ही बातमी समजली का - भाग १९५
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
----
आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
Taxonomy upgrade extras
राधिका आणि प्रणय रॉय यांना
राधिका आणि प्रणय रॉय यांना परदेशी जाण्यास बंदी. एवढे बहुमत मिळवून देखील अशा गोष्टी का कराव्याशा वाटतात हा प्रश्न आहे. कदाचित पुढल्या ५० वर्षांची सोय लावायचा विचार दिसतोय. काँग्रेस ने पैसा जमवून फक्त १०-२० वर्षांची सोय पाहिली. पण दूरदृष्टी म्हणतात ती हीच.
दुवा.
- ओंकार.
दुव्यावरच्या बातमीमधून.
दुव्यावरच्या बातमीमधून. अर्थात ते छापताना खरे काय ते छापत असतील या भरोशावर. त्याच्यावर विश्वास ठेवायचा नसेल तर शोधाशोध करायला लागेल.
They have been stopped on the basis of a fake and wholly unsubstantiated corruption case filed by the CBI about an ICICI loan that was taken by their company, RRPR, which was fully repaid with interest ahead of schedule. The case has been challenged by the NDTV founders and their company in the Delhi High Court where the matter has been pending for two years. Radhika and Prannoy Roy have been fully cooperating with the case and they have been travelling abroad regularly and returning to the country so to suggest they are a flight risk is ludicrous.
- ओंकार.
मजेशीर बातमी आहे
https://www.cnn.com/travel/article/fly-free-green-greene-trnd/index.html
ज्या लोकांचे आडनाव - 'ग्रीन' आहे त्या लोकांना, 'ग्रीन विक' प्रमोशनच्या अंतर्गत , फ्रंटिअर विमानकंपनी, फुकटात विमान प्रवास उपलब्ध करुन देते आहे. अर्थात ही ऑफर ठराविक काळाकरताच उपलब्ध असणार आहे.
गुगल सायन्स फेअर
https://www.googlesciencefair.com/?utm_source=Google&utm_medium=HPP&utm…
कितीतरी टिनेजर्स उत्तम शोध लावत आहेत. छान बातमी आहे.
ट्रम्प
आपल्याकडे सगळं आलबेल आहे असं वाटण्यासाठी तरी अधूनमधून अमेरिकन बातम्या वाचाव्यात
Trump’s Interest in Buying Greenland Seemed Like a Joke. Then It Got Ugly.
Trump Again Accuses American Jews of Disloyalty
After Lobbying by Gun Rights Advocates, Trump Sounds a Familiar Retreat
In Economic Warning Signals, Trump Sees Signs of a Conspiracy
https://timesofindia
https://timesofindia.indiatimes.com/city/delhi/vinayak-damodar-savarkar…
हेडलाईनची अक्षरं:
"Row erupts in DU over Damodar Savarkar, Subhas Chandra Bose .."
https://www.indiatoday.in/amp
https://www.indiatoday.in/amp/india/story/nsui-leaders-put-shoe-garland…
NSUI leaders put shoe garland around Savarkar statue, blacken face
थर्मामीटर फोडून ताप जाईल?
थर्मामीटर फोडून ताप जाईल? - आर्थिक मंदीविषयी योगेंद्र यादव यांचे भाष्य
Downturn deciphered: Biscuits, briefs, bikes, booze and the breakdown - 'इकॉनॉमिक टाइम्स'मधून
अरे देवा! जाऊ दे.
अरे देवा! जाऊ दे. निर्मलाबाईंना विचारतो. तोपर्यंत ' मंदीची ' मजा घेऊ.
म्या काॅलीजात असताना आमच्या वर्गात मंदा नावाची पोरगी व्हती.
लई भारी पोट्टी व्हती.
आमी समदी पोर तिला मंदी म्हणायचो.
पुढ ती लगीन करून फाॅरीनला गेली.
परवा प्रियांका गांधी टिवटिव चिमनीवर म्हनली की,
मंदी भारतात येनार हाय.
म्या आपल केसाला डाय लावूनशान वाट बघत हूतो
तवर ती निर्मलाबाई शीतारामन कडाडली
आमी भारतात मंदी यिवू देनार नाय.
आयला ह्ये भाजपावाले लई असहिष्णू हाईत.
मार्मिक श्रेणी घेतलीत.
मार्मिक श्रेणी घेतलीत.
आता मंदा नावसुद्धा ठेवत नाहीत. टीना ठेवतात. उ भारतात पत्र्याच्या डब्ब्यास टीना म्हणतात. तरी महाजनो येन गतो स पंथ: । चालायचच. बान्द्रा टेकडीवर बेबोसुद्धा नाव असतं .दक्षिणेत मात्र महान सर्व. महा लक्ष्मी, अनंतमूर्ती, महा लिंगम्म। महाराष्ट्रात बिचारे बाबुराव अन बाळा. कर्नाटकात बंगारप्पा (= सोन्याबाप्पू)
औषध उद्योगाला हादरा? Opioid
औषध उद्योगाला हादरा?
Opioid crisis: Johnson & Johnson hit by landmark ruling
उत्तम बातमी
https://www.hindustantimes.com/india-news/five-villages-in-hisar-get-wa…
हिसार जिल्ह्यातील, ५ गावांना ३७ वर्षांनंतर प्रथमच पाणी उपलब्ध झालेले आहे. गावकऱ्यांनाही रोजगार उपलब्ध झाला तसेच काम स्वस्तात झाले.
__________________
बार्बी बाहुली नेहमीच टीकेचे लक्ष्य राहीलेली आहे.
https://www.bbc.com/news/world-us-canada-49481684
रोझा पार्क या कृष्णवर्णिय महीलेस, अलाबामामध्ये 'बसमधील आपले सीट, अन्य गोऱ्या व्यक्तीला देण्याचे नाकारल्याबद्दल' १ डिसेंबर १९५५ ला अटक करण्यात आलेली होती.
या ऐतिहासिक महीलेची बार्बी प्रतिकृती बाजारात येणार आहे. 'Inspiring Women's series' मध्ये या बाहुलीचा अंतर्भाव आहे.
ब्रिटिश संसद स्थगित
ब्रिटिश संसद स्थगित
(किंवा, ट्रम्पला मागे टाकून बोरिस पुढे गेला त्याची गोष्ट.)
https://www.cnn.com/2019/08
https://www.cnn.com/2019/08/29/economy/single-women-economy/index.html
- बापरे २०३० सालापर्यंत, २५ ते ४४ वयोगटातील ४५% स्त्रिया एकट्या रहाणाऱ्या असतील.
कमाले!!!
- एकट्या बायका , या विवाहित स्त्रियांपेक्षा अधिक प्रमाणात प्रसाधने वापरतात.
- अमेरीकन जीवनमानातील ही 'पारंपारीक कुटुंबसंस्थेपासून फारकत' चा दुसरा पैलू हा की चिपोटले, स्टार बक्स आदि व्यापारात वाढ.
- पुढील वर्षात कार विकत घेणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण वाढेल.
- श्रीमंत काय, मध्यम अथवा निम्नवर्ग काय सर्वांच्याच बजेटमध्ये (मराठी शब्द?) सिंहाचा वाटा, घरगुती खर्च हाच असतो पण निम्न मध्यम वर्गीयांत जवळजवळ अर्धे बजेट फक्त घरगुती खर्चांनमध्येच विभागले जाते आणि बाकीचे उरलेले - अन्न व transportation (मराठी शब्द?)
आसाममधून अनेक बांग्लादेशी
आसाममधून अनेक बांग्लादेशी निर्वासितांना डिपोर्ट करणार आहेत वाटतं, पण बांग्लादेश आणि भारतात तसा करार नाही. मग कसे पाठवणार या लोकांना?
https://www.indiawest.com/news/india/indian-citizenship-may-be-revoked-…
आचरट आणि बिनडोक पर्याय
हा लेखक म्हणतोय - अमेरीकेत गोळीबार हिंसाचार् जे होतात ते कमी करण्याकरता सार्वांनाच बंदुक/पिस्तुल द्या.
https://pjmedia.com/news-and-politics/we-must-take-effective-steps-to-r…
तात्या
हे आमचे तात्या. आमचा ह्यांच्यावर भारी जीव.
Trump shows fake hurricane map in apparent bid to validate incorrect tweet
स्टारबक्स
https://www.cnn.com/2019/09/05/business/starbucks-mental-health/index.h…
स्टारबक्स, नोकरदारांचे (स्टाफ - बरिस्ता वगैरे) 'मानसिक स्वास्थ्य' अधिकाधिक सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. कसे ते अजुन सांगीतलेले नाही.
जिओ स्टाबक्स!!!
One more reason for me to have a
'पम्पकीन स्पाइस लॅटे"
रात्री खुडबूड झाली असेल. पण
रात्री खुडबूड झाली असेल, आई घाबरली असेल. पण अतिशय दुर्दैवी बातमी आहे :(
___________________
एकदा मुलगी अशीच रात्री घरी आलेली व मी स्वयंपाकघरात उभी होते मला कळत होते कोणीतरी लॅच (कुलुप) उघडतय. आणि मला माहीत होतं की लेकच असणारे. पण तिला मी इतक्या रात्री तिथे उभी असणे अनपेक्षित होते. ती उडालीच :) कसली घाबरली, तिला वाटलं कोणीतरी परकेच उभे आहे.
लेक घरी येइपर्यंत माझा डोळ्याला डोळा लागत नसे. अर्थातच!!!
आता तर काय ती घराबाहेरच पडली. मैत्रिणींबरोबर रहाते. आता नो कंट्रोल. जे ज्यावेळी द्यायचे होते ते दिले :( ...... बरेच राहूनही गेले असे वाटते.
किरण नगरकर ह्यांचं निधन -
किरण नगरकर ह्यांचं निधन -
https://www.indiatoday.in/india/story/kiran-nagarkar-passes-away-77-159…
प्रियांका चोप्रानं तिचं नाव
प्रियांका चोप्रानं तिचं नाव बदललं का माहीत नाही पण पेपरवाल्यांनी बदललंय. परवा नादालची टेनीस म्याचला जोन्स आणि हयात प्रेक्षक होते. तो फोटो हयातने ट्विटरवर टाकलाय.
( संगीत/सिनेमा कलाकार फ्यान लोकांना फोटो काढू देतातच. पण हयातने तो प्रियांकाला चिडवायला वापरला म्हणता येईल.)
(किंवा असं म्हणता येईल की शोभा डे, राहूल गांधी, आणि इतर नागरिकांची नाव गुंतवण्याची संधी पाक सोडत नाही?)
कमी उंची आणि मधुमेह
https://www.medicinenet.com/script/main/art.asp?articlekey=224285
तुम्ही किती उंच आहात यावरती सुद्धा डायबेटिस होण्याच्या शक्यतेचे प्रमाण अवलंबून असते.
भारतीय/एशिअन लोकांच्यात
भारतीय/एशिअन लोकांच्यात डाईबजटिजचा ट्रेंड आहे असं बरेच डॉक्टरांचं मत आहे.
आयुर्वेदात याचे उल्लेख आणि उपचार आहेत.
--
रक्तदाब असा स्पष्ट उल्लेख नसला तरी नाडीपरीक्षा आहे आणि त्यात अनुभवाने वैद्य ओळखतात.यास पित्तप्रकोप म्हटलं आहे. यात डोके दुखते.उपाय - सुंठ ,आवळा, हिरडा चूर्ण दिलं आहे. जे रुग्ण रक्तदाबाची औषधे ( खरंतर त्यास औषध म्हणताच येत नाही, तात्पुरता बारा/चोविस तासांसाठी पुढे ढकलला जातो रक्तवाहिन्या फुगवून)घेतच नाहीत त्यांना यांचा गुण येतो.
सुंठ कोलेस्ट्रॉल मारते, आवळा कोलेस्ट्रॉलला चिकटलेला*१ सोडिअम अणू काढत असावा, हिरडा बद्धकोष्टता काढतो. वय वाढत असताना कोलेस्ट्रॉल हळूहळू वाढत जात असतो. तो एका मर्यादेला पोहोचल्यावर परिणाम दिसू लागतात. तो कोलेस्ट्रॉल दोनचार दिवसांत नष्ट करण्याची अपेक्षा बाळगणे गैर आहे. तूप खाऊन लगेच आरशात रूप पाहण्यासारखं. पण महिन्याभरात नक्कीच रक्तदाब खाली येतो कोणतेही स्टिरिओड न घेता. पण आताच्या धकाधकीच्या जीवनात एवढे थांबतो कोण?
#१. ओरग्यानिक भागास धातू जोडला गेला की त्याचे केमिस्ट्रीत चिलेट तयार होतात. सोडिअम चिकटल्यावर कोलेस्टेरॉलचे लांबलचक परमाणू तयार होत असावेत. मीठ खाण्याचा आणि रक्तदाब वाढण्याचा हाच संबंध असावा.
या दोन रोगांंबद्दल ?
या दोन रोगांंबद्दल ?
सायनच्या वरजीवनदास आयुरवैदिक रुग्णालयात डाईबेटीजसाठी माझे बाबा गेले असता त्या वैद्यांनी सांगितलं यावर ठाम औषध नाही. साखर कमी जास्त होईल तशी मात्रा कमी जास्त करावी लागते. समूळ हटत नाही. जिथे जी औषधं घेता आहात तीच चालू ठेवा.
रक्तदाबावर चर्चा/ सल्ला यासाठी टिवी चानेलवर पुण्याचे एक वैद्य आलेले. ते म्हणाले की रक्तदाब वाढलेला दिसला की ताबडतोब आमरण गोळी सुरू करतात आणि कधी एक दोन वर्षांनी आयुर्वेदाकडे येतात तेव्हा मात्र लगेच बरा व्हावा इच्छा असते. प्रथम आयुर्वेदाकडे कुणी येत नाही. बरं दोन वेगळ्या पद्धतींचा उपचार काहीच उपयोगाचा नसतो किंवा तो दुसरा उपचार बंद करायलाही रुग्ण तयार नसतात.
-–
चिलेट्स - पाणी शुद्ध किंवा हार्डड ते सॉफ्ट करताना आइअन एक्स्चेंज पद्धत वापरली जाते. क्याल्सम/मग्नेशम अणूंंना सोडिअमने बदलतात तसा काही प्रकार होमिओपॅथी औषधातही आहे. सोन्याचा अणू असलेले एक औषध सोडिअम-कोलेस्ट्राल परमाणूतून सोडिअम च्या बदल्यात ओरम (सोने)चिकटवत असावे. एकदा का सोडिअम निघाला की कोलेस्ट्रालची एक मोठी साखळी होण्याचं थांबत असणार. मोठी साखळी गुठळी करत असणार. खूप व्यायाम केल्याने कोलेस्ट्राल 'बर्न' होत असला तरी सोडिअम काढता येत नसेल.
हे सर्व थोडी माहिती, तर्क यावर आधारित आहे. खंडन करण्यास भरपूर वाव आहे कारण हे दोन रोग हटत नाहीत. मलाच सगळं माहिती, मीच बरोबर असा आजिबात दावा नाही. वाटसप न्यानही नाही. किंवा कुणाला पाठवतही नाही. इथे चर्चा होते म्हणूनच देत आहे.
सिरीयसली, हे काय आहे?
खरंच, हे नक्की काय आहे? परमाणू म्हणजे नक्की काय? अणूकेंद्र, अणूभंजन, रेणू, का पेशी का आणखी काही.
सोडियम आणि कोलेस्टेरॉलचा नक्की संबंध काय? कोलेस्टेरॉलच्या रेणूत सोडियम नसतो; विकिपिडीया म्हणतो C27H46O म्हणजे कोलेस्टेरॉल. ह्यात सोडियम किंवा Na नाही.
कोलेस्टेरॉलबद्दल मी जितपत आणि वरवरचं वाचलं आहे, आणि मला रसायनशास्त्राचं जितपत उथळ आकलन आहे त्यानुसार - सर्व प्राण्यांच्या शरीरात कोलस्टेरॉल तयार होतं. ते अत्यंत कमी घनतेचं (very low density) असतं, ह्याचा अर्थ त्यात हायड्रोजनचं प्रमाण जास्त असावं. हालचाल केल्यानं ते कमी घनतेचं (low density) कोलेस्टेरॉल बनतं. सिंगल बाँडचा डबल बाँड बनत असावा - हे माझं माझ्यापुरतं आकलन, हे खरं आहे का नाही ते मी तपासून बघितलेलं नाही. व्यायामासारखा व्यायाम केला, की कमी घनतेचं कोलेस्टेरॉल अधिक घनतेचं (high density) बनतं, कदाचित डबल बाँडचा ट्रिपल बाँड बनत असेल. हे अधिक घनतेचं, हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल शरीरासाठी चांगलं असतं.
सोडियम आणि रक्तदाबाचा संबंध असतो. कोलेस्टेरॉल आणि रक्तदाबाचा संबंध असतो. सोडियम आणि कोलेस्टेरॉलचा थेट संबंध लावल्याचं माझ्या वाचनात तरी नाही; म्हणून तसं नसेलच असाही माझा दावा नाही.
चिलेट म्हणजे नक्की काय? अर्बन डिक्शनरी म्हणते Silicon breast enhancers which are placed in the bra to give you a fuller shape. (दुवा)
कोणतेही अणू इतर अणूंच्या संपर्कात आल्यामुळे बदलत नाही. हे मूलभूत पदार्थविज्ञान/भौतिकशास्त्र आहे. क्याल्सियम वा मॅग्नेसियमचे अणू सोडियममुळे बदलत नाहीत. अणू म्हणजे अणूकेंद्रक. लोखंडापेक्षा खालच्या (हलकं अणूकेंद्र, अणूक्रमांक किंवा प्रोटॉन्सची संख्या कमी) मूलद्रव्यांचं अणूकेंद्रक बदलण्यासाठी प्रचंड दाब असावा लागतो, जसा ताऱ्यांच्या केंद्रात असतो; वरच्या मूलद्रव्यांचं अणूकेंद्रक बदलण्यासाठी बाहेरून ऊर्जा द्यावी लागते, जी ताऱ्यांच्या स्फोटात तयार होते. ह्या इतपत ऊर्जा, दाब वगैरे मानवी शरीरात असत नाहीत.
माहीत नसेल तर प्रश्न विचारा, कदाचित कोणी उत्तरं देतील. वैज्ञानिक विनोद करायला काहीही हरकत नाही. पण करायचे तर ते समजूनउमजून करा. उगाच अंधश्रद्धा बाळगून, त्या पसरवण्यात हशील नाही.
कोणतेही अणू इतर अणूंच्या
कोणतेही अणू इतर अणूंच्या संपर्कात आल्यामुळे बदलत ~~~~~
~~~ वरच्या मूलद्रव्यांचं अणूकेंद्रक बदलण्यासाठी बाहेरून ऊर्जा द्यावी लागते, जी ताऱ्यांच्या स्फोटात तयार होते. ह्या इतपत ऊर्जा, दाब वगैरे मानवी शरीरात असत नाहीत.
या परिच्छेदातले अणू रेणू नाही. ते फिजिक्समधले माहिती आहेत.
मोठे मोलिक्युल म्हणतो. सोडिअम- कोलेस्ट्राल चा नक्की काय संबंध आहे ते तपासण्याची साधने आपल्याकडे नाहीत. पण एखादा विचार करून जर का तसे परिणाम दिसू लागले तर ते बरोबर असेल. आयुर्वेदामध्ये आवळ्यास रसायन, हिरड्यास अमृत का म्हटले आणि त्यांनी ते कसे शोधले हे आश्चर्य ठरते. आता झटपट परिणाम इच्छिणाऱ्या काळात यास कोणी भाव देणारही नाही. आणि खरोखर एवढ्या स्वस्त औषधांंनी रोग बरे होऊ लागले तर औषध उद्योगात मंदी नाही का येणार?
होमिओपॅथी वाल्यांनीही ओरमचे औषध बनवले म्हणजे काही तथ्य असणारच.
विस्तृत उत्तराने समाधान झाले.
उगाच अंधश्रद्धा बाळगून, त्या पसरवण्यात हशील नाही.
इथे नेमकी चर्चा होते म्हणून आतापर्यंत फक्त इथेच लिहिलं आहे. पसरवत नाहीच.
गुजरातमध्ये वाहनांसाठी दंडकपात
गडकरी प्रपोजेस, गुजरात डिस्पोजेस
गुजरातमध्ये वाहनांसाठी दंडकपात
https://www.thehindu.com/news
https://www.thehindu.com/news/national/maths-never-helped-einstein-disc…
गणिताचे शिक्षण घेणाऱ्यांनो, ह्या च्युत्याचं ऐकून घ्या!
विदूषक
हे विदूषकच आहेत.
आईनस्टाईन आणि सापेक्षतेबद्दल मला आठवतंय ते असं की आईनस्टाईनला सापेक्षतेची समीकरणं लिहायला त्याच्या गणितज्ञ मित्रानं मदत केली होती. आईनस्टाईननं गुरुत्वाकर्षण शोधलं नाही हे खरंच; पण सापेक्षतेमध्ये गुरुत्वाकर्षण ह्या मूलभूत बलाबद्दल चर्चा आहे. खूप जास्त वस्तुमान असेल तर गुरुत्वाकर्षणाचे काय परिणाम दिसतील, हे सापेक्षतेमुळे आपल्याला समजलं.
५०,००० नोकरदार/कामगार्
जनरल मोटर्स चे ५०,००० नोकरदार/कामगार संपावर गेले आहेत.
जनरल मोटर्स तर म्हणताहेत की 'ताशी कामगार', वर्षाला ९०,००० डॉलर्स कमावतात म्हणुन.
मग कसली अवदसा सुचतेय त्यांना कोणास ठाउक. एवढा पगार असताना , संप???
https://www.cnn.com/2019/09/16/business/uaw-gm-strike-general-motors/in…
Lunacy
'द इकोनॉमिस्ट' ह्या नियतकालिकाच्या आशिया आवृत्तीमध्ये 'लुनसी' - वेडेपणा - ह्या सदरात भारताच्या संशोधनाच्या प्राथमिकतांबद्दल लेख आहे. अपेक्षेनुसार, चांद्रयानाबद्दल सहानुभूतीपूर्ण शब्द आहेत आणि पंचगव्य, गोमूत्र वगैरे प्रकारांवर सडकून टीका आहे.
India’s government is pouring money into dung
भ्रष्टाचारी
https://www.lokmat.com/maharashtra/maharashtra-cooperative-bank-scam-in…
मला भाजप आवडतो. भाजपचा एकही नेता भ्रष्टाचारात नाही. बाकी पक्षातले सगळे संत भाजप जॉईन करत आहेत. माझ्यावर ED कारवाई करण्याची शक्यता नाही, नाहीतर मी पण भाजपचा नेता / कार्यकर्ता काहीतरी झालो असतो. जय हो.
https://www.loksatta.com/desh
https://www.loksatta.com/desh-videsh-news/gorakhpur-infant-died-case-do…
९ महिने जेलमध्ये सडवून, सस्पेण्ड करून, ट्रोलधाडीकरवी यथेच्छ बदनामी करून, कुटुंबियांना धमकावून, ७० पोरांना टाचा घासत मारण्याचं पाप लोकांना मुस्लिम डॉक्टरविरूद्ध भडकवून पचवून अखेर काफिल खानला क्लिन चीट दिली!!
हा देश महान आहे! केवळ महान!!
नोटबंदी, शेतीउत्पन्न आणि आसाराम लोमटेंच टिपण
त्या वर्षी बंपर पिक आलं पण शेतकरी आणि शेतमजुरांच्या हातात ठेंगाच पडला. ह्या वर्गाच्या नुकसानीची नोंद साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले ग्रामिण लेखक आसाराम लोमटे यांनी घेतली होती. पण त्यांना जे आजूबाजूला दिसलं त्याचं ते टिपण होतं (डेटावर आधारीत कनक्लूजन नाही म्हणता आल असतं). आज बिझनेस स्टॅ. मध्ये डेटा पण आला आहे. लोमटेंचा लेख आजही पुन्हा वाचण्याजोगा आहे.
https://www.loksatta.com/lekha-news/demonetisation-destroyed-farmers-an…
https://www.business-standard.com/article/economy-policy/farm-income-an…
लाल चिखल
लोमटेंच्या लेखात 'लाल चिखल' ह्या कथेचा उल्लेख आहे. लेखक कोण, ते आता मी विसरले; पण ही कथा अजिबात विसरता येणार नाही.
ही कथा आमच्या नववीच्या (बहुतेक) पाठ्यपुस्तकात होती. शेतकऱ्यांची दुःख, वेदना त्यात आहेतच. ते तेव्हाही समजलं होतं. आता त्यातून आणखी अर्थ समजतो. परिस्थितीसमोर आपल्याला काही करता येत नाही. सुरुवातीला आपल्याला वाटत असेल, आपल्याकडे सत्ता आहे, तर त्यातून भ्रमनिरास कसा होतो; अशा प्रकारेही त्या कथेकडे बघता येतं.
अनेकदा लोक विदा नसूनही काय वाट्टेल त्या फेका मारतात; आणि उलट बाजूनं, विदा नाही म्हणून गरीबांकडे, त्यांच्या त्रासांकडे दुर्लक्षही करतात. दोन्ही प्रकार चूकच; पण दुसरा प्रकार अधिक धोकादायक. ज्यांना करुणा, सहानुभूती वगैरे नाहीत, त्यांना विदा नाही ही सबब पथ्यावरच पडते. विदा नाही तर जमवून काय दिसतंय हे बघू; असं म्हणणारे लोक कमीच! सहृदय लोकांनी अशा लेखनातून प्रेरणा घेऊन विदा जमवून, त्यातून लोकांना न्याय मिळेल ह्याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. ते बिझनेस स्टँडर्डनं केल्याचं दिसतंय.
हावडी मोदी - तवलीन सिंग
'हावडी मोदी' इव्हेंटचं वार्तांकन ज्या भाटगिरी पद्धतीत झालं त्यावर तवलीन सिंग शरमिंदा आहेत. ढेरे तुम्ही पण आहात का शरमिंदा?
मुळात तवलीन सिंग मोदींच्या
मुळात तवलीन सिंग मोदींच्या फ्यान आहेत (होत्या?) केवळा ते ल्युटन दिल्लीचा हिस्सा नाहीत म्हणून. म्हणजे त्यांच्या लेखनात मला मोदी समर्थनाचा दुसरा मुद्दा सापडला नाही. (ते स्युडोसोशालिझमचा त्याग करून रिफॉर्म्स करतील हा भाबडा आशावाद बहुतेकांप्रमाणेच त्यांनाही होता. पण त्याचे कारणही ते 'जुन्या व्यवस्थेचे- ल्युटनस दिल्लीचे पाईक नाहीत म्हणून पॅट्रनेजचे राजकारण सोडतील" हेच होते).
सातव्या निझामाने लंडनच्या
सातव्या निझामाने लंडनच्या बँकेत ठेवलेले पैसे आणि पाकचा त्यावर दावा - खटला निकाल, बातमी, हिंदुस्तान टाइम्स
कबड्डी
काल रोहित शर्माच्या शतकाची चर्चा होती, पण कबड्डीमध्ये पवन सेहरावतने डुबकी किंग परदीप नरवालचा ३४ गुणांचा विक्रम मोडला आणि एका डावात तब्बल ३९ चढाईगुण मिळवण्याचा नवा विक्रमही काल केला :
Pro Kabaddi 7 : बंगळुरुच्या पवनचा धडाकेबाज खेळ, चढाईत तब्बल ३९ गुणांची कमाई
ग्रामीण भारत हागणदारीमुक्त
ग्रामीण भारत हागणदारीमुक्त झाल्याची घोषणा काल गांधी जयंतीनिमित्त समारंभात पंतप्रधान मोदींनी केली आहे. देशद्रोही लोक अर्थात त्यावर शंका उपस्थित करत आहेत.
Modi declares India open defecation free, claim questioned
शुक्रशोणितांचा सांधा
अमिताव घोष यांच्या ‘गन आयलंड’ आणि ‘द ग्रेट डिरेंजमेंट’ या पुस्तकांचा सांधा कसा जुळतो, याचा वेध..
शुक्रशोणितांचा सांधा - आदूबाळ
आणि नेहमीप्रमाणे पंकज भोसलेंच बुकरायण सदर
बुकरायण : कोंबडीविक्याची प्रेमगाथा
पुस्तकांची ओळख करून देणारे दोनही लेख आवडले.
आरे - मेट्रो - वृक्षतोड
मेट्रोसाठी आरेतील वृक्षतोडीविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आरेमध्ये रात्रभर झाडं कापण्यात येत होती. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जवळपास साडेतीनशेहून अधिक झाडं कापल्याची माहिती स्थानिकांनी दिली. हे काम पोलिस सुरक्षेत सुरू होतं. पर्यावरण प्रेमींना याची माहिती कळताच त्यांनी 'आरे'मध्ये धाव घेतली. आता अनेक आंदोलकांना अटक करून १४४ कलम लावलं आहे.
लाइव्ह अपडेट
नोबेल पारितोषिक
ह्या वर्षीचे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक जेम्स पीबल्स, मायकेल मेयर आणि दिदियर किलोझ (उच्चारात चूभूदेघे) ह्या तीन खगोलशास्त्रज्ञांना विभागून मिळाले आहे. प्रेस रिलीझ.
हा प्रतिसाद नव्या धाग्यात इथे सापडेल.
ब्रेक्झिट
ब्रेक्झिटचा सारांश. An Election Is the Only Answer for Britain इथून उद्धृत -
“I’m just saying if I narrowly decided to order fish at a restaurant that was known for chicken, but said it was happy to offer fish, and so far I’ve been waiting three hours, and two chefs who promised to cook the fish had quit, and the third one is promising to deliver the fish in the next five minutes whether it’s cooked or not, or indeed still alive, and all the waiting staff have spent the last few hours arguing about whether I wanted battered cod, grilled salmon, jellied eels or dolphin kebabs, and if large parts of the restaurant appeared to be on fire but no one was paying attention to it because they were all arguing about fish, I would quite like, just once, to be asked if I definitely still wanted fish.”
बँक राष्ट्रीयीकरणाला पन्नास वर्षं
बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला पन्नास वर्षं झाली त्यानिमित्ताने आलेले काही लेख (ऐसीकरांकडून साभार) -
बुडिताची सुवर्णजयंती = प्रदीप आपटे
Was bank nationalisation, 50 years ago, Mrs Gandhi's biggest gift or blunder? शेखर गुप्ता (साभार : नितिन थत्ते)
The 1969 bank nationalization did India more harm than good - निरंजन राजाध्यक्ष (साभार : सहज राव)
Banks will remain political fiefdoms till privatized - स्वामिनाथन अंकलेसतिया अय्यर (साभार : मनोबा)