsphinx-nose.p…
इजिप्तमध्ये फारसे पेट्रोल नसावे
त्यामुळे, पुऱ्या (किंवा डाळवडे) पेट्रोलमध्ये तळत असतीलसे वाटत नाही. (चूभूद्याघ्या.)
(डीझेल१ वापरत असल्यास मात्र कल्पना नाही.)
..........
१ बोले तो, खनिज तेल. जुने तळणीचे तेल रीसायकल करून बनवलेले बायोडीझेल नव्हे.२
२ यावरून एक जुनीच अवांतर शंका. कोकोनट ऑइल (बोले तो खोबरेल) हे कोकोनटपासून (बोले तो नारळापासून) बनवतात. पीनट ऑइल (बोले तो गोडेतेल) हे पीनटपासून (बोले तो शेंगदाण्यापासून) बनवतात. फार कशाला, ऑलिव्ह ऑइलसुद्धा ऑलिव्हपासूनच बनवतात. तर मग बेबी ऑइल कशापासून बनवत असतील?
हा भागही आवडला. विशेषत: ४-५
हा भागही आवडला. विशेषत: ४-५ शुगर क्युब्स वगैरे तपशील.
खरच कशाची साखर बनवतात देवच जाणे इतकी म्हणजे इतकी अगोड असते.